आय पील भाग -२

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
9 Nov 2008 - 8:32 pm
गाभा: 

The problem with I -pill is the way it is presented to population through ad blitz.
It is an implement with its own complications few known today and few not known for now. The biggest of them is its extensive use as contraceptive than remedy to contraceptive failure once in a while. It is used by married/ unmarred couples like an aspirin tablet for headache.
माझा मिपा वरचा वावर सूक्ष्मपणे न्याहाळणार्‍या माझ्या एका डॉक्टर सहकार्‍याचे हे मत. .
....... ह्या औषधाचा उपयोग खालीलप्रमाणे.
१. स्त्री बिज थांबविणे
२.स्त्री बिज असेल तर त्याचा शुक्राणूशी मिलन थांबविणे.
३.मिलन झाल्यास त्याचे गर्भाशयाच्या भिंतीवर रोपण थांबविणे.
ह्या गोळीचा उपयोग ७२ तासानंतर नसतोच.ही गर्भपात गोळी नव्हे.गर्भधारणा झाल्यावर ह्या गोळीचा काही उपयोग नाही.
कंडोम कसा वापरावा हे बरोबर माहित असणार्‍या जोडप्याना ह्या गोळीची गरज लागत नाही. कंडोम ची क्वालीटी बरोबर असेल आणि तो नीट वापरायचे शास्त्र माहीत असेल तर तो फाटेल कसा?
सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवन उपभोगताना त्यातले रुटिनने येंणारी घाई. घाई ने होणारा घात. ऐनवेळी पाकीटाची शोधाशोध हे सर्वात मोठे कारण असावे. लढाईला जाताना शत्रू समोर आल्यावर ढाल शोधण्यासारखे झाले.
लग्न न झालेल्याची कथा तर वेगळी. सगळाच चोरटा कारभार. घाई तर पाचवीला पुजलेली. त्यामुळे होणार्‍या अपघाताची संख्या जास्त.
नवरात्रीत एका दिवसात अनेक वेळा पील घेतलेल्या विरांगना पण असतात.
तरुणाई विक्रमाच्या मागे असते. प्रत्येक वेळी तुच माझा पहिला, तुच माझी पहिली ह्याची ग्वाही दिली जाते. आणि प्रसाद वाटला जातो एच आय व्ही सारख्या भयानक रोगांचा. काही वेळा असे रोग लग्नानंतर डोके वर काढतात होणारी मुले पण अडकतात ह्या जालात.
अर्थात ही गोळी जाहिरातित दाखवतात तशी १००% यशस्वी नसते. ही गोळी घेतल्यामुळे ऍक्टोपीक(नळीमधली गर्भधारणा)होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाजारपेठेत जी उत्पादने मान्यता प्राप्त करतात त्या उत्पादनात तत्कालीन सामाजीक मानसीक मतप्रवाह प्रतीबिंबीत होतो.१)सहज उपल्ब्धता,२) तात्काळ उपयोग ,३) तात्काळ निचरा, या निकषात बसणारी उत्पादनं सध्या सहज खपतात.
आयपील या औषधाबद्दल जेव्हा मी वाचलं तेव्हा तीनही निकष या उत्पादनाला लावून बघीतले.
संतती नियमन या कॅटेगरीत स्वस्तात स्वस्त माला-डी, निरोध , तांबी ही साधी सोपी साधनं उपलब्ध असताना लोकं आय पील सारखी फायर एक्झीट राज मार्गासारखी का वापरतात हा मोठा प्रश्न मला पडला होता.
मालाडी घेणं म्हणजे रोज गोळी घेणं .सातत्याची जबाबदारी ज्यांना नको असते त्यांना ही कटकट
वाटते.सातत्य ही कटकट अशासाठी की की सध्या अनेक कारणांमुळे लैंगीक सबंधच सातत्यानी येत नाहीत/होत नाहीत.
(महीन्यात एकवीस तोफांची सलामी देण्याचे दिवस संपले.)
जर पंधरा दिवसानी एकदा किंवा महीन्यातून एकदा एकत्र येणे होत असेल तर तीस दिवस गोळी का घ्यायची
२ मानसीक तणाव किंवा इतरही काही कारणामुळे उद्दीप्पनाचे त्रास असतात.ऑफीसमध्ये स्वप्नरंजन आणि घरी आल्यावर ऑफीसच्या ताणाने रसभंजन होते. अशा वेळी रॅपर फोडणे, कंडोम तपासणे आणि वापरणे यात जेव्हढा वेळ जातो त्या वेळात शैथील्य येते त्यामुळे कंडोममध्ये हवेचा बुडबुडा राहतो आणि कंडोम फाटतो. ही पुरुषांची समस्या आहे.
३ संतती नियमनाचे इतर नैसर्गीक प्रकार तर बोलायलाच नकोत.त्यात गॅरंटी नसल्यामुळे मानसीक ताणात वाढ होते.
आणि नेमक्या ह्याच कारणांमुळे इमर्जन्सी पिलचा उपयोग रेग्युलर पील सारखा केला जातो.
easy availability, immediate usage, easy disposal या तीन सूत्रत्रयीत आयपील सहज बसतं.
या गोळीचे दुष्परीणाम स्त्रियांना भोगायला लागतात.पुरुष ह्यात अलीप्त राहतात कारण गायनॅक इश्युज मध्ये त्यांना रस नसतो.मासीक धर्माचे लांबणीवर जाणे हा त्रास हार्मोनल ओव्हरडोज मुळे होतो.मनात गर्भधारणेच्या भितीने ताण. इथून पुढे गर्भधारणेची परीक्षा. डॉक्टरकडे जाणे. सोनोग्राफी...वगैरे.साहजीकच चिडचिड,ताणतणाव .एकूण कौटुंबीक स्वास्थ्य बिघडते.

आय-पील चा उपयोग अपवादात्मक परिस्थीतीतच करावा.अपवादाचा नियम होऊ नये.
लक्षात घ्या आपण निसर्गनिर्मीत हार्मोनल समतोल आय-पीलच्या अतीवापराने बिघडवत असतो.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2008 - 8:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगल्या विषयाला सुरूवात केली आहेत (आणि या वेळीस क्रिप्टीक नाही (नसावं?).)

लक्षात घ्या आपण निसर्गनिर्मीत हार्मोनल समतोल आय-पीलच्या अतीवापराने बिघडवत असतो.
हा असमतोल बाकीच्या गोळ्या वापरून नाही का निर्माण होणार? अलिकडेच वाचनात आलं होतं की हॉर्मोन्सचं प्रमाण खूप कमी असणार्‍या गोळ्याही बाजारात यायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ आधीच्या गोळ्या म्हणजे संप्रेरकंच होती का?

टारझन's picture

9 Nov 2008 - 10:40 pm | टारझन

प्रभुदेवा , सर्वप्रथम हाबिणंदण हो ...
याचा फायदा वाचकांना नक्कीच होईल .. व्हायला हवा ... आमचे अल्मोस्ट बरेच मित्र तसे मेडिकल फिल्ड मधे असल्याने किमान कुतुहलते पोटी सर्व गोष्टी फार वर्षांपुर्वीच क्लियर होत्या .... परंतु बरीच बिंडोकं पाहिलीत (अर्थात अविवाहीत पोरंच) सगळी उदाहरणं आपण म्हंटल्याप्रमाणे ... "कंडोम फाटणे= काम फिस्कटणे, राडा होणे " हा तर एक वाक्प्रचार म्हणून वापरला गेल्याचं आठवतय...
उत्तम हाताळणी,योग्य शब्दरचना , मुद्देसुद मांडणी .... अभिणंदण ..

अवांतर : मागे समुपदेशन बिनकामाचं आहे अशा प्रतिक्रिया आल्या होत्या , लोकांना काही गोष्टीत समुपदेशनाची गरज का आहे ते ही समजेल आता ...

-- डॉ.टारझन (बी.ए. लिटरेचर , एम.डी. मेडिसिन , बी.ई.आय.टी., सि.ए. अकाउंट्स)

दिवस असो पाचवा, किंवा विस-पंचविसावा ,
प्रॉब्लेम नाही जबरा
कंडोम वापरूनही जर झालाच राडा
तरच विचार करून टारपिल्स वापरा

विनायक प्रभू's picture

9 Nov 2008 - 8:46 pm | विनायक प्रभू

रिसर्च नंतर झालेली सुधारणा.

ऋषिकेश's picture

9 Nov 2008 - 8:55 pm | ऋषिकेश

या विषयावर मराठीतून इतक्या सहजपणे सच्चे लिखाण केल्याबद्दल अभिनंदन!
यावर अजून माहिती येऊ द्या..

खरंतर अश्या प्रकारचं सदर वृत्तपत्रांत येणें ही काळाची गरज आहे. जी सदरं/लेख वृत्तपत्रांत येतात ती बर्‍याचदा जणु फक्त आंबट शौकीनांसाठी लिहिले असावेत अश्या भाषेत लिहिलेले वाटतात. हा लेख मात्र जसा स्वच्छ आणि सच्चा वाटाला तश्या लेखांची गरज आहे.

अभिनंदन विप्र!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

अवलिया's picture

9 Nov 2008 - 9:00 pm | अवलिया

विप्रसाहेब

नेहमीप्रमाणे तुम्ही एक सुंदर विषय चर्चेला घेतला आहे. आता आय पिल किंवा तत्सम उत्पादनाचे शरीरावर काय परिणाम होवु शकतात याविषयी भाष्य करण्यास मी असमर्थ आहे परंतु ज्यापद्धतीने खाजगी कंपन्यांकडुन याची जाहिरात होत असते ते सुद्धा हे उत्पादन अगदी निर्धोक आहे असे दाखवत ती मोठी चिंतेची बाब आहे हे नक्की.

सरकारी स्तरावर निरोधची केली जाणारी जाहीरात (?) तसेच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातुन याविषयाची नीट माहीती न देणे यामुळे सर्वसामान्य जनतेची दिशाभुल होते त्यामुळे अनेकांना हा उपाय सोपा वाटतो. गावातुन आरोग्य केंद्रातुन वाटले जाणारे कंडोम फुगे म्हणुन पोरे खेळायला वापरतात हे मी स्वतः पाहीलेले असल्यामुळे ह्याविषयी सरकार किती बेफिकीर आहे हे दिसतेच.

त्यामुळे जरी आय पील चे दृष्य वा अद‍ृष्य परिणाम समोर आले तरी जसे तंबाखु बंदीची गरज असतांना तंबाखु तसेच तंबाखुजन्य उत्पादनांवर बंदी घातली जात नाही तसेच काही दिवसांनंतर आयपील च्या माध्यमातुन जमा होणा-या करामुळे सरकारी स्तरावर याची प्रशंसाच केली जाईल असे कुठेतरी वाटते.

तसेच या संततीनियमन तसेच जन्मदर घट या क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्थांकडुन फारशी अपेक्षा करणे चुकीचे राहील कारण त्यांचा अर्थव्यवहार हा खाजगी कंपन्यांच्याच हातात आहे.

असो. बघुया जे जे होईल ते... नाही का?

तसा मला वैयक्तिकरित्या काही उपयोग नाही हो या गोष्टींचा...

नाना

दिलेबद्दल आपले आभार. खरोखरच काही गोष्टीची माहिती नसलेमुळे काय कुठे वापरावे हे लोकाना कळत नाही.
गावातुन आरोग्य केंद्रातुन वाटले जाणारे कंडोम फुगे म्हणुन पोरे खेळायला वापरतात हे मी स्वतः पाहीलेले असल्यामुळे ह्याविषयी सरकार किती बेफिकीर आहे हे दिसतेच
नाना हे एक उदाहरण झाले आमच्या इकडे ग्रामिण भागात लोक हे कंडोम इंजिनची (मग ते गाडीचे असो वा ट्र्क्टरचे) पाईप गळत असेल तर एमसील एवजी वापरतात.अन हा उपाय अगदी परिणाम कारक आहे. आता बोला.
वेताळ

ब्रिटिश's picture

9 Nov 2008 - 10:03 pm | ब्रिटिश

माहितीबद्द्ल आभार
पन रॅपरसकट चॉकलेट खायला सगल्यांना आवरत आस नाय

खारपाडा क्रिप्टिक
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

आज काल जो तो घाईत असतो आणि झालेला लोचा पटकन कसा सेटल होईल याच्या विचारात असतो!!!
प्रबोधन योग्य पध्दतीने होणे गरजेचे आहे...पण ते तसे होत नाही !!!
आजच्या पिढीला शरीराला गोळ्यांचा त्रास होतो या पेक्षा भानगड टाळणे हे महत्वाचे वाटते व तोच सोपा पर्याय वाटतो हे दुर्दैव !!!
बाकी या वेळी डिक्रीप्ट झालेला लेख समजला....
मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

एका महत्त्वाच्या विषयाला सुरुवात. धन्यवाद विप्रकाका!

दे धडक तु बेधडक
अन फोड त्याजला!!
असे थेट लिखाण भिडते आणि पटते!

आय्-पील सारख्या गोळ्यांच्या रांगेत बसणारे बहुतेक सर्व गर्भनिरोधनाचे उपाय हे स्त्रियांच्या शरीराला थेट हानी पोचवणारे असतात कारण ते त्यांच्या हॉर्मोन्सशी खेळ करतात!
हॉर्मोन्सचे असंतुलन म्हणजे स्त्रियांच्या अनारोग्याची नांदी! हे असंतुलन आणि ब्रेस्टकॅन्सर ह्याचाही जवळचा संबंध आहे.
ड्र्ग ऍप्रूवल साठी होणार्‍या क्लिनिकल टेस्ट्समधे ह्यातले बरेचसे प्रकार उघडकीला येणे शक्य नसते कारण होणारे परिणाम हळूहळू आणि दूरगामी असतात आणि मुख्य म्हणजे बहुतांश कायमस्वरुपी असतात!
टेस्ट्स्चा कालावधी त्यामाने काही वर्षांचा असतो तो कमी असतो.
निसर्गचक्रातली कोणतीही ढवळाढवळ ही ह्या ना त्याप्रकारे मानवाच्या जिवाशी बेतते हे आपल्याला ज्यावेळी समजेल तो सुदिन!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

9 Nov 2008 - 11:04 pm | विसोबा खेचर

आय्-पील सारख्या गोळ्यांच्या रांगेत बसणारे बहुतेक सर्व गर्भनिरोधनाचे उपाय हे स्त्रियांच्या शरीराला थेट हानी पोचवणारे असतात कारण ते त्यांच्या हॉर्मोन्सशी खेळ करतात!

रंगाशी सहमत...

अर पण त्यापेक्षा पुरुषांनी सरळ रेनकोटाचा वापर का करू नये?

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Nov 2008 - 11:46 pm | बिपिन कार्यकर्ते

विप्र, चांगला आणि आवश्यक विषय.

या विषयावर लोकांकडे माहिती ना फारशी असते ना मिळवायचे मार्ग. शहरांतून तर माहितीपेक्षा गैरसमजच जास्त असतात. कमीत कमी महाराष्ट्रात तरी रघुनाथराव कर्व्यांसारख्या द्रष्ट्याच्या कार्यामुळे या बाबतच्या प्रबोधनाला खूप लवकर सुरूवात झाली आणि आज बरीच मजल मारता आली. तशी परिस्थिती सगळीकडेच असेल असे नाही. आणि ती नाहियेआहे.तरी पण अजून खूपच प्रबोधनाची गरज आहे, 'दिल्ली काफी दूर है'.

दुर्दैवाने, या नविन नविन रासायनिक साधनांबरोबर येणारे दुष्परिणाम मात्र लोकांसमोर येतच असतिल असं वाटत नाही. बहुधा येत नसावेतच.

ही साधने खरोखरच आवश्याक आहेत. पण विप्र म्हणतात तसे ही साधनं 'फायर एक्झिट' आहेत, 'मेन डोअर' नाहीत.

बिपिन कार्यकर्ते

अभिजीत's picture

10 Nov 2008 - 2:30 am | अभिजीत

चांगला लेख, परिस्थितीचे यथार्थ वर्णन.

- अभिजीत

नीधप's picture

10 Nov 2008 - 8:54 am | नीधप

आय पील चे जे दुष्परीणाम सांगताय ते तर सगळ्या ओसी पिल्स चेही असतातच की.
फुगल्यासारखं वजन वाढणे, गोळी घेत असलेल्या काळात रोजचा रोज गरोदर असल्याप्रमाणे मॉर्निंग सिकनेस, प्रचंड उष्णता हे तात्कालिक तर हार्मोनल इम्बॅलन्स, ब्रेस्ट कॅन्सरच्या शक्यता, पुढे बंद केल्यानंतर अपत्यप्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स इत्यादी दूरगामी परिणाम पण. थोडक्यात काय तर नवीन प्रोजेनी जिथून उत्पन्न होणार तिथले आरोग्य धोक्यात... नवीन प्रजा आरोग्यासहीत निपजणार कशी? आणि नकोच असेल मूल तरी बाईच्या आरोग्याचा प्रश्न उरतोच की. बर २१ दिवस गोळ्या घेतल्या पण एकदाही जवळ आलाच नाहीत तर? उगाचच रिस्क घेतलीत ना? किती हाय प्रोफाईल जॉब्ज असलेली जोडपी जवळ येण्याबाबतीत नियमित असतात? विप्र तुम्हाला यातली रसातळाला गेलेली टक्केवारी माहीतच असेल. असो.. हल्ली गायनॅक्स पण खूप प्रदीर्घ काळासाठी '२१ दिवसाच्या चक्राने घ्यायच्या ओसी पिल्स' हा उपाय नाही हे सांगतात.
तांबी हे प्रकरण काहींना अतिशय वेदनात्मक होऊ शकते. उदाहरणं माहितीयेत.
कॉन्डोम हा सोपा उपाय म्हणला आणि त्यातले वरचे सगळे ऐनवेळेचे घोळ बाजूला ठेवले तरी लॅटेक्स सेन्सटायझेशन हा एक धोका दूरगामी पातळीवर आहेच.
सगळ्यात सेफ उपाय म्हणजे योग्य तारखा किंवा रादर अयोग्य(गर्भधारणेसाठी) तारखा/ दिवस. पण त्यातही बाईचे सायकल जर इर्रेग्युलर असेल तर मोठ्ठे टेन्शन. रेग्युलर सायकलवालीसाठीही ५०% शक्यता आहेच घोळ होण्याची. पण निदान शरीराशी खेळ नाही कुठल्याही प्रकारे.
असो.. तर कुठलंही साधन वापरा दुष्परीणाम आहेतच. तुम्ही किती रिस्क घ्यायची आणि जोडीदाराला घेऊ द्यायची हे दोघांनी मिळून ठरवायचं.

हा पण याचा अर्थ असा नाही की लग्नाआधी कुणी संबंध ठेवूच नयेत. जिथे लग्नच २८-३० पर्यंत होत नाहीत तिथे असं वागणं हे अनैसर्गिकच की.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विसोबा खेचर's picture

10 Nov 2008 - 10:08 am | विसोबा खेचर

हा पण याचा अर्थ असा नाही की लग्नाआधी कुणी संबंध ठेवूच नयेत. जिथे लग्नच २८-३० पर्यंत होत नाहीत तिथे असं वागणं हे अनैसर्गिकच की.

ह मात्र खरं! :)

आपला,
(नैसर्गिक) तात्या.

साती's picture

10 Nov 2008 - 1:38 pm | साती

चांगलं लिहिलंय.
माझ्यामते ज्या स्त्रियांच्या सायकल्स रेग्युलर आहेत त्यांनी शक्यतो सेफ पिरीयड पद्धतच वापरावी.
आय. पिल. ही क्वचित केव्हातरी वापरण्याची (ते ही आपल्या अनवधनामुळे वापरावी लागली तरच)गोळी आहे. तिचा सातत्याने वापर करणे गैरच.

अज्जुका, आता लो डोस गोळ्या आल्यायत त्यामुळे माला डी सारख्या रोज घ्यायच्या गोळ्यांनी होणारे दुष्परिणाम बर्‍याच प्रमाणात कमी होतात. अर्थात पूर्ण खात्री देता येत नाहीच.

अदिती- "याचा अर्थ आधिच्या गोळ्या संप्रेरकच होत्या का?" याचं उत्तर "हो" असं आहे आणि मी अगदी स्त्रीचा जीव जाईपर्यंतची काँप्लिकेशन्स पाहिलीत या गोळ्यांची. तीच गोष्ट "तांबी" नावाच्या प्रकाराची आहे. ज्या बायकांना वैयक्तिक स्वच्छतेची काही माहिती नसते किंवा पाणी, साधने, आडोसा यासारख्या गोष्टी उपलब्ध नसतात त्यांना तांबी बसवून आपण जंतुसंसर्गाच्या धोक्यात लोटत आहोत हेच सरकारी गायनेक लक्षात घेत नाहीत.

"तुम्ही किती रिस्क घ्यायची आणि जोडीदाराला किती घेऊ द्यायची हे दोघांनी मिळून ठरवायचं" हे एकदम बरोबर.
अर्थात त्यासाठीही सुशिक्षित असणं , जोडीदाराची कदर असणं आणि या सगळ्या साधनांच्या फायद्या-तोट्यांची मुलभूत माहिती असणं हे गरजेचं आहे.
साती

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2008 - 2:09 pm | बिपिन कार्यकर्ते

अदिती- "याचा अर्थ आधिच्या गोळ्या संप्रेरकच होत्या का?" याचं उत्तर "हो" असं आहे आणि मी अगदी स्त्रीचा जीव जाईपर्यंतची काँप्लिकेशन्स पाहिलीत या गोळ्यांची. तीच गोष्ट "तांबी" नावाच्या प्रकाराची आहे. ज्या बायकांना वैयक्तिक स्वच्छतेची काही माहिती नसते किंवा पाणी, साधने, आडोसा यासारख्या गोष्टी उपलब्ध नसतात त्यांना तांबी बसवून आपण जंतुसंसर्गाच्या धोक्यात लोटत आहोत हेच सरकारी गायनेक लक्षात घेत नाहीत.

मी खरोखरच हादरलो हे वाचून. खरंच आयुष्य विशेषतः गरीबांचं एवढं स्वस्त झालं आहे? ज्या सरकारी दवाखान्यांवर गावागावातली जनता एवढी अवलंबून असते तिथे अश्या बर्‍याचप्रकारची उदाहरणं दिसतात.

बिपिन कार्यकर्ते

रामदास's picture

10 Nov 2008 - 7:23 pm | रामदास

तुम्हाला काय झालंय?वाचकांचं काही चुकलं असेल तर त्यांना माफ करा.सगळा लेख एका वाचनात समजला.लांछन.
विषय कळल्यानंतर वाटलं होतं की शेवटात तरी काहीतरी किर्र -किर्र बोलाल.पण नाही.(एखादी आय पीलची लावणी तरी आतापर्यंत यायला हवी होती.)

विनायक प्रभू's picture

11 Nov 2008 - 10:23 am | विनायक प्रभू

एक वाचनात समजला ह्याला अपवाद किंवा अपघात समजावा. किर्र्-किर्र कसे करणार मंजुळा बरोबर होती ना.
मी कविता करणार ह्या भितीने जेवण आणि झोप कमी झाली आहे सद्स्यांची. लावणी म्हणजे अत्याचाराची परिसीमा होईल.
ती आपणच करा ना.