बरेच दिवस ऐकून होते उरणच्या पाणजे येथील खाडीत फ्लेमिंगो पक्षी आले आहेत. आज जाऊ उद्या जाऊ करत एक रविवारी वेळ काढलाच आणि कौटुंबीक मित्रपरीवारासह गेलोच हे पक्षी पहायला. ही खाडी माशांसाठी खास करून कोलीम (माझ्या माशांच्या मालिकेत हा प्रकार आहे) ह्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. खाडीपर्यंत पोहोचलो तेंव्हा फ्लेमिंगोचे नामोनिशान नव्हते. सुरुवातीला छोटे काळे पक्षी दिसू लागले. सुर्यप्रकाशामुळे त्यांचे मुखदर्शन न झाल्याने नक्की कुठल्या जातीचे आहेत ते कळत नव्हते.
पुढे रस्त्याच्या जवळच पाण्यात हा सुंदर पक्षी होता.
अजुन पुढे ह्या पक्षाची कसरत भक्ष पकडताना.
३)
पाणी भरल्या खाडीत फ्लेमिंगोची आशा धरून आलेलो आम्ही थोडेसे निराश होऊन इकडे तिकडे पाहतो तो पाणी नसलेल्या एका खाडीच्या पट्यात पांढरे थर्माकोलचे जाळे लावतात त्याप्रमाणे काहीतरी लांबून दिसले. जरा जवळ गेलो तेंव्हा मात्र त्या थर्माकोल ढोकळ्यांच्या भासाची जागा फ्लेमिंगोच्या उंची आकृतीमध्ये साकार होत गेली. मी कॅमेरा काढला आणि जवळ जाऊ लागले. आपली चाहूल लागताच हे उडतील म्हणून आधी लांबून फोटो काढून घेतले.
आता ह्या पक्ष्यांच्या क्लोजअपच्या आशेने मी हळू हळू पुढे जाऊ लागले. पक्षी माझ्या भितीने उडू नयेत म्हणून मी दबक्या पावलांनी चालत होते खरी पण एकीचे बळ करून हे माझ्यावर हल्ला तर नाहीना करणार ही भिती पण मनामध्ये डोकावत होती. तसे दृश्यही माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. :हाहा:
जव्ळ जाऊन पाहते तर ते फ्लेमिंगो नसून अजून वेगळेच पक्षी होते पण तितकेच सुंदर होते. मित्रपरीवाराकडून त्याचे चित्रबलाक हे नाव समजले.
६)
आम्ही २-३ जणच पुढे गेलो. पण आमची चाहूल लागताच पहिले दोन पक्षी १-२-३ च्या ठेक्यावर उठले. आणि वर उडाले तेंव्हा भित्यापाठचा ब्रह्मराक्षस म्हणू लागला आलेच तुझ्या डोक्यावर आता हे टोचायला. पण बहुतेक त्यांना माझे फोटो काढणे पसंत नव्हते म्हणून कंटाळून दुसरीकडे निघून गेले. त्यापाठोपाठ ८-१० चा ग्रुप करत सगळे पक्षी दुसर्या ठिकाणी निघून गेले. त्यांचे उडते रुप अतिशय मनमोहक होते. हे उडणे पाहताना आकाशी झेप घे रे पाखरा, पाखरा जा दूर देशी अशी गाणी आठवत होती.
ह्या पक्षांना जवळून निरखायचे राहीले म्हणून पुन्हा आम्ही ह्यांची शोधमोहिम सुरु केली. आमच्या परतीच्याच भावावर एका पाणथळीवर हे जाऊन बसले होते. आता मात्र एकदम सावध गतीने आम्ही जवळ गेलो. हे काय पिच्छा सोडणार नाहीत अशा आविर्भावाने आता मात्र त्यांनी जागा सोडली नव्हती किंवा एका भेटीतच आमची मैत्री झाली होती. पण नंतर जवळ गेल्यावर कळाले की एका ठराविक अंतरावरुन आम्ही त्यांना पाहू शकत होतो, पुढे पुर्ण पाणी होते व त्या पाणथळ जागेनंतरच्या कोरड्या भागात ते उभे होते. अगदी तळ्यात मळ्यात खेळतात तसे मला वाटू लागले.
१४)
कोरड्या खाडीतील त्यांच्या पाउलखुणा व पिसे.
१६)
खाडीभेटीतील हे सुंदर झुडूप.
१९)
२१) समुद्रभाजी डायला. ही चवीला खारट असते. मिठ टाकायची गरज नसते. माझ्या लेखनात सापडेल.
प्रतिक्रिया
1 Feb 2015 - 12:12 am | जुइ
फटु आवडले!!
1 Feb 2015 - 2:42 am | मुक्त विहारि
तुमच्या पा.क्रु. जितक्या चविष्ट तितकेच सुंदर फोटो.
(देव कुणा कुणाला भरभरून कला देतो, तर कुणाला अजिबातच काही नाही....असे सुंदर फोटो काढता येत नाहीत म्ह्णून ....(निराश) मुवि...)
1 Feb 2015 - 8:12 am | शिद
मस्त आले आहेत सगळे फोटो...विशेषतः ६वा व ७वा.
2 Feb 2015 - 2:23 pm | जागु
जुई, शिद धन्यवाद.
मुक्त अहो प्रत्येका कडे असते काही ना काही कला. त्या कलेला थोडे आपल्याकडून पॉलिश करायला लागत.
8 Feb 2015 - 11:06 am | mayurpankhie
मला १२ वा फोटो जास्त आवडला, आणि दुर्वाना फुलं येता हे माहित नव्हतं....
16 Feb 2015 - 1:19 pm | मॅक
०७ व १२ मस्तच....