इथुन पाय निघत नव्हता हे खरं. फारच त्रोटक दर्शन झालं.
अर्थात मी पुन्हा येण्याची तजवीज करुन ठेवली होती. "झाल ते दर्शन दिवसाचं, पण रात्रीचं दर्शन म्हणजे खरं सुवर्णमंदीर पाहणं" असं सांगुन मी दुसर्या फेरीला आलो. दुसरी फेरी मिळावी म्हणुन मी पहिल्या फेरीत 'आता बघुन घेउया, दर्शन रात्रीच्या फेरीते घेउ, गर्दीही कमी असेल" असं सांगुन मंडळींना बाहेर काढलं होतं. म्हणजे दुसरी भेट नकी!
यावेळी टाउन हॉलवरुन चालत निघालो आणि अकाल तख्तालगतच्या रस्त्याने दाखल झालो. गर्दी कमी असेल हा भ्रम दूर झाला. मात्र कोलाहल नव्हता. लोक पादत्राणं जमा करुन मंदिराच्या दिशेने जात होते. आम्हीही पादत्राणे जमा केली आणि पाय धुवुन मंदिरात शिरलो.
प्रदक्षिणा करत फोटो काढताना वेळ कसा गेला समजल नाही. अगदी निवांत दर्शन झालं. आता सगळ्यांनाच पोटातली भूक जाणवू लागली होती. आम्ही हात जोडले आणि बाहेर पडलो.
प्रतिक्रिया
3 Jan 2015 - 3:11 am | राघवेंद्र
मस्तच !!!
3 Jan 2015 - 3:17 am | स्पार्टाकस
खूप छान आलेत फोटो!
बरीच वर्ष झाली जाऊन! पुढच्या भारतवारीत प्लान करायला हवा!
3 Jan 2015 - 3:32 am | विकास
खूपच छान!
3 Jan 2015 - 3:38 am | प्यारे१
छानच नेत्रदीपक छायाचित्रं आहेत.
3 Jan 2015 - 4:00 am | खटपट्या
सर्व चित्रे छान !!
3 Jan 2015 - 4:05 am | अर्धवटराव
कसलं सुंदर टिपलय मंदीर. व्वा...
3 Jan 2015 - 8:52 am | तुषार काळभोर
रात्रीचं सुवर्णमंदीर पहिल्यांदाच पाहतोय... लई भारी!!
3 Jan 2015 - 9:08 am | मदनबाण
सुवर्णमंदीराने तुम्हाला सुवर्ण मोहीनी घातलेली दिसतेय ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO
3 Jan 2015 - 9:18 am | अत्रुप्त आत्मा
अत्युच्च!
3 Jan 2015 - 10:27 am | मुक्त विहारि
आता अम्रुतसरला निदान २ दिवस तरी रहायला पाहिजे..
3 Jan 2015 - 11:24 am | नाखु
जोरदार अनुमोदन.
एकूण मंदीर आणि परिसर व्यवस्थीत राखलेला दिसतोय गर्दी असली स्वयंशिस्त दिसतेय.
तुळजापूर देवळात चेंगरा-चेंगरीचा
अनुभवी.
3 Jan 2015 - 4:07 pm | विशाल कुलकर्णी
खासच प्रकाशचित्रे !!
4 Jan 2015 - 5:15 am | शिद
क्लासच आले आहेत सगळे फोटो. मागच्या दोन्ही भागांतील सुद्धा.
4 Jan 2015 - 6:42 am | कंजूस
सुरेख. दुसरी फेरी आवडली.
4 Jan 2015 - 7:02 am | श्रीरंग_जोशी
अप्रतिम आहेत फोटोज.
4 Jan 2015 - 3:24 pm | पैसा
बोलण्यापलिकडचे आहे हे! डोळ्याचं पारणं फिटलं अगदी!
4 Jan 2015 - 3:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत... इतकेच !