अमृतसर म्हणताच डोळ्यापुढे येते ते जलियाँवाला बाग, सुवर्णमंदिर आणि अटारी सरहद्द.
अमृतसरला मध्ये भटकंतीत अग्रक्रम अर्थातच जलियाँवाला बागेचा.
जनरल डायरच्या हत्यारी पलटणी या निमुळत्या बोळातुन आत शिरल्या.
जिथे फुलांच्या कुंड्या ठेवल्या आहेत तिथेच बहुधा फौजा पवित्रा घेउन सज्ज झाल्या असाव्यात
समोरचे विस्तिर्ण उद्यान दिसत आहे जिथे सभेला २०००० लोक जमले होते
या जागेवरुन डायरच्या हुकुमानुसार बेछुट गोळीबार केला गेला
नृशंस गोळीबाराची सजीव प्रतिके
अंदाधुंद गोळीबाराच्या खुणा.
गोळीबारातुन जीव वाचवण्यासाठी अनेकांनी कोपर्यातल्या विहीरीत उड्या घेतल्या, अनेक जण अनवधानाने त्या जमिनीलगतच असलेल्या विहीरीत पडले असतील. विहीरीतून १२० मृतदेह काढले गेले.
मृतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेले स्मारक
दिनांक १३ एप्रिल १९६१ रोजी ही अमरज्योत तेवू लागली
प्रेक्षादालनात लावलेले भीषण संहाराचे तैलचित्र.
या नरसंहाराचा प्रतिशोध घेणार्या पंजाब शार्दूल हुतात्मा उधमसिंग यांचे चित्र.
इथे एक छोटेसे संग्रहालय आहे ज्यात अनेक चित्रे, लेखन वृत्तांत वगैरे आहे, हुतात्मा उधमसिंग यांचा रक्षाकलशही आहे. मात्र इथे चित्रणास मनाई आहे.
प्रतिक्रिया
23 Nov 2014 - 2:46 pm | दिपक.कुवेत
जलियाँवाला बागेची चित्र पहिल्यांदाच पहात आहे. त्या बागेचा ईतिहास पाहता....त्या क्षणी तिथे असलेल्या लोकांची काय मनस्थीती झाली असेल हे आठवुनच काटा येतो.
23 Nov 2014 - 5:09 pm | स्वाती दिनेश
खूप वर्षांपूर्वी अमृतसरला गेले होते, त्याची आठवण ताजी झाली..
फोटो नेहमीप्रमाणेच साक्षी टच!
पुढील फोटो व वर्णनाच्या प्रतीक्षेत,
स्वाती
23 Nov 2014 - 7:08 pm | सुहास झेले
ती घटना आजही आठवली की ... :(
फोटो सुंदरच.... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :)
23 Nov 2014 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
फार पूर्वी जालियनवाला बागेला दिलेल्या भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या :( . :( . :(
24 Nov 2014 - 11:43 am | मदनबाण
:(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
29 Dec 2014 - 1:19 pm | पियुशा
फोटो सुरेख आहेत . पण भिषण अन सुन्न कर्नारा इतिहास आहे या बागेचा :(
11 Jan 2015 - 1:49 am | निनाद मुक्काम प...
जर्मन त्यांच्याकडे झालेल्या हत्या कांडाचे जगभर प्रदर्शन करतात
त्याच धर्तीवर जगभर भारताने इंग्रजी साम्राज्याच्या अत्याचारांच्या कहाण्या जगभर दाखविल्या पाहिजे ,
साम्राज्य शाहीला विरोध अमेरिका व रशियाला ला शांतताप्रिय भारत जगभरात एक पर्याय म्हणून नक्की उभा राहू शकतो
पुढील २५ वर्षात
11 Jan 2015 - 12:14 pm | टवाळ कार्टा
लैच आशावादी बुवा तुम्ही...अब्दुल कलामांच्या मिशन २०२० चे काय करुन ठेवले ते बघितले ना
11 Jan 2015 - 1:49 am | निनाद मुक्काम प...
जर्मन त्यांच्याकडे झालेल्या हत्या कांडाचे जगभर प्रदर्शन करतात
त्याच धर्तीवर जगभर भारताने इंग्रजी साम्राज्याच्या अत्याचारांच्या कहाण्या जगभर दाखविल्या पाहिजे ,
साम्राज्य शाहीला विरोध अमेरिका व रशियाला ला शांतताप्रिय भारत जगभरात एक पर्याय म्हणून नक्की उभा राहू शकतो
पुढील २५ वर्षात