रगडा पॅटीस

आकांक्षा's picture
आकांक्षा in पाककृती
7 Nov 2008 - 6:02 am

साहित्यः (२ जणांसाठी)
पॅटीस करिता :३ उकडलेले बटाटे, हळद, मीठ, रवा.
रगडया करिता : २ वाटया उकडलेला हिरवा वाटाणा, १ मोठा टोमॅटो, १ मोठा कांदा, बारिक केलेला आल - लसुण (अंदाजे), मीठ, फोडणी साहित्य, तेल, लिंबाचा रस (आवडीनुसार), चिंच खजुर चट्णी, दही.
सजावटीसाठी: बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आणि बारिक शेव.
कृति: प्रथम बटाटे कुसकरुन घ्यावे. त्यात मीठ, हळद घालावे व मळून घ्यावे. उभे चप्पट असा आकार देऊन कटलेट सारखे बनवुन घ्यावे.
कढई मध्ये तेल गरम करुन घ्या. त्यात मोहरी टाका, तडतडली की त्यात कांदा टाका, गुलाबी झाला की बारिक केलेल आल लसुण टाका, मग टोमॅटो टाका. थोड परतुन घ्या. मग हळद, तिखट, गरम मसाला घाला. आता त्यात उकडलेले हिरवे वाटाणे घाला. मीठ घाला व पाणी घालून उकळी आणा. थोडी दाट झाली की गॅस बंद करा.
आता तयार केलेले पॅटीस रव्या मध्ये घोळ्वुन तव्यावर थोडया तेलात पालटुन घ्यावे आणि एका वाडग्यात २ पॅटीस काढुन घ्यावे. त्यावर गरम केलेला रगडा घालावा. चवीनुसार चिंचेची चटणी घालावी. थोड दही घाला ( अस खाण्यात, खुप छान लागत). त्यावर बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, शेव आणि कोथिंबीर घाला आणि खायला दया.

थोड चमचमीत आवडत असल्यास रगडा तिखट करा.

:W

प्रतिक्रिया

चकली's picture

7 Nov 2008 - 6:24 am | चकली

माझा अतिशय आवडीचा पदार्थ आहे हा! रेसिपी छान आहे.

चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

वा वा!

अतिशय उत्तम पाकृ.. प्लीज फोटूही द्या..

तात्या.

टारझन's picture

7 Nov 2008 - 2:21 pm | टारझन

एका राजस्थानी भैयाच्या हातगाडीवर जा !! ३-४ रगडा पॅटिस ऑर्डर करा .. आणि दाबुन चेपा !!

रगडा पॅटीस आणि पाणिपुरी आमचे विक पॉइंट आहेत

-टारगडा पॅटिस
भोलेश्वर भेल-पाणिपुरी सेंटर,
हमारे यहां शादी और पार्टी के ओरडर* लिये जाते है .
(अनिल कपुर ..................... माधुरी दिक्षीत )

रेवती's picture

7 Nov 2008 - 8:22 pm | रेवती

करणारे. मी पांढरे वाटाणे वापरते आकांक्षाताई.
हिरव्या व पांढर्‍या वाटाण्यात काय नक्की फरक आहे माहित नाही पण आपण जो बाहेर र. पॅ. बघतो त्यात पांढरे वाटाणे असतात.

रेवती

आकांक्षा's picture

7 Nov 2008 - 8:37 pm | आकांक्षा

फरक फक्त चवीत लागतो. पण तुम्हाला तसे आवडत असल्यास तसे करा. आणि कळवा बर का ! :)

रेवती's picture

7 Nov 2008 - 8:58 pm | रेवती

फोटू देइन. :)

रेवती

प्राजु's picture

7 Nov 2008 - 8:25 pm | प्राजु

मी ही पांढरे वाटाणेच वापरते. खूप ठिकाणी छोले म्हणजे काबुली चण्याचा रगडाही खाल्ला आहे. तो ही मस्त लागतो. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनस्वी's picture

7 Nov 2008 - 8:26 pm | मनस्वी

छानच रेसिपी. अजून येउदेत.
पाणीपुरीचे गाडीवर मिळते तसे पाणी कसे बनवावे?

स्वाती दिनेश's picture

7 Nov 2008 - 9:18 pm | स्वाती दिनेश

मी ही पांढरे वाटाणेच वापरते,आणि करायची पध्दत थोडी वेगळी आहे.
मनस्वी, पाणीपुरी पेठकरांनी दिलीय बघ..
स्वाती

मनस्वी's picture

7 Nov 2008 - 9:40 pm | मनस्वी

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
धन्यवाद स्वातीताई. वाचनखूण केली :)