मिपावर येण्यातल्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे अनेक प्रकारची माहिती मिळणे. मी कितीही मूलभूत प्रश्न विचारला तरी मला इथे "काय पावणं , अलिबागहून आला काय ??" अशी ट्रीटमेंट मिळत नाही. (पब्लिक चिमटे काढेल , पण मदत करेलच !)
तर अशा नानाविध शंकांचे आचके आपल्याला ( म्हणजे मला !) येत असतात. बर्याचदा गूगलगुर्जी उत्तर देतात. एरवी मित्र मैत्रिणी उत्तरे देतात. एवढे करून काही लघु नि दीर्घ शंका राहून जायच्या त्या जातातच. म्हण्टले , मिपावर एक फर्मास धागा बनवून टाकूया : शंकासमाधान ! ज्याला ज्याला अन्यत्र उत्तरे मिळणार नाहीत त्याने/तिने येथे शंका विचारावी. पब्लिक उत्तर देईलच. लगे हाथो सबका भला. ना अच्छा लगे तो मारो इग्नोर इसको ! कसे म्हणता ?
तर माझा सध्याचा प्रश्न : genre या noir शब्दांचे नेमके उच्चार काय ?? वेगवेगळ्या डिक्शनर्या भयानक उलटसुलट उत्तर देत आहेत. म्हण्टले आपल्या मायमराठीत नीट वाचावे म्हणजे कळेल !
genre चे मी वाचलेले उच्चार :
जानर्
जॉनर्
जॉन्-रा
noir चे मी वाचलेले उच्चार :
नुवॉ
नॉए
नॉएर्
पसंत नसलेल्याना हा धागा सहन केल्याबद्दल आणि इतरांना यात सहभागी होण्याबद्दल आगाऊ धन्यवाद !
प्रतिक्रिया
11 Nov 2008 - 10:49 am | मनिष
noir हा फ्रेंचमधे नुऑsर असा उच्चारला जातो!
"र" चा पाय मोडलेला, अस्पष्ट उच्चार करायचा.
- मनिष
11 Nov 2008 - 6:42 pm | टारझन
उच्चारांच आपलं अंमळ वाकडं .. त्यामुळ शॉली ...
बाकी
(पब्लिक चिमटे काढेल , पण मदत करेलच !)
सहमत ... इथेच मला काही असे मित्र भेटले ज्यांच्याशी थोडा पर्सनल लेव्हलला जाउन संवाद साधू शकतो .. बाकी आयुक्षात असं घडण विरळच ...
बरोबर ना लोक्स ?
- (आमच्या कंपुचा शिलेदार)
टाराजी मालुसरे
11 Nov 2008 - 11:04 am | विसोबा खेचर
मुक्तराव,
हा धागा चांगला आहे बर्र का! :)
आपला,
(शंकेखोर) तात्या.
11 Nov 2008 - 11:08 am | बिपिन कार्यकर्ते
मी ऐकलेला उच्चार नुवॉ असा आहे. मनिष म्हणतो तसा 'र' असेलच तर अगदीच सायलेंट असतो. आणि 'जॉनर' पण तसेच ऐकले आहे.
बिपिन कार्यकर्ते
11 Nov 2008 - 12:11 pm | नंदन
बव्हंशी फ्रेंचमध्ये, शेवटी e आला की त्यापूर्वीचे व्यंजन पूर्ण उच्चारले जाते. नाहीतर नाही. बर्याचदा शब्दाच्या स्त्रीलिंगी रूपाच्या शेवटी e येतो.
जसे - Simon - पु. - उच्चार सिमाँ,
आणि, Simone - स्त्री. - उच्चार सिमॉन
या नियमाला, काही वेळा c, r, f, l यांचा अपवाद आहे. (लक्षात ठेवायचे असेल तर 'केअरफुल'मधली चार व्यंजने.)
या दोन शब्दांचा मूळ उच्चार जॉनर्आ आणि (वर मनिष यांनी म्हटल्याप्रमाणे) नुऑsर असा असावा.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Nov 2008 - 12:54 pm | महेश हतोळकर
मिपा वर परत शुद्धलेखनाची चर्चा सुरु झाली......
11 Nov 2008 - 1:04 pm | सर्किट (not verified)
छंदशास्त्र ह्या विभागात टाकल्यास शुद्धलेखनावरील चर्चा मिपाला मंजूर आहे, असे हल्लीच लक्षात आलेले आहे.
शुद्धलेखन : छंदशास्त्र
बोलीभाषा: मुक्तछंद
किंवा
शुद्धलेखनः शास्त्रीय संगीत
मुक्तछंदः हिमेश रेशमिया
असे सगळीकडे सब्स्टिट्यूट करा. मजा येईल.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
11 Nov 2008 - 1:47 pm | महेश हतोळकर
शुद्धलेखनः शास्त्रीय संगीत
मुक्तछंदः हिमेश रेशमिया
हरकत नाही. एवढं करता आलं तरी खूप आहे.
छंदमुक्त महेश
11 Nov 2008 - 1:44 pm | सर्किट (not verified)
काय पावणं अलिबागहून आलात का ?
(ट्रीटमेंट हवी होती ना ? ही घ्या.)
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
11 Nov 2008 - 2:32 pm | सुनील
"अलिबागहून आलात" हा वाकप्रचार समस्त मराठी माणसांचा अपमान करणारा आहे तेव्हा त्यात ताबडतोब बदल करून "भागलपूरहून आलात" असा वाकप्रचार रूढ करावा अशी माझी मागणी आहे!
सुनील ठाकरे
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Nov 2008 - 2:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"अलिबागहून आलात" हा वाकप्रचार समस्त मराठी माणसांचा अपमान करणारा आहे तेव्हा त्यात ताबडतोब बदल करून "भागलपूरहून आलात" असा वाकप्रचार रूढ करावा अशी माझी मागणी आहे!
=)) तसं गोरखपूरही खूप "छान" आहे.
अवांतरः ensemble, entrepreneur चे उच्चार नक्की कसे होतात आणि त्याला काही नियम आहेत का?
अतिअवांतरः मी पुण्याहून आले आहे. (यालाच पाव्हण्याच्या जोड्याने साप मारणे असंही म्हणता येईल.)
11 Nov 2008 - 6:37 pm | बहुगुणी
'ऑन्सॉम्बल' (इथे ऐका) आणि 'ऑन्त्रप्रनुअर'(इथे ऐका)
11 Nov 2008 - 6:37 pm | बहुगुणी
'ऑन्सॉम्बल' (इथे ऐका) आणि 'ऑन्त्रप्रनुअर'(इथे ऐका)
11 Nov 2008 - 6:46 pm | आनंदयात्री
>>'ऑन्त्रप्रनुअर'
भेरी फस्ट हमने इस बुडबख्त शब्दवा को आंत्रपुच्छ ऐसन पढा.
और हम तो धनबादसे आया हुं !!
11 Nov 2008 - 6:41 pm | आजानुकर्ण
जौनपुराहून आलात काय
आपला
(भैय्या) आजानुकर्ण
11 Nov 2008 - 6:41 pm | गणा मास्तर
खुप दिवस छळणारा प्रश्न.
सार्वजनिक संडास किंवा मुतारीला 'स्वछतागृह' का म्हणतात?
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
13 Nov 2008 - 3:57 pm | ऍडीजोशी (not verified)
कारण इथे जाऊन माणसं आप्-आपली पोटं स्वच्छ करून घेताता
11 Nov 2008 - 6:52 pm | मुक्तसुनीत
मंडळी , चिमटे आणि उत्तरे , दोन्ही बद्दल मनःपूर्वक आभार !
14 Nov 2008 - 2:54 am | कोलबेर
genre ह्याचा उच्चार अमेरिकन लोकं 'जान्रा' करतात असं निरिक्षण आहे
noir चा उच्चार वाईन संबधी असेल तर 'पिनो नुआर' असा करताना पाहिले आहे.
14 Nov 2008 - 8:49 am | पिवळा डांबिस
वाईन मधली ती "पिनोन्वा"
पण अमेरिकनांना उच्चारातलं काय कळतंय म्हणा......
अहो "दिक्षित" चा उच्चार "डीप्-*ट" असा करतात!!!!
:))
14 Nov 2008 - 10:16 am | घाटावरचे भट
किंवा 'डिक-*ट' ;) (आता दोन्ही शब्दांच्या दुसर्या अक्षरा ऐवजी फुली टाकली असती तर काहीच कळलं नसतं. दोन्ही शब्द तेवढेच अश्लील आहेत. अश्लील वाटल्यास प्रतिसाद ऊडवावा ही मा. संपादक मंडळींना विनंती)
14 Nov 2008 - 3:02 am | भाग्यश्री
मी जॉन्र(न चा पाय कसा मोडायचा!? आणि र जरा सायलेंट.. अवघड आहे! ) असाच ऐकला उच्चार.. मलाही हा प्रश्न पडला होता! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
14 Nov 2008 - 3:18 am | चतुरंग
genre चा उच्चार 'जाऽन्र' असाच ऐकू येतोय!
noir/cafe noir/pinot noir ह्या तीनही शब्दात उच्चार 'नुआर' असाच ऐकू येतोय.
चतुरंग
14 Nov 2008 - 8:25 am | मुक्तसुनीत
मंडळी , पुन्हा एकदा , सगळ्यांचे आभार.
या धाग्याला विषयाचे बंधन नाही. माझा पुढचा प्रश्न :
आमचा पोरगा आहे चार वर्षांचा. मी अलिकडे पहातो : तो मूड असला वगैरे की एरवी बोलतो पुष्कळ ; पण हल्ली विचारलेल्या प्रश्नांना उत्तर बर्याचदा देत नाही. त्याला कुठली गोष्ट हवी असेल तर, (एरवी उत्तम संभाषण अवगत असूनही) स्पष्ट बोलायच्या ऐवजी, उं उं करतो. म्हणजे आम्ही "समजून" त्याला हवे ते द्यायचे ! अलिकडे काही निमित्ताने त्याच्या केजीमधे जाणे झाले ; त्याच्या मित्रांच्या संगतीत त्याला दूरून पहात होतो. चिरंजीव फार बोलायला तयार नाहीत ; बुजल्यासारखे.
काय करावे ? कुणाचा काही अनुभव ? काही सूचना ?
आगाऊ धन्यवाद !
14 Nov 2008 - 9:11 am | प्रमोद देव
लहान मुलांशी वागण्याची कोणतीही एक पद्धत नसावी. प्रत्येक मुलाच्या स्वभावाप्रमाणे त्यात बदल करावा लागतो.
तरीही काही समान गोष्टींचा अवलंब बर्याच वेळा यशस्वी ठरतो असे लक्षात येते.
एखादा मुलगा/मुलगी आपल्याशी नीट बोलत नसेल तर आपण त्याच्यासमोर बोलताना मुद्दाम चुकीचे बोलावे की मग न बोलणारे मुल देखिल बोलते होते असा माझा अनुभव आहे. आपल्या चुका ते दुरुस्त करते आणि बघता बघता संवाद साधला जातो.
आपण नुसतेच जर प्रश्न विचारले तर मात्र मुलं त्यांच्या पद्धतीने आणि मनात असेल तरच प्रतिसाद देतात.