हुरड्याचे थालीपीठ

आरोही's picture
आरोही in पाककृती
2 Jan 2015 - 7:56 pm

यंदाच्या हिवाळ्यात गावी जाऊन मस्त हुरडा खाऊन झालाय ,आणि आता येथे मुंबईत परत आल्यावर नवऱ्याला एका ठिकाणी ताजा कोवळा हुरडा दिसला मग तो घेऊन आला ,आता नुसताच भाजून खाण्यापेक्षा त्याचे काहीतरी वेगळे बनवावे असा विचार आला .मग थोडी शोधमोहीम केली आणि त्याचे थालीपीठ बनवले .अप्रतिम चव होती .पहिल्यांदाच बनवले आणि चांगले झाले .पुन्हा बनवते वेळी यात आवश्यकतेप्रमाणे काही बदल करू शकते असे वाटले .तूर्तास आज बनवले त्याची रेसिपी बघूया .

साहित्य : २ वाट्या हुरडा , घरात असलेली भाजणी एक दीड वाटी,कोथिम्बिर ,मीठ, आवडीप्रमाणे ,चीलीफ्लेक्स एक चमचा ,लसुन मिरची ची भरड एक चमचा .तेल ,पाणी

1

कृती : सर्व प्रथम हुरडा ,कोथिम्बिर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे .(पाणी न घालता)ताटात काढून त्यात सगळे पदार्थ आणि भाजणी टाकून साधारण थालीपीठ साठी भिजवतो तसे भिजवून घ्यावे .अर्धातास झाकून ठेवून द्यावे .
नंतर तव्यावर तेल सोडून त्यावर पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून ,दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे .
दही आणि लोणच्याबरोबर गरमागरम खावे .

2

टीप : यातील पदार्थांचे प्रमाण आपापल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता .
भाजणी ऐवजी घरात असलेली ज्वारी,बाजरी ,चणाडाळ पीठे हि वापरू शकतो .
हुरडा जास्त बारीक वाटल्या जात नाही त्यामुळे भिजवलेले मिश्रण जर सरबरीत असते त्यामुळे थापताना जर सांभाळून थापावे लागेल ,नाहीतर थालीपीठाचे तुकडे होतील .

प्रतिक्रिया

एस's picture

2 Jan 2015 - 7:57 pm | एस

खमंग पाककृती!

शिद's picture

2 Jan 2015 - 9:17 pm | शिद

+१

सूड's picture

2 Jan 2015 - 7:59 pm | सूड

आता हुरडा शोधणे आले.

हरकाम्या's picture

3 Jan 2015 - 12:05 pm | हरकाम्या

गरज ही शोधाची जननी असते. शोधा म्हणजे सापडेल.

निवेदिता-ताई's picture

2 Jan 2015 - 8:09 pm | निवेदिता-ताई

अहाहा....

कविता१९७८'s picture

2 Jan 2015 - 9:03 pm | कविता१९७८

मस्तच

मस्त पाकृ.महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला हुरडा मिळेल.तोवर धीर धरणे अाले!

hitesh's picture

2 Jan 2015 - 10:54 pm | hitesh

हे कुठे असते ?

लिलावती हाॅस्पिटलसमोर.बांद्रा रेक्लमेशन ग्राऊंड.१२ जानेवारी पर्यंत.

अगदी वेळेवर दिलीस रेसिपी.
आमच्या शेतातला हुरडा पुण्याला येतोय उद्या. लसणाच्या चटणीबरोबर चरून उरला तर थालिपीठ नक्की करून बघेन.

आमच्याकडे होणार्‍या हुरडा पार्ट्यांमध्ये जेवणा आधी जेवणात आणि जेवणानंतरही हुरडाच असतो. त्यामुळे ही नवी रेसिपी.
बाकी वाळवलेल्या हुरड्याच्या कण्या आणि दही पण यानिमित्ताने आठवले..

जुइ's picture

2 Jan 2015 - 9:12 pm | जुइ

वेगळा प्रकार दिसत आहे :)

पैसा's picture

2 Jan 2015 - 9:17 pm | पैसा

आम्हाला कोकणात काय नाय भ्येटत ह्ये!

हरकाम्या's picture

3 Jan 2015 - 12:08 pm | हरकाम्या

गरज ही शोधाची जननी असते. कोकणात ज्वारी पिकवायचा प्रयत्न करा. यश नक्की मिळेल." प्रयत्ने वाळुचे कण
रगडिता तेलही गळे या उक्तीला सार्थ करा.

पैसा's picture

3 Jan 2015 - 12:53 pm | पैसा

तुम्ही कोकणात येवां आणि येताना हुरडा घेऊन येवां. त्यासाठी तुम्ही घाटावर रहाता आहात हे गृहीत धरलंय. तसे नसेल तर सांगा. म्हणजे दुसरा उपाय सांगेन.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2015 - 10:30 pm | अत्रुप्त आत्मा

नका हो थंडीत अश्या पाककृती टाकू..
मेल्या ह्या ऑफबिट पा.कृ. ,हाटेलात तर मिळत न्हैतच आणि मेस'वाल्यांकडे तर नावच नको काढायला! :-/

मुक्त विहारि's picture

2 Jan 2015 - 11:04 pm | मुक्त विहारि

झक्कास पा.क्रु.

बोका-ए-आझम's picture

3 Jan 2015 - 2:29 am | बोका-ए-आझम

हा हुरडा म्हणजे गुजरातमध्ये सुरतला मिळतो तो ' पोंक ' आहे का? त्याची चटणी आणि वडेपण अफलातून होतात. आणि तो नुसताच शेव आणि लिंबू यांच्याबरोबर फॅब्युलस लागतो!

हो आणि नाही. पोंक ज्वारीचीच एक प्रजाती आहे, पण महाराष्ट्रातला हुरडा हा नव्हे. पोंक/सोर्गम हे सौराष्ट्र/काठेवाडमध्येच पिकतं.

स्पंदना's picture

3 Jan 2015 - 6:17 am | स्पंदना

हुरडा कधी खाल्लाच नाही. :(

पण रेसीपी मस्त दिसते आही.

सस्नेह's picture

3 Jan 2015 - 7:29 am | सस्नेह

आणि सुबक सादरीकरण !

सखी's picture

3 Jan 2015 - 7:44 am | सखी

खमंग पाकृ आणि सुबक सादरीकरण ! - अगदी हेच म्हणयाचे होते.
या सगळ्या पाकृ तुम्हा सगळ्या सुगरणी, बल्लवांनी बाकीच्यांना खायला घालायला लागतील असा (कंपुने) मंडळाने आजच मेमो पाठवलाय - मिळाला असेलच :)

खेडूत's picture

3 Jan 2015 - 7:41 am | खेडूत

अतिशय सुंदर!
लवकरच करून पहाण्यात येईल .

आहाहा... हुरडा खाल्ला आहे,पण याचे थालीपीठ सुद्धा करता येते हे आजच कळले ! हुरडाच इतका झ्याक लागतो तर थालीपीठ काय जबरा लागत असेल ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO

श्रीरंग_जोशी's picture

3 Jan 2015 - 10:03 am | श्रीरंग_जोशी

चविष्ट दिसत आहे पाकृ.

सुचेता's picture

3 Jan 2015 - 10:02 pm | सुचेता

नक्की करुन बघणार.

उमा @ मिपा's picture

5 Jan 2015 - 11:36 am | उमा @ मिपा

अहाहा. . . . तोंपासु!

नाखु's picture

5 Jan 2015 - 5:26 pm | नाखु

"हुरडे" वाला कोण आहे त्याचा शोध घ्या !!

पा कृ झकास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2015 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त हं ! लैक. करून बघण्यात येईल.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

5 Jan 2015 - 9:12 pm | सस्नेह

हा धागा दिसला की 'हृदयाचे थालिपीठ' असे का वाचले जातेय कोण जाणे !