"बकेट लिस्ट "

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
2 Feb 2015 - 11:53 am
गाभा: 

कालच "बकेट लिस्ट " हा चित्रपट पाहिला ,त्यावरच्या चर्चेत एका साईट वर एक किस्सा होता - एका वेबसाईटने survey केला ,त्यात 10000 लोकांची मते मागवली होती, की तुम्हाला तुमच्या मृत्युची निश्चित तारीख सांगितल्यास तुम्ही काय कराल ? आश्चर्य म्हणजे 80% लोकांनी आपल्या मृत्युची तारीख जाणून घेण्यात रस नाही ,असे मत नोंदवले ! आपल्यापैकी किती जणांना मृत्युची तारीख जाणून घेणे आवडेल ? व तसे समजल्यास आपल्या जीवनात व जीवनशैलीत कायकाय बदल करावेसे वाटतील?

प्रतिक्रिया

मला वाटते जीवनातील खरी गंमत आहे ती काही गोष्टीचा आपल्याला कधीच पत्ता लागणार नाही या अवस्थेची. जन्म आपल्या हातात नसतो ही तर सत्यच गोष्ट पण मिळालेले जे जीवन आहे ते किती स्पृहणीय आणि रंगतदार करावे, त्याची जडणघडण कशी असावी याची स्वप्ने आपण पाहू शकतो, किंबहुना त्याना प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या काही बाबी कराव्या लागतात ते करण्याकडेही कल असतो....काही यशस्वी होतात तर काही अयशस्वी....सारेच काही आनंदीच असते अशातील भाग नसतो, तरीही "जीवन गड्या हे प्यारे...." ही धून गाण्याची हौस सदैव राहते..... मात्र मृत्यू म्हणजे काय हे जरी माहीत असले तर आपली त्याच्याशी गळाभेट कधी व्हावी असे वाटत नसते. होणार केव्हातरी हे कटू असले तरी सत्यच होय, तरीही ती भेट कधी होणार हे माहीत नसल्यामुळेच ललाटी आलेल्या जीवनाची गोडी चाखण्यातील मजा नेहमीच हर्षदायक असते.

जाणून घेऊच नये मृत्यूची तारीख...! विज्ञानाच्या चमत्कारीक वाटणार्‍या कित्येक गोष्टी आहेतच, पण म्हणून मृत्यूची तारीख जाणून घेऊन आहे त्या आनंदाला मुकण्यात काय हशील ? येण्याच्या वेळी तो अगदी श्रीखंडपुरीचे जेवण खाताना देखील येऊ शकतोच....सबब त्याच्या भीतीने जीवनशैलीत बदलदेखील करू नयेत.> सन्दर्भ- अशोक / मायबोली . मी पूर्णतः सहमत नाही !

विटेकर's picture

5 Feb 2015 - 9:31 am | विटेकर

स्तिफन कोवेच्या सात सवयी प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात स्वतःच्या मृत्युची कल्पना करून आपल्या आयुष्याचे मिशन स्तॅट्मेन्ट लिहावे असा एक भाग असतो . मी जेव्हा हे प्रशिक्षण घ्यायचो त्यावेळी अतिशय लोकविलक्षण अनुभव घेतले आहेत. लोक ढ्सा ढ्सा रडतात .. त्या भागच्या वेळी .. एक ट्रेनर म्हणून अतिशय च्यालेन्जिन्ग भाग असायचा माझ्यासाठी तो !
माझ्या मते, माणसाला मृत्युचे स्मरण असले पाहिजे (पण भय नव्हे !) समर्थांनी स्प्ष्टच लिहिले आहे ....
मरणाचे स्मरण असावे | हरिभक्तिसी सादर व्हावे |
किंवा
आपणांस आह मरण | म्हणोन राखावे बरवेंपण ||
त्यामुळे मरणाची तारिख माहित अस्लि काय किन्वा नसली काय , आपण गाठोडे बांधून तयारच असले पाहीजे.
सततच त्या तयारीत असल्याने पश्चाताप व्हावा असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडत नाही.
हे फक्त हिन्दू तत्वज्ञान सांगते असे नाही तर , डि - डे / कयामत या ही संकल्पना आहेत.
अनेकांना माहिती असलेली एकनाथ महाराजांची गोष्ट - एकदा एक माणूस सदासर्वदा लोकांना छळत असे , म्हणून नाथांनी त्याला बोलावून सांगितले की मला सांगायला दु:ख होते की आजपासून आठ दिवसांनी तुझा मृत्यु होणार आहे !
तो घाबरलेला माणूस त्या आठ दिवसात अतिशय चांगला वागतो , अर्थात आठ दिवसात तो काही मरत नाही आणि मग नाथ त्याला सांगतात बाबा रे , मरणाचे स्मरण कायमच असावे म्हणजे दुष़्र्कृत्य होत नाही ..

तात्पर्य : आपण सतत मरणाच्या स्मरणा त असू तर ते एकूण आयुष्याचे सार्थक होण्याच्या डृष्टीने चांअगलेच म्हणता येईल.

मरणाची तारिख माहिती करून घ्यावी का ?
मी करून घेईन .. पण त्याने मला काही ही फरक पड्णार नाही ... इथून पुढे ही .. जीणे गंगौघाचे पाणी असे असण्याचा प्रयत्न करीन.

- मग ८० % लोकांना का माहीती करुन घ्यायची नाही ?

कारण मरणाबद्दल अनामिक भिती आणि eat / sleep/ drink मधून बाहेर पडायचे नाही !

पैसा's picture

12 Feb 2015 - 10:12 am | पैसा

मला पण मृत्यूची तारीख माहीत करून घेण्यात रस नाही. वरचे दोन्ही प्रतिसाद आवडले.

मृत्युन्जय's picture

12 Feb 2015 - 10:32 am | मृत्युन्जय

मृत्युची तारीख माहिती होणे शक्य नाही हे लोकांना माहिती असते म्हणुन ते "मला त्यात रस नाही" असे म्हणतात (मी इथे प्रतिसाद देणार्‍या लोकांबद्दल नाही बोलत. जनरल टेंडन्सी सांगतो आहे. प्रत्यक्षात अशी सहजासहजी तारीख कळायला लागली तर बरेच जण जाणुन घेतील.

मी स्वतः खालील गोष्टी करेनः

१. १०० कोटींचा विमा उतरवुन घेइन.
२. आहेत ते सगळे पैसे उधळुन टाकेन. ऐष करेन. विदेश भ्रमण करुन येइन. बिझिनेस क्लास ने प्रवास करेन (बायकोला विम्याचे पैसे मिळतीलच ;) )
३. सगळ्यांचा निरोप घेइन. एरवी ती संधी मिळणारच नाही.
४. कळत नकळत दुखावले गेलेल्यांची माफी मागेन. ये जानेवाला है हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा ते सुद्धा माफ करतील.
५. मागे राहणार्‍यांची व्यवस्थित सोय लागते आहे की नाही ते बघेन
६ आणि जाण्यापुर्वी एक शेवटचा दिवस बायको बरोबर निवांत गप्पा मारेन. सगळ्या भानगडीत ही गोष्ट नेहमी राहुनच जाते.

यातील प्रत्येक गोष्ट मी आत्ताही करु शकतो पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आयुष्य गृहीत धरावे लागते. अकाउंटिंग मधले गोइंग कन्सर्न बेसिस हे सूत्र धरुन आयुष्य चालवावे लागते. त्यात हे सगळे मुद्दे बॅकसीट वर जातात किंवा काही गोष्टी अवास्तव ठरतात (१०० कोटींचा विमा, पैसे उधळणे वगैरे)

कोंबडी प्रेमी's picture

12 Feb 2015 - 11:18 am | कोंबडी प्रेमी

अति तपशील नकोतच आयुष्यात .... उपयोग काही नाही आणि एक बौद्धिक मैथुन मात्र थकवणारे ...