घुटे ----

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
2 Jan 2015 - 1:05 pm

घुटे म्हणजे ऊडीद डाळीची आमटी.

अर्धा वाटी उड़ीद डाळ थोड्याशा जरासे भाजून घेणे.
मग कुकरला लावून डाळी सारखेच शिजवून घेणे.
आता थोड़ी मिरची, लसुण, ओले खोबरे व जिरे मिक्सरवर बारीक़ करून घ्या.
तेलात प्रथम मोहरी टाका.. ती तडतडली की हे मिरची लसुण जीरे फोडणीला घाला.
थोडा हिंग, हळद घाला.
त्यात आता शिजलेली उड़ीद डाळ घोटून मिसळा.
पाणी घाला.
चवीनुसार मीठ, कोथींबीर घाला.
हे घुटे जरा पातळसर असावे.

गरम गरम खावे..प्यावे..भुरके मारावेत...

भाताबरोबर(वरुन साजुक तुप) छान लागते.

ह आता फोटु मागाल तर फोटु काढेपर्यंत शिल्लकच नाही राहिले हो...

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

2 Jan 2015 - 1:18 pm | चौकटराजा

आम्ही याला उडदाचे घुटे असे म्हणतो. व माझ्या घरारील सर्वाना ते तयार करता येते व आवडते ही. ( मला ही हे उत्तम तयार करता येते.) आम्ही त्यासाठी छिलका उडीद ( सालासकट) वापरतो. भाजलेला कांदा, लसूण , भाजलेले खोबरे, कोथिंबीर व आले असे पाच पांडव असल्या खेरीज याची चव मस्त लागत नाही. या सर्वाचे वाटण करून घेणे जरूर. मोहरी जिरे अशी एकत्र फोडणीत घालणे जरूर. पोळी , ज्वारीची भाकरी व भात कशाबरोबरही हा पदार्थ मस्त लागतो. व आपण म्हटल्या प्रमाणे मी काही वेळेस कढीसारखा पितो देखील.

जर्रा फोडून सांगा ना. ही आली तिसरी रेसीपी घुट्याची. जरा सव्विस्तर लिहा म्हणजे तसेही करु पहाता येइल.

बाय डिफॉल्ट ताई... अहो, फोटो शिवाय पाकॄ वाचणे आमच्या नियमात बसत न्हाय वो....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
China builds lighter tanks for Tibet border
Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF
Russia looks to boost defence ties with India
Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B
Auto bailout cost the US goverment $9.26B
Analysts foresee bad year for U.S. government bonds
Google Fiber services may launch in India soon
Telcos to make tough calls as spectrum war heats up

मनिमौ's picture

2 Jan 2015 - 3:02 pm | मनिमौ

इथे जबर पाउस येतोय त्यात अशी पाक्रु म्हन्जे आहाहा

मस्तच!गरम गरम घुट छानच लागते.
छान पाककृती ताई.

बरेच दिवस केलेलं नाही घुटं आता करायलाच पाह्यजे. वर चौकाका म्हणतात तसं आमच्याकडे पण सालासकटच वापरतो उडिद या वरणाला.

उमा @ मिपा's picture

2 Jan 2015 - 3:19 pm | उमा @ मिपा

ताई, मस्तच पाकृ.
नक्की करणार.

कविता१९७८'s picture

2 Jan 2015 - 7:47 pm | कविता१९७८

यम्मी, नक्की करुन पाहणार

बॅटमॅन's picture

2 Jan 2015 - 7:50 pm | बॅटमॅन

हम्म...रोचक!

तूर्तास घरी फक्त टोम्याटो चटणीकरिता अंमळ उडीद डाळ आणून ठेवलेली आहे. आता तिचा वापर करणे आले.

अक्खे उडीद किंवा सालीसकट उडदाची डाळ मिळते ती आणून कर, जास्त चवदार होतं.

धन्यवाद! अवश्य केल्या जाईल.

त्रिवेणी's picture

2 Jan 2015 - 8:10 pm | त्रिवेणी

मी कधीच केल ही नाही आणि खाल्लही नाही.
आता करुन बघेन.

पैसा's picture

2 Jan 2015 - 8:16 pm | पैसा

घुट्याची अजून एक मस्त पाकृ! निवेदिता ताई, पुढच्या वेळी एकवेळ जेवायला विसरलीस तरी चाले, फटु अज्जिबात विसरायचे नाहीत!

मितान's picture

2 Jan 2015 - 9:01 pm | मितान

मस्त घुटं, हुरड्याचं थालीपीठ, तोंडी लावायला मुळ्याचा ठेचा आणि भातात टोमॅटो राईस आणि वेज बिर्याणी !!!!!!!
कोण कोण येतंय सांगा...

ताई, तू ताट पूर्ण केलंस ! :)

त्रिवेणी's picture

2 Jan 2015 - 9:40 pm | त्रिवेणी

मला फक्त टो. राईस पाहिजे.

सुनील's picture

3 Jan 2015 - 6:41 am | सुनील

सुमारे ३ वर्षांपूर्वीदेखिल 'घुट्यां'वर एक धागा आला होता (आता वरवर शोधला पण सापडला नाही). त्यावरून करून पाहिले होते.

अनुभव असा की, जर उडीद दाळ नीट भाजली गेली नसेल तर घुटे फारच बुळबुळीत होते.

सखी's picture

3 Jan 2015 - 7:27 am | सखी

हा धागा का?
निवेदिता ताई छानच वाटतिये ही आमटी, नक्की करुन बघेन.

सुनील's picture

3 Jan 2015 - 7:32 am | सुनील

होय हीच. धन्यवाद!

काल रात्रीच केलं घुटं.गरम भात,तूप आणि ही आमटी.भात कमी खायचा संकल्प नविन वर्षाच्या दुसर्याच दिवशी मोडण्यात आला.कुठे फेडाल ही पापं?: