राजकीय वादळ

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in काथ्याकूट
22 Dec 2007 - 12:44 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

श्री. नारायणराव राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवल्याचे आज वर्तमानपत्रातून समजले. हे सरकार फक्त एका माणसासाठी चालले आहे, असे श्री. राणे यांना समजले आहे.

दुसरीकडे श्री. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीत अशा गोष्टी घडतात.. अशी संयमित प्रतिक्रिया दिली आहे.

दुसर्‍या कोणी बंडाचे निशाण रोवले असते तर एकवेळ ठीक होते. पण राणे यांचे आव्हान गांभिर्याने घ्यायचे असते हे महाराष्ट्रातील राजकारणात मानले गेलेले आहे.

तुम्हाला काय वाटतं? नेतृत्वबदल होईल?

जर नेतृत्वबदल झाला नाही तर सगळे प्रश्न आपोआप संपतील. पण जर नेतृत्वबदल झाला तर मुख्यमंत्रीपद राणेंना मिळेल की अन्य कोणाला?

कृपया आपली मते नोंदवावीत.

आपला,
(निरिक्षक) धोंडोपंत

प्रतिक्रिया

अवलिया's picture

22 Dec 2007 - 2:19 pm | अवलिया

>> नेतृत्वबदल होईल?
शक्यता कमी कारण राणे मुख्यमंत्री होणार नाही या अटीवर प्रतिभाताइ ना पाठींबा होता
>>>पण जर नेतृत्वबदल झाला तर मुख्यमंत्रीपद राणेंना मिळेल की अन्य कोणाला
सुशीलकुमार शिंदे किंवा कुणीही राणे सोडुन

नाना

विकि's picture

22 Dec 2007 - 11:10 pm | विकि

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे.
आपला
कॉ.विकि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Dec 2007 - 11:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे


आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे.

१००% सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

23 Dec 2007 - 8:47 am | विसोबा खेचर

म्हणतो!

आमचा नेता नारायण राणे! अहो तसं बघायला गेलं तर सगळेच एका माळेचे मणी आहेत, चोर आहेत, लबाड आहेत!

पण मग त्यातल्या त्यात राणे बरा असं आमचं मत आहे! निदान आमच्या कोकणकडे तरी लक्ष ठेवेल! :)

आपला,
(शिंदुदूर्ग जिल्ल्यातला) तात्या.

विकि's picture

24 Dec 2007 - 1:23 pm | विकि

जय कोकण !
हल्ली कोकण म्हटला की रत्नागिरी,सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे येतात. रायगड आणि ठाण्याला स्थानच नसते. आपल यावर काय मत.
आपला
कॉ.विकि

गारंबीचा बापू's picture

23 Dec 2007 - 11:59 am | गारंबीचा बापू

तात्या,

कोकणातला माणूस मुख्यमंत्री होणं ही कोकणासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. पण आज जे काही पेपरात वाचलं त्यावरून नारायणरावांपासून मुख्यमंत्रीपद अजून तरी खूप दूर दिसत आहे. कारण हायकमांडनी फक्त त्यांचा उद्वेग ऐकून घेतला आहे. त्याला प्रतिसाद दिलेला नाही.

दुसरीकडे माननीय मुख्यमंत्र्यांना नारायणरावांशी 'जमवून'घ्यायला सांगितले आहे. याचाच अर्थ एवढ्यात नेतृत्वबदल होणार नाही असा होतो.

नारायणरावांच्या बंडाचे टायमिंगच नव्हे तर पद्धतही चुकली अशी बातमी सकाळने मुखपृष्ठावर दिली आहे.

कदाचित या बंडाचा फायदा नेतृत्वबदल होईल तेव्हा नारायणरावांऐवजी दुसरा कोणीतरी घेऊन जाईल अशी चर्चाही वर्तमानपत्रात वाचायला मिळाली.

बापु