गाभा:
बॉलिवूडमधील प्रतिष्ठित निर्माते - दिग्दर्शक आणि छोट्या पडद्यावर महाकाव्य ' महाभारत ' साकारणारे बलदेव राज चोप्रा, उर्फ बी.आर.चोप्रा यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.
आज सकाळी जुहू येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बी. आर. चोप्रा यांच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. चोप्रा यांच्या मागे, मुलगा निर्माते रवी चोप्रा आणि दोन मुली शशी आणि नीना असा परिवार आहे. सध्याचे आघाडीचे निर्माते यश चोप्रा हे बी. आर. चोप्रा यांचे भाऊ आहेत. सिनेसृष्टीला दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांनी सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
बी.आर.चोप्रा
प्रतिक्रिया
5 Nov 2008 - 3:15 pm | विसोबा खेचर
द बर्निंग ट्रेन हा आमचा अत्यंत आवडता चित्रपट देणार्या चोप्रासाहेबांना आमची श्रद्धांजली...
तात्या.
5 Nov 2008 - 3:25 pm | टारझन
फारच दु:ख झालं ..
मी कालंच युट्युब वरुन महाभारताचे १३ भाग डाउनलोड केले ... बी.आर.चोप्रांचा एका पृथ्वीवर उभे राहिलेले बाई-माणूसचा लोगो .. नंतर कथ श्री महाभारतं कथा चं अप्रतिम गीत .. आणि नंतर कशा सांगणारा " मै समय हूं " अगदी बालपण आठवलेलं ... आणि मला आशा आहे महाभारत या इतक्या जुण्या काळी ( जेव्हा तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं ) अशा काळी बी.आर.चोप्रांनी निर्माण केलेली महाभारत मालिका ..
केवळ अप्रतिम .. ते एक आदरणिय निर्माते-दिग्दर्शक होते ..
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ...
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
5 Nov 2008 - 3:59 pm | सागर
"महाभारत" सारखी अप्रतिम कलाकृती केल्याबद्दल चोप्रासाहेबांना समस्त भारतीय कायमच लक्षात ठेवतील...
मला चांगलेच आठवते की जेव्हा केबलचे आजच्यासारखे फॅड नव्हते तेव्हा "महाभारत" लागले की सगळे लोक हातातले काम सोडून टी.व्ही समोर डोळे लावून बसायचे...
लाखो दर्शकांना दूरदर्शन वर खिळवून ठेवणारी अजरामर कलाकृती निर्माण करणार्या बी.आर.चोप्रांना भावपूर्ण श्रद्धांजली...
- सागर
5 Nov 2008 - 10:57 pm | अमित.कुलकर्णी
बी. आर. चोप्रा यांनी नया दौर, कानून, इत्तेफाक, साधना, अफसाना, गुमराह, आदमी और इन्सान, दास्तान (हा बहुतेक अफसाना चा रीमेक होता), छोटीसी बात, पती पत्नी और वो, निकाह, द बर्निंग ट्रेन अशा विविध विषयांवरील दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली होती. हे वैविध्य इतर निर्माते / दिग्दर्शकांमध्ये फारसे बघायला मिळत नाही.
आणखी एक विशेष म्हणजे ज्या काळी हिंदी चित्रपट फक्त गाण्यांमुळे गाजत त्या काळी चोप्रांनी कानून आणि इत्तेफाक हे गाणी नसलेले सुंदर चित्रपट काढले (इत्तेफाक हा फारसा चांगला नसला तरी कानून मात्र नक्कीच होता.)
त्यांना श्रद्धांजली!
-अमित
6 Nov 2008 - 8:22 am | प्राजु
दि बर्निंग ट्रेन हा चित्रपट खूप आवडतो.
तसेच त्यांच्याच पती पत्नी और वह.. वर बेतलेला अमोल पालेकर, परवीन बॉबी, फारूक शेख, दिप्ती नवल, देवेन वर्मा आणि उत्पल दत्त यांच्या भूमिका असलेला एक नर्म विनोदी चित्रपट खूप आवडतो. त्याचे नाव मात्र काही केल्या आठवत नाहीये.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Nov 2008 - 9:19 am | अमित.कुलकर्णी
:)
-अमित
6 Nov 2008 - 9:24 am | विसोबा खेचर
वर बेतलेला अमोल पालेकर, परवीन बॉबी,
परवीन बॉबी?? :)
आपला,
तात्या बाबी.