आत्ता इथे रात्रीचे १० वाजतायत. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. आतापर्यन्त झालेल्या मतमोजणीत त्यांना २८३ इलेक्टोरल वोट्स मिळाली आहेत. सर्व न्यूज चेनेल्सनी ओबामांना विजयी घोषित केले आहे. अध्यक्ष होण्यासाठी २७० इलेक्टोरल वोट्स मिळावी लागतात.
निवडून आल्यावर आत्ताच ओबामांनी पहिले भाषण दिले. अगदी मोजक्या शब्दात र्हदयाला भिडणार्या शब्दांनी सर्वांना जिंकुन घेतले. ज्यांनी त्यांना मते टाकली नाहीत अशांना उद्देशून "मी तुमचा सुद्धा अध्यक्ष आहे" असे म्हटल्यावर तर उपस्थितांना आशृ आवरणे आवघड गेले त्यात दोन वेळा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले जेसी जॅक्सन सुद्धा होते. ओबामांनी जगात मैत्रीच्या संबंधावर भर देण्यावर सुद्धा लगेचच सुतोवाच केलेत. बघू या आता काय काय होते.
दरम्यान बुश साहेबांनी ओबांना वेळ मिळेल तसे व्हाईट हाऊला भेट देण्यासाठी आमंत्रण दिले आहे.
अमेरिका त्या डुब्याच्या कचाट्यातुन सुटली म्हणायची.
बरय ना तिथे दोनच वेळी राष्ट्राध्यक्ष होण्याचा नियम आहे ते?
नायतर अजुन एखाद युद्ध नक्की झाल असत.
आता बघुया ओबामा काय करतोय ते.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
ओबामा यांच्या निवडणुकीचे संदर्भ आता विविध अंगाने तपासले जातील.
अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यानंतरच्या त्यांच्या भाषणातील एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला तो म्हणजे - "I was never the likeliest candidate for this office."
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले ओबामा जेव्हा असं म्हणाले तेव्हा अशाच किंवा याही पेक्षा सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या एका यशस्वी माणसाची कहाणी ऐकल्यासारखे वाटले.
देश/धर्म/शिक्षण/वय याच्या पलिकडे मानवी संघर्ष असेच एक सारखे असतात हा धागा नक्कीच स्फूर्तीदायक आहे.
आज त्यांचे भाषण पाहताना वाजपेयी पंतप्रधान झाले त्यावेळची आठवण झाली. वयाच्या ४७व्या वर्षी त्यांना पंतप्रधानपद मिळाले असते तर आपला इतिहास ही वेगळाच झाला असता.
असो.
काही तांत्रिक प्रश्न आहेत.
१ विकिपिडियाच्या खालील दुव्याप्रमाणे १५ डिसे. ला इलेक्टॉरल कॉलेज अध्यक्षांची निवड करेल. मग आत्ताच ओबामा अध्यक्ष झाले असा जयघोष का होतोय ? आणि जर ते अध्यक्ष झालेच आहेत मग डिसे. १५ ला होणारे कसले मतदान आहे ?
२ इलेक्टॉरल कॉलेज "पॉप्युलर मतांविरुद्ध" जाऊन प्रतिस्पर्ध्याला विजयी करेल अशी शक्यता असते का ? असे पूर्वी केव्हा झाले होते का ?
December 15, 2008: Members of the U.S. Electoral College meet in each state to cast their votes for President and Vice President.
लक्षात घ्या की ओबामांना प्रोजेक्टेड विनर म्हटले गेले आहे. तसेच प्रेसिडेंट इलेक्ट म्हटले जात आहे, प्रेसिडेंट नव्हे.
पंधरा डिसेंबरला त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल व ओबामा जानेवारीत शपथ घेऊन राज्यकारभार हातात घेतील. दरम्यानच्या काळात सध्याचे अध्यक्ष ओबांना गुप्त माहिती तसेच इतर आवश्यक गोष्टी सांगून देतील व आपला बिस्तरा व्हाईत हाऊस मधून गुंडाळतील.
या अगोदर इलेक्टोराल कॉलेजने कधीही उलटे फासे टाकलेले नाहीत. कदाचित आपल्या कडे असतो तसा पक्षाचा व्हिप असेल त्यांना. माहित नाही.
ओबामांचे अभिनंदन !
ओबामांना निवडून देऊन अमेरिकेने एक नवा इतिहास घडवला आहे. 'व्हाइट' हाऊसमध्ये आता 'ब्लॅक' ओबामा बसणार आहेत हे लोकशाहीचा विजय स्पष्ट करणारे आहे.
आता भारताच्या दॄष्टीने ते किती फायदेशीर धोरणे राबवतायत ते पाहू!
अहो बोलूनचालून अमेरीका हा भारताचा दुश्मन! पाकिस्तानी दहशतवादाला सतत पाठिंबा देऊन आजपर्यंत अमेरीकेने भारतात केवळ अशांतताच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे..
त्या दीडदमडीच्या अमेरीकेचा अध्यक्ष कुणी का असेना, आम्हाला त्यात काडीचेही स्वारस्य नाही...!
मी प्रचंड खूष झाले ओबामा आल्याचे पाहून. स्फुर्तिदायी आहे प्रचंड..ज्या सामान्य परिस्थितीतून तो पुढे आलाय.. नंतरचं त्याचे भाषणही सुंदर झाले..
किती करेल काय करेल आत्ता सांगणे अवघड आहे.. पण बुश च्या पुढे ओबामा प्रचंड प्रभावी वाटतो!
बाकी, कृष्णवर्णिय माणूस अमेरिकेमधे प्रेसिडंट होणं हे खरंच चांगलं लक्षण आहे. केवळ वंश पाहून मत देणारी लोकं नाही राहीली म्हणजे आता..
प्रतिक्रिया
5 Nov 2008 - 9:57 am | विनायक प्रभू
जितं मया, जितं मया म्हटले का हो ओबामा.
5 Nov 2008 - 10:08 am | कपिल काळे
अजून ओबामा नाही आले टीव्ही वर पण, जॉन मेक्केन आत्ता टीव्हीवर आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढत आहेत.
http://kalekapil.blogspot.com/
5 Nov 2008 - 11:22 am | भास्कर केन्डे
निवडून आल्यावर आत्ताच ओबामांनी पहिले भाषण दिले. अगदी मोजक्या शब्दात र्हदयाला भिडणार्या शब्दांनी सर्वांना जिंकुन घेतले. ज्यांनी त्यांना मते टाकली नाहीत अशांना उद्देशून "मी तुमचा सुद्धा अध्यक्ष आहे" असे म्हटल्यावर तर उपस्थितांना आशृ आवरणे आवघड गेले त्यात दोन वेळा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले जेसी जॅक्सन सुद्धा होते. ओबामांनी जगात मैत्रीच्या संबंधावर भर देण्यावर सुद्धा लगेचच सुतोवाच केलेत. बघू या आता काय काय होते.
दरम्यान बुश साहेबांनी ओबांना वेळ मिळेल तसे व्हाईट हाऊला भेट देण्यासाठी आमंत्रण दिले आहे.
आपला,
(समिक्षक) भास्कर
आम्ही येथे वसतो.
5 Nov 2008 - 11:48 am | विनायक प्रभू
चला, अमेरिकेला नविन प्रेषित मिळाला. म्हणजे जगाला सुद्धा.
जय हिंद. जय महाराष्ट्र.
5 Nov 2008 - 11:53 am | भास्कर केन्डे
जय हो प्रभू साहेब!
आपल्या क्रिप्टिक प्रतिसादाला मानले. आपणांस सा. दंडवत! :)
बघू या प्रेषित काय करतो व्हाईत हाऊस मध्ये गेल्यावर.
आपला,
(बघ्या) भास्कर
आम्ही येथे वसतो.
5 Nov 2008 - 11:32 am | यशोधरा
बुश, चेनी, राईस यांनी केलेला कचरा साफ करणे हेच एक मोठे काम आहे ओबामासमोर!
5 Nov 2008 - 12:00 pm | विनायक प्रभू
तो बुचेरा कचरा साफ करेल. आणि नविन तयार करेल दुसर्याला साफ करायला. आणखी एक प्रेषिताची वाट बघावी लागेल.
जय महाराष्ट्र.
5 Nov 2008 - 12:28 pm | झकासराव
अमेरिका त्या डुब्याच्या कचाट्यातुन सुटली म्हणायची.
बरय ना तिथे दोनच वेळी राष्ट्राध्यक्ष होण्याचा नियम आहे ते?
नायतर अजुन एखाद युद्ध नक्की झाल असत.
आता बघुया ओबामा काय करतोय ते.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
5 Nov 2008 - 12:30 pm | अभिजीत
ओबामा यांच्या निवडणुकीचे संदर्भ आता विविध अंगाने तपासले जातील.
अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यानंतरच्या त्यांच्या भाषणातील एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला तो म्हणजे - "I was never the likeliest candidate for this office."
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले ओबामा जेव्हा असं म्हणाले तेव्हा अशाच किंवा याही पेक्षा सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या एका यशस्वी माणसाची कहाणी ऐकल्यासारखे वाटले.
देश/धर्म/शिक्षण/वय याच्या पलिकडे मानवी संघर्ष असेच एक सारखे असतात हा धागा नक्कीच स्फूर्तीदायक आहे.
आज त्यांचे भाषण पाहताना वाजपेयी पंतप्रधान झाले त्यावेळची आठवण झाली. वयाच्या ४७व्या वर्षी त्यांना पंतप्रधानपद मिळाले असते तर आपला इतिहास ही वेगळाच झाला असता.
असो.
- अभिजीत
5 Nov 2008 - 12:56 pm | बिजली
इराकचे युद्ध थांबवतील अशी आशा आहे.
5 Nov 2008 - 2:15 pm | अभिरत भिरभि-या
काही तांत्रिक प्रश्न आहेत.
१ विकिपिडियाच्या खालील दुव्याप्रमाणे १५ डिसे. ला इलेक्टॉरल कॉलेज अध्यक्षांची निवड करेल. मग आत्ताच ओबामा अध्यक्ष झाले असा जयघोष का होतोय ? आणि जर ते अध्यक्ष झालेच आहेत मग डिसे. १५ ला होणारे कसले मतदान आहे ?
२ इलेक्टॉरल कॉलेज "पॉप्युलर मतांविरुद्ध" जाऊन प्रतिस्पर्ध्याला विजयी करेल अशी शक्यता असते का ? असे पूर्वी केव्हा झाले होते का ?
December 15, 2008: Members of the U.S. Electoral College meet in each state to cast their votes for President and Vice President.
http://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election,_2008
5 Nov 2008 - 10:06 pm | भास्कर केन्डे
लक्षात घ्या की ओबामांना प्रोजेक्टेड विनर म्हटले गेले आहे. तसेच प्रेसिडेंट इलेक्ट म्हटले जात आहे, प्रेसिडेंट नव्हे.
पंधरा डिसेंबरला त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल व ओबामा जानेवारीत शपथ घेऊन राज्यकारभार हातात घेतील. दरम्यानच्या काळात सध्याचे अध्यक्ष ओबांना गुप्त माहिती तसेच इतर आवश्यक गोष्टी सांगून देतील व आपला बिस्तरा व्हाईत हाऊस मधून गुंडाळतील.
या अगोदर इलेक्टोराल कॉलेजने कधीही उलटे फासे टाकलेले नाहीत. कदाचित आपल्या कडे असतो तसा पक्षाचा व्हिप असेल त्यांना. माहित नाही.
5 Nov 2008 - 9:50 pm | हैदर अली
ओबामांचे अभिनंदन !
ओबामांना निवडून देऊन अमेरिकेने एक नवा इतिहास घडवला आहे. 'व्हाइट' हाऊसमध्ये आता 'ब्लॅक' ओबामा बसणार आहेत हे लोकशाहीचा विजय स्पष्ट करणारे आहे.
आता भारताच्या दॄष्टीने ते किती फायदेशीर धोरणे राबवतायत ते पाहू!
जय हिन्द!
जय महाराष्ट्र!
5 Nov 2008 - 11:19 pm | विसोबा खेचर
अहो बोलूनचालून अमेरीका हा भारताचा दुश्मन! पाकिस्तानी दहशतवादाला सतत पाठिंबा देऊन आजपर्यंत अमेरीकेने भारतात केवळ अशांतताच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे..
त्या दीडदमडीच्या अमेरीकेचा अध्यक्ष कुणी का असेना, आम्हाला त्यात काडीचेही स्वारस्य नाही...!
तात्या.
6 Nov 2008 - 10:53 am | मराठी_माणूस
अगदी बरोबर
(अवांतरः आज सारखे "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना" हे गाणे का आठवत आहे) :?
5 Nov 2008 - 11:46 pm | भाग्यश्री