एक विचार

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in काथ्याकूट
2 Feb 2015 - 10:09 pm
गाभा: 

आज दुपारी जेवणाच्या वेळी घरीच होते. मुलींच ताट मीच वाढून दिल. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी; उजवीकडे एक भाजी, वाटीत आमटी, ताक, पोळ्या आणि मग गरम गरम वरण-भात दोघी अगदी मनापासून जेवल्या. आमच्याकड़े कामाला येणा-या बाई सगळ बघत होत्या. मला म्हणाल्या,"वाहिनी, अस रोज वाढून द्या. बघा मुलींची तब्बेत कशी महिन्याभरात सुधारेल." मी हसले; म्हणाले,"अहो, कस शक्य आहे? मग माझी बाहेरची कामं, जवाबदा-या कोण पूर्ण करणार?" मी आणि बाई दोघी हसलो आणि विषय तिथेच संपला.

मात्र विषय संपला अस मला वाटल तरी विचार मनात घोळत राहिले. आता तो काळ मागे पडला.. जेव्हा; स्त्री केवळ घरातल्या अर्थकारणाला हातभार लावण्यासाठी शिक्षण घेऊन नोकरी करायची. आज आपण आपल्या मुलांना कोणताही भेदभाव न करता शिक्षण देतो... निदान दिल पाहिजे; हां विचार मान्य करतो. आज कमी शिकालेले आई-वडिल ही आपल्या मुलीने चांगले शिक्षण घ्यावे आणि तिच्या आयुष्यात चांगली प्रगति करावी ही इच्छा मनात ठेवतात. आणि त्या दृष्टीने कायम प्रयत्न करतात. 10वि 12वि च्या रिजल्ट्स नंतर वर्तमान पत्रातून आपन जे वाचतो ते फ़क्त ट्रेलर असत. अशी अनेक मूल आणि त्यांचे पालक स्वमेहतीने पुढे येतातच की.

आजचे आई-वडील आपल्या मुलाला देखिल संसार, स्वयंपाक आणि घराच्या जवाबदा-यांची जाणिव देतात. आज नविन लग्न झालेले मुलगा-मुलगी एकमेकांच वैयक्तिक स्वातंत्र्य जाणतात. मुल जन्माला घालण्याची त्यांना घाई नसते. कारण त्यांना आपल्या एकुलत्या एका बाळाला सर्व प्रकारची सुख द्यायची असतात. त्याच बरोबर स्वतःच स्वातंत्र्य... 'स्पेस'.... जपायची असते.

पण मग यासर्वात आपण कुठेतरी कुटुंब व्य्वस्था आणि पुढील पिढीवरील संस्कार या भारताच्या कण्याला धक्का देतो आहोत का?

आज मनात येणारे काही प्रश्न फ़क्त तुमच्या समोर मांडते आहे. पूर्वी शाळेच्या वर्गातील मुलांमधे केवळ 1 किंवा 2 टक्के मुलांना चश्मा असायचा. कदाचित त्यामुळेच चश्मा असलेल्या मुलांना 'बॅटरी' म्हणून इतर मूलं चिडवायची. आज मात्र एका वर्गातील किमान 8/10 मुलांच्या डोळ्यावर सर्रास चश्मा दिसतो... काय असाव याच कारण? आज मुलांना घरातील भाजी-पोळी, वरण-भात, आमटी-ताक, चटणी-कोशिंबीर अस जेवण मुळात माहीत आहे का? असेलच तर आवडत का? वयाच्या 12-13व्या वर्षीच ब्यूटी पार्लरची पायरी मुली चढायला लागल्या आहेत...का?

मला आजही आठवत; माझ्या आईला खूप लहानपणी कगश्मा लागला होता. आणि भावाला देखिल केवळ मुळचे डोळेच कमजोर असल्यामुळे चश्मा लागला होता. तरीही माझ्या आईने अनेक प्रयत्न केले होते त्याचा चश्मा जावा म्हणून. रोज सकाळच्या शाळेला जायला आम्ही 6.30 ला निघायचो. त्यागोदार उठून रात्रि भिजत घातलेले बदाम ती सहाणेवर उगाळून आमच्या दुधात घालायची. इडली, डोसा, थालीपीठ, परोठे हे पदार्थ घरीच बनायचे. दर रविवारी उगाळलेल हलकुंड आणि तेल लावून मगच अंघोळ करण्याचा नियम होता.

म्हणजे दोन पिढ़या मागे गेल तर एक लक्षात येत की त्या काळात घरातील पुरुष 'कमावता' होता आणि स्त्री 'कुटुंब वत्सला' होती. पुरुष जे आणि जितके कमवून आणायचा त्यातच घर चालत असे. 'वाघळे की दुनिया' मधील मिस्टर वाघळे म्हणा किंवा आर. के. लक्षुमण यांचा 'कॉमन मॅन' म्हणा. परवडत नाही म्हणून एकाच ताग्यातुन घरातील पड़दयांपासून ते कपड्यां पर्यंत सर्व शिवणे ही जरी सीरियल मधिल अतिशयोक्ति वाटत असली; तरी निदान मुलांचे कपडे एकाच ताग्यातिल असणे त्या काळात ख़रच 'कॉमन' होते. आदल्या दिवशी उरलेल्या पोळ्यांचे लाडू दुस-या दिवशी डब्यात हमखास असत. 'आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे.

त्या काळात संपूर्ण सोसायटीमधे एखाद्याच घरी फोन किंवा फ्रिज असायचा. ज्या एकाच घरात टी. व्ही. असायचा त्या घरात संपूर्ण सोसायटीने मिळून शनिवार-रविवारचा सिनेमा बघणे हा ठरलेला कार्यक्रम.

त्यानंतरच्या पिढीच्या मात्र थोड्या अपेक्षा वाढल्या. एका ताग्यातले कपडे घालायला मूलं नकार देऊ लागली. प्रत्येक घरात एक टू व्हीलर, फोन, फ्रिज, टी.व्ही. दिसू लागले. वाढणा-या अपेक्षांमुळे घरच्या स्त्रीला देखिल कमावण्यासाठी बाहेर पडण्याची गरज वाटू लागली. त्यासाठी बि. ए., बि. कॉम. किंवा मग बि. एड. असे शिक्षण घेऊन बैंक किंवा सरकारी कारकुनि किंवा शिक्षिका अशी नोकरी करायला स्त्री बाहेर पडु लागली. पण तिचे विश्व तरीही ऑफिस आणि घर इतकेच मर्यादित होते. ऑफिसमधुन निघताना आज संध्याकाळी काय नाश्ता द्यावा सर्वाना हां विचार तिच्या मनात घोळत असे आणि रात्रि झोपताना सकाळची भाजी चिरून, कणिक मळल्याशिवाय तिला झोप येत नसे.

लंच अवर्स मधे गप्पांचे विषयदेखिल ठरलेले असत. 'अग माझ्या अभयला चश्मा लागला ग.' 'अरे फ़क्त पहिलित ना ग तो? आत्ताच? त्याला गाईच तूप घाल खायला.' नाहीतर...'माझी मंजू बाहेर बसायला लागली बर का.' 'मग डिंकाचे आणि मेथीचे लाडू तुला आणून देते उद्याच्. मी केले आहेत माझ्या शोभासाठी.'

आता मात्र बदलत्या काळाचे विचार बदलले आहेत; अपेक्षा बदलल्या आहेत. आज जिजामाता उद्यान, जुहू, चौपाटी, हैंगिंग गार्डन असे जवळचे ऑप्शन्ससुद्धा आपण विचारात घेत नाही. कधीतरी एखाद वेळेस दाखवले की आपले कर्तव्य संपले असे आपल्याला वाटते. मग तर किल्ले, लेंणी दाखवणे तर दूरच. आज 15 दिवसातून एकदा बाहेर जाऊन जेवायचे आणि कंटाळा आला की घरी हॉटेल मधिल काहीतरी मागवायचे हे खूपच कॉमन झाले आहे.

आजच्या 'कॉमन मॅन'ची परिभाषा जशी बदलत चालली आहे; तशी कुटुंब संस्थेची देखिल बदलायला लागली आहे.

आणि आज मला फ़क्त एकच प्रश्न भेडसावतो आहे; या नविन युगात जन्मणा-या नविन पिढीला आपण 'सर्व दृष्टीने सुदृढ़ भविष्य' देतो आहोत का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव... कारण जर कुटुंब सुखी आणि सुदृढ़... तर समाज सुखी आणि सुदृढ़... आणि जर समाज सुखी आणि सुदृढ़.... तरच प्रगत आणि यशस्वी देश! हे आपण सर्वच जाणतो.

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

2 Feb 2015 - 10:22 pm | सामान्य वाचक

छान विचार आहे

अशा वेळी स्वाती ठकार यांची आठवण येते। कुठे गेल्या बरे स्वाति ताई ।।।।।।

स्वाती ठकार मिपावर होत्या? ये तो न्यूज हय मेरे लिये! एक पाय मुडपून बुचकळ्यात पडला आहात का कधी? आधी मजा येते आणि मग येतो घाम. पाठोपाठ लसणाचा उग्र दर्प.

सामान्य वाचक's picture

3 Feb 2015 - 11:59 am | सामान्य वाचक

पण हा लेख वाचून वाटले की हव्या होत्या ईथे
अशा सुरेख आणि विचार प्रवर्तक लेखासाठी तसेच सुजाण वाचक हवेत ना

ठकारबाई माहितीयेत परंतु हे घाम-दर्प काय आहे भेंडी =))

अत्रन्गि पाउस's picture

3 Feb 2015 - 3:29 pm | अत्रन्गि पाउस

भालकी कारवारच्या संग्रामाचे
लसणीच्या भाप्कार्याचे
उलटे चालत जाण्याचे
पाकातल्या उंदरांचे
एका हातात चिकन तलवार आणि बेफाम सायकल चालवण्याचे ...
...थरथरीचे ...गेले ते दिन गेले

अनुप ढेरे's picture

5 Feb 2015 - 1:39 pm | अनुप ढेरे

मी रोज कोबीची भाजी खात असे. तलवारींनी कोबी कापायची आणि त्याच्यावर सांभार मसाला मी भुर्भूरायची. एक डोळा शत्रूवर तर दुसरा भाजीवर अश्या अवतारात मी तासंतास बसायची. हा झाला माझा अनुभव. तुमचा पण सांगा नां...

लसणाची चटणी खावून सराव करावा.. भपकारा येतो

बॅटमॅन's picture

5 Feb 2015 - 2:43 pm | बॅटमॅन

अगायायायायायायायाया =)) =)) =))

  • कविता दर्शित चौधरी हि आमच्या कौलोनीत राहते आणि हि लोकांचे भांडे चोरण्यात पटाईत आहे. माझ्या घरून तवा पळवून नेला. मी हुंकार दिला आणि घराबाहेर जाऊन गर्जना केली. तेव्हा आली बाहेर गाऊन मध्ये आणि दिला तवा परत. आत्ता प्रतिक्रिया देतेस काय? येऊ का घरी उद्या परत? करू का गर्जना? वटारू का डोळे?
  • हि गोष्ट वाचून मला माझीच एक कहाणी आठवली. माझा धाकटा मुलगा प्रथमेश तेव्हा १३७ महिन्याचा होता. मी निघाले घरून घर शोधायला. तोंडात मी पुटपुटत होते.. "काहीतरी कुठेतरी कसेतरी थांबा"... अशे शब्द. इतक्यात भरधाव वेगानी एक माणूस धावत गेला. मी पण काही कमी नव्हते.. मी दुडक्या चालीत त्याच्या मागे गेले बघायला कि जातोय कुठे. मी तिरपी चालत असतांना शिंक आली. मी एकदम सरळ झाले. मग मी गुडघे दुमडून चालायला लागले. एका हातात शंख होता आणि दुसर्या हातात पिशवी. पिशवीत चिकन. तोंडात भात आणि कानात डूल. अश्या अविर्भावात मी शोधत होते घर.
अत्रन्गि पाउस's picture

5 Feb 2015 - 2:53 pm | अत्रन्गि पाउस

हा लेख वाचून मी खिक कन हसले. ओळखतो का रे मला तू सम्मित? दहावीत आहेस का रे? परीक्षा झाल्यावर उलट धावायचं सराव कर. गुढघा दुमडून शिंक देऊन बघ कशी मजा येते ते. मी पण दहावीत अभ्यास करायची. जेव्हा गूढ रात्र व्हायची आणि दूर कुत्रे भुंकत असायचे तेव्हा मी चिखल तुडवत एकटीच बाहेर पडायची आणि लिंबाच्या झाडावरून लिंब काढून आणायची.. आणि बसायची चोखत... एकटीच, शांत, आणि मग्रूर.. डोळ्यात पेटायचा अंगार.. आणि श्वास व्हायचा गरम.

पैसा's picture

9 Feb 2015 - 8:07 pm | पैसा

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 11:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्वाती ठकार, पोतदार पावसकर मॅडम, सप्तर्षींचं मांजर आणि ब्रम्हेबुवा ट्रीपला गेलेत ब्रम्हेंच्या नव्याकोर्‍या ९९ सी.सी. लुनावरुन क्वाड-सीट... :)

हाडक्या's picture

3 Feb 2015 - 5:05 pm | हाडक्या

क्वाड-सीट.

काय राव तुमी तुमाला आमी अस्सल मराटी शब्द सांगतो हिते..
जसे डब्बल शीट तसे टिब्बल शीट आणि चौब्बल शीट. कळ्ळे का ?

ट्रिप्सी,चॉप्सी,पेप्सी,सेक्सी।

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Feb 2015 - 10:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे अगुदरपासुन म्हैती हाये हाडुकराव!!!
क्वाड शीट वेगळ्या कारणासाठी लिवलयं. ब्रम्हेंचा सुप्रसिद्ध लेख आणि त्यावरच्या सुप्रसिद्ध प्रतिक्रिया वाचा मग समजेल :)

हाडक्या's picture

3 Feb 2015 - 10:49 pm | हाडक्या

ब्रह्मेंचा लेख (आणि त्यावरच्या ऐतिहासिक प्रतिक्रिया) कितीक वेळा वाचलाय हो पण दर वेळेस नवीन काही तरी गवसते. तुमचा रेफरन्स नाही लक्षात आला मज पामरास. जळ्ळा आमचाच अभ्यास कमी, जरा करा दिवा-बत्ती तुमीच.. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Feb 2015 - 9:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यावरची एक प्रतिक्रिया आज संध्याकाळी व्यनि करतो. इथे अवांतर नको :)

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 2:47 pm | टवाळ कार्टा

मला पण पाठव रे :)

स्वप्नांची राणी's picture

2 Feb 2015 - 11:40 pm | स्वप्नांची राणी

मला तर बाई प्रातःस्मरणीय रामतिर्थकर बाई आठवल्या. त्यांच एक वाक्य मला फार फार आवडतं.."तुम्ही डॉक्टरीण असा, इन्जिनिरीण असा, पायलटीण असा, सिए असा, आय्टी वाली असा तुम्हाला भाकरी करता यायलाच हवी."

पण मला भाकरी करता येत नाही याची मिपाकरांना शरम वगैरे वाटली पायजेल..

यसवायजी's picture

3 Feb 2015 - 12:03 am | यसवायजी

पण मला भाकरी करता येत नाही याची मिपाकरांना शरम वगैरे वाटली पायजेल..
येत नसेल तर शिका, नवर्‍याला सांगा नायतर हाटेलात्न मागवा. च्यामारी तुमाला भाकरी करता येत नाही तर मिपाकरांना कशाला शरम वाटंल?

स्वप्नांची राणी's picture

3 Feb 2015 - 1:01 am | स्वप्नांची राणी

"नवर्‍याला सांगा..."...हा हन्त हन्त..एक कुटुंब वत्सला असं काहि कमावता पुरूष असलेल्याला म्हणू तरी शकेल का? तुमच आपलं काहितरीच!

"हाटेलात्न मागवा.." असं कसं असं कसं...मग मी 'सर्व दृष्टीने सुदृढ़ भविष्य' कसं बनवू..???

सस्नेह's picture

3 Feb 2015 - 8:03 am | सस्नेह

पण मला भाकरी करता येत नाही याची मिपाकरांना शरम वगैरे वाटली पायजेल..

=))

सामान्य वाचक's picture

3 Feb 2015 - 1:01 pm | सामान्य वाचक

घरी भाकरी केल्याच् पाहिजेत. बाकि पुरुष मंडळी ना लष्कर च्या भाकरी भाजण्या तुन वेळ कसा मिळणार

स्वप्नांची राणी's picture

2 Feb 2015 - 10:30 pm | स्वप्नांची राणी

हां...आत्ता येतील स्युडो झ्युस्...

वधुवर कॅटेगरीत

जाण्याच्या मार्गावर जाण्याची जबरदस्त पोटेन्शियल असलेला धागा ...
शुभेच्छा !!! *JOKINGLY* *acute* *yahoo*

विशाखा पाटील's picture

2 Feb 2015 - 11:50 pm | विशाखा पाटील

सहमत!
सुदृढ समाज, कुटुंब, देश आणि भविष्य घडवायचं केवढं मोठ्ठ काम आहे. :)

स्वप्नांची राणी's picture

2 Feb 2015 - 10:59 pm | स्वप्नांची राणी

popcorn

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 11:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आज मी जेवणात फोडणीचा भात किंवा गुळ आणि भाकरी खाल्ली'; हे सांगताना कोणी ओशाळत नसे. आणि असे शिळे पदार्थ खाणारी पिढी जास्त मजबूत हाड़ा-पेराची होती हेदेखिल तेवढेच खरे.

ह्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? फोडणीचा भात / फोडणीची पोळी ही बेष्ट न्याहारी असते. मला भरपुर आवडते.

हे जे काही खाल्याची लाज म्हणा किंवा ओशाळलेपणाची भावना आहे ना, ती पालकांच्या फाजील लाडानी बिघडलेल्या मुलांना असते फक्त.

लालगरूड's picture

2 Feb 2015 - 11:48 pm | लालगरूड

:))

रेवती's picture

2 Feb 2015 - 11:53 pm | रेवती

:) लेख वाचला.

मुक्त विहारि's picture

3 Feb 2015 - 12:30 am | मुक्त विहारि

मुवि..

स्पंदना's picture

3 Feb 2015 - 6:33 am | स्पंदना

कुटुंब वस्तला, दुभती, शुभ शकुनी, (शकुनी????)
गाय गौतमी
आखूड शिंगी
मस्तक लिंगी
मध्ये द्वारका
शेपटीत लक्ष्मी
पाप जाईल दर्शनी

स्वप्नांची राणी's picture

3 Feb 2015 - 9:02 am | स्वप्नांची राणी

अश्लील अश्लील... *STOP*

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 2:47 pm | टवाळ कार्टा

???

यसवायजी's picture

3 Feb 2015 - 6:39 am | यसवायजी

वाहिनी, अस रोज लिहित जा.

आले मेले मिपाकर ओरडत.एक जण कुटुंबवत्सल असेल तर शप्पथ.या बुवा लोकांना कधी चारी ठाव स्वैपाक येणार कधी अाम्ही खाणार,आमचे चष्मे जाणार :(
माझ्या मुलाच्या चष्म्याचा नंबर जास्त आहे याला फालतु स्वैपाक करणार्या नवर्याचाच दोष आहे.कधी चुकुन मेल्याकडनं जास्त पोळ्या भात बनत नाही.कुठुन मिळणार आम्हाला पौष्टिक शिळं,फोभा फोपो :(
कालच हाटिलातनं मागवून खाल्लं.काय सांगायच्या या व्यथा.मेला कामावरुन घरी येताना पार्सल आणतो.जरा कणिक मळुन ठेवेन,भाजी चिरुन ठेवेन असा विचार करत येत नाही.म्हणून तर समाज देश आम्ही सगळे सुदृढ होत नाही आहोत आणि त्याला त्याचं तर काहीच नाही.कंपनीत पण लंच अवर मध्ये आज तू घरी जाऊन काय बनवणार वगैरे चर्चा नको करायला? तेही नाही.त्यापेक्षा कसं काय वरचे डोळे शेकर्स शेअर करत बसतात.
काय सांगू माझं दुःख :(

स्वप्नांची राणी's picture

3 Feb 2015 - 8:48 am | स्वप्नांची राणी

>> आले मेले मिपाकर ओरडत.. >> बघ ना, तरी वरच्या लेखात 'याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव' असं स्पष्ट लिहीलय!

मी मणातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही ;)

स्पंदना's picture

3 Feb 2015 - 9:20 am | स्पंदना

म्या चुकुन मट्णात वाचल.
ह हा हा!! रस्सा करायला पाहिजे!!
रव्विवार कधी गा?

स्वप्नांची राणी's picture

3 Feb 2015 - 9:31 am | स्वप्नांची राणी

फार मट्ण खात जाउ नकोस, 'सर्व दृष्टीने सुदृढ़ ' होशील...

स्पंदना's picture

4 Feb 2015 - 4:47 am | स्पंदना

पाठीवर मारा हो
खरं पोटावर नको गरीबाच्या राणीसरकार!!

जेपी's picture

3 Feb 2015 - 9:36 am | जेपी

आमच आनंदाच झाड आठवल.

मितान's picture

3 Feb 2015 - 9:49 am | मितान

जे वाटतं ते लिहिता येणं हे कौशल्य कमी लोकांमध्ये असते.
लिहीत रहा. इतरांचेही विचार कळतील.
बाकी दंगा कंपनीला गुदगुल्या होण्याचे कारण नेमके लिहिलेत तर लेखिकेला कळेल. अन्यथा उपयोग नाही. नुसता दंगाच घालायचा असेल तर चालू द्या... :)

खरं म्हणजे, मलाही प्रश्न पडलाय की नक्की काय चाललंय..?

स्वप्नांची राणी's picture

3 Feb 2015 - 10:21 am | स्वप्नांची राणी

अगं..किती तो विनम्र प्रतिसाद!

ओके ग अाज्जे.तुझ्या काळात तू घरी होतीस.निवांत उकडशेंगोळे नातवंडांना करुन घालायचीस.काय काय खाऊ बनवुन नातवंडांच्या ढेर्या वर यायच्या, अगदी सुदृढ पोरं!!.तेव्हा आजोबा फक्त जेवायलाच माजघरात येत असत.पण आमच्या काळात आम्ही दोघंही बाहेर पडतो.काम करतो,दमतो पण एक विचार फक्त 'ती'नेच करायचा हे जे गृहितक गंडलंय त्यावर वरचा प्रतिसाद आहे.लेखिकेने आपले विचार छान मांडलेत,प्रश्नच नाही पण तिने नकळत स्वतःलाच फक्त देशाच्या समाजाच्या मुलांच्या सुदृढतेला फक्त घरी बसून मुलाना चारी ठाव जेऊ घालणारी स्त्रीच असते हे गृहित धरलंय ते खटकलन् हो!!

वेल्लाभट's picture

3 Feb 2015 - 10:43 am | वेल्लाभट

अतिशय व्हॅलिड विचार आहे आणि खूप महत्वाचा

दुर्दैवाने बहुतांश पालकांना या गोष्टीची काळजी नाही. म्हणजे

मुलाला/मुलीला काही झालं आणि एखाद्या डॉक्टरच्या औषधाचा चटकन गुण आला नाही, तर ते डॉ़क्टरला शिव्या घालतील, डॉक्टर बदलतील, 'अगं यांच्याकडे जा, स्पेशलिस्ट आहे इथे प्रॅक्टिस करतो, अमूक आहे इतकी गर्दी असते' इत्यादी चर्चा करतील, पण मुळात आजारी पडतातच का अशी वारंवार मुलं, हे त्यांच्या मेंदूला शिवणार नाही.

मार्क शेजारच्या मुलापेक्शा कमी मिळाले तर ओरडतील/मारतील, पण 'तो नं ही भाजी खातच नाही, तिला ना हे मुळी आवडतच नाही' हे एखादं भूषण सांगितल्याप्रपणे सांगतील.

आयपॅड घेऊन देतील. का? 'आमच्यावेळी नव्हते आमच्या पालकांकडे पैसे. आमच्याकडे आहेत. मग काही कमी पडायला नको मुलांना' पण दिवस दिवस त्यावर गेम खेळत बसला मुलगा तर खुपणार नाही यांना. संध्याकाळी घराबाहेर हाकलून (चांगल्या अर्थी) मैदानी (मैदानं कमी झाली आहेत हा मुद्दा वेगळा) खेळ खेळायला प्रोत्साहन देणार नाहीत.

हे असं सगळं चाललेलं असताना कशी काय मुलं सुदृढ होणार? म्हणजे बहुतांश पालकांनाच जर सुदृढतेचं महत्व कळत नसेल, तर मुलांना ते कसं पटणार?

सस्नेह's picture

3 Feb 2015 - 12:11 pm | सस्नेह

ज्योतिताई, पण शेवटच्या ३ पॅरामधले विचार खरच योग्य आहेत का याचा तुम्हीच विचार करून पहा.
१. लंचअवर मधल्या गप्पा इतक्या मर्यादित विषयांवर असणेही गोष्ट भूषणास्पद आहे का ?
२. बागेत वगैरे फिरायला नेणे या गोष्टी आजचे पालक मुलांसाठी करत नाहीत असे म्हणायचे आहे का ?
३. मुलांचा, कुटुंबाचा त्यांच्या आरोग्याचा विचार फक्त स्त्रियांनीच करावा असे तुमचे मत आहे का ?
४. ऑफिसात जादा काम करून दमलेल्या स्त्रीने उशीर झाला तर बाहेरून खाणे मागवणे वाईट आहे तर तिच्या शक्तीबाहेरच्या गोष्टींसाठी तिने काय करावे ?
५. सुदृढ समाज, देश यांना सुदृढ बनवणे म्हणजे स्त्रियांनी(च) धावाधाव करणे असे आहे का ?
६. मुले, कुटुंब, समाज देश यांची जबाबदारी नवरे/पुरुष यांच्यावर नाही का ?
तूर्त इतकेच पुरे.
तुम्ही याची उत्तरे जरूर द्याल अशी आशा आहे.

विटेकर's picture

3 Feb 2015 - 12:13 pm | विटेकर

अतिशय विचारी आणि उत्तम लेख !
बूऱ्झ्वा समाज्यात अस्ले काही लिहिले की तुम्ही ताबड्तोब प्रतिगामी .. अपर्णा रामतीर्थकर वगैरे ... !
स्त्री - पुरुष समानतेच्या फाजीलपणाने कुटुंब संस्थेचा कणाच मोडला आहे हे सत्य तुम्ही मांडले आहे आणि या धड्धडित सत्याकडे डोळसपणे पाहण्याची निर्भिड्ता आहे कुठे ?
पैसे मिळवता आले म्हणजे आमची निसर्गदत्त वैषिष्ट्ये आम्ही टाकून द्यावीत की काय ? बाल संगोपन हा मातेचाच कोअर प्रांत आहे .. एखाद्या घरात (आणि हल्ली असे बर्‍याच घरात असते ) बायको नवर्‍यापेक्षा अधिक कमावू लागली की नवर्याने मुले प्रसवावीत की काय ?
निसर्गाने अतिशय सुसंगतपणे स्त्री- पुरुषाच्या शरिराची रचना केली आहे आणि त्याच्या सुसंगतपणे राहीले तर आयुष्य सुखकर होते.
पण आयुष्य सुखकर हवयं कुणाला ? लोकांना फक्त पैसा हवा आहे !
आधिक सुख म्हणजे अधिक पैसा असले भंपक सिद्धान्त उराशी बाळगले की आयुष्याची कुत्तर ओढाताण होतेच होते ....!
आणि स्त्रीया पुरुषांपे़क्षा अधिक मिळावायला लागल्या म्हणजे आली का स्त्री -पुरुष समानता ? थांबले का स्त्रीयांवरील अत्याचार ?
स्त्रीयांनी फक्त चूल आणि मूल करावे असे आता कोणीच म्हणणार नाही , ते चूकीचेच आहे, पण मिळवलेले ज्ञान हे फकत पैसे मिळवण्यासाठीच वापरायचे ? बालसंगोपन / होम मेकर इथे शिक्षित स्त्री ची गरज नाही ? ते महत्वाचे विषय नाहीत ? की ज्याचा मोबदला पैशात मिळतो तेच काम फकत महत्वाचे ?
अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान असलेल्या स्त्रीयांनी जरूर नोकरी करावी, आपल्याबरोबर इतरांचे जगणे ही सुन्दर करण्याची क्षमता असणारर्‍या माता भगिनीनी खरोखर घराच्या बाहेर पडून आप्ल्या जागी आपल्या सहचार्‍याला घरचे काम द्यावे , जर खरोखरच तशी अलौकिक्प्रतिभा असेल तर जरूर !!
पण बहुतांशी नोकर्‍या करणार्या भगिनी एकतर आय टी हमाल किंवा कारकून ! जिथे पैसे मिळतात हेच आकर्षण ! त्यालाच करियर हे गोंडस नाव !
समानता ही देखील मनात असावी लागते .. ओरबाडून घेता येईल का ?

स्वप्नांची राणी's picture

3 Feb 2015 - 12:28 pm | स्वप्नांची राणी

एकदम जबर्‍या!! 'अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान असलेल्या' पुरूषांनीही खर म्हणजे शिकारीला किंवा युद्धावरच जायला हवं..होतात आपले आयटी हमाल नाहीतर कारकून..

तुमचा रोख समजला. परंपरेने परिवाराची अर्थिक जबाबदारी पुरुषांकडे असते आणि आपापल्या क्षमतेनुसार ती त्याला पार पाडावी लागते .. मम्ह्णून हमाल तर ह्माल .. त्याला पैसे कमवून आणावे लागतात. म्हणून त्याला शिकारिला जाता येत नाही

स्पंदना's picture

3 Feb 2015 - 5:02 pm | स्पंदना

चुक!!
आज ऑस्ट्रेलियात तीन कुटुंब पहाते आहे. नवर्‍याला जॉब नाही, बायको कमावते आहे. नवरा घरी मुले, स्वयंपाक आणि साफ सफाई पहातो. ग्रोसरी वगैरे भरतो.
कुछ कम नही है इन परिवारोंमे॥ अ‍ॅन्ड फॉर युअर काईंड इन्फर्मेशन मराठी कुटुंब आहेत हो. नायतर म्हणाल पर प्रांतिय अथवा इंग्लीस असतील म्हणुन.
आयला नका होउ ना हमाल मग!! त्या हमाली पेक्षा घरी बसा मुलांना चार चांगल्या सवयी लावा, त्यांचा अभ्यास घ्या!
माझ्या घरात माझा नवरा माझ्यापेक्षा चांगल बाल संगोपन करतो आणी अतिशय प्रेमाने. मला जमलच नसत इतक मुलांच न कंटाळता करण.
काय तरी काय!!
छ्या!! विटू काका, तुम्ही लय वंगाळ बाजू उचलुन धरली.

सामान्य वाचक's picture

3 Feb 2015 - 12:54 pm | सामान्य वाचक

केहना क्या चाहते हो

सस्नेह's picture

3 Feb 2015 - 12:59 pm | सस्नेह

बाल संगोपन हा मातेचाच कोअर प्रांत आहे ..

पुरुषाने मुले प्रसवावीत असे कुणीच म्हणत नाही. पण बालसंगोपन हा मातेचाच प्रांत का बॉ ? पिता का नाही करू शकत ?

बालसंगोपन / होम मेकर इथे शिक्षित स्त्री ची गरज नाही ?

शिक्षित पुरुष नाही का उपयोगी पडणार ?

अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान असलेल्या स्त्रीयांनी जरूर नोकरी करावी,

मग नवरा कमावत नाही त्या कामकरी वर्गातील स्त्रियांनी काय उपाशी मरावे ? आणि प्रतिभावंत, बुद्धीमान नसलेल्या स्त्रीने बालसंगोपन / होम मेकर शिवाय दुसरे काहीच करू नये ?
आयटी हमाल किवा कारकून या दोन्ही नसलेल्या लाखो यशस्वी व्यावसायिक स्त्रिया आहेत आणि त्यांची कुटुंबेही सुविद्य, समृद्ध आहेत हे आपल्याला माहिती आहे काय ?
( विटेकरकाकांचा प्रतिसाद उपरोधिक नसावा असे समजून लिहिले आहे...)

सामान्य वाचक's picture

3 Feb 2015 - 1:13 pm | सामान्य वाचक

किंवा कारकुन असण्यात काय वाइट आहे? तिला जे आवडेल ते तिला करू दे की . आणि तसेही पुरुष समर्थ बुद्धिमान वेग्रे वेग्रे असतात तर कुटुंब व्यवस्था जीवंत ठेवायाची खंबीर वेग्रे जबाबदारी घेऊ देत की त्याना.

सुबोध खरे's picture

3 Feb 2015 - 1:22 pm | सुबोध खरे

आय टी हमाल किंवा कारकून असेल तरी स्त्रीला घराबाहेर पडण्याची स्वातंत्र्य उपभोगण्याची त्या निमित्ताने चार लोकांशी बोलण्याची जग पाहण्याची संधी मिळते हे काय वाईट आहे? नवर्याला संध्याकाळी "दमून" घरी आल्यावर हात चहाचा कप किंवा शिरा पोहे हे मिळणार नाहीत. किंवा बायको त्याच्या वर आर्थिक दृष्ट्या "अवलंबून" राहणार नाही. पण तिच्या स्वातंत्र्याची हि थोडीशी किंमत द्यायला काय हरकत आहे?
आणि नोकरी करणाऱ्या बायकांच्या मुलांचे संगोपन चांगले होत नाही या विधानाला कोणताही शास्त्राधार नाही.
माझ्या मते या निवडीचा अधिकार प्रत्येक स्त्रीला असायला पाहिजे.

सामान्य वाचक's picture

3 Feb 2015 - 1:57 pm | सामान्य वाचक

आपले काही तरी ग्रह करून घ्यायचे आणि तेच बरोबर म्हणून दामटत रहायचे. स्त्री च्या सुखाचा स्वातंत्रया चा बली देऊन कशाला टिकायला हवी तुमची संस्कृति? आणि संस्कृति म्हणजे कुठली हो? २०० का ४०० का १००० का २००० वर्षा पूर्वीची? कारण वेगवेगळ्या वेळी आणि स्थळी वेग वेगळ्या प्रथा अणि संस्कृति नांदत होत्या. केरल मधे काही कालापूर्वी पर्यन्त मातृसत्ताक पद्दत होती

मुळात आधी पटवून घ्या की माणुस आणि त्याचा अधिकार महत्वाचा आहे बाकी संस्कृति अणि समाजा पेक्षा.
समाजाचा एक अविभाज्य भाग असलेली स्त्री सुखी नसेल तर तुमचा समाज कसा सुखी होणार हो?
स्त्री ही माणुस आहे. समाज संस्कृति इ इ टिकवून ठेवण्याचे साधन नाही

मुळात आधी पटवून घ्या की माणुस आणि त्याचा अधिकार महत्वाचा आहे
बर्र्र

सामान्य वाचक's picture

3 Feb 2015 - 2:42 pm | सामान्य वाचक

म्हणजे काय
समजून घेणार का नाही?
समजून घ्यायला जमणार की नाही?
समजून घ्यायची इच्छा आहे की नाही?
समजून घेण्याची पात्रता आहे की नाही?
नक्की काय ते कळत नाही त्या बर्र मधून

विटेकर's picture

3 Feb 2015 - 2:43 pm | विटेकर

घराबाहेर पडल्याने खरोखरच स्वातंन्त्र्य मिळते का हो ? पुरुष जे जे अगोदर करत होते ते सगळे सगळे ( शिक्षण / व्यवसाय / नोकरी ) केल्यामुळे स्वातंत्र्य येते का हो ?
आज लाखो स्त्रिया घराबाहेर पड्तात .. त्या खरोखरच " स्वतंत्र" झाल्या का ?

आज लाखो स्त्रिया घराबाहेर पड्तात .. त्या खरोखरच " स्वतंत्र" झाल्या का ?

त्या घराबाहेर पडतात हेच तुमचे दुखणे दिसते. म्हणून असे प्रश्न येताहेत.

आमचं दुखणं कळ्ळ ना तुम्हाला ? आता तुमचं नेम्कं काय दुखणं आहे ते सांगा ?

"स्त्रिया घराबाहेर पडतात ही गोष्ट दुखणे वाटणे" हे आमचे खरे दुखणे आहे.

घर आणि नोकरी करताना ज्याने आपल्या आईची आणि बायकोची ओढाताण बघितली आहे त्याला आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी तरी स्त्रियांनी घराबाहेर पडावे असे वाट्णार नाही.
जाऊ दे , तुम्हाला नाही समजाणार ब्याट्मन भाऊ...
परदु: ख शीतळ असते ....

बायकांनी नोकरी केल्यामुळेच सावरलेली कुटुंबेही पाहिली आहेत. स्वतःच्या केसमध्ये काय झाले त्यावरून जनरलाईझ करणे हे पटत नाही.

विटेकर's picture

3 Feb 2015 - 3:17 pm | विटेकर

जाऊ दे ना ब्याट्मन भाऊ ..
तुम्हाला कळ्ले पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नव्हता आणि नाही.

बॅटमॅन's picture

3 Feb 2015 - 4:12 pm | बॅटमॅन

कळायचं ते साफच कळालं ओ. असूद्यात ना.

विटेकर काका तुअम्च्या आई आणि बायकोची ओढाताण नोकरी करण्यामुळे झाली नसून तुमच्या "बायकांची कामे आणि पुरुशांची कामे" या मानसिकतेमुळे झाली आहे अस मला वाटतं.
माझ्या हाताला चव आहे, मग मी स्वयंपाक करते, तर नवरा भांडी आवरतो, मी कपडे धोपटते,( हाय हाय वॉशींग मशीन हाय्,पण काही कपडे जरा हाताने धोपटून काढावे लागतात. बर असते ते मनस्वास्थ्याकरता ;) ) नवरा पिळून घेतो. (त्याच्याही मनस्वास्थ्याकरता बरे पडते पिळवणुक ;) )
ही अशी मनाची पारंपारिकता आडवी न आणता जर मिळुन कामे होत गेली तर तुम्ही म्हणता ती ओढातण झालीच नसती. असे कसे हो तुम्ही आई दमून आली तरी आयते पानावर बसलात? मग बायकोला तर मदत करायचा विचारही शिवणार नाही तुम्हाला.

बाळ सप्रे's picture

4 Feb 2015 - 10:54 am | बाळ सप्रे

एक्झॅक्टली !!

विटेकर's picture

4 Feb 2015 - 11:14 am | विटेकर

अपर्णा ताई ,
मी बायकोला अथवा आईला मदत करतं नाही , "आयते" पानावर बसून खातो हा निष्कर्ष तुम्ही काढलात , धन्यवाद ! केवळ वादाकराता तुम्ही हे उदाहरण घेतले अन्यथा तुम्हाला इतके "पर्सनल" व्हायचे नव्हते असे मी समजतो.
पुरुषांनी कितीही घरात मदत केली तरीही घरातील आई वर अतिरिक्त ताण पडतो हे कटु सत्य आहे, तसा माझाही वैयक्तिक अनुभव आहे.
बाकी चालू द्या. आता या धाग्यावर मी थांबायचे असे ठरवले आहे.

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 3:09 pm | टवाळ कार्टा

पुरुषांनी कितीही घरात मदत केली तरीही घरातील आई वर अतिरिक्त ताण पडतो हे कटु सत्य आहे

अगदी चूक

बाळ सप्रे's picture

4 Feb 2015 - 3:24 pm | बाळ सप्रे

तरीही घरातील आई वर अतिरिक्त ताण पडतो हे कटु सत्य आहे

याचा अर्थ मदत कमी पडतेय..
आणि एकतर तिला मदत म्हणजे .. हे तिचं काम आहे असे गृहितक...
सगळ्यांचे काम आहे .. सोयीने सगळ्यांनी वाटून करायला हवे..

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 3:09 pm | टवाळ कार्टा

+१११११११

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 3:09 pm | टवाळ कार्टा

मी माझ्या आईची ओढताण बघितली आहे....घरातल्या सगळ्यांनी थोडी थोडी कामे "समप्रमाणात" वाटून घेतली तर कधीही काहीही प्रॉब्लेम येत नाही

स्वप्नांची राणी's picture

3 Feb 2015 - 4:53 pm | स्वप्नांची राणी

मला आज पहिल्यांदा मनापासून 'ठ्ठो' म्हणावसं वाटतय...

सस्नेह's picture

3 Feb 2015 - 2:57 pm | सस्नेह

'घराबाहेर' पडलेले सगळे पुरुष स्वतंत्र आहेत म्हणता ? आणि स्त्रिया 'स्वातंत्र्य' मिळवण्यासाठीच घराबाहेर पडतात म्हणता ?

विटेकर's picture

3 Feb 2015 - 3:15 pm | विटेकर

एक्क्झ्याक्ट्ली....
"स्वांतत्र्य" अथवा "समानता" असण्याचा आणि नोकरी/व्यवसाय करण्याचा काही एक संबंध नाही !! ( माझा प्रतिसाद डॉ. साहेबआना होता)
असली तर ती एक तुझ्यापेक्षा मी मोठी / मोठा हे सांगणारी एक अत्यंत वाईट स्पर्धा !
परस्परांच्या सहजीवनामध्ये आपण परस्परांना किती आदर देतो ( स्पेस नव्हे !) यांवर संसाराचे यश अवलंबून असते. कोण किती पैसे मिळवतो आणि त्यावर जर उच्च - नीच ठरत असेल तर ते सहजीवन विनाशाकडे नेणारे आहे.. समाजाच्या दृष्टीने घातक आहे...

विटेकर's picture

3 Feb 2015 - 2:31 pm | विटेकर

पण बालसंगोपन हा मातेचाच प्रांत का बॉ ?
होय, बाप पोराला दूध पाजू शकत नाही . वात्सल्य हा स्त्रीचा स्थायीभाव आहे. अपवाद असू शकतील
शिक्षित पुरुष नाही का उपयोगी पडणार ?
पडतील ना , पण पुन्हा तेच , स्त्रीयांइतके सफाईने करु शकणार नाहीत, आणि बाल संगोपन आनि होम मेकर हे खालच्या दर्जाचे काम आहे का ?
लाखो यशस्वी व्यावसायिक स्त्रिया आहेत
आहेत ना , पण त्यांनी ते काम केले नसते तर फार बिघडले असते का ?

कपिलमुनी's picture

3 Feb 2015 - 2:57 pm | कपिलमुनी

ज्यांच्या घरातील पुरुषांचा अपमृत्यू होतो त्यांच्या घरातील स्त्रिया कमावत्या / नोकरदार/ व्यावसायिक असतील ती कुटुंबे सावरली आहेत. त्याच स्त्रिया जर घरी बसून असत्या तर त्या कुटुंबांचे फार बिघडले असते

विटेकर's picture

3 Feb 2015 - 3:03 pm | विटेकर

मग अशा " लाखो" स्त्रीया आहेत का ?

कपिलमुनी's picture

3 Feb 2015 - 3:12 pm | कपिलमुनी

" लाखो" आहेत ! रोजच्या अपघाताची आणि अपमृत्यूची आकडेवारी पाहिली तर दर वर्षी अशा लाखो स्त्रिया आहेत.
शिवाय नवर्‍याने सोडलेल्या , घटस्फोटीत , फसवलेल्या , नवर्‍याने नाडलेल्या अशा सुद्धा लाखो स्त्रिया आहेत.

कपिलमुनी's picture

3 Feb 2015 - 3:14 pm | कपिलमुनी

http://ncrb.gov.in/adsi/main.htm

इथे थोडी आकडे वारी सापडेल

विटेकर's picture

3 Feb 2015 - 3:20 pm | विटेकर

धन्यवाद !
तुमचा मुद्दा असा आहे की अपवादात्मक परिस्थितीत ( विधवा /परित्यक्ता/ अनाथ) स्त्रियांनी नोकरी करावी आणि अशी परिस्थिती आता अपवादत्मक राहीली नाही ?

कपिलमुनी's picture

3 Feb 2015 - 3:35 pm | कपिलमुनी

माझा मुद्दा " कोणत्याही परिस्थितीत (अपवादात्मक किंवा सामान्य ) नोकरी करण्याचा निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य स्त्रीला आहे"

पण त्यांनी ते काम केले नसते तर फार बिघडले असते का ?

पण काम केले नसते तर फार बिघडले असते अशांचा विदा दिला आहे आणि आकडे वारीवरून ही परीस्थिती अपवादत्मक नाहिये . सध्या पेंशन नसते ,शहरी कुटूंबाकडे शेती नसते , गृहकर्ज असते , मुलांच्या जबाबदार्‍या असतात..अशा वेळेस नोकरी - काम हवेच !

विटेकर हा अपर्णा बाईंचा (रामतीर्थंकर) डूआयडी आहे का??

विटेकर's picture

3 Feb 2015 - 2:32 pm | विटेकर

तुमचा काय अंदाज आहे ?

सामान्य वाचक's picture

3 Feb 2015 - 1:06 pm | सामान्य वाचक

पडला आहे. लेख जास्त विनोदी का हा अभिप्राय?
या प्रश्नाच्या उत्तरा साठी एक नविन धागा काढावा का

अत्यंत हिणकस प्रतिसाद देणार होतो पण आवरतो .. अनुल्लेखाने मारणे उचित ठरेल.

खूपच वैचारिक प्रतिसाद . माझे डोळे खाडकन उघडले .

आता मीही नोकरी सोडून घरी बसणार कारण मी काही अतिशय प्रतिभावंत आणि खरोखरच बुद्धीमान वगैरे नाही . साधी IT हमाल आहे . आणि नवराही फार प्रतिभावंत नाहीये म्हणून त्यालापण घरीच बसवणार .

तुमची समानतेची व्याख्या वाचून हसुन हसुन डोळ्यात पाणी आलं आहे.

तुमची समानतेची व्याख्या काय आहे सांगता का जरा ?

सामान्य वाचक's picture

3 Feb 2015 - 2:47 pm | सामान्य वाचक

निर्णय घेण्या चा अधिकार असणे , ही समानता आहे. सुजाण आणि समंजस माणूस योग्य तो निर्णय घेतो मग तो नोकरी करायचा असेल किंवा दूसरा कुठला

बॅटमॅन's picture

3 Feb 2015 - 12:46 pm | बॅटमॅन

समस्या तर आहेच. पण ही फक्त स्त्री वा फक्त पुरुष यांची जबाबदारी नाही.

इतके बोलून मी खाली बसतो.

पैसा's picture

3 Feb 2015 - 4:40 pm | पैसा

मला वाटले यावेळी तू २००० पर्यंत तरी पोचवणार. आणि तू बाजू बदलल्याचा सौंशय येतोय मला! टवाळ कार्ट्यासारखा आमचा कौतुकाचा बाब्या व्हायचंय का?

बॅटमॅन's picture

3 Feb 2015 - 4:52 pm | बॅटमॅन

टवाळ कार्ट्यासारखा आमचा कौतुकाचा बाब्या व्हायचंय का?

समजा झालो तर मला फायदा काय ते सांगा की. पटलं तर लग्गेच होतो.

पैसा's picture

3 Feb 2015 - 4:57 pm | पैसा

सासू शोधून देईन एखादी!

थ्यान्क्स पण ते काम करणारे लोक ऑन डूटी आहेत. सबब, नो थ्यान्क्स.

पैसा's picture

3 Feb 2015 - 8:20 pm | पैसा

यालाच तुम्ही "उभे" आहात असे म्हणतात!

बॅटमॅन's picture

4 Feb 2015 - 12:50 pm | बॅटमॅन

माहितीकरिता धन्यवाद.

-बॅटमॅन आणि आर्य विदोत्सुक मंडळाचे कार्यकर्ते.

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा

"आर्य विदोत्सुक मंडळ" हे कधी स्थापन झाले? :)

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा

हायला...कोण कर्ते हे काम? किती कमिशन्/फी घेतात ;)

बॅटमॅन's picture

4 Feb 2015 - 3:17 pm | बॅटमॅन

हा हा हा ;)

ज्योति अळवणी's picture

4 Feb 2015 - 11:44 pm | ज्योति अळवणी

सर्वच reply मी मनापासून वाचले. काही मतं पटली काही नाही पटली. पण अनेकांना मी विचार करायला प्रव्रुत्त केल हयात मला आनंद आहे.

धन्यवाद!

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा

आधी माझी सासू शोधा माझा नंबर आधी (रांगेचा फायदा सर्वांना :) )

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा

आणि मी असून सुध्धा काय फायदे आहेत ते अजून समजलेले नाहित...त्यामुळे मलासुध्धा सांगा :)

हाडक्या's picture

3 Feb 2015 - 5:37 pm | हाडक्या

अहो पै तै, "कोणत्याही एका बाजूचा" असा विचारच चुकीच नै का ? थोडा सारासार विचार करायला का बंदी असावी ?? जे चूक ते चूक , जे बरोबर ते बरोबर. शिम्पल्स..

Simples !

(अवांतरः आमाला भाजपवाले काँग्रेसचा आणि काँग्रेसवाले भाजपचा म्हणतेत, त्यांनापण आमी हेच म्हनतो.)

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा

हायला मी आणि "कौतुकाचा बाब्या"??? कित्ती ते कौतिक :)

सुबोध खरे's picture

3 Feb 2015 - 1:04 pm | सुबोध खरे

म्हणजे तुम्ही उभे होतात काय ?

बॅटमॅन's picture

3 Feb 2015 - 1:08 pm | बॅटमॅन

असेच काही नाही. वर बसलेला माणूसही नंतर खाली बसू शकतोच की. त्याकरिता उभे रहावेच लागते असा विदा तरी आजवरच्या निरीक्षणावरून दिसला नाही कुठे.

कानडाऊ योगेशु's picture

3 Feb 2015 - 4:20 pm | कानडाऊ योगेशु

ते उभे नव्हते तर उलटे लटकलेले होते छताला!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2015 - 6:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

पकडा गया ! :)

सुबोध खरे's picture

3 Feb 2015 - 1:16 pm | सुबोध खरे

रच्याकने-- आजकालच्या मुलांना चष्मा लागतो हे सुदृढ नसल्याने नसून पालक जास्त जागरूक झाले आहेत याचे लक्षण आहे. पूर्वी मुलाचा परीक्षेत निकाल चांगला लागत नसेल तर मुल अभ्यास करीत नाही म्हनून त्याला फैलावर घेतले जात असे आता पालक जास्त जागरूकपणे पाहतात कि मुलाला स्वच्छ दिसते आहे कि नाही. शिवाय दूर दर्शन आल्यामुळे मुलाला लांबचे साफ दिसत नाही हे लवकर लक्षात येते. हे मी माझ्या एका लेखात लिहिले आहे
http://www.misalpav.com/node/25044. ( जाहिरात केली आहे हे लक्षात घ्या)
तेंव्हा आपण मुलांच्या आहाराकडे दुर्लक्ष करीत आहोत हि वस्तुस्थिती नाही. उलट भारतवर्षात अन्नधान्याची मुबलकता हरित क्रांती पूर्वी कधीच नव्हती शतकानु शतके दुष्काळच होता. १९७५ नंतर रेशनच्या रांगेत उभे राहून घाणेरडे धान्य घेणे( अरगट/ तांबेरा पडलेली ज्वारी बाजरी किंवा गुरांना खायचा तांबडा गहू इ ) किंवा टोण्ड दुध घेणे हे बंद होऊन उलटे पौष्टिक अन्न उपलब्ध झाले आहे.
जुना काळच चांगला असे म्हणणार्यांपैकी मी नाही.

रच्याकने-- आजकालच्या मुलांना चष्मा लागतो हे सुदृढ नसल्याने नसून पालक जास्त जागरूक झाले आहेत याचे लक्षण आहे.

परफेक्ट. हेच लिहायला फार आधीच सुरुवात केली, पण एकूण लेख अन प्रतिसादांचा रोख पाहून हे नेमके कितपत सिरियसली आहे हे कळेना, म्हणून अंदाज येईस्तोवर टंकनश्रम थांबवायचे ठरवले.

आता खुद्द डॉक्टरांनीच हे मत मांडलं हे पाहून आनंद झाला. शिवाय गुस्ताखीबद्दल आधीच माफी मागून आणखी एक म्हणू इच्छितो की "डोळ्याला चष्मा लागणे" विशेषतः लहान मुले /टीनएजर्स या पर्टिक्युलर विषयाबाबत आहार अथवा पौष्टिकता, किंवा जास्त टीव्ही पाहणे, किंवा अंधारात वाचणे यापैकी कशाचा चष्मा लागण्याशी संबंध असेल असे वाटत नाही.

या वयोगटात दूरचा चष्मा लागणे ही गोष्ट माझ्यामते फिजिक्सशी जास्त संबंधित आहे आणि कदाचित डोळ्याच्या गोलाच्या उंची आणि वक्रतेत होणार्‍या बदलांशी. तो लागायचा तेव्हा लागणारच. टीव्ही कमी बघून किंवा चांगले खाऊन तो टळेल किंवा "जाईल" असं वाटत नाही.

हां. रातांधळेपणा किंवा डोळ्यांच्या इतर काही वैदयकीय समस्या आहाराशी नक्कीच संबंधित असाव्यात. हे म्हणणं फक्त चष्मा या विषयी आहे. चूक असेल तर कृपया ते सुधारावे.

-(भौतिकशास्त्राचा ग्राज्वेट) गवि

सस्नेह's picture

3 Feb 2015 - 3:19 pm | सस्नेह

आईने नोकरी केल्याने मुलांना चष्मा लागतो याबद्दल भौतिकशास्त्र काय म्हणते ?

..हॅ हॅ हॅ..
आमाला पावर नाय.. ;-)

म्ह्ण्जे तुम्ही भौतिकी तज्ञ नाही ???

गवि's picture

3 Feb 2015 - 4:33 pm | गवि

..नायतर म काय वैदिक शास्त्रज्ञ हाय?

..आमाला आमच्या लायनीपरमान जाऊ द्या.

..लायसन बगू पैले..

नेत्रेश's picture

4 Feb 2015 - 11:45 am | नेत्रेश

पुलंचे म्हैस आठवले

गवि's picture

4 Feb 2015 - 12:19 pm | गवि

हुश्श...!!

आनन्दिता's picture

4 Feb 2015 - 8:23 pm | आनन्दिता

=))

चिगो's picture

4 Feb 2015 - 4:44 pm | चिगो

आमाला पावर नाय..

कसली, चष्म्याची का? मग 'डोकेदुखी' करीता असेल चष्मा..
(चष्मीश) चिगो

कपिलमुनी's picture

4 Feb 2015 - 4:51 pm | कपिलमुनी

त्ये म्हैस मधला आहे हो सर्व !

यसवायजी's picture

4 Feb 2015 - 10:17 pm | यसवायजी

काय सांगतैस? टाक बंडल, वड बिडी.

नोकरी सुद्धा चालेल ग! पण लंच अवर मध्ये चर्चा नाही केली ना..म्हणुन लागला असेल.

मनिमौ's picture

3 Feb 2015 - 1:36 pm | मनिमौ

अगदी बरोबर.लेख चन्गला आहे. पण काही विचार पटत नाहीत.मोठ्या शहरामधे एका च्या पगारात खर्च चालेल हे अवघद आहे.बायाकानी जर आपल्या कुटुम्बअला मदत म्हनुन नोकरि केली तर त्यत काही वाइट नाही. उलट हल्लि तरुणी लग्ना अगोदर नोकरी करुन पैसा साठवतात. लग्न होउन जेव्ह बाळ होते त्या वेळी बाळा साठी १ २ वर्श ब्रेक घ्यायची पण तयारी ठेवतात. सशक्त मुल घड्वण्यासाठी बायाकानी घरात बसायची गरज नाही.आई नी वडील व बाकी कुतुम्ब यानी डोळसपणे वागायला हवे.

सिरुसेरि's picture

3 Feb 2015 - 2:37 pm | सिरुसेरि

ज्याने त्याने आपल्या जीवनातील गरजांचे प्राधान्य ओळखुन त्याप्रमाणे निर्णय घ्यावेत . काही ठराविक कालावधी नंतर या प्राधान्यक्रमाचा व सद्य परिस्थितीचा आढावा घेउन त्याप्रमाणे पुढील निर्णय घ्यावेत . आपणच निर्माण केलेल्या प्रश्नांमध्ये आपणच अडकून पडु नये .

सुखी आणि सुदृढ़ समाज कोणाला नकोय्?प्रत्येकालाच आपला समाज,आपले कुटुंब सुखी हवय.पण त्यासाठी फक्त स्त्रियांनी त्याग करावा,प्रयत्न करावा अस का?कुटुंबाची,समाजाची जबाबदारि हि स्त्री आणि पुरुष दोघांवर सारखीच असायला हवी.
ज्या स्त्रीया नोकरीकरतात त्या पैशाच्या आकर्षणासाठी हे तर अगदिच चूक.उत्तम शिक्षण घेतलेल असते,काहिवेळा कुटुंबाला आर्थिक गरज असते,उत्तम संधी असते मग स्त्रीने नोकरी का करू नये?आणि प्रत्येक स्त्रीमधे कुटुंबाची काळजी घेणे हे उपजतच असते.नोकरी करणारी(वा न करणारी)कोणतीहि स्त्री मुलांच्या आहारासाठी,विकासाठी,शिक्षणासाठी जागरूक असतेच.आजुबाजुला समाजात ज्या स्त्रीया आपण बघतोय त्या बहुदा सगळ्याच अत्यंत कसोशीने मुल्,घरातील वृद्ध्,स्वयपाक या कडे लक्ष देताना दिसतायत.मग विश्रांती म्हणून कधी बाहेरच क्वचित काहि मागवल तर काय बिघडल?(यातहि बहुतेक वेळा घरातील इतरंना काय आवडेल याचा जास्त विचार स्त्री करते)शिवाय गरज असेल तेव्हा ती घरात थांबतेच कि नोकरी सोडून.
पण या उलट आपल्याकडे पुरूष मात्र फक्त नोकरी करुनच दमतात(काहि अपवाद असतीलहि)त्यांचीहि जबाबदारि नाहि का सशक्त कुटुंब बनवायची?
ज्यावेळेस या सगळ्या बाबतीत समानता येइल तेव्हाच सुखी समाज अस्तित्त्वात येइल.

पर्फेक्ट ! फक्त पैसे कमावणे हे कधीच एकमेव उद्देश्य नसतं . बाकी सविस्तर लिहिन च वेळ मिळेल तसा. अत्ता रूमाल टाकून जाते.

पलाश's picture

5 Feb 2015 - 1:31 pm | पलाश

+१

मीता's picture

3 Feb 2015 - 2:48 pm | मीता

मस्त प्रतिसाद इशा

सविता००१'s picture

3 Feb 2015 - 3:16 pm | सविता००१

इशा

जागु's picture

3 Feb 2015 - 2:50 pm | जागु

टिव्ही आणि फ्रिज च्या बाबतीतले अनुभव मलाही आहेत.
माझ्या लहानपणी आमच्या गावात ३ टिव्ही होते. त्यातला एक आमच्या घरी होता. शनिवार रविवार आमच्याघरी हॉलमध्ये सतरंज्या अंथरायला लागायच्या. हॉलभरून बायका-माणसे पिक्चर बघायला यायची. बातम्या पहायलाही काही टह्रावीक मंडळी यायची.

आमच्या घरी फ्रिज यायच्या आधी उन्हाळ्यात पन्ह किंवा आमरस केला की टोप घेऊन ज्यांच्याकडे फ्रिज आहे त्यांच्याकडे बर्फ मागायला जायचो. तेंव्हा ते मागण्यात कोणताही परकेपणा किंवा ओशाळेपणा वाटत नसे.

रायनची आई's picture

3 Feb 2015 - 3:45 pm | रायनची आई

लेखातील विचार खूप विस्कळित आणि बाळ्बोध आहेत..मुलीन्चे ब्युटी पार्लर मधे जाणे काय किन्वा मुलान्चा चश्मा काय..खूप जनरलायजेशन केले आहे.

विशाखा पाटील's picture

3 Feb 2015 - 4:31 pm | विशाखा पाटील

हो, यात एक नाही अनेक विचार(सुमने) आहेत - चष्मा (वर चर्चा झालीच/चालूच आहे), शिळे खाणे आणि मजबूत बनणे, अधूनमधून हॉटेलातल खाणे आणि कुपोषित होणे, ताग्यातले कपडे शिवणे आणि पैसे वाचवणे, फिरायला न जाणे आणि एकत्र वेळ न घालवणे (इथे मॉलचा उल्लेख कसा आला नाही तो!) आणि मुख्य म्हणजे tv, fridge सर्वांकडे नव्हते तो काळ कसा रम्य होता वगैरे, वगैरे. या सर्वांना जोडणारा विचार म्हणजे आजच्या स्त्रिया कुटुंबवत्सल की काय ते राहिल्या नाहीत.

थोडक्यात, ज्याला जे योग्य वाटेल ते घ्यावे आणि चर्चा करून धाग्याला सुदृढ बनवावे.

कविता१९७८'s picture

3 Feb 2015 - 4:08 pm | कविता१९७८

धागाकर्तीचा सदस्यकाळ ५ दिवस २२ तास असा आहे, हा नक्कीच कुणाचतरी डु आय असल्याचा संशय येतोय.

कपिलमुनी's picture

3 Feb 2015 - 4:18 pm | कपिलमुनी

प्रत्येक तापाला स्वाईन फ्लू म्हणून धोपटू नका

आणि समजा डुआयडी असला म्हणून काय झाले? प्रत्येक डुआयडीजनित साहित्य हे ट्रोलिंगच असते काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2015 - 7:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुनिवर या म्हणीवर पेटंट हक्क प्रस्थापित करा चटकन् ;)

बघा, बघा, वादावादात कशी मराठी भाषेला अधिक श्रीमंत करणारी भाषामौक्तिके ओघळतात मिपावर ! :)

पैसा's picture

3 Feb 2015 - 4:36 pm | पैसा

मिपावर स्वागत!

एवढा मोठा लेख पहिल्याच प्रयत्नात लिहिल्याबद्दल अभिनंदन!

मात्र सगळे विचार पटले नाहीत. माणसाचे सरासरी आयुर्मान वाढत आहे. पूर्वेच्या काळात सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा म्हणजे एक हजार पौर्णिमा बघितलेला माणूस ही दुर्मिळ गोष्ट होती यावरूनही लक्षात यावे. औषधे, पूरक आहार यांची उपलबधता ही याची कारणे आहेत. आजाराचे प्रमाण वाढल्यासारखे वाटते याचे कारण म्हणजे लोकांची जागरूकता वाढली आहे. ज्या आजारासाठी आपण आज डॉक्टरकडे धाव घेतो, त्यासाठी ५० वर्षांपूर्वी कोणी गेले नसते.

डोळ्यांचे आजार किंवा इतर काही गोष्टी या निव्वळ घरचे जेवण चांगले नसते म्हणून होतात असे नव्हे. नको इतक्या प्रमाणात टीव्ही कॉम्प्युटरचा वापर, अन्नधान्यातली भेसळ, जंतुनाशकांचा सढळ हस्ते वापर अशी बरीच इतर कारणे आहेत. पण स्त्रीने नोकरी केली नाही तर या समस्या सुटतील असे अजिबात नाही. मुलांना नीट वाढवणे ही आईबाप दोघांचीही सारखीच जबाबदारी आहे.

लेखिका स्वतः नोकरी करतात असे दिसते. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य, त्यातून मुलांना अधिक चांगल्या सोयी पुरवता येणे हे शक्य झाले का नाही हे त्याच सांगतील.

त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य, त्यातून मुलांना अधिक चांगल्या सोयी पुरवता येणे हे शक्य झाले का नाही हे त्याच सांगतील.

त्यांच्याकडे स्वयंपाकाला मदतनीस आहे. अर्थात हे कसे शक्य झाले ते नको विचारु.

सुबोध खरे's picture

4 Feb 2015 - 8:31 pm | सुबोध खरे

पैसा ताई
" टीव्ही कॉम्प्युटरचा वापर, अन्नधान्यातली भेसळ, जंतुनाशकांचा सढळ हस्ते वापर" या पैकी नक्की कोणत्याही कारणाने चष्मा लागतो याला अजून तरी शास्त्राधार नाही. परंतु गेल्या काही वर्षात याचे प्रमाण वाढते आहे हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. अर्थात याचे एक कारण हेही आहे कि आता जास्त लोक शिकू लागले असल्याने आपल्याला दिसत नाही हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. "पूर्वी पायाखालची जमीन दिसते ना मग पुरे किंवा चेहरा ओळख्ता येतो आहे न मग झाले"यावर लोक समाधान मनात होते.
चष्मा लागण्याचे मूळ कारण म्हणजे वाढत्या वयात जर नेत्रगोल भिंगाच्या प्रमाणात जास्त वाढला तर कॉर्नियाची वक्रता(CURVATURE) कमी होऊन दीर्घ दृष्टी येते ( MYOPIA) यासाठी आपल्याला चष्म्याचा उणे नंबर येतो. अंतर्गोल(CONCAVE) भिंग लावावे लागते.
Myopia occurs when the eyeball is too long, relative to the focusing power of the cornea and lens of the eye. This causes light rays to focus at a point in front of the retina, rather than directly on its surface.
आणी जर नेत्र गोल कमी वाढला तर कॉर्नियाची वक्रता(CURVATURE) जास्त होऊन आपल्याला ह्रस्व दृष्टी( HYPERMETROPIA) येते. यात आपल्याला चष्म्याचा नंबर अधिक येतो आणी आपल्याला बहिर्गोल (CONVEX) भिंगाचा चष्मा लावावा लागतो.
+६ ते -६ हा नंबर केवळ अशा कारणांनी येतो आणी हा सरासरी च्या आसपास म्हणून स्वीकारला जातो

पण मी लिहिताना डोळ्यांचे आजार असं लिहिलं नव्हतं तर इतर अनेक आजार असं लिहिलं होतं. लोकांमधे अवेअरनेस वाढला आहे त्यामुळे आजारपण जास्त वाटतं हेही लिहिलं आहेच. घरचं खाणं न मिळाल्याने चष्मे लागतात असा काहीसा सूर लेखात दिसला, तो पटला नाही यासाठी हे बाकी लिहावंसं वाटलं, की आई घरात राहिली आणि मुलांना घरचं जेवण मिळालं तरी ही बाह्य कारणं दूर होणार नाहीत.

वाढत्या वयात चष्मा कसा, का लागतो हे समजले. धन्यवाद.

बर्याचदा नोकरी करुन घर सांभाळणार्या स्त्रीया गील्ट ट्रीपवर असतात.मी बाहेर असते म्हणून मुलांची आबाळ होते.त्यांना चारी ठाव स्वैपाक करुन घालू शकत नाही.त्यात आपल्या आया आज्यानी आपल्याला वाढवलेलं असतं निगुतीने त्याच्या आठवणींची यात भर असते.मग अशा विचारांचा जन्म होतो.त्यात लिहिणारीच्या हेतूविषयी शंका नाही.पण नवरा हे चाक पण तुमच्या संसाररथाला आहे.दोघांच्या समन्वयाने चांगले देण्याचा प्रयत्न आपण करु शकतो ना? तो अॅस्पेक्ट न दिसल्याने धागा एकांगी झाला.बाकी पहिल्याच लेखाला शतकी मजल मारणार तुम्ही!पुस्प्गूच आमच्याकडून आणून ठेवल्या गेला आहे.

मितान's picture

3 Feb 2015 - 5:39 pm | मितान

बर्याचदा नोकरी करुन घर सांभाळणार्या स्त्रीया गील्ट ट्रीपवर असतात. >>>>> +१

मला तर हा लेखही त्याचाच परिणाम वाटतोय.
ज्योतिताई, असे विचार असण्यात चूक काहीच नाही. पण आपल्या विचारांमागच्या धारणा मात्र वारंवार विवेकाच्या कसोटीवर घासून बघितल्या पाहिजेत असे वाटते.
बाकी मला न पटलेले मुद्दे अनेकांनी आणि अनेकींनी बोलून झालेत. त्यामुळे जास्त लिहीत नाही.
पण या सर्व प्रतिसादांवर आपले मत काय आहे हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

बाळ सप्रे's picture

4 Feb 2015 - 11:10 am | बाळ सप्रे

बर्याचदा नोकरी करुन घर सांभाळणार्या स्त्रीया गील्ट ट्रीपवर असतात

होममेकर स्त्रीयादेखिल न कमावण्याच गिल्ट बाळगतात..
तो एकेकीच्या स्वभावाचा भाग असतो ..

प्रभाकर पेठकर's picture

3 Feb 2015 - 5:00 pm | प्रभाकर पेठकर

पुरुषांनी स्वयंपाक आणि मुलांचे संगोपन नक्कीच शिकून घेतले पाहिजे. आपल्यावरची जबाबदारी म्हणून नाही तर त्यातून आनंद मिळतो म्हणून, मनापासून स्विकारले पाहिजे.

तसे, मुलांचे संगोपन ह्या विषयात अगदी तान्ह्या मुलांचे शी-शू काढणे, ढुंगण धुणे (मुलांचे), आंघोळ घालणे, जेऊ घालणे, शाळेची तयारी करणे, शाळेत पोहोचवणे, अभ्यास घेणे आदी पासून जसजशी मुले मोठी होत जातात तसतसे त्यांच्या भावविश्वात सहभागी होत संवाद साधणे, त्यांना जाणवेल इतपत मायेची उब त्यांना देणे ही अत्यंत महत्त्वाची अंगे आहेत.
तान्ह्या मुलांना हाताळणे कित्येक पुरुषांना जमत नाही त्यामुळे ती जबाबदारी घरच्या स्त्रीवर सोपविली, ढकलली जाते. बाकी शाळेचा अभ्यास घेण्यापासून पुढील जबाबदार्‍या पुरुषमंडळी घेताना घरोघर दिसतात. जसे तान्ह्या मुलांना हाताळणे पुरुषांना जमत नाही तसेच वयाने मोठ्या मुलांचे जनरल नॉलेज किंवा कांही महाविद्यालयीन अभ्यासाचे प्रश्न पुरुषांनाच सोडवायला लागतात. तिथे घरची स्त्री मागे पडते. अर्थात, हे माझे मर्यादीत निरिक्षण आहे, चुकीचे असू शकेल.
दोघांनी मिळून संसारातल्या सर्व जबाबदार्‍या समजुन-उमजून आनंदाने स्विकारल्या तर संस्कारही होतात, समृद्धीही येते आणि देशाचा विकास की काय म्हणतात तोही होईल.

बॅटमॅन's picture

3 Feb 2015 - 5:03 pm | बॅटमॅन

तान्ह्या मुलांना हाताळणे कित्येक पुरुषांना जमत नाही त्यामुळे ती जबाबदारी घरच्या स्त्रीवर सोपविली, ढकलली जाते. बाकी शाळेचा अभ्यास घेण्यापासून पुढील जबाबदार्‍या पुरुषमंडळी घेताना घरोघर दिसतात. जसे तान्ह्या मुलांना हाताळणे पुरुषांना जमत नाही तसेच वयाने मोठ्या मुलांचे जनरल नॉलेज किंवा कांही महाविद्यालयीन अभ्यासाचे प्रश्न पुरुषांनाच सोडवायला लागतात. तिथे घरची स्त्री मागे पडते.

असं जनरली पाहिलंय खरं.

मराठी_माणूस's picture

3 Feb 2015 - 5:13 pm | मराठी_माणूस

मुलांचे जनरल नॉलेज किंवा कांही महाविद्यालयीन अभ्यासाचे प्रश्न पुरुषांनाच सोडवायला लागतात. तिथे घरची स्त्री मागे पडते

हे तुमचे वैयक्तिक मत आहे असे मानतो.

प्रभाकर पेठकर's picture

3 Feb 2015 - 8:05 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या प्रतिसादातील 'अर्थात, हे माझे मर्यादीत निरिक्षण आहे, चुकीचे असू शकेल.' हे वाक्य तुमच्या नजरेतून सुटलेले दिसते आहे. हो हे माझे वैयक्तिक मत आहे.

आदिजोशी's picture

3 Feb 2015 - 8:54 pm | आदिजोशी

ढुंगण धुणे ह्या पुढे (मुलांचे) हे वाचून डोळे पाणावले

सविता००१'s picture

3 Feb 2015 - 5:08 pm | सविता००१

पदार्पणात शतकी धागा...........