इथे एका पेक्षा एक पाककृती टाकून लोकांना आनंदी करणाऱ्या सगळ्यांची माफी मागून . .
हापिसात जात नसलेला वेळ . . आणि आत्ताच खाल्लेल्या तंदुरी चिकन आणि बिर्याणीने पोट भरल्यामुळे कैच्या काय चालणारं डोकं . . याचा हा परिणाम
तर . . मंडळी . .
बाभळीच्या काट्यांची उसळ :-
साहित्य :-
१५० - २०० बाभळीचे काटे . . कमीत कमी ३ - ४ इंच लांबीचे (आता हे कुठून मिळवायचे हे तुमचं तुम्ही बघा )
२ वाट्या दही . . जितकं आंबट असेल तितकं चांगलं . .
२ - ३ दिवस खाण्याच्या कपाटात दह्याचं भांडं उघडं ठेवलं कि होईल आंबट . . ( खाण्याचं कपाट काय हे समजलं नसेल तर जवळपास च्या "वाड्यात" राहणाऱ्या लोकांना विचारा . . सांगतील ते )
३-४ कांदे . . लहान असतील तर ५-६ घ्या .
पाव किलो शेंगाचा कूट ( काट्यात भरण्यासाठी . )
गरम मसाले . तिखट , ३-४ चमचे (हे आपापल्या तिखट खाण्याच्या क्याप्याशिटी वर अवलंबून )
मीठ चवीनुसार .
कृती :-
काटे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत . गरम असेल तर चांगलं .
काटे धुवून झाले कि ते उन्हात वाळू द्यावेत थोडे .
इकडून तिकडून उडून आलेली वाळू त्यांना लागू नये म्हणून वरून पण पातळ कापड ठेवलं तरी चालेल . (कापडाच्या चारी कोपऱ्यावर काही तरी जड ठेवायचं विसरू नका . . )
काटे वाळले . कि नाजूक हाताने त्यात उभे काप द्यावेत .
आता साहित्यात असलेल्या शेंगाच्या कुटात थोडं तीखट मीठ घालावं .
त्याची छान चटणी केलीत तरी चालेल .
आता उभ्या चिरलेल्या काट्यात आडव्या हाताने ती चटणी / तिखट मीठ लावलेलं कूट भरावं .
आता . जसे भरलेले /किंवा वरून बेसन लावलेले म्हणा, बांगडे गरम तेलात सोडतात (शाकाहारी लोकांनी या जागी कांदा भजी वाचली तरी चालेल) तसे ते उकळत्या तेलात सोडावेत .
थोड्या वेळाने . काट्यांचा वरचा काळसर रंग अजून काळा होऊ लागेल .
मग ते बाहेर काढावेत .
आता . हे सगळं बाजूला ठेऊन .
उरलेल्या कुटात थोडं पाणी मिसळून . गरजेनुसार मसाला , तिखट , मीठ , जिरे , काळी मिरची . तीळ , हिंग , हळद , दालचिनी , वेलदोडे , कडलिंब , इत्यादी साहित्य घालून मस्त ग्रेवी करावी .
आता हे सगळं मिश्रण गरम करायला ठेऊन . त्यात ते तळलेले काटे सोडावेत .
तयारी झाला बाभळीच्या काट्यांची उसळ .
सोबतीला आंबोळी / भाकरी / चपाती / पोळी / पुरी / पिज्झा बेस . जे आवडेल ते घेऊ शकता .
आता प्रश्न तो .
दही आणि कांद्याचं काय करायचं हा .
तर हे सगळं वाचून ज्यांची डोकी गरम होतील त्यांनी दही डोक्यावर थापून घ्यावं .
आणि ज्यांना भोवळ येईल त्यांच्या आजूबाजूच्यांनी कांदा त्यांच्या म्हणजेच भोवळ आलेल्यांच्या नाकाशी धरावा
प्रतिक्रिया
19 Jan 2015 - 6:29 pm | जेपी
ही पाकक्रुकी अंडे घालुन (पदार्थात) करता येईल का ?
=))
19 Jan 2015 - 6:32 pm | बॅटमॅन
म्हणजे काय =))
19 Jan 2015 - 6:36 pm | अद्द्या
The पाक which is crooked can be called as पाककृकी. .
- इति पाकातले वडे करून बघण्याचा प्रयत्न करणारा रावसाहेब :D
19 Jan 2015 - 6:37 pm | जेपी
सोम्मार असुन पण टायपो झाला.. =))
कदाचीत कालची ... =))
19 Jan 2015 - 7:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा पाक क्रुकी नको ? असं विचारेलं असावं ! *mosking* ;)
19 Jan 2015 - 6:31 pm | अद्द्या
प्रत्येक अंड्यात चार काटे , क्रोस पद्धतीने
घालून ते तळल्यास जास्ती चव येईल से वाटते =))
19 Jan 2015 - 6:42 pm | मोहनराव
तोंडात काटे आले...
19 Jan 2015 - 6:47 pm | सूड
रेसिपी की थंडीमुळे माहीत नाही, पण काटा आला. ;)
19 Jan 2015 - 7:02 pm | दिपक.कुवेत
ओके पण कुठे? :D
19 Jan 2015 - 7:06 pm | स्पा
=))
19 Jan 2015 - 6:50 pm | जातवेद
बाभळीच्या काट्याची उसळ मुळ्व्याधावर अत्यंत गुण्कारी असे कुठल्यातरी कुठेतरी वाचल्याचे आठवतय. राव साहेबांनी प्रकाश टाकावा!
19 Jan 2015 - 6:52 pm | अद्द्या
आउटपुट पोर्टस बरेच तयार व्हायची शक्यता असेल . म्हणून मुळव्याधावर चांगला म्हणत असतील
19 Jan 2015 - 6:54 pm | बॅटमॅन
अरारारारारा =)) =)) =))
19 Jan 2015 - 7:06 pm | स्पा
टारु आणि मी केलेले मसाला प्रार्थना किटक्स आठवले :)
पाकृचा धागा उडला बिचार्याचा
19 Jan 2015 - 7:10 pm | स्पा
19 Jan 2015 - 7:12 pm | अद्द्या
कोणा ना कोणाचा तरी .
"शी . हे बघून मला उलट्या येताएत " तत्सम मेसेज वाचण्यास तयार रहा . .
मी मेल वर ज्यांना हि पाकृ पाठवली त्यापैकी काही जणींचे सुरु झालेत
=))
19 Jan 2015 - 7:35 pm | बॅटमॅन
काय प्रगत टेक्नॉलॉजी आहे. प्राचीन काळी मंत्र इ. मिळाला की तसे मेसेज यायचे. आता फक्त एका एसेमेसने येतात. काय काय घडेल या जगात कै नेम नाही.
19 Jan 2015 - 8:02 pm | सूड
हो का? बरं बरं!!
19 Jan 2015 - 8:14 pm | पैसा
फोटो नसल्याने पाकृ बाद ठरली आहे.
19 Jan 2015 - 8:34 pm | तिमा
वरील पाककृती केल्यावर त्या बल्लवाचार्याला प्रथम या पदार्थावर बसवावे, म्हणजे उरलेल्यांना काटेविरहित डिश खायला मिळेल.
19 Jan 2015 - 10:57 pm | हरकाम्या
अतिशय उत्तम " पाकक्रुती " ह्या असल्या पाकक्रुती पुर्वी www.bajbajpuri.com या संस्थळावर उपलब्ध होत्या.
दुर्दैवाने ते संस्थळ बन्द झाले. आपण ही पाकक्रुती त्या " संस्थळाची आठवण " म्हणुन टाकलीत की काय?
का त्या संस्थळाच्या खजिन्यातुन ही "ढापलीत " काय?
19 Jan 2015 - 11:57 pm | hitesh
ती वेबसईट मेली आहे का ?
20 Jan 2015 - 8:51 am | नाखु
फकस्त "पाक" लोकांसाठी असून त्यानंतरच "काट्याने काटा काढणे" हा वाकप्रचार वापरात आणला जाईल.
==
स्वगत : कशेळी कट्ट्यामध्ये करून बघावी काय अनायसे "ट्रायल" साठी बरीच "गुणग्राहक" तयार आहेत्च.
24 Jan 2015 - 12:06 am | चिपळूणकर
ही पाककृती वाचून "अंगात किती काटे आहेत तुझ्या " हा वाक्प्रचार आठवला.
24 Jan 2015 - 1:17 am | यसवायजी
**त किती कीडे आहेत असा आहे
3 Feb 2015 - 5:31 pm | अद्द्या
=)) =))