फॅशन

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
4 Nov 2008 - 12:25 pm
गाभा: 

दिवाळीच्या मुर्हुतावर प्रर्द्शीत झालेला मधुर भांडारकर दिग्द्र्शीत चित्रपट आहे फॅशन चित्रपटाचे कथानक
हे फॅशन इड्स्ट्री भोवती फिरते आहे हा मधुर भांडारकरचा अजुन एक चांगला चित्रपट आहे त्याचे या अगोदर्चे चांदणी बार, सत्ता,
कॉर्पोरेट आणी ट्राफिक सिग्नल हे सुध्दा चांगले चित्रपट होते मधुर भांडारकर एक वास्तववादी दिग्दर्शक आहे यात शंका नाही
आपलि या चित्रपटा बद्दल ची मते कळवा

वास्तववादी चित्रपट वेडा कोतवाल?

प्रतिक्रिया

अभिरत भिरभि-या's picture

4 Nov 2008 - 12:56 pm | अभिरत भिरभि-या

मधुरच्या नावामुळे खिशातला रुपडा खर्चून जाल तर अपेक्षाभंग होण्याची दाट शक्यता आहे.
कथानक अतिशय ठिसूळ आहे.
पेज-३ सारखे हे उलगडत जाणारे कथानक नाही. कोणतीही व्यक्तिरेखा शक्त नाही.
राज बब्बर सारखा सनातनी बाप मुलीच्या मॉडेल होण्यावर नाराज असतो. पण मग मुलीला या दुनियेची तथाकथित काळी बाजू दिसल्यावर "हार उसकी होती जो फिसलकर उठता नही" छाप लेक्चर देण्याइतपत परिवर्तन केव्हा घडते हे उलगडत नाही.

किंवा जिच्याविषयी इर्षा असते ती प्रतिस्पर्धी जेव्हा कारकीर्दीच्या उतारावर "दलदल की ठोकरे" खाऊ लागते तेव्हा आपल्या नायिकेमधे अचानक प्रेमाचा उमाळा कसा काय दाटुन येतो ते काय समजले नाही.

गंमत म्हणजे एक वर्ष फॅशन क्षेत्राबाहेर राहूनही नायिका जणू आत्ताच महाबळेश्वरची ट्रीप आपटून आल्यासारखी वाटते.

फॅशनच्या दुनियेवरचे काही पापुद्रे ही कथा काढते; पण माध्यमांतुन दिसत असलेल्या कचकड्या जगामागची वा पडद्यामागची दुनिया तिच्या खर्‍या रंगात समोर येत नाही.

फॅशन इण्डस्ट्री म्हणजे "रॅम्प" वर चालण्यापेक्षाही बरेच काही जास्त असते, हे "गाढा व सखोल" रिसर्च करणार्‍या मधुरला न कळावे हे तर नवलच |

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Nov 2008 - 1:06 pm | घाशीराम कोतवाल १.२

मधुरच्या नावामुळे खिशातला रुपडा खर्चून जाल तर अपेक्षाभंग होण्याची दाट शक्यता आहे.
मी आता तसा कोतवाल नाही बरं?

छोटा डॉन's picture

4 Nov 2008 - 1:18 pm | छोटा डॉन

च्यायला हा पिक्चर डाऊनलोड मारुन व रात्री जागुन पाहुन आपले डोके ऑट झाले आहे.
लै भंगार पिक्चर आहे ...

कामातुन सवड काढुन २-३ दिवसात नक्की परिक्षण टाकतो ...
तेव्हा कळेलच आमचे मत काय आहे.
कॄपया थोडी वाट पहा ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....