नमस्कार मिपाकरांनो,
इंटरनेटवर सल्ला मागण्याची आणि मिपा वर लिहिण्याची ही माझही पहिलीच वेळ, अपेक्षा आहे कि तुम्ही सांभाळून घ्याल ….
मी मुंबईला Sep २०१० ते Sep २०१२ एका IT कंपनी मध्ये काम करत होतो. काम सोडताना रीतसर सोडलं आणि नवीन MNC कंपनी जॉईन केली.
परंतु आता अडीच वर्ष झले तरीही जुन्या कंपनी कडून FnF पेंडिंग आहे साधारण १,००,०००/- (२ महिन्याची salary) कंपनी सोडल्यावर ८-१० महीन्यांनी योग्य ती PF रक्कम मिळाली परंतु अजूनही वरती सांगितल्या प्रमाणे दोन महिन्यांचा संपूर्ण पगार बाकी आहे.
अनेक वेळा व्यवस्थापनाला मेल केले तरी अपेक्षित उत्तर नाही " आम्ही लवकरात लवकर payment clear करू आणि धीर ठेवल्याबद्दल धन्यवाद " असा tipical उत्तर देतात, आम्ही साधारण १५ - २० ex-employee अशी situation face करत आहोत. जुनी कंपनीचा employee count साधारण २०० -२५० होता.
प्रतिक्रिया
7 Jan 2015 - 6:09 am | अत्रन्गि पाउस
हेच खूप आहे ...ताबडतोब कायदेशीर सल्ला घ्या ...१५ २० जण म्हणजे १०% लोकांचा दबावगट ह्याचा फरक पडेल
आणि प्रत्येक बारीक सारीक मेल्स चे छापील प्रत वगैरे तयार ठेवा...
पीएफ मिळाला कारण तो सरकारी खात्याकडून मिळाला आहे ...त्यात विशेष नाही ...
7 Jan 2015 - 7:59 am | स्पंदना
सगळ्यांनी मिळुन एक वकिल नेमा आणि पहिला एक नोटिस पाठवा.
7 Jan 2015 - 11:22 am | प्रसाद१९७१
हे मला सरळसरळ पैसे देणे टाळणे आहे असे दिसते आहे.
तुम्ही १०-१५ लोक आहात, प्रत्येकानी एक-एक वेळा कंपनीत धडक मारुन यायची आणि जमेल त्या लोकांना प्रश्न विचारुन त्रास द्यायचा. कोणी सीइओ वगैरे असेल त्याला भेटण्याचा प्रयत्न करायचा.
फेसबुक वगैरे वरुन ही वस्तुस्थिती सारखी सारखी पब्लिश करायची.
7 Jan 2015 - 12:09 pm | सार्थबोध
कंपनीतील, लोकांचे मैल घ्य अकौंट, एच आर, सी.इ. ओ सगळ्यांना एकत्र मेल करा, एकत्र येउन एकाच वेळी एक वकील गाठ, त्याचे पैसे - आधीच इतके लोक आहेत म्हणून कमी पैशात ठरवून घ्या, ३/४ वकील बघा, अंदाज घ्या, कंपनीला एकदम १०/१२ नोटीस जाऊ द्या, मग FB वर त्यान्ह्च्य पेज वर हकीकत टाका, पैसे मागताना आता व्याजासकट मग, हे विसरू नका बरेचसे वर प्रतिक्रियात आले आहेच, वेळ मिळाल्यास २/३ , २/३ जन तिथे जाऊन जर रिसेप्शन वर दंगा करून या, हे जर जिकीरीचे आहे मात्र,
7 Jan 2015 - 12:33 pm | जय२७८१
सध्या तरी वकीला कडे जाऊन पैसे वाया घालऊ नका. सर्व प्रथम तुमच्या office च्या भागातील Labour Officer ला लेखी तक्रार करा व त्याची एक प्रत Commissioner of Labour (M.S.) ला हि पाठवा. Commissioner of Labour (M.S.) रवाना असे हि लिहा.
तुमच्या सोयी साठी हि http://mahakamgar.gov.in/MahLabour/lc-contact-us.htm#Mumbai लिंक देतो आहे. ह्या द्वारे तुम्हाला तुमच्या भागातील Labour ऑफिसर चा नावासहित सर्व माहिती मिळेल.
हि तक्रार केल्यावर लगेच तुमच्या कंपनीला Labour Officer बोलऊन घेतील.
7 Jan 2015 - 12:34 pm | प्रसाद गोडबोले
कोर्टात जावा ... सव्याज पैसा वसुल करा .
7 Jan 2015 - 5:38 pm | योगेश९८८१
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...
जय यांनी दिलेल्या लिंक प्रमाणे मी फोन वर संबंधित अधिकार्यांना कळवले आणि त्यांनी एक लेखी अर्ज द्यायला सांगितलाय मी लवकरच ते करीन …. पुन्हा एकदा धन्यवाद …
7 Jan 2015 - 5:56 pm | कपिलमुनी
सेम परिस्थीती होती
१. लिंक्डईन , फेसबूक , ट्विटरवर (सभ्य भाषेत) बोंब ठोका !
२. पोलिस तक्रार करा ..१००-५०० देवून १-२ फोन करायला लावा . याने बरेच काम होते.
३.Labour Officer कडे तक्रार करा.
४. एखादा वसुलीभाई गाठा
7 Jan 2015 - 6:35 pm | मोदक
२. पोलिस तक्रार करा ..१००-५०० देवून १-२ फोन करायला लावा . याने बरेच काम होते.
मग पोलीसाकडे ५०० रू. कशाला वाया घालवा..? "कॉन्स्टेबल गायकवाड" म्हणून आपणच बिन्धास्त कॉलवायचे.
फोनवर थोडेच आयडीप्रूफ मागणार आहेत..? ;)
7 Jan 2015 - 6:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
7 Jan 2015 - 7:14 pm | आनन्दा
ते जर फसले तर तो सायबर क्राईम होतो.
8 Jan 2015 - 1:27 pm | मोदक
अनेक पळवाटा असतात.
आणि या परिस्थितीमध्ये अशा सायबर क्राईम साठी कंपनी कोर्टात जाईल याची खूप कमी शक्यता असते.
डिस्क्लेमर - आपापल्या जबाबदारीवर वरील उपाय करावा. :)
7 Jan 2015 - 8:05 pm | योगेश९८८१
सोनाराने कान टोचलेले बरे
8 Jan 2015 - 9:46 am | चिरोटा
नॅसकॉमवाले काही करू शकतात का ? की ते फक्त कंपन्यांचेच हीत बघतात?वर म्हंटल्याप्रमाणे कंपनी पैसे द्ययला टाळाटाळ करते आहे.
अवांतर- आपण कंपनीत कामाला सुरुवात केलीत तेव्हा कुठला बॉन्ड वगैरे साईन केला होता का?
8 Jan 2015 - 5:36 pm | योगेश९८८१
कोणत्याही बॉन्ड किवा अटीशी मी बांधील नाही
8 Jan 2015 - 12:26 pm | जय२७८१
योगेश,Labour Officer पुढे काय करतोय ते जरूर कळवा. या पुढील उपाय हि आहेत आपल्या कडे मात्र ते सध्या नको.
8 Jan 2015 - 7:25 pm | सर्वसाक्षी
खालील लोकांना भेटा.
१) शॉप्स अॅण्ड एस्टाब्लिश्मेंट
२) कामगार कल्याण अधिकारी
३) भविष्य निर्वाह निधी
४) कारखाना निरिक्षक
या लोकांना कंपन्यांना दम द्यायचा अधिकार असतो आणि तसे केल्याने त्यांचा फायदाच असतो. हे लोक असे काम अवश्य करतात. मागे एकदा विमानतळावर रिक्शावाल्याने अवास्तव पैसे मागितल्यावर आमची वादावादी पाहायला एक वाहतुक पोलिस आला. हकिकत ऐकताच त्याने मला जा म्हणुन सांगितले - पैसे न देता. त्याने त्या रिक्शावाल्याकडुन मस्त वसूल केले असतील.
हे लोक एक कळीचं वाक्य तुमच्या मालक मंडळींना ऐकवतील - "आम्हाला कोर्टात जायचा पगार मिळतो, तुम्हाला काम धंदा सोडुन खेटे घालावे लागतील शिवाय एखादा खमका न्यायाधिश तुमच्या वकिलाला न पुसता मालकाला हजर करा असे सांगु शकतो. जर कर्मचार्यांचे पैसे बुडवल्यासाठी तुम्हाला कोर्टात उभे राहावे लागल्याची बातमी पेपरात आली, तर बदनामी तुमची होइल"
या लोकांना कंपन्यांना अडचणीत आणण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आणि माहित असतात. आपण पुरावे जोडलेला अर्ज घेउन या कचेर्यांमध्ये जा आणि पाहाच.
पी एफ ला विशेष घाबरतात. जर सेक्शन ७ ची इन्क्वायरी लागली तर महागात जाते.
सर्वांनी मिळुन एक साधारण, महाग नसलेला पण बरे ज्ञान असलेला वकिल गाठा आणि कंपनीला वाईंड अप नोटीस द्या. याचा अर्थ असा की आमचे पैसे द्यायला ही कंपनी समर्थ नसेल तर यांची मालमत्ता विका आणि ते द्यायला लावा अशी न्यायालयाला विनंती.
9 Jan 2015 - 6:43 am | पाषाणभेद
खालील लोकांना भेटा.
१) शॉप्स अॅण्ड एस्टाब्लिश्मेंट
२) कामगार कल्याण अधिकारी
३) भविष्य निर्वाह निधी
४) कारखाना निरिक्षक
हा उपाय सर्वात उत्तम आणि लागू होणारा आहे. मी आजमावलेला आहे. काहीही पैसे न देता काम झाले.
9 Jan 2015 - 8:36 pm | श्रीगुरुजी
ग्राहक न्यायालयात सुद्धा तक्रार करता येईल.
10 Jan 2015 - 3:40 pm | ज्ञानोबाचे पैजार
कंपनीच्या एम डीं बरोबर प्रत्यक्ष किंवा फोन वरुन अतिशय नम्र भाषेत बोलुन पहा. बाकी कोणाबरोबरही नाही. एच आर बरोबर तर मुळीच नाही. त्यांच्याकडुन तुम्हाला काहीतरी आश्वासन मिळेलच. त्यांना ताबडतोब एक धन्यवाद देणारे मेल टाकुन त्यात झालेल्या संभाषणाचा सारांश लिहावा. त्या आश्वासनाचा व्यवस्थीत पाठपुरावा करा.
या नंतरही जर काही हलचाल झाली नाही तर एम डीं च्या नावानेच रजि ए.डी. ने स्मरणपत्र पाठवुन द्यायची व त्याची प्रत लेबर ऑफिस मधे पाठवायची. एच आर ला प्रत सुध्दा द्यायची नाही. पाकिटावर खाजगी आणि गोपनीय असा उल्लेख न विसरता करायचा. अशी किमान ३ पत्रे झाल्यावर वकिल गाठुन लिगल नोटीस द्यायची व वकीलाच्या खर्च सुध्दा कंपनी कडून वसुल करायचा.
पैजारबुवा,
7 Feb 2015 - 1:40 pm | अत्रन्गि पाउस
सांगा कि ....बाकीच्यांना पण फायदा होईल पुढे मागे !!