मसाला भरलेली (Stuffed) सिमला मिरची

प्रमोदताम्बे ..........................................'s picture
प्रमोदताम्बे ..... in पाककृती
5 Feb 2015 - 4:40 pm

मसाला भरलेली (Stuffed) सिमला मिरची

साहित्य : ८-१० अख्या मोठ्या ढोबळी सिमला मिरच्या, एक वाटी बेसन पीठ , एक वाटी ओल्या नारळाचा चव , पाव वाटी पांढरे तीळ , अर्धी वाटी शेंडाण्याचे कूट, एक टेबलस्पून गोडा मसाला,एक चमचा प्रत्येकी धने व जिरे पावडर, चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या व मीठ ,बचकभार कोथिंबीर,फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद,जिरे,हिंग
कृती : प्रथम सिमला मिरचीची देठे कापून काढून तेथून आतील बिया वगैरे काढून टाकून मिरच्या पोकळ करून ठेवा. थ्द्या तेलावर बेसन पीठ खमंग भाजून घ्या,तीळही भाजून घ्या,नारळातील खोबर्या चा चव परतून घ्या , मिक्सरच्या भांड्यात भाजलेले बेसन पीठ,भाजलेले तीळ,हिरव्या मिरच्यांचे तुकडे, परतून घेतलेला नारळाचा चव ,शेंगदाण्याचे कूट ,धने-जिरे पावडर,मीठ ,गोडा मसाला,कोथिंबीर घालून वाटण करून घ्या.
आतून पोकळ करून घेतलेल्या सिमला मिरच्यांमध्ये हे वाटण हाताने दाबून भरा.
गॅसवर फ्राय-पॅन मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोही व जिरे घालून ते चांगले तडतडल्यावर हळद व हिंग घालू फोडणी करून घ्या आणि मग मसाला भरून ठेवलेल्या (Stuffed) ढोबळी सिमला मिरच्या एकाशेजारी एक अशा फ्राय-पॅन मध्ये केलेल्या फोडणीत ठेवा ,थोडाफार मसाला वाटण उरले असेल तर तेही पॅन\मध्ये टाकून पॅनवर झाकण ठेवून वाफेवर या मसाला भरलेल्या मिरच्या शिजवून घ्या.
गरम पोळीबरोबर मसाला भरलेली सिमला मिरची सर्व्ह करा.
Stuffed Simla Mirchee

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

5 Feb 2015 - 4:50 pm | स्पंदना

मस्त आहे पाककृती.
करुन पाहेन नक्की.
फोटो जरा लहान वाटला म्हणुन साईझ वाढवला आहे.

पैसा's picture

5 Feb 2015 - 5:13 pm | पैसा

पाकृ आवडली.

विजय पिंपळापुरे's picture

5 Feb 2015 - 6:49 pm | विजय पिंपळापुरे

हयाच प्रमाणे भरलेले पडवळ पण करता येत

प्रभाकर पेठकर's picture

5 Feb 2015 - 7:48 pm | प्रभाकर पेठकर

माझी अत्यंत आवडती पाककृती आहे. माझ्या लहानपणी माझी आई अशा मिरच्या लोखंडी तव्यावर करायची. मला खुप आवडायच्या. पण नारळाचा चव त्यात नसायचा.
मी स्वतः कधी करून पाहिल्या नाहीत पण आता तुमच्या पाककृती प्रमाणे करून पाहिन.

सविता००१'s picture

6 Feb 2015 - 10:07 am | सविता००१

मी पण लोखंडी तव्यावरच करते. मस्त होतात.

कंजूस's picture

5 Feb 2015 - 8:57 pm | कंजूस

छान आहे. मला फार आवडतात.
थोडे वेगळे आणि झटपट सारण म्हणजे पंजाबी समोश्यात असते ते बटाटा अधिक मटार वापरतो आणि भरले टमाटे ,कोबिचं पानात गुंडाळी करून अवनमध्ये तेल लावून भाजायचे हा शॉर्टकट.

hitesh's picture

6 Feb 2015 - 3:54 am | hitesh

करेन

छान आहे पाकृ.करुन पाहीन.

स्नेहल महेश's picture

6 Feb 2015 - 9:49 am | स्नेहल महेश

भाकरी बरोबर अप्रतिम लागते

पदम's picture

6 Feb 2015 - 5:07 pm | पदम

नक्की करेन