झटपट सोलकढी (Instant)

प्रमोदताम्बे ..........................................'s picture
प्रमोदताम्बे ..... in पाककृती
5 Feb 2015 - 4:53 pm

झटपट सोलकढीझटपट सोलकढी (Instant)

साहित्य : घट्ट दही,दूध,पाणी,कोकण आगळ,साखर,मीठ,आले,मिरच्या,कोथिंबीर,४-५ कढीपत्याची पाने,धने-जिरे पूड,स्ट्रौबेरी खाण्याचा रंग
कृती : प्रथम मिक्सरच्या द्रव पदार्थासाठीच्या भांड्यात १मोठा कप घट्ट दही,१-१/२ते २ कप दूध,१/२ कप कोकण आगळ व पाणी,चवीप्रमाणे साखर व मीठ घालून फिरवून घ्या व एका मोठ्या स्टीलच्या उभ्या आकाराच्या गंजात काढून नंतर त्यात मिक्सरच्या छोट्या भांड्यातून आल्याचा एक छोटा तुकडा,लसणाच्या ४-५ पाकळ्या,चवीप्रमाणे २-३ मिरच्या,धने-जिरे पावडर,थोडी चिरलेली कोथिंबीर व ४-५ कढीपत्याची पाने ह्यांचे वाटण करून घेऊन ते वाटण आणी ५-६ थेंब स्ट्रौबेरी खाण्याचा रंग घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या व काचेच्या ग्लासमधून सर्व्ह करतेवेळी सजावटीसाठी वरुण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

5 Feb 2015 - 4:55 pm | स्पंदना

हांगाश्शी!!
आता चपात्या आणि भाताची रेसीपी लिवा झटाझटा, मग कोशींबीर आणि चटनी एका फेर्‍यात हुन जाउदे!!
सोडायच न्हाय!! हानायच!!

सूड's picture

5 Feb 2015 - 4:56 pm | सूड

घट्ट दही,दूध

तुम्हाला नक्की बनवता येते का हो सोलकढी? शिंच्या नसत्या रेशिप्या टाकू नका!!

आवं आवं सुड भावजी लायनीन या.
पयला त्या मिरच्या खाउन येवा, मग हिकड!!

प्रीत-मोहर's picture

5 Feb 2015 - 5:02 pm | प्रीत-मोहर

तेच ना
दूध न दही न धने जिरे पुड न रंग घालतात सोलकढीत हे एक गोवेकर असुन आजच कळले मला!!!

(गोंयकार) प्रीमो

प्रमोदताम्बे ..........................................'s picture

5 Feb 2015 - 5:03 pm | प्रमोदताम्बे .....

नेहमीच आधी मी स्वत: बनवून मगच त्याची रेसिपी व फोटो काढून पोस्ट करतो. हवे तर एकदा तुम्ही स्वत: या प्यायला व खात्री करून घ्या.

पैसा's picture

5 Feb 2015 - 5:11 pm | पैसा

दही अजिबात चांगलं लागत नाही. रंग आणि कढीपत्ताही सोलकढीमधे उपयोगाचा नाही.

तुम्हाला खरीच इन्स्टंट सोलकढी पाहिजे का? आगळामधे मीठ आणि एक मिरची उभी चिरून टाका, थोडा कांदा बारीक चिरून टाका. याला आम्ही तिवळ म्हणतो.

नारळ खवायला नको असेल तर नारळाचे दूध विकत मिळते. आगळ, नारळाचे दूध, बारीक केलेल्या लसणीच्या पाकळ्या आणि मीठ एवढेच घालून खरी सोलकढी मिळेल. त्यात दूध दही घालणे हा मी सोलकढीचा अपमान समजते!

प्रीत-मोहर's picture

5 Feb 2015 - 5:13 pm | प्रीत-मोहर

actually... आणि फुटी कढी ही करुच शकतो की नारळाच्या दुधाशिवाय ची. ती तर जिरवणीला ब्येस्ट असते एकदम.

या सगळ्याच्साठी गोव्याबाहेर विकतची सोलकढी पीत नाही मी.

अत्रन्गि पाउस's picture

5 Feb 2015 - 7:58 pm | अत्रन्गि पाउस

इस्कटून सांगताल का ताई
जीरवणी म्हणजे पाचक का ?

प्रीत-मोहर's picture

5 Feb 2015 - 9:44 pm | प्रीत-मोहर

हो. जिरवण म्हणजे पाचक. आमच्याकडे जेवणात पहिला वरणभात मग आमटीभात आणि मग शेवटी ताक आणि *कढीभात जेवतात. आणि मग अशक्य झोप येते.
* कढी म्हटल की बाय डिफॉल्ट सोलकढी. इतर कढ्यांना त्यांच्या त्यांच्या नावांनी हाक मारतात.

प्रीत-मोहर's picture

5 Feb 2015 - 9:45 pm | प्रीत-मोहर

फुटी कढी म्हणजे सोलकढी विदाउट नारळाचे दुध.

पहिला वरणभात मग आमटीभात आणि मग शेवटी ताक आणि मग कढीभात जेवतात.

ईतके भात खाल्ल्यावर अशक्य झोप न येणे अशक्य आहे +D

प्रीत-मोहर's picture

5 Feb 2015 - 10:40 pm | प्रीत-मोहर

अग तै आमच्या इथे पोळी नसते जेवणात!!!! भातच. आणि तो असा जेवायचा.

त्यात आमच्या सासरी तर वरण ( ते पण नारळाच दूध घालुन केलेल) आणि फुटी कढी मिक्स करुन भात कालवुन जेवतात. हा भात इवलुस्सा जरी जेवला तरी कहर झोप येते.

निवेदिता-ताई's picture

5 Feb 2015 - 10:52 pm | निवेदिता-ताई

ए मला फार आवड्ते नारळाचे दुध घालुन केलेले वरण़.

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2015 - 11:16 pm | पिवळा डांबिस

वरती सुडक्याच्या मदतीक जांवचो विचार केलेलंय....
पण आता सगळे गोंयकारणी पदर खोचून धावंन गेलेले बघान जीव थंडावलो!!!!
आता मी (मिपावरती) मराक मोकळो झालंय!!!
:)

उदय के'सागर's picture

6 Feb 2015 - 10:30 am | उदय के'सागर

नारळाचे दुध घालून केलेल्या वरणाची पाककृती मिळेल का, प्लीज?

चिप्लुन्कर's picture

6 Feb 2015 - 11:00 am | चिप्लुन्कर

दही आणि दुध घालून सोलकढी , घोर अपमान . आणि परत रंग येण्या साठी स्ट्रौबेरी चा खाण्याचा रंग.

(बाप रे घरी कळवायला हव कोकमं काढून स्ट्रौबेरी लावा म्हनुन.)

सानिकास्वप्निल's picture

5 Feb 2015 - 5:45 pm | सानिकास्वप्निल

सोलकढीत दही, दूध, रंग *shok*

अरे देवा *DASH*

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Feb 2015 - 5:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

मायला!!! दह्याची सोलकढ़ी??? :O , आमची कल्पना होती नारळाच्या दुधात कोकमे कुस्करून वैग्रे कायतरी! ह्यांचं तिसरंच!!!! :P

विशाखा पाटील's picture

5 Feb 2015 - 6:32 pm | विशाखा पाटील

रेसीपीचे नाव बदलवा हो! कोकम घालून फोडणीचे दुधताक, असे ठेवा.

अत्रन्गि पाउस's picture

5 Feb 2015 - 7:59 pm | अत्रन्गि पाउस

फोडणी ? ती कुठेय ? का मी चुकलोय वाचतांना ...
च्यायला त्या trap वाचून गरगरलेले अजून संपलेले नाही ==))

सस्नेह's picture

5 Feb 2015 - 10:17 pm | सस्नेह

अहो विशाखाताई त्यांनी कोकण घालून केलीये हो कढी !

विशाखा पाटील's picture

5 Feb 2015 - 11:59 pm | विशाखा पाटील

अरे हो खरंच की! 'ण' चा 'म' झाला होय. मी नुकतंच 'चार पाच वर्षांपूर्वीच' लेखन मन लावून वाचलं होतं. त्यामुळे न पिताच (सोलकढी म्हणतेय मी) डोकं गरगरत होतं. त्यात लसूण, मिरची, जिरं, कढीपत्ता इत्यादी साहित्य वाचून मला वाटलं फोडणीच द्यायचीय.

चिमिचांगा's picture

5 Feb 2015 - 11:58 pm | चिमिचांगा

आणि धाग्याचेही नाव बदलून 'दही'शतवाद म्हणजे काय? असे ठेवा.

अत्रन्गि पाउस's picture

5 Feb 2015 - 6:40 pm | अत्रन्गि पाउस

ह्याच्यात एखाद्या द्विशतकी धाग्याची बीजे दिसताहेत असे आत्ताच कुणीतरी म्हणाले का ???
ह्याच्या बरोबर एखादे आयुर्वेदिक पद्धतीने तळलेले पापलेट बरे लागेल असे वाटते

हि आमसुलाची लस्सी किंवा अमसुल फ्लेवर वाला मठ्ठा झाला... पण सोलकढी नक्कीच नाही.

पप्पु अंकल's picture

5 Feb 2015 - 7:20 pm | पप्पु अंकल

बाxxxx अशी सोलकढी गेल्या दहा हजार वर्षात कोणी बनवली नाही....

दिपक.कुवेत's picture

5 Feb 2015 - 7:22 pm | दिपक.कुवेत

प्रमोद भाउंना. असे काय सगळे एकदम तुटुन पडलात त्यांच्या पाकृवर??? मी तर म्हणीन ह्यात दोष तुमचाच आहे. वाचा पाहू शिर्षका पासून...काय म्हटलयं??? झटपट सोल कढी...मग आता ती करताना त्यानी झटपट जे जे हाताला लागलं ते मिक्सर मधे टाकलं आणि ईथे येउन पाकृ पोस्ट केली. चार कौतुकाचे शब्द (तेच ते नेहमीचेच तोंपासू, बादलीभर लाळ गळली, जीवघेणे ई. ई.) बोलायचे सोडून चुका काय दाखवताय. रे देवा म्हल्हारा क्षमा कर या मिपाकरांना. प्रमोद भाउ तुम्हि नका हो नाउमेद होउ. मी येईन अशी सोलकढी प्यायला. करु मस्त कट्टा....सोलकढी करु गट्टा...

Maharani's picture

5 Feb 2015 - 7:25 pm | Maharani

*shok*
रच्याकने
हे कोकण आगळ काय आहे/??

दिपक.कुवेत's picture

5 Feb 2015 - 7:31 pm | दिपक.कुवेत

कोकम आगळ...म्हणजे कोकमचा गर (बी काढल्यावर उरतो तो)

दिपक.कुवेत's picture

5 Feb 2015 - 7:32 pm | दिपक.कुवेत

कुस्करुन होतो तो गर....कोकम आगळ

प्रभाकर पेठकर's picture

5 Feb 2015 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर

अरे त्यांनी 'कोकम आगळ' नाही तर मुळ पाककृतीत सांगितलेल्या 'कोकण आगळा'बद्दल प्रश्न उभा केला आहे.

दिपक.कुवेत's picture

5 Feb 2015 - 7:49 pm | दिपक.कुवेत

माझाचं पोपट झाला....मी ते वाचलचं नव्हतं. पहिलचं दहि/दुध वाचलं आणि सरळ खाली स्क्रोल केलं. म्हटलं सोलकढीला नक्किच उकळी आणली असेल मिपाकरांनी....

प्रभाकर पेठकर's picture

5 Feb 2015 - 7:36 pm | प्रभाकर पेठकर

पुण्यात असताना एकदा घाईघाईत एक दुकानातून सोलकढी घेतली. पहिल्या घोटालाच नापास झाली. दह्याची सोलकढी ज्यांना आवडत असेल त्यांना आवडो बापडी. नारळाचे ताजे दूध, अस्सल कोकमं किंवा आगळ, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ह्याला पर्याय नाही.
फुटीकढीही लई भारी.

'घट्ट दही' वाचूनच हृदयातून एक बारीकशी कळ आली.
साहित्य हे 'सोल-सर्चिंग' करायला लावते, असं ऐकून होतो - तद्वत कृतीतल्या साहित्यात सोलं धुंडाळली. सापडली नाहीत. एक वेळ आगळाची आगळीक खपली असती, पण दह्याच्या दुप्पट दूध पाहून पुनश्च जवनिकेने आपले अस्तित्व जाणवून दिले.

बाकी 'आमच्याकडे अश्शीच करतात. एकदा करून तर बघा' हा युक्तिवाद तत्त्वतः बरोबर आहे - पण 'पचनी' पडेलसे वाटत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2015 - 9:07 pm | अत्रुप्त आत्मा

@पण 'पचनी' पडेलसे वाटत नाही. >> :-D

भाते's picture

5 Feb 2015 - 8:24 pm | भाते

सोलकढीची आणखी एक पाकृ?

हे पियुषचं उरलेलं साहित्य वापरुन स्ट्राॅबेरी कलर,लसूण कढिपत्ता घातलेलं पेय आहे.काही विशिष्ट पाहुणे न कळवता आल्यास त्यांना मी हे पेय देऊन बघेन.जर ते परत नाही आले तर रेशिपीला पुस्प्गूच देऊन सत्कार करेन.

Maharani's picture

5 Feb 2015 - 9:34 pm | Maharani

*lol* *LOL*

सतीश कुडतरकर's picture

9 Feb 2015 - 4:07 pm | सतीश कुडतरकर

:-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Feb 2015 - 9:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ही नक्की सोलकढीची रेसिपी आहे?

आता कोणीतरी कोल्हापुरी मिरच्यांचा हलवा किंवा मुरांबा अश्या रेसिपी टाकाल काय?

अत्रन्गि पाउस's picture

5 Feb 2015 - 10:01 pm | अत्रन्गि पाउस

मिळते बर का ठाण्यात (टेम्पटेशन - राम मारुती रोड)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Feb 2015 - 8:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्या पुण्यात पण मिळते हो स्पाईस आईसक्रीम फर्ग्युसन रोडवर.

अत्रन्गि पाउस's picture

11 Feb 2015 - 3:56 pm | अत्रन्गि पाउस

चक्क कॉपी केलेली आहे हॉ ...कांय ??

ह्या ह्या ह्या

आमच्या बदलापूरात त्याचं ओरिजिन आहे, ठाणेकरांना त्याचं फार अप्रूप वाटलं म्हणून त्यांना देऊन टाकलंनीत चितळ्यांनी!!

अत्रन्गि पाउस's picture

12 Feb 2015 - 7:36 am | अत्रन्गि पाउस

अजून एक ग्लास झटपट सोलकढी देण्यात येत आहे

*LOL*

प्रीत-मोहर's picture

5 Feb 2015 - 9:53 pm | प्रीत-मोहर

आमच्याकडे सोलकढी अशी करतात.

कोकम सोलं भिजत घालतात अर्धा पाउण तास. त्यात मिरच्या बारीक चिरुन टाकायच्या. मग त्यात हिंग थोडीश्शी साखर अन मीठ चवीपुरते घालायचे. पुरेशी आंबट झाली की सोल काढुन टाकायची त्यातली, नाहीतर अती आंबट होते. मग नारळाच दुध घालायच त्यात. आणि लसुण आणि कोथिंबीर ऐच्छिक. नो फोडणी.

मी लसुण नाही घालत कढीत, पण त्यात थोड आलं बारीक ठेचुन टाकते . आणि थोडास्सा लिंबु रस ही.
आहाहाहा ... काय चव येते...

यातले नारळाचे दुध वगळता बाकी सगळे घालायचे. मग झाली फुटी कढी.

गोव्यात मित्राच्या घरी फुटी कढी मी नुसतीच प्यायली होती.. तोंड आंबट झाले होते, पण तरी खूप आवडली होती.

फक्त फुटी कढी आणि भात खाऊन दुपारी डाराडूर झोपलो होतो..

मनिमौ's picture

5 Feb 2015 - 10:20 pm | मनिमौ

भुतलावरचे अमृत की हो हे.*crazy*

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Feb 2015 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रता साहेब, नका लक्ष देऊ या लोकांकडे. जरा कोणी नवा प्रयोग केला की त्याला विरोध करणे ही पुरातन कालापासून चालत आलेली मानवी खोड आहे !

टाका तुमचा अजून दुसरा एखादा प्रयोग !

आधी कधी सोलकडी खाल्ली नाही मी ही रेशीपी करुन पाहतो

पैसा's picture

6 Feb 2015 - 11:20 am | पैसा

चांगली चावून चावून खा!

सस्नेह's picture

6 Feb 2015 - 11:55 am | सस्नेह

पुष्कळ चावून झालीय आता ! =))

विजुभाऊ's picture

6 Feb 2015 - 3:02 pm | विजुभाऊ

अरे बापरे. सोल्कढीचा सोल हरवला की हो.
एक शंका : दह्याच्या सोलकढीचे पियुष बनवता येईल का?
****( ही पाककृती अंडी घालून करता येईल का असे विचारायचा मोह आवरतो)

रमेश आठवले's picture

9 Feb 2015 - 4:23 am | रमेश आठवले

नारळाचे दुध हे सोल कढीचा soul आहे . त्याची सर इतर ऐवजी पदार्थात येणे नाहि।
तशी अमसुलावर आधारित बरेच पेये आहेत. सार, सरबत, काका तांब्यांनी बाजारात आणलेले अमृत कोकम वगैरे .
गुजराती जेवणातील कढी म्हणजे आपल्याला तिखट मीठ घातलेले पात्तळ श्रीखंड वाटेल. इतर कढी प्रकारामध्ये सर्वात आवडणारा प्रकार म्हणजे पंजाबी पकोडा कढी.

हाफ शेंचुरी निमीत्त श्री.प्रमोद तांबे आणी श्री.सुड यांचा सत्कार सोलकडी देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक- जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

अत्रन्गि पाउस's picture

9 Feb 2015 - 4:23 pm | अत्रन्गि पाउस

कुठली सोलकढी ?

श्री.सुड यांचा सत्कार सोलकडी देऊन करण्यात येत आहे.

हायला!! मी का म्हणे?

:D

स्वच्छंदी_मनोज's picture

9 Feb 2015 - 7:44 pm | स्वच्छंदी_मनोज

धाग्याच्या नावात एकदा झटपट लिहील्या नंतर परत कंसात Instant का लिहीले ते कळले नाही. बहुदा instantly झटपट केलीले दिसतेय सोलकढी :)

बाकी अश्या दही घालून सोलकढी करता येऊ शकेल हा विचार देखील आत्तापर्यंत केला नव्हता.

अवांतरः चव जाऊद्या पण "कोकण" आगळ आणी स्ट्रॉबेरीचा एकत्रीत रंग कसा येईल याचा विचार करतोय :)

प्रभाकर पेठकर's picture

10 Feb 2015 - 10:30 am | प्रभाकर पेठकर

>>>> "कोकण" आगळ आणी स्ट्रॉबेरीचा एकत्रीत रंग कसा येईल याचा विचार करतोय.

कोकमं ताजी आणि चांगल्या प्रतिची असतील तर वेगळा रंग घालायची गरजच भासत नाही. तेच आगळाबद्दलही लागू आहे. कांही कारणाने कोकमं जुनी झाली असतील किंवा कमी दर्जाची असतील तर रंगाचा प्रभाव कमी होतो. अशा वेळी कुठला कृत्रिम रंग वापरण्यापेक्षा किंचित प्रमाणात बीट कंद वापरल्यास उत्तम रंग येतो आणि कृत्रिम रंगाचे दुष्परिणामही टाळता येतात.