तसे विचित्र पोजेस देऊन स्वतःचे कसलेही फोटो काढून घेण्यात नेतेलोक मग्न असल्याचे आपण सर्वांनी पाहिलेच आहे, पण एखाद्या विशेष खात्याचा मंत्री त्या खात्याचं मोजमाप काटा घेऊन मोजताना मी तरी पहिल्यांदाच पाहतोय.
दप्तरांचे ओझे वाढते आहे वाढलेले आहे हि काही आत्ताची बोंब नाही. व ते निश्चितच कमी व्हायला/ करायला हवे. निर्विवाद.
ते किती वाढतेय यावर बर्याच वाहिन्या/ संस्थांनी सर्वे देखील केलेत पण म्हणून मंत्री महोदय लगेच काटा घेऊन मोजायला निघालेच. अरे काय !!
मी या फोटोचं रसग्रहण वगैरे लिहित नाही पण हा फोटो पाहिल्या पाहिल्या आधी मजा वाटली मग आश्चर्य आणि मग खेद.
या फोटोत शी-कि-श्यान मंत्री दप्तराचं ओझं काट्याला लाऊन भलतेच एक्स्प्रेशन देताना दिसतात. व दप्तराचा मालक(हमाल म्हणा हवं तर) त्यांच्याकडे बघत असताना "नेमकं आजच कमी आणलं राव" असे एक्स्प्रेशन देताना दिसतोय.
तर ह्या दुसर्या फोटोत सगळ्या चिमण्या "कोण ग हा @#@$?" असा चिवचिवाट करताना दिसताहेत. (निदान मला तरी)
या पुढे पुस्तकातील मजकूर, गुणवत्ता लक्षात न घेता त्याच्या वजनावर मुलांचे भविष्य लिहितील शी-कि-श्यान मंत्री असा विचार आला कि त्यांच्या हातातील काटा माझ्या अंगावर येतो.
प्रतिक्रिया
14 Feb 2015 - 11:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर
नावाप्रमाणेच हा गृहस्थ विनोदी दिसतो आहे. असो.
नुकतेच सत्तेवर आले आहेत. काही महिने माफ करुया असे ह्यांचे मत.
15 Feb 2015 - 12:18 pm | रमेश आठवले
विनोद तागडे ?
14 Feb 2015 - 1:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आता आरोग्य खात्याच्या किंवा क्रिडा खात्याच्या कामसु मंत्र्यांनी सनी लिओनची भेट घ्यायला हरकत नाही नै? =))
बाकी ह्या मंत्र्यांना रोज फायलींचं ओझं पाठीवर घेउन मंत्रालयात हाकलायला पाहिजे.
15 Feb 2015 - 11:39 am | टवाळ कार्टा
आरोग्य मंत्र्यांनी काय घोडे मारले मग ;)
14 Feb 2015 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, आवरा राव यांना. विविध दैनिकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तारांचे ओझ्यावर थोरा-मोठ्यांची मतं मागितली आणि मग शाळेत दप्तर ठेवलं पाहिजे, वेळापत्रकं बदलली पाहिजे, अशा विविध सुचना आल्यात त्यावर कार्यवाही केली पाहिजे ते सोडून खर्रच का दप्तारांच एवढं ओझं होतं आणि ते खरंच आहे का हे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणा-या मंत्र्यांना आपला सलाम आहे.
चलने दो, अच्छा चल रहा है.
-दिलीप बिरुटे
15 Feb 2015 - 4:36 am | कुंदन
पुडी काढा राव, बार लावु या.