गृहकर्जाबाबत बँकेचे नियम यावरून या धाग्याची कल्पना सुचली..
आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने...
या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील..
माझे [ सध्या लगेच आठवणारे ;) ] दोन अनुभव..
*****************************************************************
लै लै लै भारी समजली जाणारी अत्यंत हुच्चभ्रू अशी बँक.
स्थळ: पुण्यापासून ३५० किमी दूर - महाराष्ट्रातच.
दिवस: बुधवार - कोणताही पब्लीक हॉलीडे नाही.
वेळ: दुपारी १:००
मी ज्या पार्टीसोबत होतो त्यांचे या बँकेत व्यावसायीक करंट अकाऊंट आहे आणि त्यावर नेहमी भरभक्कम व्यवहार होतात. "Any Branch Banking" हा टॅगही असल्याने त्या बँकेच्या कोणत्याही बँकेत कितीही रकमेचे व्यवहार विनासायास होतात. अर्थात मोठी रक्कम काढावयाची असेल तर बँकेला आधी पूर्वसूचना देणे आवश्यक असते मात्र हा व्यवहार पैसे खात्यात भरावयाचा होता.
बँकेत प्रवेश करून कॅशीयरच्या लाईनीत उभारणे, त्या दरम्यान नोटांचे विवरण तयार करणे व डिपॉझीट स्लिप भरणे वगैरे सोपस्कार पार पडले.
कॅशीयर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.. थांबा साहेबांना विचारतो..
साहेब (असिस्टंट मॅनेजर) : तुमची कॅश स्वीकारता येणार नाही.
मी : कारण कळेल का..?
असिस्टंट मॅनेजर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.
मी : हरकत नाही साहेब.. एनी ब्रँच बँकींग आहे.
असिस्टंट मॅनेजर : तरीपण घेवू शकत नाही.
मी : तुमच्या मॅनेजरला बोलवा.
असिस्टंट मॅनेजर : साहेब रजेवर आहेत. मीच मॅनेजर आहे आज. कॅश घेता येणार नाही.
मी : नियम बघा.. घेता येते. मी महाराष्ट्रात सगळीकडे भरतो. व्यवहार बघा तुमच्या सिस्टीममध्ये.. आणि गावांची नावे बघा.
असिस्टंट मॅनेजर : नाही घेणार.
(आम्ही एकदम गोंधळून गेलो होतो)
आता सोबतच्याने रिंगणात प्रवेश केला..
अहो साहेब.. आमचेच अकाऊंट आहे... सगळीकडे कॅश घेतात...
असिस्टंट मॅनेजर : (बोलणे मध्येच तोडून आणि अत्यंत उद्धट सुरात..) अहो तुम्हाला सांगीतले आहे ते कळतेय का..? कॅश घेणार नाही..
आता दोघांचेही फ्युज गेले..
मी : ओ भाषा सुधारा..
सोबतचा : ओ तुम्हाला हे जड जाईल.. लेखी द्या कॅश देत नाही म्हणून.
असिस्टंट मॅनेजर : लेखी देणार नाही. काय करायचे ते करा.
मग आम्ही क्यू सोडला. आमच्याकडच्या एका कागदावर सगळा प्रसंग लिहून काढला आणि
यावर अॅक्नॉलेजमेंटची सही द्या अन्यथा आमच्या अकाऊंटला एक रिलेशनशिप मॅनेजर असाईन्ड आहे त्याला कॉल करतो असा दम दिला.
तो मॅनेजर सही देईल याची खात्री नव्हती कारण तशी सही देणे म्हणजे त्याने स्वत:च्या पंचनाम्यावर सही करण्यासारखे होते. पण साहेबांनी सही दिली.
आम्ही धावपळ करून दुसरी ब्रँच शोधली व पैसे भरले.
नंतर हे सगळे प्रकरण आणि त्या पत्राची प्रत cgmcsd@rbi.org.in या रिझर्व बँकेच्या ओम्बुड्समन \ कस्टमर केअरला पाठवली.
बँकेने विनाअट त्वरीत लेखी माफी मागीतली व त्या असिस्टंट मॅनेजर साहेबांची त्याठिकाणाहून २५० किमी दूर एका ब्रँचमध्ये "बॅक ऑफिस" ला बदली केली.
आता त्या ठिकाणी आमचे पैसे विनातक्रार स्वीकारतात.
*****************************************************************
ऑफिसमध्ये कामात बुडलेल्या अवस्थेत असताना अचानक फोन वाजला..
टेलीकॉलर -(मंजुळ सुरात..) मोदक सर बोलताय का..?
मी: हो.
टेलीकॉलर : मी ** सर्विसमधून बोलत आहे.. तुम्हाला कार घ्यायची आहे का..? तुमचे XXXX बँकेसोबत होम लोन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगले इंटरेस्ट रेट देवू शकतो आणि अशी अशी ऑफर आहे.. तुम्हाला इंटरेस्ट आहे का..? (हे सगळे एका दमात)
मी : (मनातल्य मनात) $%#^& हिला कसे कळाले माझे होम लोन आहे आणि ते पण या बँकेत..!!!!
मी: (तिला घोळात घेत) मॅडम मला SX4 घ्यायची आहे. बोला..
आणि साधारणपणे १५ मिनीटांच्या चर्चेनंतर मला हवी ती माहिती कळाली.
त्या सेल्सवालीचे नांव, तिच्या मॅनेजरचे नांव आणि सर्वात महत्वाचे बँकेच्या ज्या मॅनेजरने ही माहिती दिली त्याचे नांव.
मग एक सुस्पष्ट असा मेल लिहिला.
Subject: Complaint - Sharing Personal Details with Third Party.
Hello,
This is मोदक - My customer ID is १२३४५६७८९.
Today morning I got a call from a Maruti Automobile dealer "***" from Fugewadi Pune, asking for any requirement for Auto Loan. I was assured lucrative interest rate since I am a prevailed customer of XXXX Bank.
I was shocked to know that caller (Ms. XXXX from number +91-00000 00000) was referring to my home loan and my association with XXXX Bank. After demanding more information on 'my details available at their end' I got to know that "XXXX Has provided these details to her supervisor, Mr XXXX " and they have got data set for around 200 XXXX Home Loan customers.
Therefore I would like to know,
Is it legitimate to share Loan details / Personal details / Contact number with third party..?
If not - I request a thorough investigation as to "Why personal details were made available to third party"
I am really disappointed that such incident have taken place even after my contact number is registered for DND.
Please feel free to revert in case any information required from my side.
Regards,
मोदक.
नंतर त्या बँक मॅनेजरचा फोन आला.. त्यांनी असे फोन परत येणार नाहीत याची खात्री दिली आणि तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहोत अशी माफी मागितली
मारूतीच्या शोरूममधून ज्या मुलीने फोन केला तिने माफी मागावी अशी अपेक्षा आहे का..? असेही विचारले या गोष्टीस मी नकार दिला कारण माझे काम झालेले होते.
मला आजतागायत पुन्हा त्या शोरूम मधून किंवा कोणत्याही ठिकाणाहून Home Loan च्या रेफरन्सने फोन आलेले नाहीत.
*****************************************************************
या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील..
*****************************************************************
प्रतिक्रिया
9 Dec 2014 - 2:26 pm | त्रिवेणी
चांगला धागा आहे. आपल्या सगळ्यांना फायदा होईल.
9 Dec 2014 - 2:33 pm | टवाळ कार्टा
वा.खू. साठवलेली आहे :)
9 Dec 2014 - 4:45 pm | योगी९००
खरोखर चांगला धागा आहे. असा फोन आला तर उपयोग होईल.
एकदा मी ICICI च्या एका ब्रॅंचमध्ये काही कारणासाठी माझा customer ID दिला. त्या माणसाने आणखी एकाला बोलावून मला न विचारता माझे details दाखवले. माझ्या काही Transactions पाहून त्यांना मी कोठले क्रेडीट कार्ड वापरतोय व माझे ग्रुह कर्ज कोठले आहे ते त्यांना कळले. त्या दोघांनी लगेच माझा ताबा घेतला. मी ज्या कामासाठी आलो होतो ते बाजूला सारून मी ह्या क्रेडीट कार्ड ऐवजी ICICI क्रेडीट कार्ड व होम लोन चेंज करा वगैरे मागे लागले. मी शांतपणे उठून तडक तिथल्या मॅनेजरकडे गेलो आणि तक्रार केली. मॅनेजरने माझ्यासमोर दोघांना झाडल्यासारखे केले. कारण काही दिवसांनी तोच प्रकार दिसून आला. आजकाल HDFC, ICICI ब्रँच मध्ये जाणे मुश्किल झाले आहे. एका कामासाठी जायचे म्हणले तर तेथील शिपायापासून प्रत्येकजण insurance, credit card, personal or home loan या साठी मागे लागतो.
9 Dec 2014 - 7:29 pm | मोदक
तेथील शिपायापासून प्रत्येकजण insurance, credit card, personal or home loan या साठी मागे लागतो
अशावेळी न विसरता आपल्याला दिली गेलेली आश्वासने ती आश्वासने देणार्यासमोरच एका कागदावर लिहून काढावीत व त्यावर त्याचे नांव, गळ्यात बॅज असेल तर एम्प्लॉयी आयडी, फोन नंबर आणि त्याच्या दोन किंवा तीन लेव्हल वरच्या मॅनेजरचे नांव, हुद्दा (रिजनल मॅनेजर / सेल्स मॅनेजर / एरीया मॅनेजर) आणि फोन नंबर घ्यावा.
वरच्या मॅनेजरचे नांव आपल्याकडे असल्याने मिळालेली आश्वासने कन्फर्म करता येतात.
सेल्स करणारे किराणा दुकानातली मुले काम सोडतात तसे काम सोडू शकतात कारण बहुतेकदा ते बँकेच्या पे रोल वर नसतात - ते एखाद्या DSA - Direct Sales Associate किंवा DST - Direct Sales Team कडून काँट्रॅक्टवर काम करत असतात. गळ्यात बॅज असला तरी तो "रिप्रेझेंटिटीव्ह" चा बॅज असतो - बँक अशा लोकांच्या बाबतीत कधीही हात वर करू शकते
जर शंका असेल तर बिन्धास्त त्या मॅनेजरला फोनवावे आणि माहिती विचारावी. हे फोन रेकॉर्ड करून ठेवावेत.
आजच्या Dogs Fight मध्ये सेल्स मॅनेजर कधीही "मला का फोन केला..?" किंवा "मी का माहिती देवू..?" असे म्हणणार नाही याची खात्री बाळगावी.
आपणच नीट काळजी घेतली तर फसवणूक होण्याशी शक्यता खूप कमी होते.
10 Dec 2014 - 10:36 am | सामान्यनागरिक
आपण सांगीतलेल्या ठिकाणी मलाही हाच अनुभव आला. माझ्या होम लोनचे काम करण्यासाठी एक इन्शुरन्स प्~ओलिसी मला जबरदस्तीने घ्यायला लावली. कधी एकदा ती सरेन्डर करुन माझे पैसे काढते असे झाले आहे. आणि आपल्या कस्टमरची माहिती तर ते सर्रास सगळ्यांना देतात. हल्लीतर लोन घेतांना कागद पत्रात एक अट असते की जरुर पडल्यास ते आपली महिती त्यांच्या कोणत्याही एजन्सी कडे देतील. मग हे लोक सर्रास कोणत्याही कारणासाट्।ई फोन करु लागतात.
ट्राय कडे अशी सूचना करायला हवी की असे फोन आले की त्यांच्या आफिसात जाऊन त्यांना फटके मारण्याची परवानगी लोकांना द्यावी. असे गुन्हे पोलिसांनीही दाखल करुन घेऊ नयेत. तरच हे थांबेल.
9 Dec 2014 - 4:57 pm | मराठी_माणूस
आपली बदली अशा कारणामुळे झाली हे त्याला कळले का ?
9 Dec 2014 - 6:38 pm | अत्रुप्त आत्मा
@आपली बदली अशा कारणामुळे झाली हे त्याला कळले का ?>> +++१११
छान धागा! :)
9 Dec 2014 - 6:53 pm | मोदक
हो कळाले असणारच कारण नंतर त्याचाच मॅनेजर सॉरी सॉरी म्हणत होता... मी रजेवर होतो म्हणून असे झाले अन्यथा असे होत नाही वगैरे वगैरे. (वॉर्नींग देवून बदली केली हे त्याच्याच कडून कळाले!)
आमच्या दॄष्टीने त्यावेळी आणि नंतर विनातक्रार सेवा मिळणे आवश्यक होते त्यामुळे त्या असिस्टंट मॅनेजरबाबत फारसा पाठपुरावा केला नाही.
9 Dec 2014 - 8:48 pm | प्यारे१
मला आजतागायत हे समजलं नाही की एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या अकाऊंट असलेल्या शाखेव्यतिरिक्तच्या शाखांमध्ये का घेतली जात नाही.
'पणजी'च्या बँकेत माझ्या अकाऊंटला २ वेळा शिवाजीनगर ब्रँचला जाऊन पैसे भरावे लागले सिंहगड रोड ब्रेंच सोडून. बरेच लोक पैसे द्यायला नाटक करतात (सध्या ह्या अनुभवातून जातोय, ते वेगळं आहे) हे बँकवाले लोक घ्यायला पण नाटक करतात. काय प्रॉब्लेम आहे कळत नाही.
कुणी बँकेशी संबंधित व्यक्ती नक्की काय मुद्दा असतो साम्गेल का?
9 Dec 2014 - 8:58 pm | मोदक
मला आजतागायत हे समजलं नाही की एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या अकाऊंट असलेल्या शाखेव्यतिरिक्तच्या शाखांमध्ये का घेतली जात नाही.
मलाही हा प्रश्न पडतो पण एक खाते पगाराचे असल्याने हा प्रश्न पडत नाही कारण पगाराचा टॅग असल्याने कोठेही पैसे भरता येतात आणि IDBI बँकेमध्ये कोठेही कितीही पैसे भरता येतात असा अनुभव आहे.
"पणजी"च्याच बँकेत "प्लॅटीनम कस्टमर" असा काहीतरी प्रकार आहे. आपण ठरावीक रकमेच्या फिक्स्ड डिपॉझीट्स ठेवल्या की तो टॅग मिळतो. कोठेही रांगेत उभे न राहता व्यवहार होतात, आपले खाते कोणत्याही शाखेमध्ये कसेही वापरता येते - ही माहिती २ वर्षांपूर्वीची आहे. सध्या पॉलीसी बदलली असल्यास कल्पना नाही.
9 Dec 2014 - 9:04 pm | प्यारे१
माझ्या पगारखात्यातच एका दिवसाला ५० ह. च्या वर पैसे घेतले जात नव्हते.
२०११ ला घरासाठी केलेल्या काही उलाढालींतून आलेला अनुभव
9 Dec 2014 - 11:40 pm | सुबोध खरे
मोदक साहेब
आपल्या खात्यात कोणीतरी रोख पैसे भरले आणि नंतर आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तर आपण त्याचा बचाव कसा करणार. अशा काही घटना सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्यामुळे बँका असा पवित्रा घेतात असे मला सायबर गुन्हे खात्यात काम करणाऱ्या पोलिस अधिकार्याने सांगितले होते. कोणत्याहि खात्यात चेक भरलेला चालतो कारण चेकचा आगापीछा काढता येतो.
कितपत सत्य आहे माहित नाही पण तर्कसंगत वाटते.
9 Dec 2014 - 11:41 pm | सुबोध खरे
अर्थात स्वताच्या खात्यात पैसे भरायला काय आडकाठी असावी ते कळले नाही.
10 Dec 2014 - 12:30 pm | मोदक
अर्थात स्वताच्या खात्यात पैसे भरायला काय आडकाठी असावी ते कळले नाही.
प्यारेकाकांचा आणि माझाही हाच मुद्दा आहे.
10 Dec 2014 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे.
मात्र ओळख न पटवता खात्यात पैसे भरण्याला आडकाठी करणे हे बँकेचे कर्तव्य आहे आणि तसे करणे खातेदाराच्या भल्याचेच आहे. हल्ली दुसर्याच्या खात्यात रोख पैसे भरताना (उदा. भाडेकरूने मालकाच्या खात्यात घरभाड्याचे पैसे भरताना) रक्कम फार मोठी नसली तरी हे पैसे कोण भरत आहे व का भरले जात आहेत याचे कारण लिखीत स्वरूपात मागितलेले पाहिले आहे. यामागे खातेदाराची सुरक्षा आहे हे मात्र खरे.
10 Dec 2014 - 1:22 pm | मोदक
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे.
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे.
येथे प्यारे काकांचे स्वत:चे पगारखाते आहे परंतु होम ब्रँच मध्ये पैसे भरावयाचे नसून त्याच बँकेच्या वेगळ्या ब्रँचमध्ये पैसे भरण्यास परवानगी मिळाली नाही.
याबाबतचा नेमका नियम कोणाला माहिती आहे का..?
11 Dec 2014 - 8:42 am | असंका
कॅश घेण्यापासून ते सुरक्षित ठेवण्यापर्यंत अनेक कारणांनी बँकांना 'कॅश' व्यवहारात वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. जसे कॅश मोजणे, खोट्या नोटा ओळखणे, खोट्या नोटांची विल्हेवाट (!) लावणे, खर्या नोटांची बंडले बांधणे (याला आता पिन लावू देत नाहीत, त्यामुळे धोका वाढतो असे सगळे कॅशियर मानतात), कॅश ही दिवस अखेर शाखेला घालून दिलेल्या मर्यादेत (cash retention limit) राहिल हे बघणे- कारण अ. धोका ब. इंशुरन्स क. बॅंकेत शिल्लक पैशावर बँकेला कसलेही उत्पन्न मिळत नाही,- हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि जितकी जास्त शिल्लक कॅश तितके दिवस संपतानाचे काम जास्त. शिवाय हे सगळे काम बँकेच्या स्वतःच्या कर्मचार्यांनाच करावे लागते.
याविरूद्ध चेकच्या बाबतीत ऑटोमेशन हे फार सुलभ आहे. MICR क्लिअरींग उपलब्ध असल्याने, मोठमोठ्या रकमा अगदी काही कळा दाबून खात्यात जमा होतात. पाचेक वर्षांपूर्वी तरी प्रायव्हेट बँका हे सगळे काम सरळ आऊटसोर्स करायच्या- आताचे माहित नाही. CTS किंवा चेक ट्रंकेशन सिस्टीम आल्यापासनं आता ते आणखी वेगवान आणि सुरक्षित झाले आहे.
त्यामुळे बॅंका कॅशपेक्षा चेकला प्राधान्य देतात.
आता प्रश्न आहे की दुसर्या शाखेत चेक भरले तर चालते, कॅश नाही. माझ्या मते बॅंका कॅश व्यवहार करून नका असे म्ह्णत नाहीत. फक्त कॅश व्यवहार करण्यासाठी जास्त चार्जेस लावू असे म्हणतात.सर्व्हिस चार्जेस चे सर्क्युलर मागवा आपल्या बँकेचे. त्यात सगळं स्पष्ट लिहिले असते. जर शाखेने नाही दिले तर वेबसाइटवर नक्कीच मिळेल.
11 Dec 2014 - 9:00 am | असंका
पगार खात्याचे म्हणताल तर नक्की माहित नाही, पण झीरो बॅलन्स वगैरे काही जास्तीच्या सुविधा त्या खात्यासाठी दिल्या असाव्यात. पगार खाते हे टेलर्ड प्रॉडक्ट आहे. त्यात costing करताना पगार हा सरळ खात्यावर जमा होणार असे गृहित असते. कॅश डीपॉझिट घेणे हा त्या खात्यासाठी बँकेला करावा लागणारा वाढीव खर्च होइल. एका मर्यादेवर अशी सुविधा देता येत नसावी.(शिवाय त्या पैशाचा उगम काय हे बघणे (-बघणे- तपासणे नव्हे!)बंधनकारक केले आहे- कारण ज्ञात उगम हा पगार आहे. कॅश भरली तर पगार खात्यात त्याचा उगम अज्ञात असेल. अँटी मनी लाँडरींगचे नियम)
11 Dec 2014 - 10:47 am | सुबोध खरे
कंफ्युज्ड अकौंटंट साहेब
पगाराच्या खात्यावर झीरो बॅलन्स वगैरे काही जास्तीच्या सुविधा बँक देते त्या काही उपकार म्हणून नाही तर पगाराचे पैसे दर महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या खात्यात पडतात पण ते पैसे फक्त गरजेनुसार काढले जातात त्यामुळे बँकेला हे पैसे ४ टक्के व्याजाने वापरायला मिळतात. लोकांचे असे लक्षावधी रुपये बँका वापरत असतात म्हणूनच आमच्या बँकेत पगाराचे खाते उघडा म्हणून त्यांचे एजंट लोकांच्या मागे लागलेले असतात. मी लष्करी सेवेत असताना आय डी बी आय, आय सी आय सी आय आणी कोटक महिंद्र बँकेच्या एझाण्टाणी माझ्या मागे फार धोशा लावला होता. मी त्यांना एकाच विचारले कि मी माझे एच डी एफ सी चे पगाराचे खाते सोडून तुमच्याकडे का यावे?
हे फायदे नसते तर बँका तुम्हाला फुकट क्रेडीट कार्ड, फुकट डिमांड ड्राफ्ट, पगार इतका ओव्हर ड्राफ्ट अशा सुविधा का देतील?
कॅश डीपॉझिट घेणे हा त्या खात्यासाठी बँकेला करावा लागणारा वाढीव खर्च होइल. जर बँक हे काम करत नसेल तर बँक आहे कशासाठी?
शिवाय आलेला पैसा बँक वापरणारच त्यासाठी आम्हाला कष्ट होतात असे म्हणणार असतील तर बँका हव्यातच कशाला?आणी त्यांचे कर्मचारी पगार कशाचा घेतात? जर हि मुलभूत सुविधा माझ्या पगाराच्या खात्याला मिळणार नसेल तर बँकेचा उपयोग काय?
राहिली गोष्ट माझ्या खात्यात पैसा भरण्यासाठी मी कुठून आणतो हे पाहणे बँकेचे काम नाही. ते आयकर खात्याचे आहे. आपण आपल्याला दिलेल्या कामापेक्षा दुसर्याचे काम का पाहावे? उलट मी जर पैसे भरतो आहे म्हणजे हे पैसे काळे नाहीत हेच सिद्ध होते. (ते मी तिजोरीत न ठेवता बँकेत भरत आहे). मला यात बँकेच्या कर्मचाऱ्यांचा काम टाळण्याकडे कल आहे असे वाटते
आपल्या प्रतिसादाचा सूर बँका तुमच्या वर उपकार करीत आहेत असा वाटतो. कोणीच कुणावर उपकार करीत नाहीत.
11 Dec 2014 - 4:30 pm | हाडक्या
+१०० .. खरे साहेब..
हे अगदी खरेय. आपल्याकडे सरकारी बँकांनी असा समज करुन दिलाय(घेतलाय) की ते लोकांवर उपकारच करत आहेत. दुर्दैवाने हे अजून बर्याच ठिकाणी दिसून येते.
11 Dec 2014 - 4:40 pm | असंका
याचे उत्तर खाली देत आहे. इथे जागा पुरेशी नाहिये.
11 Dec 2014 - 5:27 pm | पैसा
५० हजारच्या वरच्या रकमेच्या रोखीच्या व्यवहारांची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवणे बँकाना बंधनकारक असते. त्यासाठी बँकेला फक्त तुमचे नाव माहित असून उपयोग नाही तर पॅन नंबरही आवश्यक असतो. पॅन कार्डाची कॉपी सोबत घेऊन गेलात तर पैसे घ्यायला नकार मिळू नये. होम ब्रँच सोडून इतर शाखांमधे बचत खात्याचे पैसे भरणे काढणे याला बहुतेक बँकांची मर्यादा ठरवलेली असते. तसेच १०० हून कमी डिनॉमिनेशनच्या नोटांमधे पैसे भरले तर त्यासाठीही सर्व्हिस चार्जेस असतात. (याचं कारण असं की समजा तुम्ही १० रुपयाची ५० बंडले ५०००० म्हणून भरलीत तर कॅशियरला ते पैसे मोजायला सुमारे एक तास लागेल. त्याचा एका तासाचा पगार विचारात घेतला तर असे ५०००० घेण्यात बँकेचे नुकसानच होते. त्याऐवजी ५०० रुपयांचे एक बंडल १ मिनिटात मोजून होते.) कॅश अवर्स संपायच्या आतच पैसे भरायला हवेत. कारण सगळे हिशेब पुरे करून कॅश मोजून टॅली करून डबल लॉकमधे ठेवायला बँक कर्मचार्यांना जेमतेम एक तास हातात मिळतो. दिवसभर ५०-५० लाख रुपये १ ते १०० मोजून ते कंटाळलेले असतात. प्रत्येक शाखेची कॅश लिमिट ठरलेली असते. त्यामुळे एका ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे भरायचे किंवा काढायचे असतील तर अशा व्यवहाराची कल्पना त्या शाखेला अगोदर देणे आवश्यक असते. ५०० किंवा हजाराच्या नोटांमधे फेक नोटा येण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. नेहमीचा कस्टमर असेल आणि त्याच्या कॅशमधे अशी फेक नोट सापडली किंवा पैसे कमी असले तर तर त्याच्याकडून पैसे परत मिळवणे हे सोपे असते. पण दुसर्या ठिकाणाहून आलेल्या कस्टमरच्या पैशात अशी फेक नोट सापडली आणि ती स्टेट बँकेत पकडली गेली तर बँक स्टाफला स्वतः पैसे भरावे लागतात, कारण त्या बाहेरून आलेल्या कस्टमरला तुम्ही पकडू शकत नाही. गर्दीच्या वेळी एकेक नोट चेक करत रहाणे जिकिरीचे होते. अशी अनेक कारणे असू शकतात. मात्र हे खरेच की यापैकी नेमक्या कोणत्या कारणासाठी आपण कॅश नाकारत आहोत हे बँक स्टाफने नम्रपणे सांगायला पाहिजे. ग्राहकांसोबत अरेरावीने वागू नका अशा सूचना सर्व स्टाफला वेळोवेळी दिलेल्या असतात.
9 Dec 2014 - 5:08 pm | कविता१९७८
मला खुप वर्षाआधी होम लोन घ्यायचे होते , पण पगार कमी होता म्हणुन को-ऑप बँकेमधे अर्ज केला होता, मॅनेजरने सांगितले की तुमचा पगार कमी आहे पण वडीलांच्या उत्पन्नाचा दाखला दिल्यास तुम्हाला पुर्ण रकमेचे लोन मिळु शकते. धावपळ करुन लगेचच वडीलांच्या उत्पन्नाचा दाखला काढला तरीही लोन पास होईना ६ महीने होत आले , मग आम्हाला कळले के ठाण्याला बँकेच्या हेडऑफीस मधे लोन शी संबंधित अधिकारी लाच घेतल्याशिवाय लोन अप्रुव्ह करत नाहीत. मग एक दिवस मी , बहीण आणि भावजी बँकेच्या हेडऑफीसला गेलो. तिथे लोन विभागातिल मॅनेजर साक्षात जमदग्नीचा अवतार वाटत होता. अतिशय उर्मट शब्दात भांडायला लागला. खुपच अद्वातद्वा बोलु लागला. थोड्या वेळाने एक अधिकारी आला अणि म्हणाला की तुमचा पगार कमी असल्याने तुम्हाला कमी लोन मिळेल आम्ही सांगितलं त्यासाठी बँकेने आम्हाला माझ्या वडीलांच्या उत्पन्नाचा दाखला जोडायल सांगितला होता आणि आम्ही तो जोडलाय पण ते ऐकेनात , मग माझ्या बहीणीच्या मिस्टरांनी सांगितलं की ठिकाय नको घेउस या बँकेतनं लोन , पेपर परत घेउन जाउ, तसा तो अधिकारी म्हणाला की तुम्हाला लोन कमी मिळतंय म्हणुन लोन नकोय असं अर्जात लिहा पण बहीणीच्या मिस्टरांनी सांगितलं अज्जिब्बात नाही बँकेचा कारभार अतिशय ढिसाळ आहे, सर्व कागदपत्रांची सांगितल्याप्रमाणे पुर्तता करुनही ६ महीन्यांपासुन अर्ज करुनही अद्याप लोन मिळालेलं नाहीये म्हणुन मला आता तुमच्या बॅंकेकडुन लोन नकोय असं लिहि, तसं लिहिलं तो अर्ज त्या मॅनेजर ने आणखी वर नेला तशी त्याला झाप बसली ; अर्ध्या तासात आला तो जमदग्नीचा भिगी बिल्लि बनुन, मॅडम कीती हो राग करता, जाउ द्या , बँकेने तुमचं लोन मंजुर केलंय, आता सर्व सोपस्कार करुन तुमच्या हातात सँक्शन पेपर्स देतो तुम्ही प्लीज बसा. मग आम्ही थांबलो दुपारी तर स्वत:च्या पाकीटातुन पैसे काढुन जेवण मागवत होता पण आम्ही नकार दिला, संध्याकाळी ५ वाजता सर्व पेपर्स हातात दिले आणि आम्ही ५.३० ची ठाणे-बोईसर बस पकडुन घरी. आणि याचा परीणाम असा झाला की बँकेने नंतर ८ दिवसात गृहलोन अप्रुव्ह होण्याची हमी देत सर्व शाखेत बोर्डस् लावले.
9 Dec 2014 - 5:23 pm | सस्नेह
यापुढे असल्या अडचणीच्या प्रसंगी सल्ला मागायला वकील सापडला ...
9 Dec 2014 - 5:42 pm | आदूबाळ
आमची "जिव्हाळ्याची ब्यांक" शैक्षणिक कर्जाचा "मोरॅटोरियम पीरियड" संपून दोन महिने झाले तरी ईएमायची रक्कमच ठरवून देईना. ब्रँच मॅनेजरला ईमेली करकरून थकलो.
शेवटी चिडून त्या बँकेच्या चेअरमनचं नाव गुगलून पाहिलं तर चक्क ईमेल अॅड्रेस मिळाला. मग त्यांना ब्रँच मॅनेजरशी झालेलं सगळं ईमेल संभाषण फॉर्वर्ड केलं, आणि त्याला खालील आशयाची मेल लिहिली:
दुसर्या दिवशी दुपारी मॅनेजरबाबूंचा फोन, आणि संध्याकाळपर्यंत ईएमायचं कॅल्क्युलेशन हाजिर!
9 Dec 2014 - 6:55 pm | विजुभाऊ
उत्तम धागा.
आजच सकाळी एक फोन आला होता त्या त्ते म्हणत होते की तुम्हाला इन्टरेस्ट फ्री कर्ज हवे आहे का? कोणत्यातरी इन्शुरन्स कम्पनी चा होता. माझ्या कलीगशी या बद्दल बोललो. त्याला देखील दुपारी तसाच फोन आला. त्याने चौकशी केल्या नंतर ते लोक १० लाखापर्यन्त व्याज विरहीत कर्ज देऊ करत होते. त्याना असे बीनव्याजी कर्ज देणे कसे परवडते तसेच आमचा नंबर कोठून मिळाले विचारल्यावर त्यानी आर बी आय मधून असे साम्गितले आणि चिडून फोन बंद केला.
9 Dec 2014 - 7:13 pm | मोदक
इन्टरेस्ट फ्री कर्जाचा फंडा खूप सोपा आहे.
शून्य % व्याज असले तरी प्रोसेसींग फी घेतातच - ती फी बँकेचा "नेट प्रॉफीट" असतो. (कसा ते माहिती नाही पण असतो इतकेच माहिती आहे)
आणि जर ही स्कीम एखाद्या वस्तू साठी असेल (उदा. बजाज पल्सर) तर बजाज कंपनी त्या बँकेला ग्राहकाला शून्य % ने कर्ज दिल्याबद्दल पैसे देते - म्हणून बँकेला हे परवडते.
9 Dec 2014 - 9:08 pm | हाडक्या
जल्ला तुमचा सिबिल स्कोर फारच भरभक्कम असणार हो..!! ;)
(संदर्भ : क्रेडिट कार्डच्या धाग्यावरचा सिबिल विषयक संवाद)
9 Dec 2014 - 7:14 pm | रेवती
चांगला धागा रे मादका! खूप माहिती मिळणारे मला.
सध्या एकाला जास्त पैसे मागण्याबद्दल कसा झोडावा हा विचार करतीये. की झोडूच नये? फुल्या फुल्या.
18 Dec 2014 - 1:40 pm | साती
;)
9 Dec 2014 - 7:17 pm | रेवती
वरील लेखात हुच्च्भ्रू ब्यांक आणि पुण्यापासून दूर असताना अरेरावी केल्याचा उल्लेख आहे. तेवढा पटला नाही. हे सगळे पुण्यात व्हावे ही श्रींची इच्छा असताना दुसर्या गावातील लोकांची हिम्मत तर पहा! ;)
9 Dec 2014 - 8:39 pm | स्वधर्म
धन्यवाद मोदक. बरच शिकायला मिळेल या धाग्यातून. मी कुणाला धडा शिकवल्याचे आठवत नाही आठवलं तर नक्की लिहीन.
9 Dec 2014 - 9:14 pm | सुहास पाटील
साधारण साडेतीन वर्ष्यापुर्वीची गोष्ट. मी नुकताच सिंगल सिलिंडर ग्यास कनेक्शन घेतले होते ( भारत ग्यास ) . मला ते डबल करायचे होते. मी ग्यास वितरकाला सांगितले कि डबल कनेक्शन ला काय करायचे. त्याने मला सांगितले कि ३५०० रुपये भर मग मिळेल. मी त्याला विचारले इतके पैसे कश्या कश्या चे आहेत ते सांगा. त्याने मला सांगितले कि कि भारत ग्यास ची स्कीम आहे तुम्हाला घरगुती वापरायच्या वस्तू सुधा मिळतील ( तेल , तांदूळ इतर). मी त्याला सांगितले कि मला हे नकोय पक्त दुसऱ्या सिलिंडर कनेक्शन चे किती पैसे होतील ते सांगा. तो म्हणाला ठीक आहे नंबर लावा , कनेक्शन आले कि कळवतो . मी म्हणालो किती वेळ लागेल. तो : माहित नाही सहा महिने लागू शकतात. मी लगेच online goverment पोर्टल वर compalint takli. पुढच्या तीन आठवड्यात मला भारत ग्यास च्या ग्राहक खात्यातून फोन आला तुम्ही त्या ग्यास वाल्या कडे जा आणि मला फोन करा थितुन ( मला त्या अधिकार्याने स्वतःचा मोबाइल नंबर दिला ) . मी ग्यास वाल्याकडे जाऊन माझ्या सेल वरून त्या अधिकाऱ्याला कॉल केला नी त्या वितरकाला बोलायला लावले. पुढच्या पाच मिनटात मला दुसरे सिलिंडर मिळाले
9 Dec 2014 - 11:22 pm | खटपट्या
पुर्वी या प्रकारचा एक धागा आला होता ब्यांका कशा फसवतात?
त्यावर मी दिलेला प्रतीसाद पून्हा एकदा !!
आयसीआयसीआय बँकेचा माझा अनुभव:
मी आयसीआयसीआय बँकेकडून १५ लाखाचे गृह कर्ज २० वर्षासाठी घेतले आहे. गृह कर्जाबरोबर घराची विमा पॉलिसी घेणे बंधनकारक आहे. विमा पॉलिसी फक्त पहिल्या पाच वर्षासाठी होती हे माहित नव्हते. पाच वर्षांनी मला एक पत्र आले कि घराची विमा पॉलिसी संपली आहे, नवीन पॉलिसी काढावी लगेल. आमचा एजंट तुमच्या घरी येइल.
एजंट घरी आला. त्यास पॉलिसीचे डीटेल्स विचारले. तर म्हणाला कि भूकंप झाला आणि इमारत पडली तर संपूर्ण कर्ज माफ होईल . माझे काही बरे वाईट झाले तर संपूर्ण १५ लाख माफ होतील आणि घर तुमच्या बायकोच्या नावावर होइल. (बायको बाजूला बसली होती. तिच्या डोळ्यात एक असुरी आनंद दिसला)
दोन आढवड्यात पॉलिसी पोस्टाने घरी आली. संपूर्ण पॉलिसी काळजीपूर्वक वाचली. (कारण पाच वर्षापूर्वी वाचली नव्हती). पॉलिसीत कुठेच १५ लाखाच्या कर्ज माफीचा उल्लेख नव्हता. माझे बरे वाईट झाल्यास फक्त ८ लाखाची कर्ज माफी होईल आणि बाकीचे पैसे बायकोला भरावे लागतील असे लिहिले होते.
मी एजंट ला फोन केला. एजंट म्हणू लागला कि माझ्यावर विश्वास ठेवा. जे मी काबुल केलेय ते सर्व मिळणार. मी म्हणालो कि सर्व मिळणार आहे तर तुम्ही पॉलिसी मध्ये लिहून का देत नाहीत ? त्यावर त्याने मला दुसरी पॉलिसी पाठवण्याचे आश्वासन दिले.
एक महिना झाला तरी नवीन पॉलिसी आली नाही पण माझा हप्ता मात्र कापून जावू लागला. परत फोन केला. तर एजंट म्हणाला कि धीर धारा पॉलिसी येईल. पॉलिसी आली नाही पण दुसरा हप्ता हि कापून गेला. आता मात्र माझा धीर सुटला. तडक बँकेत गेलो, सर्व हकीकत सांगितली.
बँक व्यवस्थापकाचे म्हणणे पडले कि तो एजंट नवीन होता त्याने तुम्हाला चुकीची माहिती दिली. तुम्ही हि पॉलिसी चालू ठेवा आणि तुम्हाला १५ लाखाचे कवरेज हवे असल्यास अजून एक पॉलिसी घ्या.
मी सांगितले कि मला कोणतीच पॉलिसी नको आहे. माझे मी बघून घेईन. माझी पॉलिसी रद्द करा व मला सर्व भरलेले पैसे परत करा. व्यवस्थापकाने ते मान्य केले व मला एक आठवडा थांबण्याची विनंती केली. मी ३ आठवडे वाट पाहिली दरम्यान तिसरा हप्ता कापून गेला. मी पोलिसात जाण्याची धमकी दिली. व सर्व हकीकत बँकेच्या संचालकांना एमैल केली.
दुसऱ्या दिवशी बँक व्यवस्थापक माझ्या घरी आले, सोबत नवीन एजंट होताच. दोघांनी माझी माफी मागितली आणि माझे कापून गेलेले हफ्ते स्वतःच्या खिशातून देतो असे सांगू लागले. मी म्हणालो कि पैसे खिशातून देण्याची गरज नाही. तरीही त्यांनी माझ्या हातात माझे कापून गेलेले पैसे दिले. आणि पॉलिसी रीतसर बंद झाल्यावर आमचे पैसे परत करा म्हणून सांगून गेले.
परत एक महिना झाला आणि चवथा हप्ता कापून गेला. काहीच न करता वाट पहिली.
शेवटी पॉलिसी रद्द झाल्याचे पत्र आले. माझे पैसे माझ्या खात्यात जमा झाले.
पण एजंट काही त्याचे पैसे परत मागण्यास येत नव्हता. शेवटी व्यवस्थापकास पैसे नेवून दिले आणि त्याच्याकडून पैसे मिळाले असे लिहून घेतले.
भयंकर मनस्ताप झाला तो निराळाच.
10 Dec 2014 - 2:12 am | मुक्त विहारि
दुपारचे मस्त जेवण झालेले आणि अस्मादिक वामकुक्षी करायला जाणार, इतक्यात मोबाइल वर फोन आला.
मी : हॅलो.
तो : क्या आप क्ष्क्ष्क्ष्क्ष बोल रहे है?
मी : आपण कोण? मला फक्त मराठी येते.तुमची भाषा मला समजत नाही.
तो : आपण क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष बोलत आहात का?
मी : व्हय रे सोन्या.
तो : तुम्ही आत्ता जे मोबाइल जाळे वापरताय ना? त्याजागी आमच्या कंपनीचे मोबाइल जाळे वापरा.
मी : कशाला रे भाऊ?
तो: त्याचे अमके अमके फायदे आहेत.
मी : तुम्ही स्वतः ते वापरत आहात का?
तो : हो.
मी : मग तुम्हीच वापरा ना. मला कशाला सांगताय?
१. देवाच्या दयेने मला थोडी अक्कल आहे.त्यामुळे मला जे योग्य वाटते, ते मी करतो.
२. मी तुमच्याकडे आलो होतो का?
३. मी तुम्हाला माझा मोबाइल नंबर दिला होता का?
४. मला तुमच्या सेवेची गरज नाही.त्यामुळे पुन्हा तुमच्या कडून फोन येता कामा नये.उद्या जर का परत फोन आला तर मी ग्राहक मंचाकडे तक्रार करीन.
असे म्हणून मोबाइल ठेवून दिला.
आज तागायत मीच हीच गुरुकील्ली वापरतो.
10 Dec 2014 - 4:37 am | रेवती
एका बांगलादेशी मैत्रिणीची आठवण झाली. ती डॉक्टर आहे. हॉस्पिटलातून दमून आल्यावर असले फोन आले की ती "नो इंग्लीस" एवढेच म्हणते. ;)
10 Dec 2014 - 7:20 am | मुक्त विहारि
मराठीतच संभाषण करण्याचा हट्ट धरा.
अर्धी लढाई तिथेच जिंकता.
मग बाकीची खिंड लढवत न्यायची आणि सगळ्यात शेवटी "ग्राहक मंचाचा बाँब फोडायचा." त्याचा मानसीक किल्ला ढासळतो अन आपल्याला सुखाची झोप मिळते.
10 Dec 2014 - 3:05 am | hitesh
अक्षी बँकेत मलाही हाच अनुभव आला. एफ डी बाबत चौकशी करत असताना या एफ डी पेक्षा अमुक तमुक पॉलिशी घ्या . ती जास्त फायद्यात आहे . अशी उत्तरे मिळाली.
तुम्ही बँकेचे कर्मचारी आहात की इन्शुरन्स कंपनीचे हा प्रश्न विचारुनकस्टटमर केअरला जुजबी तक्रारही नोंदवलि.
आता छान सर्विस मिळते
10 Dec 2014 - 3:49 am | स्पंदना
श्या!
ह्या पूणेकरांपुढे जर्र्रा म्हणुन पैसे कमवायची सोय नाही. स्वतः तर काय देत नाहीत, वर धागे काढुन जनक्षोभ वाढवतात.
भारी माहिती. वाखू करुन ठेवते. कधी लागली माहिती तर येथुन घेता येइल.
मोदक राव ठ्यंक्यु बरं.
10 Dec 2014 - 4:50 pm | मोदक
एकदा एअरटेलचे त्यांच्याच वेबसाईटवरून ऑनलाईन रिचार्ज केले. साधारण २०० रूपयांचे. मला हवा असलेला आणि वेबसाईटवर नोंदवलेला प्लॅन मिळण्याऐवजी भलताच (आणि नको असलेला) प्लॅन मिळाला. कस्टमर केअर सोबत बोलून वाद न घालता त्यांच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट, ट्रँन्झॅक्शन आयडी आणि माझे डिटेल्स इ-मेलने कस्टमर केअरला पाठवले. मी लिहिलेला मेल आणि त्यांचा आलेला रिप्लाय याचा दूर दूर तक संबंध नव्हता. त्यांच्या दुसर्या तिसर्या मेल रिप्लायला "मी लिहिले आहे ते तुम्हाला समजले असेल तर तुमच्या भाषेत तेच मला लिहून पाठवा" असाही एक खवचट प्रतिसाद दिला. या सगळ्यामध्ये दोन दिवस गेले.
कस्टमर केअरकडून हे असेच लांबत जाणार अशी खात्री पटल्यावर शांतपणे हे सगळे उचलून फेसबुकवर टाकले - अर्थात मेल जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला नाही पण कुणाशी काय बोलणे झाले आहे ही साधारण माहिती टाकली.
पुढच्या अर्ध्या तासात "इश्यू एस्कलेट" झाला. कस्टमर केअर आणि फेसबुकवरच्या त्यांच्या अकाऊंटचा माणूस फोन कर करून सगळे समजावून घेवू लागले. आणखी १५ मिनीटांनी मला हवा तो प्लॅन मिळणार नाही पण मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळाला.
यामध्ये एक अनपेक्षीत गोष्ट झाली - कस्टमर केअर आणि फेसबुक वाले वेगवेगळ्या पातळ्यांवरून माझ्याशी बोलत होते आणि मला वाटत होते ते एकाच टीममधून आहेत. कारण दोघांनीही "मला हवा तो प्लॅन मिळणार नाही" आणि "मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळेल" हेच सांगीतले होते.
मला एकूण ४०० रूपयांचा टॉकटाईम मिळाला.
फेसबुकवाल्याला हे सांगीतले व २०० रू रिव्हर्स करून घे म्हणून सांगीतल्यावर त्याने त्या गोष्टीला नकार दिला (कारण माहिती नाही) व तुम्हाला आमच्यातर्फे कॉम्प्लीमेंट समजा असे सांगीतले. :)
10 Dec 2014 - 11:32 pm | बहुगुणी
कित्येक दिवस रखडलेल्या तक्रारी अॅक्सिस बँकेने काही तासांत कशा सोडवल्या ते इथे दिसतं.
अर्थात्, अॅक्सिस बँकेने Customer Support ची सोय फेसबुक पानावर उपलब्ध करून दिलीय म्हणून हे शक्य झालं असेल, ICICI च्या फेसबुक पानावर Customer Support / Care हा टॅबच नाहीये! Same with HDFC's or State Bank of India's Facebook pages. कुणी जाहीरपणे लाज काढायची संधीच या संस्थांनी ठेवलेली नाही ;-) पण SBI चं SBIInTouch हे पान आहे तिथे अशी तक्रार करता येते असं वाटतं.
11 Dec 2014 - 10:12 am | नाखु
मागच्या पंधरवाड्यात नव्याने सुरु झालेल्या पिंपरीतील सिटि मॉल मध्ये कंपनी सहकार्याबरोबर गेले होतो.स्वगत कक्षात माहीती आणि फोन नं दिला (अनावधानाने खरा!) आणि....
तीन्च दिवसांनी "तुम्हाला गिफ्ट आहे/ फुकट हॉलीडे पॅकेज ई, चे कॉल सुरउ झाले आणि प्रत्येकाचे म्हणणे एकच "तुम्ही मॉल मध्ये केलेल्या खरेदीबद्दल एका लकी ड्रा मध्ये तुमची निवड झाली आहे.
पण मी जागरूक मिपाकर(!!!) *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP* असल्याने बक्षीस घ्यायला ईतक्या लांब येउ शकत नाही तेव्हा माझ्या कंपनीतच या असा प्रेमळ आग्रह केला.(दुरदैवाने प्रतिसाद नाही)..
आणि हो महत्वाचे मी आणि कंपनी सहकारी याने मॉल मध्ये एक "पै"चीही खरेदी केली नव्हती तरी "पात्र" झालो हे विशेष *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: : *pleasantry* *db* :db:
11 Dec 2014 - 1:21 pm | मोदक
बाळ सप्रेंच्या जागो ग्राहक जागो - एक अनुभव या धाग्यावर दिलेला एक असाच अनुभव...
**********************************************************************
कोणत्यातरी टीनपाट हॉलीडे कंपनीने फोन करून त्रास द्यायला सुरूवात केली. तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये किचन अॅप्लायन्सेस चे फ्री गीफ्ट लागले आहे, त्याबरोबर २०,०००/- चे हॉलीडे व्हाऊचर पण मिळेल.
खूप टाळाटाळ करून एका शनिवारी (आई वडीलांसह) त्यांच्या औंध ऑफिसात गेलो.
बाबौ.. मासळी बाजार बरा. ३० / ४० टेबले, प्रत्येक टेबलाशेजारी ५ जण. ४ फ्यामिली आणि एक सेल्सवाली. विनाकारण गळेपडूपणा करत, "कुठे कुठे फिरता तुम्ही?", "इन्कम किती?" "आवडलेले ठिकाण कोणते?" असले प्रश्न विचारून आणि त्यांचे वेगवेगळे अल्बम दाखवून हैराण केले. मी अत्यंत शांतपणे दर १० / १५ मिनीटाला १ छोटा ग्लास कोल्ड्रींक संपवत सगळ्यांची मजा बघत बसलो.
ऑफर अशी होती की त्यांची ६० / ७० हजाराची मेंबरशीप १२ हप्त्यात घ्यायची
प्रश्नांची उत्तरे एकदम फ्लॅट टोन मध्ये देत होतो. उत्तरे ऐकून प्रश्न विचारणार्या कन्येचा चेहरा जास्ती पडत गेला.. Smile
प्रश्न - आप कारसे आए हो क्या.. पार्किंग ठीकसे मिला ना..?
मी - अॅप्रीशीएट यूवर कन्सर्न. ( कार का बाईक हा प्रश्नच उद्भवू दिला नाही ;-) )
प्रश्न - घर आपका खुद का है या रेंटेड..?
मी - पर्सनल डीटेल्स शेअर नही करूंगा.. आप प्लीज हॉलीडे व्हाऊचर के बारेमे बताईये.
प्रश्न - सर आपका पॅकेज कितना है..?
मी - दो वक्त का खाना निकलताहै, अमाऊंट नही बताऊंगा.
साधारणपणे २ तास सगळे सहन केल्यानंतर मी इंटरेस्ट नाही म्हणून सांगीतले.. कारण सांगीतले की ऑफर पटली नाही.. मला नक्की काय पटले नाही तेही शेवटपर्यंत सांगीतले नाही. ;)
किचन अॅप्लायन्सेस म्हणून त्यांनी झकास प्याक केलेला एक मध्यम बॉक्स दिला.. मी पण निर्लज्जपणे बॉक्स तिथेच उघडून आत काय आहे (किंवा खरेच कांही आहे का..?) ते बघितले, आणि मगच तो घेवून आलो.
तिथे जमलेले बहुतेक पब्लीक सोशल प्रेशर मुळे या फसव्या कल्पनांना बळी पडते असा कयास आहे.
12 Dec 2014 - 5:16 am | स्पंदना
मानल बुवा!!
आम्चे एकदा चार तास खाल्ले होते. गळाला लागलेला मासा बडवावा तसे बडवत होते $#@%&%#@& !! कश्शे बश्शे सुटलो, लय वैतागलो होतो दोघे बी.
11 Dec 2014 - 1:35 pm | सुबोध खरे
मोदक शेट
क्या बात है. They deserved it.
11 Dec 2014 - 1:41 pm | प्यारे१
क्या बात मोदक.
तुझ्यासाठी हे 'पाठपुरावा करुन जिंकणं' नेहमीचं झालेलं दिसतंय. ;)
11 Dec 2014 - 1:56 pm | मोदक
हार जीत सोडा ओ प्यारे काका... आपण ग्राहक म्हणून जागरूक असलो तर आपले कमी नुकसान होते इतकेच. :)
11 Dec 2014 - 5:19 pm | असंका
डॉ. सुबोध खरे साहेब-
मी या प्रश्नाचे उत्तर देत होतो- "पगार खात्यात कॅश भरता येत नाही का?". मी असे कधी म्हणालो की बँकेला सॅलरी अकौंटमधून फायदा होत नाही म्हणून? बँकेला निश्चितच फायदा होत असणार. वरचे प्रश्न आणि मी जे त्याच्या आधी लिहिले होते त्यात मला तरी कसलाही संबंध दिसत नाही. म्हणून उत्तर द्यायचा प्रयत्न करत नाहिये. आपला काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर सांगा, मी माझ्या कुवतीप्रमाणे निश्चितच उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
साहेब मी एका MD कडे जायचो ट्रीटमेंट साठी. त्याने मला इंजेक्शनचा कोर्स लिहून दिला. आणि म्हणाला की तुमच्या फॅमिली डॉ. कडून दर तीन दिवसांनी एक टोचून घ्या. आता मी त्याला असे म्हणू का की जर हे इंजेक्शन तुम्ही टोचत नाही तर तुम्ही कशासाठी आहात? जर मी तसे म्हणालो तर तो म्हणेल ठीके, मी देतो, प्रत्येक इंजेक्शन टोचण्याची फी दोनशे रुपये टाका!
हेही तसेच आहे. बँक नाही म्हणत नाही, फक्त त्याची फी लावते.
यावर काही लॉजिकल उत्तराची आपल्याला खरंच अपेक्षा आहे का? मी बँकांना फार कष्ट पडतात वगैरे असे विधान कुठे केले आहे? आणि कर्मचारी पगार घेतात तो त्यांना बॅंक देते आणि काय काम करावं हेही बँकच सांगते. आपल्याला बँकेचा उपयोग होत नसेल तर 'बॅंकेत आपले खाते खरंच असायला हवे का' याचा अवश्य विचार करून योग्य तो निर्णय करा.
Anty Money Laundering हे शब्द आपण ऐकले नाहित असे मला वाटत नाही. त्यातूनही सांगतो, की पैसे कुठून आले हे बघण्याची जबाबदारी RBI ने बॅंकांवर टाकलेली आहे. आपले तसे मत नाही तरी इथे वस्तूस्थिती वेगळी आहे. बघणे आणि तपासणे या वेगळ्या गोष्टी आहेत.
KYC म्हणजे काय हे आपणास माहित आहे ना? KYC च्या आधारे ग्राहकाचे प्रोफाइल तयार केलेले असते. ग्राहकाच्या खात्यात होणारे व्यवहार आणि हे प्रोफाइल यांच्यात एक संबंध असतो हे उघड आहे. जसे किराणा दुकानदार किती रकमा किती वेळा भरेल, या पद्धतीची माहिती. यात न बसणारा व्यवहार जर होऊ घातला असेल, उदा., रोज १०००/- रुपये भरणारा व्यक्ती एकदम लाख भर रुपये भरायला आला. अशा वेळी, ही रक्कम आणि त्या माणसाची बँकेत उपलब्ध माहिती जुळणार नाही. अशा व्यवहारात बँकेवर फक्त एक चौकशी करून तिची नोंद करायची जबाबदारी आहे. ती माहिती सत्य आहे किंवा कसे हे तपासणे बँकेला शक्य नाही याची नोंद घेतलेली आहे. हे मी वर थोडक्यात लिहिले होते.
याबद्द्ल मला काहीच म्हणायचे नाही. आपल्या मताचा आदर आहे. पण बँकेत टाळू म्हणून काम फार दिवस टळत नाही- जर कायमचेच टळले (बॅंक बंद पडली!) तर गोष्ट वेगळी.
मला तरी माझ्या कुठल्याही वाक्यात असा सूर जाणवत नाहिये. काही प्रश्न विचारले गेले होते की बँका असे असे करतात ते का करतात, त्यांची मी माझ्या मते उत्तरे दिली. (शक्य तेथे सेकंड चेक करूनच!). पण थोडा विचार केला तर बॅंकांचं अस्तित्त्व म्हणजे समाजाला केवढा मोठा वर मिळालेला आहे हे मला जाणवू शकते. आपल्याला तसे वाटत नाही का?
11 Dec 2014 - 5:31 pm | पैसा
कंझ्युमर कोर्टाचे नाव घेऊन मोटोरोला वाल्यांना सरळ केले होते त्याबद्दल आधी एकदा लिहिले होते. पुन्हा कॉपी पेस्ट करत आहे. http://www.misalpav.com/comment/620543#comment-620543
माझ्या मुलीच्या मोटोरोला ई चा डिस्प्ले फुटला. ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरला २३ ऑगस्टला दुरुस्तीसाठी दिला, तेव्हा त्यांनी मोटोरोला कंपनीकडे चौकशी करून १८०० रुपये एस्टिमेट लिहून दिले आणि २० दिवसांत फोन मिळेल म्हणून सांगितले. मी एक महिना वाट बघून फोन केला तर म्हणतात की डिस्प्लेची किंमत आता ४००० झाली. तेवढे पैसे भरा नाहीतर फोन परत घेऊन जावा. बरं म्हटलं आणि मोटोरोलाच्या चॅट सपोर्टला विचारले की किंमत कधी वाढली. ते म्हणाले की २० सप्टेंबरला. म्हटल्यावर माझं डोकं सटकलं. कंपनीला सगळे डिटेल्स ईमेल केले आणि उत्तराची अजून वाट बघत आहे.
दरम्यान सर्व्हिस सेंटरचा फोन आला की तुम्ही अजून फोन नेला नाहीत. त्याला म्हटले, की मी फोन देऊन एक महिना झाला तरी तुम्ही काय झोपा काढत होता का? मी अॅडव्हान्स पैसे देत होते ते तुम्ही घेतले नाहीत. आता मला २३ ऑगस्टच्या रेटने डिस्प्ले दुरुस्त करून द्या नाहीतर मी कन्झ्युमर कोर्टात जाते. आणखी काही वाद न घालता तो बुवा म्हणाला, वरिष्ठांशी बोलतो.
नंतर त्याचा फोन आला की पुढच्या आठवड्यात फोन तयार होईल. दुरुस्तीसाठी फक्त १८०० रुपये द्या. काम झालं. कन्झ्युमर कोर्टाचं नाव घेतलं म्हणून हे चॅप्टर लोक सुतासारखे सरळ झाले. नाहीतर १८०० च्या डिस्प्लेचे माझ्याकडून ४००० काढून मधले खिशात घातले असते. सरळच आहे ना. ऑर्डर २४ ऑगस्टला दिली म्हणतात मग दर २० सप्टेंबरचा हा कोणता न्याय झाला? पण चेपलं तर चेपलं अशीच वृत्ती दिसते बरेचदा.
11 Dec 2014 - 6:42 pm | सुबोध खरे
@कंफ्युज्ड अकौंटंट
साहेब पगार खाते म्हणजे विशेषज्ञ नव्हे तर आपला फ्यामिली डॉक्टर. आपल्या फ्यामिली डॉक्टर ने आपल्याला सांगितले कि मी तुम्हाला इंजेक्शन फ्देणार नाही तर आपल्याला कसे वाटेल?
रोज १००० रुपये भरायला आलेली व्यक्ती जर १ लाख रुपये भरायला आली तर आपण त्याचा PAN मागू शकता. पण त्याला खात्यात पैसे भरत येणार नाहीत हे कोणत्या नियमाधारे आपण सांगत आहात तो नियम पाहायला मला नक्की आवडेल.
KYC च्या आधारे बँक काय प्रोफाइल करते आणि तो कोणत्या नियमात बसतो हे हि मला पाहायला आवडेल?
@ पैसा ताई
बर्याचशा बँकामध्ये आता खोट्या नोटा शोधणारी आणि नोटा मोजणारी यंत्रे बसविली आहेत त्यामुळे त्याला फार वेळ लागतो हे आता तरी मान्य करणे कठीण आहे.
"जनहितार्थ जारी"
रिझर्व बँकेच्या परिपत्र प्रमाणे http://rbidocs.rbi.org.in/rdocs/Notification/PDFs/87010713DCFL.pdf पारा २ i प्रमाणे सामान्य नागरिकाच्या नोटा मध्ये जर एखादी फेक नोट सापडली तर ती जमा करून घेणे हे बँकेचे कर्तव्य आहे.
11 Dec 2014 - 7:18 pm | असंका
प्रतिसाद प्रश्नांच्याच क्रमाने-
१. पगार खाते म्हणजे फॅमिली डॉ. ही कल्पना चूक आहे. पगार खाते ही संकल्पनाच खाजगी बँका घेऊन आल्या आहेत. ते एक स्पेसिफिक गरजांसाठीचे स्पेसिफिक प्रॉडक्ट आहे. सगळ्या गरजांसाठी बेसिक सेव्हिंग अकाउंट हे फॅमिली डॉ. चे काम करू शकेल.
२. रोख पैसे भरता येणार नाहीत असे मी कुठे म्हणालो आहे ते दाखवा मग पुढे बोलू.
३. KYC खाली बँक काय प्रोफाइल करते ते या लिंक वर बघा. नियमात बसत असावे, कारण नियम बनवणार्या संस्थेचीच लिंक आहे ही-
http://rbi.org.in/scripts/BS_ViewMasCirculardetails.aspx?id=7361
11 Dec 2014 - 9:55 pm | पैसा
नोटा मोजायची यंत्रे असतात पण ती अगदी अपुरी असतात. समजा एका शाखेत ६ टेलर्स/कॅशियर्स आहेत, तर यंत्रे दोनच असतात. अशा वेळी ग्राहकाने समजा थोड्याशाच ५००/१००० च्या नोटा आणल्या तर कॅशियर चेक करतो. सर्वसाधारणपणे डोळ्यांना आणि हाताला फेक नोट कळते. पण शंका आली तर खात्री करून घेण्यासाठी अनेकदा त्याला जागेवरून उठून दुसरीकडे जावे लागते. समजा ५००/१००० चे बंडल असेल तर लेबलवर कस्टमरचे नाव्/खाते नंबर लिहून फक्त १०० नोटा असल्याची खात्री करून ड्रॉवरमधे टाकले जाते आणि मग काउंटरची वेळ संपल्यावर नोटा चेक केल्या जातात. कस्टमर शाखेचा रेग्युलर कस्टमर असेल तर बाबा तुझ्या बंडलात फेक नोट होती एवढ्या फोनवर कटकट न करता पैसे आणून देतो आणि फेक नोट परत नेतो. मात्र हेच बंडल दुसर्या शाखेच्या कस्टमरने किंवा तिसर्याच माणसाने आणले असेल तर त्या माणसाला संध्याकाळी फोन करून बोलावणे शक्य नसते. म्हणजे तो समोर असतानाच नोटा चेक कराव्या लागतात. एका नोटेला वीस-पंचवीस सेकंद लागतात असं समजलं तरी १०० नोटा मशीनमधे चेक करायला निदान ३५-४० मिनिटे लागतील. एवढा वेळ रांगेत असलेले इतर लोक गप्प बसणे शक्य नाही.
फेक नोट बँकेत जमा करून घेतली पाहिजे हे खरे असले तरी ती कोणत्या ग्राहकाकडून आली आहे हे समजलेच पाहिजे. प्रत्यक्षात काय होते की, ते न कळल्यास ती नोट इतर सर्व नोटांमधे मिक्स होऊन मोठ्या प्रमाणात कॅश जमा झाल्यावर स्टेट बँक किंवा रिझर्व्ह बँकेत जाते तेव्हा तिथे पकडली जातेच. आणि मग ते फक्त बँकेचे नाव तारीख पाहून त्या बँकेला कळवतात. मग एकतर ते पैसे बँकेच्या स्टाफला स्वतः भरावे लागतात किंवा मग स्टेट बँक्/रिझर्व्ह बँकेच्या जादा हुशार लोकांनी पोलीस कंप्लेंट दिल्यास पोलीस चौकीवर जाऊन उत्तरे द्यावी लागतात. अशा वेळी पोलीस बँकेचे स्टाफच फेक नोटा सर्क्युलेट करत आहेत अशा प्रकारे चौकशी करतात!
11 Dec 2014 - 8:07 pm | सुबोध खरे
बर्याच तरुणांसाठी पहिले खाते हे पगाराचे असते आणि त्याला घर किंव इतर कोणत्याही कारणासाठी मोठा चेक द्यायचा असेल तर आपल्या खात्यात पैसे भरणे आवश्यक आहे. नेमके अशा वेळेस बँकेने खोडा घातला तर काय. मी स्वतः लष्करात असताना विशाखापटणम ला असताना मला अशी गरज पडली होती. तेंव्हा माझे हॉंगकॉंग बँकेत खाते होते. हे खाते माझ्या सौच्या आणि वडिलांच्या नावावर होते तेंव्हा मी तेथे रोख पैसे भरले आणि दुसर्या दिवशी माझ्या वडिलांनी त्या पैशाचा धनादेश मुंबईत दिला. तेंव्हा पगाराच्या खात्यात रोख पैसे भरू न देणे हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा अत्यंत चुकीचा पवित्रा आहे. मि या परिस्थितीत त्या बँकेविरुद्ध अगदी वरपर्यंत तक्रार केली असती. आणि आपले पगाराचे खाते सरळ दुसर्या बँकेत हलविले असते.
रोख पैसे भरता येणार नाहीत असा कोणता नियम आहे हे आपण सांगितलेले नाही.
आणि बँकेचे प्रोफाईल मध्ये पगाराचे खाते असलेला माणूस LOW RISK गटात मोडतो. असे असताना त्याला पगाराच्या खात्यात पैसे भरू न देणे हा शुद्ध आडमुठेपणा आहे.
11 Dec 2014 - 9:01 pm | असंका
याला म्हणतात मिसक्वोटिंग! आपण जे वर डकवले आहे त्याच्या आधीचा रायडर की ही माहिती नक्की केलेली नाही हा आपण वाचलाच नाही का? वरचे सगळे हे कारण मिमांसा देण्यासाठी लिहिले होते की पगार खाते वेगळे असते आणि का वेगळे असते.
मुळात वर आपण डकवलेलं वाक्यच अशा अर्थी नाही की पगार खात्यात रोख रक्कम घेऊ शकत नाहीत. त्या वाक्यांचा अर्थ हा की एका मर्यादेपर्यंत रोख रक्कम घेऊ शकत असावेत. त्या मर्यादेवर जर रक्कम भरायची तर परिस्थिती काय असेल ते मला सांगता येत नाही.
त्याच्या नंतरच्या प्रतिसादात मी नक्की केलेली माहिती दिली होती की सेवा शुल्क भरून आपण रोख रक्कम भरू शकता.
आणि तरीही आपण माझा आधीचा प्रतिसाद- तोही अर्धवट- डकवून मला पुन्हा खिजवायचा प्रयत्न करत आहात की मी अजुनही नियम दाखवलेला नाही म्हणून?
त्याच्या लगेच आधी मी या प्रश्नात कसा मार्ग काढता येइल तेही सांगितले होते.सर्विस चार्जेस चे सर्क्युलर मागवा किंवा वेबसाईट वर मिळते ते बघा. मगाशीच मी एका बॅकेच्या साइटवर बघितले की रोख रक्कम भरायचे चार्जेस किती. आता साइटवर चार्जेस सकट लिहिलेली सेवा बॅक नाकारेल का ?
11 Dec 2014 - 8:22 pm | प्यारे१
मी होम ब्रँचला पैसे भरुन त्याचं बिल्डरला डाऊनपेमेंट करुन नंतर माझं होम लोन अप्रूव्ह होऊन रहायला जाऊन तीन वर्षं झाली.
जौ द्या. आता नाही घेत पैसे तर नाही घेत ना! ;)
11 Dec 2014 - 11:19 pm | सुबोध खरे
दहा हजार रुपये पगार असणार्या पगाराच्या खात्याला लावणारे शुल्क ( चार्जेस ) खालील दुव्यात पाहावेत .
स्वतःच्या खात्यात ५०,०००/- रुपये दर दिवशी दुसर्या शाखेत भरता येतात. मुळ शाखेत कितीही पैसे महिन्यात १५ वेळा भरा काहीही शुल्क नाही.
हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घ्यावे. दहा हजार रुपये महिना हा जास्त पगार नाही.सरकारी चपराशाला सुद्धा मिळतात.
http://www.idbi.com/pdf/soc/Star-SalaryAccount.pdf
असो मला जास्त वाद घालायचा नाही. मी काही वाणिज्य क्षेत्रातील माणूस नाही परंतु बँकेतील कर्मचारी मनमानी फार करतात. जर आवाज लावून धरलात तर आपले काम होते.
12 Dec 2014 - 6:28 pm | असंका
साईट वरून माहिती घेण्याच्या माझ्या सल्ल्याचा आपल्याला उपयोग झाला असे दिसते आहे.
मात्र वर 'सरकारी चपराशाला सुद्धा मिळतात' याचा संदर्भ नाही कळला.
वादाचा मुद्दा नाहीच्चे. कुणीतरी एक दोन प्रश्न विचारले होते, त्याला मी माझ्या माहितीप्रमाणे उत्तरे दिली होती. आपल्याला कसलातरी राग आला आणि आपण मला मी जे जे लिहिले त्याचा विपर्यास करून उलट आव्हाने वगैरे दिलीत. (कर्मचारी पगार कशाचा घेतात, बँकांचा उपयोग काय, वगैरे सारखी आपली वाक्ये ही भावनिक आणि मी जे लिहिले त्याचा विपर्यास करूनच करता आली आहेत. ते आपले स्वतःचे वस्तुस्थितीनिदर्शक मत आहे हे मला पटत नसल्याने ते सर्व आपण रागात ते लिहिले असे समजत आहे. गैरसमज होत असल्यास दूर करा...) आपण माझ्यावर मी पक्षपाती अस्ल्याचाही आरोप केला. मी त्या त्या सुरात त्यांना उत्तरे दिली. आता उठून आपण एकदम म्हणत आहात की आपल्याला जास्त वाद घालायचा नाही? वाद कोण घालत होतं?
हे सरसकटीकरण झाले. वाणिज्य क्षेत्रातील असण्याचा काहिच संबंध नाही. बँकेत सगळ्या विद्या-शाखांचे कर्मचारी आणि ग्राहकही असतात.
आपलं अडलेलं काम करून घ्यायला आवाजाइतकीच योग्य माहितीही आवश्यक असते. अरे ला कारे म्हणल्याने आपल्याला लक्ष वेधून घेता येइल. काम कसं होइल? नुसता आवाज लाऊन कामं होत असती तर बँकांमध्ये नॉइज कॅन्सलिंग वगैरे सिस्टीम बसवल्याशिवाय कुणालाच काम करता येणार नाही. कसंही करून आपलं काम व्हायलाच हवं आणि सगळ्यात आधी व्हायला हवं, मग ते अगदी चुकीचं का असेना असं असणारेही बरेच असतात. ते तर पहिले आवाज लावतात आणि आवाज करतच बाहेर जातात. काम काही होत नाही. मात्र ते बाहेर गेल्यावर त्यांचा असा उद्धार होतो- (इतर ग्राहकांमध्ये हां! कर्मचार्यांमध्ये नाही, तेवढाही वेळ नसतो त्यांच्याकडे) -कारण यांचं गायन चाललेलं अस्तं तोवर बाकीचे ग्राहक ताटकळत असतात...
12 Dec 2014 - 8:38 pm | सुबोध खरे
साईट वरून माहिती घेण्याच्या माझ्या सल्ल्याचा आपल्याला उपयोग झाला असे दिसते आहे.
साईटवरून माहिती देण्याचा दुवा आपण सांगण्याचं अगोदर मी दिला होता( जनहितार्थ) आपण जरा तपासून पाहावे इतकीच विनंती.
मी आपल्या इतका वाणिज्य क्षेत्रात पुढारलेला नाही किंवा लोकांना सल्ला देण्या इतका ज्ञानी हि नाही.
बाकी कुणाच्याही सल्ल्याचा फायदा कुणालाही झाला तरी ते चांगलेच. ( कुणाच्या का कोम्बडयाने , उजाडल्याशी कारण)
राग आपल्याबद्दलचा नाही तर बँकेतील कर्मचार्याच्या( सरकारी सुद्धा) "मला काय त्याचे" या वृत्तीचा होता /आजही आहे.
सरकारी कार्यालयाशी सामान्य माणसाचा रोज संबंध येत नाही पण बँकेशी येतो.
उदा. १९८९ साली मी लखनौला कोर्स साठी गेलो असता मी ५००० रुपयाचा डिमांड ड्राफ्ट घेऊन गेलो होतो तेथील SBI शाखेचा. त्यावर तेथील म्यानेजरने मला हे पैसे आपल्याला एक महिन्याने मिळतील असे सांगितले. मी लष्करी अधिकारी आहे आणि एक महिन्यासाठी आलो आहे आणि मी पैसे मुंबईत भरलेले आहेत. मग आपण मला एक महिन्याने पैसे देत त्याचा अर्थ काय? तो म्हणाला आम्हाला त्यांची तर आली नाही. आता यात माझा काय दोष? हा म्यानेजर ढीम हलायला तयार नव्हता आणि मी सांगितले कि तुम्ही मुंबईला फोन करून खात्री करून घ्या. पाहिजे तर त्याचे पैसे मी देतो( बँकेत हि सोय असूनही) शेवटी मला आवाज चढवावा लागला आणि खात्यामार्फत तुमच्या विरुद्ध वैयक्तिक तक्रार करावी लागेल असे सांगितल्यावर त्याने उपकार म्हणून दोन दिवसांनी( कदाचित फोन केला असावा) पैसे दिले.
अर्थात जेंव्हा मी आवाज चढवतो तेंव्हा त्याबद्दल नियमांची पूर्ण माहिती असल्याशिवाय नाही त्यामुळे आवाज चढवून माझी कामे होत आली आहेत. आणि बँकेच्या कर्मचार्यांच्या चुकीमुळे लावलेले शुल्क मी कधीही भरलेले नाही. standing instruction असताना माझी ECS बाउन्स झाली आणि त्याचे ३५० रुपये शुल्क मला लावले. हे पैसे मी बँकेला भरायला लावले. परंतु कर्जाचा एक हप्ता वेळेत न भरल्याबद्दल माझ्या निष्कलंक आर्थिक चारित्र्याला डाग लागला. असे अनेक वाईट अनुभव आल्यापासून मी सरकारी बँकेशी व्यवहार करणे सोडून दिले आहे. शेवटचा भविष्य निर्वाह निधीचे खाते पण आता राष्ट्रीयीकृत बँकेतून काढून घेतले आहे.
लष्करात असताना बँकेने चुकीच्या बँकेला धनादेश सदर केल्यामुळे चेक बाउन्सचा बट्टा मला लागला. ( लष्करात हा दखलपात्र गुन्हा आहे). या सर्व प्रकरणाची दाद लावण्यासाठी मला आवाजही चढवायला लागला आणि लिखित तक्रार दिल्यावर त्या बँक म्यानेजरने माझी सर्वांसमोर गयावया करणे सुरु केले. अर्थात मी प्रकरण लिखित स्वरुपातच तडास लावायचे असल्याने त्याला तसे सोडले नाहीच. तेंव्हा कर्मचारी माझ्या मागे काय बोलतात याचे मला घेणे देणे नसते आणि नाही.
असे असूनही पगाराच्या खात्यात पैसे भरू न देणे हे मला आजही अन्यायकारकच वाटते.
15 Dec 2014 - 11:21 am | असंका
सर्व्हीस चार्जेस चे सर्क्युलर मागवून त्यावरून सर्व्हीस मिळेल की नाही हे ठरवणे हे असलेल्या माहितीचे अॅप्लीकेशन झाले. नुसतेच साइट बघा असे मी म्हणालो नाही. साइटवर काय बघा आणि त्याचा कसा अर्थ लावा हेही मी सांगितले. ही माहिती मला दुसर्याकडून मिळाली होती, त्यामुळे तिचे महत्त्व मी जाणतो. तशी माहिती आपण अगोदरच दिली होती असे आपले म्हणणे आहे, मी तपासले, पण मला ते सापडले नाही. जरा लिंक देता का त्या प्रतिसादाची?
(बाकी कोंबडा, उजाडणे वगैरेबद्द्ल संपूर्ण सहमत. पण तसे असतानाही आपल्याला ही माहिती आपणच अगोदर दिली होती असे सांगावेसे वाटलेच ना?)
ते उघड आहे हो. आपण सातत्याने मी जे बोलतो त्याचा विपर्यास का करत आहात? जे ग्राहकाच्या मागे बोलले जाते ते कर्मचारी बोलत नसून इतर ग्राहक बोलतात असे मी म्हणालो होतो- तपासा-
मात्र ते बाहेर गेल्यावर त्यांचा असा उद्धार होतो- (इतर ग्राहकांमध्ये हां! कर्मचार्यांमध्ये नाही, तेवढाही वेळ नसतो त्यांच्याकडे)
आता आपली बाजू न्याय्य आणि योग्य असेल तर इतर कुणीही - कर्मचारी काय, ग्राहक काय किंवा बघे काय- जे बोलते त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय रहात नाही हे खरेच आहे, पण आपण तसे न म्हणता कर्मचार्यांच्या म्हणण्याशी देणे घेणे नाही असे म्हणत आहात. हे माझ्या प्रतिसादाखाली आल्याने गैरसमज होऊ शकतो की मीच तसे म्हणालो आहे की काय, म्हणून खुलासा.
खाजगी क्षेत्रातील बॅंकांमध्ये वाइट अनुभव आल्यामुळे परत सरकारी बॅंकांकडे वळलेलीही उदाहरणे आहेत. (-उदाहरण हवेच असेल तर पहिला मी!) विषय चालू आहे पगार खात्यांचा. आपल्या मते पगार खात्यावर पैसे न भरू देणे हे अन्यायकारक आहे. मग पगार खाते स्कीम काय सरकारी बॅंकांनी आणली आहे काय? कित्येक सरकारी बॅंकांत ही स्कीम आजही उपलब्ध नाहिये. वड्याचं तेल वांग्यावर काढणे चाललंय ....
15 Dec 2014 - 9:48 am | पिलीयन रायडर
महिन्याभरापुर्वी "पिझ्झा हट" मधुन "ब्रिझ्झा" मागवले होते. ८.४५ ला रात्री ऑर्डर दिली. वेळ लक्षात रहायचं कारण म्हणजे ऑर्डर घेणार्यानी अगदी आवर्जुन ती सांगितली. मला ८.५४ ला मेसेजही आला की तुमची ऑर्डर निघाली आहे. ९.१५ ला फोन आला की "तुमचं घर कुठंय?" ...मी विचारलं की तुम्ही कुठे आहात, त्या हिशोबानी सांगते.. म्हणे मी अजुन निघालोच नाहीये.
मला कळेना की जर ३० मिनिटात पोहचणं आवशयक आहे तर हा अजुन निघाला कसा नाही. मी हे त्याला विचारल्यावर म्हणे "तुमचं घर फार लांब आहे.. ग्रिड मध्ये नाहीये.. शिवाय ३० मिनिट वाली ऑफर पिझ्झावर असते.. ब्रिझ्झा वर नाही.."
म्हणलं ओके बेटा.. तू ये आधी ऑर्डर घेउन... मग बघते तुझ्याकडे...
९.४५ झाले तरी कुणी आलं नाही.. मी परत मेन लाईनला फोन करुन झापलं.. आणि हे ही विचारलं की ३० मिनिटाची ऑफर तर कोणत्याहि ऑर्डरवर आहे ना.. तर म्हणे हो..
मग म्हणलं तुमची माणसं खोटं कशी बोलतात? आता तर मला फ्री च पाहिजे..
त्यानी साम्ङितलं की ऑर्डर घेउन आलेल्या माणसाला स्टोअर मॅनेजरला फोन करायला सांगा. तुम्ही पैसे देऊ नका..
१०.१५ पर्यंत काहीच नाही...!! स्टोअरचा फोन कुणी उचलेना म्हणुन परत मेन लाइणवर फोन केला.. परत तीच राम कहाणी.. तेवढ्यात पिझ्झा हटचा माणुस दारात...
मी आधी डिलिव्हरी घेतली आणि मग म्हणल की पैसे देणार नाहीये. तू १ तास लेट आहेस. तर म्हणे की तुमचं घर किती लांब आहे (मेन रोडवर आहे..) आमच्या ग्रिड मध्ये नाहीच..
म्हणलं मग तुम्ही माझी ऑर्डर घेतलीच कशाला?
मग म्हणे ३० मिनिटाची ऑफर वीकेंडला नसतेच...
आता माझा फक्त स्फोट व्हायचा बाकी होता... आवाज बुलंद झाला होतच.. (तो नेहमीच असतो..)
"तू जेवढं खोटं बोलशील तेवढा अडकशील.. तुझ्या मेन लाइणवर फोन करुन मी सगळे नियम आत्तच विचारलेत. तू तुझ्या मॅनेजरला फोन लाव"
तो ही उखडलला.. हो लावतोच ना.. बघुच म्हणुन तिरमिरिने फोन लावला...
मॅनेजरने पण "दे बरं..कसं काय देत नाही पैसे पाहु.." म्हणून मला फोन द्यायला सांगितला..
"८.५४ ल ऑर्डर निघालीये.. माझ्याकडे मेसेज आहे.. आत्ता १०.१५ झालेत.. मी पैसे देणार नाही.." असं चाम्ङलंच ठणकवुन सांगितलं..
गपगुमान "फोन जरा बॉयला द्या" म्हणला.. त्याला म्हणे सही घेऊन ये.. पैसे वगैरे नको मागुस आता.. तोही गपचुप निघुन गेला...
मी खरं तर पैसे देणार होते.. त्या दिवशी जरा पाउस होता, त्यामुळे उशीर झाला असता तरी मी समजुन घेतलं असतं. पण खोटं बोलणे आनी माझ्या वरच अरेरावी करणे ह्या प्रकारानी त्या माणसाचं नुकसान झालं. त्यानी अगदी १०.१५ लाही खरं कारण सांगुन साधं सॉरी म्हणलं असतं तरी मी पैसे दिले असते.
15 Dec 2014 - 10:23 am | काळा पहाड
म्हणून मराठी लोकांना नोकरी द्यायची नसते.
15 Dec 2014 - 10:31 am | पिलीयन रायडर
काका.. तो हिंदी होता.. मी सगळं मराठीत लिहीलय फक्त..
15 Dec 2014 - 1:59 pm | अद्द्या
दोन दिवसापुर्वीची गोष्ट. मी बेळगाव मध्ये राहतो . आयडिया च्या सीम वर उगाचच कैच्याकाय सर्विस चालू झाली . . कस्टमर केअर ला लावला फोन . . आणि सवयीप्रमाणे मराठीत बोललो . . समोरचा मुलगा म्हणाला "सर मराठी बरल्ला . कन्नड माताडी " (सर मराठी येत नाही . कन्नड बोला ) . म्हटलं ओके . बेंगलोर सेंटर ला लागली असण्याची शक्यता धरून मी इंग्रजी सुरु केल, . तरी तेच उत्तर . . मग मी हिंदी सुरु केलं . तरीही तेच . . शेवटी मोडक्या तोडक्या कन्नड मध्ये त्याला म्हणालो . . बाबा रे . क़न्नद समजतं . पण बोलता येत नाही . ंइ हिंदी /इंग्रजीत बोलेन . तू बोल कन्नड मधे। मला समजतं . तेवढी ती कॉलरट्यून बंद कर .
यावर तो म्हणतो . . सर सपोर्ट पाहिजे असेल तर कन्नड मध्ये बोला . आणि फोन ठेऊन दिला .
डोकं फिरलं . परत कॉल लावला . प्रत्येक कॉल च्या सुरुवातीला हे लोक आपलं नाव सांगतात . त्यामुळे मी म्हणालो . . अबक व्यक्तीला कॉल फॉरवर्ड करा . तसा तो झाला . . त्याला म्हटलं . कॉल का कट केला ??
म्हणाला सर कन्नड नाही बोला इसलिये . .
तुमचा सिनियर असेल त्याला फॉरवर्ड कॉल कर ।
बरेच आढेवेढे घेतल्यावर त्याने तसं केलं .
त्याला सगळी कहाणी सांगितली . . तो म्हणतो . सर आमच्या कडे सगळीकडून लोक येतात कामाला . एका प्रतिक भाषेसाठी आग्रह नाही धरू शकत तुम्ही . .
मी : हेच तुम्ही केलं तर चालतं का? आणि मी सुरुवातीलाच त्याला सांगितलं . कन्नड बोलू शकत नाही . .तरि नशीब मला समजत तरी होतं . समजा बाहेरच्या राज्यातला माणूस असेल तरी त्याला तुम्ही हे उत्तर दिलं, तर तो ऐकेल का? आणि तुमचे हे लोक साधे पाचवी पण शिकलेले नाहीत का? हिंदी , इंग्रजी का येत नाही ? एक राष्ट्रीय भाषा आहे दुसरी आंतरराष्ट्रीय . . दुसरी गोष्ट . स्वतःला तुम्ही "कस्टमर सपोर्ट " म्हणवता . मग कस्टमर ला नाराज करायचं बघाल फालतू गोष्टीवरून कि त्याला जमेल तसं सपोर्ट द्याल . ?
तो: सॉरी सर . वि विल कीप धिस इन माइंड नेक्स्ट टाईम .
15 Dec 2014 - 2:49 pm | कपिलमुनी
कॉल फॉरवर्ड केला असेल तो सिनियरनेच घेतला असेल असे मुळीच नाही. बहुतेक वेळेस सहकार्यालाच देउन ग्राहकाला शांत करतात . आप्ल्याला पण समाधान मॅनेजरची बोलल्याचे !
15 Dec 2014 - 3:14 pm | असंका
हे इतकं सहज शक्य आहे? ते तर म्हणतात की कॉल रेकॉर्ड होणं शक्य असतं वगैरे?
15 Dec 2014 - 3:00 pm | अद्द्या
असू शकेल . .
पण तुम्ही म्हणताय तसं . "तेवढंच आपलं समाधान "
15 Dec 2014 - 6:58 pm | मोदक
फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा कोणाला काही अनुभव आहे का..?
हाफिसातल्या मित्राने "आर्मर जॅकेट" मागवले असता त्याला "लॅपटॉप टेबल" दिले गेले आहे. (स्नॅपडील)
15 Dec 2014 - 7:23 pm | पैसा
मित्राला स्नॅपडीलच्या फेसबुक पेजवर टाकायला सांग.
http://www.americanbazaaronline.com/2014/11/04/order-samsung-smartphone-...
हा किस्सा लै फ्येमस झालाय.
मला फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांचा अतिशय उत्तम अनुभव आहे. ईबेवर पूर्वी खरेदी करत असे, तेव्हाही कधी वाईट अनुभव आलेले नाहीत. हल्ली ईबेवर क्वचितच खरेदी करते. कारण फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलकडून चांगल्या क्वालिटीच्या आणि खर्या कंपनीच्या वस्तू योग्य किंमतीत मिळतात.
स्नॅपडीलकडून एकदाच चुकीच्या मापाचा ड्रेस आला होता. पण त्याना कळवताच त्यानी चुकीचा ड्रेस कुरियरने परत मागवून रिप्लेसमेंट दिली. कुरियर चार्जेस रिफंड केले आणि बरोबर मापाच्या ड्रेसला नंतर वाढलेले पैसे डिस्काउंट म्हणून कमी केले.
15 Dec 2014 - 11:18 pm | टवाळ कार्टा
मी नोकिआ आशा २१० मागवलेला फ्लिपकार्टवरुन...७ दिवसांत मिळेल असे स्टेटस दिसूनसुध्धा २० दिवसांनी आला
जो फोन मिळाला त्याच्या सिम-२ वाल्या साईडच्या खाचेचे झाकण लागायचे नाही...मग त्यांना बदलून द्यायला सांगितले
त्यांच्याकडे दुसरा फोन नव्हता म्हणून पैसे परत दिले
16 Dec 2014 - 11:06 am | अद्द्या
अतिशय चांगला अनुभव आहे दोन्हीचाही .
आजपर्यंत तरी काहीही प्रोब्लेम आलेला नाही . .
16 Dec 2014 - 3:41 pm | कपिलमुनी
"आर्मर जॅकेट" असे असेल तर अत्यंत रद्दड क्वालिटीचे असते असा स्नॅपडीलचा अनुभव आहे . शक्यतो पैसे परत मिळाले तर उत्तम
16 Dec 2014 - 4:37 pm | मोदक
रद्दड क्वालिटीचे म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम होता..?
18 Dec 2014 - 6:47 am | लॉरी टांगटूंगकर
मित्राला फ्लिपकार्टचा एक गंडका अनुभव आहे.
डेलचा चार्जर मागवलेला. कार्ट्यांनी शामसिंगचा चार्जर पाठवला. त्यावर डेलचं स्टीकर होतं. ल्याप्टॉपला पीन बसेना म्हणल्यावर मग साधी स्टीकर उचकटून पाहीली तर खाली वेगळाच ब्रँन्ड.(दिल्लीच्या चोर बाजाराच पत्ता होता बॉक्सवर) फोन केल्यावर कस्टमर केअरची बै अक्कल काढायला लागली. फोटो वगैरे काढून पाठवल्यानंतर म्हणले रिफंड देणार नाही, रिप्लेसमेंट देतो. पैशासाठीच अडून बसल्यानंतर त्यांनी वॉलेट मध्ये पैसे टाकले. ते प्रॉडक्ट नंतर साईट वरून काढून टाकलं.
अॅमेझॉनचा माझा एक हेडफोन सव्वामहीन्यात गंडला. जेबीएलवाले म्हणाले की ऑनलाईनला आम्ही वॉरंटी देत नाही. अॅमेझॉननं परत घेतला, संपूर्ण किमतीचा चेक दिला.
ई रिटेलर्स कडचे वॉरंटीचे नियम नेमके काय आहेत? काही कंपन्यांनी ऑनलाईन खरेदीला वॉरंटी देणार नाही असं डीक्लीअर केलेलं आहे. तरीही त्यांचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. नेमकं काय आहे हे? त्या वेळेला अॅमेझॉननं काम केलं म्हणल्यावर मी खोदकाम करत बसलो नाही. कोणाला माहीत असेल तर सांगणेचे करावे.
Here’s what Lenovo, Dell, HP, Toshiba, Asus, Nikon have said about e-commerce offers & warranties in India
Lenovo: Flipkart, Snapdeal and Amazon not our authorized resellers
Snapdeal, Flipkart not our authorised resellers: Lenovo
18 Dec 2014 - 5:01 am | hitesh
Dear Sir ,
My name is *** . I am from Mumbai. I had taken two cards ***and ***I am using them and paying the bills also since last few months.
But since last one month I am getting calls from you that I have one more connection *** They are asking me the pending bill which was initially 701 and now gone to 901.
This card is not mine. Your agent ***hadgiven me only two cards. This third card is not mine.
Kindly stop this number *** and please ddon't harass me.
Your agent who gave me two card is *** His number is . ***
Thanking you.
***
महिनाभर सारख फोन येत होते.. कार्ड तुमचेच आह . बिल भरा.. मी शेवटी कंटाळुन फेसबुकवर टाकले..
फेसबूकावर मेसेज केल्यावर चमत्कार् झाला. दोन तासाट एज्म्तचा फोण आला. म्हणाला .. माझा जॉब जाइल. त्याने स्वता पैसे भरून सिम ब्म्द केले
18 Dec 2014 - 9:48 am | hitesh
हे तिसरे कार्ड नाना किंवा माइंनी वापरले असेल का ?
:)
18 Dec 2014 - 10:18 am | सतिश गावडे
मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानात वडापाव खायला गेलो. तिथे नेहमीप्रमाणे वडापाव घेण्यासाठी रांग होती. वडापाव बरोबर त्यांनी मला चिंचेची चटणी दिली.
माझं टाळकंच सणकलं. म्हटलं तुम्ही ही अशी वडापाव बरोबर चिंचेची चटणी देता आणि मग मुंबईकरांना (डोंबोलीकरांना टु बी स्पेचिफिक) पुणेकरांना बदनाम करण्याची संधी मिळते. ते वडापाववाले ही पुणेकरच असल्यामुळे आणि मी उपरा पुणेकर असल्यामुळे आमच्यात खडाजंगी झाली. शेवटी मी जिंकणार नाही असे लक्षात येताच (खरे तर आपण अजून पुण्यात तसे नविन आहोत याची जाणिव होताच) मी त्या वडापाववाल्यांना ग्राहक मंचाकडे जायची (पोकळ) धमकी दिली आणि घेतलेला वडापाव खाऊन तिथून सटकलो.
18 Dec 2014 - 10:34 am | टवाळ कार्टा
क्यारे....कुच कामधंदा नै तेरेकू...
वडापाव के सात चिंच का चटणी दिया तो लगेच (इथे "च" "चु..." मधला :) ) भांडण करनेका?
18 Dec 2014 - 10:58 am | खटपट्या
घेतलेला वडापाव तीथेच टाकून सटकला असतात तर जास्त परीणामकारक झाले असते.
18 Dec 2014 - 11:26 am | अनुप ढेरे
उगाच तणतण, छान लागते की चिंचेची चटणी वडापावबरोबर...
18 Dec 2014 - 11:31 am | टवाळ कार्टा
एकदा हिरवी चटणी + सुक्की लसूण चटणी घातलेला वडापाव मीठ लावून फ्राय केलेल्या हिरव्या मिरचीबरोबर खाऊन बघा
25 Dec 2014 - 2:45 am | मुक्त विहारि
जबरदस्त..
18 Dec 2014 - 6:46 pm | सस्नेह
येत्या 24 तारखेला राष्ट्रीय ग्राहक दीन आहे तस्मात ईथल्या सर्व हौशागौशानौशांनी आपली हौस भागवून घ्यावी.
18 Dec 2014 - 7:16 pm | मिहिर
इतर दिवशी केवळ राज्यस्तरीय पातळीवरचा ग्राहक दीन असतो आणि २४ तारखेला राष्ट्रीय ग्राहकही दीन असणार आहे, असे काही आहे का?
22 Dec 2014 - 4:41 pm | अद्द्या
काही वेळा पूर्वीच . . चक्क रिजर्व बँक चे गवर्नर रघुराम राजन यांच्या नावाने एक मेल आला . . मेल ला डोमेन सुद्धा बँक चा होता . .
मेल चा सारांश पुढील प्रमाणे . . " ब्रिटीश सरकार आणि रिजर्व बँक यांच्यात झालेल्या एका करार नुसार तुम्ही ५००००० ब्रिटीश पौंड जिंकला आहात . तरी आमच्या अबक खात्यावर १५००० रुपये जमा करा . आणि आपलं नाव गाव बँक चे नंबर इत्यादी सगळं पाठवून द्या . "
लगेच रिजर्व बँक च्या साईट वर कम्प्लेंट लॉक केली . आणि अपेक्षे प्रमाणेच हे सगळं खोटं असल्याचा रिप्लाय आला . .
25 Dec 2014 - 2:32 am | खटपट्या
मलापण एक फोन आला होता. सांगत होते की तुमचा क्रेडीट्कार्ड्चा व्याजदर खूप जास्त आहे. आमचे बँकेबरोबर टायअप आहे. डीटेल्स द्या, व्याजदर कमी करून देतो.
बॅंकेत फोन केला तेव्हा कळाले की बोगस फोन आहेत.
4 Jan 2016 - 11:14 am | मन१
मी फार फार मागे एल आय सी हाउसिंग फायनान्स मधून होम लोन घेतलय. ( त्यांच्याकडून होम लोप्न घेण्याची घोडचूक केली आहे. ) सुरुवातीचे तीन वर्ष व्याज ८.९ टक्के दराने फिक्स्ड होतं. त्यानंतर फ्लोटिंग होणार होतं. हे फ्लोतिंग म्हणजे वित्त संस्थेचा जो काही जहिर बेस रेट असेल, त्याच्याशी निगडित असते. अर्धा एक टक्का मागे पुढे.
तीन वर्षे संपल्यानंतर मला तब्बल साडे अकरा, बारा असे कै च्या कै दराने व्याज आकारले जात आहे. ( ह्याच दराने घ्यायचे असेल तर पर्सनल लोन सुद्धा काय वाईट आहे ? )
.
.
मी त्यांच्या हापिसात जाउन " व्याजाचा दर बेस रेटशी लिंक्ड करुन हवा आहे. त्याची काय प्रोसेस आहे ती सांगता का " असे म्हणत विचारणा केली. "आमच्याकडे असे काहीही होत नाही" असे म्हणत त्यांनी मला घालवले. अर्थात ही सर्व विचारणा तोंडीच केलेली आहे, लेखी नाही. शिवाय त्यांचे उत्तर चुकीचे वाटत असले तरी त्यांनी शांअतपणे व नम्रपणेच दिलेले आहे. पण
नवीन सर्व ग्राहक एल आय सी हाउसिंग फायनान्स कडून फ्लोटिंग दराने दहा सव्वा दहा टक्क्याच्या आसपास लोन मिळवू शकतात. अशा जाहिराती सर्वत्र आहेत. मग जुन्या ग्राहकास दहा सव्वा दहा फ्लोटिंग , किम्वा बेस रेटशी निगडित फ्लोटिंग नाकारला जाउ शकतो का ?
.
.
आय सी आय सी आय, व इतर कित्येक बँकाबाबत मला खात्री आहे. रिझर्व्ह ब्यांकेने रेपो रेट वगैरे कमी केल्यास, आणि आपण ब्याअंकेस सुधारित दर लावण्याची विनंती केल्यास काही शे किंवा हजार रुपयांची प्रोसेसिंग फीस घेउन नवा दर आकारला जातो.
.
अ, पण सुधारित दर लावा; अशी भूमिका घेणे रास्त आहे; हा माझा अंदाज.
.
.
.
मला सल्ला हवा आहे. माझा अंदाज योग्य आहे का.
.
.
गृह कर्ज दुसर्या ब्यांकेत हलवणे मला सध्या शक्य नाही. कागद पत्रांची पूर्तता वगैरे करणे जिकिरीएचे वाटते. सग्ध्या बर्राच व्यग्र आहे.
त्यामुळे तूर्तास तरी ह्यांनीच जरा शहाण्यासारखा दर लावावा ही अपेक्षा आहे.
.
.
14 Jan 2016 - 4:52 pm | मोदक
मनोबा.. तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे तो म्हणजे काही प्रोसेसींग फी भरून व्याजदर बदलता / दुसर्या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करता येतो का ते पाहणे.
(दुसरा ऑप्शन म्हणजे लोन शिफ्ट करणे असा आहे.. पण तो तुला नको आहे!)
14 Jan 2016 - 5:09 pm | पैसा
एकदा लोन सँक्शन झाले की काही मोठी कागदपत्रे लागत नाहीत. तुझी सॅलरी ज्या बॅंकेत जमा होते तिथे जाऊन आपले लोन टेक ओव्हर करा म्हणून सांग. तेच सगळे करतील.
14 Jan 2016 - 5:47 pm | आदूबाळ
असं लोन अॅग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे का? ते कोणत्या कॉव्हेनंट्सवर (अटींवर) अवलंबून आहे का?
14 Jan 2016 - 4:59 pm | मोदक
गेले ८ महिने एअरटेल सोबत वाद सुरू आहे.
त्यांचे इंटरनेट कनेक्शन घेताना सेल्सवाला येवून डेमो देवून गेला व त्या स्पीडचे नेटवर्क पुन्हा मिळाले नाही. एअरटेल वाल्यांकडे भरपूर तक्रारी केल्या व त्याचे उत्तर म्हणून वेगवेगळ्या टीमचे भरपूर लोक्स येवून "हो येथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे" असे सांगून गेले.
एअरटेलवाल्यांनी मला, "तुमच्या येथे टॉवर लावायला पाहिजे, त्याला वेळ लागेल", "टॉवर लावण्यास जागा शोधून द्या" येथेपर्यंत मेलामेली केली. (हा विनोद नाही माझ्याकडे या गोष्टींचे मेल आहेत..!!)
काल संध्याकाळी सगळे उचलून मा. मंत्री रवीशंकर प्रसाद आणि ट्रायला पाठवले.
आज दुपारी त्यांनी एअरटेलला "For resolving the grievance please" असे बोल्ड अक्षरात लिहून पाठवले व मला CC मध्ये ठेवले आहे.
बघू काय होते आहे ते...
14 Jan 2016 - 5:22 pm | प्रसाद१९७१
मस्त च.
इथे अपडेट द्या मधुन मधुन
14 Jan 2016 - 5:14 pm | होबासराव
आज दुपारी त्यांनी एअरटेलला "For resolving the grievance please" असे बोल्ड अक्षरात लिहून पाठवले व मला CC मध्ये ठेवले आहे.
क्या बात है !
14 Jan 2016 - 8:04 pm | राहुल०८
मला कुठलीही माहिती किवा नोटीस न देता ICICI ने account मधून पैसे काढून घेतले "Low Balance " च्या नावावर . नाही तेव्हा नवीन policy, scheme, advertisement यांचे शेकडो sms, email फुकटचे पाठवतात. पण customer ला साधी माहिती सुद्धा देत नाही कि तुमच्या account चा balance कमी होत आहे, या दिवसानंतर आम्ही पैसे कापून घेऊ. Deduction वाचवायचं असेल तर इतके पैसे या कालावधीत भरा.
आपलं जाम डोकं सरकलं…. एक खरमरीत email लिहिला…CEO ते सगळे Managing director, VP, AVP....जेवढे दिसले त्यांच्या email वर सगळ्यांना पाठवला…
Hello,
This is XXXX holding aaccount in ICICI bank from last 5 years. I did number of transactions with ICICI bank.
Recently Rs XXXX has been deducted from my account before prior intimation. Reason was below quarterly balance. I have been told by customer service that, this is as per your policy. I agree, you can craft your policies as per your wish and benefits . But you shall consider customer and his track record with your bank.
I have requested that the ICICI should inform customers beforehand if they see the balance below mark and shall advice them. If the customer can replenish the advised amount within certain time-frame, then he need not pay any charge.
ICICI sending number of promotional, advertisement etc emails but why can't ICICI implement a simple system to check customer quarterly balance and advice him accordingly? Is it very difficult for you to implement ? or you wish to suck customer money with your policies and loose faith.
If you are advertising as a customer oriented bank then you should implement system which really helps customer.
If you still want to continue like this, then I may not keep an account with ICICI bank.
--
Thanks and Regards
एका आठवड्यामध्ये कापलेले पैश्याचं खात्यामध्ये पुनरागमन झालं….
14 Jan 2016 - 8:48 pm | असंका
सुंदर !! अभिनंदन!!
14 Jan 2016 - 9:12 pm | मोदक
झकास.. अभिनंदन.!!
मी गेले काही महिने क्रेडीट कार्डच्या लिमीटपेक्षा जास्त खर्च केला; म्हणून मला ओव्हरलिमीट चार्जेस + सर्वीस टॅक्स वैग्रै वैग्रै असा ५७२/- रूपये दंड लावला.
चूक माझी होती; तरीही मी त्यांना मेल लिहिला की तुम्ही मला असे चार्जेस फोन करून कळवले नाहीत आणि कस्टमरला या कारणासाठी दंड लावणे योग्य नाही (This is not fair टाईप्स!!)
तिसर्या दिवशी त्यांचा "In appreciation of your relationship, we have arranged to reverse the mentioned charges levied on the card account" असा मेल आला. :)
17 May 2016 - 10:51 am | पिलीयन रायडर
मला एक प्रश्न पडलेला आहे. पण तो नक्की ग्राहक कॅटेगरीत येतो की नाही हे नक्की माहिती नाही. तरीही इथे विचारत आहे.
माझ्या मुलाला मागच्या वर्षी "ट्रिहाऊस कर्वेनगर" इथे प्रवेश घेऊन दिला. तेव्हा अॅडमिन फीस म्हणुन ३०हजार अधिकचे भरले होते. ह्या वर्षी रोल ओव्हर अॅडमिशन म्हणुन फिसचा पहिला हप्ता - १६ हजार रुपये भरले. शाळा नेहमी ३ टप्प्यांमध्ये फीस मागते. त्यानुसार पहिला जानेवारीचा हप्ता आम्ही दिला. पुढचा जुन आणि नोव्हेंबर मध्ये असतो.
एप्रिल मध्ये आमचे एक वर्षासाठी अमेरिकेला जायचे ठरल्याने मी मुलाच्या अॅडमिशनचे कसे हे विचारण्यास प्रिन्सिपलकडे गेले. तेव्हा संपुर्ण फिस भरावी लागेल असे कळाले. त्या बदल्यात मुलगा "ऑनलाईन स्टूडंट" म्हणुन रोल वर राहिल आणि दर महिन्याला आम्हाला मंथली प्लानर पाठवले जाईल असे सांगितले.
ह्यासंदर्भात अजुन चौकशी करण्यास आणि आवश्यक अर्ज देण्यास मी शाळेत अॅडमिनला परत भेटले. तेव्हा असे कळाले की
१. मुलगा शाळेत येणार नसुनही "अॅक्टिव्हिटी आणि स्पोर्ट्स फी" कमी करता येणार नाही.
२. मध्येच अॅडमिशन कॅन्सल केल्यास फक्त ट्युशन फिस परत दिली जाईल. ती सुद्धा जेवढे दिवस शाळेत होतात त्या हिशोबाने कापुन.
एकंदरीत विचार करता आणि शाळेत ज्या पद्धतीने मुलाला शिकवले जात आहे ते पहाता मला ह्या शाळेत मुलाला ठेवु नये असे वाटल्याने मी दुसर्याच दिवशी शाळेत अॅडमिशन कॅन्सल करायला गेले. तेव्हा तिथे परत प्रिन्सिपल भेटल्या. त्या भेटीत नव्या गोष्टी अशा कळाल्या की:-
१. फीस कोणतीही परत मिळणार नाही कारण एकही दिवस शाळेत आला असाल तर त्या टर्मची फीस द्यावी लागेल.
२. ह्या संबंधात शाळेचे धोरण लिखित स्वरुपात दाखवा अशी मागणी केल्यावर आउटलुक मधला एक मेल दाखवण्यात आला.
मी ह्यावर "पहिला हप्ता भरलेला आहे. दुसर्या हप्त्याआधीच कॅन्सलेशन असल्याने पुढची फीस भरण्याचा प्रश्नच येत नाही, तेव्हा काही रक्कम परत न देता केवळ कॅन्सल करा आणि बोनाफाईड द्या" अशी मागणी केली. त्याला होकार मिळाला.
पण ३ दिवसांनी फोन आला की "६०% रक्कम भरल्याशिवाय बोनाफाईड मिळणार नाही." मी परत जाउन प्रिन्सिपलला भेटले. तेव्हाही "हीच शाळेची पॉलीसी आहे" असे उत्तर मिळाले. तेव्हा माझे अनुत्तरित राहिलेले प्रश्नः-
१. अॅडमिशन फॉर्म काढुन पाहिला असता शाळेने माझी कुठेही अशा धोरणांवर सही घेतलेली नाही. शाळेकडे असे मुळात लिखित धोरणच नाही. खरं तर "फीस आणि अॅडमिशन पॉलीसि" असणे आवश्यक नाही का?
२. शाळेने कधीही टर्म प्रमाणे फीस मागितलेली नाही. नेहमी इन्स्टॉलमेंट मध्येच मागितली आहे. मग अशावेळी कॅन्सल करताना टर्म प्रमाणे फीस शाळा घेऊ शकते का? आणि ६० हा आकडा कसा काढला हे उत्तर देणे त्यांना बंधनकारक आहे का?
आज पुन्हा चौकशी केली असता, डायरेक्टर मॅडमनेही हेच सांगितले आहे असे उत्तर मिळाले.
वास्तविक बानोफाईड काही माझ्या मुलाला अत्यावश्यक नाही. मी परत आल्यावरही त्याला कुठेही प्रवेश मिळेलच. पण प्रश्न तत्वाचा आहे. अशी अडवणुक शाळा करु शकते का? मी ग्राहक म्हणुन इथे दाद मागु शकते का?
शाळा खाजगी असल्याने कितीही आणि कशीही फिस घेऊ शकतात. पण एक पालक म्हणुन माझी संमती घेणे आवश्यक नाही का? किमान एक ठरलेले धोरण असणे आवश्यक नाही का?
18 May 2016 - 10:42 pm | वगिश
शाळेला " xxx रूपये भरल्याशिवाय bonafi मिळणार नाही" असेलेखी मागावे.
25 May 2016 - 3:09 pm | पिलीयन रायडर
हे सर्व मुद्दे लिहुन मी शाळेच्या डायरेक्टरला मेल केला. साईट्वर जे जे मेल आयडी सापडले त्या सगळ्यांवर हा मेल पाठवला.
आज मला मुलाचे बोनाफाईड घेउन जा म्हणुन मेल आला आणि शाळेत गेल्यावर लगेच बोनाफाईड दिलेही गेले. :)
25 May 2016 - 3:13 pm | मोदक
व्वाह..!!! अभिनंदन.
25 May 2016 - 3:17 pm | पिलीयन रायडर
आपला आशिर्वाद आहे सर!
20 May 2016 - 10:10 am | नमकिन
दुकान दारी करायची म्हटले की हे असे होते, कुठूनही पराया माल अपना.
पुढचे पैसे टप्पा टप्पा घेत होते तेच निवडलेत ते ठीक अन्यथा एकरकमी ची सवलत मिळवताना पुढचे गमावुन बसला असतात.
आमच्या सौ मुळे आम्हालाही या "झाडाची" सावली लाभली हिरवे चलन खर्च करुन.
25 May 2016 - 3:58 pm | विटेकर
फेस्बुकवर करायची म्हणजे कुठे करायचे?
25 May 2016 - 4:08 pm | मोदक
प्रिपेड आहे की पोस्टपेड आहे की इंटरनेट आहे?
26 May 2016 - 2:22 pm | विटेकर
पोस्त्पेड नेट सेटर - डोन्गल
12 Apr 2017 - 11:25 am | आशु जोग
सावकाश वाचून कमेंट देइन
12 Jun 2017 - 12:45 pm | सस्नेह
दोनेक महिन्यापूर्वी एक कॉल आला. कुणी अश्विनी नामक पुण्यातील sbi एजंटने मला sbi क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे का विचारले. मी कार्डच्या चार्जेस आणि बेनिफिटस बद्दल माहिती विचारली. त्यवर तिने sbi सिम्प्ली सेव्हर नावाच्या कार्डाची माहिती दिली, ती अशी.
sbi सिम्प्ली सेव्हर कार्ड हे पहिल्या वर्षी फ्री असून दुसऱ्या वर्षापासून रु. ४९९ प्रतिवर्ष चार्जेस.
रु. २००० एक महिन्यात खर्च केल्यास अमुक इतके पॉईंट्स वगैरे.
माझ्या दृष्टीने फायदेशीर ऑफर अशी होती की पेट्रोल खरेदीवर २ टक्के सूट. मला महिन्याला साधारण ४५०० रु. चे पेट्रोल लागते आणि ते डेबिट कार्डावर घेतल्यास त्यावर ३ टक्के सरचार्ज. म्हणजे क्रेडिट कार्डचे २ आणि डेबिट कार्डचे ३ असे ५ टक्के वाचले असते. या एकाच कारणासाठी मी सिम्प्ली सेव्हर कार्ड घ्यायचे ठरवले आणि त्या बाईला संमती दिली. तिने माझे कागदपत्र मागितले ते पाठवले आणि व्हेरिफिकेशन कॉल येईल म्हणून सांगितले.
काही दिवसांनी sbiच्या दिल्ली ऑफिसकडून कॉल आला. मात्र त्यांनी मला सांगितले की माझ्या कागदपत्रांवरून मी सिम्पली सेव्हर ऐवजी प्लॅटिनम कार्डसाठी इलिजिबल असून मला प्लॅटिनम कार्ड घ्यायचे आहे काय ?
मी त्या कार्डच्या टर्म्स विचारल्यावर सांगितले गेले की प्रतिवर्ष रु. ३००० चार्जेस असून डीपार्टमेंटल स्टोर खरेदीवर बरेचसे पॉईंट्स वगैरे जादाचे बेनिफिट्स आहेत. शिवाय कार्ड अॅक्टिव्हेशननंतर लगेचच रु. ३००० ची गिफ्ट व्हाऊचर्स फ्री. मला विचार करण्यासाठी वेळ हवा म्हणून सांगितल्यानंतर कन्फर्मेशनसाठी सेकंड कॉल करण्यात येईल असे सांगितले गेले.
त्यानंतर मी ऑनलाईन माहिती घेतली तेव्हा असे समजले की रु. ३००० ची गिफ्ट व्हाउचर्स यात्रा, बाटा इ. कंपन्यांची आहेत, ज्यांची मला सध्या काहीच आवश्यकता नव्हती. सो मी सिम्पली सेव्हरच घ्यायचे ठरवले.
पण यानंतर सेकंड कॉल आलाच नाही. मात्र माझ्या मोबाईलवर मेसेज आला की आपले प्लॅटिनम कार्ड डिस्पॅच झाले असून लवकरच ते आपल्याला मिले. त्यानंतर अॅक्टिव्हेशन करा इ.
मला धक्काच बसला. मी अजुनी संमती दिली नसताना कार्ड कसे डिस्पॅच केले ?
मी अश्विनीबाईंना पुन्हा फोन केला आणि सांगितले की मी कन्फर्मेशन दिलेले नसतानाही मला प्लॅटिनम कार्ड का दिले गेले ? अश्विनीबाईनी सांगितले की त्या पुण्यात असून दिल्लीला कागदपत्र पाठवले की त्यांचा संबंध संपला. मी तिला सांगितले की मला सिम्पली सेव्हरच हवे असून प्लॅटिनम कार्ड दिल्यास मी ग्राहक कोर्टात जाईन. त्यावर तिने दिल्लीस संपर्क साधून सेकंड कॉल करण्यास सांगते असे सांगितले.
यानंतर दोन दिवसांनी सेकंड कॉल आला. त्यावर मी सांगितले की मला प्लॅटिनम कार्ड नको आहे आणि सिम्ल्पली सेव्हर हवे आहे. दिल्लीवाल्यांनी ओके म्हणून सांगितले.
पुन्हा दोन दिवसांनी मला एका कुरिअरवाल्याचा फोन आला की तुमचे क्रेडिट कार्ड आले आहे आणि घ्यायला कुठे येऊ ? मी विचारले की कसले कार्ड आहे ? त्यावर त्याने प्लॅटिनम कार्ड असे सांगितले. तेव्हा मी त्याला सांगितले की ते कॅन्सल झाले असून दुसरे सिम्पली सेव्हर नावाचे कार्ड आल्यानंतर मला द्यावे. कुरिअरवाल्याने ते परत sbi ला पाठवले.
यानंतर चार दिवसांनी मला मेसेज आला की आपले प्लॅटिनम कार्ड चे अॅक्टिव्हेशन झाले असून रु. ३००० ताबडतोब जवळच्या sbi शाखेमध्ये भरा.
मी अश्विनीबाईना पुन्हा फोन केला. त्यावर तिने सांगितले की सेकंड कॉल नंतर तिची जबाबदारी संपली असून यानंतर मी दिल्ली येथे संपर्क साधावा किंवा ईमेल करावा. मग मी तिने दिलेल्या ईमेलआयडीवर ईमेल केला. यावर उत्तर काहीच आले नाही पण चार दिवसांनी मला माझ्या पोस्टल पत्त्यावर एक जाडजूड पाकीट आले, ज्यात प्लॅटिनम कार्डसाठीच चार्जेस रु. ३०००, लेट चार्जेस रु. ११०० आणि इतर सटरफटर काहीतरी असे मिळून रु. ५१०० मला बिल लावून ते माझ्या नावावर डेबिट टाकले होते.
आता मात्र मी खवळले. मिपाकर मोदक याचा फोनवर सल्ला घेतला. त्याप्रमाणे sbiचे जालावरील ऑफिशियल कम्प्लेंट सेंटर feedback@sbicard.com शोधून काढले आणि रीतसर तक्रार दिली.
Feedback वरून उत्तर आले की तुम्ही प्लॅटिनम कार्डसाठीच अॅप्लाय केले होते व ते तुम्हाला देण्यात आले आहे. व तुमचे कार्ड अॅप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला फी भरावीच लागते. ती न भरल्यास लेट फी व इंटरेस्ट ही भरावा लागतो. तुम्हाला अद्याप कार्ड मिळाले नसल्यास पत्ता द्या, आम्ही पुन्हा पाठवू व लेट फी रद्द करू.
मी चाट पडले. पुन्हा उत्तर दिले की मी कसलेही अॅप्लीकेशन केले नसून तुमच्या एजंटने मला सिम्पली सेव्हर नावाचे कार्ड ऑफर केले होते व ती ऑफर अॅक्सेप्ट करून मी त्यासाठी पेपर्स पाठवले होते. तुम्ही दिलेले प्लॅटिनम कार्ड मला नको असून माझ्या अकौंटवर लावलेले सर्व चार्जेस काढून टाकावेत.
यावर उत्तर आले की आम्ही लेट फी मधून टाकली असून तुम्ही सिम्पली सेव्हर कार्ड अॅक्टिव्हेशन केल्यानंतर प्लॅटिनम कार्डचे चार्जेस आम्ही withdraw करू.
हे म्हणजे ब्लॅकमेलच झाले की ! आता मात्र मी इतकी वैतागले की sbiचे कुठलेही कार्ड नको, असे ठरवून टाकले.
पुन्हा मोदकचा सल्ला घेतला. त्याचे म्हणणे पडले की पहिले सिम्पली सेव्हर घेऊन सगळे चार्जेस withdraw करून घ्यावेत. आणि नंतर ते सिम्पली सेव्हर हवे असल्यास ठेवावे नाहीतर परत करावे.
मग त्याप्रमाणे त्यांना कळवले. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या कार्ड्सची माहिती असलेली एक लिंक दिली. ती पाहिल्यानंतर त्यात उन्नाटी नावाचे एक कार्ड आढळले, ज्यात पाच वर्षपर्यंत कोणतेही चार्जेस नव्हते. शिवाय इतर बेनिफिट्स सिम्पली सेव्हरसारखेच. मी बारकाईने पहिले की काही छुपे चार्जेस तर नाहीत. पण वेगवेगळ्या पेजेसचे सर्फिंग करूनही इतर काहीच चार्जेस दिसले नाहीत.
मग काय, Feedback वाल्यांना कळवले की उन्नाटी कार्ड मला चालेल. त्यावर त्यांनी उत्तर दिले की त्यासाठी मला रु. २५००० इतके फिक्स डिपॉझिट sbi कडे भरावे लागेल.
मला धक्काच बसला ! हा काय चावटपणा ? अशी काही कंडीशन असेल तर वेबसाईटवर का नाही दिली ? मी पुन्हा काळजीपूर्वक जालावर शोधले. कुठेही या फिक्स डिपॉझिटवाल्या कंडीशनचा उल्लेख नव्हता.
मग मी feedback वाल्यांना एक खरमरीत उत्तर लिहिले. की, २५००० रु. फिक्स डिपॉझिट हे वेबसाईटवर कुठेही लिहिलेले नसताना तुम्ही कसे काय मागत आहात ? हे चुकीचे असून हा प्रकार अतिशय खेदजनक आहे आणि मला आता sbi कडून कुठल्याही प्रकारचे क्रेडीट कार्ड नको आहे. तसेच माझ्या खात्यावरील सर्व चार्जेस जर ताबडतोब withdraw केले नाहीत तर मला नाईलाजाने आता कन्झ्युमर कोर्टात तक्रार द्यावी लागेल. या ईमेलची कॉपी मी nodalofficer@sbi.com यांना पारित केली.
यानंतर दोनच दिवसात nodalofficer यांचेकडून उत्तर आले की आपल्या विनंतीप्रमाणे आपल्या नावावरील सर्व क्रेडीट कार्डे रद्द केली असून आपल्या खात्यावरील सर्व चार्जेस withdraw केले गेले आहेत. भविष्यात आपल्याला sbi कार्ड हवे असल्यास कृपया संपर्क साधा इ. इ.
....आता sbiची कुठलीही सर्व्हिस घेण्यापूर्वी नक्कीच दहावेळा विचार करण्यात येईल !!!
21 Jun 2017 - 2:03 pm | मोदक
या महिन्यात वेगवेगळ्या कंपन्यांशी फोनाफोनी सुरू आहे...
*****
ओरल बी चा सहा महिन्यांपूर्वी घेतलेला एक ऑटोमेटिक टूथब्रश खराब होऊ लागला. त्याच्या ग्रिपवर फंगस तयार झाले. (हेड दोनदा बदलल्याने हेड चांगले होते) मग ओरल बी ला मेल केला. लगेच रिप्लाय आला आणि त्यांनी फोटो बघून नक्की काय झाले आहे ते बघितले आणि पुढील अॅनालिसीससाठी प्रॉडक्ट परत मागितले - त्याबदल्यात त्याच किंमतीची बिग बझार व्हाऊचर्स पोस्टाने घरी आली.
*****
अमुलची बासुंदी एका अमुल स्टोअर मधून घेतली. दुसर्याच दिवशी टेट्रापॅकमधील बासुंदी खराब झाली आणि त्यात गॅस तयार होऊ लागला. पुन्हा कस्टमर केअरशी फोनाफोनी. अमुलच्या कस्टमर केअरने फोन उचलला नाही. मग फॅक्टरीला फोन केला. त्यांनी प्रॉब्लेम विचारला आणि शहर विचारले. थोड्या वेळाने पुणे ऑफिसमधून फोन, पुन्हा प्रॉब्लेम विचारला आणि नेमक्या कोणत्या दुकानातून बासुंदी घेतली ते विचारले. थोड्या वेळाने आणखी एकाचा फोन. या साहेबांनी "दुकानदाराशी बोललो आहे, प्रॉडक्ट तेथे जमा करा आणि त्याच किंमतीचे काहीतरी घेऊन जा किंवा पैसे परत घेऊन जा" म्हणून सांगितले.
*****
आता तनिश्कसोबत मेलामेली सुरू करायची आहे. एक दागिना फॉल्टी लागला आहे आणि गेले दीड वर्षात पाच वेळा दुरूस्त करून घेतला आहे.