गाभा:
नमस्कार मित्रानो.
मला इनवेस्टमेंट .संदर्भात माहिती हवी आहे ती पण मराठीत कारणकी माझया मते सर्व साधारण मराठी कुटुंबात या बद्दल खूप कमी माहिती आहे ती सर्व सामान्य माणसाना कलावी या साठी हा धागा उघडला आहे म्हणून यावर लवकरात लवकर प्रतिसाद द्यावेत ही नम्र विनंती.
गुंतवणूक हा एक अतिशय संवेदनशील विषय असल्याने यावर नकीच मिसळ पाव वर चर्चा होणे आपेखित आहे.
यात गुंतवणुकीचे प्रकार, त्यातील वैविध्या उदा. लिक्विड फंड, शेर मार्केट, डेट फंड, कॅपिटल फंड, बॉन्ड्स, म्यूचुयल फंड, एट्सेटरा. त्यातील फायदे तोटे, एत्यादी माहिती द्यावी.
तसेच त्यावरील मराठीतील पुस्तके, मराठीतील ब्लॉग्स, अर्थविषयक साप्ताहिके, किंवा संदर्भ ग्रॅंता विषयी माहिती द्यावी.
प्रतिक्रिया
12 Jan 2015 - 12:57 am | जयन्त बा शिम्पि
गुंतवणूकीसाठी माझी पहिली पसंत आहे ती म्हणजे पी पी एफ { लोक भविष्य निधी } सुरवातीची मुदत जरी १५ वर्षे असली तरीही वर्षभरात किमान ५०० रुपये आणि कमाल १,५०,०००/- ( १ एप्रिल २०१४ पासुन वाढवलेली मर्यादा )रुपये यात भरता येतात पंधरा वर्षानंतर वाटले तर मुदत आणखी पाच पाच वर्षे वाढविता येते पोष्टासह राष्ट्रीयकरण झालेल्या सर्व बँकेत खाते उघडता येते आयकरात सुट मिळते खाते सुरु केल्यानंतर पहिली सहा वर्षे काहीही रक्कम काढता येत नसली तरीही शक्यतोवर यातून रक्कम काढण्यापेक्षा , भरण्यावरच भर द्य्यावा हे उत्तम दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत रक्कम जमा केली, तर त्या महिन्याचे व्याज खात्यात जमा होते सध्या यात जमा होणार्या व्याजावर ८.५० % टक्के दराने व्याज मिळते महत्वाची बाब म्हणजे या रकमेवर कोर्टाची जप्ती आणता येत नाही म्हणून अधिक सुरक्षित आहे.
मी १९८९ पासून खाते सुरु केले आहे आणि पाच पाच वर्षे वाढवीत , आता इतकी रक्कम गुंतविली आहे कि मला येथुन पुढे दर वर्षी एक लाख रुपये निव्वळ व्याजापोटी मिळत रहातील. पुर्वी एजंट लोकांना कमिशन मिळत असे , आता तेही बन्द केले असल्याने , एजंट याबाबत अधिक माहिती सांगावयास तयार होत नाही
एका व्यक्तीस एकच खाते सुरु करता येते कळत नकळत या खात्यामध्ये धीरे धीरे भरपूर बचत होते आमच्या दहा जणांच्या कुटुंबात नऊ जणांच्या नावे पी पी एफ ची खाती मी सुरु ठेवली आहेत
तेंव्हा बचतीची सुरवात पी पी एफ पासून करावी हे उत्तम
12 Jan 2015 - 3:12 am | hitesh
सहमत.
12 Jan 2015 - 1:28 am | जयन्त बा शिम्पि
ज्यांच्या पगारातून भविष्य निधी { सह वर्गणी द्वारा ) म्हणजे जितकी रक्कम कर्मचार्र्याची कपात केली जाते , तितकीच रक्कम जर मालकाकडून कर्मचार्याच्या खात्यात जमा केली जात असेल तर , रिटायरमेंटला काही वर्षे शिल्लक असतांना साधारण ३ वर्षे अगर ५ वर्षे आपल्याला झेपेल एव्हढी रक्कम , स्वत:ची म्हणुन जादा कपात करुन घेण्याची व्यवस्थापकास लेखी विनंती करावी.त्यामुळे गुंतवणुक तर होते, वर व्याजही मिळू शकते. ही रक्कम सुद्धा सुरक्षित असते
मी शेवटच्या तीन वर्षात रु.३०००/- ते ७०००/ ज्यादा भविष्य निधी मध्ये ( एकतर्फी ) गुंतविली होती, त्यावर मला घसघशीत
व्याज मिळाले,
जर खरोखर गरज नसेल तर , ९०% भविष्य निधी साठी लगेचच अर्ज करु नये. व दहा टक्के सुध्दा मागू नये लक्षात ठेवा तुम्ही अर्ज केला तरच सरकारी यंत्रणा हालते , अन्यथा ती रक्कम तशीच पडून असते रिटायरनंतर मी दोन वर्षापर्यन्त थांबलो आणि घसघशीत व्याज प्राप्त केले आहे
12 Jan 2015 - 12:54 pm | चिनार
जर निवृतीनंतर आपण १० वर्ष पैसे काढलेच नाही तर १० वर्षांचे व्याज मिळते का ?
12 Jan 2015 - 1:22 pm | टवाळ कार्टा
मी पण हाच प्रश्न विचारायला आलेलो
12 Jan 2015 - 1:38 pm | सुनील
नाही.
पूर्वी मिळत असे. गेल्या ४-५ वर्षांपासून त्यांनी भरणा नसेल तर व्याज देणे बंद केले आहे.
12 Jan 2015 - 1:53 pm | टवाळ कार्टा
म्हणजे २० वर्षांनंतरसुध्धा पैसे भरता येतात?
12 Jan 2015 - 2:06 pm | सुनील
समजले नाही.
PF मध्ये पैसे तुम्ही भरतच नाही. कंपनी भरते.
जर कंपनी सोडली तर भरणा बंद होईल. पैसे तसेच राहतील पण त्यावर व्याज नाही मिळणार.
12 Jan 2015 - 2:08 pm | सतिश गावडे
12 Jan 2015 - 2:09 pm | सुनील
बरोबर. मुद्दा तो नाही.
12 Jan 2015 - 2:25 pm | टवाळ कार्टा
आय माय स्वारी...मला PPF बद्दल माहिती विचारायची होती
12 Jan 2015 - 2:52 pm | सुनील
ओके.
PPF मध्ये पहिले १५ वर्षे भरणा करीत रहावाच लागतो.
त्यानंतर ५-५ वर्षांसाठी मुदतवाढ घेत राहता येते. मुदतवाढीत तुम्हाला पर्याय असतो - भरण्यासहित अथवा भरण्याविरहीत. मात्र एकदा एका पद्धतीने मुदतवाढ घेतली की ५ वर्षांपर्यंत त्यात बदल करता येत नाही.
व्याज दोन्ही बाबतीत मिळते.
12 Jan 2015 - 3:13 pm | टवाळ कार्टा
५ वर्षे मुदतवाढ किती वेळा करता येते?
12 Jan 2015 - 3:26 pm | सुनील
होय. कितीही वेळा मुदतवाढ करता येते.
22 Jan 2015 - 8:04 am | ravi bhagwat
मी पूर्वी काम करीत असलेल्या कंपनीमध्ये माझा भविष्य निधी जमा होत असे. आता मी कंपनी सोडली. आता मी सेवा उद्योगात आहे. मात्र निधी तसाच आहे. तो मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज वगैरे उपलब्ध आहे का? असल्यास माहिती द्यावी. नसल्यास निधी मिळविण्यासाठी काय पद्धत आहे याची माहिती द्यावी, ही विनंती.
12 Jan 2015 - 3:29 am | hitesh
बहुतेक ब्यान्कातुन हल्ली सेविंग अकाउंटला एफ एफ डी किंवा स्वीप इन / आउट फ्यासिलिटी मिळते.
त्यामुळे सेविंगच्या पैशावर एफ डी चा व्याजदर मिळतो.
12 Jan 2015 - 10:03 am | चिनार
वर सांगितल्याप्रमाणे पी पी एफ हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित उपाय आहे. जर ३० वर्षांसाठी दरवर्षी १ एप्रिल ला ७०००० रु. गुंतविले तर आपली गुंतवणूक २१००००० एवढी होते. ३० वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला एकरकमी ८४००००० रु . मिळतील. पण पी पी एफ मध्ये पैशे अडकून पडतात आणि गरज असल्यावर काढता येत नाहीत हा एक तोटा आहे .
म्यूचुयल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे . एकरकमी गुंतवणे शक्य नसल्यास Systematic investment Planning (SIP) द्वारा दरमहा गुंतवणूक करावी. मला या गुंतवणुकी द्वारे जवळपास ३०% रिटर्न मिळालेत . गुंतवणूक करण्याआधी अभ्यास जरूर करावा
12 Jan 2015 - 12:03 pm | सतिश गावडे
मी नुकताच एक SIP प्लान एका ब्यांकेकडून घेतला. एका मित्राशी चर्चा केली असता तो म्हणाला की माझा प्लान "रेग्युलर" प्लान असून तुझ्या परताव्याचा काही भाग दलालास जातो. मी म्हटले की मी हे ब्यांकेत जाऊन केले यात दलाल कुठे आला. त्याच्या म्हणण्यानुसार ही ब्यांकेची मखलाशी आहे. रेग्युलर प्लानसोबत दलाल येतो.
त्याने यावर सुचवलेला उपाय म्हणजे मी माझा रेग्युलर प्लान "डायरेक्ट प्लान" मध्ये रुपांतरीत करून घ्यावा.
याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का?
12 Jan 2015 - 12:19 pm | चिनार
तुमच्या मित्राचे म्हणणे बरोबर आहे. "रेग्युलर" प्लान मध्ये आपण त्या म्यूचुयल फंड कंपनीशी दलालाद्वारे व्यवहार करतो . साहजिकच त्याला कमिशन मिळते ( जवळपास ०.५ %). "डायरेक्ट प्लान" मध्ये आपण थेट कंपनीशी व्यवहार करतो.
आता तुम्ही "डायरेक्ट प्लान" मध्ये रुपांतरीत करताना काही आर्थिक नुकसान होते का याविषयी मला माहिती नाही. जर होत असेल तर मी असं सुचवेल की रुपांतर करू नका . मात्र पुढल्या वेळेस काळजी घ्या .
12 Jan 2015 - 12:27 pm | चिनार
Birla Sun Life Frontline Equity Fund - Plan A - Growth
HDFC Equity Fund - Growth
Kotak Select Focus Fund - Grow
SBI Magnum Bluechip Fund - Growth
HDFC Mid-Cap Opportunities Fund - Growth
ICICI Prudential Value Discovery Fund - Growth
ICICI Prudential Dynamic Plan - Gro
Reliance Equity Opportunities Fund - Growth
Axis Long Term Equity Fund - Growth
ICICI Prudential Taxplan - Growth
Reliance Tax Saver (ELSS) Fund - Growth
12 Jan 2015 - 12:34 pm | सतिश गावडे
हे चांगले फंड आहेत का?
मी ICICI Prudential Value Discovery Fund - Growth घेतला आहे.
12 Jan 2015 - 12:50 pm | चिनार
ICICI Prudential Value Discovery Fund - Growth
हा फंड चांगला आहे . त्यातून मला ३८% रिटर्न मिळाले . अर्थात पुढील वाटचाली विषयी सांगता येणार नाही .
ICICI prudential focussed blue chip fund-Growth, Birla Sunlife frontline equity fund-Growth हे सुध्दा चांगले आहेत
12 Jan 2015 - 12:29 pm | सतिश गावडे
माझा एकच हप्ता गेला असल्यामुळे आता होणारे नुकसान हे एकुण नुकसानीच्या तुलनेत खुपच कमी असेल. त्यामुळे हे रुपांतरण मी आताच करून घेईन.
12 Jan 2015 - 12:22 pm | अनुप ढेरे
http://www.valueresearchonline.com/story/22511
12 Jan 2015 - 11:28 am | सुबोध खरे
http://www.jagoinvestor.com/
येथे आपल्याला गुन्तवणुकीबद्दल साद्यंत माहिती मिळेल. वेळ काढून वाचत रहा.
12 Jan 2015 - 12:06 pm | सतिश गावडे
आर्थिक साक्षरतेसाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. त्यांचे स्मार्टफोन ऍप असून त्यात या संकेत्स्थळावरील १०० ताज्या नोंदी उतरवून घेता येतात.
अतिशय साध्या सोप्या भाषेत विविध आर्थिक बाबींवर चर्चा तसेच विश्लेषण असते.
12 Jan 2015 - 12:55 pm | सतिश गावडे
जीवन विमा पॉलिसी ही आर्थिक गुंतवणूक नव्हे. समजा कुणी मनीबॅक किंवा एंडोवमेंट प्रकारातील पॉलिसी गुंतवणूक + विमा अशी घेतली असल्यास त्यातील परतावा अतिशय कमी आहे (साडे तीन चार टक्के)
12 Jan 2015 - 1:47 pm | चिनार
जीवन विमा पॉलिसी ही आर्थिक गुंतवणूक नव्हे.!!!!
१००% मान्य !
पण मानसिक समाधान आणी कुटुंबियाच्या सुरक्षेसाठी जीवन विमा पॉलिसी नक्की काढावी असं माझं मत आहे आणी कुटुंबियांना त्याची कल्पना आणि माहिती द्यावी !
12 Jan 2015 - 2:12 pm | सतिश गावडे
कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी "टर्म पॉलिसी" हा जीवन विम्याचा प्रकार निवडावा.
मनीबॅक आणि एंडोवमेंट प्रकारातील पॉलिसी आपल्या गळयात मारण्याचा प्रयत्न करणार्या एजंटना फाटयावर मारावे. जो पैसा आपण मनीबॅक आणि एंडोवमेंट पॉलिसीत टाकणार असू तो गुंतवणुकीच्या इतर चांगल्या पर्यायात टाकावा.
12 Jan 2015 - 1:56 pm | गवि
..लहान आकाराच्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करायची असल्यास कुठे जास्तीतजास्त वाव आहे?
(सध्या किंमत कमी आणि चांगले वाढीचे पोटेन्शियल)
साधारण दरही माहीत असल्यास शेअर करावेत आपापल्या गावातले.
टुरिस्ट लोकेशन्समधे घर घेणे हे बरे की तापदायक?
12 Jan 2015 - 2:07 pm | hitesh
या हिकडे.
बेलापुर - उरण - जे एन पी टी
12 Jan 2015 - 2:15 pm | गवि
..आधीच वाढून बसलेत ना रेट्स..
:(
12 Jan 2015 - 2:31 pm | hitesh
नाय हो. अजुन बेसलाइन किमती हैत.
दहा लाख.. एक गुंठा प्लॉट
http://www.misalpav.com/node/29565
वन आर के .. सात लाख
12 Jan 2015 - 3:21 pm | सिरुसेरि
म्यूचुयल फंड बद्दल काही शंका -
माझे काही सिप म्यूचुयल फंड चालु आहेत . आता मला १ ,२ डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड सिप चालु करायचे आहेत . तर त्यासाठी चांगले डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड कसे ठरवायचे / निवडायचे ? सध्या कोणते डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड चांगले आहेत ? डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड यामध्ये सिप पर्याय का लम्प्सम पर्याय चांगला ?
जीवन विमा पॉलिसीमध्ये माझी मनीबॅक पॉलिसी गेली १० वर्षे चालु आहे . तर आता त्यातुन बाहेर पडता येइल का ?
12 Jan 2015 - 3:43 pm | चिनार
http://www.moneycontrol.com/
इथे बऱ्यापैकी माहिती मिळेल
12 Jan 2015 - 4:18 pm | सामान्य वाचक
म्हणजे काय
Mf मधे ग्रोथ आणि dividend ऐसा पर्याय असतो. जर दर वर्षि पैसे ( व्याजा प्रमाणे ) लागणार नसतील तर ग्रोथ पर्याय घ्यावा. कारण dividend दिला की काही % administrative charges म्हणून वाजा होते. ग्रोथ मधे तुम्हला गरज असेल तेंव्हा आणि तेव्हढि यूनिट्स तुम्ही विकू शकता
12 Jan 2015 - 5:08 pm | सतिश गावडे
होय.
जीवन विमा पॉलिसीमधून केव्हाही बाहेर पडता येते. पर्याय साधारणपणे असे असतात:
१. तीन वर्षांचे हप्ते पुर्ण भरावयाच्या आत बाहेर पडल्यास आपली पॉलिसी बंद होते. आपल्याला काहीही मिळत नाही. तीन वर्ष भरलेले हप्ते वाया जातात.
२. दुसरा पर्याय पॉलिसीचे हप्ते तीन वर्ष भरुन नंतर पॉलिसी बंद करता येते. यात पहिल्या वर्षी भरलेले विम्याचे हप्ते विमा कंपनी एजंटचे कमिशन तसेच इतर चार्जेस म्हणून पुर्णपणे कापून घेते. आणि उरलेल्या पैशांच्या विशिष्ट टक्के रक्कम आपल्याला मिळते. पॉलीसी तीन वर्षांनंतर लगेच बंद केल्यास ही रक्कम आपण तीन वर्ष भरलेल्या हप्त्यांच्या एकुण रकमेच्या तुलनेत नगण्य असते.
३. तिसरा पर्याय असतो पॉलिसी पेड अप करणे. यात तीन वर्षांपर्यंत पॉलिसीचे हप्ते भरुन नंतर केव्हाही हप्ते भरणे बंद करायचे. आणि भरलेले पैसे पॉलिसीचा कालावधी पुर्ण होईपर्यंत विमा कंपनीकडेच ठेवायचे. असे केल्याने पॉलिसी "पेड अप" आपोआप अवस्थेत जाते मध्ये जाते. पेड अप पॉलिसीवर भरलेल्या हप्त्यांच्या प्रमाणात रिस्क कव्हर मिळते. आणि पॉलिसीची मुदत संपताच ती पॉलिसी मनी बॅक किंवा एंडोव्हमेंट पॉलिसी असल्यास भरलेल्या हप्त्यांच्या प्रमाणात पैसे मिळतात.
या तिन्ही प्रकारात विमा कंपनीचा लॉयल्टी बोनस मिळत नाही.
तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये "पॉलिसी टर्मिनेशन" चा क्लॉज असेल. किंवा विमा कंपनीला फोन करुन त्यांना पॉलिसी क्रमांक सांगून ती पॉलिसी बंद करायची असल्यास कोनते पर्याय आहेत ते विचारा.
** ही सर्वसाधारण माहिती आहे. पॉलिसी टर्मिनेशनचे क्लॉजेस विमा कंपनी आणि पॉलिसीनुसार बदलू शकतात. नेमक्या माहितीसाठी विमा कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करणे.
12 Jan 2015 - 4:32 pm | सामान्य वाचक
सर्व साधारण पणे १०० - तुमचे वय = जी संख्या येईल तेव्हडी % गुंतवणूक मार्केट मध्ये ( म्हणजे जास्त जोखीम आणि जास्त परतावा) . मार्केट म्हणजे शेअर्स , मुचुअल फंड etc
उरलेली गुंतवणूक सुरक्षित, जसे कि बँक मुदत ठेवी, पोस्ट, PPF etc मध्ये, जिथे परतावा तुलनेने कमी, पण जोखीम पण खूपच कमी असते.
हा अर्थातच जनरल नियम आहे. तुमच्या जोखीम घेण्याच्या हिंमती प्रमाणे हे सूत्र बदलू शकते.
मुच्युअल फंड निवडताना शक्यतो sector फंड टाळावेत . कारण इकोनॉमी ची नस सापडणे कठीण असते. म्हणजे कुठला सेक्टर वरती जाइल , हे भाकित अवघड असते. त्यामुळे diversified फंड निवडावेत .
12 Jan 2015 - 4:42 pm | चिनार
उत्पन्नाच्या साधारण किती % गुंतवणूक असावी ?
12 Jan 2015 - 4:51 pm | सामान्य वाचक
जास्तीत जास्त
12 Jan 2015 - 4:38 pm | सामान्य वाचक
शक्यतो sip हा पर्याय चांगला . कारण त्यामुळे आपली गुंतवणुक सरासरी ने होते.
आपण एकदम मोठी रक्कम गुंतवली आणि त्यानंतर मार्केट पडले तर आपले नुकसान जास्त होते. ते SIP मध्ये कमी होते कारण तुम्ही थोडी थोडी रक्कम ठराविक काळाने गुंतवता . त्यामुळे सरासरी वर गुंतवणूक होते
12 Jan 2015 - 5:06 pm | शिद
चांगली चर्चा.
वाचत आहे व वाचनखूण साठवली आहे.
12 Jan 2015 - 5:38 pm | नगरीनिरंजन
खूपच माहितीपूर्ण सल्ले आहेत. पण गुंतवणूक म्हणजे भविष्याचा विचार. त्यामुळे भविष्यात काय होऊ शकते त्याचा सध्याच्या ट्रेंडवरुन अदमास बांधला पाहिजे आधी. पुढची पंचविस वर्षे गेल्या पंचवीस वर्षांसारखीच असतील असे नाही. त्यामुळे येत्या पंचवीस वर्षात काय-काय होऊ शकते ते ढोबळ मानाने कोणी सांगू शकेल काय?
12 Jan 2015 - 6:01 pm | सामान्य वाचक
कारण भले भले तत्ज्ञ्य भविष्यात काय होणार हे नक्की सांगू शकत नाहीत त्यामुळे असे गृहीत धरू कि भविष्य काल हा सर्व साधारण असेल. जर काही फार वेगळे , जसे कि तिसरे महायुद्ध, घडले तर तसे हि आपल्या प्लानिंग चा काहीही उपयोग नाही.
dont put all eggs in one basket , हे कायम लक्षात ठेवावे.
साधारण गुंतवणूक ३ भागात करावी
० - ५ वर्षे : शोर्ट टर्म
५ ते १५ वर्षे : मिडीयम टर्म
१५ ते पुढे : लॉंग टर्म
12 Jan 2015 - 8:17 pm | चित्रार्जुन
.
12 Jan 2015 - 9:17 pm | आजानुकर्ण
स्कॉट अॅडम्स (dilbert.com) यांचा खालील सल्ला उत्तम आहे.
Everything you need to know about financial planning*
Make a will.
Pay off your credit cards.
Get term life insurance if you have a family to support.
Fund your 401(k)/IRA/PF 1 to the maximum.
Buy a house if you want to live in a house and you can afford it.
Put six months’ expenses in a money market fund.
Take whatever money is left over and invest 70% in a stock index fund and 30% in a bond fund through any discount broker and never touch it until retirement.
1. PF/PPF चा पर्याय अमेरिकेतील 401(k) आणि IRA सारखाच आहे.
12 Jan 2015 - 10:25 pm | चित्रार्जुन
च्रर्चा छान चालु आहे, पण मराठितील पुस्तके सुचवलितर खुप छान..
"आर्थिक साक्षरतेसाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. त्यांचे स्मार्टफोन ऍप असून त्यात या संकेत्स्थळावरील १०० ताज्या नोंदी उतरवून घेता येतात. अतिशय साध्या सोप्या भाषेत विविध आर्थिक बाबींवर चर्चा तसेच विश्लेषण असते."
कुठला अॅप जरा लिन्क देता का?
12 Jan 2015 - 11:39 pm | सतिश गावडे
अँड्रॉईड अॅप इथे आहे.
13 Jan 2015 - 9:44 pm | योगेश९८८१
८०'c करिता ४ दिवसांपूर्वी MF - axis bank long term ELSS - growth मध्ये १,००,०००/- गुंतवणूक केली आहे. मला त्यांनी सांगितले कि lumpsum तुमच्यासाठी जास्त योग्य पर्याय आहे कारण SIP मध्ये तुम्हाला ८०'c tax बेनिफेत मिळणार नाहि (विश्वास ठेवला) मी PPF मध्ये हि २५K टाकले आहेत.
share बाजारात सुद्धा गुंतवणूक करण्याची इच्चा आहे (स्वतः deal). मागच्या वर्षी मोठ्या उत्साहात एका नामांकित बँकेत ट्रेडींग खात पण चालू केल पण नीट माहित नसल्याने १ वर्षात बंद केल. (काही न करता :( ) सुरुवातीला शिकण्यासाठी का होईना पण ३००० - ५०००/- नुकसान सुद्धा मला चालेल … पण नक्की सुरुवात कुठून आणि कशी करायची तेच काळत नाही. त्या बद्दल थोड मार्गदर्शनाची अपेक्षा ….
13 Jan 2015 - 9:52 pm | अनुप ढेरे
सुरुवातीला One up on wall street हे पुस्तक वाचा, छान आहे.
13 Jan 2015 - 9:53 pm | टवाळ कार्टा
मी पण याच्याच शोधात आहे
13 Jan 2015 - 10:17 pm | आजानुकर्ण
ही चुकीची माहिती आहे. त्या एजंटने कमिशनसाठी चुकीची माहिती दिली आहे. एसआयपी हे काही वेगळे प्रॉडक्ट नाही. पैसे गुंतवणुकीचे डिस्ट्रीब्युशन आहे. याच न्यायाने मग पीपीएफवरील फक्त एकाच हप्त्यावर ८०-सी चा फायदा मिळाला पाहिजे.
SIP चा प्रत्येक हप्ता वेगळी गुंतवणूक समजली जाते व ELSS साठी ह्या प्रत्येक हप्त्यातून मिळालेले युनिट्स ३ वर्षे रिडीम करता येत नाहीत. मात्र प्रत्येक हप्ता हा ८०-सी साठी पात्र आहे.
13 Jan 2015 - 11:06 pm | श्रीगुरुजी
>>> ट्रेडींग खात पण चालू केल पण नीट माहित नसल्याने १ वर्षात बंद केल. (काही न करता ) सुरुवातीला शिकण्यासाठी का होईना पण ३००० - ५०००/- नुकसान सुद्धा मला चालेल … पण नक्की सुरुवात कुठून आणि कशी करायची तेच काळत नाही. त्या बद्दल थोड मार्गदर्शनाची अपेक्षा ….
नवीन गुंतवणूकदार असाल तर सुरवातीला २-३ वर्षे फक्त ब्ल्यू चीप शेअर्समध्येच गुंतवणू़क करा. टाटांच्या बहुतेक कंपन्या (टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा टी, टाटा केमिकल्स, टाटा स्टील इ.) तसेच मारूती-सुझुकी, हीरो होंडा, बजाज, इन्फोसिस, लार्सन अॅण्ड टूब्रो, स्टेट बँक, कोल इंडिया इ. कंपन्या कायमच नफा मिळवून देतात. कधीकधी काही काळ यांच्या शेअर्सचा भाव कमी होतो, परंतु काही काळातच तो उसळी घेऊन वर येतो.
या कंपन्यांच्या भावावर रोज लक्ष ठेवा. प्रत्येक कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा सर्वाधिक व सर्वात कमी भाव दिलेला असतो. खरेदी करताना शक्यतो ५२ आठवड्यातील सर्वात कमी भावाच्या जवळ खरेदी करा व विकताना शक्यतो सर्वात जास्त भावाच्या जवळ विका. येस बँक व अॅक्सिस बँक या खाजगी बँकांचे शेअर देखील चांगला नफा मिळवून देतात.
खूप जास्त कंपन्यात गुंतवणू़क करू नका. उदा. टीसीएस किंवा इन्फोसिस, मारूती, येस बँक किंवा अॅक्सिस बँक, स्टेट बॅन्क ऑफ इंडीया, हीरो होंडा किंवा बजाज, लार्सन अॅण्ड टूब्रो अशा मोजक्याच ५-६ कंपन्यात गुंतवणूक करा. एका कंपनीत स्वतःच्या बजेटप्रमाणे २५-५० हजारापेक्षा जास्त गुंतवणूक नको. चांगल्या फायद्यासाठी एकूण किमान सव्वा ते दीड लाख रूपयांचे शेअर्स असावेत. त्यावर एका वर्षात २०-३० टक्के नफ्याचे लक्ष्य असावे. वरील कंपन्या मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप चांगल्या आहेत. वरील कंपन्यात १-२ महिन्यात २० हजाराचे ३० हजार होणार नाहीत. परंतु १-३ वर्षाच्या अवधीत २० हजाराचे नक्कीच ३० हजार किंवा जास्त होतील व या व्यतिरिक्त थोडा लाभांश सुद्धा मिळेल. नशीब चांगले असल्यास बोनस शेअर्स किंवा शेअरचे विभाजनसुद्धा होईल.
सध्या टीसीएस, इन्फोसिस, एल अॅण्ड टी, मारुती इ. कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात बर्यापैकी वाढण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी शेअर बाजाराचा इंडेक्स खूप उतरला असेल, त्या दिवशी हे किंवा वर नमूद केलेले शेअर्स जितक्या कमी भावात मिळतील तितक्या कमी भावाला खरेदी करा.
शेअर बाजारात रोज किंवा दर आठवड्याला शेअर खरेदी केलेच पाहिजेत किंवा विकलेच पाहिजेच असे नसते. मात्र रोज नियमित दिवसातून अनेक वेळ भावावर लक्ष ठेवा. मनीकंट्रोलच्या साईटवर स्वतःचा पोर्टफोलिओ बनवून ठराविक कंपन्यांचे शेअर्स कायम बघता येतात. इक्विटीमास्टर वर देखील असेच करता येते. तुम्हाला ज्या कंपन्यांवर लक्ष ठेवायचे आहे त्या कंपन्यांचा पोर्टफोलिओ बनवून रोज अनेकवेळा भाव बघत रहा व ज्या दिवशी भाव खूप पडले असतील तेव्हा चटकन खरेदी करा.
एकदम गुंतवणूक टाळा. कमीतकमी १ शेअर घेतला तरी चालतो. समजा आज इन्फोसिसचा एक २०८९ रूपयांना मिळाला. २-३ दिवसांनी अजून ५ शेअर्स कदाचित २०८० किंवा कमी भावात मिळतील. असे करून काही दिवसांनी तुमच्याकडे अंदाजे ३०,००० रूपये गुंतवून सरासरी २०७० किंवा अशाच भावाने घेतलेले १५ शेअर्स असतील. जेव्हा भाव १०-१५ टक्क्यांनी वाढेल तेव्हा विकून टाका किंवा पैशाची लगेच गरज नसेल तर न विकता अजून भाव वाढण्याची वाट बघा.
14 Jan 2015 - 2:06 am | काळा पहाड
याचं कारण सांगू शकाल? मला वाटतं की डायव्हर्सीफाईड गुंतवणूक चांगली असते. मी जर प्रत्येक सेक्टरचे २ (उदा: फार्मा, आयटी, इन्फ्रा, ऑटो आणि बँकींग) अशा १० कंपन्यात १५००० गुंतवले तर धोका वाटला जाणार नाही का?
14 Jan 2015 - 10:57 am | असंका
एकदम एवढ्या जास्त कंपन्यांच्या शेअरकडे लक्ष ठेवणे अवघड असते...शिवाय त्यांनी तो सल्ला नवख्या माणसासाठी दिला आहे. पाच सहा कंपन्या - वेगवेगळ्या सेक्टरमधल्या असल्या म्हणजे सुद्धा पुरेसे वेल डायव्हर्सिफाइड झाले.
14 Jan 2015 - 12:25 pm | श्रीगुरुजी
+१
बरोबर. हा सल्ला नवख्या गुंतवणुकदारासाठी आहे. अनुभवी गुंतवणुकदार वेगवेगळ्या सेक्टरमधल्या १५-२० कंपन्यात गुंतवणुक करतो. २-३ वर्षे शेअरबाजाराचा अनुभव घेतल्यानंतर आपोआप इतर गुंतवणूकयोग्य कंपन्या सापडायला लागतात. तोपर्यंत तरी सावध गुंतवणूक करावी.
14 Jan 2015 - 10:29 am | चिनार
ज्यांना शेअर बाजाराचे ज्ञान नाही त्यांनी म्युचूअल फंड मध्येच जास्त गुंतवणूक करावी . मी सुद्धा त्यापैकीच एक !!
ज्ञान असलं तरी बाजाराविषयी अचूक आडाखे बांधणं भल्याभल्यांना जमत नाही.
PPF मध्ये गुंतवणूक जरूर करावी .
13 Jan 2015 - 10:05 pm | प्रसाद भागवत
गुंतवणुकीचे मुल्यमापन करताना विचारांत घ्यावयाच्या सुरक्षीतता, तरलता आणि परतावा या कसोट्यांचा तौलनिक विचार करायला हवा आणि PPF हा यातील तरलता आणि परतावा या दोन्ही बाबतीत पुर्णतः असमाधानकारक पर्याय आहे. थोडे स्पष्ट्च सांगावयाचे तर सर्वसामान्य गुंतवणुकदाराने या पर्यायाचा अजिबात विचार करु नये असे माझे मत आहे.( खाते जरुर उघडावे, प्रतिवर्षी ५०० रु. ही गुंतवावेत, यापेक्षा जास्त नको.) जप्ती येत नाही....या मुद्द्यास अवास्तव महत्व देण्याचे कारण नाही.
मध्यंतरी मीच लिहिलेल्या धाग्यावर या विषयाची चर्चा सुरु झाली होती परंतु वेळेअभावी मी PPF का नको याविषयीची प्रतिक्रिया लिहु शकलो नाही. नंतर एकेदिवशी PPF ने शेअर बाजाराच्या निर्देशांकापेक्षा अधिक परतावा दिल्याचे प्रतिपादन करणारा एक लेख ईकॉनॉमिक्स टाईम्स मधे छापुन आल्याने पुन्हा या विषयला उकळी फुटली. त्याचा साधार प्रतिवाद करणारे लेखही आले, यामुळे मीही याविषयीची आकडेवारी गोळा करित असताना नेमके याच वेळी SBI आणि HDFC म्युचुअल फंडांकडुन या विषयावर वेगवेगळी पण अतिशय निर्णायक स्वरुपाची सादरीकरणे झाली ज्यातुन PPF हा एक गुंतवणुक पर्याय म्हणुन कसा निष्प्रभ आहे हे कळते.
अगदी PPF प्रमाणेच करबचत करणारी ELSS नावाची दुसरीही योजना अस्तित्वात आहे. भारतांतील किमान 20 फंडाच्या ELSS योजनांची 2,3,5,7,10,12 अशा वेगवेगळ्या कालावधीकरिता PPFमधील गुंतवणुकीबरोबर केलेली तुलना माझ्या संग्रही आहे ज्यातुन असे दिसते की या 20 च्या 20 ही योजनांनी बहुतेक सर्व वेळा PPF पेक्षा खुपच सरस परतावा दिला आहे.
मी एक व्यावसायिक गुंतवणुक सल्लागार असल्याने व फंड व्यवस्थापकांनी अतिशय अभ्यासाने केलेली अशी सादरीकरणे वा माहिती जाहीरपणे देणे कितपत योग्य आहे हे माहित नसल्याने येथे देण्याचे मी टाळतो आहे मात्र माझ्या prasadbhagwat@vsnl.net या मेलवर संपर्क केल्यास मी या विषयीची आणि अन्यही माहिती देवु शकेन.
13 Jan 2015 - 10:22 pm | hitesh
पी पी एफ बद्दल नकारात्मक लिहिताय म्हणज तुम्ही कसले तरी एजंट आहात ही शंका तुमचा पेअतिसाद शेवट्पर्यंत वाचल्यावर खरी ठरली.
तुम्ही दहा लोकाना दहा फंड सांगितले तर ते सगळेच पीपीएफ पेक्षा फायद्याचे ठरतील का ? कुठला तरी एक फंड आउअटपर्फॉर्मर ठरला तर त्याची फूटपट्टी कर्य्न पी पी एफ ला क्षुल्लक ठरवणे योग्य नव्हे
14 Jan 2015 - 10:26 am | प्रसाद भागवत
PPF चे वस्तुनिष्ठ मुल्यमापन करणे एवढे महाभयंकर पाप असेल याची कल्पना नव्हती. व्यासायिक सल्लागाराने एजंटगिरी केलीच पाहिजे असा नियम आहे हे ही ठावुक नव्हते.
"तुम्ही दहा लोकाना दहा फंड सांगितले तर ते सगळेच पीपीएफ पेक्षा फायद्याचे ठरतील का ? कुठला तरी एक फंड आउअटपर्फॉर्मर ठरला तर त्याची फूटपट्टी कर्य्न पी पी एफ ला क्षुल्लक ठरवणे योग्य नव्हे....................." मी येथे २०पेक्षा अधिक फंडांचा संदर्भ देवुन या 20 च्या 20 ही योजनांनी बहुतेक सर्व वेळा PPF पेक्षा खुपच सरस परतावा दिला आहे असे लिहिले आहे.... या वाक्याचा अर्थ लागणे एवढे कठीण आहे हे ही नव्यानेच कळले.
आता खुलासा करावयासच हवा की मी PPF योजना विकणारा एजंट ही आहे. ईच्छुकांनी संपर्क करावा.
एकुणातच कसलाही अभ्यास न करता अतार्किक युक्तीवाद करण्याचे, आणि झापडबंद विचारांच्या अधीन जावुन अतिशय ठाम मते बनविण्याचे कौशल्य आत्मसात करावयाला हवे तर.
14 Jan 2015 - 10:35 am | चिनार
प्रसाद भागवत सर ,
आपलं म्हणणं पटत असलं तरी "mutual funds are subjected to market risk" या वाक्याची भीती वाटते. पुढील पाच वर्षात बाजार उच्चांकाचे विक्रम गाठेल असं तज्ञ म्हणतात. याविषयी आपलं मत काय ?
14 Jan 2015 - 10:44 am | काळा पहाड
व्यावसायिक सल्लागारांबद्दल लोकांचं एवढं नकारात्मक मत का आहे ते वरील एसआयपी ला ८० सी लागू होत नाही वगैरे सल्ले देणार्यांबद्दल अनुभवातून स्पष्ट व्हावं. बाकी पीपीएफ ला एजंट असण्याची गरज काय आहे? एसबीआय मध्ये खातं उघडायचं आणि पैसे भरायचे एवढं सरळ आहे. तीच गोष्ट म्युच्युअल फंडाबद्दल. direct म्युच्युअल फंड हे एजंट द्वारे विकल्या जाणार्या म्युच्युअल फंडापेक्षा चांगला परतावा देतात ही गोष्ट बर्याच लोकांना ठाऊकच नसते. एकूणच एजंट ही संकल्पना आता कालबाह्य होत आहे.
14 Jan 2015 - 11:07 am | मराठी_माणूस
पीपीएफ मध्ये परताव्याची १००% गॅरंटी आहे, ती म्युचुअल फंडामध्ये आहे का ? तसेच व्याज कर मुक्त असल्यामुळे फायदा दर्शनी दिसणार्या व्याज दरा पेक्षा जास्त असतो.
14 Jan 2015 - 12:15 pm | सुबोध खरे
http://www.personalfn.com/knowledge-center/financial-planning/tutorials/...
इ एल एस एस मध्ये सुद्धा मिळणारे डिव्हिडंड आणि होणारा क्यापिटल गेन करमुक्त आहे. पण इ एल एस एस मधून तुम्हाला पैसे पाहिजेत त्यावेळेस जर बाजार पडलेला असेल तर परतावा बराच कमी होऊ शकतो ( अर्थात बाजार वर असेल तर तो बरच जास्त असू शकतो)
शहाणी माणसे मध्यम मार्गी असतात म्हणजे अर्धे पैसे भविष्य निर्वाह निधीत आणि अर्धे इ एल एस एस मध्ये टाकतात असे आढळून आले आहे.
शेवटी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे खरे.
13 Jan 2015 - 10:24 pm | hitesh
इ एल एस एस बद्दल वेगळा लेख लिहावा
14 Jan 2015 - 1:56 am | सुहास
म्युच्युल फंडच्या सिस्टेम्याटि़क इन्वेस्टमेन्ट प्लान सारखाच शेअर्समध्ये गुंतवणूकीसाठी सिस्टेम्याटि़क ईक्विटी प्लान सुद्धा असतो.. तुम्ही यात शेअर्स आणि ईटीएफ मध्ये गुंतवणूक करू शकता. परतावा उत्तम मिळण्यासाठी गुंतवणूक डायव्हर्सिफाय करावी, टारगेट ठेवून गुंतवणूक करावी, सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नयेत आणि आपली तोटा सह्न करायची क्षमता लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी.
14 Jan 2015 - 11:33 am | सामान्य वाचक
मुळात PPF आणि मुच्युअल फंड यांची तुलना अस्थानी आहे . MF मधली गुंतवणूक हि जोखिमी चीच आहे. आणि PPF मधली बिन जोखिमी ची.
पण M F हे कायम PPF पेक्षा जास्त परतावा देतात हे खरे आहे. पण जोखीम हि जास्त आहे. मुद्दल देखील बुडू शकते जे PPF मध्ये होणे नाही
त्यामुळे तुमचे पैसे विभागून ठेवावे. इथे १०० - तुमचे वय , हा थम्ब रूळ वापरावा . किंवा ८०- तुमचे वय, हा थोडा जास्त सुरक्षित नियम
थोडे MF मध्ये, काही PPF मध्ये, काही debt फंडात , काही बँक FD , काही सोने इत्यदि.
सोने हा देखील एक अत्यावश्यक भाग आहे गुंतवणुकीचा . liquid asset म्हणून
14 Jan 2015 - 12:16 pm | सुबोध खरे
+१००
14 Jan 2015 - 1:22 pm | प्रसाद भागवत
धोका किंवा जोखीम ही कल्पनाच मुळात कालसापेक्ष/ व्यक्तीसापेक्ष आहे. काच ही पारदर्शक आहे किंवा नाही या प्रश्नाप्रमाणेच. वॉरेन बफेट त्यांनी म्हटलेच आहे की गुंतवणुकदारांसाठी घरामधील केलेली गुंतवणुक बहुधा फायद्याची ठरते कारण ते त्यांच्याकडील चांगले शेअर्स घराप्रमाणे दीर्घ्काळ बाळागत नाहीत.
येथेही PPF एवढा दीर्घकालीन विचार केला तर आकडेवारीनिशी सिद्ध करता येते की असे एक दोन नव्हे तर डझनावारी चांगले फंड्स आहेत ज्यानी तुलनात्मक खुप अधिक परतावा दिला आहे. आणि ही गोष्ट जर गेल्या 10/12/15 वर्षांत 100 पैकी 97/98/99 वेळा तावुन सुलाखुन तपासुन बघीतली गेली अहे तर आपणच असे काय पाप केले आहे की आपण म्युचुअल फंड्स मधे गुंतवणुक केली आणि परिस्थिती उलटली ??...कोणतीही मोठी शस्रक्रिया करताना आपण संभाव्य धोक्याची कल्पना आहे वगैरे 'डिक्लरेशन' देतोच ना की त्याकडे पाहुन शस्रक्रिया टाळतो. रस्त्यावर प्रवासात अपघात होण्याचा धोका आहे म्हणुन आपण ते टाळतो का??
उत्तम दर्जाचे, निर्देशांकात महत्वाचे स्थान असलेले,भरपुर लाभांश देणारे असे शेअर्स समविष्ट असणारी योजना दीर्घकाळांत PPF/NSE/FD अशा पर्यायांपेक्षा उजवे रिटर्न्स का देइल याची अन्य ही अतिशय तर्कशुद्ध कारणे आहेत.
अनेक परिसंवाद, कार्यशाळंमधुन आलेल्या अनुभवांतुन खात्रीने सांगतो गुंतवणुक दारांनी घेतलेल्या धोक्यामुळॅ झालेल्या नुकसानाईतकेच (किंबाहुन जास्त) नुकसान धोका न पत्करण्यानेही होतेच की. "अरे चांगला मोक्याचा प्लॉट मिळत होता रे २५,००० रुपयांत, २/४हजाराची धवपळ केली असती ना तर भाड्यावर जगलो असतो रे आरामशीर" हे असे संवाद ऐकले नाहीत का कधी ??
तेंव्हा उगीच साप साप म्हणुन भुई धोपटण्याने काहीही होणार नाही याची जाणीव बाळागावी ,कधी धोका न पत्करणे हीच सर्वाधिक धोकादायक गोष्ट आहे हेच खरे.
15 Jan 2015 - 12:52 am | चित्रार्जुन
शेअर मारकेत वर अ ब पासुन ज्ञ प्र्यन्त माहिती असणारी दैली सोप काडाकि?
15 Jan 2015 - 9:40 am | सतिश गावडे
एचडीएफसीच्या "फिक्स्ड डीपॉझिट स्वीप इन" आणि "सुपर सेव्हर" या सुविधांबद्दल कुणी अधिक सांगू शकेल काय?
15 Jan 2015 - 1:42 pm | प्रसाद भागवत
गावडे साहेब,तसे जवळच रहातो आपण,पायधुळ झाडावी एकदा... मग चर्चा करु निवांतपणे. काय म्हणता??
15 Jan 2015 - 9:37 pm | सतिश गावडे
जरुर भेटूयात काका.
15 Jan 2015 - 8:02 pm | आदिजोशी
सामान्य (माझ्यासारख्या) लोकांचं शेअर बाजाराविषयी असणारं अज्ञान, पैसे कमावण्याचे मर्यादित स्त्रोत, कुठल्याही प्रकारच्या परताव्याची न मिळणारी हमी ह्या आणि अशा काही कारणांमुळे लोकं शेअर बाजारात पैसे गुंतवायला बिचकतात.
मी आज एक एफडी केली की मला किती पैसे मिळणार हे लिहून, बँक मॅनेजरच्या सही सकट मिळते. सरकारी पर्यायांमधे टाकलेले पैसे बुडणार नाहीत ह्याची खात्री असते म्हणून ते पर्याय माझ्यासारख्यांना शेअर्स पेक्षा जवळचे वाटतात. 'आजपर्यंत नाही बुडाले, पण नेमके मी टाकले आणि बुडाले तर?' असा मराठी मध्यमवर्गीय विचार मनात असतो. आणि अशा प्रकारच्या गुंतवणुकींमधे पूर्वी फसवणूक झाल्याचा अनुभवही जमेस असतो. पहिल्या हफ्त्यातून १५ हजार रुपये आधी न कळवता कापून घेतल्याचा अनुभव स्वतः घेतला आहे. तोच रिकव्हर व्हायला २ वर्ष गेली.
तुम्ही ह्या धंद्यात आहात म्हणून तुम्हाला हे सवयीचे आहे. इतरांना नाही. त्यामुळे ज्यांना त्या बद्दल साशंकता आहे त्यांची आणि सेफ गुंतवणूक पर्यायांची हेटाळणी करू नका. सगळ्यांचाच उद्देश घसघशीत नफा मिळवणे नसून काही जण पैसा सुरक्षीत रहावा म्हणूनही असे पर्याय निवडतात हे लक्षात ठेवा.
मला नकोय वर्षाला ४०% परतावा म्हणून मी मूर्ख, गाढव आणि अगदीच ह्या... ठरत नाही. धोपट मार्गाने जाणार्यांना सौम्य भाषेत हिडीस फिडीस करू नका.
@ हितेश भाऊ
एकंदर प्रसाद भाऊंची लेखनशैली आणि प्रत्येक चर्चेचा शेवट 'भेटा मग बोलू' अशा प्रकारच्या वाक्यांनी होत असल्याने तुम्हाला जर ते मिपाचा वापर त्यांचा धंदा वाढवण्यासाठी करत आहेत अशी शंका आली तर त्यात चूक नाही. मला पहिल्याच लेखात आली.
पण त्यांना भेटायचं की नाही हे प्रत्येकावर अवलंबून आहे. काही जणांना आवडेल काही जणांना नाही.
तो पर्यंत झालेल्या चर्चेतूनही माझ्यासारख्यांना बरेच काही शिकायला मिळते आहे हे ह्या चर्चेचे फलित समजा.
15 Jan 2015 - 9:47 pm | आजानुकर्ण
मी एजंट नाही. एखाद्याने एफडी मध्ये गुंतवले किंवा शेअरमध्ये गुंतवले तर जो काही फायदातोटा होईल त्यात माझा काहीही वाटा नाही. मात्र एफडीपुरती मानसिकता ही दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीला नक्कीच हानीकारक आहे. भारतासारख्या देशांच्या शेअर बाजारात १०-१२ वर्षाच्या कालावधीसाठी पैसे गुंतवणे एफडीपेक्षा फारच फायदेशीर ठरु शकते. अर्थात इतकी वर्षे कळ काढण्याची तयारी पाहिजे. एकदोन वर्षात डाऊनपेमेंटसाठी/लग्नासाठी/गाडीसाठी पैसे हवे असतील तर एफडी निश्चितच योग्य पर्याय आहे. पण १० वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर शेअरबाजार अत्युत्तम. गेल्या ४० वर्षात (मुंबई शेअर बाजार सुरु झाल्यापासून) भारतात व जगात तेजी-मंदी-शेअर घोटाळे-अमेरिकेवर हल्ला अशा असंख्य उलथापालथी झाल्या आहेत. काहीही न करता केवळ पैसे गुंतवून ठेवल्यास १०० च्या इंडेक्सपासून ३०००० च्या इंडेक्सपर्यंत (३५ वर्षात ३० पट वाढ) संपत्तीनिर्मिती करण्याची क्षमता तुम्ही गुंठामंत्री किंवा मंत्र्यासंत्र्यांशी संबंध असलेले आयआरबी सारख्या कंपनीचे मालक असल्याशिवाय शक्य नाही.
मागच्याच आठवड्यात मी वाचलेला आणि लक्षात राहिलेला हा परिच्छेद. अवश्य विचार करा
18 Jan 2015 - 6:55 pm | प्रसाद भागवत
जोशी साहेब, मी ह्या धाग्याव्यतिरिक्तही येथे व अन्यत्र नियमित लिखाण केले आहे मात्र कधीही कोणाची हेटाळाणी वा कोणाला हिडीस फिडीस केल्याचे मला वाटत नाही. हो, मात्र माझी मते ठाम आहेत,ती अधीक अभ्यासाअंती बनवलेली आहेत आणि त्यांना आकडेवारीचा आधार आहे. माझ्या मतांचा प्रतिवाद न करता केवळ तुम्ही 'एजंट' आहात अशा आशयाची विधाने करणे ही माझी हेटाळणी नव्हे काय??
मी आज एक एफडी केली की मला किती पैसे मिळणार हे लिहून, बँक मॅनेजरच्या सही सकट मिळते......अशा अवासायनात गेलेल्या बॅंका, पतपेढ्यांच्या एफ. डीज चे/सह्यांचे काय झाले?? मार्क ट्वेन ने सही केलेल्या चेकप्रमाणे दुर्दैवाने ह्या सह्यांना बाजारात काही किंमत नसते ही वस्तुस्थिती आहे. एकुणांत 'धोका/जोखीम..' म्हणजे काय येथुनच आपल्याला सुरवात करावी लागते आणि माझ्या लेखातुन मी ती केली ही आहे
सगळ्यांचाच उद्देश घसघशीत नफा मिळवणे नसून काही जण पैसा सुरक्षीत रहावा म्हणूनही असे पर्याय निवडतात हे लक्षात ठेवा....... गुंतवणुक हाही असा एक शब्द आहे ज्यात 'परतावा' हा अध्यहृतच आहे असा माझा समज आहे. वृद्धीसाठी केली जाते तीच 'गुंतवणुक' असे मी मानतो. सबब या मुद्द्यावर आपली मुळातच गफलत आहे असे माझे मत आहे.
एकंदर प्रसाद भाऊंची लेखनशैली आणि प्रत्येक चर्चेचा शेवट 'भेटा मग बोलू' अशा प्रकारच्या वाक्यांनी होत असल्याने तुम्हाला जर ते मिपाचा वापर त्यांचा धंदा वाढवण्यासाठी करत आहेत अशी शंका आली तर त्यात चूक नाही.............माझ्या लेखांवरील बहुसंख्य शंकात्मक प्रतिक्रियांना मी जमेल तितक्या विस्ताराने उत्तरे दिली आहेत. मात्र 'शेयर बाजारात गुंतवणुक करायला "योग्य" सल्लागार असूच शकत नाही.... मी त्याला ५०००० रुपये दिले आणि सांगितले मला १५% इंटरेस्ट ने हे पैसे कधी परत करता येतील ते बघ .
किती मुदतीत हे शक्य होईल याची खात्री कोण देतो का ?... अशा प्रतिक्रियांवर 'भेटुन बोलु' हेच उत्तर सयुक्तीक नाही काय ?? अर्थात मी व्यावसयिक आहे हे मी कधीच लपवुन ठेवलेले नाही. उद्या एखाद्या सर्जन बरोबर त्याने त्याची सारी व्यावसयिक कौशल्ये या अशा फोरमवर वापरुनच कार्यभाग उरकावा असेही कोणास वाटेल, पण व्यवहारात ते शक्य नाही. अर्थांत ह्यात सक्तीचा भाग नाही हे आपण लक्षांत आणुन दिले आहेच याबद्दल आपले धन्यवाद.
18 Jan 2015 - 6:58 pm | प्रसाद भागवत
जोशी साहेब, आपल्या प्रतिक्रियेच्या उत्तरादाखल दिलेली प्रतिक्रिया स्वतंत्रपणे प्रकाशित झाली आहे.. पहावी. क्षमस्व.
18 Jan 2015 - 9:17 pm | vikramaditya
चर्चेतुन बरीच माहिति मिळाली.
सेफ गुंतवणुक हाही एक दृष्टीकोन आहे, त्याची अवहेलना करुन चालणार नाही.
कारण उच्च रिटर्नची स्वप्ने दाखवण्या-या व ते खरे न झाल्यास स्वःताच्या खिशातुन पैसे देणारा एजंट अजुन पाहीला नाही. "होते असे कधी कधी" असे म्हणुन बहुतेक जण हात झटकतात.
18 Jan 2015 - 11:03 pm | सुबोध खरे
मी गुंतवणूक तज्ञ नाही पण बरेच वरिष्ठ नागरिक माझ्याकडे येतात आणि आपले मन मोकळे करतात त्यातून काही गोष्टी लक्षात आल्या त्या अशा.
बर्याच चांगल्या म्युच्युअल फंडानी २००८ ते २०१२ या कालावधी मध्ये डिव्हिडंड दिलेला नाही त्यामुळे त्याच्यात गुंतवणूक केलेल्या वरिष्ठ नागरिकांची पंचाईत झाली. आज बाजार चढत असताना त्या फंडाची चांगली किंमत येते आहे म्हणून बर्याच लोकांनी पैसे काढून राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवणे पसंत केले आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक लांब पल्ल्यात नक्कीच जास्त फायदेशीर ठरते परंतु असेही बरेच लोक पहिले कि ज्यांनी बाजार चढत असताना चांगल्या कंपन्यात गुंतवणूक केली. त्यातील काहीना घरगुती कारणासाठी उदा. मुलीच्या लग्नासाठी पैसे पाहिजे होते तेंव्हा बाजार पडलेला असल्याने त्यांना पडत्या बाजारात समभाग विकावे लागले आणि पैसा उभा करावा लागला उदा. एक गृहस्थ टाटा स्टील मध्ये त्यांनी केलेली गुंतवणूक २००५ ते २००८ मध्ये केलेली गुंतवणूक ३५० ते ७०० रुपये प्रतिसमभाग. २००९ मध्ये या समभागांची किंमत १५० रुपयावर घसरली. शेवटी बरीच कळ काढून त्यांनी २०१० मध्ये ५०० ते ६०० रुपये प्रतिसमभागाला विकून मोकळे झाले. म्हणजे पाच वर्षे पैसे बिनव्याजी ठेवून मुद्दल परत मिळाले यात समाधान मिळवणे आहे. हि परिस्थिती दर ४-५ वर्षांनी होत असते. तेंव्हा आपल्याकडे असलेला फक्त अतिरिक्त पैसा मध्यमवर्गीय माणूस बाजारात गुंतवतो यात नवल नव्हे.
रिलायंस पॉवर मध्ये ४०० ते ५०० रुपयाला घेतलेले समभाग आज ६० ते ७० रुपयाला आहेत. यातहि ब्ल्यू चीप म्हणून गुंतवणूक केलेले आणि अडकलेले अनेक लोक माझ्या पाहण्यात आहेत.
ज्या लोकांनी पी पी एफ मध्ये गुंतवणूक केली किंवा ते पैसे राष्ट्रीयीकृत बँकेत व्याजावर ठेवले त्यांना पाच वर्षात चक्रवाढ व्याजाने ५५ ते ६० टक्के परतावा मिळाला. शिवाय त्या वयाला आपले पैसे बुडतात कि काय हि चिंता दोन वर्षे पर्यंत खात राहणे हे कठीणच आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पी पी एफ मध्ये पैसे ठेवल्यास मुळ गुंतवणूक हि १०० % सुरक्षित राहते( no capital erosion) हि वस्तुस्थिती आहे. आणि एका विशिष्ट वयानंतर आपले पैसे बुडाले हे मान्य करणे फारच कठीण आहे.
या प्रश्नाची हि दुसरी बाजू म्हणून मी मांडत आहे
डिसक्लेमर/ दावा -- माझी भांडवल बाजारात थोडीफार गुंतवणूक आहे आणि २००८-९ मध्ये हि गुंतवणूक मूळ मुदलाच्या २५ % इतकी( ७५ % तोटा) कमी झालेली होती तेंव्हा मी रोज समभागांचे भाव पाहत असे पण त्यामुळे माझ्या काळजाचा ठोका चुकला नाही याचे कारण मी ते पैसे बाजारात गुंतवताना पत्नीला सांगितले होते कि हे पैसे बुडाले असे समज.
19 Jan 2015 - 12:45 am | आजानुकर्ण
रिलायन्स पॉवर (आणि इतर रिलायन्स कंपन्या) या ब्लू चीप नसून फक्त चीप कंपन्या आहेत. अहो बाजारात एल अँड टी, इन्फोसिस, विप्रो, हॅवेल्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय, भेल, आयटीसी अशा अक्षरशः सोन्यासारख्या कंपन्या आहेत. अगदी दर तीन महिन्यांनी डिविडन्ड देतात. रोजच्या वापरात त्यांच्या वस्तू आपण पाहतो. रिलायन्स पॉवरचा एकही टॉवर कुठेही उभा नसताना ती ब्लू चीप कशी काय बॉ? लोकांनी आयपीओच्या नफ्याच्या लोभाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बुडले. याचा दोष कुणाला देणार?
कॅपिटल इरोजन होत नाही हा भ्रम आहे. तुम्ही ठेवलेल्या १०० रुपयाची व्हॅल्यू इन्फ्लेशनमुळे हळूहळू कमीच होत जाते. फक्त आपल्याला तेवढा आकडा स्थिर असल्याचे दिसते इतकेच.
18 Jan 2015 - 11:08 pm | सुबोध खरे
२०१३ सालातील हा दुवा पहा. म्हणजे मी काय म्हणतो आहे ते समजेल आज गेल्या ८ महिन्यात बाजार वधारला असल्याने कोणताही इ एल एस एस भरपूर परतावा दाखवतो आहे. पण त्याच फंडाची २०१४ मार्च पर्यंतची कामगिरी पाहिली तर ती बर्यापैकी निराशाजनक होती. यात उत्तम फंड सुद्धा येतात
http://articles.economictimes.indiatimes.com/2013-04-15/news/38556016_1_...
18 Jan 2015 - 11:14 pm | सुबोध खरे
हा दुवा पहा.
तीन फंड सोडून कोणत्याही फंडाने पाच वर्षात २० टक्क्याच्या वर परतावा दिलेला नाही
http://www.moneycontrol.com/mutual-funds/performance-tracker/returns/els...
माझा सर्व गुंतवणूक सल्लादाराना हाच प्रश्न आहे कि हे तीन सर्वोत्तम फंड कसे निवडायचे? मला याचे समाधानकारक उत्तर आजतागायत मिळालेले नाही.
19 Jan 2015 - 12:39 am | आजानुकर्ण
एक तर पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही फक्त इलएसएस स्कीम्स का पाहताय? करबचत ही मुद्दा नसेल तर लार्ज कॅप (डायवर्सिफाईड), मल्टी कॅप किंवा बॅलन्स्ड फंड चांगले
दुसरा मुद्दा असा आहे की या फंडांवर जो परतावा मिळतोय तो लाँग टर्म गेन्स असल्याचे गृहीत धरले तर पूर्णपणे करमुक्त आहे. एफडीचा ९ टक्के परताव्याचा दर हा प्री-टॅक्स आहे. म्हणजे तुम्ही ३० टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये असल्यास तो साधारण साडेसहा टक्क्यापर्यंत येतो.
एफडीच्या साडेसहा टक्के परताव्यापेक्षा जास्त परतावा देणारे किती फंड्स आहेत ते पाहा.
२० टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळणे हा निकष आहे काय? तसे असेल तर स्वतःचीच कंपनी असणे चांगले. आणि सर्वोत्तमच फंड हवेत हे कशासाठी? वॉरन बफेलाही नेहमी सर्वोत्तम परतावा मिळत आलेला नाही. ;) अगदीच गाळात गेलेला फंड सोडला तर बहुतेक फंड्स एफडीपेक्षा चांगले रिटर्न्स देत आहेत.
अाता साडेसहा टक्के बरे की सरासरी १२ ते १५ टक्क्यापर्यंत परतावा देणारे फंड्स बरे एवढाच विचार सामान्य गुंतवणूकदाराने करावा.
19 Jan 2015 - 9:37 am | सुबोध खरे
PPF हा यातील तरलता आणि परतावा या दोन्ही बाबतीत पुर्णतः असमाधानकारक पर्याय आहे. थोडे स्पष्ट्च सांगावयाचे तर सर्वसामान्य गुंतवणुकदाराने या पर्यायाचा अजिबात विचार करु नये असे माझे मत आहे
या भागवत साहेबांच्या मुद्द्याला दिलेला प्रतिसाद आहे
19 Jan 2015 - 1:22 pm | प्रसाद भागवत
डॉ.साहेब, असहमत,
आपली प्रतिक्रिया ही ''दीर्घकालीन गुंतवणुक म्हणजे 03 वर्ष काळाकरीता केलेली...' या गृहितकावर बेतलेली आहे. खरे म्हणजे या कालावधीला दीर्घकालीन म्हणणे सयुक्तीक होणार नाही. आपल्या पहिल्या ( ईकॉनॉमिक्स टाईम्स) धाग्यातही 05 मुदतीचे दाखविलेला परतावा हा तत्कालीन व्याजदरांच्या तुलनेने खराब म्ह्णता येणार नाही.
आपले 'आज गेल्या ८ महिन्यात बाजार वधारला असल्याने कोणताही इ एल एस एस भरपूर परतावा दाखवतो आहे. पण त्याच फंडाची २०१४ मार्च पर्यंतची कामगिरी पाहिली तर ती बर्यापैकी निराशाजनक होती'.............. हे विधान ही खरे नाही. या ही काळांत 10 वर्षे वा अधिक कालावधीसाठी अनेक ELSS नी अन्य सर्व गुंतवणुक पर्यांयापेक्षा सरस परतावा दिलेला आहे.
आपणच दिलेल्या ( मनीकंट्रोल) धाग्यावरुन मिळालेल्या माहितीवरुन असे दिसते की किमान 20 फंडसनी दिलेला परतावा हा 14% आणि त्याहुन जास्त आहे जो त्याची 'करमुक्तता' लक्षांत घेता 15% परताव्याच्या सर्वसामान्य अपेक्षा पुर्ण करतो सहाजिकच आपला बेंचमार्क हा 20% असण्याऐवजी 'उपलब्ध पर्यांयांत सर्वोत्तम' असा असेल तर अशी योजना शोधण्यास आपणास भरपुर वाव आहे, त्यकरिता कोणत्याही सल्लागाराची गरज भासु नये.
18 Jan 2015 - 11:33 pm | साती
आजकाल मिपा आणि इतर संस्थळे यांवर लेख वाचत असताना वारंवार डोक्यात येणारा प्रश्नं म्हणजे इतकी गुंतवणूक का आणि कुठपर्यंत करावी?
म्हणजे हेतू काय असावेत या गुंतवणुकीचे?
१.सत्तराव्या वर्षी एवढे व्याज यावे नी तेवढे व्याज यावे म्हणून आता एवढी राशी जमा करा नी तेवढी जमा करा.
आणि मग? सत्तराव्या वर्षी आपण मेल्यावर मुद्दल सगळं आपल्या वारसांना?
माझ्या मते इतकीच गुंतवणूक करावी ज्या योगे मुलांची शिक्षणे व्यवस्थित होतील.
किंवा व्यवसायाला सुरूवातीचे भांडवल देता येईल.
त्यानंतर त्या मुला/मुलीचे घर, लग्नं, कार, परदेशप्रवास आणि मुलंबाळं त्यांचं त्यानी बघून घेतलं पाहिजे.
हां एखाद्याचं मुल मानसिक्/शारिरीक विकलांग असेल तर त्याकरिता योग्य राशी जमवून ट्रस्ट बनवला पाहिजे.
२.आजारपणे आणि शेवटपर्यंत व्यवस्था- यात आजारपणासाठी एखादा योग्य, बरिचशी आजारपणे कव्हर करणारा आणि आपल्या घराजवळच्या हास्पिटलातही कॅशलेस बेनिफिट मिळणारा प्लान घ्यावा.
शेवटपर्यंतची व्यवस्था हा विषय जरा ट्रिकी आहे. कारण अगदी बेडरिडन अवस्थेत जर तुम्ही घरीच रहाणार असाल तर जवळच्या नातेवाईकांचा तेवढा सपोर्ट हवा. आणि जर तेवढा सपोर्ट करणारी मुलेबाळे असतील तर आपल्या साध्या गुंतवणूकीतून(दैनंदिन खर्चाकरिता केलेली तजवीज) एखादी प्रायवेट नर्स नक्कीच परवडेल.
जर एखाद्या टर्मिनल केअर संस्थेत रहाणे चालणार असेल तर आपली इतकी गुंतवणूक असावी की दरमहा येणार्या व्याजातून किंवा बँक अकाऊंटमधून तो खर्चं वळता व्हावा.
३. पार्टनरसाठी- कमावता पार्टनर असेल किंवा त्याची/तिची स्वतःची योग्य गुंतवणूक असेल तर पार्टनरसाठी म्हणून अवाच्या सवा गुंतवणूक कशाला?
एखादा योग्य टर्म इन्शुरन्स, हेल्थ पॉलिसी, एज्युकेशन फंड आणि रिटायरमेंट नंतरच्या दैनंदिन खर्चाची तजवीज यावर आपल्या भविष्यनिर्वाहाचा मुख्य भर असायला हवा.
मग उरलेल्या पैशांचं काय-
तर आत्ता रहायला चांगलंस घर.
आत्ता होणारा खर्चं
आत्ता करायची हौसमौज
आणि पैसा कमवायला लागणार्या वेळाची काटछाट करून आत्ता कुटुंबियांत करता येणारी भावनिक गुंतवणूक. आपले आवडीचे छंद जोपासायला वेळ देणे आणि पैशापलीकडेही विचार करणे.
18 Jan 2015 - 11:52 pm | सुबोध खरे
साती ताई
आजच माझ्या सौ. च्या वर्गमित्राला भेटून आलो तो मुंबईत रुग्णालयात भरती झाला आहे ल्युकेमियासाठी AML M ४ ( अजून पूर्ण अहवाल आला नाही पण मोनोसाईट्स ७८% आहेत त्यामुळे प्राथमिक अहवाल M ४ आहे). माझ्या वर्गमित्राला embryonal cell Ca (एक प्रकारचा कर्करोग) झाला त्यातून तो पूर्ण बरा झाल्यावर ५ वर्षांनी त्याला NHL (दुसर्या प्रकारचा कर्करोग) झाल त्या निराश परिस्थितीत असताना मी आमच्या सरांना आयुष्याच्या अनिश्चीत्तेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मोलाचा सल्ला दिला तो असा
तुम्ही मिळवत असलेल्या मिळकतीचे
१/३ पैसे दैनंदिन खर्चासाठी वापरा
१/३ पैसे भविष्यासाठी ठेवा आणि
१/३ पैसे आत्ता जीवन उपभोगण्यासाठी वापर
कारण जीवन हे क्षणभंगुर आहे ते आज आहे तोवर उपभोगुन घ्या.
जगलात तर उत्तम आहे. १/३ वाचवलेले असतील तर मुले बापाने कफल्लक करून ठेवले म्हणून बोटे मोडायला नको. या १/३ साठीच हा वरचा अट्टाहास.
पण मरायची पाळी आली तर जगायचे राहून गेले हि खंत नको.१/३ उपभोगुन घ्या
आणि हे मी अक्षरशः प्रत्यक्षात आणतो आहे.
19 Jan 2015 - 12:05 am | साती
मलाही साधारणपणे असेच काहीसे म्हणायचे आहे.
19 Jan 2015 - 12:09 am | साती
आईने कफल्लक करून ठेवले हे माझ्या कर्त्यासवरत्या मुलाने माझ्याविषयी म्हटले तर मला अज्जिबात वाईट वाटनार नाही.
न कमावत्या मुलाने म्हणू नये म्हणून योग्य किंमतीचा टर्म इन्श्युरंस घ्यावा.
19 Jan 2015 - 12:11 am | साती
'वाटणार' नाही
:)
19 Jan 2015 - 12:50 am | डॉ सुहास म्हात्रे
आमच्या पिताजींनी सांगितलेली गोष्ट आठवली. नोकरीच्या सुरुवातीला त्यांचा पगार होता वट्ट रू १५ फक्त. त्यातले रु ५ ते गावाला आईवडीलांकडे पाठवायचे, रु ५ मध्ये संसार चालवायचे आणि उरलेले रू ५ बचत म्हणून ठेवायचे.
दोन मुले शिक्षण पूर्ण करून स्थिर झाल्यावर आणि स्वतः रिटायर झाल्यावर "पुरेसे पेन्शन व आवाक्यातल्या गरजा" असल्याने आईवडीलांनी मुलांकडे पैसे मागण्याचा एकही प्रसंग आला नाही. उलट आम्हा भावांना त्यांना काय खास भेटवस्तू द्यावी असा प्रश्न सतत पडत असे.
19 Jan 2015 - 1:47 pm | प्रसाद१९७१
सध्या म्युचुअल फंडांच्या चांगल्या रीटर्न्स चे आकडे दिसत आहेत ते गेल्या ६ महीन्यात मार्केट ५० % वाढल्यामुळे आहेत. नाहीतर त्या आधी रीटर्न्स चे आकडे अतिशय वाईट होते.
त्यात सर्व सल्लागार २०००, २००१ ह्या काळातल्या गुंतवणुकी वर आज कीती खुप खुप जास्त पैसे मिळत आहेत हे लिहीत आहेत. तेंव्हा ज्यांनी गुंतवणुक केली आणि थांबले ते नशिबवानच होते. पण त्याच प्रकारचा परतावा ह्या पुढच्या काळात मिळणे पण अवघड आहे.
इथे सतत ब्ल्यु चीप कंपन्यांचे शेयर घेउन ठेवा म्हणजे काही प्रश्न नाही असे सरसकट विधान बर्याच लोकांनी केलेले दिसते आहे. पण गेल्या ५ वर्षातली ह्या शेयर्स ची कामगीरी बघा. सर्व प्रचंड निळे शेयर्स आहेत. टाटा स्टील, रीलायंस, ओएनगीसी, विप्रो, कोल ईडीया. डीएल्फ वगैरे तर लुटुनच गेले.
ह्याचा अर्थ जनरली लागू होइल असा कुठला फॉर्म्युला नाही आणि असलाच तर तो सोप्पा पण नाही. फक्त घेउन ठेवले आणि १० वर्ष विसरुन गेलो असे करुन चालणार नाही.
19 Jan 2015 - 2:07 pm | टवाळ कार्टा
+१११११११११११११११११११११
19 Jan 2015 - 2:30 pm | प्रसाद भागवत
(1)सध्या म्युचुअल फंडांच्या चांगल्या रीटर्न्स चे आकडे दिसत आहेत ते गेल्या ६ महीन्यात मार्केट ५० % वाढल्यामुळे आहेत. नाहीतर त्या आधी रीटर्न्स चे आकडे अतिशय वाईट होते............असहमत, 10 वर्षांचा कालावधीचा विचार केल्यास याही काळात म्युचुअल फंडस च्या प्रमुख योजनांनी अन्य गुंतवणुक पर्यायांपेक्षा सरस परतावा दिला आहे.
(2) ज्यांनी गुंतवणुक केली आणि थांबले ते नशिबवानच होते. पण त्याच प्रकारचा परतावा ह्या पुढच्या काळात मिळणे पण अवघड आहे......... गुंतवणुक दीर्घकालीन असावी, हे तर मुख्य गृहितकच आहे, बाकी भविष्यकाळांतील परताव्याचे असे निराशाजनक भविष्य चितारण्याचे कारण नसावे.
डीएल्फ वगैरे तर लुटुनच गेले...... याला,(तसेच रिलायन्स पॉवर ला) Blue-Chip कोणी ठरवले ??... टीममधील सगळेच खेळाडु फॉर्म मधे असतातच असे नाही,,म्हणुनच फोलिओत 12/15 ब्लुए चीप शेअर्स असावेत असे मी आधीच सुचविले आहे.
असो, मुद्द्यांची होणारी पुनरावृती पहाता मी आता 'गुंतवणुक' यावर प्रतिसाद देणे थांबवतो.
19 Jan 2015 - 1:54 pm | प्रसाद१९७१
भागवत साहेब, हे विधान अतिषय विचारपूर्वक केलेले आहे.
जर कोणाला वार्षिक २०% परतावा मिळवण्याची युक्ती अभ्यासानी सापडली असेल तर तो दुसर्यांना सल्ला देण्यात वेळ घालवेल का दुसर्यांकडुन १२ किंवा १५ टक्याने पैसे घेउन वरचे ५% मिळवेल?
दुसर्यांच्या पैश्या बद्दल सल्ले देणे सोप्पेच असते हो. कोणाचे काय जातय त्यात. आणि परतावा कमी आला तर कायद्यात कुठे तरतुद आहे सल्लागाराला दंड करण्याची?
कोणत्या स्टॉक मार्केट मधे खुप पैसे मिळवणार्या माणसानी सल्ला देण्याचे काम केले आहे?
19 Jan 2015 - 2:31 pm | अनुप ढेरे
अभ्यास वाढवा...
19 Jan 2015 - 2:50 pm | प्रसाद१९७१
@अनुप - तुम्ही च सांगा एक तरी नाव.
बफेट च्या फिलॉसॉफिक बोलण्याला तुम्ही सल्ला म्हणत नसाल अशी अपेक्षा आहे.
सल्ला म्हणजे - ह्या वेळेला तू हे कर असे स्पेसिफिक माणसाला स्पेसिफिक स्टॉक, म्यु.फं. वगैरे बद्दल स्पेसिफिक वेळेला सांगणे.
19 Jan 2015 - 3:17 pm | अनुप ढेरे
बसंत माहेश्वरी, संजय बक्षी वगैरे नावं शोधा गूगल वर. स्टॉक सल्यांची त्याची सर्वीस आहे. पूर्ण पॅकेजची वार्षिक फी एक लाख फक्त. अमुक शेअर आत्ता घ्या असा सल्ला असतो. मनीलाईफ वगैरे सायटींवरही सुविधा असतात अशा (मी वापरतो ही). वार्षिक ४-५ हजारात शेअरचे/ फंड्सचे सल्ले देणार्या. फुकट सल्ले देणार्याही सायटी असतात.
19 Jan 2015 - 3:23 pm | प्रसाद१९७१
अश्या बर्याच असतात हो सायटी. पुन्हा तेच. त्यांना जर इतके कळते तर स्वता का नाही पैसे मिळवत. असे थोड्याश्या किमतीला आपले नॉलेज विकुन का टाकतात?
आणि ह्या कुठल्याही सल्लागारांची काहीही कमिटमेंट नसते.
19 Jan 2015 - 3:46 pm | प्रसाद भागवत
अहो प्रसादराव, सल्ला ही एखादी भौतिक वस्तु असती आणि दुसर्याला दिल्याने ती संपत असती किंवा मुळ सल्ला देणाराकडे ती उरत नसती ( उदा. जमीन, आंबे, मिठाई ई) तर.... आपला "तर स्वता का नाही पैसे मिळवत. असे थोड्याश्या किमतीला आपले नॉलेज विकुन का टाकतात?".....हा मुद्दा खरा मानता आला असता.
येथे दुसर्याला सल्ला देवुनही पैसे मिळतात, शिवाय स्वतः तो अधिक चांगल्या प्रकारे उपयोगांत आणता येतोच, असे नाही का ??
मुळातच गल्ल्त करताय तुम्ही.
19 Jan 2015 - 3:47 pm | अनुप ढेरे
कोण म्हणतं की स्वत: नाही मिळवत.
नॉलेज विकतात कारण तो ऑलमोस्ट फुकट पैसा असतो. बिना जोखीम...
शेअर बाजाराशी रिलेरटेड गुंतवणुकीची कोणीच कमिटमेंट देत नसते. कोणी देत असेल तर ती व्यक्ती फ्रॉड आहे हे नक्की.
शेवटी आपणच डोकं चालवून, जालावर असलेल्या अगणित माहितीचा वापर करून निर्णय घ्यायचा असतो.
19 Jan 2015 - 2:53 pm | प्रसाद भागवत
आपल्या वैचारिक भुमिकेबद्दल आदरच आहे मात्र व्यवसायाची गणिते वेगळीच असतात साहेब.
उदा. मी माझ्या क्लायंटस कडुन सल्ला देण्याची माझी फी ही त्यांना 15% फायदा झाला तरच द्या असे सागुंन मिळवतो... आता सांगा तुमच्या म्हणण्याप्रमाणॅ एवढा खटाटोप करुन, भांडवल उभे करुन, जे पैसे मिळवायचे (तुम्हीच दिलेले उदाहारण घ्यावयाचे तर 5%) ते मला सल्ला देवुनही मिळतातच की.....मग मी सल्ला का देवु नये ??
दुसर्यां च्या पैश्या बद्दल सल्ले देणे सोप्पेच असते हो. कोणाचे काय जातय त्यात.......जातं ना, क्लायंटला नाही झाला अपेक्षित फायदा तर माझं उत्पन्न जात्ं ना..शिवाय वेळ आणि असमाधानी क्लायंट मुळे पुढचे संभाव्य क्लायंट्स जातात.
आणि हो, ही माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली असल्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्या, तर मी आधीच क्षमा मागतो.
28 Jan 2015 - 12:06 pm | चित्रार्जुन
उदा. मी माझ्या क्लायंटस कडुन सल्ला देण्याची माझी फी ही त्यांना 15% फायदा झाला तरच द्या असे सागुंन मिळवतो... आता सांगा तुमच्या म्हणण्याप्रमाणॅ एवढा खटाटोप करुन, भांडवल उभे करुन, जे पैसे मिळवायचे (तुम्हीच दिलेले उदाहारण घ्यावयाचे तर 5%) ते मला सल्ला देवुनही मिळतातच की.....मग मी सल्ला का देवु नये ??
किती फी आहे ओ तुम्ची?
17 Feb 2020 - 4:35 pm | गणेश-जाधव
सर्व प्रथम या पोर्टल च्या निर्मात्याला माझा प्रणाम. मराठी भाषिकांसाठी केलेले हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
गुंतवणुकीचे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. उदारणार्थ शेर मार्केट, म्युच्युअल फंड, बँक सेविंग्स, एफ डी, आर डी, एल आय सी, सोने-चांदी, रिअल इस्टेट आदी गुंतवणुकीच्या पर्यायांचा यात मुखत्व समावेश होतो.
कमी वेळेमध्ये जास्त किव्हा लवकर परतावा मिळण्यासाठी तुमच्यासमोर शेर मार्केट आणि म्युच्युअल फंड पर्याय येतात.
म्युच्युअल फंड म्हणजे काय? याची संपूर्ण महिती या ब्लॉग मध्ये दिली आहे https://investica.com/blog/what-are-mutual-funds/
शेर मार्केट म्हणजे काय आणि त्यात कशी गुंतवणूक करायची याची महिती या ब्लॉग मध्ये दिली आहे https://mr.wikipedia.org/wiki/समभाग_बाजार
https://choicebroking.in/blog/demat-account-opening-guide/