साहित्यः
३ वाट्या तांदूळ
१ वाटी उडदाची डाळ
३/४ वाटी मूग डाळ
१/२ वाटी तूरीची डाळ
१/२ वाटी चणा डाळ
१/४ वाटी जाड पोहे
४-५ हिरव्या मिरच्या
१ छोटा कांदा
कढीपत्ता
कोथींबीर
मीठ चवीनुसार
पाकृ:
प्रथम सर्व डाळी व तांदुळ स्वच्छ धुवून, एकत्र ५-६ तास भिजवणे.
मिश्रण वाटण्याआधी पोहे भिजवून घेणे, मिरच्या बारीक चिरून घेणे.
मिक्सरच्या भांड्यात डाळ-तांदूळ, भिजवलेले पोहे व बारीक चिरलेल्या मिरच्या एकत्र करून वाटून घेणे.
वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून चांगले एकत्र करावे.
आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्यात थोडेसेच तेल घालावे व तयार मिश्रण डावाने घालून आप्पे सोनेरी रंगावर फ्राय करावे.
उलटवून दुसरी बाजू ही छान होऊन द्यावी, गरज वाटल्यास थोडे तेल घालावे.
तयार आप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
नोटः
ह्या मिश्रणाला फर्मेंट करायची गरज नाही. रात्री डाळ-तांदूळ भिजवले तर सकाळी नाश्त्याला बनवता येतात.
आवडत असल्यास सांबाराबरोबरही सर्व्ह करू शकता.
प्रतिक्रिया
30 Jan 2015 - 1:59 pm | अनुप ढेरे
वाह! मस्तं!
30 Jan 2015 - 2:03 pm | गवि
वॉव.. खासच. शेवटचा फोटो अगदी रेडी टु पिक अप बघून जळजळले.
बादवे मी आधी प्रॉन पॅक्ड तिखट आप्पे असं वाचलं, मग चष्मा लावला.
वैसे वो भी आयडिया बुरा नही है.. असं काही करता येईल का कोळंबी वगैरे वापरुन ? :)
30 Jan 2015 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
@ शेवटचा फोटो अगदी रेडी टु पिक अप बघून जळजळले.>> +++१११
30 Jan 2015 - 2:06 pm | सविता००१
सानिकाची मस्त रेसिपी आली.
बास. एवढच
30 Jan 2015 - 2:27 pm | मधुरा देशपांडे
+१
30 Jan 2015 - 2:12 pm | अजया
किती दिवसानी आलीस गं.मस्त पाकृ.तोंपासु.
30 Jan 2015 - 2:18 pm | जागु
अरे वा मी फक्त उडीद डाळ आणि तांदळाचे करते. हे आप्पेही छान आहेत. फोटो पाहुन तोपासु.
फर्मेंट न केल्याने स्पंजी होतात का?
30 Jan 2015 - 2:43 pm | वेल्लाभट
प्रोटीन हा शब्द वाचताच डोळे चमकले!
अप्पे नेहमी होतातच. मस्त रेसिपी सुंदर फोटो! सहीच
30 Jan 2015 - 3:08 pm | इशा१२३
सानिका मस्त दिसताहेत आप्पे.तोपासु.
30 Jan 2015 - 3:30 pm | शिद
मस्तच.
आमच्या गावाला तांदळाचं पिठ, गुळ व वेलचीदाणे रात्री आमलेल्या ताडीमध्ये भिजत घालून सकाळी गोड आप्पे करतात; विशेषतः होळीला. बॅटर रात्रभर आणखिन फर्मेंट होऊन आप्पे अगदी मस्त लुसलूशीत व स्पंजी होतात.
30 Jan 2015 - 7:05 pm | सूड
आमलेल्या ताडीमध्ये?? बरे लागतात?
30 Jan 2015 - 7:34 pm | शिद
आमलेली ताडी म्हणजे सकाळची ताडी सुर्य जसा चढत जातो तशी आमते. तिच ताडी त्याच संध्याकाळी/रात्री बॅटर बनवायला वापरतात.
कोणाला माहिती नसेल (विशेषतः ताडी न पिणारे) तर मिटक्या मारत खातात कारण ताडीची चव अजिबात येत नाही आणि चढत तर अजिबातच नाही. :)
30 Jan 2015 - 3:35 pm | सस्नेह
असेच करते पण फर्मेंट करून . कांद्यामुळे मस्त खमंग स्वाद येतो.
30 Jan 2015 - 4:02 pm | उमा @ मिपा
केव्हाची वाट बघत होते गं! मस्त पाक्रु. फोटो अहाहा! सर्वात जास्त आवडला तो नारळाच्या चटणीचा हिरवा रंग. परफेक्ट!
एक शंका... फर्मेंट नाही केला तरी आप्पे फुगून स्पोन्जी कसे काय होतात?
30 Jan 2015 - 5:55 pm | सानिकास्वप्निल
मिश्रण वाटून झाले की थोडे घोटायचे मस्तं हलके होतात :)
धन्यवाद गं भारतवारीमुळे नवीन पाकृ द्यायला जरासा उशीर झाला ;)
30 Jan 2015 - 4:28 pm | रेवती
येस्स......मस्त पाकृ व फोटू. खरेच प्रोटीन प्याक्ड आहेत.
30 Jan 2015 - 5:31 pm | चाणक्य
काय भारी फटु काढलाय आणि....तोंपासु
30 Jan 2015 - 6:17 pm | पदम
+१००
30 Jan 2015 - 6:32 pm | स्वाती दिनेश
मस्त ग.. हिवाळ्यात पीठ आंबायला फार वैताग येतो तेव्हा हे नॉन फरमेंटेड आप्पे मस्तच!
स्वाती
30 Jan 2015 - 8:38 pm | स्रुजा
हो ना ! माझ्या तर कडधान्यांना पण नखरे सुचतात थंडीत. फर्मेंट नाही पाहून च जीवात जीव आला.
मस्त पाकृ हे वेगळे नकोच सांगायला. :) टूथ पीक ची आयड्या एकदम झकास !
30 Jan 2015 - 6:35 pm | पिंगू
मस्त वाटताहेत. उद्या करण्यात येतीलच..
30 Jan 2015 - 9:39 pm | निवेदिता-ताई
मस्तच
30 Jan 2015 - 9:41 pm | मनिमौ
++11111
30 Jan 2015 - 10:22 pm | मुक्त विहारि
प्रेझेंटेशन मस्त...
बाकी आप्पे कधीच काड्या लावून खाल्ले नाहीत.
आणि तसेही आमच्या बायकोच्या हातचे आप्पे फोटो काढण्या इतपत शिल्लक रहात नाहीत.
आप्पे ताटात पडले रे पडले की मेंदू हाताला आणि तोंडाला, कामाला लावतो.
30 Jan 2015 - 11:07 pm | सुहास झेले
व्वा व्वा... वेलकम बॅक :)
पाककृती, फोटो नेहमीप्रमाणे अल्टीमेट :) :)
31 Jan 2015 - 12:37 am | रुपी
माझ्याकडे आप्पेपात्र नाही. कुणी Aebleskiver Pan आप्पे बनवण्यासाठी वापरले आहे का?
2 Feb 2015 - 6:33 pm | रेवती
होय, माझ्या मैत्रिणीने वापरले म्हणाली पण ते कास्ट आयर्नचे नसल्याने, म्हणजे अॅल्यूमिनिअमचे हलके असल्याने फारसे चांगले झाले नाहीत म्हणाली व माझ्याकडील अप्पेपात्र घेऊन गेली. मी वापरले नसल्याने कल्पना नाही.
4 Feb 2015 - 2:46 am | रुपी
मला पण मैत्रिणीकडूनच आणावे लागणार वाटते..
31 Jan 2015 - 10:57 am | आरोही
मस्त हे करून बघितले आहेत ,खरेच छान होतात .फोटो नेहमीप्रमाणे झकास ..
31 Jan 2015 - 3:06 pm | त्रिवेणी
सानिकाची पाककृती आली.
टुथपिक मुळे साऊथ इंडिजची आठवण आली.
31 Jan 2015 - 7:44 pm | स्वाती२
छान पाकृ आणि फोटो! इथे थंडीत पीठ आंबत नाही त्यामुळे ही पाकृ अधिक आवडली. नक्की करुन बघेन.
31 Jan 2015 - 7:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
_/\_ अजून असंच खाऊ घाला.
देवा, सास्वला क्षमा कर. पाकृची छायाचित्र जीवघेणी आहेत, हे त्यांना माहिती नाही. :)
-दिलीप बिरुटे
31 Jan 2015 - 11:35 pm | दिपक.कुवेत
का ईतक्या लवकर परत आलीस? भारतातील सुट्टि अजुन वाढवायची ना! आप्पे ऑल टाईम फेवरेट.....कसेहि आणि कोणत्याहि स्वरुपात. फोटो नेहमीप्रमाणेच कातील....
2 Feb 2015 - 2:25 pm | इशा१२३
मस्त झाले अप्पे.काल करुन पाहिले.छान स्पोन्जी झाले.
3 Feb 2015 - 11:16 pm | सानिकास्वप्निल
धन्यवाद इशा.
तुझा निरोप व फोटू मिळाला होता, बनवून बघीतलेस आणि आवडले म्हणून धन्यवाद :)
2 Feb 2015 - 5:18 pm | लव उ
पण चव छान होती...
4 Feb 2015 - 7:51 am | स्पंदना
मी ही बनवले सगळ्या डाळी घालुन.
छान झाले होते.
5 Feb 2015 - 6:03 pm | सानिकास्वप्निल
धन्यवाद अप्पूताई :)
4 Feb 2015 - 11:08 am | स्नेहल महेश
वाचनखूणा साठवलेली आहे
5 Feb 2015 - 10:53 pm | पैसा
नेहमीप्रमाणेच मस्त पाकृ आणि फोटो!
9 Feb 2015 - 3:30 pm | मनिमौ
बनवले आहेत. घरी सगळ्यांना खुपच आवडले
11 Feb 2015 - 10:43 pm | अजो
बनवले आज. मस्त झालेत.
17 Mar 2015 - 1:23 pm | अनुश्का
खुप छान