साहित्य-
२ लिटर दूध(जास्त फॅट असलेले), १ वाटीभर साखर, वेलचीपूड,केशराच्या काड्या, बदाम,पिस्त्यांचे काप,चारोळी
कृती-
मायक्रोव्हेव प्रूफ काचेच्या भांड्यात दूध घ्यावे, ८०० वॅटला ३ मिनिटे गरम करावे, दार उघडून ढवळावे.परत ३ मिनिटे गरम करावे. असे दूध निम्मे होईपर्यंत करावे. मग साखर घालून ढवळावे,परत ३ मिनिटे गरम करावे.ढवळून परत आटवावे. असे जितकी दाट रबडी हवी तितके आटवावे.दूध उतू जाणार नाही याकडे लक्ष द्यावे लागते.
मी १०% फॅट असलेले कोंडेन्स्ड मिल्श घेते म्हणजे कमी आटवायला लागते.
मायक्रोव्हेव नसेल तर आपल्या पारंपरिक पध्दतीने मोठ्या आचेवर जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवावे. आटवताना सारखे ढवळावे नाहीतर दूध लागते/उतू जाऊ शकते.
ज्यांना साय आवडत नाही अशा(माझ्यासारख्यां)साठी- दूध थोडे गार झाले की ब्लेंडर किवा हँडमिक्सर दूधात फिरवून साय मोडून काढावी.
नंतर केशराच्या काड्या,वेलचीपूड,बदामपिस्तेकाप,चारोळी इ. घालावे.
रबडी फ्रिजमध्ये ठेवून थंड करावी.
ही थंडगार रबडी चांदीच्या वाटीतून किवा नक्षीच्या नाजूक काचेच्या बाउल मध्ये घेऊन खावी.
आपण जरी काचेच्या किवा चांदीच्या बाउलमधून रबडी खात असलो तरी डोळ्यासमोर बनारसची द्रोणातली रबडी आणावी, :) उसकी तो बातही अलग है!
प्रतिक्रिया
9 Nov 2008 - 9:34 pm | रेवती
बासूंदी तर बर्याचवेळा आपण करतो. रबडी त्यापेक्षा घट्ट असते असं ऐकलय.
याबरोबर पुर्या करतात का नुसतीच रबडी खातात?
पाकृ नेहेमी प्रमाणेच आवडली.
रेवती
9 Nov 2008 - 11:16 pm | स्वाती दिनेश
रबडी अगदी घट्ट.. खायची,प्यायची नाहीच.. पुरी बरोबर खाऊ शकतो की .. पण मग जरा बासुंदी आणि रबडी ह्याच्या मधे ठेव.. म्हणजे बासुंदीहून घट्ट पण रबडीहून जरा कमी आटव.
तात्या,आता इथे फ्रांकफुर्टात चुल्हाणं आणि कढई कुठून आणू बाबा? म्हणून तर शेवटचं वाक्य वाच ना.. द्रोणातली बनारसी रबडी आठवत खा..
ऋषिकेश, ट्रे नाही ते टेबलमॅट आहे केळ्याच्या पानाचे,:)
स्वाती
9 Nov 2008 - 10:34 pm | ऋषिकेश
रबडी-रबडी
नावडे-आवडे
लालुची-स्वातीची
अनुक्रमे!
:)
अवांतरः केळ्याच्या पानाचा ट्रे मस्त :)
-(खादाड) ऋषिकेश
9 Nov 2008 - 10:38 pm | मदनबाण
इंदुर ला गेलो असताना रबडी मजबुत चापली होती त्याची आठवण झाली... :)
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
9 Nov 2008 - 10:54 pm | विसोबा खेचर
मायक्रोव्हेव प्रूफ काचेच्या भांड्यात दूध घ्यावे, ८०० वॅटला ३ मिनिटे गरम करावे,
पाकृशी असहमत...
वरील पद्धतीने केलेली रबडी मी खाल्ली आहे, परंतु अस्सल रबडीची चव तिला लागत नाही..
मायक्रोव्हेव नसेल तर आपल्या पारंपरिक पध्दतीने मोठ्या आचेवर जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवावे.
रबडी ही पितळीच्या कढईत चुलीवर आटवूनच करावी लागते तरच तिला अस्सल चव येते....
आपला,
(इंदौर, अलाहाबाद, नवी दिल्ली, उज्जैन, देवास, हरिद्वार, मथुरा, बनारस, ग्वाल्हेर, झाशी इत्यादी ठिकाणची रबडी यथेच्छ खाल्लेला) तात्या,
9 Nov 2008 - 11:16 pm | चतुरंग
तात्या म्हणतात त्यात तथ्य आहे. रबडी ही जाड बुडाच्या कढईत, लांब दांड्याच्या लोखंडी ढवळण्याने सावकाश आटवून केलेली असली की त्याची तुलना करता येत नाही पण किमान त्याखालोखाल गॅसवर मंद आचेवर आटवलेली अतिशय दाट बासुंदी आणि पुढे त्याची रबडी हाही प्रकार 'चाखणीय' होतो हे स्वानुभवातून नक्की! :)
चतुरंग
11 Nov 2008 - 11:57 am | पर्नल नेने मराठे
8| जाड बुडाचे पातेले :-?? कुठून आणू
11 Nov 2008 - 12:47 pm | सर्किट (not verified)
ठाण्याला जा. तिथे एक जाड बुडाचे पातेले आहे असे ऐकिवात आहे ;-)
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
11 Nov 2008 - 1:09 pm | जैनाचं कार्ट (not verified)
=))
* एक शंका वजन पेलवेल का त्याला?
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
11 Nov 2008 - 3:44 pm | शाल्मली
स्वातीताई,
पाकृ. मस्त आहे. कालच कोन्डेन्स्ड मिल्श आणले आहे. त्यामुळे चेरी केक नंतर आता लवकरच म्युन्स्टरात रबडी करण्यात येणार आहे ;) :)
फोटोही एकदम मस्त आला आहे.
--शाल्मली.
11 Nov 2008 - 5:45 pm | प्रभाकर पेठकर
मस्त पाककृती.
साला, जे जे आवडते तेच नेमके डॉक्टर लोकं मना करतात खायला......
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
12 Nov 2008 - 2:13 am | चतुरंग
एखाद वाटी रबडी खाऊन मस्त ३-४ किमि चालून आलात ना काही होत नाही!!
चतुरंग
12 Nov 2008 - 6:53 pm | लिखाळ
आणि ३-४ किमी चालून आल्यावर वाटीभर थंडगार रबडी खायला काय मजा येईल :)
-- (चक्रात अडकलेला) लिखाळ.