कोण जिंकणार दिल्ली?

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
29 Jan 2015 - 8:43 pm
गाभा: 

अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.

प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.

दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.

परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.

बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.

सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

प्रतिक्रिया

ग्रेटथिंकर's picture

7 Feb 2015 - 2:48 pm | ग्रेटथिंकर

आआपला मिळणार भरघोस पाठिंबा बघुन भाजप चक्क गडबडलेला दिसतोय, बिनबुडाचे आरोप करणे चालु आहे. किरण बेदिही हडबडल्यासारख्या आज वागत आहेत, प्रचार संपुणसुद्धा त्या दिल्लीत आज मतदानादिवशी प्रचार करत फिरत होत्या, आपने तशी तक्रार केली आहे इसीकडे.

बरेच दिवस दिसला नाहित.. माई सांगत होत्या कि तुमचे मुळव्याधीचे ऑपरेश्न झाल्या पासुन तुम्हि सतत पालथे पडुन असता म्हणुन. पण मला खात्रि होति दिल्लि निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हि आपली पायधुळ इथे झाडाल. बाकि सगळे ठिक... माई काय म्हणतायत्..सचिन कसा आहे..... काँग्रेस नि सकाळिच जाहिर केल आहे कि ते निवडणुकिनंअतर जाहिर करणार आहेत कि ते आप ला पाठींबा दयायचा कि नाहि... लडने से पहले हि पप्पु ने हार मान लि या तो आप और पप्पु मिले हुए है.

प्रतापराव's picture

7 Feb 2015 - 2:55 pm | प्रतापराव

आपचा उदय होणे हि काळाची गरज आहे. सध्याचे पक्ष त्यातील ते कार्यकर्ते,घराणेशाही लाचारांच्या फौजा पाहून हेच आपल्या भवितव्याचा देशाचा निर्णय घेणारे लोक हे वाटून विषन्न व्हायला होत होते. आपच्या रूपाने दिल्लीकरांना एक समर्थ पर्याय मिळाला आहे. राजकारणाचे प्रचलित रूप बदलायलाच हवे नि त्यात कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा नि तो घेताना केजरीवाल हे दिसतायत.केजरीवाल हे योग्य आहेत कि नाहीत हे येणारा काळच सांगेल मात्र इतर पक्ष ज्यांना पुरेशी संधी मिळालेली आहे ते सारखेच आहेत ह्यात काही शंका नाही.

नांदेडीअन's picture

7 Feb 2015 - 3:08 pm | नांदेडीअन

+ १

नांदेडीअन's picture

7 Feb 2015 - 3:09 pm | नांदेडीअन

आप आल्यामुळे इतर पक्षांना एक प्रकारची भिती असेल की पुढच्या वेळी निवडणुकीला सामोरे जाताना नुसते बोलबच्चन देऊन भागणार नाही.
आपचा प्रभाव वाढू द्यायचा नसेल तर कॉंग्रेस-बीजेपीलासुद्धा काम करावे लागेल.
आणि कॉंग्रेस-बीजेपीवाले जर प्रामाणिकपणे काम करायला लागले तर आपची गरजच भासणार नाही.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 3:29 pm | पिंपातला उंदीर

हे बघा यान्चे उमेद्वार

http://www.bhaskar.com/news-ht/UT-DEL-NEW-aap-candidate-beaten-up-for-st...

बरेच दिवस दिसला नाहित.. माई सांगत होत्या कि तुमचे मुळव्याधीचे ऑपरेश्न झाल्या पासुन तुम्हि सतत पालथे पडुन असता म्हणुन. पण मला खात्रि होति दिल्लि निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हि आपली पायधुळ इथे झाडाल. बाकि सगळे ठिक... माई काय म्हणतायत्..सचिन कसा आहे..... काँग्रेस नि सकाळिच जाहिर केल आहे कि ते निवडणुकिनंअतर जाहिर करणार आहेत कि ते आप ला पाठींबा दयायचा कि नाहि... लडने से पहले हि पप्पु ने हार मान लि या तो आप और पप्पु मिले हुए है.

ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री.श्रीगुरुजी आणी समस्त मिपाकराचा सत्कार मोफत लाईट,पाणी आणी एक एक 120/300 किवाम पान देण्याची घोषणा करुन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

ग्रेटथिंकर's picture

7 Feb 2015 - 8:19 pm | ग्रेटथिंकर

फुलचंद स्पेशल, रिमझीम ज्यादा टाकून पान द्या.

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 8:40 pm | श्रीगुरुजी

ही तुझ्या 'ह्यां'ची पसंती दिसतेय.

कपिलमुनी's picture

7 Feb 2015 - 11:13 pm | कपिलमुनी

भगवी चड्डी आणि पांढरी गांधी टोपी असा पूर्ण पोशाख देण्यात येत आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2015 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३५ सिट येणार आपला आणि आपच सरकार यावं ही इच्छा !
बाकी चालु द्या.

दिलीप बिरुटे

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 7:27 pm | पिंपातला उंदीर

सगळ्या exit poll नुसार आप च सरकार बनत आहे . दोन दिवसापासूनच हा कल मोदी सरकार विरुद्ध नाही अस सांगण्याची केविलवाणी कसरत करत आहे . इथे मिपा वरचे भक्त पण थोड्या फरकाने तेच करत आहेत म्हणा . मला वैयक्तिक अस वाटत की अजूनही भाजप आणि आप ला समान संधी आहे

सुबोध खरे's picture

7 Feb 2015 - 7:54 pm | सुबोध खरे

आगाउपणा असेल.( मी यातील तज्ञ नाही किंवा तसा कोणताही दावा नाही)
पण जे एक्झिट पोल पहिले त्यांचे अंदाज दुपारी ३ पर्यंतचे आहेत त्यामुळे कदाचित भाजप शेवटच्या क्षणी बाजी मारून जाईल असे वाटते. तीन पर्यंत मतदान न केलेल्या त्यांच्या उमेदवारांना संघ कार्यकर्त्यांनी शिस्तशीरपणे उठवून मतदान करायला लावले असे ऐकतो आहे यामुळे हा फरक पडेल असे वाटते.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 8:19 pm | पिंपातला उंदीर

हे आकडे ३ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाचे आहेत - ३-६ या काळात आपचे आकडे वाढते आहेत. बाकि wishful thinking आहेच

ग्रेटथिंकर's picture

7 Feb 2015 - 8:24 pm | ग्रेटथिंकर

सगळे exit pole खोटे आहेत ,बीजेपीला सत्तर जागा मिळणार आहेत-इतिश्रीगुरुजी :ROFL:

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 8:27 pm | पिंपातला उंदीर

लवकरच गुर्जी unreal times किंवा faking news ची एखादी लिंक देऊन आपली तोंड बंद करतील . बघाच तुम्ही *lol* *LOL* :-)) :))

दुश्यन्त's picture

7 Feb 2015 - 8:40 pm | दुश्यन्त

+१

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 8:41 pm | श्रीगुरुजी

माझी कोणतीही लिंक खोटी नसते. खोटं बोलायला मी थोडाच आपटार्ड आहे!

माझी कोणतीही लिंक खोटी नसते. खोटं बोलायला मी थोडाच आपटार्ड आहे!

पहिले वाक्य बरोबर असेन ही .. एक मिपाकर म्हनुन आप्लय मतांचा आदर आहेच.
पण दुसरे वाक्य चुकीचे आहे. हे भाजप सम्र्थक कधी दुसर्‍यांना येव्हडे तुच्छ समजणे बंद करणार काय माहीत .

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 8:43 pm | श्रीगुरुजी

अरे नान्या, जरा १० तारखेपर्यंत तरी थांब. लगेच नाचायला लागलास. :YAHOO:

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 8:33 pm | पिंपातला उंदीर

मोदी -कितने आदमी थे ?
शाह -सरकार वह "1 "ही है !
मोदी - और तुम ?
शाह -सरकार 400 एम .पी ,एम एल ए.200000 आर यस यस वर्कर +मिडिया ...
मोदी -फिर इतने टेंसन में क्यों हो ?
शाह -सरकार सब कुछ करके देख लिया ...अब कुछ ना हो पायेगा ...यहाँ तक केजरी के चेले ई .वी .एम .मशीन भी चेक कर रहे हैं .
मोदी -अब क्या करो गे?
शाह -जीत गये तो मोदी ..मोदी ..मोदी ..
..... .हार गये तो बेदी ....बेदी ...बेदी !

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 8:39 pm | श्रीगुरुजी

मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्यांचे अंदाज

(१) इंडिया टीव्ही - सी-व्होटर
आआपः ३१-३९, भाजपः २७-३५, काँग्रेसः २-४

(२) इंडिया टुडे - सिसेरो
आआपः ३५-४३, भाजपः २७-३५, काँग्रेसः ३-५
(यात आआप व भाजपच्या सरासरी जागांची बेरीज ७० आहे. काँग्रेसला ३-५ जागा कशा मिळणार?)

(३) एबीपी-नेल्सन
आआपः ३९, भाजपः २८, काँग्रेस: ३

(४) टुडेज चाणक्य
आआपः ४२-५४ (४०-४६% मते), भाजपः १६-२८ (३४-४०% मते), काँग्रेसः ०-२ (१०-१६% मते)

(५) न्यूज नेशन
आआपः ३९-४३, भाजपः २५-२९, काँग्रेसः १-३

(६) इंडिया न्यूज - अ‍ॅक्सिस
आआपः ४६-६०, भाजपः १०-२४, काँग्रेसः ०-२

मतदानपूर्व चाचण्यांचे अंदाज गोंधळात टाकणारे व उलटसुलट होते. याउलट मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व अंदाज एकच स्पष्ट कौल दर्शवितात. बहुतेकांचे अंदाज आआपला बहुमत देणारे आहेत. काँग्रेसची कामगिरी अत्यंत निष्प्रभ ठरेल यावरही सर्व चाचण्यांचे एकमत आहे. बरं झालं आआपला स्पष्ट बहुमत मिळतंय ते. आता काँग्रेसची गरज नाही. आता मजा येईल.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 8:45 pm | पिंपातला उंदीर

बाकी गुर्जी मजा कशी येईल .
उत्सुक अमोल

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2015 - 8:48 pm | श्रीगुरुजी

जरा विचार करा. लगेच लक्षात येईल.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 8:51 pm | पिंपातला उंदीर

आल लक्षात . See you in another battle then .

ग्रेटथिंकर's picture

7 Feb 2015 - 8:47 pm | ग्रेटथिंकर

भाजपचा पुरता सुपडासाफ होताना दिसतोय, पण गुर्जींना आनंद कशाचा तर काँग्रेस हारतेय याचा !
आता मोदींचे क्रॉनी कॅपिटॅलीझम आणि केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार यात तुलना होईल व बड्या उद्योगपतींच्या हातचे बाहुले असलेले भाजप व मोदी पुर्ण झाकोळुण जातील.

रच्याकने, आप चा प्रवक्ता प्रो.आनन्द कुमार वृत्त वाहिनि वर म्हणाले कि खेजरीवाल ला कंन्ट्रोल करणे हि आता मीडिया ची जबाबदारि आहे ह्यातच सगळे आले. ह्याला आणि ह्याच्या पंटर लोकाना मिडियानेच तर बनवले आहे. आधिच मर्कट त्यात प्यालेला.. दुद्रैव दिल्लिच जर हे आकडे प्रत्यक्षात उतरले तर. ग्रेटथिंकर नाना काहि दिवस असेच येत रहा मिपा वर मग बघुया मफलर म्यान चा स्वच्छ कारभार. त्याला आता शेपुट घालुन पळता हि येणार नाहि आणि राज्यकारभार तर मुळिच जमणार नाहि. मग आहेच मोदिं च्या नावाने गळा काढणे आणि आंदोलनाचा तमाशा.

बरं झालं आआपला स्पष्ट बहुमत मिळतंय ते. आता काँग्रेसची गरज नाही. आता मजा येईल.

हा अ‍ॅटीट्युड बदलला पाहिजे सर्वांचा.. जर आप पुर्ण बहुमतात आले तर आप सर्व वचनांना खरे जागेन.. ह्या एकाच गोष्टीमुळॅ लोकांना भाजप आणि कॉन्ग्रेस ला पर्याय हवा आहे.. आम्ही असे केले आम्ही हे करु शकलो नाही तर तुम्ही १५ वर्षात काय केले असले तरी आप बोलणार नाही. पाहुच

फक्त मजा म्हणुन आणि विरोधाला विरोध म्हणुन आप निवडनुकीत उतरली नव्हती. आप म्हणजे नाशिक मध्ये महानगरपालिकेत सत्ता मिळालेली म.न.से नाही की भाजप कॉन्ग्रेस सारखी निवडनुकां नंतर लोकांशी संपर्क न करणारी पार्टी ही नाही.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 8:43 pm | पिंपातला उंदीर

बाकी कॉंग्रेस मुक्त नारा देणार्या भाजपाला या निवडणुकीत कॉंग्रेस चा performance चांगला हवा होता . त्याना दिल्ली कॉंग्रेस मुक्त नको होती . For obvious reasons . पण राहुल गांधी यांनी इथे पण निराशा केली . जो केजरीवाल फेकू ला पुरून उरतो तो पप्पू ला कसला ऐकतो

प्रतापराव's picture

7 Feb 2015 - 8:54 pm | प्रतापराव

जर चाचण्यां नुसार निकाल लागला तर हा भारतातला एक एतेहासिक विजय असेल. बलाढ्य केंद्रसरकार, जवळपास २००००० संघाचे कार्यकर्ते, १२० खासदार, प्रचाराची सर्व साधने अमाप खर्च ह्याविरुद्ध एकटे केजरीवाल नि त्यांनी उभी केलेली सुशिक्षित युवकांची फौज ह्यांचा हा विजय प्रस्थापित राजकारणा विरुद्धचा निकाल असेल. आणि हा विजय न जातीवर आधारित असेल न धर्मावर असेल तो असेल सर्वसामान्य जनतेचा स्वताला सत्तेच्या अहंकारामुळे खास समजणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध्चा विजय....

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 9:03 pm | पिंपातला उंदीर

त्याना एका धर्मगुरू (इमाम बुखारी ) ने पाठींबा दिला होता . हिम्मत बघा आप ने तो नाकारला . भाजप आणि कॉंग्रेस यातून काही शिकतील का हा प्रश्न आहे

रच्याकने, आप चा प्रवक्ता प्रो.आनन्द कुमार वृत्त वाहिनि वर म्हणाले कि खेजरीवाल ला कंन्ट्रोल करणे हि आता मीडिया ची जबाबदारि आहे ह्यातच सगळे आले. ह्याला आणि ह्याच्या पंटर लोकाना मिडियानेच तर बनवले आहे. आधिच मर्कट त्यात प्यालेला.. दुद्रैव दिल्लिच जर हे आकडे प्रत्यक्षात उतरले तर. ग्रेटथिंकर नाना काहि दिवस असेच येत रहा मिपा वर मग बघुया मफलर म्यान चा स्वच्छ कारभार. त्याला आता शेपुट घालुन पळता हि येणार नाहि आणि राज्यकारभार तर मुळिच जमणार नाहि. मग आहेच मोदिं च्या नावाने गळा काढणे आणि आंदोलनाचा तमाशा.

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 9:28 pm | पिंपातला उंदीर

आता हा कोणत्या आय डी चा डू आय डी ? कळवावे

होबासराव's picture

7 Feb 2015 - 9:32 pm | होबासराव

हा डू आय डी नाहि आहे हो..जसे तुम्हि पिंपातला उंदीर तसे आम्हि होबासराव.. बाय द वे तुम्हि कुठल्या दुसर्या आय डि ने वावरता :)

पिंपातला उंदीर's picture

7 Feb 2015 - 9:38 pm | पिंपातला उंदीर

माझा एकच आय डी आहे . आणि तो १० आय डी च्या बरोबर आहे . माझे profile बघा . कळेलच

जेपी's picture

7 Feb 2015 - 9:34 pm | जेपी

मस्त चर्चा...
एक अंदाज

भाजप 36
आप 24
कॉं 10
खोट ठरल तर आनंद आहे.

रच्याकने-आनंद कभी मरते नही...

होबासराव's picture

7 Feb 2015 - 9:35 pm | होबासराव

वर्हाड प्रांति होबासक्या करणे म्हणजे आगाउ पणा करणे... :)

प्रतापराव's picture

7 Feb 2015 - 9:57 pm | प्रतापराव

भाजपा नि कॉंग्रेस हे धर्मावर आधारित राजकारण करण्यात पटाईत आहेत. सामान्य लोकांशी त्यांना घेणे आहे ते फक्त मतापुरते. आता भाजपला लोकसभेत बहुमत मिळाले तेव्हा मी तरी मोदींच्या विकासाच्या आश्वासनाला भुलून मत दिले मात्र आता देशातील परिस्तिथी धार्मिक बनत चालली आहे कोण म्हणतोय 'हम दो हमारे दस' सगळा गोंधळ चाललाय.. एकेकाची विधाने एकूण त्यांच्या बालबुद्धीची कीव येतेय .

श्रीगुरुजी's picture

9 Feb 2015 - 8:57 pm | श्रीगुरुजी

आज काही वाहिन्यांवर बातमी पाहिली. ७ तारखेला मतदान झाल्यापासून आआपचे काही उमेदवार व कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर २४ तास खडा पहारा ठेवून आहेत. रात्री ते तिथेच बाहेर झोपतात. भाजपने मतमोजणी यंत्रात काही गडबड करू नये म्हणून केजरीवालांनीच पहारा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हा काय मूर्खपणा आहे? भाजपने किंवा इतर कोणत्याही पक्षाने मतदान झाल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात गडबड केल्याचे यापूर्वीचे एखादे उदाहरण आहे का? जर भाजप मतदान झाल्यावर अशी गडबड करू शकतो तर तो मतदानापूर्वीच का करणार नाही? पहारा ठेवण्याचे असे बालिश कृत्य करून आआप व केजरीवाल काय साध्य करणार आहेत? निवडणुक आयोगाची स्वतःची संरक्षण यंत्रणा असते. आजतगायत मतदान झाल्यावर मतदान यंत्रे हॅक करून निकाल बदलण्याचे एकही उदाहरण नाही. मग कशासाठी हे नाटक सुरू आहे?

इलेक्ट्रोनीक ताक पण फुंकुन प्यायला बसलेत आणि काय.

गणेशा's picture

10 Feb 2015 - 11:02 am | गणेशा

असे उदाहरण आहे.. पण एक सामान्य नागरीक म्हणुन मी पुरावा कसे देणार.

चिंचवड विधानसभे मध्ये भाजप कडुन जेथे इतर पक्षाचे उमेदवार आहेत तेथील बरीच मशीन्स कुठलेही बटन दाबल्यास भाजप ला मत देत होती. कायदेशीर तक्रार मोरेश्वर भोंडवे नी केली होती. नाना काटे गप्प राहिले कारण पुढे उगाच त्रास नको आणि हे प्रकरण दाबलेच जाणार होते.

असो.. तुम्हाला अजुनही दुसर्‍यांना मुर्खच म्हणायचे आहे का ? असो ..

सोफ्टवेअर मधेय बदल करुन असे करता येते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2015 - 11:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनाकारण चुकीची माहिती पसरवू नये असे मला वाटतं. मी आत्तापर्यन्त तीन वेळा मतदान केन्द्राध्यक्ष होतो. मतदान यंत्र आम्ही ताब्यात घेतल्यापासून किमान दहावेळा तपासून घेतलेलं असत Mock Poll ( अभिरूप मतदान) घेतलेलं असतं आणि मग मतदान यंत्र प्रत्यक्षात वापरलं जातं.

-दिलीप बिरुटे

गणेशा's picture

10 Feb 2015 - 11:34 am | गणेशा

हो.. पण तपासणारे .. सारीच यंत्रणांना पैसे चारुन हे करता येवु शकते.
असो माझ्याकडे पुरावे नाहीत आणि देता ही येणार नाही त्यामुळे मी शांत बसतो .. पण ही चुकीची माहीती नाहिये.
जसे तुम्ही तपासुन घेता तसेच येथे ही तपासणारे ओळखिचे आहेतच त्यांच्याकडुन पण माहिती घेतली होती.
दुसरी गोष्ट त्या सोफ्टवेअर मधेय बदल करुन असे करता येवु शकते हे कोणी ही सांगु शकते.

त्यामुळे पुरावे नसणारी गोष्ट असु शकते पण चुकीची माहीती मी पसरवत नाहिये .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2015 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालु द्या...!

-दिलीप बिरुटे

गणेशा's picture

10 Feb 2015 - 12:50 pm | गणेशा

पुन्हा निट वाचले..

मतदानापुर्वी असे करु शकतात, मतदान झाल्यावर असे करता येत नाही.
बाकी काही चुकी झाल्यास विसरुन जावे.. कारण या गोष्टीचे पुरावे आपण देवु शकत नाहीत, तेव्हडी ताकद नसते आपणाकडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2015 - 12:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मतदानापूर्वी कसं करता येतं ? किती मतदान झालय हे मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी दाखवतात. रीडिंग शून्य. आणि उमेदवारांच्या नावासमोर शून्य मतदान असते ते सर्वांना दाखवून मतदान सुरु होते.

-दिलीप बिरुटे

गणेशा's picture

10 Feb 2015 - 2:13 pm | गणेशा

मतदान मोजनी पुर्वी असे म्हणायचे होते.
मतदान मशीनच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल करुन कुठले ही बटन दाबले तरी एकाच उमेदवारास वोट जाते. आणि हे आज नाही तर पुढे कधी कोण सापडले तर आठवण ठेवा.

@ गुरुजी , जसे तुम्ही चुकीच्या लिंक आणि गोष्टी सांगत नाही असे जे तुम्ही म्हणता तसे मी थापा मारत नाही.
आता ह्याचा पुरावा माझ्याकडे कसा असेल, मी एक सामान्य वोट देणारा आहे.

बिरुटे सर, तुम्ही मतदान मशीन मधले सोफ्टवेसर बद्दल माहीती दिली तर मग जास्त बरे होयील आणि ती सोफ्तवेअर चीप बदलताच येत नाही असे नसते.

असो पुरावा नसल्याने थापा वाटत असतील तर सोडुन देणे .

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 1:04 pm | श्रीगुरुजी

अहो आता पुरेना थापेबाजी. केजरीवाल अजूनही भंपकपणा करत आहेत. निदान तुम्ही तरी थांबा.

जर भाजपला मतदानापूर्वी किंवा मतदान चालू असताना किंवा मतदानानंतर मतदान यंत्रे हॅक करून निकाल बदलता येत असता तर त्यांनी हे दिल्ली किंवा इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केले नसते का? महाराष्ट्रात १२२ जागांऐवजी १४५ किंवा सर्व २८८ जागा नसत्या का मॅनेज करता आल्या?

गणेशा's picture

10 Feb 2015 - 2:16 pm | गणेशा

चार मशिन्स फक्त भाजपलाच वोटींग करत होत्या हे आधी तपासुन आप ने तसे जाहीर निवेदन निवडनुक अधिकार्‍यांना दिले होते, त्यानुसार बदल झाले.

ठिक आहे , तुम्ही म्हणता तसे करता येत नसेल. पुरावा नसल्याने हा मुद्दा मी पुढे न्हेत नाही, तुम्ही यब्द्दल केजरीवाल ला मुर्ख समजला तरी हरकत नाही.
पण पुढे राष्ट्रवादी कडुन असे कधी होते आहे हे बोलु नका.. कारण बारामतीत पण काही ठिकाणी हे होते अआणि माहीती आहे. पुरावे अर्थातच नाही
एक बारामतीकर

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 2:33 pm | श्रीगुरुजी

त्या यंत्रात तांत्रिक बिघाड होता व तो दुरूस्त करण्यात आला हे निवडणुक आयोगानेच जाहीर केले होते.

एक साधा विचार करा. जर भाजपला ४ मतदान यंत्रात फेरफार करता येत असेल तर उर्वरीत यंत्रात का नाही करता येणार? जर मतदान यंत्रात भाजपला फेरफार करता येत असता तर भाजपने स्वतःची इतकी दारूण अवस्था करून घेतली असती का? उलट भाजपने स्वतःला दोन तृतीयांश जागांची बेगमी करून ठेवली असती.

मी असे म्हणत नाही की भाजप ने तेथे केले आहे, मी हे फक्त सांगत आहे की तसे करता येते.

तुम्ही तांत्रीक बिघाड ज्याला म्हणता तो मॅन्युअली पण करता येते. मी एक सोफ्ट इंजिनिअर आहे . तो प्रोग्रॅम चेंज करुन मी दाखवु शकतो.

कृपया येथे तुम्ही विचारले असे कोठे होते का म्हणुन मी सांगितले. आता सआंगितल्यावर त्याला पाठपुरवठा मी करु शकत नाही म्हणुन मी चुकच असे नाही. ठिक आहे भविष्यात कधी असे निदर्शनास आल्यावरच बोलता येईल.

आणि सर्व ठिकाणी असे केले तरी सर्वांना पैसे चारायला लागतील तसे शक्यतो होत नाही. आणि सगळीकडे भाजपच आल्यावर मशीन चेक करण्याचे आदेश नंतर सर्व पक्ष देवु शकतील

. असो या मुद्द्यावर मी जास्त बोलु शकणार नाही. दिल्लीत भाजप न्मे तसे नसेल केले ही, पण आप मुर्खच आहे असे समजलात म्हणुन सांगितले असे होउ शकते.

वरती जो तुम्ही तांत्रीक बिघाड म्हणता आहे त्यात सर्व वोट भाजप ला जात होते

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 2:53 pm | श्रीगुरुजी

मला फक्त एवढंच सांगा की मतदान झाल्यावर आआप कार्यकर्त्यांना व उमेदवारांना गेले ३ दिवसरात्र मतदानमोजणी यंत्रावर पहारा ठेवायला सांगण्याचा भंपकपणा करण्याचे कारण काय?

निवडणुक आयोगाची स्वतःची सुरक्षा यंत्रणा नसते का?

प्रत्येक मतदान यंत्राला सील नसते का?

या सगळ्यावर अविश्वास दाखवून आणि जणू काही भाजप प्रत्येक मतदान यंत्रातले सॉफ्टवेअर बदलून निकाल बदलणार आहे म्हणून स्वतःच तिथे वेगळा पहारा ठेवण्याचे प्रयोजन काय?

हे सगळे करून केजरीवाल काय साध्य करणार होते? भाजपबद्दल लोकांच्या मनात विनाकारण संशय निर्माण करण्याचे कारण काय? आआपचा पहारा नसता तर भाजप असे खरोखरच करू शकला असता का?

आज विजय मिळाल्यावर सुद्धा माझी बायको केंद्र सरकारी नोकरीत आहे व सरकार तिच्यावर सूड उगवू शकते हे जाहीर मेळाव्यात सांगण्याचे कारण काय?

भाजपवर विनाकारण कपोलकल्पित आरोप करणे केजरीवाल कधी थांबविणार खुदा जाने.

असे झाले असेल तर ते योग्य नाहिये. पहारा देण्यासाठी आयोगाची यंत्रणा आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 3:00 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद!

भाजप वाईट पक्ष असेल, पण विनाकारण या पक्षाचा बागुलबुवा उभा करू नका हे केजरीवालांना कोणीतरी समजावण्याची गरज आहे.

असो.

कपिलमुनी's picture

10 Feb 2015 - 3:16 pm | कपिलमुनी

पंप्र मोदींच्या पत्नीची बातमी दाखवल्याची शिक्षा म्हणून गुजरात सरकारने तिथल्या दूरदर्शन संचालकाची बदली तात्काळ अंदमानला केली !
हा सूड नाहीतर काय आहे ??
आता यात मोदी कदाचित डायरेक्ट इन्वोल्व नसतील पण त्यांचे भक्त तर आहेत ना ? आणि त्यांनी याच्यावर सोयीस्कर मौन पाळले आहे . बाकी हागल्या मुतल्यावर ट्वीट करतात पण अशा घटनांवर नाही !
( हागल्या मुतल्यावर हा देखील * चा मुका घेणे या प्रमाणे वाक् प्रचार आहे)

म्हणून केजरीवाल यांचे सर्व आरोप निराधार नसतात

पिंपातला उंदीर's picture

10 Feb 2015 - 3:20 pm | पिंपातला उंदीर

*lol* *LOL* :-))

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 3:22 pm | श्रीगुरुजी

मुख्यमंत्री राहिलेले आणि भावी मुख्यमंत्री असलेले केजरीवाल आणि गुजरात मधील दूरदर्शनचा संचालक यांच्यात काहीच फरक नाही का?

केजरीवालांच्या पत्नीला त्रास द्यायचा असता तर पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आणि आताच्या भाजप सरकारने यापूर्वीच त्रास दिला नसता का? इतका वेळ कशाला वाट पाहतील ते?

कपिलमुनी's picture

10 Feb 2015 - 3:34 pm | कपिलमुनी

थांक्यू ! कमीतकमी त्या संचालिकेला त्रास दिला हे कबूल केल्याबद्दल !
यापूर्वीच त्रास दिला नसता का?
अहो यापूर्वी केजरीवाल यांनी कुठे मोदी-शहा द्वयीला माती चारली होती ? ( पुन्हा वाक् प्रचार) ..
पूर्वीच्या आणि आताच्या परीस्थितीमधे बराच फरक पडला आहे . एका काळजी करणार्‍या नवर्‍याने बायकोची काळजी बोलून दाखवली.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 3:41 pm | श्रीगुरुजी

>>> यापूर्वीच त्रास दिला नसता का?
अहो यापूर्वी केजरीवाल यांनी कुठे मोदी-शहा द्वयीला माती चारली होती ? ( पुन्हा वाक् प्रचार) ..

केजरीवालांनी त्रास देऊ नये म्हणून आधीच पत्नीला त्रास दिला नसता का? इतका वेळ वाट पाहण्याची गरज काय?

>>> थांक्यू ! कमीतकमी त्या संचालिकेला त्रास दिला हे कबूल केल्याबद्दल !

आपल्या धोरणांविरूद्ध बातमी दिल्यास कारवाई करण्याची दूरदर्शनची फार जुनी परंपरा आहे. १९७९ मध्ये जयप्रकाश नारायण यांचे निधन झाल्याची बातमी देणार्‍या वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते (त्यावेळी जयप्रकाश नारायण गेलेच नव्हते). २-३ महिन्यांपूर्वी चीनच्या पंतप्रधानांचे नाव झी (XI) असे उच्चारण्याऐवजी इलेव्हन असे उच्चारल्याबद्दल गोव्यातील वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते.

>>> एका काळजी करणार्‍या नवर्‍याने बायकोची काळजी बोलून दाखवली.

काळजीबिळजी काही नाही, हा शुद्ध भंपकपणा आहे. जे होणे शक्यच नाही ते भाजप करणार असल्याची विनाकारण ओरड आहे ही. स्वतः साळसूद राहून भाजपचा बागुलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हा. मतमोजणी केंद्रावर पहारा ठेवून हेच केलं होतं त्यांनी.

कपिलमुनी's picture

10 Feb 2015 - 4:25 pm | कपिलमुनी

>>केजरीवालांनी त्रास देऊ नये म्हणून आधीच पत्नीला त्रास दिला नसता का? इतका वेळ वाट पाहण्याची गरज काय?

तेव्हा केजरीवाल यांना एवढा यश मिळेल अशी अपेक्षा नव्हती !

>>आपल्या धोरणांविरूद्ध बातमी दिल्यास कारवाई करण्याची दूरदर्शनची फार जुनी परंपरा आहे. १९७९ मध्ये जयप्रकाश >>नारायण यांचे निधन झाल्याची बातमी देणार्‍या वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते (त्यावेळी जयप्रकाश नारायण >>गेलेच नव्हते). २-३ महिन्यांपूर्वी चीनच्या पंतप्रधानांचे नाव झी (XI) असे उच्चारण्याऐवजी इलेव्हन असे >>उच्चारल्याबद्दल गोव्यातील वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते.

तुम्ही सांगत आहात त्या शुद्ध चुका आहेत !
त्याबद्दल निलंबित करणे योग्य कारण ते चुकीची शिक्षा आहे . पण योग्य आणि खरी बातमी दाखवल्याची शिक्षा ? कारण ती बदली रेग्युलर नव्हती.

बाकी मोदींचा १० लाखाचा सुट हा तुम्हाला भंपकपणा वाटणार नाही .. दिखाउ पणा वाटणार नाही .. तिथे मेक इन इंडिया आठवणार नाही .. याला दुसर्‍याच्या डोळ्यातला कुसळ दिसता पण स्वतःच्या डोळ्यामधला मुसळ दिसत नाही असे म्हणतात .
बाकी तुम्ही भक्त त्यामुळे तुम्हाला सर्व चालते

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 5:12 pm | श्रीगुरुजी

>>> तेव्हा केजरीवाल यांना एवढा यश मिळेल अशी अपेक्षा नव्हती !

जाहीर सभेत कितीही दावे केले तरी प्रत्येक पक्षाला आपली व इतर पक्षांची परिस्थिती माहित असते.

>>> तुम्ही सांगत आहात त्या शुद्ध चुका आहेत !
त्याबद्दल निलंबित करणे योग्य कारण ते चुकीची शिक्षा आहे . पण योग्य आणि खरी बातमी दाखवल्याची शिक्षा ? कारण ती बदली रेग्युलर नव्हती.

दूरदर्शनची स्वतःचे नियम व धोरणे आहेत. त्याविरूद्ध वर्तन केल्यास कारवाई होते. हे निर्णय दूरदर्शन स्वतःच्या अखत्यारीतच घेते. प्रसारभारती आल्यावरसुद्धा या धोरणात बदल झालेला नाही. दूरदर्शनचे अनेक निर्णय हे विचित्र असतात. १९९३ मध्ये दूरदर्शनवर 'खून भरी मांग' हा चित्रपट दाखविला गेला होता त्यावेळी त्या चित्रपटातील शत्रुघ्न सिन्हाचे चित्रीकरण असलेली दृश्ये जाणूनबुजून कापली होती (कारण तो भाजपमध्ये होता). आणिबाणीच्या काळात दूरदर्शनने 'आंधी' चित्रपटावर बंदी आणली होती व त्या चित्रपटातील गायक किशोरकुमारची गाणी छायागीतमध्ये बराच काळ दाखवित नव्हते.

>>> बाकी मोदींचा १० लाखाचा सुट हा तुम्हाला भंपकपणा वाटणार नाही .. दिखाउ पणा वाटणार नाही .. तिथे मेक इन इंडिया आठवणार नाही .. याला दुसर्‍याच्या डोळ्यातला कुसळ दिसता पण स्वतःच्या डोळ्यामधला मुसळ दिसत नाही असे म्हणतात .

या सुटाची किंमत १० लाख कोणी सांगितली तुम्हाला? तुमच्याकडे काय शिंप्याची किंवा कपड्याची पावती आहे का? पुरावा असेल तर द्या.

>>> बाकी तुम्ही भक्त त्यामुळे तुम्हाला सर्व चालते

तुम्हा द्वेष्ट्यांना काहीच चालत नाही.

कपिलमुनी's picture

10 Feb 2015 - 5:58 pm | कपिलमुनी

>>दूरदर्शनची स्वतःचे नियम व धोरणे आहेत. त्याविरूद्ध वर्तन केल्यास कारवाई होते. हे निर्णय दूरदर्शन स्वतःच्या >>अखत्यारीतच घेते. प्रसारभारती आल्यावरसुद्धा या धोरणात बदल झालेला नाही. दूरदर्शनचे अनेक निर्णय हे विचित्र >>असतात. १९९३ मध्ये दूरदर्शनवर 'खून भरी मांग' हा चित्रपट दाखविला गेला होता त्यावेळी त्या चित्रपटातील >>शत्रुघ्न सिन्हाचे चित्रीकरण असलेली दृश्ये जाणूनबुजून कापली होती (कारण तो भाजपमध्ये होता). आणिबाणीच्या >>काळात दूरदर्शनने 'आंधी' चित्रपटावर बंदी आणली होती व त्या चित्रपटातील गायक किशोरकुमारची गाणी >>छायागीतमध्ये बराच काळ दाखवित नव्हते.
खून भरी मांग दाखवला तेव्हा मला आठवता तसा इलेक्शन चालू होता त्यामुळे इनडायरेक्ट प्रचार होइल अशी धारणा झाल्यामुळे त्याचा पात्र कापला होता.

बाकी जे झाले त्याला चूक न म्हणता तुम्ही दुसर्‍याच मुद्द्यावर बोलत आहात . काँग्रेसच्या कालवधीमधल्या चुका दाखवून आता काय साध्य होणार आहे ? भाजपा त्याच चुका करणार असेल तर फरक तो काय ??
त्यामुळे मोदींविषयी बातमी दाखवून जर निष्कारण बदली होत असेल तर हे चूकच आहे हे मान्य करा .
काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण चुका होत होत्या म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवला आहे. ते चुकले म्हणून ही चूक जस्टीफाय होत नाही.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 10:56 pm | श्रीगुरुजी

>>> खून भरी मांग दाखवला तेव्हा मला आठवता तसा इलेक्शन चालू होता त्यामुळे इनडायरेक्ट प्रचार होइल अशी धारणा झाल्यामुळे त्याचा पात्र कापला होता.

त्यावेळी जवळपास कोणतीच निवडणुक नव्हती असे आठवत आहे. समजा असली तरी शत्रुघ्न सिन्हा चित्रपटात दिसल्यामुळे कसा काय प्रचार झाला असता? राजेश खन्ना त्यावेळी काँग्रेसचा खासदार होता व त्याचे चित्रपट मात्र सुरूच होते. आणि महत्त्वाचे म्हणजे केबलवर शत्रुघ्न सिन्हाचे चित्रपट कसे थांबविता येणार होते?

>>> बाकी जे झाले त्याला चूक न म्हणता तुम्ही दुसर्‍याच मुद्द्यावर बोलत आहात . काँग्रेसच्या कालवधीमधल्या चुका दाखवून आता काय साध्य होणार आहे ? भाजपा त्याच चुका करणार असेल तर फरक तो काय ??
त्यामुळे मोदींविषयी बातमी दाखवून जर निष्कारण बदली होत असेल तर हे चूकच आहे हे मान्य करा .
काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण चुका होत होत्या म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवला आहे. ते चुकले म्हणून ही चूक जस्टीफाय होत नाही.

दूरदर्शनवाले आपल्या धोरणानुसार अशी कारवाई करत असतात. मोदींचा त्याच्याशी संबंध नाही.

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 10:49 am | कपिलमुनी

दूरदर्शनवाले आपल्या धोरणानुसार अशी कारवाई करत असतात. मोदींचा त्याच्याशी संबंध नाही.

हा तर कळस आहे ! रेल्वे अपघात झाला तेव्हा लालबहादूर शास्त्री स्वतः रेल्वे चालवत नव्हते किंवा सिग्नल दाखवत नव्हते पण त्यांनी नैतिक जबाब्दारी घेउन राजीनामा दिला .

दूरदर्शनवाले पण सरकारचा एक भाग आहे . मग दूरदर्शनचे धोरण हेच सरकारी धोरण .. त्यामुळे ही बातमी प्रसारीत झाल्यानंतर ती बदली रद्द करणे किंवा त्याचा निषेध करायला हवा होता. पण तो केला गेला नाही याचा अर्थ सरळ आहे की याला मोदींची हरकत नाहिये .
त्यांना मेसेज पास करायचा आहे माझ्याविरूद्ध झापाल तर घरी जाल .

त्यांची विरोधकांना संपवायची वृत्ती यातून दिसून येते जसा की संजय जोशी !

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 12:47 pm | श्रीगुरुजी

पंतप्रधानांनी प्रत्येक स्तरावरल्या नियुक्त्यात किंवा बदल्यांमध्ये लक्ष घातलं किंवा निषेध करत बसले तर देश कधी चालविणार? उद्या ग्रामपंचायतीतल्या एखाद्याची पाणीखात्यातून उंदीर मारायच्या विभागात बदली झाली तरी यात पंतप्रधानांनी लक्ष घातलं पाहिजे अशी तुम्ही अपेक्षा ठेवाल.

पिंपातला उंदीर's picture

11 Feb 2015 - 2:49 pm | पिंपातला उंदीर

भ्रष्टाचाराचे आरोप झाले की पावत्या मागायच्या असा विनोदी प्रकार भक्तांनी सुरु केलेला दिसतोय .

http://www.abplive.in/india/2015/01/27/article486403.ece/How-costly-is-M...

http://www.bbc.com/news/world-asia-india-31034110

http://www.dnaindia.com/india/report-pm-modi-s-name-suit-estimated-cost-...

http://www.standard.co.uk/news/londoners-diary/londoners-diary-only-savi...

बाकी आता तुम्ही शिंप्याची पावती मागताय तर ज्या काळ्या पैशा बद्दल मोदी सरकार आणि भाजपा गळा काधत आहे त्या सर्व अकाउंटचे नाव नंबर आणि बॅलन्सशीट असतीलच तुमच्याकडे.. तेवढ्या द्या म्हणजे झाला

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 11:00 pm | श्रीगुरुजी

हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो. प्रत्येक जण आपल्या मनाने सूटची किंमत ठरवत असतो. आआपवाले तर सांगत होते की सूटवर जी पिवळ्या रंगाची शिवण दिसत होती तो प्रत्यक्षात सोन्याचा धागा आहे. आआपवाल्यांनी काय गाडगीळांकडे जाऊन सोन्याची शुद्धता तपासली होती की काय? एकजण उठतो आणि सूट १० लाखाचा सांगतो, लगेच दुसरा उठतो आणि सूट १५ लाखाचा सांगतो, ... याला काही अर्थ आहे का? सूटच्या कापडाची आणि शिंप्याची पावती असेल तरच विश्वास ठेवता येईल.

अर्धवटराव's picture

10 Feb 2015 - 11:04 pm | अर्धवटराव

एका भक्ताने नमोंना ते कापड भेट दिलं होतं. नमोंनी त्याचा कोट शिवला. नमोंच्या लेखी त्याची किंमत केवळ शिलाईचा खर्च. १५ लाखाची शिलाई आकारणारा शिंपी मनिष मलहोत्रा असावा काय? ;)

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 10:42 am | कपिलमुनी

अशे आरोप झाल्यानंतर पंप्र किंवा त्यांच्या कार्यालयाने किंवा भाजपाने उत्तर देणे गरजेचे होते . पण आरोपांचे खंडन केले नाही. बाकी गोलमेज परीषदेला उघडे जाणारे गांधीजी किती महान होते ते पुन्हा एकदा रीयलाइ़ज झाले .

अर्धवटराव's picture

11 Feb 2015 - 10:58 am | अर्धवटराव

अशे आरोप झाल्यानंतर पंप्र किंवा त्यांच्या कार्यालयाने किंवा भाजपाने उत्तर देणे गरजेचे होते .

पंतप्रधान व्यक्तीने काय कपडे घातले, त्याची किंमत किती होती, कुठुन शिवले, कोणि ते कापड भेट दिलं याचं स्पष्टीकरण पंप्र कार्यालय किंवा भाजपने द्यायला हवं होतं? आय काण्ट बिलीव्ह इट.

तसंही आपल्या देशकारणाला आणि राजकारणाला गरिबीचं उदात्तीकरण करण्याची विचित्र हौस आहेच.

बाकी बापुंबद्दल काय बोलणार... त्यांच्या साध्या लाईफस्टाईलच्या महागड्या किंमतीबद्दल सरोजनी नायडुंचे उद्गार प्रसिद्ध आहेतच. असो.

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 1:26 pm | कपिलमुनी

नक्कीच आहे .
पण दोन्ही बाजूंना आहे

चायवाला पासून ते मोदी किती गरीबीतून कष्ट करून वाढले आहेत हे गरिबीचं उदात्तीकरण भाजपावाले पण करतात ..
राग " गिरे तो भी टांग उप्पर " या वृत्तीचा आहे . पोकळ समर्थन आणि दुसर्‍यांवर आरोप !
बाकी रागां ला शहजादे म्हणायचे आणि आपण सुद्धा तसेच वागायचे यालाच दुटप्पीपणा म्हणतात

अर्धवटराव's picture

11 Feb 2015 - 9:25 pm | अर्धवटराव

गरिबीतुन कष्ट करुन वर येणं आणि दुसर्‍याच्या पैशातुन गरिबी विकत घेणं जर तुम्हाला सारखं वाटत असेल तर त्यावर माझं काहि म्हणणं नाहि.

आणि तसंही, या सध्याच्या राजकारणाच्या साठमारीत उगाच त्या गांधीबाबाला घुसडणं मला पटत नाहि. असो.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 12:52 pm | श्रीगुरुजी

पंतप्रधानांवर गेला बाजार असे अनेक आरोप रोज होत असतात. अशा प्रत्येक आरोपाला उत्तर ते देत बसले तर दिवसाचे ४८ तास करून सुद्धा पुरणार नाहीत. अशा खोडसाळ आणि निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करणेच योग्य.

मग हेच उद्या मुख्यमंत्र्यांना पण लागु होणार आहे हे लक्षात राहुद्या. आणि व्यर्थ आरोप करु नका

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 10:44 am | कपिलमुनी

सर्व आरोपांना पावत्या मागत असाल तर काळ्या धनाच्या पावत्या , पुरावे कुठे आहेत ?
भाजपा नुसते आरोप करत होती . आता ९ महिने झाले .. कुठे आहे काळा पैसा ?? किमान पुरावे तरी जाहिर करा

अर्धवटराव's picture

11 Feb 2015 - 11:02 am | अर्धवटराव

काळ्या धनाच्या 'पावत्या' आणि त्या 'दाखवणे' याबद्दल आपल्या काय अपेक्षा आहेत? किंवा त्याबद्दल आपल्या काय कल्पना आहेत असं विचारणं जास्त सयुक्तीक ठरेल.

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 11:24 am | कपिलमुनी

काय अपेक्षा आहेत

गुर्जींना मोदींच्या कपड्याची पावती किंवा शिंप्याच्या बिलाची पावतीची जी अपेक्षा आहे ना तीच !
कारण मला माहीत आहे पंप्रच्या शिंप्याची आणि काळ्या धनाची कोणतीही खरी पावती अस्तित्वातच नसते !

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 12:50 pm | श्रीगुरुजी

जर शिंप्याची पावतीच अस्तित्वात नसते तर कशाच्या जीवावर तुम्ही सुटाची किंमत १० लाख ठरविलीत? उगाच हवेत काहीतरी निराधार वावड्या उडवायच्या.

बादवे, तुम्ही लग्नात सूट घातला होता का? असल्यास त्याला किती खर्च आला होता?

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 1:28 pm | कपिलमुनी

कृपया वैयक्तीक होउ नये !

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 1:31 pm | श्रीगुरुजी

वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व.

मुद्दा एवढाच की स्वतःच्या सूटला किती खर्च आला यावरून इतरांच्या सूटच्या किंमतीचा अंदाज येऊ शकेल.

पिंपातला उंदीर's picture

11 Feb 2015 - 2:54 pm | पिंपातला उंदीर

हे एक भक्ताच लक्षण . थोडी टीका झाली की संतुलन ढासळत . मला खात्री आहे गुर्जी णा मनातल्या मनात या देशद्रोही लोकांना कुठल्या नरकात पाठवू अस झाल असेल *lol* *LOL*

अर्धवटराव's picture

11 Feb 2015 - 9:26 pm | अर्धवटराव

.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 12:53 pm | श्रीगुरुजी

मोदींना आणि जेटलींना व्यनी केलाय, तुम्हाला पुरावे पाठविण्यासाठी.

थॉर माणूस's picture

10 Feb 2015 - 5:16 pm | थॉर माणूस

बाकी तुम्ही भक्त त्यामुळे तुम्हाला सर्व चालते

कार्यकर्त्यांना भक्त म्हणून तुम्ही कार्यकर्ते किंवा भक्त यापैकी कुणातरी एकाचा अपमान केलाय... ;)

पिंपातला उंदीर's picture

10 Feb 2015 - 4:16 pm | पिंपातला उंदीर

बायको वरून आठवल . जिंकल्यानंतर केजरीवाल प्रथमच आपल्या पत्नीस समोर घेऊन आले. त्यांचे प्रत्येक वेळी संभाळुन घेतल्याबद्दल आणि कायम पाठीशी उभे राहील्याबद्दल जाहीर आभार मानले. कुठे केजरीवाल आणि कुठे आपले ………. . बर ते जाऊ दे . चालायचंच *biggrin*

मी आता नेट वर एक लिंक पाहिली, अरविंद केजरीवाल यांनी अहंकार करु नका असे सांगितले आहे त्यात आणि हे चांगले वाटले.
सामान्य लोक जिंकु शकतात, हे आप ने दाखवुन दिले आहे, फक्त नेत्यांची मुले , पैसेवाले यांपेक्षा सामन्य लोक जिंकु शक्तात हे दाखवणे खुप आहे असे वाटते

अनुप ढेरे's picture

10 Feb 2015 - 5:22 pm | अनुप ढेरे

हा कमरेखालचा वार आहे. न कळत्या वयात झालेल्या लग्नाची आठवण साठाव्या वर्षी का उगाळायची?
बाकी काँग्रेस समर्थकांच्या प्रतिक्रिया पाहताना मजा येतेय. भाजपाच्या पराभवाने थोडा तरी मुद्दा मिळाला आहे त्यांना.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 11:01 pm | श्रीगुरुजी

चालायचंच. मुद्दे संपले की धागा भरकटविण्यासाठी असे वार केले जातात.

प्रदीप's picture

10 Feb 2015 - 5:52 pm | प्रदीप

दिवसभर दगदग केल्यानंतर, थकूनभागून घरी परतून मग 'ओल्या पिंपात माना मुरगळून पडलेल्या गलितगात्रांचा 'वर्ल्ड व्ह्यू वाचून 'अंमळ करमणूक' होते आहे खरी!

कपिलमुनी's picture

10 Feb 2015 - 5:03 pm | कपिलमुनी

भाजपेयी आत्मपरीक्षण करतील अशी किंचित आशा होती पण हे तर अजून केजरीवाल भंपक आहे .. आक्रस्ताळा आहे ईई मुद्दे उगाळत बसले आहेत .
एवढ्या मोठ्या पराभवाची कारणीमीमांसा कोणत्याही पक्षाने , कार्यतर्याने , समर्थकाने नक्कीच करायला हवी. पूर्ण पराभव झाला याचा अर्थ चुकाही तेवढ्याच गंभीर आहेत . आणि मतदारांशी तुटलेली नाळ का तुटली .
केजरीवाल कसे का असेना पण आज मतदारांनी त्यांना स्विकारला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथे हातपाय आपटून नावे ठेवण्यात काही हशील नाही. अ पार्टी विथ डिफ्रन्स ने आत्मपरीक्षण करावे आणि पुढे या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी .

बाकी समर्थकाऐवजी भक्त असतील तर मात्र हे अवघड आहे.

नांदेडीअन's picture

10 Feb 2015 - 5:14 pm | नांदेडीअन

*mosking*

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 5:15 pm | श्रीगुरुजी

>>> भाजपेयी आत्मपरीक्षण करतील अशी किंचित आशा होती पण हे तर अजून केजरीवाल भंपक आहे .. आक्रस्ताळा आहे ईई मुद्दे उगाळत बसले आहेत .

निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.

>>> एवढ्या मोठ्या पराभवाची कारणीमीमांसा कोणत्याही पक्षाने , कार्यतर्याने , समर्थकाने नक्कीच करायला हवी. पूर्ण पराभव झाला याचा अर्थ चुकाही तेवढ्याच गंभीर आहेत . आणि मतदारांशी तुटलेली नाळ का तुटली .

करतील ना. जरा वेळ तर द्या. अजून पूर्ण निकाल सुद्धा जाहीर झालेला नाही.

>>> केजरीवाल कसे का असेना पण आज मतदारांनी त्यांना स्विकारला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथे हातपाय आपटून नावे ठेवण्यात काही हशील नाही. अ पार्टी विथ डिफ्रन्स ने आत्मपरीक्षण करावे आणि पुढे या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी .

नक्कीच करेल हे भाजप

>>> बाकी समर्थकाऐवजी भक्त असतील तर मात्र हे अवघड आहे.

हे केजरीभक्तांनाही लागू पडते.

कपिलमुनी's picture

10 Feb 2015 - 6:04 pm | कपिलमुनी

त्यांनी सरकार सोडल्यावर चूक मान्य केली .. लोकसभेचा पराभव पचवला .. चुका केल्या हे कबूल केला आणि त्या सुधारल्या म्हणून तर आज विजय प्राप्त झाला .

निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.

खरे आहे .. बाकी ते संजय जोशी कुठे असतात हो आज काल ??

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 11:04 pm | श्रीगुरुजी

>>> त्यांनी सरकार सोडल्यावर चूक मान्य केली .. लोकसभेचा पराभव पचवला .. चुका केल्या हे कबूल केला आणि त्या सुधारल्या म्हणून तर आज विजय प्राप्त झाला .

मुख्यमंत्रीपद सोडल्यावर अनेक दिवस ही कृती योग्यच कशी आहे आणि आपण कशी मुख्यमंत्रीपदावर लाथ मारली असे केजरीवाल आणि आआपवाले उच्चरवाने सांगत होते. जनलोकपालसाठी अशी हजार मुख्यमंत्रीपदे कुर्बान आहेत अशा फुशारक्या ते मारत होते. आपले हे कृत्य जनतेला अजिबात आवडलेले नाही व आपण करत असलेले समर्थन कोणालाच पटत नाही व या निवडणुकीत हा मोठा इश्यू होईल हे ओळखल्यानंतरच केजरीवालांनी चूक मान्य केली. नाहीतर आधी बरेच महिने मी बरोबरच केलं असे अभिमानाने सांगत होते.

अश्या फुशारक्या ते मारत असतील ही पण निदान माफी तरी मागितली. पण भाजप शेवट पर्यंत त्यांना भगोडा म्हणत होते आणि आता त्यांना ते म्हणण्याच्या ही लायक ठेवले नाही.

मी काय म्ह्णतो श्री गुरुजी, काही वेळेस तात्पुरती माघार घेणॅ किंवा चुक मान्य करणे ही फायदेशीर नसते का ?

असो.. तुम्ही जेव्हडे दुसर्यावरती चिखल फेकताल तेव्हडाच चिखल तुमच्याकडे पण फेकला जातो.

कट्टरता असावी पण ती इतरांचा पण आदर करुन असावी. दुसरे तुच्छ आणि आपण कसे बरोबर हे योग्य नाही.
मी तुमचे लिखान वाचतो, पहिले मुद्दे विश्लेषण योग्य असेन पण प्रत्येक विरोधी मतांवर ते बरोबर असले तरी आपण आपलेच मुद्दे का रेटायचे ?
दुसर्‍यांचे अभिनंदन करताना पण बघु आता असे का बोलायचे.

असो.. दुसर्‍यांना तुच्छ लेखने बंद करावे. त्यांनी चुक केली तर ते खाली येतील पुढच्यावेळेस आपोआप. आप काय कोणाचे पाहुने नाही की बिजेपी पण. जे तत्त्वाने..सदाचाराणे जनतेची कामे करतील त्यांच्या बाजुने लोक असतील असे नाही का वाटत.

असो .. आनखिन काय बोलणार

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 10:59 am | कपिलमुनी

आज चेसुगु असते तर शेवटचा प्रतिसाद कोणाचा या मुद्दावर २०००-३००० ची पार्टनरशीप नक्कीच झाली असती.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 11:05 pm | श्रीगुरुजी

अवांतर - हे "चेसुगु" म्हणजे नक्की कोणते सभासद?

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 12:58 pm | श्रीगुरुजी

>>> अश्या फुशारक्या ते मारत असतील ही पण निदान माफी तरी मागितली. पण भाजप शेवट पर्यंत त्यांना भगोडा म्हणत होते आणि आता त्यांना ते म्हणण्याच्या ही लायक ठेवले नाही.

माफी मागणे ही निवडणुक स्ट्रॅटेजी होती हो. त्यात प्रामाणिकपणा नव्हता. मुख्यमंत्रीपद सोडल्यावर अनेक महिने ते आणि त्यांचे सहकारी हा निर्णय कसा योग्य आणि तात्विक आहे आणि जनलोकपालसाठी मुख्यमंत्रीपद कसे लाथाडले आणि भविष्यात अशी हजारो मुख्यमंत्रीपदे लाथाडू असे जाहीररित्या सांगत होते. आपला निर्णय चुकीचा होता याचा अचानक निवडणुकीच्या तोंडावर कसा काय साक्षात्कार झाला?

भविष्यात अशी हजारो मुख्यमंत्रीपदे लाथाडू असे जाहीररित्या सांगत होते आणि आता म्हणताहेत की आता मुख्यमंत्रीपद कधीही सोडणार नाही. एक ठाम भूमिका घ्या ना कधीतरी.

माफी निवडनुकीच्या तोंडावर मागितली नाही, तुम्ही काय म्हणता, तुम्हाला तेव्हडे कळते आणि दिल्लीतील जनतेला काहीच कळत नाही ?
आणि एक ते ठाम भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी आहेत, आणि त्या साठी इतर गोष्टींचा मी कधीच विचार करत नाही.

थॉर माणूस's picture

11 Feb 2015 - 2:22 pm | थॉर माणूस

...ही निवडणुक स्ट्रॅटेजी होती हो.

हॅ हॅ हॅ... भाजपा नेत्यांबरोबर आता कार्यकर्त्यांच्या तोंडात सुद्धा हे वाक्य पक्कं बसलंय बहुतेक. प्रामाणिकपणाच लवलेशही नसलेले वायदे, आश्वासने आणि वक्तव्ये करणे हे प्रस्थापित पक्षांना तरी कुठे नवं आहे? हे म्हणजे चिखलात लोळणार्‍याने शेजारून चाललेल्या माणसाच्या चपलेवरच्या डागाला हसण्यासारखं आहे.

एक ठाम भूमिका घ्या ना कधीतरी.

भाजपाची विरोधी पक्ष असतानाची भूमिका/धोरणे आणि त्यांनी सध्या घेतलेले निर्णय असा धागा कुणी काढेल काय? नै... मला वरची वाक्ये नक्की कुठल्या पक्षासाठी लागू करायची हे कळेना आता. :)

पिंपातला उंदीर's picture

11 Feb 2015 - 8:53 am | पिंपातला उंदीर

गुर्जीनी संजय जोशी यांचा उल्लेख कसा खुबीने टाळला हे मंडळीच्या लक्षात आले असेलच *biggrin*

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 1:02 pm | श्रीगुरुजी

स्वतःकडे मुद्दे नसले की विषयाशी संबंध नसलेल्या प्रतिसादातून कमरेखाली वार करून किंवा एक ओळीच्या प्रतिसादांच्या काड्या टाकून धागा भरकटवणे ही तुमची खोड आहे. याबद्दल २ दिवसांपूर्वी मी एक डोस दिलेला होता.

वरील एका ओळीच्या प्रतिसादातून परत तोच प्रयत्न सुरू झालेला दिसतोय. धागा भरकटू नये म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करतोय.

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 1:30 pm | कपिलमुनी

निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.

मोदींच्या व्यक्तीकेंद्रीत आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी संजय जोशी ठरले होते ..
आता मोदी निवडणूक जिंकले आहेत म्हणून निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 10:26 pm | श्रीगुरुजी

>>> मोदींच्या व्यक्तीकेंद्रीत आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी संजय जोशी ठरले होते ..

बळी ठरले होते म्हणजे नक्की काय झालं होतं त्यांचं?

पिंपातला उंदीर's picture

11 Feb 2015 - 2:58 pm | पिंपातला उंदीर

असा त्रागा करू नका हो गुर्जी . तुमचे प्रतिसाद अधिकच विनोदी होत चालले आहेत . बाकी ते डोस वैगेरे जाऊ द्या . तुमसे ना हो पायेगा - Gangs of Wasseypur मधला संवाद *lol*

दुश्यन्त's picture

10 Feb 2015 - 6:15 pm | दुश्यन्त

सुधारतील ते भाजपेयी कसले. राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे सोयीनुसार गुंडाळून बसले, आता काला धन विसरत आहेत. महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत.
केजरीवालवर टीका करायला यांना तोंड आहे का? प्रधानसेवक स्वतः राज्याराज्यात 'मै , मै 'करत प्रचार करत फिरतात. दिल्लीमध्ये विरोधकांना बाजारू, अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना असले सल्ले देत फिरतात तर भक्त तरी कसे गप्प बसतील. आता भक्त लोक दिल्लीत हिंदुनी एक होवून मते दिली नाही म्हणून आप जिंकली असला प्रचार करत आहेत जणू काही हिंदू मते म्हणजे यांची जहागीर आहे. हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारणे हा यांचा जुना धंदा आहे. युपी मध्ये पण सध्या भाजप आणि सपा हेच करत आहेत. मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 11:21 pm | श्रीगुरुजी

>>> सुधारतील ते भाजपेयी कसले. राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे सोयीनुसार गुंडाळून बसले, आता काला धन विसरत आहेत.

हे सर्व मुद्दे अजिबात गुंडाळून ठेवलेले नाहीत आणि ते जिवंत आहेत हो. ३७० वे कलम आणि अ‍ॅस्फामुळेच तर यांचं अजून पीडीपीशी जमत नाहीय्ये. हे दोन्ही गुंडाळावेत अशी पीडीपीची इच्छा आहे आणि भाजप त्याला विरोध करतोय म्हणून तर तिथं अजून सरकार स्थापन होत नाहिय्ये.

>>> महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत.

कधी केली संभाजी ब्रिगेडशी जवळीक? कधी केलं एनसीपी बरोबर फिक्सिंग? आजचीच बातमी आहे. शिवसेना युती सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल असं आजच राकाँ ने जाहीर केलंय. हे फिक्सिंग असतं का?

>>> केजरीवालवर टीका करायला यांना तोंड आहे का? प्रधानसेवक स्वतः राज्याराज्यात 'मै , मै 'करत प्रचार करत फिरतात.

केजरीवालही तेच करतात ना. मी ४९ दिवसात यँव केलं, त्यँव केलं अशा फुशारक्या मारत होतेच ना. माझ्या ४९ दिवसांच्या कारकीर्दीतल्या तिमाहीत दिल्लीत सर्वाधिक करभरणा झाला अशीही लोणकढी थाप त्यांनी मारून स्वतःकडे नसलेलं श्रेय घेतलं होतंच ना.

>>> दिल्लीमध्ये विरोधकांना बाजारू, अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना असले सल्ले देत फिरतात तर भक्त तरी कसे गप्प बसतील.

केजरीवाल स्वतःबद्दलच बोलताना अनार्किस्ट असे म्ह्णाले होते.

>>> आता भक्त लोक दिल्लीत हिंदुनी एक होवून मते दिली नाही म्हणून आप जिंकली असला प्रचार करत आहेत जणू काही हिंदू मते म्हणजे यांची जहागीर आहे.

असे भाजपने सांगितलेलं नाही. अजून काही दिवसांनी आत्मपरीक्षण केल्यावर भाजपची प्रतिक्रिया येइल. प्रथमदर्शनी असं दिसतंय की भाजपची मते जवळपास तेवढीच आहेत (३२.३%). फक्त २ टक्क्यांनी घटलेली आहेत. काँग्रेसची मते १६-१७% टक्क्यांनी घटलेली असून आआपच्या मतात अंदाजे २४-२५ टक्क्यांची वृद्धी आहे. म्हणजे काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात आआपकडे वळलेली (की वळविलेली?) आहेत. थोडक्यात म्हणजे या निवडणुकीत आआपच्या मतांना सूज आलेली आहे आणि कोणतीही सूज काही काळाने उतरतेच. २०१६ मधील निवडणुकीत ही सूज उतरलेली दिसेल.

>>> हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारणे हा यांचा जुना धंदा आहे. युपी मध्ये पण सध्या भाजप आणि सपा हेच करत आहेत.

असे करणे हे काँग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भाजपचे नाही. केजरीवालांनी देखील बुखारीला पाठिंबा द्यायला जाहीर करायला लावून तेच केले होते. प्रकरण अंगाशी येताना दिसताच घाईघाईने बुखारीचा पाठिंबा आम्हाला नको असे शहाजोगपणे सांगितले. तोपर्यंत मुस्लिमांपर्यंत योग्य तो संदेश गेला होता. मुस्लिमांनी आआपला मते द्यावीत असे बुखारीने सांगितले होते. पण केजरीवालांनी युक्ती करून मुस्लिम मते नकोत असे न सांगता बुखारीचा पाठिंबा नको असे सांगून चलाखी केली होती.

>>> मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार.

सेम फॉर केजरीवाल

>>> सुधारतील ते भाजपेयी कसले. राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे सोयीनुसार गुंडाळून बसले, आता काला धन विसरत आहेत.

हे सर्व मुद्दे अजिबात गुंडाळून ठेवलेले नाहीत आणि ते जिवंत आहेत हो. ३७० वे कलम आणि अ‍ॅस्फामुळेच तर यांचं अजून पीडीपीशी जमत नाहीय्ये. हे दोन्ही गुंडाळावेत अशी पीडीपीची इच्छा आहे आणि भाजप त्याला विरोध करतोय म्हणून तर तिथं अजून सरकार स्थापन होत नाहिय्ये.

समान नागरी कायदा या लोकसभेला बिजेपी च्या मुद्यांमध्ये नव्हताच. आणि होता तर आता बहुमत त्यांच्याकडे आहे का करत नाहियेत ? या एका मुद्द्या साठी मी कायम भाजप ला मत देइन पण त्यांनी तो मुद्दा खरेच गुंडाळुन ठेवलाय. कास्मिर च्या राजकारणात मी पडत नाही, पण ३७० कलम केंद्रा सरकार रद्द करु शक्ते की राज्य ? आणि जर राज्य सरकार करत असेन तर लोकसभेला तशी घोषणा त्यांनी का केली होती. ( हेच तुम्ही नेहमी केजरीवाल ला बोलता ना )
--
महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ?

>>> महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत.

कधी केली संभाजी ब्रिगेडशी जवळीक? कधी केलं एनसीपी बरोबर फिक्सिंग? आजचीच बातमी आहे. शिवसेना युती सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल असं आजच राकाँ ने जाहीर केलंय. हे फिक्सिंग असतं का?
मला वाटते संभाजी ब्रिगेड नसेल म्हणायचे त्यांना शिवसंग्राम बोलायचे आहे काय मेटेंचे ? ते आणि ब्रिगेड वेगळॅ आहेत.
जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता.
आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो.
मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते.
आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा .

>>> केजरीवालवर टीका करायला यांना तोंड आहे का? प्रधानसेवक स्वतः राज्याराज्यात 'मै , मै 'करत प्रचार करत फिरतात.

केजरीवालही तेच करतात ना. मी ४९ दिवसात यँव केलं, त्यँव केलं अशा फुशारक्या मारत होतेच ना. माझ्या ४९ दिवसांच्या कारकीर्दीतल्या तिमाहीत दिल्लीत सर्वाधिक करभरणा झाला अशीही लोणकढी थाप त्यांनी मारून स्वतःकडे नसलेलं श्रेय घेतलं होतंच ना.

तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ?

>>> आता भक्त लोक दिल्लीत हिंदुनी एक होवून मते दिली नाही म्हणून आप जिंकली असला प्रचार करत आहेत जणू काही हिंदू मते म्हणजे यांची जहागीर आहे.

असे भाजपने सांगितलेलं नाही. अजून काही दिवसांनी आत्मपरीक्षण केल्यावर भाजपची प्रतिक्रिया येइल. प्रथमदर्शनी असं दिसतंय की भाजपची मते जवळपास तेवढीच आहेत (३२.३%). फक्त २ टक्क्यांनी घटलेली आहेत. काँग्रेसची मते १६-१७% टक्क्यांनी घटलेली असून आआपच्या मतात अंदाजे २४-२५ टक्क्यांची वृद्धी आहे. म्हणजे काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात आआपकडे वळलेली (की वळविलेली?) आहेत. थोडक्यात म्हणजे या निवडणुकीत आआपच्या मतांना सूज आलेली आहे आणि कोणतीही सूज काही काळाने उतरतेच. २०१६ मधील निवडणुकीत ही सूज उतरलेली दिसेल.

मग तुम्ही मोदींना मतांची सूज आलेली आहे याव्ळेस लोक्सभेच्या निवडनुकीत ती पण कधी ओसरेल हे का सांगत नाहियेत ? का सुजा फक्त आप च्या मतांच्या ओसरतात, भाजप्चय मतांच्या नाहित.
आणि एक ३३ % होते तर ते वाढवण्याचे का जमले नाही भाजप ला ? आणि असे ही शक्यता नाही का की कॉन्ग्रेस ची २५ % मतातील १५ % मते आप ला पडली अशी तुम्ही म्ह्णाता त्यातले ५ % च आप ला मिळाले असतील आणि १० % भाजप्ला पण . पण भाजप्चे स्वताचे ११ % आप कडे वळले असतील .
का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ?
माझय मताने भाजप चे पण ११ % आप ला मिळाले आणि कॉन्ग्रेस चे १० % भाजप्ला मिळाले. याला पण अर्थ का होत नाहीत तुम्ही म्हण्ता तसे ?

>>> हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारणे हा यांचा जुना धंदा आहे. युपी मध्ये पण सध्या भाजप आणि सपा हेच करत आहेत.

असे करणे हे काँग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भाजपचे नाही. केजरीवालांनी देखील बुखारीला पाठिंबा द्यायला जाहीर करायला लावून तेच केले होते. प्रकरण अंगाशी येताना दिसताच घाईघाईने बुखारीचा पाठिंबा आम्हाला नको असे शहाजोगपणे सांगितले. तोपर्यंत मुस्लिमांपर्यंत योग्य तो संदेश गेला होता. मुस्लिमांनी आआपला मते द्यावीत असे बुखारीने सांगितले होते. पण केजरीवालांनी युक्ती करून मुस्लिम मते नकोत असे न सांगता बुखारीचा पाठिंबा नको असे सांगून चलाखी केली होती.

मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना.
मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे. म्
आणि आप सांगत ते सहाजोग पणा, आणि हेच महराष्ट्रात बिजेपी थोड्याच दिवसात रा,कॉ ने पाठिंबा दिलाच नाही ते कौताकास पात्र असा भेद का ? चुक ती चुकच ना मग ?
>>> मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार.

सेम फॉर केजरीवाल

दुश्यन्त's picture

11 Feb 2015 - 12:26 pm | दुश्यन्त

बीग्रेडच्या व्यासपीठावर फडणवीस, गडकरी गेल्या महिन्यात जावून आले आहेत. पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी भाजपच्याच तिकिटावर २ वेळा आमदार खाली होती (आता एनसीपी मध्ये आहे). पवार/ प्रफुल पटेल आणि गडकरी/ शहा/ मोडी याराना नवीन नाहि. भाजप - एनसीपी च्या सेटिंग मुळेचच सरकार स्थापनेननंतर लोकांनी गेल्या २० वर्षात घातल्या नाही इतक्या शिव्या घातल्या हे फडणवीस यांनी स्वतः कबूल केले आहे.
समान नागरी कायदा, ३७० कलम , राममंदिर हे मुद्दे भाजपने कधीच गुंडाळून ठेवले आहेत. वरचे गुरुजी कदाचित अजून ८०-९० च्या दशकात वावरत असावेत कारण भाजपच्या आजच्या नवीन कार्यकर्त्यांना तर हे मुद्दे काय होते हे पण आठवत असेल कि नाही माहित नाहि.हिंदू- मुस्लिम ध्रुवीकरण करण्यात भाजप माहिर आहे. सध्या युपी मध्ये भाजप-सप दोघेही हेच करत आहेत.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 1:25 pm | श्रीगुरुजी

>>> बीग्रेडच्या व्यासपीठावर फडणवीस, गडकरी गेल्या महिन्यात जावून आले आहेत. पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी भाजपच्याच तिकिटावर २ वेळा आमदार खाली होती (आता एनसीपी मध्ये आहे).

व्यासपीठावर जाऊन काय त्यांचा अजेंडा मान्य केला काय?

>>> पवार/ प्रफुल पटेल आणि गडकरी/ शहा/ मोडी याराना नवीन नाहि. भाजप - एनसीपी च्या सेटिंग मुळेचच सरकार स्थापनेननंतर लोकांनी गेल्या २० वर्षात घातल्या नाही इतक्या शिव्या घातल्या हे फडणवीस यांनी स्वतः कबूल केले आहे.

न मागता राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याचा फडणवीसांनी अत्यंत चतुराईने उपयोग करून शिवसेनेला नमवून शरण आणले. ज्या दिवशी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तेव्हा मौन पाळले नसते तर शिवसेनेने प्रचंड ब्लॅकमेल करून मंत्रीपदांसाठी अतिशय त्रास दिला असता. त्याऐवजी पाठिंबा ना स्वीकारून ना नाकारून शिवसेनेला घायकुतीला आणून व कासावीस करून भाजपने एक अत्यंत चतुर खेळी खेळली होती.

>>> समान नागरी कायदा, ३७० कलम , राममंदिर हे मुद्दे भाजपने कधीच गुंडाळून ठेवले आहेत.

अशी तुमची खुळी समजूत आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 1:13 pm | श्रीगुरुजी

>>> समान नागरी कायदा या लोकसभेला बिजेपी च्या मुद्यांमध्ये नव्हताच. आणि होता तर आता बहुमत त्यांच्याकडे आहे का करत नाहियेत ? या एका मुद्द्या साठी मी कायम भाजप ला मत देइन पण त्यांनी तो मुद्दा खरेच गुंडाळुन ठेवलाय.

भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. कायदा मंजूर होण्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर व्हावा लागतो.

>>> कास्मिर च्या राजकारणात मी पडत नाही, पण ३७० कलम केंद्रा सरकार रद्द करु शक्ते की राज्य ? आणि जर राज्य सरकार करत असेन तर लोकसभेला तशी घोषणा त्यांनी का केली होती. ( हेच तुम्ही नेहमी केजरीवाल ला बोलता ना )
--

केंद्र आणि राज्य असे दोघेही लागतात.

>>> महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ?

कोणत्या वृत्तपत्रात आले होते? लिंक देता का?

>>> जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता.

आवाजी मतदानात एकूण मतांपैकी निम्मी किंवा अधिक मते पडावी लागतात. विश्वासदर्शक ठरावावेळी फक्त २४६ आमदारांचाच आवाज होता. त्यात भाजपचे १२३ + काही इतर मित्रपक्षांचा बहुमताचा आवाज होता. राष्ट्रवादीचे मौन होते. यावर दुसर्‍या धाग्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. ती वाचा.

>>> आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो.
मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते.
आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा .

तो दुसरा धागा वाचा.

>>> तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ?

करावा ना प्रचार. पण स्वतः काय केले तेवढेच बोला ना. माझ्या ४९ दिवसांच्या तिमाहीतच सर्वात जास्त करभरणा झाला हे सांगून करभरणा होण्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता.

>>> का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ?

आजच्या अनेक वृत्तपत्रातून विश्लेषण आले आहे ते वाचल्यास शंका दूर होतील.

>>> मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना.
मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे.

गुपचूप बुखारीला भेटून व त्याला जाहीररित्या पाठिंबा द्यायला लावून नंतर पाठिंबा नाकारणे हे एक नाटक होते हो.

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 1:16 pm | कपिलमुनी

भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. कायदा मंजूर होण्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर व्हावा लागतो.

संयुक्त अधिवेशन घेउन पास करता येता

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 1:18 pm | श्रीगुरुजी

कदाचित येईल तसे करता. पण यासाठी साधे बहुमत पुरेसे की दोनतृतीयांश हे बघायला हवे. दोनतृतीयांशाची गरज असल्यास अजून काही वर्षे थांबावे लागेल.

समान नागरी कायदा लोक्सभेचा जाहिरनामा/वचननामा/व्हिजन आणि फलाना काय असते त्यात नव्हता. आणि
इ तो जानिव पुर्वक काधुन टाकला होता. तो तेथे असल्यास येथे दाखवुन द्यावे.

>>> महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ?

कोणत्या वृत्तपत्रात आले होते? लिंक देता का?

सकाळ पेपर मध्ये आले होते, न्युज प्रमाणे सर्च कसे मारतात मला माहीत नाही तरी पाहतो. मी खोटे बोलत नाहिये.

>>> जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता.

आवाजी मतदानात एकूण मतांपैकी निम्मी किंवा अधिक मते पडावी लागतात. विश्वासदर्शक ठरावावेळी फक्त २४६ आमदारांचाच आवाज होता. त्यात भाजपचे १२३ + काही इतर मित्रपक्षांचा बहुमताचा आवाज होता. राष्ट्रवादीचे मौन होते. यावर दुसर्‍या धाग्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. ती वाचा.

दुसर्या धाग्यावरचे भाजप च्या बाजुने नसणारे रिप्लाय पण बघा

>>> आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो.
मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते.
आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा .

तो दुसरा धागा वाचा.

या साठी दुसर्या धाग्याची गरजच नाहिये

>>> तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ?

करावा ना प्रचार. पण स्वतः काय केले तेवढेच बोला ना. माझ्या ४९ दिवसांच्या तिमाहीतच सर्वात जास्त करभरणा झाला हे सांगून करभरणा होण्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता.

मग स्वता बद्दल आणि त्या रीलेट्ड च बोलायचे होते तर भाजप आणि मोदी केजरीवाल बद्दल का बोलत होती ? का त्यांना स्वताविषयी काही बोलण्यासारखे नव्हते ?

>>> का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ?

आजच्या अनेक वृत्तपत्रातून विश्लेषण आले आहे ते वाचल्यास शंका दूर होतील.

कोणत्या वृत्तपत्रात असे ठोस लिहिलेले आहे की फक्त कॉन्ग्रेस चीच सर्व मते आप कडे वळाली. का त्या वृत्तपत्रांचे विश्लेषण बरोबर असते का ? मग अशी अनेक वृत्तपत्रे आहेत त्यात भाजप च्या चुका आहेत असे दाखवले आहे, शिवाय महारष्ट्रात काय घोळ घातला होता तेंव्हा ही त्यांच्यावर टिकायुक्त विश्लेशन पण आहे मग तेच का खरे नाही म्हाणायचे? आणि तुम्ही म्हणता तेव्हडेच का खरे माणयाचे ? तुमचाच धागा का प्रमाण माणायचा ?

>>> मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना.
मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे.

गुपचूप बुखारीला भेटून व त्याला जाहीररित्या पाठिंबा द्यायला लावून नंतर पाठिंबा नाकारणे हे एक नाटक होते हो.

जर गुपचुप बुखारी ला भेटायचे होते तर सगळीकडे कसे कळाले ? आणि काय बोलणे झाले हे पण न्युज वालेच सांगत आहेत, त्यांच्यावर पण आता किती भरवासा ठेवावा ?
बर असो असे सगळॅ झाले असले तरी लगेच पुर्ण पाठिंबा नाकारला गेला होता. आधीच्या चर्चा तुम्ही म्हणता तश्या गुपचुप झाल्या असतील आणि त्याला ठोस पुरावा नाहिये नक्की काय बोलणे झाले असेन , जो पुरावा आहे त्याच्यात काड्या टाकुन आधीच मागितला होता हे आपण कश्याच्या जिवावर बोलतो आहोत.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 11:03 pm | श्रीगुरुजी

>>> समान नागरी कायदा लोक्सभेचा जाहिरनामा/वचननामा/व्हिजन आणि फलाना काय असते त्यात नव्हता. आणि
इ तो जानिव पुर्वक काधुन टाकला होता. तो तेथे असल्यास येथे दाखवुन द्यावे.

जाहीरनाम्यात एखादी गोष्ट नसली तर ती करायचीच नसते किंवा तसे करणे हे घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे असं काही नसतं.

बादवे, हिंदुत्व आणि रामजन्मभूमीसारखे प्रश्न हा भाजपचा छुपा अजेंडा आहे असे अनेक विरोधक म्हणत असतातच.

>>> >>> >>> महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ?

>>> >>> कोणत्या वृत्तपत्रात आले होते? लिंक देता का?

>>> सकाळ पेपर मध्ये आले होते, न्युज प्रमाणे सर्च कसे मारतात मला माहीत नाही तरी पाहतो. मी खोटे बोलत नाहिये.

शोधा म्हणजे सापडेल.

>>> आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो.
मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते.

ते कसं काय? राष्ट्रवादीला पाठिंबा मागितलाच नव्हता. राष्ट्रवादीने तो न मागता स्वतःहून दिला होता, पण भाजपने तो स्वीकारलाच नव्हता. ज्या पक्षाचा पाठिंबा स्वीकारलाच नव्हता त्याच पक्षाबरोबर संगनमत कसे काय शक्य आहे? भाजपने एक चतुराई केली. राष्ट्रवादीच्या स्वयंघोषित पाठिंब्याचा सरकारच्या बहुमतासाठी वापर करण्याऐवजी अत्यंत चलाखीने वापर करून शिवसेनेला शरण आणले.

>>> आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा .

त्याचे कारण हा प्रयोग करून भाजपने स्वतःला शिवसेनेकडून ब्लॅकमेल होऊन दिले नाही, म्हणून तो कौतुकास पात्र. केजरीवालांची माफी प्रामाणिक नव्हती. त्यामुळे कौतुकाचा प्रश्नच नाही.

>>> मग स्वता बद्दल आणि त्या रीलेट्ड च बोलायचे होते तर भाजप आणि मोदी केजरीवाल बद्दल का बोलत होती ? का त्यांना स्वताविषयी काही बोलण्यासारखे नव्हते ?

दोघेही एकमेकांविरूद्ध बोलले आहेत.

>>> कोणत्या वृत्तपत्रात असे ठोस लिहिलेले आहे की फक्त कॉन्ग्रेस चीच सर्व मते आप कडे वळाली. का त्या वृत्तपत्रांचे विश्लेषण बरोबर असते का ? मग अशी अनेक वृत्तपत्रे आहेत त्यात भाजप च्या चुका आहेत असे दाखवले आहे, शिवाय महारष्ट्रात काय घोळ घातला होता तेंव्हा ही त्यांच्यावर टिकायुक्त विश्लेशन पण आहे मग तेच का खरे नाही म्हाणायचे? आणि तुम्ही म्हणता तेव्हडेच का खरे माणयाचे ? तुमचाच धागा का प्रमाण माणायचा ?

माझा धागा नका प्रमाण मानू. वाचन वाढवा आणि स्वतःचे मत ठरवा.

>>> जर गुपचुप बुखारी ला भेटायचे होते तर सगळीकडे कसे कळाले ? आणि काय बोलणे झाले हे पण न्युज वालेच सांगत आहेत, त्यांच्यावर पण आता किती भरवासा ठेवावा ?

अलका लांबा निवडणुकीच्या काही दिवस आधी बुखारीच्या भावाला भेटून आल्या हे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. त्या भेटून आल्यावर लगेचच बुखारी पाठिंबा देतो हा योगायोग नव्हे.

जाहीरनाम्यात एखादी गोष्ट नसली तर ती करायचीच नसते किंवा तसे करणे हे घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे असं काही नसतं.

येथे पुरावा नसताना ही तुम्ही जर भाजपच्याच बाजुने असे बोलणार असेन तर पुढे काय बोलु आता मी.

मी मात्र तुम्हाला जाहीर पणे सांगतो, की भाजप या मोदी सरकारच्या ५ वर्षाच्या काळात समान नागरी कायदा आणणार नाही म्हणजे नाही.


जर त्यांनी असे केले तर मी कधीच राजकिय धाग्यावर माझे मत देणार नाही किंवा कधीच राजकिय धागे काढनार नाही.

या उलट तुम्ही जसे म्हणत की तो मुद्द गुंडालुन ठेवला नाही तो ते करणारच, तर काही प्रमाण देताल का ? मला वाटते तुम्हाला ते शक्य नाही.

ते कसं काय? राष्ट्रवादीला पाठिंबा मागितलाच नव्हता. राष्ट्रवादीने तो न मागता स्वतःहून दिला होता, पण भाजपने तो स्वीकारलाच नव्हता

तुम्ही आप सारखे अस्विकार केला का त्या पाठिंब्याचा? हे जे कौतुक करत आहात तर थोडे राष्ट्रवादीचे पण करा मग. आणि एक भाजप चा हा डाव नव्हता. ते काय सर्वांना सांगुन थोडेच पवारांना सांगणार होते पाठिंबा द्या.
हे सर्व ठरले होते, आता तुमचा धागा पहा आणि त्यावेळेसचे माझे रिप्लाय पण .

केजरीवालांची माफी प्रामाणिक नव्हती.

वा .. दुसर्‍याच्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला योग्य वाटत नाही.. दुसर्यास तुच्छ लेखने सोडा.

दोघेही एकमेकांविरूद्ध बोलले आहेत.

नाही, केजरीवाल मुद्द्याला धरुन बोलत होते, आणि भाजप काय करत होता हे तरी आता येथे द्यायला लावु नका . कुठला ही दिल्लीचए पेपर आणि न्युज पाहु शकता
बर्र ते जावुद्या दोघे ही एकमेकांन्बद्दल बोलत होते तर केजरीवल ४९ दिवसाच्यावेळॅस काय झाले बोलले तर तुम्हाला आक्षेप का ? बोलुद्या की ते पण बाकी भंपक बोलण्यापेक्षा ते महत्वाचे नव्हते का ?

माझा धागा नका प्रमाण मानू. वाचन वाढवा आणि स्वतःचे मत ठरवा.

बरोबर, तुम्ही पण वाचन वाढवा आणि इतरांच्या ही चुका पहा.

अलका लांबा निवडणुकीच्या काही दिवस आधी बुखारीच्या भावाला भेटून आल्या हे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. त्या भेटून आल्यावर लगेचच बुखारी पाठिंबा देतो हा योगायोग नव्हे.

भावाल भेटुन त्या काय बोलल्या याचे संभाषण द्या ? नसेल तर फक्त भाजपच्या खोट्या आरोपावर मते गिरवु नका.

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2015 - 1:32 pm | श्रीगुरुजी

>>> तुम्ही आप सारखे अस्विकार केला का त्या पाठिंब्याचा? हे जे कौतुक करत आहात तर थोडे राष्ट्रवादीचे पण करा मग. आणि एक भाजप चा हा डाव नव्हता. ते काय सर्वांना सांगुन थोडेच पवारांना सांगणार होते पाठिंबा द्या.
हे सर्व ठरले होते, आता तुमचा धागा पहा आणि त्यावेळेसचे माझे रिप्लाय पण .

भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा स्वीकार किंवा अस्वीकार केलाच नव्हता. न मागता ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांना उत्तर द्यायची गरज काय? २००४ मध्ये सपचा अमरसिंग स्वतःहून सपचा संपुआ सरकारला पाठिंबा द्यायला गेला होता. सोनिया गांधींनी स्वीकार/अस्वीकार न करता त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. तसेच इथे पण.

२००१ मध्ये ९/११ नंतर वाजपेयींनी भारत अल्-कायदा विरूद्धच्या लढाईत अमेरिकेला पाठिंबा देईल असे अनेकवेळा बुशला सांगितले होते. बुशने त्या पाठिंब्याचा स्वीकार/अस्वीकार केला नव्हता.

गणेशा's picture

12 Feb 2015 - 2:54 pm | गणेशा

मग कॉन्ग्रेस ने पण आप ला मागच्या वेळेस होउन पाठिंबा दिला होता, तुम्ही आप ला तरी का दोष देत बी टीम म्हणता मग.
सर्वांचेच एकसारखे माना ना. काय प्रोब्लेम आहे ? आप ने पण कोठे कॉन्ग्रेस चा पाठिंबा मागितला होता.

आणि
समान नागरी कायद्यावर काहीच बोलत नाहीत, गुंडाळुन ठेवला नाही तर कधी पर्यंत आमलात येइन असे आपणास वाटते, का आमलात येणार नाही असेच आमच्या सारखे तुम्हाला वाटते

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2015 - 3:11 pm | श्रीगुरुजी

>>> मग कॉन्ग्रेस ने पण आप ला मागच्या वेळेस होउन पाठिंबा दिला होता, तुम्ही आप ला तरी का दोष देत बी टीम म्हणता मग. सर्वांचेच एकसारखे माना ना. काय प्रोब्लेम आहे ? आप ने पण कोठे कॉन्ग्रेस चा पाठिंबा मागितला होता.

राष्ट्रवादीने भाजपला भाजपने न मागता स्वतःहून दिलेला पाठिंबा आणि मागील वर्षी दिल्लीत काँग्रेसने आआपला दिलेला पाठिंबा यात अजिबात साम्य नाही. राष्ट्रवादीने पाठिंब्याचे अधिकृत पत्र राज्यपालांना किंवा भाजपला दिलेले नव्हते. पाठिंबा देतो असे नुसतेच माध्यमांमध्ये जाहीर केले होते. अशा तोंडी आश्वासनांना अर्थ नसतो.

याउलट दिल्लीमध्ये आपले ८ आमदार आआपला पाठिंबा देत आहेत असे अधिकृत पत्र काँग्रेसने राज्यपालांना दिले होते. त्यानंतरच केजरीवालांना सरकारस्थापनेचे निमंत्रण मिळाले होते.

>>> समान नागरी कायद्यावर काहीच बोलत नाहीत, गुंडाळुन ठेवला नाही तर कधी पर्यंत आमलात येइन असे आपणास वाटते, का आमलात येणार नाही असेच आमच्या सारखे तुम्हाला वाटते

समान नागरी कायद्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल. त्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमत लागेल (कदाचित दोन तृतीयांश बहुमत लागेल). सध्या भाजप राज्यसभेत अल्पमतात आहे. सध्याच्या स्थितीनुसार भाजपला राज्यसभेत बहुमतासाठी किमान ३ वर्षे थांबावे लागेल. त्यानंतर नक्कीच समान नागरी कायद्याची प्रक्रिया सुरू होईल.

पिंपातला उंदीर's picture

11 Feb 2015 - 8:58 am | पिंपातला उंदीर

गुर्जी तुम्ही एका ठिकाणी म्हाणाला होतात की सत्तातूर कॉंग्रेस सत्तेसाठी काश्मीर मध्ये पीडीपी किंवा ओमर यांच्याशी शय्यासोबत करू शकत . मग आता भाजप पीडीपी सोबत करत आहे ते काय ? वन नाईट stand का contract marriage ?हमारा खून खून , तुम्हारा खून पानी ? बाकी कुठल्याही पक्षाचे नुकसान विरोधकांपेक्षा आंधळे समर्थक /भक्त करत असतात हे भक्तांना कधी कळेल ते एक अयोध्येचा रामच जाणे

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 1:16 pm | श्रीगुरुजी

भाजपने पीडीपी बरोबर युती केली तर ती स्वतःच्या अटींवर असेल. अ‍ॅफ्स्पा मागे घ्या अशासारख्या देशविघातक अटी भाजप मान्य करणार नाही.

याउलट काँग्रेस सत्तेत सहभागी होण्यासाठी पीडीपीच्या कोणत्याही अटी मान्य करू शकते. हाच फरक आहे भाजप व काँग्रेसमध्ये.

आज भाजपएवढ्या जागा काँग्रेसकडे असत्या तर एव्हाना पीडीपी बरोबर लग्न लागून हनीमून सुद्धा पार पडला असता. पण इथे भाजपशी गाठ असल्याने अजून युती होत नाहीय्ये.

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 1:22 pm | कपिलमुनी

भाजपाच्या युती या स्वतःच्या अटींवर ! आणि दुसर्‍याच्या युती म्हणजे सत्तालोलुपता !
आपला म्हणजे बीजेपीचा ( या आपच्या नावाने घोळ घातलाय ;) ) ते प्रेम !! दुसर्‍यांची ती भानगड

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 1:26 pm | श्रीगुरुजी

>>> भाजपाच्या युती या स्वतःच्या अटींवर ! आणि दुसर्‍याच्या युती म्हणजे सत्तालोलुपता !

ही वस्तुस्थिती आहे.

थॉर माणूस's picture

11 Feb 2015 - 2:41 pm | थॉर माणूस

नव्हे... अंधश्रद्धा आहे. :)

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 10:39 pm | श्रीगुरुजी

तसं समजा.

या आधी तिथे काँग्रेसची सरकारे येऊन गेलीत ना हो (एकदा तर पीडीपीचं पण येऊन गेलंय)? घेतला का अ‍ॅफस्पा मागे?

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 10:41 pm | श्रीगुरुजी

काही जिल्ह्यातून अ‍ॅफस्पा मागे घेण्याची चाचपणी युपीए सरकारने केली होती. लष्कराच्या ठाम विरोधामुळे तो प्रस्ताव पुढे रेटता आला नव्हता.

पिंपातला उंदीर's picture

11 Feb 2015 - 2:51 pm | पिंपातला उंदीर

भाजप आणि राष्ट्रवादी अभद्र छुप्या युतीचे समर्थन करणार्यांकडून काय अपेक्षा करणार ? बाकी valentine day ला नमोजी बारामतीला आहेत म्हणे ? गैरसमज नको . कार्यक्रमासाठी आहेत कुठल्यातरी

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 10:37 am | कपिलमुनी

लोकसभेला भाजपाची झाली ती वाढ आणि दिल्लीमध्ये आपची आली ती सूज !

थॉर माणूस's picture

11 Feb 2015 - 11:03 am | थॉर माणूस

त्यांची तीच सिस्टीम आहे हो.
हम करे तो प्यार, आप करे तो... ;)

अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना असले सल्ले देत फिरतात तर भक्त तरी कसे गप्प बसतील.

गुरुजी, केजरीचे सोडा हो त्याला तुम्ही लोकांनी नालायक, भगोडा, खुज्लीवाल वगैरे वगैरे बोलून सोडून दिले होते (प्रत्यक्षात पब्लिकने काय केले ते दिसत आहेच). आपले प्रधानसेवक त्यांना तुम्ही नक्षली बना असे सांगत फिरत होते त्यावर बोला.बाकी पंतप्रधान पदावरची व्यक्ती असली बेजबाबदार विधाने करते तर त्यांचे अंधभक्त शाहाणपण दाखवतील ही अपेक्षा जरा जास्तच आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 1:20 pm | श्रीगुरुजी

स्वतबद्दल बोलतानाच केजरीवालांनी अराजकवादी असा शब्द वापरला होता. अराजक माजवायचे असेल तर नक्षली बना हे सांगण्यात काय चूक?

लिंक द्या बरे, एकदा बघुद्या. कारण मी नेमके हे कधी बघितले / वाचले किंवा ऐकले नाही.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 10:47 pm | श्रीगुरुजी

>>> लिंक द्या बरे, एकदा बघुद्या. कारण मी नेमके हे कधी बघितले / वाचले किंवा ऐकले नाही.

मी पुराव्याशिवाय बोलत नसतो किंवा स्पेक्युलेशनही करत नसतो.

हे वाचा.

होय, मी अराजकतावादी आहे - केजरीवाल

ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या वेळेस हे बोलले होते का, तरी मी म्हण्तले कधी बोलले होते बरे.
असो त्या न्युजमधीलच गोष्टी जश्याच्या तसे येथे कॉपी करुन देतो . मग पोलिस जर काही काम करणार नाही तर काय केले पाहिजे शिवाय ते दिल्ली राह्यसरकारच्या अंडर पण नव्हते.
तुम्हाला एखादी गोष्ट उलटी बोलली तरी खुप लागते, तर मग रुलिंग पार्टीचे पोलिस ऐकत नसेन तर ? त्यांना राग येवुच नये का ? असो बाकी त्यावेळेसच्या गोष्टी कोण बरोबर आणिचुक हे पुन्हा काढु नये दिल्लीए जनतेला हे माहीती होते आणि तरीही ५४ % टक्के लोकांनी त्यांना निवडुन दिले आहे.
--

---------
They say I am an anarchist. Yes, I am. Today, I will create anarchy for Mr Shinde," he said .
He has been requested by the police to move his demonstration to Jantar Mantar, the designated spot for public protests. (Common gripes greet common man party: foreign media on Kejriwal)

On Wednesday night, Delhi Law Minister, Somnath Bharti conducted a self-described midnight "raid" in a South Delhi neighbourhood, and asked the police to arrest Ugandan citizens and raid a house where he alleged they were trafficking drugs and sex. The police refused, saying they had no warrant.

Four women have since filed a police case alleging that they were beaten up by a mob, and forced to submit urine samples.They tested negative for drugs.

In a separate case, another minister Rakhi Birla has accused the police of ignoring her orders to punish a family responsible for a dowry-related death

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2015 - 1:23 pm | श्रीगुरुजी

>>> ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या वेळेस हे बोलले होते का, तरी मी म्हण्तले कधी बोलले होते बरे.
असो त्या न्युजमधीलच गोष्टी जश्याच्या तसे येथे कॉपी करुन देतो . मग पोलिस जर काही काम करणार नाही तर काय केले पाहिजे शिवाय ते दिल्ली राह्यसरकारच्या अंडर पण नव्हते.
तुम्हाला एखादी गोष्ट उलटी बोलली तरी खुप लागते, तर मग रुलिंग पार्टीचे पोलिस ऐकत नसेन तर ? त्यांना राग येवुच नये का ? असो बाकी त्यावेळेसच्या गोष्टी कोण बरोबर आणिचुक हे पुन्हा काढु नये दिल्लीए जनतेला हे माहीती होते आणि तरीही ५४ % टक्के लोकांनी त्यांना निवडुन दिले आहे.
--

दिल्लीच्या जनतेला तेच बरोबर आहे हे माहिती होते तर लोकसभेला का एकही जागा मिळाली नाही?

>>> In a separate case, another minister Rakhi Birla has accused the police of ignoring her orders to punish a family responsible for a dowry-related death

याच रा़खी बिर्लांची मागील वर्षीची एक गोष्ट आठवली. गाडीवर कोणी तरी दगड मारला म्हणून थेट पोलिस तक्रार दाखल केली होती त्यांनी. चौकशीअंती हे समजले की लहान मुले फुटबॉल खेळताना तो चेंडू बिर्लांच्या गाडीवर आदळला होता. त्यावेळी बिर्लांनी थयथयाट करून एका मुलाच्या वडीलांना माफी मागायला लावली होती. हे प्रकरण तिथेच संपले होते. परंतु नौटंकी करण्याच्या आआपच्या व्यवच्छेदक लक्षणाला अनुसरून सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी गाडीवर कोणीतरी दगड मारल्याची थेट पोलिस तक्रार दाखल केली होती.

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2015 - 1:26 pm | श्रीगुरुजी

On Wednesday night, Delhi Law Minister, Somnath Bharti conducted a self-described midnight "raid" in a South Delhi neighbourhood, and asked the police to arrest Ugandan citizens and raid a house where he alleged they were trafficking drugs and sex. The police refused, saying they had no warrant.

Four women have since filed a police case alleging that they were beaten up by a mob, and forced to submit urine samples.They tested negative for drugs.

वॉरंट नसताना पोलिस कसे काय कोणाला अटक करणार होते? विशेषतः परदेशी नागरिकांच्या बाबतीत तर सर्व कायदेशीर प्रक्रीया काटेकोर पाळायला लागतात.

In a separate case, another minister Rakhi Birla has accused the police of ignoring her orders to punish a family responsible for a dowry-related death

पोलिसांना शिक्षेचे अधिकार नाहीत. ते न्यायालयाला आहेत. एखाद्या कुटंबाला शिक्षा करावी असे आदेश देणार्‍या या मंत्रीबाई धन्य आहेत.

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 2:09 pm | कपिलमुनी

केजरीवाल तर जिंकले . असो !

पण या पराभवाला मोदी जबाबदार आहेत का ?
तुमचे मत काय ?

पिंपातला उंदीर's picture

11 Feb 2015 - 3:05 pm | पिंपातला उंदीर

अनेक आंतरजालीय आंतरराष्ट्रीय फोरम वर आपल्या सरकारची /देशाची /पक्षाची बाजू मांडण्यासाठी चीनी कम्युनिस्ट सरकारने काही सदस्य पे रोल वर ठेवले आहेत . कितीही मोठ हत्याकांड होऊ दे , कुणालाही फाशी देऊ दे , कितीही मानवी हक्कांची पायमल्ली होऊ दे या सायबर आर्मी च एकाच काम असत . आपल्या सरकारच /पक्षाच समर्थन करायचं . या आर्मी च्या सदस्यांना टु सेंट आर्मी अस हेटाळनिने म्हंटले जात . इथंही असा काही प्रकार सुरु झालाय की काय अस वाटायला लागल आहे .

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 10:50 pm | श्रीगुरुजी

जेव्हा एखाद्या खेळाच्या स्पर्धेमध्ये भारत पराभूत होतो तेव्हा तो संघाचा पराभव असतो, कर्णधाराचा किंवा उपकर्णधाराचा किंवा एखाद्या विशिष्ट खेळाडूचा नसतो. संपूर्ण संघच जबाबदार असतो. राजकारणातही हेच तत्व लागू आहे.

पिंपातला उंदीर's picture

11 Feb 2015 - 8:36 pm | पिंपातला उंदीर

बाकी हा वैविध्यपूर्व देश एका संघटनेच्या / पक्षाच्या फक्त काळ्या किंवा पांढऱ्या रंगात पाहणाऱ्या लोकांची मला कीव कम सहानुभूती वाटते . बाकी श्रीगुरुजी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे असे दिसते . त्यामुळे काही एखादा वावगा शब्द गेल्यास क्षमस्व . बाकी मुद्दे आधारित वाद करत जाऊच .

गणेशा's picture

11 Feb 2015 - 11:51 pm | गणेशा

कोण जिंकणार दिल्ली ?
हे धाग्याचे शिर्क्षक .. मला वाटते सर्वांचय मतांचा येथे आदर होउन नकी कोण आणि कसे आणि का जिंकेल हे येथे पाहिजे होते, पण धागा कर्ता भाजप्च कसा बरोबर हे येव्हडेच का बोलतो आहे ?

कोण जिंकणार दिल्ली अवैजी भाजप च दिल्लीत योग्य आणि तेच सर्वाथाने चांगले असे म्हणुन धागा असता तर समजु शकलो असतो.
धाग्याचे नाव येक आणि आपण पाठपुरवठा करतो भाजप ला असे का ?
निपक्षपाती पणे कोण जिंकणार दिल्ली धागाकर्ता का माडण्यास असमर्थ ठरतोय ?

एक गोष्ट सआंगायची राहिलीच या धाग्याचे उत्तर एक च आहे ' आप ' तरीही त्यानंतर ही भाजप्च कसा बरोबर हे चालु आहे.
धन्य ते गुरुजी..
निदान भाजप म्हणुन दुसरा धागा काढा मग आणि तेथे भाजप ची मते लिहा.. कदाचीत तेथे कोणी येव्हडे विरोध करणार नाही.. धागा पाहुनच रिप्लाय द्य्वा का नाही ते ठरवतील

शिर्क्षक द्यायचे एक आणि आत दुसरेच हे बंद करा

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2015 - 1:16 pm | श्रीगुरुजी

>>> एक गोष्ट सआंगायची राहिलीच या धाग्याचे उत्तर एक च आहे ' आप ' तरीही त्यानंतर ही भाजप्च कसा बरोबर हे चालु आहे.

आआपला बहुमत मिळाले म्हणून फक्त आआपच बरोबर आणि भाजप चूक हे कसे काय बुवा?

कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे बसुन थोडेच ठरवणार आहे, ज्यांनी ठरवायचे त्यांनी ठरवले ?

तुम्ही धागा दिल्ली कोण जिंकणार ? हा आहे की. दिल्लीत भाजपच योग्य आहे हा आहे ?
कृपया आधी सांगा.

बाकी आता या धाग्यावर मी लिहिने थांबवत आहे, कारण खुप लिहिले आहे आणि सारखे सारखे तेच तेच लिहिने योगय वाटत नाही.

तरी तेव्हडे समान नागरी कायदा गुंदाळुन ठेवला नाही वगैरे काहि म्हणा पण त्याचे तेव्हडे सांगा मग अमलात कधी पर्यंत येइल, कारण या एका गोष्टी साठी मी भाजप ला मत दिले होते.
तुम्ही उत्तर नाही दिले तरी ते मला माहित आहे .. तो होणार नाही या मोदी सरकारच्या काळात आणि पुढेही शक्यता कमी आहे. आणि ती भारतीय लोकांची शोकांतीका पण आहे.

------------------- समाप्त------------------------------------------

समान नागरी कायद्यावरून आठवले. बहुपत्नीकत्व हा इस्लामचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलाय.

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2015 - 3:17 pm | श्रीगुरुजी

बरोबर.

समान नागरी कायद्याच्या दिशेने हळूहळू वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात अशाच १-२ न्यायालयीन निर्णयांच्या आधारे समान नागरी कायद्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2015 - 3:15 pm | श्रीगुरुजी

>>> तुम्ही धागा दिल्ली कोण जिंकणार ? हा आहे की. दिल्लीत भाजपच योग्य आहे हा आहे ?
कृपया आधी सांगा.

धागा दिल्ली कोण जिंकणार याच विषयावर आहे आणि १० तारखेला त्याचे उत्तर मिळाले आहे. दिल्लीत भाजपच योग्य आहे का हा त्यातूनच उपविषय निर्माण झाला आणि त्याचे उत्तर माझ्याकडून होय असेच आहे.

>>> बाकी आता या धाग्यावर मी लिहिने थांबवत आहे, कारण खुप लिहिले आहे आणि सारखे सारखे तेच तेच लिहिने योगय वाटत नाही.

तुमच्या संयमित आणि ठामपणे लिहिलेल्या प्रतिसादांबद्दल आणि मुद्द्यांबद्दल मनापासून आभार! कोठेही कटुता आली नाही हेच महत्त्वाचं.