आत्ता म.टा. चाळत असताना "महाराष्ट्राबाहेर एकही परीक्षा जाऊ देणार नाही!" ही बातमी वाचण्यात आली. हे उद्गार अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे आहेत :-)
बाकी त्यांचे राजकारण अथवा राज्य चालवण्याची पद्धत (?) मला मान्य नसली तरी त्यांचे हे वाक्य कुठेतरी पटले: "महाराष्ट्रात मध्यंतरी परप्रांतियांना मारहाण झाली, अनेक उद्योग बंद पडले. पण, ते सुरू करण्यासाठी स्थानिक कामगार मिळाले नाहीत. आमचा मराठी माणूस ती कामे करण्यास तयार नाही! एखादा उद्योग बंद पाडणे म्हणजे न्याय मिळवून देणे नव्हे" ह्या वाक्यात तथ्य आहे असे वाटते.
तर आपल्याला काय वाटते? आपला अनुभव/निरीक्षण आदी येथे सांगू शकलात तर बरे होईल. ही चर्चा राजला चूक ठरवण्यासाठी नक्कीच नाही. राजने आंदोलन केले म्हणून आता काँग्रेसचे असूनही मुख्यमंत्र्यांना, "मी मराठीविरोधी नाही. स्थानिकांना रोजगार मिळालेच पाहिजेत" असे बोलावे लागत आहे. (कदाचीत परवानगी मिळायला वेळ लागला असेल म्हणून उशीरा बोलताहेत इतकेच ;) ) तर हा विषय आपण मराठी माणसे कामे करायला पुढे असतो का ह्या संदर्भात आहे. आणि अशी कामे जी बाहेरून लोंढे येऊन महाराष्ट्रात करत आहेत... (साहेबांच्या बारामतीच्या म्हशी सांभाळण्यापासून...)
प्रतिक्रिया
7 Nov 2008 - 9:41 am | वासुनाना आले
X( साले सर्व कोग्रेस् नेते एक जात **त शेपुत घाले
त्यांना काय कळ्नार मराठि मनाची वेदना
साला त्यांना आपलि व्होट बॅक प्यारी आहे
म्हनुन महराष्ट्राचा खेळ खंडोबा झाला आहे
मी मराठीविरोधी नाही. स्थानिकांना रोजगार मिळालेच पाहिजेत" असे बोलावे लागत आहे. कदाचीत परवानगी मिळायला वेळ लागला असेल म्हणून उशीरा बोलताहेत इतकेच
शेवटी एकदा बैलांना बाई कडुन बोलावयाची परवानगी मिळालि वाटत
साहेबांच्या बारामतीच्या म्हशी सांभाळण्यापासून
टोनग्याच्या म्हशी सुध्धा ते (परप्रांतिय) साभांळ्तात
हे दैवा दुर्दैव आहे :(
7 Nov 2008 - 10:02 am | सहज
आपला अनुभव/निरीक्षण >>
एका खाजगी अभियांत्रीकी कारखान्यात, रात्रपाळीला अंगमेहनीच्या कामाला बहुसंख्य मराठी तरुण टिकायचे नाहीत तिथे फक्त बिहारी, उप्र व कन्नड कामगार काम करायचे. कित्येक मराठी कामगार काम करायला यायचे पण आठड्यात पळून जायचे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्या कामाला रात्रपाळीत व ओव्हरटाईम दुप्पट पगार मिळायचा.
अर्थात ज्यांनी ते काम नाकारले त्या मराठी तरुणांना दुसरे काम मिळत असेल म्हणुन त्यांना करावेसे वाटत नाही हे मान्य केले [व त्यांनी ते करावे असा आग्रह नाही.] पण मग अश्या कारखान्यात बिहारी, उप्र व कन्नड कामगारांना प्राधान्य व प्रमोशन मिळाले तर काही तक्रार करु नये. शेवटी शो मस्ट गो ऑन!
अर्थात हे झाले खाजगी पण सरकारी नोकरीत [उदा रेल्वे] मला वाटते ज्या राज्यातील जागा भरती आहे त्या जागेसाठी त्या राज्यातील लोकांना भरती केले जावे.
पोट भरायला आलेल्या लोकांना केवळ परप्रांतीय म्हणून बदण्यात काय अर्थ?
खरे तर कुठल्याही शहरात स्थलांतर प्रमाणाबाहेर [त्या शहरातील उपलब्ध साधनसंपत्ती, वीज, पाणी, जागा, रोजगार संधी व मनुष्यबळ] होउ नये यावर काहीतरी उपाययोजना केली पाहीजे.
7 Nov 2008 - 11:29 am | llपुण्याचे पेशवेll
सर्व साधारणपणे ज्या माणसाचे कुटुंब इथे असते त्याला कायम रात्रपाळी करणे वगैरे गोष्टी शक्य नसतात. कायम १२-१२ तास काम करणेही शक्य नसते कारण त्याना घरची सुधा कामे असतात. अशावेळी केवळ पैसा मिळवण्यासाठी आलेले लोक १२-१२ तास काम करतील, रात्रपाळ्या करतील यात कौतुक ते काय. महाराष्ट्रातील आपल्या पूर्वीच्या २ पिढ्यांपूर्वी परीस्थिती अशीच होती. लोक आपले गाव सोडून ठीक ठीकाणी स्थायिक होऊन राहीले होते. साधारण पणे १९४० सालापासून महाराष्ट्रात उद्योगधंदे यायला सुरूवात झाली. किर्लोस्करांचे कारखाने इतर अनेक कापड गिरण्या. यात काम करणारा बहुसंख्य नव्हे ९८% मराठी माणूसच होता. भांडवलदार असतीलही कदाचित परप्रांतीय पण काम करणारा वर्ग मराठीच होता. महाराष्ट्रात अनेक ठीकाणी उदा. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगबाद, मुंबई, नवी मुंबई येथे मोठे मोठे उद्योगसमूह उभे राहीले, विस्तारले, समृद्ध झाले. कारण काय? कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधांचा आधार आणि मुख्यत्वे राजकीय पाठींबा. मग ज्या लोकांच्या २-२ पिढ्या एखाद्या उद्योगात काम करून पिकल्या आहेत अशांच्या मुलांना त्या नोकर्या देणे रास्त का केवळ स्वस्त पडते म्हणून बिहारी आणि उ. प्र. वाले लेबर वापरणे चांगले?
जे वर्क कल्चर आपल्याकडे आहे तसे उ.प्र. आणि बिहार मधे नाही. तिथे सगळी गुंडगिरी आहे. त्यामुळे जेव्हा ते लोक इकडे येतात तेव्हा तिथली ही संस्कृती घेऊन येतात. या गरीब लोकाना का मारताय अशा विचारणार्या लोकाना असा प्रश्न विचारणार्या लोकाना असे विचारावेसे वाटते की हेच गरीब लोक लालू, पास्वान सारख्याना निवडून देतात ना?
जन्मापासून मुंबईत राहूनही हेच लोक म्हणतात ना 'हम यूपी के है हम अपनी भासा बोलेंगे'(हे केवळ जयाचे वाक्य नाही टी.व्ही. वर दाखवलेले एका चाळीतल्या उ.प्र. कन्येचे वाक्य आहे) मग अशा मुलांचा मुलाहिजा कोण करतो?
पुण्याचे पेशवे
8 Nov 2008 - 2:49 pm | ऋषिकेश
सहमत!
मराठी माणूस अमराठी प्रदेशात जेव्हा "एकटा" जातो तेव्हा तो ही काम करतोच.. प्रस्तुत चर्चाप्रस्तावात तुलना चुकीच्या आधारावर/गृहितकावर आहे. परप्रांतिय जो एकटा आहे, फक्त पैसा कमवायला आला आहे आणि इथला मराठी माणूस जो सहकुटुंब राहतो आहे, त्याला नोकरी व्यतिरिक्त अनेक व्याप आहेत त्याने १२-१५ तास काम करावे अश्या कारणाने जर कंपन्या बाहेरच्यांना नोकर्या देणार असेल तर ते सामाजिक-मानसिकदृष्ट्या हानिकारक वाटते.
याचा अर्थ जरी बाहेरच्यांना येणार्यास मज्जाव करावा असा होत नसला तरी इथल्या लोकांना डावलून त्यांना नोकर्या देता कामा नयेत. कंपन्यांनी/उद्योजकांनी आणि सरकारने मिळून स्थानिक व्यक्तींना आवश्यक ते प्रशिक्षण मिळेल याची तजवीज केली तर हा प्रश्न कुठेच उद्भवणार नाहि असे वाटते.
स्वगतः पण मग उद्या अमेरिकन कोडींग नीट करू लागले तर तुझा जॉब गेला समज ;)
-(स्थानिक) ऋषिकेश
7 Nov 2008 - 12:41 pm | वासुनाना आले
जन्मापासून मुंबईत राहूनही हेच लोक म्हणतात ना 'हम यूपी के है हम अपनी भासा बोलेंगे'(हे केवळ जयाचे वाक्य नाही टी.व्ही. वर दाखवलेले एका चाळीतल्या उ.प्र. कन्येचे वाक्य आहे) मग अशा मुलांचा मुलाहिजा कोण करतो?
अश्याना काय करायचे सांगा
किर्लोस्करांचे कारखाने इतर अनेक कापड गिरण्या. यात काम करणारा बहुसंख्य नव्हे ९८% मराठी माणूसच होता.
पण काही स्वयंघोशीत गिरणी कामगार नेत्यांनी त्या मराठी माणसाला भिकेला लावले
त्याला रस्त्यावर आणले नंतर ते कोणी राजकारणात गेले तर कोणी ढगात गेले
छंद - पलंगतोड पान खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही
7 Nov 2008 - 1:22 pm | अनामिका
विलासराव!गाढ निद्रेतुन बाहेर आले म्हणायचे?
पण बैल गेला आणि झोपा केला "करुन उपयोग काय्?लालु ला जे करायचे होते ते त्याने करुन दाखवले.हे मात्र सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावत बसले .तसे पाहता मराठी संस्कृती आणि ह्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही.
गांधी घराण्याची आणि पर्यायाने काँग्रेसची हुजरेगीरी करण्यात आणि आपल्याच स्वभाषिकांवर दंडेलशाही करण्यात उभी हयात घालवली .आता यांनी माय मराठीच्या आणि मराठी अस्मितेच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या पेद्रट खांद्यावर घेतल्याचा उगा आव आणु नये.सरळ खुर्ची रिकामी करावी आणि लातुरचा रस्ता धरावा व तेथे जाऊन थंड बसावे आणि तसे नसेल करायचे तर बिहार मधे जाऊन त्या नतद्रष्ट लालु आणि पासवानच्या पिकदाण्या हाती धरावीत तेव्हढीच लायकी उरली आहे यांची .तसे देखिल बाकी काही नसले तर १० जनपथ वर कपबश्या मिसळण्याचे काम करण्यात हे वाकबगार आहेतच.
महाराष्ट्राचे वाटोळे करायला लालु आणि पासवान सारखे बाहेरचे नेते कशाला हवेत ?विलास आणि शरद ही जोडगोळी असल्यावर.
जे झाले ते खुप झाले.आता मराठी माणसाच्या जखमेवर औषध लावायचा प्रयत्न करु नका.काहि उपयोग व्हायचा नाही .तुम्हां काँग्रेसींना आणि त्या तुमच्या आघाडिला दाती तृण धरुन इथुन जायला भाग पाडतो कि नाही ते बघाच तुम्ही!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
7 Nov 2008 - 2:30 pm | घाशीराम कोतवाल १.२
१० जनपथ वर कपबश्या मिसळण्याचे काम करण्यात हे वाकबगार आहेतच
महाराष्ट्राचे वाटोळे करायला विलास आणि शरद ही जोडगोळी खुप आहे.
वा अनामिका काय सणसणीत हाणलिस असच हाण म्हण्जे होणार नाही अशी परत घाण
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
7 Nov 2008 - 6:24 pm | अवलिया
हा विषय आपण मराठी माणसे कामे करायला पुढे असतो का ह्या संदर्भात आहे.
माझ्या मते आपण सर्व जण (मिसळपाववरील वावरणारे तरी) मराठी आहोत असे मी समजतो. शितावरुन भाताची परिक्षा या न्यायाने सांगा बरे आपण कामाला नाही म्हणतो का?
मी तरी कामाची लाज बाळगत नाही. मला असे वाटते आपणही तसेच असाल. त्यामुळे मराठी माणुस कामचुकार आहे हा आक्षेप अजिबात मान्य नाही. कोणाच्या काही विशिष्ठ कामासंबंधी काही धारणा असतील त्यांना कामचुकारपणा असे संबोधणे चुकीचे राहिल असे मला वाटते. कारण मी सुद्धा काही वैयक्तिक कारणांनी काही कामे टाळली आहेत किंवा काही कामे स्विकारण्यास नकार देतो.
त्यामुळे मराठी माणुस कामचुकार अजिबात मान्य नाही.
बाकी तुमचे चालु द्या.
(मराठी)नाना
19 Nov 2008 - 4:48 pm | अनामिका
नाना आपण मराठी माणसे कामचुकार आहोत अश्या प्रकारचा जो अपप्रचार चालला आहे सध्या मला तो मान्य नाहि.
माझ्या वडिलांवरुन मी हे नक्की सांगु शकते कि हे धादांत खोटे आहे.माझे वडिल ठाण्यातील टेक्सन कंपनीत होते.१९७९ ते१९८१ या कालावधीत त्यांना जर्मनी येथे कंपनी तर्फे तांत्रिक शक्षणासाठी पाठविण्यात आले होते . मे १९८१ जेंव्हा ते परतले तेंव्हा दुर्दैवाने टेक्सन मधे संप पुकारला गेला आणि व्यवस्थापनाने काही वर्षात या कामगारांना काढून टाकले. या सगळ्या प्रकारामुळे वडिल नैराश्याच्या गर्तेत ओढले गेले.पण त्यातुनही बाहेर पडत् त्यांनी ठाण्यात ज्या परीसरात आम्ही रहायचो तेथेच ६ गुंठे जागा खरेदी केली जर्मनीत मिळवलेल्या मिळकतीतून.वडिलोपार्जित शेती हाच व्यवसाय असल्या कारणाने त्या कडेच त्यांचा कल अधिक होता.घेतलेल्या जागेत त्यांनी फळझाडे ,फुलझाडे व भाजीपाला लावुन स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरर्निर्वाहाचा प्रश्न सोडवला. त्या नंतरच्या काळात त्यांनी कुक्कुटपालन तसेच दुग्धव्यवसाय देखिल केला.अगदी शहराच्या मध्यभागी असलेल्या त्यांच्या गोठयाचा त्रास तेथिल रहिवाश्यांना कधिही झाला नाही.आणि होवु देखिल दिला नाही.
बागेत पिकणार्या भाज्या फळे माझी आई स्वतःच्या कंपनीत नेवुन योग्य दरात विकायची. बरोबरीने काम करणार्या स्त्रियांचा कामावरुन जाताना भा़जी विकत घेण्याचा वेळ यामुळे वाचायचा.अश्या प्रकारे प्रतिकुल परिस्थितीत देखिल समोर आलेल्या संकटाला व आर्थिक चणचणीला सामोरे जात विपरीत परिस्थितीत देखिल आई आणि वडिलांनी नेटाने आपल्या जबाबदार्या पार पाडल्या.
माझे शिक्षण तसेच उच्चशिक्षण देखिल याच कमवलेल्या पैशातुन झाले.
आज एक मराठी नागरीक म्हणून मला या सगळ्या गोष्टिंचा खुप अभिमान आहे.
माझे लग्न ज्या व्यक्तीशी झाले तीने देखिल वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचा व्यवसाय व स्वतःची आयपीसील मधिल नोकरी समर्थपणे सांभाळली. बांधकामाचे सामान विकण्याचा व्यवसाय सांभाळताना झालेला त्रास मी समक्ष डोळ्यानी बघितला आहे.वेळेला ट्रक रेती भरुन दरवाज्यासमोर उभे असायचे पण चालक आला नाही तरी ट्रिप चुकायची नाही.माझे यजमान स्वतः ती खेप मारायचे व योग्य जागी सामान पोहोचवायचे.
एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली मी माझ्या आयुष्यातील दोन्ही पुरुषांना आणि त्यांच्या जोडिला घरातील इतरांना प्रामाणिकपणे कष्ट करताना बघितले आहे मी त्यामुळे अश्या प्रकारचे आरोप झाले की त्रास होतो.
सध्याची पिढि शारीरीक कष्टाच्या कामांना तयार नसते हे मान्य पण तरिही कामचुकार आहेत हे अमान्य.................
"लाथ मारेल तिथे पाणी काढेल "असे बळ असलेल्या मराठी माणसाला कामचुकार म्हणणे नतद्रष्टपणाचे लक्षण आहे"
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
7 Nov 2008 - 8:36 pm | मुक्तसुनीत
काही वेळा असा मुद्दा मांडला जातो की, मराठी माणसे कष्टाच्या कामापासून दूर पळतात ; आपोआप तिथे परप्रांतीय त्यांची जागा घेतात. (सहजराव यांचे वरील पोस्ट.) मात्र हिंदी चित्रपटात, कुठल्याही इंग्रजी भाषिक वर्तुळांमधे घरकाम/कष्टा करणार्या व्यक्ति या मराठीच रंगविल्या जातात - जे अर्थातच आक्षेपार्ह आहे. असे असल्यास सत्य नेमके कुठे आहे ? मराठी माणसे कष्टकरी आहेत की नाहीत ?
विकासरावांच्या मूळ पोस्टमधे जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर कितीही घासून घासून गुळगुळीत झालेले असले तरी खरे तेच आहे : उद्योजकता. आपण उद्योजकता बाणवली पाहिजे. स्वतःचा व्यापार/उद्योग/व्यवसाय सुरू करणे हा एकच उपाय आहे. जे किर्लोस्करांनी केले तेच करायला हवे. मला तर असे वाटते की चर्चा "काय करायला हवे" पेक्षा "कसे करायला हवे , काय पावले उचलता येतील" याची व्हायला हवी.
8 Nov 2008 - 1:05 am | विकि
आमचा मराठी माणूस ती कामे करण्यास तयार नाही पण ती कामे तेच परप्रांतीय त्यांच्या राज्यात करणार नाहीत.स्थानिक मराठी माणुस कशाला कमी पगारात आणि बारा,चौदा तास काम करेल.या परप्रांतियांना जे लघु उधोजक स्वतःच्या फायधासाठी मुंबईत वाढू देत आहेत त्यांना आधी फटकवायला हवा.अनेक आयटीआय झालेल्या मराठी मुलांचे अश्याने नुकसान होत आहे. सुरवातिला मदतनीस म्हणुन परप्रंतीय कामाला लागतात नंतर सर्व शिकून येथील मुलांच्या नोकर्या बळकावतात किंवा स्वतःच गाळा टाकून(अर्थात यात त्यांची प्रचंड मेहनत असते पण हे सर्व का होते.त्यांना धद्यासाठी कर्ज,परवाने देणारे लाचखोर अधिकारी कोण असतात यांचाही विचार करणे तसेच याच्याही मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.) गावाकडून अजुन मुले आणतात.यात नुकसान कोणाचे?
आपण महाराष्ट्र सरकारने एमाआयडिसी झोन नेमके कोणासाठी आणि कशासाठी चालू केले आहेत याचाही विचार करायला हवा.
मुळात ते परप्रांतीय येथे कशाला आले आहेत तर पैसा कमवायला,पोट भरायला.गावाकडे कुटूंब टाकून ते एकटे मुंबईत येतात.मिळेल त्या कामात,पैशात गुजराण करतात.हळूहळू यांतील काहींची थोड्या प्रमाणात कींवा जास्त कष्ट घेतल्यामुळे जास्त प्रमाणात आर्थिक परिस्थिती सुधारते.
स्थानिक माणुस धंदा,उधोग यांत अपवादानेच पडतो. तो कोठे आठ तासांचे काम मिळेल शनिवार(दुसरा,चौथा)रविवार सुट्टी या शोधात असतो(आता बाहेरील कंपन्या येथे आल्यामुळे परिस्थिती थोडीफार बदलली आहे.)अर्थात त्यात गैर काहीच नाही. अनेक मराठी कनिष्ट अथवा मध्यमवर्ग अश्याच तर्हेने जगत आला आहे. त्याचे प्रतिबिंब पुढील पिढीवर पडत असते. याबाबत उदाहरण धायचे झाल्यास महापालिकेची शिपाई,कचरावाहक यांतील भरती.सरकारी लिपीक,टंकलेखक ,इ.या पदासांठी उच्चशिक्षण झालेल्यांचे अर्ज येणे याला आपण काय समजावे.पोलीस शिपाई पदासाठी वैद्यकीय,अभियांत्रिक झालेले उमेदवार येणे याचा अर्थ काय तर नोकरीची हमी.