ओबामा आणि काश्मिर

विकास's picture
विकास in काथ्याकूट
4 Nov 2008 - 6:33 am
गाभा: 

ओबामा हा जरी आजपण मला योग्य उमेदवार वाटत असला तरी त्याने जी काही काश्मिरसंदर्भात मुक्ताफळे उधळली आहेत ती पहाता त्याचे भारताबद्दलचे धोरण हे पाकीस्तानावंबी असणार असे दिसत आहे:

Barack Obama's Kashmir thesis!

यात म्हणल्याप्रमाणे त्याने आत्ता एमएसएनबीसीला दिलेल्या मुलाखतीतच हे मत दिले आहे असे नाही तर सुरवातीपासून तो याच पद्धतीने बोलत आहे की, "पाकीस्तानची जर अफगाणिस्तानमधे" मदत होणे हवे असेल तर "काश्मिर प्रश्न भारताने सोडवला पाहीजे. जर त्याला भारताकडून भिती नसेल तर तो अफगाणिस्तानात मदत करेल." यातून वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात, पण मुख्य म्हणजे यात भारताच्या बाजूने निर्णय घेण्यात काही मदत होईल असे वाटत नाही.

याचा अर्थ ओबामाला पर्याय म्हणून मॅकेनला भारतीय वंशाच्या लोकांनी मते द्यावीत असा नाही... तर जो कोणी उद्या निवडून येईल त्यावर भारतीयांचा दबाव राहणे महत्वाचे आहे. इस्त्रायलचा तसा राहीला म्हणून अमेरिकेने कधी त्यांच्या देशात आणि राजकारणात त्यांना तोटा होईल अशी लुडबूड केली नव्हती आणि करत नाहीत...

प्रतिक्रिया

एकलव्य's picture

4 Nov 2008 - 8:34 am | एकलव्य

एकलव्याची धावती तिरंदाजी ...

सी. राजा मोहन यांचे लिखाण म्हणजे एक निव्वळ विनोद आहे.

ओबामा म्हणतो - The most important thing we're going to have to do with respect to Afghanistan, is actually deal with Pakistan. And we've got work with the newly elected government there in a coherent way that says, terrorism is now a threat to you. Extremism is a threat to you. We should probably try to facilitate a better understanding between Pakistan and India and try to resolve the Kashmir crisis so that they can stay focused not on India, but on the situation with those militant

सी. राजा मोहन यांचे यावरील काढलेले निष्कर्ष (उत्साही वीरांनी समूळ वाचावेत) हे महाशय कोणत्या विद्यापीठात शिकवितात याविषयी शंका निर्माण करण्यासारखे आहेत.

निष्कर्ष १: अमेरिकन सरकारच्या हस्तक्षेपामुळे भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरसंदर्भातील वाटाघाटी अशक्य होऊन जातील.
- पहिली गोष्ट म्हणजे असा निष्कर्ष कसा काय काढला तेच कळत नाही. असो!
जरी ओबामाने तशी गर्भित धमकी दिली असे खरे मानले तरीही... काश्मीरबद्दलच काय पण पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानाबद्दलही अमेरिकेन लष्कर भारतावर गेल्या शतकातही दबाव टाकू शकले नाही. आज तर अमेरिकेच्या भारत आणि पाकिस्तानचे चित्र बिघडविण्याच्या क्षमतेचेच कमालीचे खच्चीकरण झालेले आहे.

निष्कर्ष २: चर्चांचे स्वरूप द्विपक्षीय राहणार नाही.
- भलताच विनोद! पॉलिटिक्स इज ऑल अबाऊट प्राऑरिटिज हे खरे आहे. पुढे मागे कदाचित प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भारत-पाकिस्तानशिवाय अन्य काही मध्यस्थही कार्यरत असतील. मग तो ईराण असेल, अमेरिका असेल, रशिया किंवा चीनही. पण जर भारताची संमती नसेल तर अमेरिकेला पाकिस्तानच्या वतीने चर्चेस उभे राहणे इतके साधेसरळ बिलकुल नाही. भारताचे राहू दे... जागतिक राजकारणाची चाहूल घेतल्यास अमेरिकन वकिलाची सर्व्हिस घ्यायला ना पाकिस्तान तयार होईल आणि ना चीन त्याला घेऊ देईल.

निष्कर्ष ३: पाकिस्तान लष्कर भारताविरुद्धची आघाडी अधिक आक्रमक करेल.
- आत्ता काय कमी आक्रमक आहे? कारगिलच्यावेळेस काय फक्त प्रेमसंवाद चालला होता? पाकिस्तान लष्कर हे नेहमी आक्रमकच राहील याच तयारीने भारतीय सैन्यदळ सज्ज असावे असा अंदाज बांधायला हरकत नसावी. आपण गाफील राहिलो तर हल्ले होतात इतकेच काय ते तात्पर्य... तयारी ही नेहमीचीच असणार.
===================

भारतीय सरकार किती समर्थपणे येथील आर्थिक व्यवस्था सांभाळते, लष्करी सामर्थ्य वाढविते आणि मुत्सद्दीपणे जागतिक राजकारणात आपले स्थान पक्के करते यावर काश्मिर प्रश्नाचे काय होणार याचे उत्तर अवलबून आहे. अमेरिकाचा होऊ घातलेला राष्ट्रपती नाहीच असे नाही पण फारसे काही वाकडे करू शकेल याची शक्यता नाही. (या तिन्ही गोष्टींसमोर म्हणजे काय बरं भाऊ? असा प्रश्न उभा करता येईल. पण त्याविषयी सविस्तर कधीतरी नंतर!)

भास्कर केन्डे's picture

4 Nov 2008 - 9:05 pm | भास्कर केन्डे

एकलव्य,
तुमची तिरंदाजी व्यवस्थित मुद्देसूद तर झाली आहेच शिवाय अचून निशाणा साधला आहे. असेच चांगले चांगले प्रतिसाद येऊ द्यात. कुठे असता आजकाल, फार दिसत नाहीत?

आपला,
(सहमत) भास्कर

प्रकाश घाटपांडे's picture

4 Nov 2008 - 12:12 pm | प्रकाश घाटपांडे

हितले ज्योतिशी म्हंतात ओबामा निवडून येनार हाये.
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2008 - 12:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओबामाची सरशी होणार अशा बातम्या आहेत, तरीही सहा-सात टक्के मताच्या दोलायमान मतदारांमुळे मॅक्केन ही बाजू मारु शकतो असे म्हणतात. असे असले तरी भारतीय म्हणून मला ओबामाचे आणि मॅक्केनच्या धोरणे माहिती नसल्यामुळे ( वर्णद्वेषाचा भाग अलहिदा) अमेरिकेवर भारतीयांचा दबाव राहणे इतकेच मला महत्वाचे वाटते. अर्थव्यवस्थेचे संकट व जागतिक मंदिचे सावट यातून अर्थतज्ञाच्या मते दोनेक वर्ष अध्यक्षांना त्याकडेच लक्ष पुरवावे लागेल. भारताकडे ( विशेषतः काश्मिरकडे ) वाईट नजरेने पाहू नये, इतका दबाव निवडून येणार्‍यांवर भारतीयांचा राहावा या पलिकडे आपण देवाकडे कोणती प्रार्थना करु शकतो.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

4 Nov 2008 - 6:11 pm | विकास

भारताकडे ( विशेषतः काश्मिरकडे ) वाईट नजरेने पाहू नये, इतका दबाव निवडून येणार्‍यांवर भारतीयांचा राहावा या पलिकडे आपण देवाकडे कोणती प्रार्थना करु शकतो.

हेच म्हणायचे होते... बाकी माझ्या माहीतीप्रमाणे जर ओबामा आला तर (किमान) एक भारतीय वंशाची व्यक्ती तरी कॅबिनेटमधे असेल. अर्थात बॉबि जिंदाल पण बूश कॅबिनेटमधे होताच.

विनायक प्रभू's picture

4 Nov 2008 - 12:39 pm | विनायक प्रभू

अमेरिकन प्रेसिडेंट माकड (आजवर)
बोके कोण ते सांगायला पाहिजे का?
कोणी का निवडुन येईना तो तेलच ओतणार.

अभिजीत's picture

5 Nov 2008 - 8:01 am | अभिजीत

या वक्तव्याने आपल्याकडे संशयाची भावना निर्माण होणे साहजिक आहे. पाकिस्तान याचा वापर करेल हे नक्की .
पण इलेक्शन झाल्यानंतर येणारा प्रेसिडेंट लगेच या प्रश्नात लक्ष घालेल असे वाटत नाही.

ओबामा निवडून येइल असे गृहित धरुन -
ओबामाचे भारताशी संबंधित गंभीर वाटणारे हे पहिलेच मत असावे. इतक्यात ठरवणे अवघड आहे.

- अभिजीत