आज पाकिस्तानात पेशावरमधील 'आर्मी पब्लिक स्कूल' या शाळेत ७-८ तेहरिक्-ए-तालिबान च्या अतिरेक्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार केला. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यात अंदाजे १२३ मुले व ९ इतर जण मृत्युमुखी पडले असून ६ अतिरेक्यांना पाकिस्तानी लष्कराने कंठस्नान घातले आहे. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान ४० मुलांची प्रकृती गंभीर आहे.
'मलाला'ला काही दिवसांपूर्वीच नोबेल पारितोषिक मिळाल्याचा संताप येऊन तालिबानी अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे. जे भयंकर विष पाकिस्तानने पेरले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे. १९४७ साली स्वतंत्र देश मिळाल्यावर देशाचा विकास करण्याऐवजी पाकिस्तानने गेली ६७ वर्षे फक्त काश्मीर या एकाच विषयावर लक्ष केंद्रीत करून युद्ध, अतिरेकी हल्ले, धर्मांध प्रचार अशा भयंकर मार्गांनी येनकेनप्रकारेण काश्मीर परत मिळवायचा प्रयत्न केला. आपल्या देशाचा विकास व्हावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, उद्योगधंदे वाढावेत, देशाची आर्थिक स्थिती सुधारावी इ. महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त लष्कर, शस्त्रास्त्रे, युद्ध, दहशतवाद इ. वरच पाकिस्तानने भर दिला. भारताबरोबर ४ वेळा युद्ध करून हात पोळून घेतले. १९८९ पासून सातत्याने भारतात दहशतवादी पाठवून भारताला 'हजार जखमा' करून त्रास द्यायचा प्रयत्न केला. भारतात दहशतावादी कृत्ये करणार्या दाऊद, टायगर मेमन, भटकळ बंधू, हफीझ सईद, मसूद अझर इ. भयंकर दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना शस्त्रास्त्रे, आर्थिक मदत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे समर्थन केले. लहान कोवळ्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना मदरशात पाठवून सतत धर्म व जिहाद चे ब्रेनवॉशिंग करून अनेक तरूण पिढ्या बरबाद केल्या. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माईंड हफीज सईद, मुंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार दाऊद व मेमन बंधू, भारतात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करणारे भटकळ बंधू अशा दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देऊन पाकिस्तान भयंकर घोडचूक करीत आहे.
आज पाकिस्तानला आपल्याच कृत्याची भयंकर किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानला आवरणारा या जगात कोणताच देश नाही का? खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे.
पाकिस्तानला अजूनही सुधारण्याची संधी आहे. दहशतवाद्यांची मदत बंद करून व मदरशातून दिले जाणारे धार्मिक व जिहादी शिक्षण बंद केले तर अजूनही पाकिस्तान योग्य त्या मार्गावर जाऊ शकतो. अन्यथा असे हल्ले परत परत होत राहतील व कधी पाकिस्तानातील, कधी भारतातील तर कधी इतर कोणत्यातरी देशातील निरपराध नागरिकांना याची भयंकर किंमत मोजावी लागेल.
प्रतिक्रिया
16 Dec 2014 - 8:08 pm | मोदक
खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे.
असे एखादे उदाहरण आहे का जगाच्या इतिहासात..?
(सिरीयसली विचारलेला प्रश्न आहे - उपरोध नाहीये)
16 Dec 2014 - 8:56 pm | श्रीगुरुजी
नक्की माहित नाही. कदाचित इतिहासात असे एखादे उदाहरण असावे.
17 Dec 2014 - 10:30 am | श्रीगुरुजी
याच्या जवळपास जाणारे एक उदाहरण आहे. १९९० च्या दशकात इंडोनेशियातून पूर्व टिमूर बेटाला स्वातंत्र्य हवे होते व स्वतःचा वेगळा देश हवा होता. इतर इंडोनेशियन जनतेचा याला विरोध होता व इंडोनेशियाचा सर्वेसर्वा सुहार्तो याने दडपशाहीचे सर्व मार्ग वापरून त्यांची स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा अत्याचार फार मोठ्या प्रमाणावर झाले तेव्हा १९९९ मध्ये पाश्चात्य देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून सुहार्तोवर दबाव आणून पूर्व टिमूर बेटावर संयुक्त राष्ट्रसंघाची शांतीसेना पाठविण्याची परवानगी घेतली व शांतीसेनेच्या देखरेखेखाली पूर्व टिमूर बेटाला अधिकृत स्वातंत्र्य मिळून एक नवीन देश निर्माण झाला.
पाकिस्तानबाबतीत असेच काहीसे करणे खूप अवघड असले तरी अगदीच अशक्य नाही. पाकिस्तानी लष्कर व अतिरेक्यांचे साटेलोटे असल्याने हा देश १०-१२ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्याच्या ताब्यात देऊन अतिरेक्यांच्या पूर्ण नि:पाताचा प्रयत्न करता येईल. अन्यथा हे अतिरेकी निव्वळ भारत किंवा पाकिस्तानला धोकादायक न ठरता संपूर्ण जगाला तापदायक ठरतील.
17 Dec 2014 - 12:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही सांगितलेला उपाय तर्कशुद्ध वाटला तरी त्यात बरेच व्यावहारिक अडथळे आहेत.
(अ)
...पाकिस्तानी लष्कर व अतिरेक्यांचे साटेलोटे असल्याने... ;
(आ) पाकिस्तानचे नागरी शासन लष्कराचे बाहुले असल्यामुळे आणि
(इ) पाकिस्तानची लोकसंख्या, क्षेत्रफ़ळाचा आकार, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती;
या सर्वांचा विचार करता (संयुक्त राष्ट्रसंघाची किंवा इतर कोणत्याही देशाची) उघड लष्करी कारवाई तेथे यशस्वी होण्याची शक्यता नाही. शिवाय अशी उघड कारवाई करण्यासाठी जो आर्थिक खर्च, मनुष्यहानी आणि जागतिक विरोध होईल तो सोसण्याची ताकद आणि धाडस आजमितीला कोणत्याही एका देशाकडे वा संयुक्त राष्ट्रसंघाकडेही नाही.
हे जेवढे जगाला माहित आहे तेवेढेच ते "अतिरेकी + पाकिस्तानी लष्कराला"ही माहित आहे; म्हणूनच सर्वसामान्य पाकिस्तानी जनता आणि भारतासारखे देश भरडले जात आहेत आणि पाश्चिमात्य देश "स्वतःची कातडी बचावली, खूप झाले" असा पवित्रा घेऊन आहेत.
दुसर्या महायुद्धानंतर बदललेल्या लष्करी कारवाई करण्याच्या पद्धती, जागतिक जनमताचा प्रभाव, माध्यमांचा (मेडियाचा) प्रभाव, जागतिक राजकारण इत्यादीमुळे कोणत्याही देशाला/राष्ट्रसंघाला इतर कोणत्याही मोठ्या देशात शिरून तेथे यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे* शक्य झाले नाही. कुवेत व पूर्व टिमोर या दोन छोट्या देशांत वर दिलेल्या कारणांच्या अभावाने असे शक्य झाले. याविरुद्ध, इराक आणि अफगाणिस्तानमधिल अमेरिका/राष्ट्रसंघाचे भूतकाळातले आणि अजूनही चालू असलेले अनुभव या दृष्टीने मार्गदर्शक आहेत.
काही रोग बळावलेल्या अवस्थेत गेले की त्यांचा आक्रमक पद्धतिने उपचार करण्याने रोग्याला मूळ रोगापेक्षा जास्त धोका संभवतो. शिवाय काही रोगांवर आजमितीला उपाय सापडलेले नाहीत. पाकिस्तानातील सद्य परिस्थिती हा जगाला झालेला याच प्रकारातिल रोग आहे.
-------------------------------
* यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे :
यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे म्हणजे पायदळाने सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे होय. हे युद्धाचे उद्दिष्ट्य साध्य केले तरच त्या भूमीवरच्या सर्व विरोधी/अतिरेकी कारवायांचा नायनाट करणे शक्य होते.
दुसर्या महायुद्धात हे यशस्वीपणे केले गेले. यात जर्मनी आणि जपान या दोन देशांमधिल सामाजिक-राजकिय-धार्मिक परिस्थितीचेही योगदान आहे.
इराक आणि अफगाणिस्तान युद्धांनी "केवळ कार्पेट बाँबिंग केले म्हणजे नंतर पायदळाला सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे शक्य होईल" हा समज फोल आहे, हे शिकवले आहे.
बांगलादेश युद्धात शत्रुराष्ट्राकडून लेखी शरणागती लिहून घेतल्यानंतरही सुरुवातिला दिलेल्या कारणांमुळे भारताच्या सेनेने बांगलादेश व्यापणे आणि त्याच्यावर संपूर्ण ताबा ठेवणे तर सोडाच पण त्या देशाला स्वतंत्र करूनही त्याला आपला भरवश्याचा मित्रदेश बनवणेही शक्य झाले नाही.
-------------------------------
17 Dec 2014 - 12:38 pm | मोदक
धन्यवाद एक्कासाहेब..!
17 Dec 2014 - 2:27 pm | प्रसाद१९७१
ते असे नाहीये एक्का साहेब, पाश्चात्य समाजात गेली १५० वर्ष प्रचंड प्रमाणावर आपल्याकडच्या समाजवाद्यांसारखा बुद्धीभेद बळावला आहे. ही लोक स्वताच्याच देशाच्या सैन्याला शिव्या घालतात आणि त्यांना खलनायक ठरवतात.
त्यामु़ळे सैन्याच्या इच्छाशक्तीवर फार परीणाम झाला आहे.
ह्याच अमेरिकेने ३०० वर्षापूर्वी इराक वर हल्ला केला असता तर ५० टक्के लोक मारुन टाकले असते आणि ५० टक्क्यांना गुलाम म्हणुन अमेरिकेत घेउन गेले असते.
भारतावर इंग्रजांच्या ऐवजी जपानी लोक राज्य करायला आले असते तर भारतात स्वातंत्र्य मागायला भारतीय माणसे शिल्लक ठेवली नसती.
17 Dec 2014 - 3:07 pm | क्लिंटन
+१०००. यावरूनच मिपावरच्या काही जुन्या चर्चांची आठवण झाली :)
17 Dec 2014 - 3:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
मूळ मुद्द्यात अवांतर टाळण्याकरिता मी असे सांगितले...
दुसर्या महायुद्धानंतर बदललेल्या लष्करी कारवाई करण्याच्या पद्धती, जागतिक जनमताचा प्रभाव, माध्यमांचा (मेडियाचा) प्रभाव, जागतिक राजकारण इत्यादीमुळे कोणत्याही देशाला/राष्ट्रसंघाला इतर कोणत्याही मोठ्या देशात शिरून तेथे यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे* शक्य झाले नाही.
...त्याचा अर्थ तोच आहे. ते तुम्ही तुमच्या भाषेत सांगितलेत. इतकेच :)
शिवाय प्रत्येक युद्धात स्थानिक लोकांच्या मनोवृत्तीचा प्रचंड प्रभाव कोणत्याही युद्धाच्या वाटचालीवर आणि निकालावर असतो. जर्मनी, जपानमध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्याने झालेले युद्धाच्या युद्धोत्तर चिरफाडीचे विश्लेषण आणि त्यावरचे उपाय इराक, अफगाणिस्तानमधल्या युद्धानंतर दृष्टीपथात असलेल्या भविष्यातल्या स्वप्नातही शक्य आहेत काय ?
17 Dec 2014 - 8:02 pm | श्रीगुरुजी
>>> (इ) पाकिस्तानची लोकसंख्या, क्षेत्रफ़ळाचा आकार, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती;
या सर्वांचा विचार करता (संयुक्त राष्ट्रसंघाची किंवा इतर कोणत्याही देशाची) उघड लष्करी कारवाई तेथे यशस्वी होण्याची शक्यता नाही.
पाकिस्तानातील दहशतवादी व तालिबानी पेशावर, खैबर व वायव्य प्रांतात एकवटले आहेत. उर्वरीत पाकिस्तानात त्यांचे अस्तित्व खूप कमी प्रमाणात आहे (चूभूदेघे). उदा. कराची
त्यामुळे जर जागतिक समुदायाने पाकिस्तानमधील दहशतवाद संयुक्तरित्या संपविण्याचा निर्धार केला तर याच भागात त्यांना लक्ष केंद्रीत करावे लागेल. हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही.
16 Dec 2014 - 8:12 pm | आयुर्हित
पाकिस्तान दुध देणारी गाय असती तर केव्हाच अमेरिकेने धावा बोलला असता!
पण रोजच्या चहा पाण्याच्या खर्चाला अमेरिकेलाही बंदुके/हत्यारे विकत घेणारे रोज हवे असतात ना!
16 Dec 2014 - 8:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पेरावे तेचं उगवते हा धडा पाकिस्तानला मिळालाय बासं. लहान मुलं मरायला नाही पाहिजे होती. -_-
17 Dec 2014 - 7:16 am | आंबट चिंच
+१ हेच म्हणतो. लहान मुले मरायला नको होती.
16 Dec 2014 - 8:16 pm | जेपी
विश्वास नांगरे पाटील लातुरात असतानाचा
किस्सा आठवला."भारतातील तरुणाला फक्त सिमेवर उभा करा बंदुक न देता.
आपोपाप सगळा बदल घडेल.
16 Dec 2014 - 8:22 pm | हवालदार
काही कळाले नाही :(
17 Dec 2014 - 12:22 pm | जेपी
काहि कळाले नाही>>>
मला धागा कळाला नाही.त्यामुळे कुणाला न कळणारा प्रतिसाद दिला. *biggrin*
17 Dec 2014 - 9:28 am | सतिश गावडे
जेप्या ही भाषणातील टाळ्या खेचायची वाक्ये झाली रे. वास्तवात ते इतकं सहज असतं तर काय हवं.
16 Dec 2014 - 8:18 pm | कंजूस
"सेटन मे साइट व्हर्सीज"या म्हणीचा(=अधिपत्य गाजवण्यासाठी सैतान धर्मग्रंथाचाही आधार घेतो) प्रत्यय येतो आहे.
16 Dec 2014 - 8:20 pm | बॅटमॅन
बाकी ठीके, पण
हे कै खरं वाटत नाही. अमेरिकेचा हात होता ना त्यामागे?
16 Dec 2014 - 8:25 pm | भाते
आपल्यासाठी काय होते ते समजले असेल आज त्यांना!
16 Dec 2014 - 9:07 pm | सखी
जे मारले गेले ते सामान्य नागरीकच होते ना, मुख्यतः शाळेतली मुलेच होती ना? त्यांच्याबद्दल त्यांच्या पालकांबद्दल तरी या धाग्यावर धुलवड व्हायला नको असे कळकळीने सांगावेसे वाटते (तुम्हाला एकटयालाच नाही, सर्वांनाच).
16 Dec 2014 - 8:29 pm | प्रसाद गोडबोले
छ्या :
तुम्हीपण ना श्रीगुरुजी ... माझा शतकी मुद्दा ढापलात ... :-/
ह्या अन सिडनी हल्ल्याविषयी... ह्यातल्या दहशतवाद्यांची नावे पाहुन मी घरी जाऊन धागा काढणार होतो
"दहशतवादाला धर्म नसतो म्हणे " *lol*
16 Dec 2014 - 11:52 pm | मृत्युन्जय
प्रगो आजचा प्रकार बघता खरेच म्हणायला लागेल की दहशतवादाला धर्म नसतो. मरणारेही मुसलमान आणि मारणारेही मुसलमान.
17 Dec 2014 - 12:49 am | काळा पहाड
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. ते मारणारे लोक कट्टर मुसलमान होते आणि (त्यांच्या दृष्टीने) कमी कट्टर मुसलमानांना मारत होते. यातला मूळ धागा धर्म हाच आहे. उगीच "सर्वधर्मसमभाव" टाईप विधाने करू नका.
17 Dec 2014 - 12:00 pm | प्रसाद गोडबोले
करेक्ट
अगदी हेच म्हणणार होतो .
17 Dec 2014 - 2:21 pm | प्रसाद१९७१
हे कसे कळले तुम्हाला.
ती मारली गेलेली मुले मोठी झाल्यावर एकतर पाक आर्मी मधे गेली असती किंवा तालेबानी झाली असती. भारतासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच
17 Dec 2014 - 3:57 pm | काळा पहाड
तसं वाटत नाही. ही मुलं आर्मी पब्लिक स्कूल मध्ये होती. थोडक्यात, मध्यम व उच्च मध्यम वर्ग आणि आर्मी ऑफिसर्स ची मुलं. अपवाद वगळता पाकिस्तानी आर्मी आजही प्रो-वेस्टर्न आणि प्रोफेशनल आहे.
17 Dec 2014 - 4:52 pm | प्रसाद१९७१
पाकिस्तानी आर्मी आजही प्रो-वेस्टर्न आणि प्रोफेशनल आहे. >>>>>
वेस्टर्न कपडे घातले आणि इंग्लिश बोलले म्हणजे वेस्टर्न होते काय?
आणि वेस्टर्न असो वा इस्टर्न, भारत द्वेष च भरला आहे. ती पाक आर्मी असो, तालिबान असो वा पाकी चॅनल असो, डॉक्टर असो - सगळे सारखेच.
सिडनी मधला अतिरेकी वकील होता.
17 Dec 2014 - 4:57 pm | प्रसाद गोडबोले
जोरदार अनुमोदन .
प्रसाद , तुम्ही कधी मध्यपुर्वेत विशेशतः सौदीत पाक लोकांच्या सोबत राहिला आहात काय ? तुमचे अन माझे ह्या बाबतीतले विचार तंतोतंत जुळत आहेत म्हणुन विचारले.
17 Dec 2014 - 5:16 pm | प्रसाद१९७१
@प्रगो - मध्यपूर्वेत कधी राहीलो नव्हतो, पुढे ही कधी जायची वेळ येउ नये ही इच्छा!
भारतीयांनी पण पर्यटनासाठी दुवई वगैरे ला जावु नये अश्या टोकाच्या मताचा मी आहे. त्यांनी खर्च केलेल्या पैश्याचा थोडा भाग भारताच्या जवानांना मारण्यासाठी वापरात येतो.
@ट्.का. दोन्ही प्रसाद नक्की वेगळे आहेत.
17 Dec 2014 - 5:14 pm | काळा पहाड
मला या दोन्हीतला विरोधाभास दिसत नाही. भारतद्वेषी पाक आर्मी प्रोफेशनल असू शकत नाही का?
17 Dec 2014 - 5:19 pm | प्रसाद१९७१
प्रोफेशनल असू शकते की. मी लिहीले होते की पाक आर्मी काय आणि तालीबान काय, भारतासाठी दोन्ही तितक्याच धोक्याच्या.
माझा हा प्रतिसाद सुद्धा दिला होता कारण कोणीतरी कमी कट्टर असा शब्द वापरला होता. माझ्या मते सगळेच एकाच लेव्हलचे कट्टर असतात. कोणी गावरान असेल, तर कोणी फाडफाड इंग्लिश बोलत असेल. मनात एकच असते.
17 Dec 2014 - 5:24 pm | काळा पहाड
मीच तो वापरला होता. तालिबानी कट्टर म्हणजे दाढी, बुरखा, कन्व्हर्जन इत्यादी. अशा प्रकारचा कट्टरपणा पाक आर्मी कडे आहे काय? बाकी आपण शत्रू असल्याने त्यांना इकडे गोळाबारी करणे क्रमप्राप्तच आहे. पण त्यांचा विरोध धार्मिक आहे कि प्रादेशिक? तसं असतं तर त्यांनी अमेरिकेला पाकिस्तानात पाय टाकू दिला असता का?
17 Dec 2014 - 5:54 pm | प्रसाद१९७१
तसं असतं तर त्यांनी अमेरिकेला पाकिस्तानात पाय टाकू दिला असता का? >>>>>> पहील्यांदी, अमेरिका पाय टाकू का विचारत नाही, त्यांना जे करायचे ते अमेरीका करते. आणि अमेरिकेकडुन प्रचंड पैसा येतो.
दाढी, बुरखा, कन्व्हर्जन इत्यादी. अशा प्रकारचा कट्टरपणा पाक आर्मी कडे आहे काय? >>> आहे, आहे आणि आहे. १००% आहे.
17 Dec 2014 - 7:04 pm | क्लिंटन
अहो कट्टरपणा दाढीमध्ये नाही तर मनात असतो.इतकी वर्षे पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान गळ्यात गळे घालून असतील तर लष्करात कट्टरपणा नाही असे कसे शक्य आहे?
17 Dec 2014 - 8:25 pm | सुबोध खरे
पाकिस्तान देशाचे आणी लष्कराचे इस्लामीकरण जन झिया उल हक यांनी सुरु केलं.गंमत म्हणजे लष्करात पाच वेळेस नमाज पढण्यासाठी अधिकार्याच्या वैयक्तिक गोपनीय अहवाल (ACR) मध्ये गुण होते. त्यामुळे एक आमचे वरिष्ठ (मित्र) नौदलाचे अधिकारी अडमिरल बंगारा पाकिस्तानात राज्दुतावासात अधिकारी होते. तेथे त्यांच्या बरोबरचे पाकिस्तानी अधिकारी दुपारी मेस मध्ये बियर पिता पिता मध्येच उठून नमाज पढण्यासाठी जात असत. (पूर्ण लष्करी गणवेश उतरवून सलवार कमीज चढवून नमाज पढायचा आणी परत गणवेश चढवायचा). ते पाकी अधिकारी हसत म्हणाले का करणार ACR मध्ये गुण कमी व्हायला नकोत. सर्वाना इस्लाम बद्दलचे शिक्षण देण्यासाठी मौलवी सुद्धा नेमले होते. विचारवंत माणूस यातून सुटू शकेल परंतु मध्य आणी निम्न स्तरावरील लोकांचे धृविकरण बर्यापैकीझाले हि वस्तुस्थिती आहे.
17 Dec 2014 - 5:18 pm | काळा पहाड
मी कदाचित चुकत असेन पण पाक आर्मी = तालिबान हे लॉजिकली बरोबर वाटत नाही. आर्मीच्या परंपरा असतात, प्रोसेसेस असतात. माझ्या मते त्यात कडवेपणा झिरपू शकतो पण सर्व आर्मी जिहादी विचारांची असं नक्कीच नसावं. असो. मी या बाबतीत आर्म चेअर अॅनॅलिस्टची भूमिका वठवू इच्छित नाही. इथले आर्मी एक्स्पर्ट्स काय म्हणतात ते ऐकायला मला आवडेल.
17 Dec 2014 - 8:19 pm | प्रसाद गोडबोले
हा सुहास डोक्यावर पडलाय . अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो .
डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेस इस्लामचा स्विकार का केला नाही ह्यावर जर वाचन कर रे भावा !
बामियानच्या बौध्द मुर्ती फोडणारे कोण होते ह्याचा जरा अभ्यास कर.
उगाचच पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदुर्वर जळजळ काढणारी तुझ्यासारखी मंडळी आहेत म्हणुन मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास असुनही कठीण वज्रास भेदु ऐसे व्हावे लागते !
तुजप्रत कल्याण असो .
17 Dec 2014 - 8:46 pm | सुहास..
हा सुहास डोक्यावर पडलाय . >>>
बाबा रे ! अजुन प्रताप माहीत नाहीत बहुधा तुला माझे ! मी किती डोक्यावर पडलोय हे अजुन मिपावर तरी दाखविले नाही ..
अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो . >>
जर का अभ्यास जगातल्या कुठल्याही दोन धर्मांमध्ये दरी वाढविणार असेल तर तसला अभ्यास तुमचा तुम्हालाच लखलाभ होवो
डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेस इस्लामचा स्विकार का केला नाही ह्यावर जर वाचन कर रे भावा ! >>>
आणि धर्मांतर केले कशासाठी होते ? कुठल्या धर्माने त्रास दिला होता आम्हा दलीतांना ? उगा इतिहास उगाळु नका .भावना भडकावु नका ......
पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदुर्वर जळजळ काढणारी तुझ्यासारखी मंडळी आहेत >>
गप्पे !! पुरोगामित्व बघीतलय जस्ट नाऊ मुटेकाकांच्या धाग्यावर, त्यामुळे बेगड्या हिदुंत्वावर ही गफ्फा नकोत आणि पुरोगामित्वावर ही ...
( वाटचाल बघा झरा स्वःताची , मिसळपावचा निख्खळ आनंद मारुन टाकला साल्ला या सगळ्या चर्चांनी )
17 Dec 2014 - 9:54 am | योगी९००
प्रगो..
इथे लहान मुलांची क्रुर हत्या झालीय आणि तुम्हाला शतकी मुद्द्याचे पडलेयं असा समज होत आहे तुमच्या प्रतिक्रियेवरून... . अर्थात तुमचा तसा उद्देश नाही आहे हे सर्वांना माहित आहे. तसेच दहशतवादाला धर्म नसतो म्हणे या नंतर स्मायलीचीही गरज नव्हती. अशावेळी सर्वांनी आपापल्या भावनांवर आवर घालणे हे उत्तम..
दहशतवाद्यांचा तीव्र निषेध आणि मरण पावलेल्यांना श्रद्धांजली..!!
17 Dec 2014 - 5:06 pm | प्रसाद गोडबोले
भावनांना आवर ह्या वरुन सुचले हे ...
योगी,
तुमच्या गल्लीतलया मुस्लिमलोकांनी भारत पाकिस्तान मॅच मधे भारत हरल्यावर फटाके वाजवल्याचे पाहिले आहे का हो कधी ?
किंव्वा तुमच्या ओळखीतल्या कोणी हातावर "लादेन" असा टॅटु करुन घेतला आहे का हो ?
क्किंव्वा
तुमच्या रुममेटने कधी "९-११" प्रकारात तालिबानचा दोष नव्हताच तो अमेरिकेचा खोटारडेपणा आहे लादेन निर्दोष होता अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ?
किंवा तुमच्या कलीगने कधी "काश्मीर मधे भारतीय सेनाच गरीब बिचार्या लोकांना त्रास देते , तिथे दहशतवादी नाहीयेतच" अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ?
किंववा तुमच्या टीममॅटने कधी "चलो तुम्हारा नाम आज से अब्दुला खान करके तुम्हे कन्व्हर्ट कर देते है " असे विधान केले आहे का ?
मी पण लय जग पाहिलय योगीराव , भावना कशा आवरायच्या मला व्यवस्थित माहीत आहे , माझा प्रतिसाद भावनेच्या भरात दिलेला नसुन सारासार विचार करुनच दिलेला आहे :)
16 Dec 2014 - 8:56 pm | श्रीगुरुजी
मृतांचा आकडा १६० वर पोहोचला आहे. अरेबिक बोलणार्या ८ अतिरेक्यांपैकी चौघांनी स्वतःला बॉम्बने उडवून दिले व दोघांना लष्कराने गोळ्या घालून मारले आहे. अजून दोन अतिरेकी शाळेतच असून त्यांनी अजून २० शिक्षक व ३४ विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले आहे.
अशाच स्वरूपाचा हल्ला काही वर्षांपूर्वी रशियातील उत्तर ओसेशिया प्रांतातील बेस्लन येथे झाला होता. त्या हल्ल्यात ३२ चेचन अतिरेक्यांनी एका शाळेवर हल्ला करून १००० विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले होते. रशियन लष्कराने त्यांना सोडविण्यासाठी केलेल्या प्रतिहल्ल्ल्यात ३३० जणांचा मृत्यु झाला होता.
योगायोग म्हणजे ४३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १६ डिसेंबर १९७१ ला भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करून बांगलादेशाचा जन्म झाला होता.
16 Dec 2014 - 9:14 pm | आयुर्हित
१९७१मध्ये भारताशी हरलेला पाकिस्तान आज स्वत:शी पण हरला
16 Dec 2014 - 9:32 pm | हुप्प्या
तालिबान हा एक भस्मासूर बनला आहे. रशियाशी लढत असताना मुजाहदिन लोक शौर्याचे मूर्त रुप म्हणून गौरवले जात होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांनी ह्या लोकांची अमेरिकेचे संस्थापक मंडळींशी (वॉशिंग्टन प्रभृती) तुलना करून त्यांना फार वरच्या पातळीवर नेऊन ठेवले होते. पण आता हा भस्मासूर त्यांना पोसणार्या अमेरिका, पाकिस्तानवर उलटला आहे. निष्पाप मुलांना मारणे हे कुठल्याही संस्कृतीला पटणारे नाही. पण धर्माची अतिरेकी नशा चढलेल्या लोकांना हे भान असणार नाही.
16 Dec 2014 - 9:35 pm | पिंपातला उंदीर
दुर्दैवी घटना . हि घटना मुस्लिम कट्टर धर्मान्धानी घडवून आणली हे च सत्य . पण या घटने मधून माझ्या देशाने काय धडा घ्यायला हवा ? धर्मांध हे धोकादायकच असतात . मग ते कुठल्याही धर्माचे असो . आपल्या कडच्या अनेक हिंदू धर्मांधाना सौदी अरब किंवा पाकिस्तान चे एक सूक्ष्म आकर्षण असत . ते म्हणजे ते बघा कसे कट्टर आहेत त्यांच्या धर्माबद्दल . नाही तर आपण किती मवाळ आहोत ? पण हिंदू धर्मांध सोयीस्कर पणे विसरतात कि १९७१ मध्ये याच सेकुलर देशाने एका कट्टर धर्मांध देशाला दोन तुकड्यात विभाजित केल होत . भारतासारख्या प्रचंड वैविध्य असणार्या देशासमोर , सगळ्या जाती धर्मा च माहेर घर असणार्या देशासमोर आव्हान आहे ते धर्मांधता न वाढू देण्याच . मग ती iSIS असो , LTTE असो , किंवा RSS असो . आता सध्या देशात ओवेसी , रामझादे वाली साध्वी , साक्षी महाराज , या लोकांची चलती आहे . दुसऱ्या धर्माच्या धर्मान्धांवर टीका करताना आपण आपल्या धर्माच्या धर्मांधाना थारा देत आहोत का याची खातरजमा आपण च करून घ्या . नाही तर महा शक्ती असण्याची क्षमता असणारा हा देश दुसरा पाकिस्तान बनेल यात काही शंका नाही . पंतप्रधान बनल्यावर मोदी ना हे नक्कीच कळले असेल पण भक्ताना ज्या दिवशी हे कळेल तो सुदिन . कुठेही मोदी भक्तांना खेचून आणता का अशी टीका होईल पण हा प्रतिसाद माझा देश कट्टर धर्मांध होऊ नये या तळमळीतून आला आहे
16 Dec 2014 - 9:48 pm | अनुप ढेरे
सहमत आहे.
16 Dec 2014 - 11:18 pm | हुप्प्या
तालिबान्यांनी केलेल्या ह्या निर्घृण हल्ल्याचा वापर करून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपून काढण्याचा हा प्रकार निंदनीय व अज्ञानमूलक आहे. सब घोडे बारा टक्के असा न्याय लावून जसे तालिबानी तसेच हिंदुत्त्ववादी असे पुरोगामी समीकरण लावणे चूक आहे.
१९७१ मधे पाकिस्तानचे दोन तुकडे केले ते केवळ भारताचे कर्तृत्त्व नव्हते. तर पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर अत्याचार केले. बंगाली समाजाला हे कळले की निव्वळ मुस्लिम असल्याने आपली नाळ दुसर्या पाकिस्तानशी जोडली जाऊ शकत नाही. आपली संस्कृती वेगळी आहे. आणि भौगोलिक अंतर त्यामुळे हे घडले.
ज्या प्रमाणात आज मुस्लिम अतिरेकीपणा बोकाळला आहे त्याचे कारण त्या धर्मात कुठल्याही सुधारणा करणे नामंजूर आहे. तसे करणार्याला पाखंडी म्हणून मृत्यूदंड दिला जाऊ शकतो. बाकी सर्व धर्म एक तर मवाळ स्वभावाचे आहेत (जसे जैन) किंवा त्यांनी आपणात सुधारणा केल्या आहेत (जसे ख्रिस्ती धर्म)
कुठल्या धर्माच्या अमलाखाली असणार्या देशात त्या धर्माविरुद्ध टीका करणार्यांना मृत्यूदंड आहे? अगदी अतिरेकी हिंदू म्हणवले जाणारे मोदीही भारतात असा कायदा आणू इच्छित नाहीत. लोकगीते, नाटके ह्यात हिंदू देवांचीही चेष्टा केली जाते. मुस्लिम धर्मात असे शक्य नाही.
नुसते भोंगळपणे सगळ्यांना एकाच मापात तोलणे म्हणजे १ इंच हे अंतर आणि १ मैल हेही अंतरच म्हणून दोन्ही सारखे म्हणण्यापैकी आहे.
माझे असे म्हणणे आहे की कितीही प्रयत्न केला तरी हिंदू धर्म हा मुस्लिम धर्माइतका कट्टर होऊ शकत नाही. त्या धर्माची मांडणी तसे होण्यापासून त्याला परावृत्त करतील. उदा. बहु ईश्वरवाद, कुठल्या एकमेव धर्मग्रंथाचा अभाव, कुठल्या एकमेवाद्वितीय प्रेषिताचा वा दैवी व्यक्तीचा अभाव, कुठलीही मूलतत्त्वे नाहीत (मूर्तीपूजा योग्य की अयोग्य, पुनर्जन्म आहे का नाही, स्वर्ग नरक आहे का नाही इ.)
कितीही कट्टर झाला तरी धर्माच्या प्रभावाखाली (हे महत्त्वाचे) येऊन कुठला हिंदू विमान अपहरण करू शकेल असे मला वाटत नाही, कुठल्या शाळेवर (अगदी मदरसा असली तरी) बेछूट गोळीबार करून शेकडो मुले मारूच शकणार नाही. एखादे उन्मादमूलक कृत्य जसे दंगल व थंड डोक्याने कारस्थान आखून केलेले कृत्य ह्यात फरक आहे. मुस्लिम धर्माचे अतिरेकी हे थंड डोक्याने, योजना आखून विध्वंसक, हिंसक कृत्ये पार पाडतात असा आजवरचा इतिहास आहे. ह्या धर्मात सुधारणा झाल्या तरच त्याला आळा बसेल.
16 Dec 2014 - 11:43 pm | असंका
मग आपल्यामते हे चांगलं की वाइट?
17 Dec 2014 - 12:56 am | काळा पहाड
ते हेच सांगतायत की हे चांगलं किंवा वाईट नसतं. अशी चेष्टा करणारे सुद्धा हिंदूच असतात पण त्यामुळे ते धर्मबाह्य ठरत नाहीत.
17 Dec 2014 - 1:00 am | असंका
चांगलं किंवा वाईट नसतं? खरंच?
आपल्या श्रद्धास्थानांची चेष्टा कुणी केली तर ते चांगलंही झालं नाही किंवा वाईटही झालं नाही? इतके स्थितप्रज्ञ आहात आपण?
17 Dec 2014 - 2:03 am | हुप्प्या
मुक्त समाजात विविध प्रकारचे लोक रहातात. कुणी सच्चे धर्मभक्त असतात, कुणी स्वार्थापुरतेच धर्मभक्त असतात तर कुणी ठार नास्तिक असतात. कुणी वेगळ्या धर्माचे असतात. ह्या सर्वांना आपापल्या मतांचे स्वातंत्र्य असायला हवे. तो काय नास्तिक आहे, तो तमक्या धर्माचा आहे त्याला आमचा धर्म काय कळणार तो अशी चेष्टा करणारच, दुर्लक्ष करा इतपत समजून घ्यायची परिपक्वता असेल तर त्याला स्थितप्रज्ञ वगैरे फार मोठी नावे द्यायची गरज नाही. याउलट अशा प्रकारे टीका करणार्यांना जाळून, ठेचून वा भोसकून ठार मारावे असा कायदा करणे कितपत योग्य आहे?
अशा प्रकारे राक्षसी कायदे असतील तर ते वापरून अनेकदा नास्तिक वा अन्य धर्मीय लोकांना ब्ल्याकमेल केले जाते. वेळप्रसंगी मारलेही जाते.
उदा. हिंदू पुराणात अनेक हास्यास्पद वाटणार्या गोष्टी आहेत. त्यावरून कुणी टिंगल टवाळी केली तर संबंधित व्यक्तीला शिक्षा द्यावी का आणि किती? मला वाटते कुठलीही शिक्षा देऊ नये. पण हे फक्त एकाच धर्माला लागू नसावे. नाहीतर त्या स्वातंत्र्याला अर्थ नाही.
असो, विषयांतर पुरे.
17 Dec 2014 - 10:08 am | काळा पहाड
हिंदू धर्मातल्या एखाद्या गोष्टी बद्दल हिंदू धर्मातल्या लोकांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे. बाकीच्या धर्मातल्या लोकांनी मात्र लांब रहावं कारण ते मुळातच या धर्माच्या विरूद्ध्ह असणार. त्यामुळे हिंदू धर्मातल्या वाईट गोष्टी दाखवणार्या बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र दाभोळकरांना माझा पाठिंबा असणारच कारण ते आमचेच लोक आहेत. पण एम एफ हुसेनसारख्याला मात्र ठोकायलाच हवं असं मला वाटतं.
17 Dec 2014 - 10:17 am | टवाळ कार्टा
बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र दाभोळकर
हे जे बोलायचे त्याला अभ्यास आणि मुद्देसूद बोलणे असायचे
17 Dec 2014 - 10:30 am | योगी९००
हुप्प्या यांच्या प्रतिसादाशी सहमत...!!
तालिबान्यांनी केलेल्या ह्या निर्घृण हल्ल्याचा वापर करून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपून काढण्याचा हा प्रकार निंदनीय व अज्ञानमूलक आहे. सब घोडे बारा टक्के असा न्याय लावून जसे तालिबानी तसेच हिंदुत्त्ववादी असे पुरोगामी समीकरण लावणे चूक आहे.
+१०००० सहमत...!!
17 Dec 2014 - 3:23 pm | क्लिंटन
हा असला आडाणी प्रकार बघितला की तळपायाची आग मस्तकात जाते.आणि असे करणारे लोक मोठे धर्मनिरपेक्ष म्हणून मिरविले जातात त्याचा आणखी संताप येतो.
आजच निखिल वागळेंचा टिवटिवाट जसाच्या तसा पेस्ट करतो:"Peshawar incident tells us how religious fanatics behave. RSS Parivar is not Taliban today, but can become one if they get chance" . या असल्या शतमूर्खांना एक गोष्ट कशी कळत नाही हेच समजत नाही.रा.स्व.संघाचे लाखांनी सदस्य आहेत आणि काल-आजपासून नव्हे तर गेल्या ९० वर्षांपासून सुरवात होऊन.तालिबान्यांनी केलेल्या कृत्यांप्रमाणे किती कृत्ये रा.स्व.संघाच्या सदस्यांनी केली आहेत? मी रा.स्व.संघाचा समर्थक आहे अशातला भाग नाही पण असला पुरोगामी बिनडोकपणा बघितला तर भविष्यात रा.स्व.संघाचा कट्टर समर्थक व्हायची शक्यताही नाकारता येणार नाही :) मागेही टाईम्स ऑफ इंडियामध्ये काश्मीरविषयी "हॉक्स" कोण आणि शांतीची कबुतरे कोण याचे फोटो आले होते.त्यात हॉक्सच्या यादीत गिलानीपेक्षा अडवाणींचा फोटो पहिला होता.आता बोला.
17 Dec 2014 - 3:36 pm | प्रसाद गोडबोले
डोक्याला शॉट ... अक्कल कुठे गहाण टाकुन आलेत हे पुरोगामी लोक ? *dash1*
17 Dec 2014 - 3:38 pm | बॅटमॅन
चान्स मिळाला तर काहीही होऊ शकतं ना. अगदी अल कायदासुद्धा शांतिसेना होऊ शकते, हाफिझ सईद संत बनू शकतो. तद्वतच डार्क साईडलाही माणूस जाऊ शकतो. त्यात इशेश ते काय. चान्स मिळाला की मोदीविरोधकांचे मोदीभक्तही होतात. त्यामुळे यात तत्त्वतः अशक्य काहीच नाही.
17 Dec 2014 - 4:10 pm | प्रचेतस
आता तुम्ही सुद्धा चर्चा भरकटवताय असे वाटत नाही का?
17 Dec 2014 - 4:14 pm | प्रसाद गोडबोले
नाही
असे म्हणाणार्यांची मनोवृत्ती
अन
अन
असे प्रतिपादन करणारी मनोवृत्ती
ह्या तिन्ही वृत्ती तात्विक दृष्ट्या समानच आहेत इतकेच दाखवुन द्यायचे होते :D
17 Dec 2014 - 7:48 pm | क्लिंटन
निखिल वागळेंच्या या टिवटिवाटाला श्रीहर्ष पेरला नावाच्या एका ट्विटरेटीने दिलेले उत्तर वाचून हसून हसून खुर्चीवरून पडायची वेळ आली. त्याचे
उत्तर "Tehelka incident tells us how left fanatics behave. @waglenikhil is not a rapist today, but can become one if they get chance"
17 Dec 2014 - 8:07 pm | श्रीगुरुजी
कुमार केतकरसुद्धा निखिल वागळेंसारखेच अडाणी आहेत. अशा संतापजनक व्यक्तींना मी 'निधर्मांध' म्हणतो.
दूध व शॅम्पेन यांना एकसमान मानणे हा जितका मूर्खपणा आहे तितकाच मूर्खपणा तालिबानी व संघाला एकसमान मानताना होतो हे यांच्या गुडघ्यात कधी शिरतच नाही.
16 Dec 2014 - 9:51 pm | इडली डोसा
काही पाकिस्तनी व्यक्तिंशी बोलणं झालं होतं आणि त्यन्च्या कडुन हे कळालं कि बरीच कुटुंब स्थलांतरित होउन दुसर्या देशांमध्ये गेली आहेत. पण अजुनही बरीच अभगी लोकं तिथेच आहेत ज्यांना दुसरी कडे जाणं शक्य नाही.
बाकी सर्वसामन्य पकिस्तानी नागरीकांची स्वप्नं , ईच्छा , आकांक्षा हि अपाल्यासरख्याच आहेत.
16 Dec 2014 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा
प्रॉब्लेम असा आहे.की असे शेकडो हल्ले इस्लामी जगता अंतर्गत (त्यांच्यावरच) झाले..तरी (त्यात मेलेल्यां..उरलेल्या सहीत) कुणालाही हे पटत नाही..कि हे सर्व आपल्या धर्मामुळे होतं आहे. आमच्या वैदिक(हिंन्दु) धर्मात जसं "खरा" ब्राम्हण-याच्या भरपूर संज्ञा/व्याख्या निघतात..कारण मुळात "खरा" ब्राम्हण ही कल्पनाच खोटी आणि लबाड आहे.(म्हणूनच मी म्हणत असतो,की मी ब्राम्हण-असणं, हे धर्म शास्त्रानीच अशक्य करून ठेवलेलं आहे.) तद्वतच "सच्चा मुसलमान" कुणीच(असू शकत..) नसल्यामुळे, सावरकर म्हणायचे तसं..ज्याची लाठी बलवान तोच(त्या वेळी..) खरा..,हा न्याय तिथे लागू पडतो. म्हणूनच या असल्या खर्या लोकांच्या हतात राज्य आणविण्यासाठी हे हल्ले आणि धर्मयुद्ध लढवली जातात..आणि याच "खर्या" लोकांनीच ही धर्मशास्त्रे देवाची नावे घेऊन लिहिली आहेत..फक्त ती सामान्य जनतेला भुलवणार्या भाषेत व तत्त्वात लिहिली आहेत..आश्या अर्थानी पाहिलं,तर ह्या सर्व सोई धर्मशास्त्रेच करून ठेवत असतात,हे सहज कळतं..परंतू, हे सामान्य(मरणार्या) जनतेला उमगत नाही..म्हणून (प्रत्येक धर्मातली..) तीच "बिचारी" सामान्य जनता कायम म्हणत रहाते,,,
कुणी कुणाला मारली पाचर?,मागे पुढे पत्ता नाही
सामान्यांचे खुळे मेंदू,धर्माशिवाय सत्ता नाही.
16 Dec 2014 - 11:36 pm | खटपट्या
क्या बात है !!
17 Dec 2014 - 3:38 am | अर्धवटराव
आता विषयांतर झालेच आहे म्हणुन..
अशा अनेक संज्ञा, शक्यता, कल्पना निघणं हे प्रगतीच्या स्कोपचं लक्षण आहे. मानवी प्रगतीचे मापदंड मूलतः सब्जेक्टीव्ह्च असायला हवेत.
हा अत्यंत चुकीचा निश्कर्ष आहे. खरेपणा कितीही बदलत गेला तरी त्याच्या सच्चेपणाला बाध येत नाहि.
तसं असण्यात काहिही गैर नाहि.
प्रॉब्लेम कोण सच्चा आणि कोण झुटा हा नाहिच मुळी. आपण जसं इतरांचं मुल्यमापन करतो तसं इतरांना आपलं मुल्यामापन करु द्यावं काय, आणि इतरांना स्खलनशील समजताना आपणही त्याच मातिचे बनलो आहोत हे स्विकारणं आपल्याला शक्य आहे काय, इतका साधा प्रश्न आहे.
17 Dec 2014 - 6:39 am | अत्रुप्त आत्मा
नाही हो नाही .. काही तरी गैर समज होतोय. मी ज्याच्या बद्दल बोलतोय, त्या संद्न्या धर्माच्या पोथ्यंमधे लबाडनि केलेल्या स्वत:च्या सोई बद्दल... सर्व सामान्य माणसे धर्माचा जो "चांगला" अर्थ घेतात त्याबद्दल नाही.
असो....अत्ता वेळ नाही. दुपारी आल्यावर सविस्तर लिहिन.
17 Dec 2014 - 12:16 pm | प्रसाद गोडबोले
बुवा , काही अत्यंत विनम्र प्रश्न :
तुमचा इस्लामचा अभ्यास किती ?
इस्लामचा उदय कसा झाला ?
इस्लामपुर्व अरब जगतात मक्का येथे काय होते ?
हुबाल म्हणजे कोण ?
वहाबी , शिया , सुन्नी,, अहमदीया , बोहरा , सुफी ह्यातील मुख्य फरक काय ?
पवित्र कुराण आणि हदीथ च्या मते सच्चा मुसलमान कोणाला म्हणायचे ?
दार-उल-हर्ब आणि दार अल इस्लाम म्हणजे काय ?
आपला वैदिक धर्माचा 'अभ्यास' आहे असे गृहीत धरत आहे . पण इस्लामचा अभ्यास केल्याशिवाय तौलनिक प्रतिक्रिया देवु नयेत ही अति नम्र विनंती !
संपादित
17 Dec 2014 - 12:38 pm | प्रचेतस
बुवांचा इस्लामविषयक अभ्यास अतिशय चांगला आहे.
शेषराव मोरे, हमीद दलवाई, कुरुंदकर आदी ते कोळून प्यायले आहेत.
बाकी हिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस रूढींनी भरलेला आहे असे नमूद करतो.
17 Dec 2014 - 12:43 pm | प्रसाद गोडबोले
बरं
ओके . मग हिंदु अतिरेक्यांनी शाळेत घुसुन १५० पोरं मारली असली एखादी घटना सांगा .
17 Dec 2014 - 12:46 pm | प्रसाद गोडबोले
पेशावर मधे घडलेली ही नृशंस घटना आणि वैदिक धर्मातलया तथाकथित हिणकस रुढी ह्यांची तुलना उगाच कै च्या कै अस्थानी आहे इतकेच म्हणु इच्छितो !
17 Dec 2014 - 12:47 pm | प्रचेतस
मी रूढींनी म्हटलंय मित्रा. पोरे मारण्याचा इथे काय संबंध?
बाकी अगदीच ताणायचे म्हटले तर कंसाने देवकीचे आठ पुत्र मारले, गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाचा निर्वंश केला. =))
17 Dec 2014 - 12:55 pm | प्रसाद गोडबोले
हिणकस रुढी आणि निष्पाप मुलांचा जीव घेणे ह्या दोन गोष्टींची तुलनाच होवु शकत नाही .
>> हिंदु धर्मावर टीका करणारे कंस , कृष्ण मुळात झालेच नाहीत निव्वळ काल्पनिक आहेत असे मानतात म्हणुन हा पॉईंट बाद ठरतो .
शत्रुचा निर्वंश करणे हे आमच्या वैदिक धर्मात तरी एकदम न्याय्य आहे .
आर्य चाणक्यांनीही ह्याला विरोध केला नसता . इव्हन महाभारतातही अर्जुन कृष्णाने खांडववनात जिनोसाईड केलेच ना ... मत्स्य न्याय परफेक्टली लॉजिकल !
वैदिक धर्म प्रचंड लॉजिकल आहे ... तुमच्या हिंदु धर्माचे माहीत नाही :D
17 Dec 2014 - 12:45 pm | मदनबाण
हिंदू धर्मसुद्धा अतिशय हिणकस रूढींनी भरलेला आहे असे नमूद करतो
आमच्या हिंदूंना हिंदू धर्माबद्धल लईच ज्ञान... परंतु उपद्रवमुल्य कोणाचे ? त्या बद्धल बोलण्याचे सोडुन इतर गोष्टीच चर्चेत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
17 Dec 2014 - 12:49 pm | प्रचेतस
इस्लामचे उपद्रवमूल्य वादातीत आहेच यात काहीच शंका नाही.
पण दुसर्यावर टिका करण्याआधी स्वतःच्या घरात काय जळते आहे ते कसे विझवता येईल ते बघावे आधी माणसाने.
17 Dec 2014 - 1:20 pm | मदनबाण
स्वतःच्या घरात काय जळते आहे ते कसे विझवता येईल ते बघावे आधी माणसाने.
हॅहॅहॅ... चांगला विनोद आहे बरं का वल्ली शेठ ! सती प्रथा आज आहे का ? कोणत्याही कारणांनी का होइन, कितीही विरोध का होइना त्यात बदल झाला ना ? हिंदू त्यांची जीवन पद्धती काळा प्रमाणे सातत्याने बदलत आले आहेत. शरीयत कायद्या प्रमाणे गीता कायदा किंवा मनूस्मॄती इ.चा वापर करुनच जगा नाहीतर मरा ! असे हिंदू इतर धर्मियांना सांगत नाहीत्,आणि त्यांची हिंसा देखील करत नाहीत.
बादवे आपण जरा "काफिर" या विषयावर देखील उजेड पाडावा अशी नम्र विनंती ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
17 Dec 2014 - 1:30 pm | प्रचेतस
बदल झाला आहे, होत आहे आणि अजूनही खूप बदल होणे बाकी आहे जे होणे गरजेचे आहेत.
येथे इस्लामचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. मी स्वतः इस्लामचा कडवा विरोधक आहे.
बाकी काफिर म्हणजे श्रद्धाहीन. मग त्यात हिंदू, बौद्ध, जैन, क्रिस्टियन्स, बोहरा, अहमदिया आदी पंथांमधले लोक सुद्धा आले.
17 Dec 2014 - 1:33 pm | मदनबाण
येथे इस्लामचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. मी स्वतः इस्लामचा कडवा विरोधक आहे.
हा धागा ब्राम्हण-अब्राम्हण जाती-रुढींवर नसुन धर्मांधतेने झालेल्या हिंसाचारावर आहे... आणि तो त्याच ट्रॅकवर रहावा.
बस और कुछ नही...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
17 Dec 2014 - 1:39 pm | प्रसाद गोडबोले
बाकडे वाजवुन अनुमोदन !!
नोट :
मदनबाण , काळापहाड हे माझे डुप्लिकेट आयडी नाहीयेत .
17 Dec 2014 - 12:49 pm | प्रसाद गोडबोले
हिंदु धर्मीयांनी प्रोअॅक्टीव्हली केलेल्या हिंसेचे एक उदाहरण द्या
हा माझा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे ! ( एक पुष्यमित्र शुंगाचे नाव घेता येते पण त्याने केलेले हिंसा हे अशोकाच्या आतातायीपणाला दिलेली रीईक्शन होती असे मानायला लईच वाव आहे )
17 Dec 2014 - 12:58 pm | प्रचेतस
गुप्तांच्या वैभवशाली साम्राज्याच्या अस्तानंतर इस्लामचा उदय झाला आणि मध्यपूर्वेतून इस्लामची आक्रमणे वरचेवर सुरु होऊ लागली त्यामुळे संपूर्ण भारतभर कुणा एकालाही सार्वभौम साम्राज्य स्थापणे अशक्य झाले. त्यामुळे राष्ट्रकूट, चालुक्य, पाल, अहोम, परमार, यादव, होयसाळ, चोल, पांड्य अशी अनेक राजघराणी उदयास आली.
मध्ययुगीन भारताचा हा इतिहास त्यांच्यातील परस्परसंघर्षांनी आणि रक्तरंजित लढायांनी भरलेला आहे.
17 Dec 2014 - 1:00 pm | प्रसाद गोडबोले
मत्स्य न्याय
मत्स्य न्याय
मत्स्य न्याय
17 Dec 2014 - 2:24 pm | बॅटमॅन
असहमत.
गुप्तांनंतर काही काळ हूणांची आक्रमणे झाली. यशोवर्मन मौखरी नामक यूपीमधील राजाने ती परतवून लावली, नंतर मग हर्षवर्धनाचा उदय झाला. इ.स. ६४७ मध्ये तो मेला. त्याच्यानंतर कनौज या राजधानीच्या शहरावर कब्जा मिळवण्यासाठी दख्खनचे राष्ट्रकूट, गुजरात-राजस्थानचे गुर्जर-प्रतिहार आणि बंगालचे पाल यांच्यात ट्रिपल थ्रेट म्याच सुरू झाली ती दोनतीनशे वर्षे तरी सुरूच राहिली. यामुळे भारतातील बहुतांशी राज्ये दुबळी झाली होती- किमान नॉर्थमधली तरी.
याच वेळेस अरबांची आक्रमणे सुरू होती, परंतु त्यांचा इम्पॅक्ट नगण्य होता. मुहम्मद बिन कासीमने दाहीरचा पराभव करून इ.स. ७१२ मध्ये सिंध घेतले खरे, पण ४०-५० वर्षांतच ते परत घेतल्या गेले. इ.स. ७५० च्या आसपास प्रतिहास राजा नागभट याने अरबांचा काही लढायांत जबर्या पराभव केल्याने ते परत गेले ते गेलेच. त्याच सुमारास अफगाणिस्तानातील हिंदू राज्यांशीही अरबांचा व अन्य इस्लामिक सत्तांचा संघर्ष सुरूच होता. काबूल व झाबूल या राज्यांना अरब सोर्सेस मध्ये "हिंदू शाही" असे नाव रूढ आहे. या हिंदू शाही राज्यांनी भारताची सरहद्द दोनेकशे वर्षे यशस्वीरीत्या रक्षिली.
त्यामुळे अंतर्गत कलहाचे व एकछ्त्री साम्राज्य स्थापण्यात आलेल्या अपयशाचे कारण मुसलमानी आक्रमणे होती हे खरे नाही. एक साधे उदा. घ्या. हर्षवर्धनाने चालुक्य पुलिकेशी यावर आक्रमण केले. ती लढाई झाली नर्मदातीरी. त्यात हर्षवर्धन हरला. नंतर चालुक्यांनी तमिळनाडूच्या पल्लवांवर आक्रमण केले तेव्हा चालुक्यही हरले. त्यामुळे हा काळच रीजनलायझेशनचा होता असे म्हटल्यास चूक ठरू नये.
17 Dec 2014 - 2:31 pm | बॅटमॅन
आय मीन, अरबांच्या आक्रमणांनंतर (इ.स. ७५०) डायरेक पहिले आक्रमण येते ते गझनीच्या महंमदाचे (इ.स. ९८०). मधली २०० वर्षे भारतात जे काही चालले होते त्याचे कारण मुसलमान आक्रमणे नव्हेत.
17 Dec 2014 - 2:34 pm | प्रचेतस
सहमत आहेच रे.
भारतात इस्लामचा प्रभाव १० व्या शतकानंतरच खर्या अर्थाने सुरु झाला.
माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच होता की गुप्तांनंतर हर्षवर्धनाचा ३०/४० वर्षाचा काळ वगळता त्यानंतर कुठल्याही एका राजवटीला भारतात सार्वभौम राजवट स्थापन करणे अशक्य झाले. आपापसातील लढायांमुळेच कमजोर होत जाऊन शेवटी ही राज्ये इस्लामच्या भक्ष्यस्थानी पडली.
17 Dec 2014 - 2:36 pm | बॅटमॅन
हां ते आहेच. या वाक्यातून
जे कॉजेशन ध्वनित होते त्यालाच फक्त आक्षेप आहे. बाकी काही नाही.
17 Dec 2014 - 2:41 pm | प्रचेतस
ओह्हो.
लिहिण्याच्या ओघात झालेली चुकीची वाक्यरचना. :)
17 Dec 2014 - 2:46 pm | प्रसाद गोडबोले
तुम्ही दोघं सारखं असं लिंबोत जात जाऊ नका ... मुद्दा असा आहे की त्यांच्यातील हिंसा अन आपल्या धर्मातील "हिणकस" रुढी ह्यांची तुलना आतातायी अस्थानी आहे .
इव्हन हिंदुनी केलेली हिंसा अन त्यांनी केलेली हिंसा ह्यातही जमीन अस्मानाचा फरक आहे .
इथे तालिबान्यांचा नंगा नाच स्पष्ट दिसत असताना "दहशतवादाला धर्म नसतो " किंव्वा "सगळेच धर्मात धहशतवादी प्र्वृत्ती असतात " किंव्वा "हिंदुंमधील "हिणकस " रुढी ह्या १५० लहान पोरांना मारण्याइतक्याच क्रुर आहेत" वगैरे विधानांनी विषय भरकटवुन हिंदुत्ववाद्यांवर खापर फोडणे कोणत्याही तर्कनिष्ठ माणसाला पटण्या सारखे नाही.
हिंदुंमधील तथाकथित हिणकस रुढींवर कैकवेळा वाद विवाद झालाय , हवा असल्यास परत करु ( आज तसेही हाफिसात काम नाहीये ;) ) पण इथे विषय भरकटवु नका .
हां तर सांगा पाहु दहशतवादाचा रंग कोणता ?
17 Dec 2014 - 2:56 pm | बॅटमॅन
आमची चर्चा वेगळ्या मुद्याबद्दल होती. तदुपरि इथे मुद्दा कोण भरकटवते आहे?
शेकडो पोरे मेली तर त्याबद्दल निषेध व्यक्त करणे ही प्राथमिक गरज आहे. पाकड्यांना आता तरी नीट कळाले पाहिजे ही काय भानगड आहे ते.
तदुपरि मेलेली पोरे मुसलमान असल्यानेच जर कुणाला उकळ्या फुटत असतील तर तो वेगळा विषय आहे. त्याबद्दल बोलण्याची माझी इच्छा नाही.
17 Dec 2014 - 3:01 pm | प्रसाद गोडबोले
अत्लूप्त आत्माबुवा .. ते मनाले की हिंदुच्यात हिनकस लुधी असतात अन खला बाम्मन हा खल्या मुसलमाना इतकाच खोता अन लबाद अशतो अन हा आगोब्बा लग्गेच त्याची बाजु घेवुन बोल्ला ... दुश्त ल्ल्ल्लूऊऊऊ *beee*
ब्यॅतम्यान , तु ना त्यांचे घल उनात बांध अलेबियाच्या *diablo*
17 Dec 2014 - 3:04 pm | बॅटमॅन
हिंदू धर्मात हिणकस रूढी आहेतच मग. सवालच नाही.
फक्त इथे त्यांचा उल्लेख अप्रस्तुत आहे. अर्थात निव्वळ मुसलमानांना झळ बसली हे वाचून उकळ्या फुटणार्यांना जरा धरबंद म्हणून त्यांचा उल्लेख असेल तर अंशतः तेही मान्यच आहे.
17 Dec 2014 - 3:11 pm | प्रसाद गोडबोले
गूड . किमान इतके तरी मान्य केलेस :)
आता ह्या विषयी बोलायचे झालेच तर , एक माणुस मशाल घेवुन दुसर्याचे घर जाळायला निघाला होता त्या मशालीची आग घेवुन्त्याचीच लुंगी पेटली तर तुझी रीअॅक्शन काय असेल ?
मला तरी उकळ्या फुटतात असे काही पाहुन ... आत्ता कश्शी जिरली ... आता तरी अक्कल येईल की नाइ ह्यांना .
17 Dec 2014 - 3:16 pm | बॅटमॅन
अंशतः सहमत, अंशतः असहमत.
17 Dec 2014 - 3:22 pm | प्रसाद गोडबोले
बरं मग सांग तुझी रीअॅक्शन अशी असेल काय ?
>> आमच्या मंदीरातही नंदादीप तेवत ठेवतात त्यानेही एखाद्याची लुंगी पेटु शकते , आमच्या मडीरातही समया , दिवे उदबत्त्या वगैरे ज्वलनशील वस्तु आहेत . आमच्या मंदीरातले पुजारीही त्या मशाल घेवुन घर पेटवायला निघालेल्या सैताना इतकेच दांभिक , खोटे आणि लबाड आहेत !
अशी असेल का तुझी प्रतिक्रिया ?
17 Dec 2014 - 3:34 pm | बॅटमॅन
अशी बायनरीछाप प्रतिक्रिया या ठिकाणी मला देववत नाही, तस्मात तूर्तास पास.
17 Dec 2014 - 3:46 pm | प्रसाद गोडबोले
अतृप्त बुवांची प्रतिक्रिया त्या टाईअपची होती ...
आग लागली पेशावरात अन इस्लामच्या रुढी श्रध्दां विषयी बोलायचे की हिंदुंच्या ? ... अहो लाख असोत हिंदुंच्यात हिणकस प्रथा पण इथे त्याचा काय संबंध ? ह्या ना त्या निमित्ताने हिंदु धर्मावर टिका करायची म्हणजे झाले ... तो निखिल वागळेने पण तसाच काहीसा टिवटीवाट केलाय बघ .... हा म्हणजे हिंदुत्ववाद्यांना अन तालिबान्यांना एका तराजुत तोलण्याचा प्रकार झाला ... ISIS आणि RSS ची तुलना करण्या सारखे झाले ! ह्याला काय अर्थय राव ?
हे असं करणं पुरोगामित्वाची पर्क्विसिट आहे की काय ? तसे असल्यान आम्ही सनातनीच बरे !
|एका केवलमर्थसाधनविधौ सेना शतेभ्योधिका नन्दोन्मूलन दॄष्टवीर्यमहिमा बुद्धिस्तु मा गान्मम |
लेखनसीमा
_________________________________________________________________________________
17 Dec 2014 - 3:50 pm | क्लिंटन
मलाही. माझे घर जळले तरी चालेल पण ते जाळायची इच्छा आणि प्रयत्न करणार्याच्या केसालाही धक्का लागू नये असे म्हणणार्या बेगडी मानवतावादाला मी तरी फाट्यावर मारतो.
17 Dec 2014 - 5:39 pm | स्पंदना
फक्त..हो फक्त अवयवांचा पहिल्या मजल्याप्र्यंत पोहोचू शकेल असा ढिग पाह्यला ९३च्या स्फोटात. त्यावेळी किती त्या देशातले लोक कळवळले असतील विचारते मी. लोकलने घरी निघालेले सरणावर पोहोचले तेंव्हा किती कळवळले असतील ते लोक हे ही विचारेन मी. अगदी परवा मृत्यु पावलेल्या जवांनाची मुंडकी कापून नेली तेंव्हा अगदी शाळेला जाणारी हीच पोर कशी फुरफुरली असतील हे विचारते मी.
माझ्या पुजेत काही रोज सगळ्या जगात फक्त माझाच धर्म पसरव, तरच तू हिंदू अस म्हणत नाही मी. पण दिअवसातून पाचवेळा फकत एव्हढच म्हणुन मेंदू असा ठासुन भरला गेला आहे हे ही तितकेच खरे.
काल सिडनेच्या व्हिक्टीम्सना आदरांजली वहायला हे लोक मुद्दमहुन त्यांचे कपडे घालुन आले होते. त्यातल्या एकाची बायको दाखवायला म्हणुन चेहरा गंभीर ठेवायचा प्रय्त्न करत होती, पण तिची नजर जिहादच्या त्या तथाकथीत वीराला मिळालेया जन्नतची खुषी दर्शवत होती.
17 Dec 2014 - 4:57 pm | प्रसाद१९७१
मध्ययुगीन भारताचा हा इतिहास त्यांच्यातील परस्परसंघर्षांनी आणि रक्तरंजित लढायांनी भरलेला आहे. >>>>>
त्या लढाया धर्म ह्या बेसिस वर नव्हत्या त्यामुळे हे उदाहरण गैरलागू आहे.
काही कोटी लोक फक्त त्यांचा धर्म न मानणार्या लोकांना नामशेष करणे ह्या एकमेव ऑब्जेक्टीव्ह साठी एकत्र येतात, असे दुसर्या कुठल्याही धर्मात होत नाही.
17 Dec 2014 - 12:08 pm | प्रसाद गोडबोले
संत एकनाथच खरर्या अर्थाने ब्राह्मण आहेत असं कोणतरी म्हणाले होते म्हणे ... तर आज संत एकनाथ सुध्दा लबाड ठरले गेले आहेत.... टाळ्या !!
17 Dec 2014 - 5:04 am | निनाद मुक्काम प...
ऑपरेशन दर्ब ए अर्ज
म्हणजे मलाला च्या नावाने शिमगा करून उत्तर वझिरीस्तान मध्ये पाकिस्तानी तालिबान चा खातमा करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला राजी करण्यास वेस्टन वल्ड ला यश आले
मलाला वर लिहिलेल्या लेखात मी दोन वर्षापूर्वी म्हटले होते ही कारवाई झाली तर पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल
पण आजतागायत पाकिस्तानी तालिबान ने मोठ्या शहारात आत्मघाती हल्ले केले केले होते मग आज एवढे घातक
पाऊल का उचलले गेले ह्याचे कारण कारण मी वरती उल्लेख केला त्या ऑपरेशन मध्ये पाकिस्तानी सैन्याने तालिबान व त्याच्न्या कुटुंबाला गेल्या काही महिन्यात जवळजवळ ६०० च्या आसपास मारले हयात महिला व लहान मुले आली ,
आता आपली मुले मेल्याचे दुख्ख काय असते हे पाकिस्तानी लष्कराला दाखविण्यासाठी हे पाऊल उचलले गेले
बदला हा पठाणांच्या रक्तात आहे त्यांचे आयुष्य त्यांची जीवनशैली बदला ह्या शब्दाभोवती केंद्रित आहे ,
तेव्हा त्यांना जो नडेन तो आपल्या कर्माची फळे भोगेल
दुनिया टीव्ही जो आय एस आय व दाउद ने सहकार्याने उभारला आहे त्याने ह्या घटनेचे खापर रॉ व मोदी सरकार वर फोडून आपला कार्यभाग संपन्न केला आहे.
पाकिस्तानी तालिबान ला इंटेलिजन्स व तांत्रिक मदत रॉ देते असा त्यांचा नेहमीचा आरोप असून तेथे अश्या घटना घडल्या की भारतावर खापर फोडले जाते ,पण दुनिया वगळता इतर पाकिस्तानी वाहिन्या व भारत द्वेषी विचार जंत सुद्धा म्हणजे मुझाहीर लुकमान सारखे ह्या घटनेला पाकिस्तानी तालिबान जबाबदार असून त्या नुअसर भाष्य करत आहेत
बाकी १६ डिसेंबर हा दिवस का निवडला केला हे एक गूढ आहे
मला तर बुआ बाजी मधील डायलॉग जाम आवडला आहे
आपल्याला जो नडेल तो नरकात सडेल
17 Dec 2014 - 9:16 am | मदनबाण
सर्व प्रथम या भ्याड हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या निष्पाप मुलांचा बळी गेला आहे त्या पालकां बद्धल अत्यंत सहानभुती व्य्क्त करतो.
आता मुख्य विषयाकडे वळतो...
बाभळीच्या झाडाला प्राजक्ताची फुले कशी येतील ? जे पेरल तेच उगवले. ज्या देशाची निर्मीती ही हिंदू आणि हिंदूस्थान द्वेषातुन झाली आहे तो विनाषाकडे धावतो आहे याचे काय नवल ? सतत हिंदूस्थानचा द्वेष करुन विकासाच्या ऐवजी विध्वंसाचेच राजकारण केले गेले त्याचेच फळ पाकिस्तान भोगत आहे आणि यापुढे ही भोगेल ! या देशाचे नाव जरी पाकिस्तान असले तरी एक राष्ट्र म्हणुन ते नापाक आहे. हे राष्ट्र हे इस्लामी दहशदवादाचे केंद्र असुन येथील मदरश्यांच मधुन इस्लामच्या धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली ब्रेनवॉश केलेल्या पिढ्या घडवल्या गेल्या ! आता हेच शिक्षण त्यांच्याच मूळावर उलटलेले दिसत आहे.प्रचंड संख्येने अतिरेकी घडवण्याचे काम आणि कँप्स उभारण्याचे सत्र याच नापाक पाकिस्तान झाले आणि आज अतिरेक्यांनी याच राष्ट्रातल्या नागरिकांच्या कच्च्या-बच्च्यांना डोक्यात आणि छातीत गोळ्या घालुन हलाल केले.आज पाकिस्तानचे नागरिक अल्लाह के नाम पे, रसुल के नाम पे रहम करो असा आक्रोश करत आहेत, पण हेच नागरिक हिंदूस्थानच्या विरोधात चालणार्या दहशदवादा बद्धल मूग गिळुन बसले होते.
पाकिस्तान सैन्याने Rah-e-Nijat आणि Zarb-e-Azb अशी ऑपरेशन्स राबवली यात मुख्यत्वे उत्तर वझरिस्ताना भागात राववली जो कबिलाई भाग आहे, कबिलाई अतिरेकी म्हणतात तुम्ही आमची माणसे,मुले मारलीत आता आम्ही तुमची माणसे, मुले मारु ! आणि याचेच प्रत्यंतर वारंवार घडुन आलेले आहे.
२००७ कराची मधे १५० लोक ठार केले गेले.
२००९ रावळपिंडी मधे ३० लोक ठार केले गेले.
असे अनेक हल्ले आधी झाले आहेत आणि भविष्यात देखील होतील कारण दहशदवादाचा जिन्न जो यांनी पोसला आणि मोठा केला तोच ह्यांच्यावर उलटला आहे...
भविष्यातला भयानक धोका :-
ज्या पद्धतीने सातत्याने पाकिस्तान आर्मी, एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी हल्ले होत आहेत,त्यातुनच पुढे ह्या अतिरेक्यांच्या हाती आण्विक अस्त्रे लागण्याची शक्यता बळावत चालली आहे, ज्याचा धोका आपल्याला आणि खुद्द पाकिस्तानला सुद्धा आहे.याचे मुख्य कारण पाकिस्तानी सैन्य,आयएसआय आणि कट्टर पंथी हे एकाच माळेचे मणी आहेत. पाकिस्तानी सैन्यात वरच्या पदांवर असलेले अधिकारी हे कट्टरपंथी आणि आयएसआय ची प्यादीच आहेत.
आपण घ्यायची दक्षता :- पाकिस्तान हे राष्ट्र म्हणुन प्रचंड अस्थिरतेकडे वेगाने प्रवास करत आहे,प्रचंड अणवस्त्र साठा असलेले आणि नव्याने त्यात भर घालण्याचे उध्योग हे कुठल्याही शांतता प्रेमी राष्ट्राचे ध्योतक नाही... त्यामुळे आपल्या देशात हल्ले , घातपात होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहेच.रेल्वे स्टेशन,बस डेपो, मंदिर-मस्जिद, मॉल, भाजी बाजार इं आणि अन्य ठिकाणी जिथे मोठ्या संख्येने लोकांची वर्दळ असते तिथे हे हल्ले प्रामुख्याने केले जाण्याची शक्यता असु शकते.
इस्लाम आणि दहशदवाद :-
आजच्या घडीला जगात सर्वात बदनाम झालेला धर्म म्हणजे इस्लाम ! अर्थातच त्याला कारण म्हणजे धर्माच्या नावावर केला जाणारा प्रचंड हिंसाचार ! आज प्रत्येक मुसलमान व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते त्याचे मूळ कारण हेच आहे.इस्लामला जर खरा "खतरा" असेल तर तो धर्मवेड्या मुल्ला-मौलवींचा आणि तथाकथित धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली चालणार्या ब्रेनवॉशचा. जो पर्यंत मुस्लिम युवक आणि समाज या गोष्टींपासुन दुर जाणार नाही,आणि त्यांच्या धर्माची खरी आयडियालॉजी तपासुन पाहणार नाही तसेच अशा घटनांचा विरोध करण्याचे कष्ट घेणार नाही तो पर्यंत जगाच्या / लोकांच्या त्यांच्या बद्धल /धर्मा बद्धल आणि त्यांच्या विषयीचा दॄष्टीकोन बदलणार नाही ! आजच्या घडीला इंटरनेटमुळे आयएसआयएस सारख्या अतिरेकी संघटने मधे जाणारे हिंदूस्थानी मुस्लिम युवक याच धर्मवेडापायी खरा "इस्लाम" बुडवु पाहत आहेत आणि अश्या युवकांना या विचार धारणेपासुन मुक्त आणि दुर करण्याचे काम हे यांच्याच समाजाचेच असायला हवे नाही का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
17 Dec 2014 - 6:04 pm | प्रसाद१९७१
तुम्हा लोकांना खरेच असे वाटते का की पाकी लष्कर तालिबानांविरुद्ध काहे कारवाई वगैरे करते आहे?
१० लाख खडे लष्कर, ज्यांना कुठल्याही सीमांवर रहायची गरज नाही ( एका बाजुला भारत, जो काही आगळीक करणार नाही आणि दुसर्या बाजुला इराण - ज्याला सुन्नी तालिबान नकोच आहेत) त्यांना तालीबान नष्ट करायला वर्षानुवर्ष लागतात ह्या वर तुमचा विश्वास आहे का?
पाकी लष्कर दाखवण्यापुरते असली नाटकी कारवाई करते, ६ महीन्यात लाखाच्या आसपास असलेल्या तालीबानांपैकी फक्त १००० मारले.
जे तालिबानी मारले ते फक्त दोन कारणांनी
१. तिथल्या लोकल आर्मी कमांडर शी पंगा घेतला. तालिबान चे आर्थिक व्यवहार प्रचंड आहेत आणि त्यातला वाटा लष्करी अधिकार्यांना येत असतो. तिथे काहीतरी गडबड झाली.
२. तालिबान्यातच शेकडो ग्रुप आहेत, त्यातल्या एका ग्रुप ने दुसर्या ग्रुपचा काटा काढण्यासाठे लष्कराचा उपयोग करणे नेहमीच घडते. भारतात जसे एका टोळीच्या गुंडाचा एनकाउंटर करण्यासाठी दुसरी टोळी पैसे देते तसे आहे हे.
पाक लष्करानी मनापासुन ठरवले तर एक महीना पण नाही लागणार
17 Dec 2014 - 10:42 am | श्रीगुरुजी
>>> भविष्यातला भयानक धोका :-
ज्या पद्धतीने सातत्याने पाकिस्तान आर्मी, एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी हल्ले होत आहेत,त्यातुनच पुढे ह्या अतिरेक्यांच्या हाती आण्विक अस्त्रे लागण्याची शक्यता बळावत चालली आहे,
अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हातात पडावीत किंवा अतिरेकी अण्वस्त्रांच्या जवळपास पोहोचावेत अशी माझी इच्छा आहे. असे झाले तर अमेरिका व इतर सामर्थ्यवान राष्ट्रे खडबडून जागी होतील व तातडीने पाकिस्तानात सैन्य घुसवून अतिरेक्यांचा नि:पात करण्याच्या मागे लागतील. अन्यथा जोपर्यंत अतिरेकी स्थानिक नागरिक किंवा भारत/अफगाणिस्तानातील नागरिक मारत आहेत, तोपर्यंत ही राष्ट्रे अतिरेक्यांकडे काणाडोळा करतील.
17 Dec 2014 - 11:12 am | मदनबाण
असे झाले तर अमेरिका व इतर सामर्थ्यवान राष्ट्रे खडबडून जागी होतील व तातडीने पाकिस्तानात सैन्य घुसवून अतिरेक्यांचा नि:पात करण्याच्या मागे लागतील.
गुरुजी कुठल्या जगात आपला वावर असतो ? ज्या अमेरिकेला अफगाणिस्तान मधे आपले सैन्य ठेवणे आणि पोसणे कठीण जात आहे, ती अमेरिका पाकिस्तानात सैन्य पाठवेल का फक्त कल्पना विलास असु शकतो ! तालिबानला निर्माण करणारी,प्रशिक्षण देणारी आणि हत्यार पुरवणारी अमेरिकाच आहे हे आपणास ठावुक नाही की काय ? पाकिस्तान ज्या पैश्यावर आणि हत्यारांवर पोसला पोसला तो देखील अमेरिकेचाच, आणि हा पैसा आणि शस्त्रे हिंदुस्थाना विरुद्ध वापरली जात आहेत हे अमेरिकेला ठावुक नाही असे म्हणणे दुधखुळेपणाचे ठरेल ! अमेरिकेने या पद्धतीचा वापर करुन आपली आर्थीक गती कमी केली आणि तालिबानचा वापर करुन रशियाला नामोहरम केले. अमेरिकेने देखील मोस्ट वॉटेंड जाहिर केलेला हाफिद सईद आणि मुंबई आणि इतर हल्ल्याचा सुत्रधार पाकिस्तानात मुक्तपणे संचार करतो आणि त्याच्या सभेला येडी पाकिस्तानी प्रजा हजेरी लावते हे जगाला आणि अमेरिकेला दिसत नाही काय ? बादवे अमेरिकेने हाफिद सईदला अटक करण्यासाठी $10m जाहिर केले आहे हे आपल्या ठावूक असेल ही अपेक्षा.
आधीच मर्कट तशातच मद्य प्याला । मग वृश्चिकदंश झाला त्याला ॥ मग झाली तयाला भूतबाधा । काय वर्णू लीला त्या कपिच्या अगाधा ॥ अशा पाकिस्तानी दहशदवादी मर्कटांच्या हाती ही अणवस्त्रे लागणे हे धोकादायकच !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
17 Dec 2014 - 12:04 pm | श्रीगुरुजी
अजूनपर्यंत हाफिझ सईद किंवा दाऊद वगैरे मंडळींनी अमेरिकेवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे अमेरिका त्यांच्या मागे गेलेली नाही. हाफिझ सईदविरूद्ध अमेरिकेने बक्षीस जाहीर केले असले तरी अमेरिका त्याचा बंदोबस्त करण्यासाठी अजून फारशी उत्सुक नाही कारण त्यांच्या कारवायांची अमेरिकेला फारशी झळ पोहोचलेली नाही.
तथापि जर भविष्यात अतिरेक्यांच्या हाती अण्वस्त्रे पडली तर त्यांचा वापर सर्वप्रथम भारताऐवजी इस्राईल व इंग्लंड, फ्रान्स अशा देशांविरूद्ध केला जाईल. अशावेळी अमेरिका व इतर देशांना नक्कीच या अतिरेक्यांचा बंदोबस्त करावा लागेल.
17 Dec 2014 - 12:20 pm | मदनबाण
जूनपर्यंत हाफिझ सईद किंवा दाऊद वगैरे मंडळींनी अमेरिकेवर हल्ला केलेला नाही.
अच्छा,म्हणजे अमेरिका हल्ला होण्याची वाट बघते आहे तर ! ;)
हाफिझ सईदविरूद्ध अमेरिकेने बक्षीस जाहीर केले असले तरी अमेरिका त्याचा बंदोबस्त करण्यासाठी अजून फारशी उत्सुक नाही कारण त्यांच्या कारवायांची अमेरिकेला फारशी झळ पोहोचलेली नाही.
मग बक्षिस टाईमपास साठी जाहिर केले असावे !
तथापि जर भविष्यात अतिरेक्यांच्या हाती अण्वस्त्रे पडली तर त्यांचा वापर सर्वप्रथम भारताऐवजी इस्राईल व इंग्लंड, फ्रान्स अशा देशांविरूद्ध केला जाईल. अशावेळी अमेरिका व इतर देशांना नक्कीच या अतिरेक्यांचा बंदोबस्त करावा लागेल.
हे कशावरुन ? बरं हल्ला करण्याचे प्रयत्न तर ते आत्ता पण करत आहेत ! { ISIS followers urged to attack Times Square हे गुगल करा बरं...} शिवाय पाकिस्तानने त्यांच्या इतिहासा नुसार लढलली युद्ध ही आपल्या देशा बरोबरच केली आहेत, अणुबॉम्बचा वापर ते हिंदूस्थानावरच आधी करतील...शिवाय हे राष्ट्र आपल्या शेजारीच आहे बरं का... काल जी घटना घडली तिथुन दिल्ली हे अंतर अंदाजे ८०० किलोमिटर आहे.
बाकी आपल्या सुरक्षतेची काळजी आपणच घेतली पाहिजे, अमेरिका येउन तारणहार बनेल ही भ्रामक कल्पना बाळगणे सुज्ञपणाचे लक्षण आहे का ?
जाता जाता :- बाकी मुंबईत सिसिटीव्ही कॅमरे लागले का ? लागले असतील तर ते चालु आहेत का ? याचा आढावा मिडाया मंडळींनी आता करावाच... तसेही आत्म सुरक्षतेच्या बाबतीत आपण फार सतर्क आहोतच नाही का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
17 Dec 2014 - 12:26 pm | श्रीगुरुजी
>>> अच्छा,म्हणजे अमेरिका हल्ला होण्याची वाट बघते आहे तर !
नक्कीच. जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत अमेरिका अशा भानगडीत पडत नाही.
>>> मग बक्षिस टाईमपास साठी जाहिर केले असावे !
बक्षिस का जाहीर केले त्याची कल्पना नाही. परंतु ज्या तर्हेने अमेरिका लादेनच्या मागे लागली होती तसे हाफीझ सईदच्या बाबतीत अजिबात दिसत नाही.
>>> हे कशावरुन ? बरं हल्ला करण्याचे प्रयत्न तर ते आत्ता पण करत आहेत ! { ISIS followers urged to attack Times Square हे गुगल करा बरं...} शिवाय पाकिस्तानने त्यांच्या इतिहासा नुसार लढलली युद्ध ही आपल्या देशा बरोबरच केली आहेत, अणुबॉम्बचा वापर ते हिंदूस्थानावरच आधी करतील...शिवाय हे राष्ट्र आपल्या शेजारीच आहे बरं का... काल जी घटना घडली तिथुन दिल्ली हे अंतर अंदाजे ८०० किलोमिटर आहे.
बाकी आपल्या सुरक्षतेची काळजी आपणच घेतली पाहिजे, अमेरिका येउन तारणहार बनेल ही भ्रामक कल्पना बाळगणे सुज्ञपणाचे लक्षण आहे का ?
>>> तालिबान्यांचा भारतापेक्षा अमेरिका, इस्राईल, इंग्लंड या देशांविरूद्ध जास्त राग आहे. लादेनचेही तसेच होते. त्याने भारताविरूद्ध फारसे काही केलेले नाही.
17 Dec 2014 - 12:39 pm | मदनबाण
नक्कीच. जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत अमेरिका अशा भानगडीत पडत नाही.
परत चूक... अमेरिकाच अश्या सगळ्या भानगड्या निर्माण करते ! नाहीतर त्यांची शस्त्रे कोण विकत घेइल ? बरं माझ्या माहिती प्रमाणे शस्त्रास्त्रे आणि पॉर्न या पलिकडे अमेरिका काही जास्त निर्माण करत नाही. ;)
बक्षिस का जाहीर केले त्याची कल्पना नाही. परंतु ज्या तर्हेने अमेरिका लादेनच्या मागे लागली होती तसे हाफीझ सईदच्या बाबतीत अजिबात दिसत नाही.
ह्म्म... ज्या लादेनला अमेरिकेने घडवला त्यालाच मारला ! सईद काही संत-महंत नाही, त्याच्यावर इनाम घोषीत करण्याचे काही तरी प्रयोजन असणारच ना ? जितके अतिरेकी कमांडर आत्ता पर्यंत निर्माण झाले ते सगळे अल्लाला भेटायला आणि सुंदर पर्यांबरोबर क्रिडा करायला जन्नत यात्रेवर गेले...लादेनही गेला फक्त व्हाया समुद्रमार्ग... तेच सईदचे देखील होइल आणि व्हावे ही इच्छा. बरं लादेनला शोधायला बरीच वर्ष गेली, तो पर्यंत अमेरिकेने अफगाणिस्तानचा वापर मुक्तपणे वेपन टेस्टिंगसाठी केला... त्यांचा प्रवास तोराबोरा व्हाया वजिरिस्तान ते अबोटाबास पर्यंत झाला.असो...
लादेनचेही तसेच होते. त्याने भारताविरूद्ध फारसे काही केलेले नाही.
हेच तर लादेनचे टार्गेट अमेरिका होते तर सईदचे हिंदूस्थान आहे ना ? मग चिंता / काळजी आपल्याला करायला हवी,अमेरिका कशाला करेल ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
17 Dec 2014 - 7:54 pm | श्रीगुरुजी
>>> परत चूक... अमेरिकाच अश्या सगळ्या भानगड्या निर्माण करते ! नाहीतर त्यांची शस्त्रे कोण विकत घेइल ? बरं माझ्या माहिती प्रमाणे शस्त्रास्त्रे आणि पॉर्न या पलिकडे अमेरिका काही जास्त निर्माण करत नाही.
अमेरिका अश्या भानगडी निर्माण करते हे खरे आहे. परंतु ती भानगड त्यांच्यावरच उलटली तर अमेरिका नक्कीच ती भानगड नष्ट करायचा प्रयत्न करते. (उदा. लादेन). जर ती भानगड स्वतःला त्रासदायक नसेल तर अमेरिका त्याकडे चक्क दुर्लक्ष करते. १९८० च्या दशकात अमेरिकेने अनेक खलिस्तानवाद्यांना आश्रय दिलेला होता. अजूनही काही खलिस्तानवादी अमेरिकेत सुखाने रहात आहेत. अमेरिकेने खलिस्तानवाद्यांविरूद्ध कधीही भूमिका घेतलेली नाही कारण त्यांनी अमेरिकेला त्रास दिलेला नाही. लादेनने अनेक प्रकारे अमेरिकेला त्रास दिला. येमेन बंदरातील अमेरिकी पाणबुडीवर हल्ला (ज्यात १७ अमेरिकी नौसैनिक गेले), केनया व सुदानमधील अमेरिकी दूतावासावर हल्ला, सौदीतील अमेरिकी सैनिक रहात असलेल्या इमारतीवर स्फोटकांनी भरलेला ट्रक घुसविणे आणि शेवटी जागतिक व्यापार केंद्रावरील हल्ला. यामुळेच अमेरिकेने लादेनला मारले. दाऊद, मेमन बंधू, भटकळ बंधू, हाफीझ सईद, मसूद अझर हे भारताविरूद्ध दहशतवादी कृत्ये करीत आहेत. त्यांनी अमेरिकेविरूद्ध फारसे काही केलेले नाही. त्यामुळे अमेरिका त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार. परंतु त्यांच्या किंवा तालिबान्यांच्या हातात अण्वस्त्रे लागण्याची शक्यता निर्माण झाली तर त्याच क्षणी अमेरिका त्यांच्या मागे हात धुवून लागेल.
>>> लादेनचेही तसेच होते. त्याने भारताविरूद्ध फारसे काही केलेले नाही. हेच तर लादेनचे टार्गेट अमेरिका होते तर सईदचे हिंदूस्थान आहे ना ? मग चिंता / काळजी आपल्याला करायला हवी,अमेरिका कशाला करेल ?
भारत पाकिस्तानात उघडपणे किंवा लपून राहणार्या अतिरेक्यांविरूद्ध अमेरिकेसारखी कारवाई करू शकत नाही हे एक दुर्दैवाने कटु सत्य आहे. भारत प्रोअॅक्टिव्ह नाही, भारत फक्त रीअॅक्टिव्ह आहे. त्यातून मतांसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन आहेच. (१९९३ मध्ये काश्मिरमधील मशिदीत लष्कराने वेढा घालून अडकविलेल्या ७-८ अतिरेक्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन देण्यात आले कारण २-३ महिन्यांनी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक होती). अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील अतिरेक्यांना मारण्यासाठी अमेरिकेनेच पुढाकार घ्यायला हवा आणि दहशतवाद आपल्या अंगावर शेकल्याशिवाय अमेरिका कारवाई करणार नाही हे निश्चित.
17 Dec 2014 - 12:28 pm | टवाळ कार्टा
फारच अपेक्षाबुवा तुमच्या :)
17 Dec 2014 - 11:12 am | टवाळ कार्टा
घंटा....त्याऐवजी...हाम्रिका त्यांच्याशी मांडवली करेल...त्यांच्या काठीने आशियातले चीन, भारत आणि रशिया यांना झुंजवत ठेवायला
17 Dec 2014 - 11:53 am | भाते
घरी गेल्यावर याविषयीच्या बातम्या आणि चर्चा पहात असताना काही मुद्दे लक्षात आले.
१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानची फाळणी होऊन बांग्लादेश अस्तित्वात आला. हा दिवस आपण विजय दिवस म्हणुन साजरा करतो. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
काल, १६ तारखेला अश्या प्रकारचा दहशतवादी हल्ला होऊ शकतो याची पुर्वकल्पना तिथल्या गुप्तचर खात्याकडुन (?) ३ दिवस अगोदरच देण्यात आली होती. तरीही पाकिस्तानी सैन्य यापध्दल गाफिल राहिले. यातली सर्वात धक्कादायक बातमी अशी कि या हल्ल्याला तिथल्या सैन्याचा पाठिंबा (!) होता.
आपलीच जनता (त्यातही स्त्रिया आणि लहान मुले) अश्या क्रुर हल्ल्यात मारले जात असताना निगरगट्ट असणारे हे सैन्य आपल्यासाठी किती धोकादायक ठरु शकते याची जाणिव आपल्याला या घटनेमुळे झाली.
17 Dec 2014 - 11:58 am | मदनबाण
तरीही पाकिस्तानी सैन्य यापध्दल गाफिल राहिले. यातली सर्वात धक्कादायक बातमी अशी कि या हल्ल्याला तिथल्या सैन्याचा पाठिंबा (!) होता.
याचे मुख्य कारण पाकिस्तानी सैन्य,आयएसआय आणि कट्टर पंथी हे एकाच माळेचे मणी आहेत. पाकिस्तानी सैन्यात वरच्या पदांवर असलेले अधिकारी हे कट्टरपंथी आणि आयएसआय ची प्यादीच आहेत.
कबिलाई अतिरेकी म्हणतात तुम्ही आमची माणसे,मुले मारलीत आता आम्ही तुमची माणसे, मुले मारु ! आणि याचेच प्रत्यंतर वारंवार घडुन आलेले आहे.
या बद्धल आत्ताच इकडे वाचले :- आम्ही जे केलं ते योग्यच – तहरीक ए तालिबान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित
17 Dec 2014 - 12:20 pm | श्रीगुरुजी
>>> काल, १६ तारखेला अश्या प्रकारचा दहशतवादी हल्ला होऊ शकतो याची पुर्वकल्पना तिथल्या गुप्तचर खात्याकडुन (?) ३ दिवस अगोदरच देण्यात आली होती. तरीही पाकिस्तानी सैन्य यापध्दल गाफिल राहिले. यातली सर्वात धक्कादायक बातमी अशी कि या हल्ल्याला तिथल्या सैन्याचा पाठिंबा (!) होता.
निव्वळ सैन्य नव्हे तर त्या प्रांतातील सरकारसुद्धा मुद्दाम गाफील राहिले असणार. पेशावर प्रांतात इम्रानखानच्या तेहरिक्-ए-इन्साफ या पक्षाचे सरकार आहे. दस्तुरखुद्द इम्रानखानला तेहरिक्-ए-तालिबान विषयी सहानुभूती आहे. किंबहुना इम्रानखानचा उल्लेख "क्लीन शेव्हड् तालिबानी' असा केला जातो.
अवांतर - इम्रानखान हा क्रिकेट खेळाडू म्हणूनसुद्धा मला कधीही आवडला नाही. अत्यंत खडूस, कुजका व अजिबात खिलाडूवृत्ती नसलेला होता तो. त्याच्या कारकीर्दीत भारताविरूद्ध जेव्हा जेव्हा एकदिवसीय सामने झाले तेव्हा प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानी संघाने कधीही पूर्ण ५० षटके गोलंदाजी केली नाही. तो आपल्या संघातील खेळाडूंना मुद्दाम वेळकाढूपणा करायला लावून ५० पेक्षा कमी षटके टाकायला लावायचा. अगदी १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत सुद्धा पाकड्यांनी ४९ षटकेच टाकली होती.
17 Dec 2014 - 12:51 pm | आतिवास
झालेल्या दु:खद घटनेवर काही अंदाधुंद प्रतिसाद उबग आणणारे आहेत.
कुणाच्या मृत्यूवर आणि तेही दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूवर जुन्याच वादविवादाला पुन्हा/ नव्याने सुरुवात करणे विलक्षण आहे.
पण ते असो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहेच. ते नेहमी दुधारी असते हेही माहिती आहे.
जे गेले ते "जात्यात'' होते, आपण "सुपात" आहोत, इतकं तरी भान राखलं पाहिजे असं मी स्वतःला पुन्हा एकदा सांगतेय!
17 Dec 2014 - 3:25 pm | प्यारे१
घटना दुर्दैवी आहे.
मरणाराला किमान का मेलो हे तरी समजायला हवं.
मारणाराला आपण का मारतोय हे ठाऊक हवं. त्यातही शाळकरी मुलांना मारुन काय मिळणार हे समजण्याची मानसिकता ह्या ब्रेनवॉश केलेल्या प्रोग्राम्ड अतिरेक्यांना समजत नसतंच.
ह्या घटनेनंतर पाकीस्तान सुधारावं ही इच्छा आहे पण वरच्या काही प्रतिसादांमधून जे समजलंय त्यावरुन 'इन जनरल पठाणी आणि पाकिस्तानी लष्कराच्या मानसिकतेवरुन' तसं वाटत नाही.
17 Dec 2014 - 3:57 pm | क्लिंटन
तशी इच्छा सगळ्यांचीच आहे पण तशी शक्यता फारच धूसर आहे त्याचे काय? :( आणि समजा पाकिस्तान वरकरणी सुधारले तरी ती सुधारणा फार काळ टिकायची फार शक्यता नाही.शेवटी "लडके लिया पाकिस्तान हसके लेंगे हिंदूस्तान" (की उलटे) ही त्यांची मनोवृत्ती आहे आणि त्यात कायमस्वरूपी सुधारणा होईल अशी आशा बाळगणेही भाबडेपणाचे आहे. तशी सुधारणा झाली तर चांगलेच आहे पण ती होणार नाही ही शक्यता सगळ्यात जास्त हे गृहित धरून आपण गाफिल राहिले नाही पाहिजे.
17 Dec 2014 - 4:10 pm | प्यारे१
मी भारताच्या अथवा भारतीयांच्या दृष्टीकोनातून म्हणत नाहीये. त्यामुळं आपलं सावध राहण्याचं काम आपल्याला झकत करावंच लागणार आहे.
आज आपलीच पोरं मारली जात आहेत म्हणून तरी त्यांचं हे जीवघेणं खूळ त्यांच्या मानगुटीवरुन उतरलं जावं अशी सदिच्छा व्यक्त करतोय.
हे त्यांना जाणवलं तर असल्या उद्योगांतून बाजूला वळतील असा भाबडाच आशावाद. पण घटनाक्रमावरुन बदला घेतला गेला आहे असंच वाटतंय.
पाक सेनाधिकार्यांची मुलं तिथं शिकत आहेत तिथं जाऊन रक्तपात करु जेणेकरुन पाकी आर्मीला समजेल असं काहीसं चित्र सामोरं येतंय. पाकीस्तान स्वतःच्या खड्ड्यात पडून स्वतः मरणार आहे नि मरता मरता भारतासाठी फार मोठा लोचा करुन जाणार आहे.
17 Dec 2014 - 7:35 pm | क्लिंटन
छे हो तसे काही होणार नाही.
एक उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याच आसपास बघायला मिळते ते लिहितो.फेसबुकवर, मिपावर आणि इतर अनेक ठिकाणी राजकारणावर खडाजंगी चालत असते.आपल्या विचारांपेक्षा वेगळा विचार कोणी करत असेल तर त्याची बोलताना-लिहितानाही संभावना करताना कधी तोल निसटतो हे आपल्यासारख्या शिकल्यासवरलेल्या (आणि बंदुक हातात उचलून कोणत्याही कारणाने इतरांचे मुडदे पाडायची सुतराम शक्यता नसलेल्या) लोकांनाही समजत नाही.उदाहरणार्थ मोदीविरोधी असेल तर देशद्रोही, मोदी समर्थक असेल तर नमोरूग्ण किंवा मोदीभक्त,२०११ मधला अनुभव-अण्णांच्या उपोषणाला विरोध असेल तर भ्रष्टाचार समर्थक इत्यादी इत्यादी गोष्टींनी इतरांची संभावना केली गेलेली आपण सगळेच बघतो.आपणही कमी-अधिक प्रमाणात त्यात सामील असतो.एकूणच काय की एखादी भूमिका अधिक ताठरपणे घेतली असेल तर ती बदलणे फारच कठिण असते.
पाकिस्तानचा जन्मच मुळी हिंदूद्वेषावर झालेला.भारताचा सर्वनाश करायला हजार वर्षे गवत खाऊन राहू पण अणुबॉम्ब बनवू ही त्यांची मानसिकता.आणि त्या कट्टरतेच्या जोरावर गेल्या ३० वर्षात हजारो लोकांना त्यांनी ठार मारले आहे. भारताविरूध्द निर्माण केलेला भस्मासूर जरी त्यांच्यावर उलटत असला तरी त्या भस्मासूरापेक्षा भारत हाच मोठा शत्रू ते मानणार. आपल्यासारख्या शिकल्यासवरलेल्यांना जर ताठर भूमिका बदलणे कठिण जाते तर आपल्यापेक्षा अनंतपटीने जास्त ताठर आणि कट्टर लोक आपली भूमिका सहजासहजी बदलतील असे मला तरी वाटत नाही. या हल्ल्यानंतर तालिबान हाच भारतापेक्षा आमचा मोठ शत्रू वगैरे बडबड चालू असली तरी ती किती काळ टिकेल आणि त्यातून नक्की काय निष्पत्ती होईल याविषयी फारशी आशावादी परिस्थिती आहे असे मला तरी वाटत नाही.
17 Dec 2014 - 7:58 pm | श्रीगुरुजी
+ १
सहमत. एवढे होऊनसुद्धा अजूनही पाकिस्तानला वाट चुकलेला धाकटा भाऊ असे समजणारे 'विचारवंत' भारतात आहेत.
17 Dec 2014 - 3:53 pm | गजानन५९
तालिबान्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप चिमुकल्यांना.... एक माणूस म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून मनापासून श्रद्धांजली....(हे लिहावे लागतेय हेच खरे तर माणुसकीचे दुर्दैव )
पाकिस्तानात झालेला कालचा हल्ला, मागच्या आठवड्यात सिडनीत झालेला हल्ला हेच दर्शवतो कि जगातले कुठलेच ठिकाण जसे सुरक्षित नाही तसेच दहशतवादी कुठलीच दयामाया कुणाला दाखवणार नाहीत.
हल्ला पाकिस्तानात झाला म्हणून आपण सुरक्षित आहोत अथवा आपल्या इथे काही होऊ शकत नाही असे विचार करायचे दिवस खरे तर मुंबई हल्ल्यानंतरच सरले. उद्या हेच माथेफिरू लोक आपल्या देशात घुसू शकणार नाही हे म्हणणे तर खूपच धाडसाचे होणार आहे.
दिवस खरच धोकादायक बनत आहेत आणि हा दहशतवाद कधी आपला दरवाजा ठोठावेल हे आपल्याला समजणार देखील नाही.
17 Dec 2014 - 8:11 pm | प्रदीप
नेहमीप्रमाणेच चांगला आहे. पण
ह्याविषयी मात्र मतभेद आहे. आपणच उदाहरण दिलेल्या पूर्व तिमोरची, अशाच प्रकारच्या 'बाहेरील शक्तीने मिळवून दिलेल्या स्वातंत्र्यात' परिस्थिती काय आहे? आपापसात मारामार्या, सुंदोपसुंदी- अगदी रामोस- होर्टा ह्या प्रमुख नेत्याच्या वधाचा (अयशस्वी) प्रयत्न इत्यादी रामायण तेथे घडले आहे.
स्वातंत्र्य मिळवण्याची व स्वतःची उन्नती साधण्याची उर्मी, जनतेत आतून यावी लागते.