ड्ब्ल्यु.एच्.ओ. मधला कामाचा ३ रा दिवस. एकंदरीत कामाचे स्वरुप फारसे कळले नव्हते.
टीम मीटींग ला बोलावणे आले. व्यासपिठावर दिग्गज मंड्ळी बसली होती. साहेब आल्यावर सगळी उठून उभी राहिली. आम्ही पण सलामी दिली. त्यांनी "टेक युवर सिट" म्हट्ल्यावर बसलो बापडे. हे स्पेशल ऑफिसर टू गवरमेंट ऑफ इंडिया फॅमिली प्लॅनिंग होते.पहिल्याच वाक्यात आमची दाणादाण उडाली. एकंदरीत आपला साहेब सोलकर आहे हे लगेच समजले. त्यांच्या भाषणाचा साधारण गोषवारा खालीलप्रमाणे:
If anyone of you is a pancy foot quit today. There is no room for weaklings here. You have joined worst possible profession for living. So quit today. I will tell you why?
The population will hurl at you pure unadultereted shit. Be ready for it. Depression, Disorientation,Diabetes are occupational hazards of this profession.So quit today.
माझ्या साथिदाराचा चेहेरा ढगाळला. तो काहितरी बोलणार हे मला कळले. ओठ न हलवता त्याला गप्प बसायला सांगितले.(शाळेत शिकलेली कला)
Unfortunately in India, sex is a dirty word. You cannot speak directly about it. So you will be trained in slang language, roundabout reach, and speaking between two lines. Unless you become expert, you will not be able to produce results. And I donot want laggards around me. Population will hate you for helping them.
They will hurl stones at you for solving their problems. You will need a very strong mind to deal with the stress of this job. And if you do not have it quit today. My team will help to develop this strong mind but you will have to devise your own methods to keep your mind safe and save it from going bananas. Report to me within 24 hrs. about your plans. दोन तास साहेब न थांबता बोलले इतर विषयाबद्द्ल.
मीटींग संपल्यावर मणामणाचे पाय उचलत खाली आलो. साथिदाराची अवस्था बघण्यासारखी झाली होती. लांबून आला होता बिचारा पोटापाण्याकरिता.चहा पोटात गेल्यावर बोलायला लागला बापडा.
तो:तू काय करणार आहेस. मी सोडतो.
मी: एवढ्यात मी सोडणार नाही. तू रेडा, मी रेडा. हा साहेब ज्ञानेश्वर दिसतो आहे. संधी सोडण्यात अर्थ नाही.
तो: अरे पण केवढे कठीण आहे हे काम.
मी: पगार दुप्पट आहे ना?
तो: अरे पण दगड खायचे.
मी: अरे ते फक्त बोलण्यापुरता. मदत करायला गेलेल्याला कोण दगड मारेल. साहेब फक्त माणसामधील काही घाणुस लोकांबद्द्ल बोलत आहेत. तुला कोणी वाकडा भेट्ला की दे माझ्या टेबलवर पाठ्वून.(मी किती चूक होतो ते मला एक वर्षात कळणार होते.)
दुस-या दिवशी काय रिपोर्ट करायचा तेवढाच विचार करु आता.
रात्रभर विचार केला. पण उत्तर सापडले नाही. सकाळी ऑफिसला जाताना नजर पड्ली आयडियल (दादर)मधल्या एका पुस्तकावर. नाव होते "बटाट्याची चाळ". म्हटलो सुटलो आता.
रिपोर्टींग मध्ये माझा नंबर आला. साहेबाला पु.ल्.देशपांडे ह्या जादुगाराची ४ पुस्तके दाखविली. साहेब हसला. म्हणाला -""गुड बॉय. करेक्ट चॉइस, नाईस स्ट्रॅटेजी"
नंतर ७ वर्षे दिवसाला १८ तास त्या खदाणीत काम करताना मी कधीच वेडा झालो नाही.
त्रास वाढला की रात्री दोन प्रकरणे वाचून काढायचो. सकाळी एकदम फिट्ट. जाता जाता: फॅमिली प्लॅनींगला आता फॅमिली वेल्फेअर म्हणतात. वेल्फेअर म्हट्ल्यामुळे भावना दुखावल्या जात नाहीत म्हणे समाजाच्या.नेमक्या कुठल्या हे मी सांगायला हवे का?
क्रमशः इलाज नाही.विज केंव्हाही जाईल. पुढील भागात कवच कुंडलांची म्हणजेच भाईकाकांची भेट. बरोबर भक्ती बर्वे आणि माझे मित्र सतिश दुभाशी.
प्रतिक्रिया
12 Nov 2008 - 10:38 pm | लिखाळ
चांगला आहे लेख.. पुढे वाचण्यास उत्सुक..
अनुभव 'काथ्याकुटात' पडल्याने यात कुठला काथ्या आहे ते शोधत होतो. मग शेवटी कळफलकाच्या कळा कुटल्या.
-- लिखाळ.
13 Nov 2008 - 7:48 pm | टारझन
प्रभुदेवा , स्टॅमिना वाढवा आता.......... लेखणाचा
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
12 Nov 2008 - 10:33 pm | आंबट शौकिन
लेख चांगला आहे.
13 Nov 2008 - 12:05 am | बिपिन कार्यकर्ते
विप्र, अजून एक छान विषय हाताळताय बहुतेक. पुढच्या भागात कळेल नीट. (आणि पुढचा भाग वीज आली रे आली की लिहायला लागा. पुढचे ४-५ तास तरी जाणार नाही ना वीज ... म्हणजे लिहून होईल :) )
'चित्रकला', 'झेंडावंदन' वगैरेचं मूळ सापडलं. तुम्ही क्रिप्टिकशास्त्रात कसे एवढे पारंगत झालात ते समजले आता. ;)
बिपिन कार्यकर्ते
13 Nov 2008 - 11:39 am | विनायक प्रभू
भाईकाकांचा पण हात आहे ह्या शास्त्रात.
13 Nov 2008 - 10:56 am | सहज
घरोघरी फिरुन लोकांना कुटुंबनियोजनाबद्दल प्रबोधन करायचे काम सेवाभावी कार्यकर्ते कसे करतात हे आम्हाला समजवा.
तुम्ही एक दोन किस्से घेउन लिहा की.
13 Nov 2008 - 11:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काका, उदाहरणं देऊन आम्हा ढ विद्यार्थी-वाचकांसाठी लिहा.
13 Nov 2008 - 11:54 am | अवलिया
चांगले आहे.
अंगच्या गोष्टींबद्दल तुम्ही सांगत आहात... थोडे स्पष्ट असेल तरी हरकत नाही.
काही जणांचा बोळा निघेल हा झालाच तर फायदाच होईल.
13 Nov 2008 - 1:04 pm | जैनाचं कार्ट (not verified)
हेच म्हणतो आहे !
प्रभु देवा, थोडं नाही.. एकदम व्यवस्थीत स्पष्ट लिहा !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
13 Nov 2008 - 1:53 pm | सुमीत भातखंडे
लवकर लिहा पुढचा भाग.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
13 Nov 2008 - 6:28 pm | ब्रिटिश
सपष्ट लीवताय. आजुन येवदे लवकर
अवांतर : ईज गेल्यावर काय ऊद्योग करता?
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
13 Nov 2008 - 6:31 pm | अवलिया
ईज असतांना जे चार्ज झालं असल ते डिस चार्ज करतात..
चौकशाच लय लोकांना
13 Nov 2008 - 6:59 pm | चतुरंग
सुरुवात चांगली आहे! लोकांच्या कल्याणाचे काम त्यांच्याच शिव्या आणि दगड खात करायचे म्हणजे सोपे नव्हे. अजून डीटेल मधे येऊदेत.
तुमच्या सायबाच्या बोलण्यावरुन भरपूर दुनियादारी केलेला उच्चपदस्थ आय्.ए.एस. असावा असे वाटते (सचिव पदाला पोचलेला).
चतुरंग
13 Nov 2008 - 7:35 pm | विनायक प्रभू
आय्.ए.एस अधिकारी ह्याना वचकून असायचे एवढ्या फाट्क्या तोंडाचा.