चोराच्या उलट्या .....

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
16 Jan 2015 - 1:20 pm
गाभा: 

माझ्या एका मित्राने ...मोबाईल चोरताना रंगेहाथ एका चोराला पकडला ट्रेन मध्ये, मग हिरो स्टाइल त्याला घेवून दोघे तिघे पोलिस स्टेशन मध्ये गेले .....अपेक्षा हि, कि आता त्याला ताबडतोब आत टाकतील आणि चोप चोप चोपतील.
ड्यूटी ऑफिसर शांत पणे म्हणाला, तुमच्या पैकी फिर्याद जर कोणी नोंदवली तरच आम्ही यावर कारवाई करू किंवा याला सोडून देवू ....कामाचा खाडा कोण करेल म्हणून बरोबरचे, निघून गेले.
मित्राचा ! स्वतःचा फोन असल्यामुळे आणि तो ही महागडा, त्याने सगळी कारवाई पूर्ण केली आणि साहेबांना विचारले, माझा फोन आता मी नेवू शकतो का ?
साहेब म्हणले ! येडा झाला का तू ....आता तो कोर्टात सादर करावा लागेल पुरावा म्हणून
तुला तुझा फोन हवा असेल तर, एफीडेवीट करून आण....
दुसर्या दिवशी वकिलाला ३०० रु देवून मित्र एफीडेवीट करून पोलिस स्टेशन मध्ये गेला मोबाईल आणायला.
हवालदार साहेब म्हणले ! साहेब तुमचा फोन घेवून लग्न निमित्त गावाला गेलेत, तुमचा लेटेस्ट पीस होता ना, साहेबाना खूप आवडला ४ दिवसांनी येवून घेवून जा .....
दरम्यान चोर महाशय, त्याच दिवशी जामिनावर सुटले असेही कळले आमच्या मित्रवर्यांना.............!

सन्दर्भ- विकास वडनेरे

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2015 - 1:22 pm | धर्मराजमुटके

कोणत्या शहरातली घटना म्हणायची ही ?

उडन खटोला's picture

16 Jan 2015 - 1:24 pm | उडन खटोला

महामुंबई

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2015 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा

राम राम राम!

hitesh's picture

16 Jan 2015 - 2:50 pm | hitesh

सेना , भाजपा , फडणवीस , मोदी...

अच्छे दिन आये

प्रदीप's picture

16 Jan 2015 - 2:54 pm | प्रदीप

. hitesh..

You've lost your pebbles already?

नाखु's picture

16 Jan 2015 - 3:11 pm | नाखु

आमचे येथे कशाचाही कुणाशीही,कसाही बादरायण संबंध लावून मिळेल.

fitesh
बळचकर नगर
ता :जोडवाडा
जि:जुनीखोड

उखजी तुमचा मित्र खोटं बोलतोया
मला 3 दिवसांनंतर जामीन मिळाला बघा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Jan 2015 - 10:41 am | माईसाहेब कुरसूंदीकर

माहिती तंत्रज्ञानाशी नेहमी फटकून वागणारी पोलिस मंडळी असे जुळवून घेतील अशी अपेक्षा नव्हती.असो,
खटोल्या, तो फोन नोट-४ होता की आय.फोन की तो कुठला ब्लेकबेरी?

अरे व्वा माईनी त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवलय की.
नोट ४ / आयफोन ५ / ब्ल्याकबेरी
माई लुमियाचा विन्डो फोन वापरून बघा..... लै भारी वाट्टेल तुम्हाला.