फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
11 Jan 2015 - 4:02 am
गाभा: 

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे.

"चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर.

ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत,

एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा,

त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो.

दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही.

माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे?

जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे?

बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.)

आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे.

प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही.

दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे.

दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच.

दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा.

आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही.

समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत.

याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे.

दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का?

जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

17 Jan 2015 - 4:50 pm | संदीप डांगे

याच धर्तीवर अशी फ्रान्सची भूमिका आहे की आमच्याकडे शरियत कायदा नसून लोकशाही व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणाचीही व्यंगचित्रे काढणे हा आमचा हक्क आहे.

लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दोन परिमाणे आहेत ह्या आपल्या तथाकथित स्वतंत्र फ्रांस मध्ये.

the prosecution of Sinet for “anti-Semitism” is now a national embarrassment for the French government.

Sinet wrote a cartoon associating Jewishness with success. The cartoon joked that Jean Sarkozy, the son of French president Nicolas Sarkozy, would be more successful in life if he formerly converted to Judaism.

Jean Sarkozy was getting married to a wealthy Jewish heiress at the time.

Sinet was accused of being “anti-Semitic.” He sued one of his critics for defamation. When the editor of Charlie Hebdo asked Sinet to apologize, Sinet replied “I’d rather cut my balls off.”

Chairle Hebdo magazine fired Sinet.

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2015 - 11:30 pm | श्रीगुरुजी

यातून नक्की काय सिद्ध होतंय आणि दहशतवाद्यांनी केलेल्या १७ लोकांच्या हत्या कशा समर्थनीय ठरतात?

हुप्प्या's picture

18 Jan 2015 - 4:07 am | हुप्प्या

वाट्टेल ती उदाहरणे देऊ नका. चार्ली हेब्दोने कुणाला नोकरीवरून काढून टाकले असेल तर एक उद्योग म्हणून त्यांना तो हक्क आहे. नोकरीवर ठेवताना काही अटींवर नोकर व नोकरीवर ठेवणारा सह्या करतात. त्यातल्या कुठल्या अटीचा भंग झाल्यास नोकरी जाऊ शकते. त्यावरून काही सिद्ध होत नाही.
इथे सरकारने कुठेही बंदी घातली नाही. जे काही झाले ते कायद्याला धरून. कुणी कुणावर अंदाधुंद गोळ्या घालून लोकांना यमसदनाला घातलेले नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारने गदा आणलेली नाही.
तेव्हा म्हंमदाचे व्यंगचित्र आणि ह्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. ह्या उदाहरणाने काहीही सिद्ध होत नाही. मुस्लिम धर्म पिसाटांनी केलेल्या हल्ल्याचे दुरान्वयानेही समर्थन होत नाही.

संदीप डांगे's picture

18 Jan 2015 - 5:18 am | संदीप डांगे

वाट्टेल ते… पासून सुरु होणारा प्रतिसाद बघितला कि तो तुमचाच असेल याची खात्री असते. वाट्टेल ते--- चे कॉपीराईट घेतलंय का?

असो.

वर उल्लेखित प्रकरणात काय वावगं आहे हे जर कुणी (फक्त मुस्लिमद्वेषातून) समजत नसेल किंवा समजूनच घ्यायचे नसेल तर अशा एकांगी आणि पूर्वग्रहदुषित हेकेखोरपणे वाद घालणाऱ्या दांभिक लोकांना का उत्तर द्यावं?

जाउ द्या. कायदे, घटना आणि त्यातून मिळणारे न्याय किंवा संरक्षण हे सगळेच आभासी असते. त्याबद्दल नंतर कधीतरी.

फ्रांस सरकार ज्यूंची टिंगल करणाऱ्यास कायदा वापरून वाकवू शकली. पण आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकावर मिरवणाऱ्या खोडसाळ पत्रकारांना पुरेसे संरक्षण देऊ नाही शकली...

तुम्हाला बहुधा स्वत: काहीही संशोधन, वाचन करायचे नाही आहे, तरीसुद्धा हे वाचून घ्या एकदा.

संदीप डांगे's picture

18 Jan 2015 - 5:40 am | संदीप डांगे

2012

In September 2012, the newspaper published a series of satirical cartoons of Muhammad, some of which featured nude caricatures of him. Given that this issue came days after a series of attacks on U.S. embassies in the Middle East, purportedly in response to the anti-Islamic film Innocence of Muslims, the French government decided to increase security at certain French embassies, as well as to close the French embassies, consulates, cultural centers, and international schools in about 20 Muslim countries. In addition, riot police surrounded the offices of the magazine to protect it against possible attacks.

Foreign Minister Laurent Fabius criticised the magazine's decision, saying, "In France, there is a principle of freedom of expression, which should not be undermined. In the present context, given this absurd video that has been aired, strong emotions have been awakened in many Muslim countries. Is it really sensible or intelligent to pour oil on the fire?" The U.S. White House stated "a French magazine published cartoons featuring a figure resembling the Prophet Muhammad, and obviously, we have questions about the judgment of publishing something like this." However, the newspaper's editor defended publication of the cartoons, saying, "We do caricatures of everyone, and above all every week, and when we do it with the Prophet, it's called provocation."

हुप्प्या's picture

18 Jan 2015 - 7:16 am | हुप्प्या

तुम्ही दिलेल्या इंग्रजी परिच्छेदात सरकारने कुठली कारवाई केल्याचे म्हटलेले नाही. त्या चार्ली हेब्दोच्या व्यवस्थापनाने त्या ज्यू विरोधी लिहिणार्‍याला नोकरीवरून काढून टाकले. आता ह्या घटनेमुळे महंमदाचे कार्टून आणि त्यानंतरची कत्तल हे योग्यच होते हे कसे ते जरा उलगडून सांगा. आम्हा अडाण्यांना ते कळत नाही. कारण संशोधन वा वाचन हे आपणच करत आहात असे दिसते आहे. असो.

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 2:21 am | संदीप डांगे

double standard

double standard 2

double standard 3

ठीक आहे थोडे अजून वाचा मग... प्रस्तुत लेख मुद्दा स्पष्ट करतो का बघा.

संदीप डांगे's picture

18 Jan 2015 - 5:34 am | संदीप डांगे

Siné sacking (2008)

On 2 July 2008, a column by the cartoonist Siné (Maurice Sinet) appeared in Charlie Hebdo citing a news item that Jean Sarkozy, son of Nicolas Sarkozy, had announced his intention to convert to Judaism before marrying his fiancée, a Jewish heiress Jessica Sebaoun-Darty. Siné added, "he'll go far, this lad!" After this led to complaints of anti-Semitism, after journalist Claude Askolovitch described them as anti-Semitic. The magazine's editor, Philippe Val, ordered Siné to write a letter of apology or face termination. The cartoonist said he would rather "cut his own balls off," and was promptly fired. Both sides subsequently filed lawsuits, and in December 2010, Siné won a 40,000-euro court judgment against his former publisher for wrongful termination. Siné also reported a death threat posted on a site run by the Jewish Defense League. The text said "20 centimeters of stainless steel in the gut, that should teach the bastard to stop and think."

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2015 - 1:32 pm | श्रीगुरुजी

सहमत!

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2015 - 1:33 pm | श्रीगुरुजी

सहमत म्हणजे "हुप्प्या" यांच्या प्रतिसादाशी सहमत. संदिप डांगेच्या प्रतिसादाशी नव्हे.

सामान्य वाचक's picture

19 Jan 2015 - 3:24 pm | सामान्य वाचक

जाउ दे आता. कोळसा उगाळणे सोडून दया .कुठे फालतू वेळ घालवता

श्रीगुरुजी's picture

16 Jan 2015 - 6:27 pm | श्रीगुरुजी

>>> मोहमद साहेबांचे चित्र नाही तर व्यंगचित्र आले कोठून?

कुराणात त्यांचे वर्णन आहे (म्हणे). कर्मठ मुसलमान दाढी, आखूड पायजमा, फरकॅप इ. वेशभूषा केलेले आढळतात. त्यांच्यासारखेच दिसण्याचा या मुस्लिमांचा उद्देश असतो.

चित्र आहेच की. इराणी परंपरेत त्यांची चित्रे काढणे संमत आहे. जास्त लांब कशाला जा, "महम्मद" हे विकिपीडिया आर्टिकल वाचा. तिथेच काही चित्रे आहेत. मजा म्हणजे इथे इतका दंगा चालू असताना त्या लेखावरची चित्रे मात्र कोणीही बॅन केली नाहीत.

नगरीनिरंजन's picture

17 Jan 2015 - 4:21 pm | नगरीनिरंजन

झुंडसंहिता जिंदाबाद हा लोकसत्तातला लेख वाचला का?
धार्मिक मूर्खपणा वाढत चालला आहे आणि धर्माविरुद्ध बोलणारे, लिहिणारे अधिकाधिक कलाकार हवे आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2015 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल धन्स.

मी फ्रेंच हत्याकांडाचा तीव्र निषेध करतो.

-दिलीप बिरुटे

कार्टुन ते क्रिकेट

चालु द्या =))

कपिलमुनी's picture

19 Jan 2015 - 5:10 pm | कपिलमुनी

चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

बाकी तुमची निराशावादी मानसिकता जाउन लढवय्या वृत्ती आली आहे , हभिण्ण्दन

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 5:11 pm | टवाळ कार्टा

तुमचे नाव "कपिलमुनी"च्या ऐवजी "नारदमुनी" ठेवा ;)

सौंदाळा's picture

19 Jan 2015 - 5:38 pm | सौंदाळा

डांगेसाहेब
ग्राफिक डिझायनिंग, मद्य उद्योग वरच्या स्तरात केलेले काम, क्रिकेट मधे चालणारे बेटींग, बी.सी.सी. आय मधील एक वर्ष, मुसलमान मित्रमंडळी असे अत्यंत व्यापक विश्व फार कमी लोकांना अनुभवण्यास मिळत असेल यावर तुमचे अनुभव लिहाच

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 6:27 pm | संदीप डांगे

मद्य उद्योग वरच्या स्तरात केलेले काम

काहीतरी गैरसमज झाला का तुमचा?

सौंदाळा's picture

19 Jan 2015 - 6:41 pm | सौंदाळा

नाही हो.
आज धाग्यावरचे प्रतिसाद वाचत होतो त्यात तुमचा हा प्रतिसाद दिसला

(हाय कंबख्त, तूने पीही नही!) असे म्हणाल तर काय आहे ना की ही तुमची दारू जिथे बनते ना तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे (हाय कंबख्त, तूझे पताही नही!) .

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 6:47 pm | संदीप डांगे

अहो ते क्रिकेटच्या नशेबद्दल होते. गैरसमज नसावा.

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2015 - 7:13 pm | श्रीगुरुजी

>>> ग्राफिक डिझायनिंग, मद्य उद्योग वरच्या स्तरात केलेले काम, क्रिकेट मधे चालणारे बेटींग, बी.सी.सी. आय मधील एक वर्ष, मुसलमान मित्रमंडळी असे अत्यंत व्यापक विश्व फार कमी लोकांना अनुभवण्यास मिळत असेल यावर तुमचे अनुभव लिहाच

:YAHOO:

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 6:00 pm | संदीप डांगे

आठ दिवस झाले हा धागा सुरु आहे. बरेच मुद्दे तेच तेच येत आहेत. चर्चा पुढे जात नाही आहे. जे घडले ते आपण नाकारू शकत नाही, ज्यामुळे घडले तेही नाकारू शकत नाही. मी फक्त कार्यकारणभावाचे समर्थन केले, आदर्शवाद आणि नितीमत्ता ह्या स्थळकाळसापेक्ष असतात. गळ्यातले मंगळसूत्र हे कुणाला प्रेमाचं, सौभाग्याचं प्रतिक वाटू शकतं तर कुणाला गुलामगिरीचं. एकाचा दहशतवादी दुसऱ्याचा क्रांतिकारी असतो. एकाची विभाजनवादी चळवळ दुसऱ्याची स्वातंत्र्य चळवळ असू शकते.

हुसैनची चित्रे व्यक्तिगत कलाकृती होती, शर्लीची चित्रे हि व्यावसायिक उद्देशाने छापून हजारोंच्या संख्येने वारंवार प्रसारित केलेली होती. शर्लीच्या चित्रांकडे दुर्लक्ष करा म्हणणारे हुसैनला तोच नियम लावू शकत नाहीत हे पण कळले. घटना, नियम, कायदे व न्यायालये यांच्यातून खरोखरच न्याय मिळतो असे नाही. त्यामुळे नियम आणि कायद्यात बसवून कुणी चुकीचे वर्तन करत असेल तर न्याय कसा होईल?

शार्लीच्याच प्रकरणात हल्लेखोरांनी नंतर शांतपणे पोलिसांकडे आत्मसमर्पण केले असते, न्यायालयात खटला चालवून त्यांच्या वकिलाने आपल्या हुशारीच्या बळावर ह्या हत्या रागाच्या भरात झाल्या किंवा तत्सम काही कारणे देऊन त्यांची निर्दोष मुक्तता करवून घेतली असती तर ह्या हत्या योग्य झाल्या असत्या का हा एक प्रश्न आहेच.

दोन समाजात पडणाऱ्या संशयाच्या खोल दरीचा एकूण मानवजातीला धोकाच आहे. त्यामुळे तारतम्य बाळगणे फार महत्वाचे. दुर्दैवाने ते फार दुर्मिळ आहे.

ह्या वादात माझे सगळे मुद्दे मांडून झाले आहेत. पण पुढे वागायचे कसे हा प्रश्न सुटल्याशिवाय ह्या चर्चेचा काही फायदा झाला असे म्हणता येणार नाही.

आयुधजीवी आणि बुद्धीजीवी या दोन्ही समाजाने एकत्र कसे राहायचे हाच प्रश्न महत्वाचा आहे. काहीही असो, जातीय सलोखा टिकणे फार आवश्यक आहे.

ह्या विषयावर इथेच थांबतो. सर्व प्रतिसादकर्त्या सदस्यांचे आभार. माझ्या प्रतिसादाने कुणाला त्रास झाला असेल तर त्याने सरळ दुर्लक्ष करावे. धन्यवाद!

एक नम्र विनंती: माझ्या आकलनाप्रमाणे मिपा हे विविध विचारांच्या आदानप्रदान व प्रदर्शनाचे मुक्त माध्यम आहे. कोणत्याही सदस्याच्या व्यक्तिगत व नाजूक विषयांना कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारच्या सार्वत्रिक चर्चेत ओढून आणणे व त्यावर वाद प्रतिवाद करणे शिष्टसंमत वाटत नाही. त्यामुळे त्याबाबतीत तारतम्य बाळगावे.

कपिलमुनी's picture

19 Jan 2015 - 6:11 pm | कपिलमुनी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2015 - 7:18 pm | श्रीगुरुजी

>>> मी फक्त कार्यकारणभावाचे समर्थन केले, आदर्शवाद आणि नितीमत्ता ह्या स्थळकाळसापेक्ष असतात. गळ्यातले मंगळसूत्र हे कुणाला प्रेमाचं, सौभाग्याचं प्रतिक वाटू शकतं तर कुणाला गुलामगिरीचं. एकाचा दहशतवादी दुसऱ्याचा क्रांतिकारी असतो. एकाची विभाजनवादी चळवळ दुसऱ्याची स्वातंत्र्य चळवळ असू शकते.

तसंच निष्पापांची, बालकांची आंधळ्या धर्मवेडातून केलेली हत्या ही काहीजणांसाठी दु:खदायक असू शकते तर काहीजणांसाठी ती अत्यानंदाची. बरोबर ना? ही भावना सापेक्षच आहे ना?

>>> दोन समाजात पडणाऱ्या संशयाच्या खोल दरीचा एकूण मानवजातीला धोकाच आहे. त्यामुळे तारतम्य बाळगणे फार महत्वाचे. दुर्दैवाने ते फार दुर्मिळ आहे.

तुमचा लेख आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचल्यावर तर हे तारतम्य अतिदुर्मिळ आहे हे लक्षात आलं.

>>> ह्या वादात माझे सगळे मुद्दे मांडून झाले आहेत. पण पुढे वागायचे कसे हा प्रश्न सुटल्याशिवाय ह्या चर्चेचा काही फायदा झाला असे म्हणता येणार नाही.

तारतम्य बाळगा. मरणार्‍याचा व मारणार्‍याचा धर्म बघून मत बनवू नका. मरणार्‍याकडे माणूस म्हणून पहा. सगळे प्रश्न सुटतील.

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 8:22 pm | संदीप डांगे

हुसैनची चित्रे व्यक्तिगत कलाकृती होती, शर्लीची चित्रे हि व्यावसायिक उद्देशाने छापून हजारोंच्या संख्येने वारंवार प्रसारित केलेली होती. शर्लीच्या चित्रांकडे दुर्लक्ष करा म्हणणारे हुसैनला तोच नियम लावू शकत नाहीत हे पण कळले. घटना, नियम, कायदे व न्यायालये यांच्यातून खरोखरच न्याय मिळतो असे नाही. त्यामुळे नियम आणि कायद्यात बसवून कुणी चुकीचे वर्तन करत असेल तर न्याय कसा होईल?

शार्लीच्याच प्रकरणात हल्लेखोरांनी नंतर शांतपणे पोलिसांकडे आत्मसमर्पण केले असते, न्यायालयात खटला चालवून त्यांच्या वकिलाने आपल्या हुशारीच्या बळावर ह्या हत्या रागाच्या भरात झाल्या किंवा तत्सम काही कारणे देऊन त्यांची निर्दोष मुक्तता करवून घेतली असती तर ह्या हत्या योग्य झाल्या असत्या का हा एक प्रश्न आहेच.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2015 - 12:59 pm | श्रीगुरुजी

अरेच्चा, हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे राहिलेच की. असो. या राहिलेल्या मुद्द्यांवर आमचे खालील उत्तर आहे.

:YAHOO:

माहितगार's picture

19 Jan 2015 - 9:57 pm | माहितगार

बरेच मुद्दे तेच तेच येत आहेत. चर्चा पुढे जात नाही आहे. .......

या धागालेखात आणि धाग्यातील चर्चेत जाणवलेल्या तार्कीक उणीवांची, आणि धागा चर्चेची समीक्षा करावायाची आहे, काळाच्या ओघात स्वतंत्र धाग्याच्या रुपाने करेन.

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 10:47 pm | संदीप डांगे

अरेवा! :-) जरुर करा...

तुमच्याकडे अजून एक धागा उधार आहे हो!

संदीप डांगे's picture

20 Jan 2015 - 1:15 pm | संदीप डांगे

हत्याकांडाचे समर्थन मागे घेत आहे.

खुलासा:
काल हा लेख वाचला. लेखकाने संयत पद्धतीने सगळे मुद्दे मांडले आहेत. कितीही चुकीचा असला तरी आपलाच मुद्दा लावून धरणाऱ्यापैकी मी नाही. त्यामुळे फ्रेंच हत्याकांडाचे समर्थन मागे घेत आहे. तेवढे सोडून बाकीचा लेख वाचावा.

मी हिंदुविरोधी आहे का मुस्लिमप्रेमी याची शंका असलेल्यांनी माझा हा हिंदीतला लेख वाचावा. त्यावर काथ्याकुट करण्याची इच्छा असल्यास मिपावर मराठीत भाषांतर करून टाकेन. पण आता लगेच नाही, महिनाभराने टाकेन. ("हुश्श…. वाचलो", इति समस्त मिपाकर)

"शांतीप्रिय मुस्लिम" हा एका ठिकाणी आलेला उल्लेख म्हणजे सगळेच मुस्लिम शांतीप्रिय आहेत असा होत नाही. उदाहरणार्थ ह्या लेखात दिलेल्या काही बातम्या व घटना. माझ्यामते त्यांच्या धार्मिक चालीरीतींचा विरोध करण्यापेक्षा त्यांच्या स्वत:चे विचार इतरांवर लादण्याच्या बळजबरीचा सर्व मार्गाने प्रचंड प्रचंड विरोध केला पाहिजे. त्यासाठी हिंसा हा पर्याय नसून सक्षम दबावगट हा पर्याय आहे.

सुबोध खरे's picture

20 Jan 2015 - 1:49 pm | सुबोध खरे

डांगे साहेब,
काही गोष्टी मला यात लिहाव्याशा वाटतात.
१) भारत ते इस्राएल या मध्य आशियातील देशांमध्ये सर्वच्या सर्व देश मुस्लीम /मुस्लीमबहुल आहेत. यातील एकाही देशामध्ये लोकशाही नाही. कारणे भरपूर आहेत. आपण शोधा.
२) यातील कोणत्याही देशात भारतातील मुसलमानांना मिळते ते स्वातंत्र्य मिळत नाही. हि वस्तुस्थिती आहे
३) हुसेन साहेबांनी महमदाचे नग्न चित्र काढले असते आणी त्यांना मारण्याचा फतवा पाकिस्तानातील /इराण किंवा सौदीतील इमामाने काढला असता तर त्याचे( कारण तो भारतीय नागरिक आहे) संरक्षण करण्याचा खर्च कोणी उचलायचा? कारण असा अवास्तव खर्च ब्रिटनने सलमान रश्दीनच्या बाबतीत उचलला होता/आहे.
४) मग या संरक्षणाची जबाबदारी जर भारतीय सरकारने उचलायला पाहिजे होती असे आपल्याला वाटत असेल तर त्याने कतारला पळून जाऊन देशद्रोह केला नाही असे आपल्याला वाटते काय?
खटले बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे अगदी अबू आझमी विरुद्धही भरले पण त्यातील कोणीही पळून गेले नाहीत. मग आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य या नावाने बोंब मारणाऱ्या व्यक्ती हुसेनच्या पळून जाण्यावर चकार शब्द का काढत नाहीत.
अबू आझमी खुल्या सभेत बोलू शकतात कि "मुल्क के कितने भी तुकडे हो जाये हम किसीको अपने मजहबसे खिलवाड करने नही देंगे"हे भाषण मी स्वतः ऐकलेले आहे. हा देश द्रोह नव्हे तर काय? अशा माणसाला काय शिक्षा द्यावी? यावर खटला भरलेला आहे त्यांना कोणी गोळी मारली नाही. या देशाचा जो कायदा आहे त्याप्रमाणेच चालले पाहिजे
५) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकराना विचारले कि आपण धर्म बदल केलात तर इस्लाम कडे का नाही जात. त्यावर त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे कि इस्लाम मध्ये धर्म भक्ती हि देशभक्ती पेक्षा आद्य मानलेली आहे जे मला कदापीही सहन होणार नाही.
६) common civil code नको कारण ते आमच्या धर्मात ढवळा ढवळ करते असे म्हणणारे मुसलमान पुढारी common criminal code(Cr PC) बद्दल काहीच का म्हणत नाहीत? मग मुसलमान माणसाना चार लग्ने करायची मुभा आहे आणि तीन वेळा तलाक म्हणून बायकोला हाकलून देण्याची मुभा आहे तर मुसलमान चोरांना चोरी केल्यावर हात तोडण्याची शिक्षा का देऊ नये? हा दुटप्पी पणा कशासाठी
या सर्व धडधडीत दिसणाऱ्या गोष्टी असूनही सुडो सेक्युलर व्यक्ती मुस्लीम लागुल्चालन का करीत आहेत? मला त्यांच्या वैचरिक दिवाळखोरीची कीव करावीशी वाटते.
लष्करात एक गोष्ट अतिशय चांगली आहे ती म्हणजे आपला धर्म आपल्या घरात असला पाहिजे. लष्कराच्या ठाण्यातील मशीदीवर जोरात बांग हि दिली जात नाही कि गणेशोत्सवात ठणाणा बोंबले ( लाउड स्पीकर) सुद्धा लावले जात नाहीत.
सर्वाना एकच कायदा. लष्करातील मुसलमानांना दुसरे लग्न करायला परवानगी नाही.होय हि वस्तुस्थिती आहे. तसे करायचे असेल तर लष्कर सोडायला लागते. त्यामुळे लष्करात हिंदू मुसलमान अशी कोणतीही तेढ नाही. सर्वाना एकाच पातळीवर आणले तर राजकारण्यांची दुकाने चालणार नाहीत पण कोणतेच दुकान न चाल्वता सुडो सेक्युलर लोक कशासाठी मारुतीच्या बेंबीत हात घालतात?

संदीप डांगे's picture

20 Jan 2015 - 2:28 pm | संदीप डांगे

हुसैन पळून जाण्याचे खरे कारण तो खूप घाबरला होता. त्याला काही लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. हे त्याने स्वत: कबूल केले आहे. तसेच खटले लढवत बसणे आपल्या देशात फार मोठी गोष्ट नाही. हुसैन कडे तेवढा पैसा आणि सपोर्ट होता. पण जीवाचे कधीही कुणीही बरेवाईट करू शकतो ह्या भीतीने तो पळाला. त्याच्या चित्रांबद्दल हिंदूंमध्ये भयंकर प्रक्षोभ होता, हे काही खोटे नाही.

घटनेने प्रत्येकाला आपला धर्म पालन व प्रचार करण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे. घटनेतले हे कलम इतर नागरी कायद्यांच्या आड येते. मूळ कलम बदलणे हाच त्यावर उपाय आहे. माझ्या मते राज्यघटनेने कुठल्याही प्रकारे कुठल्याही धर्माचे अस्तित्व मान्य करू नये कारण त्यामुळेच जो धोका निर्माण झाला आहे तो फार भयानक आहे. आमच्या धर्मात असंच चालतं म्हणून कुणीही काहीही नियम काढेल आणि नागरी कायद्यांतून सूट मागेल.

मतपेटीवर डोळा ठेवून तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी ही गोची करून ठेवली आहे. समान नागरी कायदा हा सर्वोच्च असला पाहिजे. ज्यांना तो मान्य नाही त्यांनी देश त्वरित देश सोडला पाहिजे.

मुस्लिम आपल्या फायद्यानुसार रंग बदलतात हे काही लपून राहिलेले नाही. सर्व मुस्लिम हे अलकायदाचे सदस्य आहेत हे माझ्याच एका मुस्लिम मित्राने मला सांगितले होते. सर्व मुस्लिम आपल्या कमाईतून अलकायदास दान करतात. तो त्यांच्या धार्मिक आचरणाचा भाग आहे. त्याच वेळेला अलकायदा किंवा तत्सम संघटनेने केलेल्या हत्यांचा तोंडदेखला निषेधही करतात.

बाकी इतर मुद्दे मान्य. तरीही कुठल्याही धर्मावर टीका करणे वेगळे आणि निंदानालस्ती, खोचक अपमान करणे वेगळे. शर्ली एब्दोच्या वागणूकीवर जो आक्षेप आहे तो मागे घेऊ शकत नाही.

विटेकर's picture

21 Jan 2015 - 3:59 pm | विटेकर

कॉम्रेड आता थोडे सेन्सीबल बोलू लागले आहेत ! श्रेय तुम्हाला द्यायला हवे . एक हाती चांगली खिंड लढवलीत की !
आम्ही मुद्दामच लांब राहीलो , अस्ल्या राळ उडवण्याने काही होत नाही असा वैयक्तिक अनुभव असल्याने !

संदीप डांगे's picture

21 Jan 2015 - 5:05 pm | संदीप डांगे

आपण बोलतो तोच सेन्स आहे असे मत असणारेच कट्टरवादी म्हटले जातात. इतरांनी आपले मुद्दे केवळ आपण बोललो म्हणून मान्य केले असे समजणे हा केवळ अहंकार आहे.

ह्यापेक्षा वेगळे ह्या लेखातही काही नव्हते म्हणा.

विटेकर's picture

21 Jan 2015 - 5:17 pm | विटेकर

काही गोष्टी वादातीत असतात.
सूर्य पूर्वेकडे नव्हे तर पश्चिमेकडे उगवतो असे म्हणून वाद घालाणार्‍या मूर्खाला काय म्ह्णाल ?
असो , अकारण वेळेचा आणि बाईटचा अपव्यय नको , तो पुरेसा झालाच आहे. कोंबडे झाकले म्ह्णजे सूर्योदय होणार नाही अशा मूर्खोत्तमांनी आपल्या मूर्खांच्या नंदनवनात आनंदाने नांदावे ! आमची अजिबात ना नाही.
शुभेच्छा !! ( आणि मिपाच्या भाषेत - मोठे व्हा .. वाढदिवसाच्या शुभेच्छा !

संदीप डांगे's picture

21 Jan 2015 - 6:35 pm | संदीप डांगे

केवळ आपले मत मानत नाही म्हणून इतरांना मूर्ख ठरवणारे महानच म्हणायला पाहिजेत. दुसऱ्यांना मोठे व्हा चा सल्ला देणाऱ्यांना आपण खरच मोठे झालो आहोत असं वाटत असेल तर आमचीसुद्धा काही ना नाही.
- अजून आपण अंड्यातच आहोत का बाहेर पडलो आहोत याचा शोध घेणारं एक कुरूप वेडं पिल्लू

पिंपातला उंदीर's picture

21 Jan 2015 - 4:31 pm | पिंपातला उंदीर

एखादा धागा ब्लोक कर्ण्याचि सुविधा आहे का मीपा वर

सहमत. धागा वाचनमात्र झाल्यास उत्तम.

संदीप डांगे's picture

21 Jan 2015 - 5:00 pm | संदीप डांगे

सहमत, संपादकांना नम्र निवेदन.

धागा वाचनमात्र करावा अथवा धाग्याचे शीर्षक बदलावे.
माझ्याकडून ह्यापुढे कुठल्याही धाग्याला त्रासदायक नाव देण्यात येणार नाही याची मी काळजी घेईन.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2015 - 4:48 pm | टवाळ कार्टा

३०१
माझा धागा हैज्याक केलात...आता मी बीशीशीआयवर पुढचा हल्ला कर्नार
- फ्रेंच कार्टूनिस्ट आणि त्याला मार्नारा

सामान्य वाचक's picture

21 Jan 2015 - 4:53 pm | सामान्य वाचक

शीर्षक बदला

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 11:12 pm | हाडक्या

डांगेसाहेबांनी बहुदा मुविंच्या धाग्याशी स्पर्धा करायचे ठरवलेले दिसते. अर्धे पर्तिसाद त्यांचेच जणु.

विटेकर's picture

22 Jan 2015 - 9:55 am | विटेकर

बहुधा तसेच असावे !
संक्षींच हा डुआयडी आहे का हो ? तोच आग्रहीपणा तीच चिकाटी , आपल्या मतासाठी मुसंडी मारणे !!!
त्यांच्या आठवणीने गळा दाटून आला अणि पुनर्जन्माच्या सिद्धांतावरील श्रद्धा अधिक दृढ झाली.

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2015 - 12:33 pm | श्रीगुरुजी

+१

>>> तोच आग्रहीपणा तीच चिकाटी , आपल्या मतासाठी मुसंडी मारणे !!!

हे वाक्य असे हवे.

तोच आग्रहीपणा तीच चिकाटी , आपल्या चुकीच्या मतासाठी मुसंडी मारणे !!!

कपिलमुनी's picture

22 Jan 2015 - 3:03 pm | कपिलमुनी

आज सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय सार्वजनिक संस्था आहे असा निकाल दिला .
सविस्तर निकाल आला कि धाग्याला फुंकर घालूच :)

आजानुकर्ण's picture

22 Jan 2015 - 7:29 pm | आजानुकर्ण

चांगला निर्णय. लवकरच बीसीसीआयचा संघ हा खऱ्या अर्थाने भारताचा संघ होईल असे वाटते.

(गुरुजी शेवटचा प्रतिसाद माझाच असणार आहे!)

प्रदीप's picture

22 Jan 2015 - 8:03 pm | प्रदीप

ह्याबाबतीत इतका काथ्याकूट करण्याची खरोखरीच आवश्यकता होती का? बीसीसीआयचा संघ कायदेशीररीत्या भारताचा नसेलही. पण तो भारताचा 'डी फॅक्टो' संघ आहे ना! टेस्ट्स्मधे अधिकृतरीत्या त्या संघाला 'भारत' असेच संबोधले जाते, बीसीसीआय नव्हे. पूर्वी (म्हणजे सुमारे १९६५ सालाअगोदर) इंग्लण्डचा 'अधिकृत संघ' (म्हणजे जो 'इंग्लंड हे नाव धारण करून खेळतो, तो) भारतात येत नसे. तेव्हा त्यांचा जो (दुय्यम दर्जाचा) संघ आपल्याशी खेळे, त्याला एम. सी. सी. (मेरिलेबॉन क्रिकेट क्लब) असे अधिकृत नाव होते. नंतर त्यांच्या मते भारताच्या टेस्ट संघास 'प्रथम दर्जा' प्राप्त झाला. त्यानंतर आपण त्यांच्या 'इंग्लंड' हे नाव धारण करणार्‍या संघाशी खेळत आलो आहोत.

मुळात इथे प्रश्न असाही आहे की, जे कोणी सर्वसाधारण प्रेक्षक भारताची टेस्ट मॅच पाहून त्यातील भारताच्या यशापयाशाविषयी जल्लोष अथवा दु:ख प्रदर्शित करतात, ते वरील 'डी फॅक्टो स्टेटस' मुळे. आता हा संघ अगदी तांत्रिक दृष्ट्या अधिकूत राष्ट्रीय संघ नाही, तसेच (बहुधा) पाकिस्तानचा संघही त्यांचा अधिकृत संघ नाही, इत्यादी तपशिलात ते जातच नाहीत. मला वाटते श्रीगुरूजींची टिपण्णी ह्या सर्वसाधारण प्रेक्षकांविषयी होती.

(आपल्या आयुष्यात अनेक बाबी अशाच 'डी फॅक्टो' असतात, अनेक विषयातील स्टँडर्ड्स सुरूवातीस डी फॅक्टो असतात, पुढे सर्व रीतसर कामकाज संपूर्ण झाल्यावर मग त्यांजवर संबंधित स्टँडर्ड करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेचे शिक्कामोर्तब होते. तसे होईपर्यंत कधीकधी वर्षे लोटतात).

आजानुकर्ण's picture

22 Jan 2015 - 8:12 pm | आजानुकर्ण

तुमचा मुद्दा मान्य आहेच. मी वरही लिहिले होते ते पुन्हा लिहितो. मी स्वतः आवडीने क्रिकेट पाहायचो. आजकाल तितका रस राहिलेला नसला तरी संघाची प्रगती वगैरे पाहतोच. भारतासारख्या राष्ट्रीय स्तरावर कोणतीही एकच एक युनिक आयडेंटिटी नसलेल्या देशाला क्रिकेट-बॉलीवूड वगैरेंसारखे देशाला एकत्र आणण्यासाठी हा खेळ मोठ्या प्रमाणावर उपयुक्तही आहे. निव्वळ खेळातली हारजीत आणि सुखदुःखाच्या हलक्याफुलक्या बाबी असतील तर ठीकच आहे.

पण जेव्हा या चर्चेने देशद्रोहाचे वळण घेतले तेव्हा ह्या सर्व मुद्यांना काहीही अर्थ राहत नाही. देशद्रोह हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. देशाच्या दृष्टीने कदाचित सर्वात गंभीर. शिवाय इंडियन पीनल कोडनुसार या गुन्ह्याची तांत्रिक व्याख्याही आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर देशद्रोहासारखा आरोप होतो तेव्हा तो कोणत्या बेसिसवर होतोय याची तपासणीही आवश्यक आहे. जी संघटना स्वतःला देशाचे अधिकृत प्रतिनिधी मानत नाही त्या संघटनेच्या पेरोलवर काम करणाऱ्या चाकरांनी केलेल्या भ्रष्टाचाराला 'देशाची गद्दारी' मानणे किती हास्यास्पद आहे हेच दाखवून द्यायचे आहे. उद्या असा दावा कोणी केलाच तर कोर्ट तो खटला दाखल तरी करुन घेईल काय? मग उगीच बेणारेबाईंची ट्रायल घेतली त्या स्टाईलने एखादा देशप्रेमी, दुसरा देशद्रोही असे लेबलिंग कशाला करत बसायचे.

प्रदीप's picture

22 Jan 2015 - 9:10 pm | प्रदीप

'देशद्रोह' हे अगदी टोकाचे विशेषण सोडून देऊया, फारतर. पण माझ्या अनुभवानुसार, कुठल्याही पातळीवरील, कुठल्याही खेळातील संघांच्या फॉलोअर्समधे, अ‍ॅलेजियन्सची अगदी तीव्र भावना असते. अगदी गल्लीतील क्रिकेट घ्या. आमच्या हिंदू कॉलनीतील प्रत्येक गल्लीची स्वतःची टीम असायची. आणी दरवर्षी नित्यनेमाने तिथे अंडरआर्म स्पर्धा व्हायच्या. तिथे जर दुसर्‍या गल्लीतील एखाद्या मुलाने, आपल्या विरूद्ध खेळत असलेल्या पहिल्या गल्लीच्या खेळाचे निरालस जाहीर कौतूक तिथल्यातिथे, तुम्ही म्हणता तशा अगदी खेळाचा आनंद घेण्याच्या भावनेतून केले असते, तर त्याचे काय झाले असते, असे वाटते? हे अगदी गल्ली खेळाचे उदाहरण दिले. अगदी इंग्लिश प्रीमियर लीगच्या टीम्सच्या चाहत्यांचेही तसेच असते. तिथेही बापल्या टीममधून कालपर्यंत खेळलेल्या खेळाडूवर त्याच्या जुन्या टीमच्या होमग्राउंडवर, त्याच्या आताच्या नव्या टीमकडून खेळण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याची होणारी हूर्यो आपण पाहतोच की!

खेळ समजून घेऊन, समोरील टीममधील खेळाडूंच्या खेळाचे खाजगीत, व खेळ संपल्यानंतर, कौतूक करणे वेगळे, व तिथल्या तिथेच एका टीमच्या कंपूत बसून समोरील टीमचे गोल झाले की टाळ्या पिटणे वेगळे, नाही का? ज्या व्यक्ति भारताविरूद्धच्या मॅचमधे पाकिस्तान जिंकल्यावर जाहीरपणे फटाके फोडतात, जल्लोष साजरा करतात, त्यांना 'देशद्रोही' नका म्हणू हवे तर, पण त्या व्यक्ति तिथे खेळातील खुबी समजून पाकिस्तानच्या खेळाडूंचे कौतुक करत आहेत, असे तुम्ही नक्कीच मानत नसाल?

आजानुकर्ण's picture

22 Jan 2015 - 9:32 pm | आजानुकर्ण

मतभेद फक्त देशप्रेम आणि देशद्रोह यांबाबतच आहे. हे मुद्दे सोडले तर तुमच्या मताशी सहमती आहेच. खेळ आणि देशप्रेम/देशद्रोह यांचा कुठलाही संबंध दिसत नाही (आणि नसावा). एवढेच म्हणायचे होते.

अर्धवटराव's picture

22 Jan 2015 - 10:41 pm | अर्धवटराव

अवांतर बोलणं सुरु आहे म्हणुन...

देशप्रेम म्हणजे अगदी गांधीटोपी, चरखा, शिक्षकी-डॉक्टर-सैनीक-पोलीस-शेतकरी वगैरे पेशा, किंवा संसद आणि राजकारण नाहि.
तसच, देशद्रोह म्हणजे फक्त सरकारी नोकरीत बेइमानी, सैन्यातुन पळुन जाणे, फितुरी, शत्रु राष्ट्राशी संगनमत वगैरे नाहि.
देशहितास बाधक प्रत्येक गोष्ट देशद्रोहच आहे. खेळाला जर देशाचा टॅग लागला असेल तर त्यात बेईमानी करणं देशद्रोहच आहे. मग ते क्रिकेटचं फिक्सींग असो किंवा खेळाडुंच्या बजेटमधुन पैसे खाणं. बुलेटप्रूफ जॅकेटच्या बजेटच्या पैशाची अफरातफर करणं आणि मॅच फिक्सीं करणं यात फरक (व्हिक्टीमायझेशनच्या)प्रमाणाचा आहे, प्रकाराचा नाहि.

आजानुकर्ण's picture

22 Jan 2015 - 10:57 pm | आजानुकर्ण

अवांतर चालूच आहे आणि देशहिताचा विषय पुन्हा निघालाच आहे तर क्रिकेट हीच देशहितास बाधक गोष्ट आहे असे वाटत नाही का? नाही काय आहे, दहाबारा टाळकी पैशे कमावण्यासाठी त्या चेडूच्या मागे पळत असतात. आणि लाखो लोक प्रॉडक्टिव तास वाया घालवत त्या थेट प्रक्षेपणाचा रतीब पाहत असतात. नक्की देशहिताची व्याख्या कशी करायची बॉ? इथं लवकर रिटायर होणं हादेखील प्रॉडक्टिव वेळेचा अपव्यय असल्याचे दावे तावातावाने केले गेले होते. मग हे म्याच पाहताना वाया गेलेले प्रॉडक्टिव तास कुठं मोजायचे बॉ?

ही मतमतांतरे टाळण्यासाठी इंडियन पीनलकोडनुसार देशद्रोहाची सुस्पष्ट व्याख्या केली आहे. त्यात खेळाडूंचे बजेट, मॅच फिक्सिंग, आयपीएल, बीसीसीआय वगैरे गोष्टींचा काहीही संबंध नाही.

अर्धवटराव's picture

23 Jan 2015 - 12:05 am | अर्धवटराव

देश हि संकल्पनाच अवास्तव आहे, आणि प्रेम व द्रोह हे मानवी मेंदुचे केमीकल लोचे आहेत.
इंडीयन पीनलकोड तर फार लांबची गोष्ट आहे, मुळात न्याय"व्यवस्था" हिच भलिमोठी गफलत आहे. असो.

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2015 - 8:16 pm | श्रीगुरुजी

>>> लवकरच बीसीसीआयचा संघ हा खऱ्या अर्थाने भारताचा संघ होईल असे वाटते.

भारतीय क्रिकेटचा संघ हा बीसीसीआयचा संघ आहे अशी तुमची अजूनही समजूत दिसतेय. हा संघ पूर्वीही भारत या देशाचास संघ होता, आजही आहे आणि उद्याही असेल. हा संघ बीसीसीआयचा संघ कधीच नव्हता. न्यायालयात किंवा इतरत्र कोणी काहीही दावे केले तरी हा भारताचाच संघ होता/आहे/असेल.

आजानुकर्ण's picture

22 Jan 2015 - 8:19 pm | आजानुकर्ण

=))

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2015 - 8:24 pm | श्रीगुरुजी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता तुमच्याकडे कोणताच मुद्दा शिल्लक नाही. तुम्ही फक्त स्मायली टाकू शकता.

:YAHOO:

आजानुकर्ण's picture

22 Jan 2015 - 8:29 pm | आजानुकर्ण

लोल. खऱंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं बीसीसीआयचे राष्ट्रीयीकरण करण्याची प्रक्रिया आता सुलभ झाली आहे. या प्रायवेट कंपनीचे कार्यक्षेत्र सार्वजनिक असल्यामुळे ते प्रा.लि. पासून प.लि. पर्यंत आता करता येईलच. भारताचा ऱाष्ट्रीय झेंडा आणि राष्ट्रपतींशी उत्तरदायित्व असे मुद्देही इन्क्लुड केले की ही खाजगी कंपनी खऱ्या अर्थाने सार्वजनिक होईल.