धोंडोपंतांच्या लेखावरून स्फुर्ती घेउन...
वाचतो क्वचित
त्यातून ललित
घुसते डोईत
कधितरी
लिहितो मधेच
त्यातून तात्विक
विचार सात्विक
करितो मी
ठरवितो मग
लिहावी कविता
सुखदु:ख बाता
जमेचिना
पुरे झाले आता
डोके खाजवणे
कविता रचणे
चेष्टा नोहे
पहा मिपावर
असा हा लिखाळ
लावितो पाल्हाळ
पुन्हा पुन्हा
--लिखाळ.
प्रतिक्रिया
9 Nov 2008 - 2:42 am | घाटावरचे भट
=)) अगदी माझ्या मनातले विचार........
झकास कविता...आपलं सॉरी, पाल्हाळ...
-भटोबा
9 Nov 2008 - 6:30 am | अरुण मनोहर
येवो मिपावर
असा हा लिखाळ
कल्पना रसाळ
पुन्हा पुन्हा
9 Nov 2008 - 8:37 am | बेसनलाडू
छान आणि थेट!
(वाचक)बेसनलाडू
9 Nov 2008 - 9:06 am | धोंडोपंत
हा हा हा . छान छान.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
9 Nov 2008 - 9:48 am | विसोबा खेचर
लिखाळभावजी,
मस्तच बर्र का! :)
तात्या.
9 Nov 2008 - 11:25 am | सहज
नावाचा लिखाळ
स्वभाव मवाळ
थोडासा खट्याळ
लिहीतसे
नियमीत येतो
तो लागता भुक
तर्रीवर ताक
त्याला हवे
दिवस अपुर्ण
भासे खरतर
झाली ना चक्कर
मिपावरी
सार्थक होतसे
थांबा पळभर
मोद भरपुर
मिपावरी
9 Nov 2008 - 3:27 pm | दत्ता काळे
नियमीत येतो
तो लागता भुक
तर्रीवर ताक
त्याला हवे
. . . सहज सुंदर
9 Nov 2008 - 4:25 pm | स्वाती दिनेश
पाल्हाळ आवडले आणि सहजरावांची प्रतिक्रियाही..
स्वाती
9 Nov 2008 - 11:35 pm | लिखाळ
>येवो मिपावर
असा हा लिखाळ
कल्पना रसाळ
पुन्हा पुन्हा<
धन्यवाद अरूणराव.
>नावाचा लिखाळ
स्वभाव मवाळ
थोडासा खट्याळ
लिहीतसे
नियमीत येतो
तो लागता भुक
तर्रीवर ताक
त्याला हवे<
अगदी पहिल्या स्वाक्षरीपसून सर्व ! :) प्रतिसादाबद्दल आभार !
भटबुवा, बेला, धोंडोपंत, बाळकराम, तात्या, स्वातीताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
-- लिखाळ.
9 Nov 2008 - 11:54 pm | चतुरंग
लिखाळांची प्रतिभा भरार्या घेऊ लागली आहे! ;)
चतुरंग
10 Nov 2008 - 12:07 am | चतुरंग
वाचतो खचित
त्यातून कोलित
मिळते हातात
पहातरी
उसवी लगेच
ओळ येकयेक
शब्दांची हो फेक
करितो मी
ठरवितो आता
विडंबन नाही
सरळच काही
जमेचिना
पुरे झाले आता
बोरु खाजवणे
कविता चरणे
छान वाटे
पहा मिपावर
असा हा 'रंगा'री
चालवितो आरी
पुन्हा पुन्हा
चतुरंग
10 Nov 2008 - 8:56 pm | लिखाळ
>ठरवितो आता
विडंबन नाही
सरळच काही
जमेचिना<
हा हा हा.. विडंबन छान आहे... :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
-- लिखाळ.
10 Nov 2008 - 11:58 pm | प्राजु
केला लिखाळाने
काव्याचा प्रयास
जमविला खास
ओवी छंद
पहा मिपावर
आला हा लिखाळ
सदासर्व काळ
लिहितसे
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Nov 2008 - 5:02 pm | लिखाळ
काव्यातून दिले
प्रतिसाद तुम्ही
भारावलो आम्ही
अधिकच । :)
-- लिखाळ.