नमस्कार, मिपा वर लिहण्याचा पहिलाच प्रयत्न.
आज सकाळी कार्यालय मध्ये येताना F.M. वरचे गाणे इतके डोक्यात गेले की मनातली गरळ ओकल्याशिवाय चैन पडनार नाही.
F.M. वर गाणे लागले होते अंदर की सीटी मे मारो बम डोले ( कोण रे तो अश्लिल...अश्लिल..बोलत आहे). ह्या गाण्याच्या नक्कि काय शब्दरचना आहेत मला अजुन कळाले नाहि? काय ते गाणे काय ती शब्दरचना? दुसरे गाणे लागले होते मला राग येतो. ते गाणे चालु असताना जर तुम्ही झोपायचा प्रयत्न करत असाल तर हे गाणे नक्की hypnotise करुन तुम्हाला राग येत आहे असे वाटते. असो. अशी गाणी सकाळी कोणाला ऐकाला आवडतात? ऑफीस मध्ये आल्यावर पहिले लतादीदी आणि किशोर कुमार जुगलबंदि ऐकले मग जरा मन शांत झाले.
काल माजी मुख्यमंत्री अंतूले यांचेही निधन झाले. मा. अंतूले यांना विनम्र श्रद्धांजली. मा. अंतूले ह्यांनी रायगड जिल्ह्या करीता भरपुर काहि केले आहे. BATU हे तंत्रशास्त्र विद्यापीठ त्यांच्याच प्रयत्नाने उभे राहीले.
वरती जे काहि लिहले आहे ते मनात आले तसे उतरवले आहे. मिपावर आज पर्यन्त अजगरा सारखा पडीक होतो, प्रथमच काहितरी हालचाल केली आहे तरी ....
प्रतिक्रिया
3 Dec 2014 - 9:38 am | मुक्त विहारि
लिहीत रहा..
3 Dec 2014 - 10:26 am | असा मी असामी
धन्यवाद...प्रयत्न करीत राहीन.
3 Dec 2014 - 9:46 am | खटपट्या
यात अश्लील काय आहे ?
3 Dec 2014 - 10:08 am | टवाळ कार्टा
ते "बम" इंग्रजीमधे कसा लिहिला जातो त्यावर अवलंबून आहे ;)
3 Dec 2014 - 10:40 am | असा मी असामी
;)
3 Dec 2014 - 10:16 am | संजय क्षीरसागर
खरडफळा ही सुविधा उपलब्ध आहे.
3 Dec 2014 - 10:38 am | असा मी असामी
धन्यवाद..सुचनेवर विचार केला जाइल.
3 Dec 2014 - 10:32 am | सस्नेह
अजगरेही मिपावर येऊन फुत्कारू लागली हे पाहून धन्य वाटले
3 Dec 2014 - 10:37 am | असा मी असामी
फुत्कारलो नाहि हो...जरा हालचाल केली. ;)
3 Dec 2014 - 11:35 am | मनीषा
अजगरावरून आठवले...
एका अजगराने म्हणे अख्खा माणूस गिळला , आणि त्याचा व्हिडीओ कुणीतरी शेअर केला होता म्हणे--
लोकांच्या मनात काय येईल, आणि त्यांना कशात इंटरेस्ट वाटेल? काहीच सांगता येत नाही .
कृपया राग मानू नये. सहज मनात आले ते लिहिले.
5 Dec 2014 - 12:42 am | Targat Porga
आधी क्यामेर्यातून व्हाटस्याप, फेसबुकसाठी खाद्य तयार करायचं अन मग वेळ मिळालाच तर मदत यंत्रणा बोलवायची, दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात असाच प्रकार घडला होता.
3 Dec 2014 - 11:45 am | मराठी_माणूस
FM १००.७ ऐकत जा
3 Dec 2014 - 11:55 am | ज्ञानोबाचे पैजार
उगाच तुम्हाला आवडले नाही म्हणुन नावे ठेवत सुटू नका. "नीट" ऐका तुम्हाला पण आवडेल. ती एक अजरामर रचना आहे.
सोनमताई म्हणतातः-
अंजन की सीटी मे म्हारो बम डोले
अंजन की सीटी मे म्हारो बम डोले
दौडा दौडा रे....
दौडा दौडा रे डरायवर चल मत होले होले
दौडा दौडा रे डरायवर चल मत होले होले
थोडा और भगा ले..
डरायवर चल मत होले होले,
अंजन की सीटी मे म्हारो बम डोले
अंजन की सीटी मे म्हारो बम डोले
फक फक इंजन बोल रहा है
फक फक इंजन बोल रहा है
पटरी थर थर कापे
कहा रुकेगी गाडी आकर
कहा रुकेगी गाडी आकर
मन ये मेरा पुछे..
इंजन जुड जाये
इंजन जुड जाये मुझसे आके खाये हिचकोले
अंजन की सीटी मे म्हारो बम डोले....
दिल घबराये हर डिब्बे मे
दिल घबराये हर डिब्बे मे
जले प्यार का खेत...
कभी कभी तो लगता है मै हू रेल
ऐसी मीठी सी..
ऐसी मीठी सी सीटी बोले,
खांउ मै रस गोले
रस गोले खाउ मै..
.. बम डोले..
अंजन की सीटी मे म्हारो बम डोले...
दुसर्या गाण्या विषयी कोणी काही अव्दातव्दा बोलंल तर... मला राग येतो.
पैजारबुवा
3 Dec 2014 - 8:37 pm | यसवायजी
फक फक इंजन बोल रहा है
म्हणजे काय रे भाऊ?
जे काहि लिहले आहे ते मनात आले तसे उतरवले आहे. ;)
3 Dec 2014 - 8:56 pm | टवाळ कार्टा
तो इंजीनाचा आवाज आहे... :P
3 Dec 2014 - 9:04 pm | हाडक्या
या "रेल" च्या इंजीनाचा काय ? ;)
आज काल हिंदीत इतकी द्वयर्थी गाणी आलीयेत पण दादा कोंडकेंची सर कोणाला नाही बघा.
3 Dec 2014 - 9:20 pm | टवाळ कार्टा
याची सर नाही पण ;)
3 Dec 2014 - 10:41 pm | मुक्त विहारि
तुम्ही पाठवलेला व्हिडिओ दिसत नाही.
नक्कीच खास असणार...
3 Dec 2014 - 11:10 pm | यसवायजी
सौद्यांना मराठी चांगलंच कळालं वाटतं. ब्लॉकच केलं त्या 'रेगे'तल्या पोरीला आणी येष्टीच्या दांड्याला.
4 Dec 2014 - 2:41 pm | hitesh
m.youtube.com/watch?v=DOeqOOXcceg
अंजम की सिटी .. आन्नु मलिक
4 Dec 2014 - 10:08 am | बोका-ए-आझम
सोनमताई कोण? कपुरांच्या का? त्या गातात पण?
4 Dec 2014 - 11:43 am | मारवा
पैजारबुवा
वेल्लाभट चा व्यायाम वरचा लेख वाचला
नंतर हा लेख यातील तुम्ही दिलेल हे डिटेल गाण
मग जसे मनात आले तसे लिहीले तर काय होइल
या विचाराने घाबरुन
थांबलो
3 Dec 2014 - 12:09 pm | विजुभाऊ
हे मुळ एक राजास्थानी लोकगीत आहे.
"अंजन की सिटी मे म्हारो मन डोले.
चल्ला रे चल्ला रे डालेवर गाडी होले होले."
हिंदी लोकानी मन डोले च्या जागी बम डोले केलेय.
3 Dec 2014 - 8:39 pm | बाबा पाटील
आचार्य अत्रे नाही तर दादा कोंडके हवे होते राव,या गाण्यावर त्यांनी जे काय सांगितल असत...........
4 Dec 2014 - 10:26 am | कविता१९७८
हे जुनं गाणं जयाप्रदा आणि जितेंद्र च्या "माँ" चित्रपटातलं आहे आणि गाणं आहे "अंदर के सीटी मे मारो मन डोले".
4 Dec 2014 - 10:41 am | बाळ सप्रे
हे मात्र खासच !!
4 Dec 2014 - 10:43 am | इरसाल
ऑफीसला जायला निघालो गाडीचा अॅक्सिलेटर दाबुन पण गाडी जागची हलेना परत दाबला....ज्यायला सायकलचे पॅडल तुटले.उचलुन बघायला गेलो तो मोबाईल होता स्क्रीन तुटुन पडली होती मग गेलो सोनाराच्या दुकानात आणला १ किलो फाफडा बांधुन.......
वरती जे काहि लिहले आहे ते मनात आले तसे उतरवले आहे.
पण अजिबात गर्व नाय बरं !!! हंम्म.......
4 Dec 2014 - 8:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ब्याक मारती है, फरंट मारती है, देखो ये लडकी करंट् मारती है|
ह्या गाण्याचा प्रतिभावान गीतकार कोण माहित नाही पण संगीत अन्नु मलिक ह्या प्रतिभावंताचे.
http://helm4demo.webhostautomation.net/song/back_maarti_hai_current_mart...
4 Dec 2014 - 11:04 pm | सतिश गावडे
हापिसला जाताना (नायतं याताना) येफेम आयकायचा नाय. हाय काय आनी नाय काय. आगदीच ऐकायसा वाटला तं इविदभारती लावायचा. ज्या गोष्टीचा सोलुशन आपल्याकडंच हाय त्या गोष्टीचा तरास कशाला करायचा मी म्हन्तो.
मीही BATU चा पासाऊट आहे. माझ्यासारखी रायगड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील शेकडो मुलं BATU उभे करण्यासाठी अंतुलेंची ऋणी राहतील. BATU होतं म्हणून मी इंजिनीयर झालो. घरापासून आठ किमीवर हे विदयापीठ नसतं तर माझं इंजिनीयर होणं ही अशक्य कोटीतील गोष्ट होती.
पूर्वी रायगड जिल्ह्याचं नाव कुलाबा होतं. अंतुलेंनी ते बदलून रायगड केलं.
5 Dec 2014 - 8:32 am | असा मी असामी
तुमच्या माझ्यासारखे अनेक जण BATU मुळे इंजिनीयर झाले. नाहितर B.Sc करुन कुठेतरी महाड, रोहा MIDC मध्ये काम करत असतो.
5 Dec 2014 - 9:45 am | सतिश गावडे
सहमत आहे. B.Sc Chemistry करुन बिरवाडी किंवा धाटाव MIDC. :(
13 May 2024 - 8:07 pm | Bhakti
ओह,
BATU हे विद्यापीठ मला माहितीही नव्हतं.दोन एक वर्षांपूर्वी समजलं.अजूनही कोकण बाजूला प्रसिद्ध आहे,जे लिहिले ते खरं आहे, अनेकांची स्वप्ने या विद्यापीठाने पूर्ण केली.
5 Dec 2014 - 3:41 pm | मदनबाण
अंदर की सीटी मे मारो बम डोले
हा.हा.हा...
बाकी हल्ली इंग्रजी बमचा अर्थ शोधण्यासाठी मंडळी जालावर kim kardashian या बाईचा शोध घेतात म्हणे ! बाईंची जग प्रसिद्धी होण्या मागे हेच "मूळ" कारण आहे, असे विश्वसनीय सुत्रांकडुन मिळलेल्या माहितीतुन समजले आहे.सुत्रांकडुन हल्लीच जालावर शोधण्यात येणार्या नविन शब्दा बाबत सुद्धा माहिती मिळालेली आहे !
वरील उल्लेखीत बाईचा जालावर शोध घेतल्यास आणि इंस्टाग्राम फोटो पाहिल्यास बामविप होइल हे आधिच सांगुन ठेवतो. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)
5 Dec 2014 - 3:45 pm | मदनबाण
अरे हो... एक सांगायचे राहुनच गेले !
वराचा प्रतिसाद मआतत लिहले आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)
5 Dec 2014 - 3:48 pm | टवाळ कार्टा
म्हणजे??
कोणता कोणता??? गरज पडल्यास व्यनी करावा अशी विनंती :)
आणि आजकाल बम शोधले तर गूगलबाबा kim kardashian च्या लिंका देतो ;)
5 Dec 2014 - 4:01 pm | मदनबाण
बामविप :- बाल मनावर विपरीत परिणाम.
कोणता कोणता??? गरज पडल्यास व्यनी करावा अशी विनंती
व्यनी ? ह्म्म्म तुम्ही टवाळ ना ? मग तुम्हाला माहित असायला हवा होता ! ;) जाउंदे... इथेच देण्याचा आगाऊपणा करतो !
बुडबुडयाला इंग्रजीत म्हणतात ते + चेहर्यावर केसींची टिंब टिंब येते. तो शब्द ! {हे समजण्या इतके टवाळ तुम्ही नक्कीच असाल ! }
मध्यंतरी जालावर भ्रमंती करताना असेच एका सायटीवर गेलो होतो... {आत्ता त्या साईटीच नाव नाही लक्षात} त्यात जालावर पुरुष मंडळी काय पाहण्यात रस दाखवतात ? स्त्रीया काय पाहतात इं आणि अमुक तमुकचा विदा दिला होता, त्यातुनच काही गोष्टी नव्याने कळल्या !
आणि आजकाल बम शोधले तर गूगलबाबा kim kardashian च्या लिंका देतो
ही नविन माहिती सुद्धा तुमच्याकडुनच आत्ता समजली बघा !
जाता जाता :- हा प्रतिसाद संपादित झाल्यास हरकत इल्ले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)
5 Dec 2014 - 4:44 pm | टवाळ कार्टा
हाहाहा...समजले काय ते
जसे कुत्रा व्यक्ती / मांजर व्यक्ती असे व्यक्तींचे प्रकार आहेत....तसेच वर उल्लेखलेल्या गोष्टीचे सुध्धा एका प्रकारात येतात...आम्ही पडलो दुसर्या प्रकारातले....त्यामुळे "तो" शब्द मी शोधत नाही ;)
5 Dec 2014 - 4:49 pm | मदनबाण
जसे कुत्रा व्यक्ती / मांजर व्यक्ती असे व्यक्तींचे प्रकार आहेत....तसेच वर उल्लेखलेल्या गोष्टीचे सुध्धा एका प्रकारात येतात...आम्ही पडलो दुसर्या प्रकारातले....त्यामुळे "तो" शब्द मी शोधत नाही
हे माझ्या डोक्यावरुन गेले, तेव्हा कॄपया व्यनी करावा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)
5 Dec 2014 - 10:12 pm | टवाळ कार्टा
उत्तर दिलेले आहे...अर्थात व्यनीमधूनच ;)
13 May 2024 - 7:50 pm | अहिरावण
दहा वर्षे झाली... करा परत एकदा हालचाल !!!