दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
4 Dec 2014 - 8:54 pm
गाभा: 

खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.

पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.

श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.

आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?

किती वाजता करायचा?

खायला-प्यायला काय आणायचे?

इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.

तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.

(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Dec 2014 - 9:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कट्ट्याला शुभेच्छा.
(दुचाकीवाल्यांनो - हेल्मेट घालून जारे बाबांनो.)

आशु जोग's picture

4 Dec 2014 - 10:59 pm | आशु जोग

कोथरूड ठरवा ठिकाण
इकडे लई लोकं हायती

चला... "पुण्यामधे नक्की कुठे" हे ठरण्यासाठी २० प्रतिसाद नक्की. (पॉपकॉर्न घेउन बसतो)

श्रीरंग_जोशी's picture

5 Dec 2014 - 3:11 am | श्रीरंग_जोशी

मी उपस्थिती लावलेला कट्टा शनिवारवाड्यात झाला होता. पुणे महानगराच्या विविध कोपर्‍यांतून व शेजारच्या गावांतून कट्टेकरी आले होते.

सोयीचे ठिकाण म्हणून शनिवारवाडा चांगला पर्याय आहे.

विटेकर's picture

5 Dec 2014 - 5:53 am | विटेकर

मी आहे . स्थान/ वेल कलवावे.
पेठकर याना भेटण्याची तीव्र इच्छा आहे,
श्री मु वि याना भ्रमन ध्वनी व्य नि केला आहे

मुक्त विहारि's picture

5 Dec 2014 - 6:19 am | मुक्त विहारि

मी इथे सौदीतच अडकून बसलो आहे.

त्यामुळे मी येवू शकणार नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Dec 2014 - 2:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

धागा तूच काढलास ना रे विहार्या? सौदीत अडक्लास म्हणजे ? सांग त्या शेखला-कट्टा आहे, जावेच लागेल!

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2014 - 2:52 pm | टवाळ कार्टा

ओ खापर आज्जीबाई...या वयात हरी हरी करायचे सोडून तुम्हीपण :P

हाडक्या's picture

5 Dec 2014 - 5:05 pm | हाडक्या

या आज्जीबै जबरी हैत हो.. बाटलीचा आवाज आला की त्या पयला गलास घेऊन बसत्यात.. ;)

प्रसाद गोडबोले's picture

5 Dec 2014 - 3:47 pm | प्रसाद गोडबोले

__/\__

हर्षद खुस्पे's picture

5 Dec 2014 - 9:15 am | हर्षद खुस्पे

आम्हाला यायला आवडेल ...पण कोणाची ओळख नाही.... :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2014 - 5:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपाकट्ट्याला ओळख लागत नाही. कट्ट्याला आलात की आपोआप ओळखी होतीलच ! :)

ओल्द मोन्क's picture

5 Dec 2014 - 10:32 am | ओल्द मोन्क

नक्किच हजेरि लाउ...

विजुभाऊ's picture

5 Dec 2014 - 10:42 am | विजुभाऊ

अरेच्चा.....
पेठकरकाका कधी आलात इकडे?

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2014 - 5:42 pm | प्रभाकर पेठकर

कालच आलो आहे.

समीरसूर's picture

5 Dec 2014 - 10:59 am | समीरसूर

५ आणि ६ काही अपरिहार्य कारणांमुळे शक्य होणार नाही. :-( पण कट्ट्याला शुभेच्छा! :-) पुढच्या कट्ट्याला अवश्य हजेरी लावणार...

संचित's picture

5 Dec 2014 - 11:04 am | संचित

नेहमी सगळे कट्टे पुण्यातच का? बंगलोर ला कुणी मिपाकर आहेत का? इकडे पण करा न एखादा कट्टा.

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2014 - 11:19 am | टवाळ कार्टा

तिथे "मिथुनायण" फेम अ‍ॅडी जोशी रहातात ना?

श्रीरंग_जोशी's picture

5 Dec 2014 - 7:56 pm | श्रीरंग_जोशी

मिपाकर मन्द्या बंगळुरूला असतात.

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Dec 2014 - 9:32 am | लॉरी टांगटूंगकर

येस्स सार!!!
नानु बेंगळूर सिटीली वासागिदीनी.
नं व्यनि करतोय..

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2014 - 11:21 am | डॉ सुहास म्हात्रे

पेठकर साहेब वेळ आणि जागा तुम्हीच नक्की करा. कारण वेळ कमी आहे. दुपारी एक ते पाच सोडून इतर वेळ असल्यास दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी येऊ शकेन.

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2014 - 12:56 pm | प्रभाकर पेठकर

आत्ताच अर्ध्या तासापूर्वी पुण्यात आगमन झाले आहे. (थोर राजकारण्यांप्रमाणे....आत्ताच आगमन झाले आहे वगैरे वगैरे). उद्या (शनिवार, दिनांक ६) माझ्यासाठी सोयीचे आहे.
कट्टा माझ्याच घरी व्हावा. जास्तीत जास्त सद्स्यांनी हजेरी लावावी. सहकुटुंबही यावे ही आग्रहाची विनंती. माझे कुटुंब आहेच.

माझा भ्रमणध्वनी क्रमांक ९८५०५८३००५.

संध्याकाळ पर्यंत इथेच ह्या धाग्यावर प्रत्येकाने आपली उपस्थिती कळविली तर जेवणाची व्यवस्था करायला मला सोपे जाईल.
उद्या दत्तजयंती आहे व्हेज - नॉन व्हेज कळावावे. माझा कुठलाही उपास नसतो. अवश्य येणे करावे ही आग्रहाची विनंती.

यसवायजी's picture

5 Dec 2014 - 4:29 pm | यसवायजी

(वेळ कळवली नसल्या कारणाने)
च्या-नॅष्ता, दोनपारचं आणी रातचं जेवान हाय का कसं?

ह्म्म.. याला कोपराने खणणं असं म्हणतात..

नाही!!! कोपराने खणणारी माणसं *&^%$# असतात. मी आपलं डायरेक विचारतोय.
"यज्ञकर्म"ला जायला जमलं नाही, निदान काकांच्या घरी तरी जेवू म्हटलं :)

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2014 - 5:44 pm | प्रभाकर पेठकर

घरी आलात तर तुमच्या इच्छेनुसार सर्वकांही मिळेल.

यसवायजी's picture

5 Dec 2014 - 9:04 pm | यसवायजी

धन्यवाद काका. यह तो आपका बढप्पन हय.

सिरुसेरि's picture

5 Dec 2014 - 11:23 am | सिरुसेरि

चेन्नई ला कोणी मिपाकर आहेत का ? असल्यास मिपाचा चेन्नई कटटा करता येइल .

श्रीरंग_जोशी's picture

5 Dec 2014 - 7:52 pm | श्रीरंग_जोशी

मिपाकर सोत्रि चेन्नईला असतात.

प्रसाद भागवत १९८७'s picture

5 Dec 2014 - 2:43 pm | प्रसाद भागवत १९८७

प्रभाकर काका स्थळ कळवा ना पुण्यात ६ तारकेला किती वाजता आणि कुठे ?

विजुभाऊ's picture

5 Dec 2014 - 5:30 pm | विजुभाऊ

प्रभाकर काका स्थळ कळवा ना पुण्यात
काका... हा व्यवसाय कधीपासून.... जर्रा अगोदर कळ्ळं अस्तं ना तर मी सुद्धा माझ्यासाठी स्थळासाठी विचारणा केली असती.

धडपड्या's picture

5 Dec 2014 - 2:50 pm | धडपड्या

नक्कीच यायला आवडेल... पण कोणाशीच ओळख नाही...

बबन ताम्बे's picture

5 Dec 2014 - 4:18 pm | बबन ताम्बे

ओळख होईल आणि मिपा वरील हरहुन्नरी, विद्वान व्यक्तिमत्वे प्रत्यक्ष पहाता येतील.

निलेश's picture

5 Dec 2014 - 4:55 pm | निलेश

मी येनार आहे. पण कुठे आणि किती वाजता ते निश्चित करा.

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2014 - 5:34 pm | प्रभाकर पेठकर

संभाजी पार्क आणि राजधानी (व्यनितून सुचविल्याप्रमाणे) मला सोयीचे आहे. वेळ संध्याकाळी ५.३० सुद्धा चांगली आहे.
सतिश गावडे आणि मुवी अंतिम शिक्कामोर्तब करतीलच.

संभाजी पार्क मजपण जमेलसे दिसतें!!

निलेश's picture

5 Dec 2014 - 7:34 pm | निलेश

संभाजी पार्क चालेल, पण वेळ संध्याकाळी ६:३० चालेल का?

सतिश गावडे's picture

5 Dec 2014 - 8:46 pm | सतिश गावडे

चालेल. संपर्क क्रमांक व्यनि करतो. येण्यापूर्वी एकदा कॉल करा.

सर्वसाक्षी's picture

5 Dec 2014 - 7:41 pm | सर्वसाक्षी

कट्टा जोरदार होउ द्या.
मी कलकत्त्यात आहे, उद्या रात्री परतणार त्यामुळे कट्टा हुकणार. यावेळी योग नाही, पुन्हा कधीतरी

साक्षी

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Dec 2014 - 8:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे

एक किलोभर मलाईचम आणता का माझ्यासाठी ? :-)

सतिश गावडे's picture

5 Dec 2014 - 8:45 pm | सतिश गावडे

केव्हा: उदया (शनिवारी)
किती वाजता: संध्याकाळी साडे पाच वाजता
ठिकाण: संभाजी पार्क (पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व नाटयगृहाच्या बाजूची बाग)
स्नेहभोजनाचे ठिकाण: राजधानी (सध्या तरी. प्रत्यक्ष गप्पांमध्ये पुनर्विचार होऊ शकतो.)
ओळख: पुर्व-ओळख आवश्यक नाही. कट्टयाला हजेरी लावल्यानंतर मिपाकरांशी ओळखी होतील.
होणारा खर्च: तुझा तू माझा मी
संपर्क: सतिश गावडे किंवा वल्ली यांना व्यनि करावा.
आगंतुक उपस्थिती: चालेल. ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे.

*येताना काही खादयपदार्थ आणल्यास हरकत नाही. मात्र त्यासाठीचे पैसे मिळणार नाहीत. खादयपदार्थ स्वखर्चाने आणावेत.
**कुटुंबातील इतरांना कट्ट्याला घेऊन येण्यास हरकत नाही. मिपाकर इतर मिपाकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना "एक्स्ट्रा एक्स्टेंडेड फॅमिली" समजतात.
***काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास सतिश गावडे किंवा वल्ली यांना व्यनि करावा.

खटपट्या's picture

5 Dec 2014 - 10:58 pm | खटपट्या

चापान्याची यवस्था नीट करा. नायतर गेल्या येळंसारखं करताल आनी मंग पैसाताय वर्षभर टोमणा मारीत बसल.

पैसातायच्या नुकत्याच झालेल्या पुने वारीत जंगली म्हाराज रोडवरंच (म्हनजे जंगली म्हाराज रोडवरच्या हाटेलात, रोडवर नाय) च्याय पाजन्यात आलेली हाये.

आमच्याकडे फोटो हायेत. त्यामुले पैसाताय आता काय बोलूच शकत नाय. *lol*

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2014 - 5:11 am | अत्रुप्त आत्मा

+++++१११११ =))
===≈==========
आपला:-
प्रत्याक्ष दर्शी सहभागी! =))
आत्मू चाय्बाज! :-D

एस's picture

6 Dec 2014 - 10:46 pm | एस

पैसातायच्या नुकत्याच झालेल्या पुने वारीत जंगली म्हाराज रोडवरंच (म्हनजे जंगली म्हाराज रोडवरच्या हाटेलात, रोडवर नाय) च्याय पाजन्यात आलेली हाये.

आमच्याकडे फोटो हायेत. त्यामुले पैसाताय आता काय बोलूच शकत नाय. Lol

काय ग्यारंटी नाय. तरीबी पुन्याला नावं ठिवायला त्या कमी कर्नार नाय. तवा फोटु टाका इथं. पुडंमागं आमच्यावर हल्ला झाल्यास या फोटुंची ढाल करता यील.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 10:51 pm | मुक्त विहारि

पुणेकरांना नवे ठेवणे हा इतर पुणेकरांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.(त्यात आम्ही पण आलोच.)

उलट आमच्या अशा नावे ठेवण्याने, पुणेकरांची सहनशक्ती वाढतच असणार.(थिंक पॉझीटीव्ह.)

पैसा's picture

7 Dec 2014 - 1:03 pm | पैसा

फोटोचा पुरावा ठेवल्यामुळेच सध्या तोंड बंद ठेवावे लागत आहे. तरी पुणेकर आहेत. पुन्हा संधी देतीलच बोलायची!

दिपक.कुवेत's picture

7 Dec 2014 - 2:09 pm | दिपक.कुवेत

पुणेकरांबद्दल

एस's picture

8 Dec 2014 - 3:29 pm | एस

तुमच्या आगामी एका तरी पुणे वारीत आपण चहा घेऊ असे आश्वासन देत आहे. ("तुम्ही बसा हं, मी आलोच चहा घेऊन!" - टाईप) ;-)

(हे कळाले तर तुम्ही एकतर खरे पुणेकर तरी आहात किंवा पुणेकरांचे आदरातिथ्य एकदातरी अनुभवलेले आहात.)

पैसा's picture

8 Dec 2014 - 4:06 pm | पैसा

पुणेरी आदरातिथ्य चांगलेच माहिती आहे हो! मात्र एक गोष्ट कोणाच्या लक्षात आलेली दिसत नाही. पुण्याचा हा एवंगुणविशिष्ट स्वभाव म्हणजे आमच्या रत्नांग्रीच्या मधल्या आळीतून पाणी घालून पात्तळ करून पुण्याला निर्यात झालेला आहे. पेठीय पुणेकरांचे सगळे पूर्वज आमच्या रत्नांग्रीचेच. तेव्हा, "ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी" हे लक्षात असो द्यावे. कसें!!

पेठीय पुणेकरांचे सगळे पूर्वज आमच्या रत्नांग्रीचेच.

साफ चूक. पेठा शिवकाळापासून आहेत. रत्नांग्रीवाले पेशवाईत आले.

पुणेकर नसलो तरी इतिहासातल्या चुका खपत नाहीत. :D

शिवकाळातलं पुणं 'बरं'तरी असेल नै मग? ;)

प्रचेतस's picture

8 Dec 2014 - 4:32 pm | प्रचेतस

+१

आणि उगा रत्नांग्री बित्रांगीचं कौतुक सांगू नका म्हणावं
पुण्याचं पाणी मूळचं श्रीवर्धनी.

अरे हो की! हे विसरलोच होतो.

धन्स. :)

सतिश गावडे's picture

8 Dec 2014 - 4:56 pm | सतिश गावडे

अरेच्चा. तरीच बुवा नेहमी "आमच्या अमुक पेठेत आमच्या तमुक पेठेत" म्हणतात. आदय पेशवे बुवांच्या आजोळचे. *lol*

पैसा's picture

8 Dec 2014 - 5:08 pm | पैसा

मी शन्वारवाड्याबद्दल एकही शब्द बोललेला नाहीये. तसंच रत्नांग्रीकर शिवकाळात पुण्याला गेले की पेशवाईत याबद्दलही काहीही बोललेलं नाहीये. तेव्हा तुमचे चूक बरोबर तुमच्याकडेच ठेवा! श्रीवर्धनातले घराणे सगळ्या पेठांत रहात असले तर तुम्हालाच माहिती!

सर्वच पेठीय पुणेकर हे मूळचे रत्नांग्रीकर असे घाऊक विधान आपणच केलेत की ओ. तस्मात तुमची चूक पदरात घ्या, तिलाही आपलं म्हणा.

पैसा's picture

8 Dec 2014 - 5:37 pm | पैसा

मी शन्वारवाडा आणि भट याबद्दल काय बोल्ले का? पेठेतल्या एवंगुणविशिष्ट लोकांबद्दल बोल्ले. श्रीवर्धनची भट मंडळी पण हा स्वभाव राखून होती असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय?

शन्वारवाडा अन भट यांबद्दल मीही बोलतच नाहीये. श्रीवर्धनाचा उल्लेख पेठेतल्या एवंगुणविशिष्ट लोकांच्या आगमनाची नांदी म्हणूनच आला होता फक्त.

तदुपरि त्या स्टेरिओटैपचे पूर्वज तिकडे होते/आहेत हे मान्यच आहे. फक्त तो घाऊकपणास आक्षेप होता. बाकी चालू द्या.

(किंचित ओशीडीप्रेमी) बॅटमॅन.

आम्ही तरी शनिवारवाडा आणि भट यापैकी काहीतरी बोललो का?
आम्ही फ़क्त पुण्याचं मूळचं पाणी श्रीवर्धनी इतकंच बोललो. :P

त्यापेक्षा अगोदर बघावयाचे जाहले तर पुणक विषयाचे पाणी बदामीस, तर त्याहीपेक्षा अगोदर पहावयाचे जाहल्यास प्रतिष्ठानपुरी जावोन पोचते. ;)

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2014 - 6:03 pm | प्रसाद गोडबोले

आणि आमच्यामते त्याहीपेक्षा अगोदरचे बघावयाचे झाल्यास अफ्रिकेस जाऊन पोहचते ;)

आफ्रिकेतही इथिओपियाच्या आसपास जाऊन पोहोचते असे वाचल्याचे स्मरते.

(च्यायला म्हणजे आपण सगळे हबश्यांचे वंशज का काय?)

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2014 - 6:31 pm | प्रसाद गोडबोले

हबशी म्हणजे परत फिरुन मुरुडात जंजिर्‍यात आलात की वो तुमी :D

बॅटमॅन's picture

8 Dec 2014 - 7:15 pm | बॅटमॅन

ळॉळ. ती ब्र्यांच लै नवी.

तिमा's picture

8 Dec 2014 - 8:16 pm | तिमा

चर्चा भरकटायला लागली म्हणजे प्रतिसाद उजवीकडे जातात काहो संपादक ?

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2014 - 8:52 pm | प्रसाद गोडबोले

चर्चा भरकटायला लागली = > प्रतिसाद उजवीकडे जातात

की

प्रतिसाद उजवीकडे जातात = > चर्चा भरकटायला लागली

ह्या दोहों पैकी कोणती कॉज -इफ्फेक्ट रीलेशनशीप बरोबर आहे हे अद्याप अभ्यासले गेले नाहीये ... :D

तदुपरी कॉलिंग संपादक्स ....

हा ब्याट्या इतिहासाच्या जंगलात पोरं जत्रेत हरवल्यासारखा हरवतो. =))))

खटपट्या's picture

8 Dec 2014 - 10:07 pm | खटपट्या

जल्लं संपलं वाटतं...

तर त्याला शोधताना इतरांची "लपाछपी" होते (आणि हा कोपर्‍यात लपून गंमत पाहतो)

सतिश गावडे's picture

9 Dec 2014 - 10:05 am | सतिश गावडे

अच्छा असं आहे होय.

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 10:08 am | टवाळ कार्टा

छान अभिनय...साक्षीदार म्हणून नाव काढशील ;)

सतिश गावडे's picture

9 Dec 2014 - 10:12 am | सतिश गावडे

(नदीपलिकडे राहत असलो तरीही) पुणे तिथे काय उणे.

आता अजून कीती उजवीकडे जाणार ?

यसवायजी's picture

9 Dec 2014 - 10:32 am | यसवायजी

शेवटचा प्रतिसाद माझाच राहू द्या रे पोरांनो..

सतिश गावडे's picture

9 Dec 2014 - 10:33 am | सतिश गावडे

त्यासाठी प्रतिसादात पिवळं करावं लागतं

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 10:41 am | टवाळ कार्टा

हे असं का?...घे केले

प्रमोद देर्देकर's picture

9 Dec 2014 - 10:55 am | प्रमोद देर्देकर

असं नाही. अक्षरे पिवळी पाहिजे असतील बहुतेक.

तांत्रिकदृक्षट्या पम्या बरोबर असला तरी येथे टकाचे उत्तर बरोबर आहे.

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 11:18 am | टवाळ कार्टा

पम्याने "केतकी पिवळी पडली" वाचलेले दिसतेय =))

प्रमोद देर्देकर's picture

9 Dec 2014 - 11:24 am | प्रमोद देर्देकर

हो ना राव काल अख्खा दिवसा त्यातच गेला माझा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2014 - 11:29 am | डॉ सुहास म्हात्रे

लोक इतक्यातच दमले काय ?

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 11:31 am | टवाळ कार्टा

तुम्ही खरे उत्साही :)

पैसा's picture

9 Dec 2014 - 11:56 am | पैसा

कुठे नेऊन ठेवलात कॉलम माझा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2014 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे

आत्ता जगाचा अंत होऊन कडेलोट होणार असे दिसत आहे !

नाखु's picture

9 Dec 2014 - 11:59 am | नाखु

एका सुरात म्हणा.
"दिल्या घेतल्या पिवळ्याची शपथ तुला आहे"
मी आणि सगा साक्षीला *yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo: आहोतच

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 12:02 pm | टवाळ कार्टा

मी पिवळे दिले नाही....मी पिवळे घेणार नाही :)

सौंदाळा's picture

9 Dec 2014 - 12:02 pm | सौंदाळा

आज त्याच धाग्यावर संपादकसुध्दा धुळवड खेळताना पाहुन एक मिपाकर म्हणुन.....

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 12:05 pm | टवाळ कार्टा

आणखी सरकत नाहिये...त्यामूळे माझी इथून रिटायरमेंट

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 12:05 pm | टवाळ कार्टा

अर्रेच्चा हा आणखी सरकला

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 12:07 pm | दिपक.कुवेत

मी का म्हणून मागे राहू?

लॉरी टांगटूंगकर's picture

9 Dec 2014 - 4:00 pm | लॉरी टांगटूंगकर

खटपट्या's picture

9 Dec 2014 - 10:26 pm | खटपट्या

बाबौ !! आता तर मॉनीटरच्या भाईर जायला लागलाय !!

विटेकर's picture

10 Dec 2014 - 3:02 pm | विटेकर

या प्रतिसादाची अक्षरे बहुधा क्यम्पुटर च्या बाहेर्च द्शोधावी लागतील ... लैच सरकलयं राव !

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Dec 2014 - 5:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

हे सरकला सरकला वाचुन
सरकायलो खटीया जाडो लागे हे गाणे आठवले

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 5:16 am | मुक्त विहारि

आज शनिवार कट्ट्याचा दिवस.

मस्त मजा करा.

खा,प्या. फोटो काढा, आणि वुत्तांत टाका...

आम्ही निदान व्रुतांतावर समाधान मानू..

वृत्तांत वैगरे काही नाहीये,म्हणे!! ;)

सतिश गावडे's picture

6 Dec 2014 - 3:27 pm | सतिश गावडे

कोण म्हणे?

सूड's picture

6 Dec 2014 - 3:45 pm | सूड

च्च्यॅ!! विझवलीस ??

विटेकर's picture

6 Dec 2014 - 6:23 pm | विटेकर

कर
Sat, 06/12/2014 - 18:22
अरे मी इथे बागेच्या बाहर उभा आहे
पेठकर काका फोन उचलत नाहित
मला कोणीतरी फोन करा प्लीज
09881476020

हर्षद खुस्पे's picture

6 Dec 2014 - 8:13 pm | हर्षद खुस्पे

कट्टा मस्त चालू आहे

सगळ्यांना भेटून आनंद वाटला. संपला की अजूनही सुरुच आहे?

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 10:35 pm | मुक्त विहारि

मस्त मज्जा करा..

प्रचेतस's picture

6 Dec 2014 - 10:38 pm | प्रचेतस

आताशी पोचलो घरी.
मथुरा मध्ये महाराष्ट्री थाळी नंतर परत डेक्कनवर गप्पाष्टक.
मजा आली.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 10:43 pm | मुक्त विहारि

ते बिचारे बराच वेळ वाट बघत होते.

प्रचेतस's picture

6 Dec 2014 - 10:50 pm | प्रचेतस

हो.
भेटले ते.

प्रसाद भागवत, विटेकर काका, बबन तांबे, हर्षद खुस्पे आणि ओल्द मोन्क ह्यांना पहिल्यांदाच भेटलो.

कट्टा एकदम मस्त पार पडला आहे.

दिपक.कुवेत's picture

7 Dec 2014 - 11:31 am | दिपक.कुवेत

फोटो नाहि, वर्णन नाहि....काय पुरावा कट्टा झालाच तो??? (हुश्श्य चला जरा जळजळ कमी झाली)

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Dec 2014 - 12:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

काल दिवसभर बाहेर होतो. त्यामुळे धागा आज वाचला. आमच्या पुण्यात कट्टा झाला आणि हजेरी लावता आली नाही याचे दु:ख आणि कट्टा झाल्याचा आनंद दोन्ही आहे.

निलेश's picture

7 Dec 2014 - 3:31 pm | निलेश

काल ओफिसमुळे यायला जमले नाही. निदान फोटोतरी टाका.

स्पंदना's picture

7 Dec 2014 - 3:53 pm | स्पंदना

ह्यअ‍ॅ !! काय कट्टाबिट्टा झाला नाहिये!
उग्गा थापा मारतोय झाल वल्ली आणि धन्या!!
काय खर नाही.

यसवायजी's picture

7 Dec 2014 - 4:46 pm | यसवायजी

फोटो????????????

कट्टा झालाय हे पुराव्यासह शाबित करा नाहीतर कट्टा नाही झाला असे मानल्या जाईल.

नका मानू कट्टा झाला असे. काय फरक पडतो. :P

आम्हाला पडतो फरक.कशावरुन कट्टा झाला? :tongue:

अत्रुप्त आत्मा's picture

7 Dec 2014 - 8:43 pm | अत्रुप्त आत्मा

फोटूssssssssssssss :-\ .. :-\ .. :-\

बॅटमॅन's picture

8 Dec 2014 - 2:50 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो. =))

हर्षद खुस्पे's picture

7 Dec 2014 - 7:18 pm | हर्षद खुस्पे

होलसेल मघ्ये फोटो आहेत . ईस्पिकचा ऐक्कांकडे आहेत
इहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2014 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

बागेत हिरवळीवर बसून गप्पा मारताना मोबाईलच्या कॅमेर्‍याने काढलेले फोटो कमी प्रकाशामुळे बरेच खराब आले आहेत, तेव्हा क्षमस्व. पण, कट्टा झाला हे सिद्ध करण्याचा "इज्जतका सवाल" निर्माण झाल्याने ते फोटो "जसे आले तसे" टाकत आहे :) ;)

.

.

.

नंतर या जळजळ वाढवणार्‍या गावरान थाळी आणि उत्सवमूर्ती पेठकर साहेबांची पसंती असलेली मिसळपाव + ओल्या खोबर्‍याचा बटाटावड्याकडे मोर्चा वळवला गेला...

.

काही जणांनी थाळीत बाजरीच्या भाकरी ऐवजी चपाती निवडली होती...

आणि हे आम्ही खरंच खाल्लं असे सिद्ध करणारा फोटो (कोण रे तो म्हणतोय, कुठे आहे इनोची बाटली म्हणून ? :) )

तर मंडळी, आत्ता कट्टा खरोखरच झाला हे सिद्ध झालं आहे. बघा, पुणेकरांशी पंगा घेणे अंगाशी येते ते असे. +D

आता कोणीतरी एक किंवा अनेक सिद्धलेखक कट्टाकरी वृत्तांत टाकून उरलीसुरली कसर काढून कट्ट्याला न आलेल्यांची जळजळ वाढवेलच ! :) ;)

सतिश गावडे's picture

7 Dec 2014 - 9:10 pm | सतिश गावडे

पुढ्यातील गावरान थाळीकडे पाहतानाचे माझ्या आणि सूडच्या चेहर्‍यावरील भाव पाहून शेजारच्या टेबलावरचा लहान मुलगा विचारात पडला आहे. *lol*

पैसा's picture

7 Dec 2014 - 8:58 pm | पैसा

बरं बरं.

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2014 - 9:10 pm | प्रभाकर पेठकर

कट्टा झाला. अगदी मस्तं झाला. मी सौंना (माझ्याच) घेउन येणार होतो पण शेवटपर्यंत स्त्री सदस्यांनी मुवींच्या धाग्याकडे निर्दयी पाठ फिरविल्याने मी बिगरसौ गेलो होतो. संभाजी पार्काच्या मुख्य प्रवेशद्वारातच श्री. समीर उभे होते. (अगदी वेळेवर पोहोचले होते) त्यांच्याशी नजरेनेच ओळख झाली आणि कट्ट्याला क्षीण सुरुवात झाली. १० मिनिटातच सर्वश्री वल्ली, सतिश गावडे आले आणि कट्ट्याला रंग भरू लागला. इस्पिकचा एक्का आले. पाठोपाठ यशोचे आगमन झाले. श्री देशपांडे आले. कोणीतरी शेजारच्या शेंगदाणेवाल्याची व्यवसायवृद्धी करण्याच्या सदहेतूने भरभक्कम २ पुड्या शेंगदाणे घेतले. त्याचा आस्वाद घेत 'कोण कोण येणार आहेत, कोण टांग देण्याची शक्यता आहे' ह्यावर एक परिसंवाद झाला. (शेंगदाणे संपल्यामुळे) गेटवरचा मुक्काम हलवून कट्ट्याच्या आरक्षित जागेवर, पार्कात हिरवळीवर आसनस्थ झालो. माझ्या तरूणपणी पाकिस्तान युद्धात भारताने विजय संपादीत रणगाडा ठेवला होता. त्याकाळी तो फार दिमाखदार दिसायचा. अभिमान वाटायचा. आज तो गंज आणि पालापाचोळ्याचा आश्रयदाता होऊन फारच केविलवाणा दिसत होता. माझ्या तरूणपणाचं विजयी प्रतिक आज माझ्यासारखच म्हातारं दिसत होतं.

ओल्द मोन्क, ५० फ़क्त, ब्याटम्यान, हर्षद खुस्पे हे सुद्धा आले. गप्पा टप्पा होताना आणि आजूबाजूच्या कोलाहलात मला ९-९, १०-१० मिस्ड कॉल्स आले पण ऐकूच आले नाही. मधेच एक कॉल ऐकू आला आणि श्री विटेकरांचे आगमन झाले. तिथे आता यशोच्या हिमालयीन ट्रेकींग आणि इतर ट्रेकिंग संदर्भात मला अनाकलनिय भाषेत चर्चा झाली. पुढचे ट्रेकिंगचे प्लान ठरले. ते माझं क्षेत्र नसल्याकारणाने दु:खी अंतःकरणाने त्यांची चर्चा ऐकून आणि समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत होतो. नंतर लवकरच, कांही अर्जंट काम असल्याकारणाने यशोने सर्वांचा निरोप घेतला. इथे वल्ली विरुद्ध सूड आणि सतिश गावडे ह्यांनी प्रेमळ चेष्टामस्करी सुरु होती. बुवांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. वल्ली आणि श्री. विटेकर ह्यांच्यात 'प्राचिन भारत' विषयक अभ्यासक्रमावर चर्चा झाली. तो अभ्यासक्रम, तीव्र इच्छा असूनही, पूरा करता येत नसल्याने श्री. वल्ली ह्यांनी खंत व्यक्त केली. आता श्री. व सौ. बबन तांबे कट्ट्यावर दाखल झाले होते. मराठी भाषा आणि मिपाचे गाजलेले, गाजवलेले वादविवाद ह्यावरही उद्बोधक चर्चा झाली. श्री. प्रसाद भागवतांनी हजेरी लावली. मराठी भाषेचे सौंदर्य, इस्पिकच्या एक्का ह्यांचे ओमान देशाचे अनुभव ह्यावर चर्चा सुरु असताना श्री समीर ह्यांना त्यांच्या संगणकावर (ई-पॅड्वर) आलेली कांही चित्र उघडत नसल्याकारणाने ते भयंकर अस्वस्थ झाले होते. श्री इस्पिकच्या एक्का ह्यांनी आणि श्री वल्ली ह्यांनी त्यांची समस्या दूर करून 'ती' चित्र उघडून दिली. एव्हढी चर्चेत असलेली आणि श्री. समीर ह्यांच्या अस्वस्थतेची पातळी पाहता ती चित्रे पाहण्याची मला प्रचंड उत्सुकता होती पण त्यांनी दाखविली नाहीत. श्री धन्या आणि सूड ह्यांच्यात कांही 'तरूणांच्या' भाषेत बोलणे आणि खिदळणे चालले होते त्याचा अंदाज येत नव्हता पण माझ्या शेजारीच बसलेल्या श्री वल्ली ह्यांना चर्चेचे संदर्भ माहित असल्याने ते गालातल्या गालात हसत होते. संभाजी पार्कातला अंधार आणि पोटातली भूक वाढू लागली. कोणीतरी बटाटेवडे आणले होते तर कोणी स्वादिष्ट मिठाई त्यामुळे भूकेचे निरसनही लगेच होत होते. श्री भागवत ह्यांनी जास्त करून श्रोत्याची भूमिका निभावली तर श्री. समीर उत्साहाने खदखदत होते. वल्ली हे धीरगंभीर मुद्रेने सर्व गोष्टींचा आस्वाद घेत होते. सूड आणि धन्या ह्यांच्यात मधून मधून जोरदार हास्याचे फवारे उडत होते त्यात त्यांच्या जवळच बसलेले श्री. इस्पिकचा एक्का ही सहभाग दर्शवत होते. एकमेकांना टाळ्या देत माना डोलावल्या जात होत्या. दर १०-१५ वाक्यांनंतर अतृप्त आत्मा (बुवा) ह्यांची आठवण निघत होती. आज ते (इतरांची) लग्ने लावण्यात मग्न असल्याकारणाने उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे सर्वांनाच वाईट वाटले. मधे मधे फोटो काढले जात होते. पण अंधार दाटल्याने फोटो कितपत आले असतील ह्याची शंकाच आहे.

शेवटी 'संघ उत्तीष्ट' म्हणत मराठमोळी खाद्यसंस्कृती जपण्यासाठी 'मथुरा' ह्या उपहारगृहाकडे निघालो. कांही जणांनी कामामुळे, दूसरी कांही निमंत्रणं असल्याकारणाने आमची रजा घेतली आणि आम्ही ५-६ जणांनी मथुरा उपहारगृही गावरान थाळी, भाकरी मटकीची उसळ तर मिसळपाव तसेच ताक वगैरेंचा हसतखेळत आस्वाद घेतला. शेवटी उपहारगृहा बाहेर पडल्यावर मराठी भाषेतील चमत्कृती, सभ्य आणि असभ्य मराठी, मराठी वाक्यांचे इंग्रजीकरण इ.इ. मराठी भाषेला वाहिलेला परिसंवाद झाला आणि जड अंतःकरणाने कट्टा आवरता घेतला.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2014 - 10:34 pm | मुक्त विहारि

"माझ्या तरूणपणी पाकिस्तान युद्धात भारताने विजय संपादीत रणगाडा ठेवला होता. त्याकाळी तो फार दिमाखदार दिसायचा. अभिमान वाटायचा. आज तो गंज आणि पालापाचोळ्याचा आश्रयदाता होऊन फारच केविलवाणा दिसत होता. माझ्या तरूणपणाचं विजयी प्रतिक आज माझ्यासारखच म्हातारं दिसत होतं."

तुम्हाला म्हातारे कोण म्हणेल? उलट तुम्हाला भेटल्यामुळे मन मस्त टवटवीत होते.शारीरीक वयाचा बाऊ न करता, मन ताजे कसे ठेवायचे? हे तुमच्यासारख्या बर्‍याच मिपाकरांकडून शिकण्यासारखे आहे.

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2014 - 11:02 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद मुवि.

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2014 - 8:09 am | टवाळ कार्टा

तुम्ही पण त्यातलेच हो :)

मुक्त विहारि's picture

8 Dec 2014 - 9:36 am | मुक्त विहारि

आम्ही शिकलो...

प्रभाकर दादा जन्मजात आहेत...

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2014 - 9:39 am | टवाळ कार्टा

बाबांचा सल्ल्याने का? :)

अजया's picture

8 Dec 2014 - 6:52 am | अजया

मस्त वृत्तांत.

मस्त वृत्तांत :) मला शेंगदाणे नाही मिळाले ते? बाकीची खादाडी तर चुकलीच!

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2014 - 4:30 pm | प्रभाकर पेठकर

>>>> बाकीची खादाडी तर चुकलीच!

वाटलं नं वाईट? तरी म्हंटलं होतं, नको जाऊस म्हणून.

शेंगदाण्यांचं विशेष कांही नाही. माझ्या खात्यावर लिहून ठेव, पुढच्या वेळी देऊ. तेव्हढा मी नक्कीच उदार आहे.

यशोधरा's picture

8 Dec 2014 - 4:58 pm | यशोधरा

काम होते हो काका. :) पुढील वेळेस नक्की.

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2014 - 5:57 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद. पुढचा कट्टा आमच्या इमारतीच्या गच्चीत करूया.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2014 - 7:04 pm | अत्रुप्त आत्मा

एकमेकांना टाळ्या देत माना डोलावल्या जात होत्या. दर १०-१५ वाक्यांनंतर अतृप्त आत्मा (बुवा) ह्यांची आठवण निघत होती. आज ते (इतरांची) लग्ने लावण्यात मग्न असल्याकारणाने उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे सर्वांनाच वाईट वाटले. >>> चला...म्हणजे मी आत्मरूपाने उपस्थित होतो!!! ;)

बाकि..आंम्ही लग्ने नेहमी इतरांचीच लावतो,असा खुलासा करु इच्छितो! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

तुम्हिहि मनावर घेतलतं तर तुमचंहि लागेल कि वो!!! कुठे अडतयं गाडं???

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2014 - 7:17 pm | अत्रुप्त आत्मा

इतकं सोप्पं असतं..तर काय पाहिजे होतं? :)

दिपक.कुवेत's picture

8 Dec 2014 - 7:19 pm | दिपक.कुवेत

"तॄप्त आत्मा" करा....बघा फटाफट योग जुळून येतील कि नाहि ते!!!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2014 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/facebook-cute-giggle-smiley-emoticon.gif

बुवांच्या ष्टाईलने 'त्रुप्त अत्मा' असा अयडी* असेल.

*वाक्यातील 'अ' हे बुवांच्या लेखनशैलीतील 'अवडले, अता, अंबट' या शब्दांच्या चालीवर वाचावेत. ;)

नंदन's picture

10 Dec 2014 - 12:09 am | नंदन

वृत्तांत आवडला. जोरदार झालेला दिसतोय कट्टा.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2014 - 10:28 pm | मुक्त विहारि

आमचा कट्टा हुकला खरा.

पण हरकत नाही.

खटपट्या's picture

7 Dec 2014 - 11:54 pm | खटपट्या

व्रुत्तांत आणि फोटो छान.
च्या पानी झालंच नाही वाटतं.

मुक्त विहारि's picture

8 Dec 2014 - 12:39 am | मुक्त विहारि

अरे बाबा... पुण्यामध्ये चक्क थाळी दिल्या गेली.अज्जून काय हवे?

आणि पुण्यात साध्या अर्ध्या घोट चहाला पण "अम्रुततुल्य" असे म्हणतात.

त्यामुळे बाहेर गावचे मिपाकर आले की अम्रुततुल्य आणि परदेशातले मिपाकर आले की, थाळी, असा नियमच आहे मुळी.

म्ह्णजे बघा, पैसा ताईंना चहा आणि प्रभाकर दादांना थाळी.

परग्रहवासीय आले की , थाळी आणि पर्वती, असा जंगी बेत आखतात, असे मागच्या वर्षीच्या "मंगळवारीत" समजले.

दुसर्‍या आकाशगंगेतून कुणी आलेच तर, पार हडपसर ते लोणावळा आणि कात्रज ते कोथरूड असे रिक्षाने फिरवतात.

(आजकाल आमच्या कळफलकातून "पुणे" असे वाचले की, आपोआप अक्षरे टाइप व्हायला लागतात.अर्थात पुणेकरांना आजकाल ह्या गोष्टीची सवय झाल्याने, ते मनावर घेणार नाहीत,ह्याची १००% खात्री आहे.आता खूद्द आमचाच मुलगा पुण्याला शिकायला असल्याने, तसे आम्ही पण पुणेकरच आहोत.)

त्यामुळे बाहेर गावचे मिपाकर आले की अम्रुततुल्य आणि परदेशातले मिपाकर आले की, थाळी, असा नियमच आहे मुळी.

घोर पक्षपात..

मुक्त विहारि's picture

8 Dec 2014 - 2:25 am | मुक्त विहारि

तुम्ही आलात की एक दिवस आपण पुण्याला जावू आणि थाळी हादडू...

हाकानाका....

पैसा's picture

8 Dec 2014 - 2:38 pm | पैसा

आणि त्यासाठी पण गोवा ते पुणे ३ फेर्‍या मारायला लागल्या हो!!

स्पा's picture

8 Dec 2014 - 7:14 am | स्पा

झकास व्रुतांत :):)

समीरसूर's picture

8 Dec 2014 - 9:18 am | समीरसूर

कट्टा छान जमला. वृत्तांतदेखील देखणा आणि फोटोदेखील देखणे. माझा हुकला पण काही महत्वाचे कारण असल्याने यायला जमले नाही. पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत आहे. जेवण फर्मासच दिसते आहे. मथुराचे जेवण खाऊन कित्येक वर्षे लोटली. असो.

योगी९००'s picture

8 Dec 2014 - 9:34 am | योगी९००

झकास व्रुतांत...!!

बाकी सर्वच कट्ट्यांना सुडराव उपस्थित असतात हे पाहून आश्चर्य वाटले.

बाकी सर्वच कट्ट्यांना सुडराव उपस्थित असतात हे पाहून आश्चर्य वाटले.

तीव्र सहमती ;)

सूड's picture

8 Dec 2014 - 4:10 pm | सूड

ओके!!