गाभा:
नमस्कार मंडळी,
प्रथमच आपली मते जाणून घेण्यासाठी हा धागा टाकतोय. मी माझी सध्याची ह्युंदाई वेरणा पेट्रोल 2008 मॉडेल चेंज करून वोल्क्सवॅगन वेंटो 1.6 हाइलाइन एम टी पेट्रोल घेण्याचा विचार करतोय.
ह्या गाडी बद्दल कुणाला अनुभव आहे का?
एकूणात कशी आहे? कंपेर्ड टू वेरणा कशी? किंवा माइलेज च्या दृष्टीने कशी? पॉवर? ड्राइविंग कंफर्ट? लॉँग रन साठी? किंवा डेली वापर 60 की मी असेल विविध ठिकाणी फिरण्यासाठी तर कंफर्ट च्या दृष्टीने कशी? ए सी बद्दल ?
तसं मी बर्या पैकी अभ्यास व कंपॅरिज़न्स केले आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पैकी कुणाची मते कळावी म्हणून प्रयोजन.
आपली मते जाणण्यास उत्सुक.
कळावे.आभारी.
प्रतिक्रिया
23 Nov 2014 - 2:25 pm | सर्वसाक्षी
माझा अनुभव उत्तम आहे. मी साडेतीन वर्षे वेंटो वापरत आहे आणि समाधानी आहे. देखभाल खर्च पहिली दोन वर्षे प्रतिवर्षी रुपये १०,५००.००. तिसर्या वर्षी १७००० - ब्रेक डिस्कस/ पॅड्स बदलल्यामुळे. सर्विसींग वर्षातून एकदा/ १५००० किमी चालल्यावर. शहरात बी २ बी गर्दीत सरासरी १०, बाहेरगावच्या प्रवासात १६-१७ किमी प्रतिलिटर. गाडी दणकट आहे. सहा महिन्यांपूर्वी अलाइनमेंट केली, बॅलन्सिंगला वेट वापरावी लागली नाहीत. सस्पेन्शन्स उत्तम आहेत.
गाडी घेताना स्पेअर व्हील १५" चेच पहिजे असा आग्रह धरा नपेक्षा १४" चे दिले जाते. मी बराच नडलो तेव्हा १५" चे जरा वापरलेले मॅगव्हील मला फुकट मिळाले.(पहिले १४" परत न घेता)
23 Nov 2014 - 3:23 pm | देशपांडे अमोल
धन्यवाद सर्वसाक्षीजी.
लॉँग रन मध्ये आरामदायक व प्रवासाचा जास्त त्रास न जाणवू देणारी असेल ना?
तसेच सार्विसिंग बद्दल अनुभव कसा आहे? वेबसाइट वर दिल्या प्रमाणे त्यांचे नवी मुंबईत नेरुळ इथेच फक्त सर्विस सेंटर आहे असे दिसते. तर विथ अपायंटमेंट च जावे लागते का? शिवाय स्पेर्स बरेच महाग वैगेरे आहेत का? असं कळलं की लॅपटॉप लावून ते गाडी चेक करतात. म्हणजे ते अप्लिकेशन आपण आपल्या लॅपटॉप वर घेऊ शकतो का?
23 Nov 2014 - 4:23 pm | चंद्रनील मुल्हेरकर
लांब प्रवासात आरामदायक गाडी हवी तर सेडान कशाला घेताय ?एसयुवी घ्या सरळ.
23 Nov 2014 - 5:07 pm | धडपड्या
फोक्सवॅगनच्या गाड्या जनरली अवजड प्रकारात येतात... देखभाल व्यवस्थित ठेवली तर अविरत सेवेची गॅरंटी.. साधारणत: स्पेअर्स उच्च दर्जाचे वापरले जात असल्याने बर्यापैकी महाग असतात. ए.सी. बेस्ट इन क्लास... हायवेवर रोड ग्रीप उत्तम, कंट्रोल सोपे.. एकदा सवय झाली, की दुसरी वापरावीशी वाटत नाही.. मी स्वत: पोलो वापरतोय...
23 Nov 2014 - 5:17 pm | धडपड्या
स्कोडा रॅपिड सुद्धा चेक करा... बर्यापैकी पैसे वाचतील. दोन्ही गाड्या एकाच असेंब्लीवर बनतात.. फिचर्स फक्त कमी जास्त होतील...
24 Nov 2014 - 1:47 pm | कपिलमुनी
स्कोडा रॅपिड पण मस्त आहे . सेम फीचर ते पण कमी किंमतीमधे
27 Nov 2014 - 4:26 pm | llपुण्याचे पेशवेll
Skoda la Spare parts cha khoop problem ahe.
Soochana: Marathit liha mhananaryano mazya hapisatalya computer waroon jang jang pachadoon sudha Marathi type karu shakat nahiyye. :(
Krupaya maaf karane
27 Nov 2014 - 5:10 pm | कपिलमुनी
कोणता काँप्युटर वापरता आपण ?
28 Nov 2014 - 11:08 am | llपुण्याचे पेशवेll
waparatoy windows 8 aslele yantrach. Pan client machine asalyane tyachyawar kaay kaay block kele ahe kalat nahi. Mipa chya bhasha badala madhe marathich selected disate pan pratyaksh type kartana matra English madhe type hote ahe. :(
30 Nov 2014 - 7:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
क्विलपॅड वापरा.
23 Nov 2014 - 10:51 pm | सर्वसाक्षी
मलातरी नक्कीच आरामदायक वाटते. सर्वीस उत्तम. १०० रु दिले की घरुने नेली/ पोचवली जाते. सहसा अपॉइंट्मेंट मागावी लागत नाही, वर्ष होत आले की त्यांचाच फोन येतो. स्पेअर्स व लेबर मध्ये बहुधा लुटत नसावेत. मध्यंतरी उंदरांनी वायरींग कुरतडल्यामुळे गाडी सर्विस सेंटर ला पाठवावी लागली, वायर खाल्ल्याने एसी ही बंद झाले होते. पण २४ तासात १८०० रुपयात काम झाले. गाडी घरुन नेल्यापासुन परत आल्यापरयंत सतत एसेमेस अपडेट येतात. काम करण्याआधी खर्चाचा अंदाज दिला जातो. बदललेले पार्ट गाडीत घालुन परत पाठवतात.
गाडी मजबुत आहे. स्पीड्ला खड्डा आला तरी किंचितही विचलित होत नाही.
23 Nov 2014 - 5:11 pm | स्वाती दिनेश
पोलो माझी पण आवडती.. पसाटही आवडते.
स्वाती
23 Nov 2014 - 9:10 pm | देशपांडे अमोल
सर्वांचे आभार.
आपल्या प्रतिक्रियांमधून मला गाडी विषयी निर्णय घेण्यास मदत होईल.
24 Nov 2014 - 10:33 am | माईसाहेब कुरसूंदीकर
फियाट लिनियाचाही विचार करून पहा.जर्मन गाड्याचे सुटे भाग महाग असतात असे ऐकले आहे.
लिनिया ५००० आर.पी.एम.ला ११२ बी.एच.पी. पॉवर देते तर वेण्टो ५२५० आर.पी.एम.ला १०३ बी.एच.पी.
लिनिया Maximum Torque - 207Nm@2200rpm तर वेंटो- 153Nm@3800rpm
ह्या दोन्ही बाबतीत लिनिया सरस दिसते आहे.होय ना?
येथे दोन्ही पेट्रोल गाड्यांची तुलना करून पहा-
http://www.cardekho.com/compare/fiat-linea-and-volkswagen-vento.htm
24 Nov 2014 - 11:27 am | धडपड्या
फियाटच्या गाड्यांचे आयुष्यमान बरेच कमी आहे.. स्पेअर्स आता सगळ्याच कंपन्या भारतातच बनवत असल्याने सगळ्यांच्या किंमती जवळपास सेमच झाल्यात..
एलीगन्स, ग्रेस हवीच असेल तर होंडाचा विचार करा, परंतु मेंटेनन्स जास्त आहे, पण कंफर्ट आणि ड्रायव्हिंग प्लेझरला तोड नाही.. तशा फोक्सवॅगनच्या गाड्या रणगाडा कॅटेगरीमध्ये येतात...
24 Nov 2014 - 2:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पण मारुती व टाटा डिझेल गाड्यांसाठी फियाटचेच इंजिन वापरतात.शिवाय मारुती गाड्यांचा पत्रा फियाटच्या मानाने तकलादू असतो असे ह्यांचे मत.
24 Nov 2014 - 3:00 pm | कपिलमुनी
एका मिपाकराचा स्विफ्टचा पत्रा सीएन्जी केट बसवल्यामुळे फाटला होता आणि एकूणच मारूतीचा पत्रा आणि टाटाचा प्लास्टेक / फायबर हलक्या दर्जाचा असता
24 Nov 2014 - 4:12 pm | काळा पहाड
आँ? हे काय तिसरंच? व्होल्क्स वॅगन येण्यापूर्वी फियाट हीच सर्वात टिकावू गाडी होती. एक ब्लॅक जोक फियाट ओनर्स मध्ये पॉप्युलर आहे: फियाट्ची गाडीचं जीवनमान तिच्या कंपनी (जीवनमाना) पेक्षा जास्त आहे.
बाकी वजन ज्यास्त असल्यानं मायलेज कमी आहे पण फियाट मध्ये बसल्यावर जितकं सुरक्षीत वाटतं त्याच्या निम्मं सुद्धा मारूतीत बसल्यावर वाटत नाही.
24 Nov 2014 - 12:43 pm | प्रसाद गोडबोले
माझी स्वतःची पोलो आहे ... काय गाडी आहे राव ! पण तरीही मला वाटत आहे की वेन्टो घ्यायला हवी होती !
डोळे झाकुन वेन्टो घ्या ... दुसर्या गाडीचा विचार करणारच असाल तर होन्डा सिटी द ऑल टाईम क्लासिक !!
27 Nov 2014 - 4:29 pm | llपुण्याचे पेशवेll
sahamat. aataa tara vento Diesel pan ali ahe. New Polo Diesel 1500 cc pan mast ahe.
24 Nov 2014 - 12:54 pm | वेल्लाभट
मला असलेली माहिती, ऐकलेले अनुभव:
अॅव्हरेज लाजिरवाणं.
लक्झरी उत्तम आहे पण प्रॅक्टिकॅलिटी कमी. उदाहरणार्थ ग्राउंड क्लियरन्स कमालीचा कमी. छोटास्सा स्पीडब्रेकरही घासतो, खड्डे दणकतात.
चारच जणांना छान. पाचवा अनवेलकम.
रॅपिड (जुळी बहीण) उजवी आहे.
सियाझ चा विचार केलायत का? ती यापेक्षा भारी आहे असं वाटतं.
सिटी ट्राईड अँड टेस्टेड आहेच.
बघा.
सेडानच हवी असेल तर हे पर्याय आहेत. नाईतर स्कॉर्पियो बघा म्हटलं असतं.
24 Nov 2014 - 1:10 pm | योगी९००
सियाझचा विचार केला आहे का?
सियाझ गाडी छानच आहे. पण थोडी underpower वाटते. test drive घेऊन विचार करा. गेली दोन वर्ष मी dzire Petrol वापरतो. एकदम उत्तम..!! अॅवरेज मस्त (१५ शहरात आणि हायवे वर २० पर्यंत)..आणि देखभालखर्च ३०००/- (आत्तापर्यंत - नवीन गाडी असल्याने). पण डिझायर आणि वेंटोची comparison नाही होऊ शकत. पण डिझायरच्या अनुभूवामुळे जर मोठी सेडान घ्यायची गरज (आणि ऐपत) आली तर सियाझलाच first preference देईन.
24 Nov 2014 - 1:22 pm | प्रसाद गोडबोले
येस्स ! पण सुरक्षितता सेफ्टी च्या मुद्द्यावर फोल्क्सवॅगनला सध्या तरी कोणीही तोड देवु शकत नाही .
24 Nov 2014 - 1:38 pm | वेल्लाभट
त्यावरून आठवलं,
परवा एक बातमी फिरत होती. टोयोटा एटिऑस च्या वायूपिशव्या उघडल्या नाहीत. प्रवासी गंभी...र जखमी झाला. कंपनीकडून उत्तर आलं.... the airbags did not deploy because the car did not collide properly.
कुठल्याही गाडीचं होऊ शकतं असं. टोयोटाचंही झालं. अर्थात, फोक्सवागनची सेफटी फीचर्स कमी आहेत असं म्हणण्याचा उद्देश नाही. गैरसमज नकोत.
24 Nov 2014 - 1:47 pm | प्रसाद गोडबोले
हा हा हा ... ह्यावरुन एक जोक आठवला !
बायको नवर्याला फोन करते ...
बायको : हॅल्लो डार्लिनंग कसा आहेस ? मला तुला एक गुड न्युज आणि एक बॅड न्युज द्यायची आहे .
नवरा ऑफीसच्या कामात व्यग्र असतो तो वैतागुन म्हणतो
नवरा : अगं मी आत्ता खुप बीझी आहे , पटकन गुड न्युज सांग , बॅड न्युजला द्यायल वेळ नाहीये आत्ता .
बायको : ओके. गुड न्युज इज मी आत्ताच कन्फर्म केलं की आपल्या नवीन ऑडी ए ८ च्या एयर बॅग्स पर्फेक्ट काम करतात :D
25 Nov 2014 - 7:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
डार्क ह्युमर म्हणतात तो हाचं.....चायला ऑडी ए८...माझी स्वप्नसुंदरी आहे ती.
24 Nov 2014 - 1:41 pm | वेल्लाभट
आमचीही आहे. मारुती डोळे मिटून घ्यावी कधीही. लक्झरी वगैरे कमी असते इतर गाड्यांपेक्षा हे मान्य. पण परिस्थिती बदलतेय आता; उदा. सियाझ, एर्टिगा.
डिझायर कव्वा गाडी आहे. (जुनीच अधिक आवडते) फुल फिदा. फुल सॅटिस्फाईड. It never lets you down.
24 Nov 2014 - 2:13 pm | धडपड्या
इटिओस हीच मुळात किर्लोस्कर समुहाची गाडी आहे.. फक्त टोयोटाचं नाव वापरतात...
डिझायर मुळात स्विफ्ट चे एक्सटेंडेड व्हर्जन असल्याने बेसिक्स तसेच ठेवलेत... याचा परिणाम ब्रेकिंग वगैरे वर जाणवतो.. हवी तेवढी एफिशिएन्सी नाही.. हायवे वर रस्ता सोडते..
जर तुमचं दिवसाला ६० -७० कि.मी. वापर होणारच असेल, तर तुम्ही CNG किंवा डिझेल चा का नाही विचार करत?
24 Nov 2014 - 5:50 pm | योगी९००
हवी तेवढी एफिशिएन्सी नाही.. हायवे वर रस्ता सोडते..
पटलं नाही. मला तरी हा अनुभव नाही. एफिशिएन्सी च्या बाबतीत मी खुष आहे. स्पर्शलाकूड..!!
माझी गाडी डीझायर आहे म्हणून कौतूक करत नाही पण हायवे रस्ता सोडते असे अजूनही वाटले नाही.
24 Nov 2014 - 9:34 pm | टक्कू
सहमत.... एकदम स्टेबल
एफिशियन्सी १९.५ हायवे १७ सिटी
24 Nov 2014 - 11:38 pm | धडपड्या
एफिशिअन्सी, फक्त फ्युएल कन्सम्शन बाबत नाही, तर ब्रेकिंग बाबत बोलत होतो.. ७०-८० च्या वेगात जर पॅनिक ब्रेकिंग केलेत तर गाडी रस्ता सोडते... लवकर कंट्रोल होत नाही..
24 Nov 2014 - 2:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मारुतीवाले सियाझ(डिझेल) व डिझायर(डिझेल्)मध्ये फियाटचेच इंजिन वापरतात हे कळले.
http://www.business-standard.com/article/news-cd/maruti-extends-its-dies...
तेव्हा डोळे झाकून चितळ्यांच्या बाकरवडीसारखे डोळे झाकून मारुती गाड्या घेवू नयेत असे म्हणते.
24 Nov 2014 - 3:40 pm | धडपड्या
हे जुन्या गाड्यांचे असायचे... इंजीन नाही, टेक्नोलॉजी वापरायचे.. सध्याची जी K- Series Engines आहेत, ती पूर्णपणे भारतीय आहेत... फियाटची नाहीत...
24 Nov 2014 - 3:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म. पण मग हा बातमीदार हे म्हणतोय-
The Maruti Ciaz gets the option of a 1372cc, four-cylinder petrol engine and a Fiat-sourced 1248cc, four-cylinder diesel engine. The petrol motor makes 91bhp and 13.2kgm, while the diesel engine makes 89bhp and 20.4kgm.
http://www.autocarindia.com/auto-news/maruti-ciaz-vs-rivals-price-and-sp...
24 Nov 2014 - 3:58 pm | माझीही शॅम्पेन
अहो माईकाका internet आणि shoroom मध्ये फरक असतोय !!! सध्या तरी ही fiat engine वाल्या गाड्या दुकानात नाहीयेत
24 Nov 2014 - 4:12 pm | प्रसाद१९७१
K-Series Engines पेट्रोल ची आहेत. डीझेल ची इंजिन फीयाट ची वापरत असावी मारुती. पूर्वी पण स्विफ्ट ला वापरायचे.
त्यात चूक काहीच नाही. जे जे चांगले असेल ते वापरावे, ग्राहकांचा पण फायदाच आहे.
24 Nov 2014 - 4:17 pm | प्रसाद१९७१
लिनिया किंवा फियाट च्या सगळ्याच गाड्या चांगल्या डिझाइन केलेल्या असल्या तरी फार खपत नाहीत. लिनिया महीन्याला १०० पण तयार होत नाहीत. अशी न खपणारी गाडी घेउन काय करायचे? त्याचे स्पेयर पार्ट कसे मिळतील? अश्या गाड्यांना रीसेल व्हॅल्यु पण नसते.
मारुती किंवा हुंडाई घ्यावी.
वोक्स वॅगन ची युरोप मधली पोलो आणि भारतातली पोलो ह्यात फरक असतो. सेफ्टी पण युरोप मधल्या आणि भारतातल्या गाड्यांची वेगवेगळी असते. त्यामुळे पोलो च्या नावावर जाऊ नये, त्या फक्त बाहेरुन सारख्या दिसतात.
तसा ही वोक्स वॅगन चा भारतातील खप वाढत नाहीये ( कमीच होतोय ), त्याला काहीतरी कारण असेलच.
24 Nov 2014 - 4:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मुद्दा चांगला आहे पण एखादी वस्तु जास्त खपते म्हणजे ती उत्तम व खपत नाही ती टाकाउ ही मानसिकता चुकीची आहे. फोक्सवॅगनच्या गाड्याही चांगल्या असतात असे ऐकले आहे.
हुंडाईच्या गाड्या चांगल्या असतेलही पण त्या दिखाऊ वाटतात.
आम्हा भारतियांना कळपाची मानसिकता असते. मित्रांनी घेतली मारुती,शेजार्यांनी घेतली मग मीही तीच घेणार...
24 Nov 2014 - 4:50 pm | काळा पहाड
मारूती हा मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. हीरो होंडा कसं पूर्वी नवीन स्टीकर आणून स्प्लेंडरला नवीन नवीन नावं देवून नको तितक्या किंमतीत विकायचं, मारूती तोच प्रकार आहे. आणि माजोरडे पणा ला तर तुलना नाही. आणि हुंडाई म्हणजे तर लुटारूच. अरे, तुम्ही गाडी विकताय की तुमच्या गाडी मधल्या सॉफ्टवेयरची नवीन पॅकेजेस विकताय. ड्युअल टोन कलर आण, किंमत नवीन लाव, मागचा कॅमेरा लाव, किमत नवीन लाव, कुठे मोबाईल कनेक्ट करायचं आण किमत नवीन लाव. तो आय टेन नावाचा भंपक प्रकार पाहून (आणि तो घेणारे भद्रजन पाहून) तर हात टेकले.
24 Nov 2014 - 5:25 pm | वेल्लाभट
हेच वाटलं अगदी.
24 Nov 2014 - 4:53 pm | प्रसाद१९७१
मुद्दा ह्याच्या पेक्षा उलटा आहे. एखादी वस्तु जर खरच सो कॉल्ड चांगली आहे, तर ती खपत का नाहीये ह्याचा विचार केला पाहीजे. खपत नाहीये म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहेच. लोक स्वताचा पैसा घालुन गाडी घेताना विचार करतच नसतील असे नाही.
उलट आहे, भारतीयांना काही कळत नसताना पण फक्त ब्रँडनेम साठी जास्त पैसे घालतात. वोक्सवॅगन चे ब्रँडनेम नक्कीच मारुती पेक्षा चांगले आहे ( हे दिसतेच आहे चर्चे वरुन ), त्यासाठी लोक १० टक्के जास्त पण किंमत देतील, तरी पण खुपच कमी खपते म्हणजे काहीतरी गडबड आहे. ती शोधावी, नक्की खात्री पटल्यावरच घ्यावी.
24 Nov 2014 - 4:38 pm | काळा पहाड
गाडी घेतानाच विकायचा विचार करायचा? हे म्हणजे लग्नाच्या रिसेप्शन मध्य्च एखाद्या घटस्फोटाच्या वकीलानं गिफ्ट देताना आपलं कार्ड देण्यासारखं आहे.
खालचे टोमणे तुम्हाला नाहीत. भारतीयांना आहेत.
भारतीय मेंटॅलिटी! कितनी सेफ है पेक्षा कितना देती है याचा विचार.
आणि दोन्ही कडचे आरसे (लागतात म्हणून) बंद करून चालवावी. आणि मग पार्किंग बिर्किंग चा खर्च न करता रस्त्याच्या बाजूला उभी करून ट्रॅफिकची कोंडी करावी.
24 Nov 2014 - 4:48 pm | प्रसाद१९७१
५ वर्षानी तरी विकणारच ना. आणि लिनिया चा बंपर ला किंवा बॉनेट ला काही झाले ( अगदी तुमची चुकी नसताना ), तर तुमच्या गाडीच्या रंगाचे पार्ट मिळायला महीना महीना थांबायला लागते. कंपनीमधुन मागवायला लागतात. मारुतीचे पाहीजे त्या रंगाची बॉनेट, बंपर शोरुम मधेच असतात. त्याचे कारण आहे की खप प्रचंड आहे.
भारतीय वोक्सवॅगन आणि युरोपात तयार होणारी वोक्सवॅगन ह्यात फरक असतो. फक्त नावावर जाउ नये. ह्या भारतातल्या गाड्यांची युरोपियन नियमांनुसार क्रॅश टेस्ट झाली असल्याचे तुमच्या कडे काही माहीती आहे का?
मारूती सुद्धा निर्यातीच्या वेगळ्या गाड्या बनवते.
वोक्सवॅगन चा भारतातला खप वाढत का नाहीये ( बाकीच्यांचा वाढुन ) ह्या मागे कारणे तर नक्कीच असणार. कमीतकमी ती शोधण्याचा प्रयत्न तर करावा.
24 Nov 2014 - 5:02 pm | काळा पहाड
माझ्याकडे फियाट आहे आणि मला हा प्रॉब्लेम कधीच आलेला नाही.
अहो पण स्विफ्ट पेक्षा पोलो सुरक्षित आहे की नाही? तुमच्या कडे उपलब्ध पर्यायानुसार पोलो हा सर्वात चांगला ऑप्शन आहे.
गाडीचं जिवनमान पाच वर्षाचंच असतं का? घेणारा नाही का घेत पाच वर्ष जुनी गाडी? तसंच समजायचं. शिवाय ही गाडी विकून नवीन गाडी घेणं ज्याला परवडतं (हा एक आतबट्यातला प्रकार असतो) त्याला हा फरक नगण्य असणार.
24 Nov 2014 - 5:23 pm | वेल्लाभट
हा हा हा हे जाम आवडलं ! टोट्टली अग्रीड
तेही महत्वाचं आहे. आहे आता मेंटॅलिटी. जगात सर्वत्रच फ्युएल एफिशियंट कार्स चा जमाना आहे. इकडे जास्तच महत्व आहे त्याला अंमळ; काय करणार?
काय संबंध? उगाचच काहीतरी शेरे मारायचे? फोक्सवागन अथवा फियाट घेतल्यावर मारुती ह्युंडई वाल्यांना हिणवायचा स्वभावही फीचर म्हणून मिळतो वाटतं...
27 Nov 2014 - 4:36 pm | llपुण्याचे पेशवेll
Volkswagen cha bhartatla khap kami honyache ek karan kimmat ani servicing chya babtitle wait anubhav ha ahe.
Mazi gadi ghetali tya dealer chya mhananyanusar-
Ek tar tulanene servicing kendre kami ani servicing queue motha. apalya kade chote chote accident ani dent pent che praman itke jast ahe ki service center chi kshamata kami padate. Tyamule motha waiting queue ani gadbadine kame urakane. Europe madhalya planners na mhane itaka motha servicing volume expected navata.
Ata dealers sathi mhane norm parat badalnar ahet.
(marathit na lihita English lipi waparali yabaddal kshama asavi)
24 Nov 2014 - 5:29 pm | प्रसाद१९७१
माहीत नाही. मला नाही वाटत की असे कुठे सिद्ध झाले आहे. जे लोक स्विफ्ट वापरतात ते त्या गाडीच्या फार प्रेमात असतात.
तुम्हाला कधी बॉनेट कींवा बंपर बदलून घ्यायला लागला नसेल.
ते सर्व सोडा, तुम्हाला काय कारण वाटते की फियाट पंटो ( का पुंटो ), किंवा लिनिया खपल्या नाहीत ह्याचे?
मी आधीच सांगीतले आहे की गाड्या चांगल्या आहेत नक्कीच डीझाइन च्या दृष्टीने, आणि दिसायला पण चांगल्या आहेत.
तरी का खपल्या नाहीत? त्याच कीमतीच्या गाड्या धो-धो खपत असताना सुद्धा? काहीतरी कारण ( अनेक ) नक्कीच असतील ना. ती कमीत कमी शोधा तरी.
तिच गोष्ट पोलो आणि वेंटो ची. लोक डीझायर साठी महीना, २ महीने वाट बघतायत पण वेंटो घेत नाहीत. स्विफ्ट अजुन तुफान खपतीय पण पोलो चा खप कमी होत चाललाय. ते का?
24 Nov 2014 - 10:40 pm | काळा पहाड
पुंटो (Italian: Point) आणि लिनिया (Italian: Line). ओके. फियाट च्या न खपण्याची बरीच कारणे आहेत. पब्लिक परसेप्शन हे एक, टाटा हे दुसरं पण ते सगळं अलाहिदा. आल्टो ही सगळ्यात जास्त खपणारी कार आहे. ती जास्त खपली म्हणजे ती सुरक्षित कार होत नाही. तुम्हाला तुमची फॅमिली सेफटी जास्त महत्वाची की रिसेल व्हॅल्यू हे तुमचं तुम्ही ठरवायचं.
24 Nov 2014 - 5:34 pm | प्रसाद१९७१
घर घेताना पण माणसे ते पुन्हा विकले जाताना काय होइल ह्याचा विचार करतात.
आज वेंटो घेतली आणि वर्षानी ऑनसाईट ला जायला लागले तर कीती व व्हॅल्यु येइल ते नको का बघायला?
आणि मी सामान्य माणसांबद्दल बोलतोय का.पा. जे पैसे जमवुन, लागले तर कर्ज काढुन गाड्या घेतात. १० लाखाची गाडी घेताना अशी सामान्य माणसे ५ वर्षानी ५०००० मिळाले तरी चालतील असा विचार नाही करु शकत.
24 Nov 2014 - 5:35 pm | वेल्लाभट
कुणी आपल्या विचारांचे, मतांचे, ग्रहांचे तारे कशाला तोडा?
सियाझ आउटसेल्स सिटी
24 Nov 2014 - 5:37 pm | प्रसाद१९७१
पोलो , वेंटो चे नाव पण नाही.
24 Nov 2014 - 5:41 pm | प्रसाद गोडबोले
जग्वार , लॅन्ड रोव्हर, रोल्स रॉईस वर्शाला किती खपतात हो ? फारच कमी नै ... लई फालतु गाढ्या असणार त्या मग !
खपतं ते सर्व्वोत्तम हा निकष आवडला बुवा तुमचा :D
24 Nov 2014 - 5:50 pm | प्रसाद१९७१
काय प्रगो, तुमच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या माणसाकडुन ही अपेक्षा नव्हती.
प्रत्येक गोष्टीत काही वर्ग वारी नसते का? तुलना स्विफ्ट आणि पोलो अशी आहे. किंवा डीझायर, सीयाझ आणि वेंटो अशी आहे.
24 Nov 2014 - 6:04 pm | प्रसाद गोडबोले
निव्वळ खप हा डिसायडींग क्रायटेरीया कसा काय असु शकतो ? एनी वे , प्रत्येकाचे डिसिजन क्रायटेरीया वेगवेगळे असतात ... निव्वळ खप पाहुन निर्णय घेणे ही मेंढ्यांची मेन्टालिटी झाली !
आता तुम्ही आम्हाला शिकले सवरले म्हणालात म्हणुन थोडेसे ग्यान पाजळतोच :D
प्रत्येक गाडीचे पॅरामीटर लक्षात घेतले तर ती एक एन डायमेन्शनल मेट्रीक स्पेस मानता येईल ( खप ही केवळ एक डायमेशन आहे , इतर अनेक डायमेशन्स असतील जसे की सेफ्टी , पॉवर , फ्युल इफीशन्शी एत्च एत्च) आणि मग कोणत्याही दोन बिंदुतील अंतर मोजता येईल . ठोडक्यात तुमची "अपेक्षित" द्रीम कार आणि त्याला सर्वात जवळचे अॅप्रॉक्षीमेशन शोधता येईल .
असे स्टॅटीस्टीकल मॉडेल पुर्वी तयार केले होते मी :)
...
पण ते मॉडेल गाडी निवडण्यासाठी तयार न करता मॅच मेकींग साठी अर्थात सुयोग्य वधु निवडण्यासाठी तयार केल्याने सुरवातीलाच वादग्रस्त ठरुन स्कॅप करण्यात आहे :(
24 Nov 2014 - 6:11 pm | प्रसाद१९७१
तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते समजले नाहीये नीट. खप हा क्रायटेरीया नाहीये.
पण 'खप' हा डेटा पॉईट काहीतरी सांगतोय. ते हे सांगतोय की आपल्या एव्हडे बजेट असलेल्या २०००० लोकांनी मागच्या महीन्यात स्विफ्ट घेतली, पण पोलो १००० लोकांनी पण घेतली नाही. असे का ह्याचा अनॅलिसिस तर आधी करा. त्यातुन काय कारणे निघतायत ते बघा, मग विचार करा.
वोक्सवॅगन नावाला भुलु नका. ते भारतात काय करतात ते बघा.
24 Nov 2014 - 6:22 pm | प्रसाद गोडबोले
बरं
1 Dec 2014 - 8:20 pm | आनन्दा
तुम्ही डिझायर आणि वेंटो कंपेअर करताय? सारखे बजेट?
आणि, बाय द वे, गाडी घेताना केवळ तेव्हाचेच नव्हे, तर नंतरचे बजेट पण पहावे लागते. त्या बजेटनुसार दिझार आणि वेंटो आर अॅपल टू ओरेंज.
24 Nov 2014 - 7:17 pm | टवाळ कार्टा
ते मॉडेल जर अजून असेल तर पाठवता का व्यनीमधून? माझ्यासारख्या "इच्छूकांना" उपयोगी पडेल :)
24 Nov 2014 - 11:33 pm | धडपड्या
पोलो आणि स्विफ्ट च्या किंमतींमधली तफावत पाहीलीत का? लाखभर रुपायांचा फरक आहे.. पोलो विकतानाच "प्रिमियम हॅचबॅक" म्हणून विकली जाते, स्विफ्ट नाही...
27 Nov 2014 - 4:45 pm | llपुण्याचे पेशवेll
sahamat ahe. Polo madhe Dual air bags hi ata basic feature mhanoon yete.
Polo chya standard (basic model madhe sudha asatat)Feature Madhe
1. AC ; 2. Front two power windows; 3.Tilt/Telescopic steering adjustment 4.interal wiring
ityadi goshti yet.
ata 5. Front Dual airbag hi feature hi feature add zali ahe.
24 Nov 2014 - 9:36 pm | टक्कू
म्हणजे तुम्हाला तो चार्ट कसा वाचावा, त्यातून काय बघावं हेच कळलेलं नाहीये :D
चालायचंच.
लोल !
24 Nov 2014 - 6:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
फियाट व टाटाचा काही काळापुरता करार झाला होता. फियाटच्या गाड्या टाटाच्या शोरूम्समधून विकल्या जात व गाड्यांचे सर्विसिंगपण टाटाचे डीलर्स करीत. फियाटच्या गाड्या खपल्या नाहीत ह्याचे कारण हेच आहे.टाटाच्या डीलर्सना फियाट गाड्या दुरुस्त करण्यात वा विकण्यात नफा कमी मिळत असल्याने त्याचा फियाटवर परिणाम झाला.असो.
आणी धागा वेंटो घ्यावी की घेवू नये असा आहे.!
अमोल,- वेंटो,लिनिया,सिटी,रॅपिड्,सियाझ ह्या सर्वांची तू चाचणी-हाक घ्यावीस व ठरवावेस असे म्हणते.
24 Nov 2014 - 9:49 pm | मैत्र
वरच्या वाद चर्चेत पडण्याइतकं सेडानचं ज्ञान नाही. कित्येक वर्षे जुनी अॅक्सेंट शहरात शांतपणे वापरतो आहे आणि ह्युंडाई च्या सवयीमुळे आणि विलक्षण आकर्षक डिझाइन मुळे वेर्ना फ्लुइडिक नवीन मॉडेल बरेच दिवस मनात आहे.
मिपावरच्या इतर अशाच चर्चेमुळे अतिशय कमी वापर (२० किमी किंवा त्याहून कमी) चांगली चाललेली गाडी बदलू नये अशा मताने चालतो आहे (यावरही जाणकारांची मते आवडतील - अॅक्सेंट पेट्रोल जीएलएस जुने १०+ वर्षे मॉडेल - शहरात १०किमी/लि, बाहेर क्वचित जास्तीत जास्त १३-१४). वेंटो पेक्षा नवी वेर्ना दिसायला जास्त छान आणि आरामदायक वाटली. वेंटो म्हणजे जर्मन ट्रक - दणदणीत आणि भक्कम. पण सेडानची रोल करण्याची शान वाटत नाही.
तर फोक्सवॅगन - वर चर्चेत फोक्सवॅगन भारतात एक आणि बाहेर एक बनवते असं वाचलं.
इथे अशी बातमी आहे की भारतात फक्त पोलो आंतरराष्ट्रीय क्रॅश टेस्ट मध्ये पास झाली -
http://www.autocarindia.com/auto-news/indian-cars-fail-crash-safety-test...
त्यात ग्यानबाची मेख अशी की ही टेस्ट एन्ट्री लेव्हल मॉडेलवर केली जाते. पोलो आता एअरबॅगशिवाय मिळतच नाही म्हणून ती पास झाली.
प्रत्यक्षात फोर्ड फिगो एअरबॅगशिवाय पास झाली आहे.
इतर बातम्यांमध्ये स्विफ्ट आणि डॅटसन गो या दोन्ही फेल झाल्याची माहिती आहे.
http://www.business-standard.com/article/companies/datsun-go-swift-fail-...
या बातम्या अतिशय ताज्या (नोव्हेंबर १४) मधल्या आहेत.
वेंटो ही पोलोचीच सेडान असल्याने अर्थात जास्त सुरक्षित असावी. कारण या टेस्ट मध्ये सेडान नव्हत्या. सर्व कॉम्पॅक्ट कार्स ची तुलना केली गेली.
24 Nov 2014 - 11:49 pm | धडपड्या
एअरबॅग्स चे उघडणे, न उघडणे हे अत्यंत रिलेटिव्ह असते.. हे सेंसर्स हेडलाईटच्या मागे असतात.. बर्याचदा मोठा अपघात होउनही हेडलॅंपला धक्का लागला नाही, तर एअरबॅग उघडत नाहीत, तर छोट्या अपघातातही योग्य जागेवर धक्का बसला तर उघडतातही...
24 Nov 2014 - 11:00 pm | देशपांडे अमोल
धन्यवाद मंडळी,
अपेक्षे प्रमाणे मिपाकरांकडून वाचनीय व अभ्यासू प्रतिसाद आले. त्यातून गाइडेन्स ही मिळाला व बरेच नवीन पैलू ही कळाले. मी आता जवळपास वेंटो वर फ्रीझ होतोय. इतर काही कारणांपेक्षा मला वाटतं ब्रँड व जर्मन टेक्नॉलॉजी ने भुरळ घातली असावी. तसेच स्वतःला अपग्रेड करण्याची इच्छा - ती देखील असणे शक्य आहे. सेल्स मध्ये असल्याने प्रवास बराच होतो आणि कंफर्ट हा देखील एक पॅरामीटर होताच. शिवाय सेफ्टी आणि दणकटपणा हा पण एक विचार केला - आणि वेंटो वर ज़ीरो डाउन झालो.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार. तुमच्या गरजेला मिपाकरांना साद घातली की ते नक्की धावून येतात आणि मिपा वरील चर्चेतून नक्कीच खूप काही घेण्यासारखे असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पुन्हा एकदा आभार.
कळावे.
25 Nov 2014 - 11:17 am | सुनील
अभिनंदन!
मी अकरा वर्षे झेन वापरली आणि ३ वर्षांपूर्वी ७५,००० ला विकली. दुसरी गाडी घेण्यासाठी अनेक पर्याय तपासले. वर्ना आणि वेन्टो शॉर्ट्लिस्ट केले. शेवटी दान वेन्टोच्या बाजूने पडले. आज तीन वर्षे होऊन गेली. समाधानी आहे!
25 Nov 2014 - 12:31 am | आजानुकर्ण
जुनी गाडी का बदलताय बॉ? २००८ म्हणजे फार जुनी नाही. चांगली चालत असेल तर तीच वापरा. ह्युंदाईच्या गाड्या १०-१२ वर्ष आरामात चालतात.
25 Nov 2014 - 10:38 am | सुबोध खरे
नवी गाडी घ्यावी कि जुनी यावरील एक लेख मूळ इंग्रजीत आहे तसाच देत आहे.
वाचून पहा विचार करा म्हणजे नवी गाडी घ्यायची कि नाही याच्या विचारांची बैठक पक्की होईल.
मी यात कोणतेही मत प्रदर्शन करीत नाही चूक कि बरोबर हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे
Indians generally trade / upgrade their cars after only 5 years of ownership. Here is a classic situation : Sell a 5 year old WagonR for that shiny new Swift / Getz / Vista. Or an '03 Honda City for a new Civic / Octavia / Corolla. Or an '03 Octavia for a new Laura / Accord.
Either you will buy a new car from the same segment, or upgrade to a higher segment. The latter seems to be the more popular option amongst indians. We were curious to know the absolute financial implications and ran some numbers on the excel. I have used a typical C Segment sedan as the basis of calculation. For segments lower or higher, simply equalize the appropriate numbers.
What actually makes financial sense? Should you retain your existing car for another 3 - 5 years or trade up toward a new car?
Considerations
• Since we are assuming that a 5 year old car is already on hand, I am going to calculate the cost of ownership from the 6th year to the 10th.
• A 5 year old car in India would have typically covered about 60,000 – 80,000 kms. Translated, it still has a good amount of useful healthy life in it. A well-maintained modern C segment sedan will easily deliver reliable service of at least 1,50,000 kms. An immaculately maintained C-segment will go upto 2,00,000 kms or over.
• The loan is entirely paid off (Don’t you just love the non-EMI times of your life!)
Option ONE : Retain your existing car
• Rs. 4,25,000 : The resale value of your 5 year old C-segment sedan (e.g. Honda City) as of today.
• Rs. 20,000 : Averaged maintenance cost per year. Thus, you would spend a total of a lac over the next 5 years on a timing belt replacement, suspension overhaul, new brake pads and other required items.
• Rs, 35,000 : Total cost of insurance premiums for the next 5 years.
• Rs. 1,50,000 : Resale cost (realistic) of your 10 year old C-segment sedan in year 2013.
Thus, if you retain your existing sedan for the next 5 years, you will incur a total ownership cost of Rs. 4,10,000 OR Rs. 82,000 p.a.
Option TWO : Upgrade to a C+ segment car
• Rs. 12,50,000 : Cost of a new Honda Civic or equivalent sedan.
• Rs. 4,25,000 : Proceeds from the sale of your existing sedan used as down-payment toward the new car.
• Rs. 20,000 : Approximate EMI per month for 8.25 lacs on a 5 year term.
• Rs. 6,000 : Averaged maintenance cost per year.
• Rs. 1,20,000 : Total cost of insurance premiums for the next 5 years.
• Rs. 6,20,000 : Realistic resale of your new C+ sedan in year 2013.
Thus, if you upgrade from a C-segment sedan to a C+ segmenter, you will spend a total of Rs. 11,55,000 over the next 5 years. OR 2,31,000 per year
But that’s not the entire picture, is it? What we have not calculated yet is the opportunity cost of the Rs. 20,000 per month that you are blowing away toward the new car’s EMI. If you don’t upgrade, that money can instead be invested. Even if reasonably invested, the saved Rs. 20,000 per month will become a whopping 15 lakh rupees at the end of 2013!
Net net, retaining your current 5 year old sedan (over a 12.5 lakh sedan upgrade) will make you richer by 22.5 lakh rupees over the next 5 years! That’s an earning of Rs. 4,50,000 per year. OR Rs. 37,500 a month.
Shocked? Yup, me too. Remember, the cost of a new car is not the EMI alone. The long list consists of depreciation, taxes, higher insurance premiums, loan interest costs and more. Even if you are a business owner and can avail of depreciation benefits, the numbers still don’t justify an upgrade to a higher sedan. On the other hand, you can consider upgrading sensibly. Plenty of used (and excellent) Accords, Mondeos & RS' in the 6 - 7.5 lakh price band. Lateral upgrades do give you immense bang for the buck.
This is all the more reason to maintain your car well. Not only will it last a longer period and give you reliable service, but it will fetch you a better resale too. Now you know why I am known to use my cars till they drop apart.
25 Nov 2014 - 10:41 am | सुबोध खरे
हा २००८ चा लेख मी संगणकात साठवून ठेवलेला होता पण ती गणिते आजही लागू होतात
25 Nov 2014 - 2:24 pm | वामन देशमुख
प्री-ओन्ड टाटा नानो किंवा मारुती अल्टो घ्यायची म्हणतोय, त्याबद्धलही जाणकारांनी सल्ला द्यावा.
25 Nov 2014 - 2:30 pm | टवाळ कार्टा
नॅनोच्या फंदात पडू नका....आणी ऑल्टो घेतलीत तर K-10 Kappa ईंजिनवालीच घ्या
25 Nov 2014 - 2:47 pm | वेल्लाभट
प्री ओन्ड नॅनो..... वेल्ल्ल....... शक्यतो नको. नवी कोरी घेतलीत तर गाडी वाईट नाहीये. अतिशय प्रॅक्टिकल आहे माझ्या मते. बसून चालवून बघितलंय. मागे पुढे उत्तम लेग व हेड रूम. ८० ९० पर्यंत व्यवस्थित जाते, सिटी ड्राईव्ह साठी उत्तम. अर्थात त्या गाडीच्या मर्यादा आहेतच व हायवेला त्या प्रकर्षाने जाणवतात. लगेज स्पेस न के बराबर. गाडी आवाज खूप करते. एसी बरे आहे. टर्निंग रेडियस, मायलेज उत्तम.
आफ्टर सेल्स ठीकठाकच.
नवीन के१० घ्या. दी बेस्ट एन्ट्री लेव्हल हॅचबॅक. स्वतः वापरतोय. तक्रार नाही. चालवायला सुसाट. ६८पीएस विथ ८०० किग्रॅ कर्ब वेट.... अर्र.... काय उसळते राव गाडी..... प्रेमात....
थोडं बजेट वाढवता आलं, तर ग्रँड आय१० खल्लास गाडी आहे.
27 Nov 2014 - 10:17 am | सुखी जीव
मस्त आहे VENTO. अत्यंत दणकट सेफ.मस्त पिक अप, stable
माझ्यासाठी VENTO का CITY असा प्रश्न होता. CITY च्या प्रेमात पडल्यामुळे VENTO सोडली.
27 Nov 2014 - 11:27 am | वेल्लाभट
हे वाचा
लोकसत्ताचा लेख आहे. यात लिहील्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी झालेल्या सुरक्षा चाचणीत फोक्सवागन ची पोलोही सपशेल नापास झाली होती म्हणे !
आता बोला.
आणि भारतातल्या वेडझव्या ड्रायव्हिंगला जोवर ताळ्यावर आणलं जात नाही (जे व्हर्च्युअली इम्पॉसिबल आहे) तोपर्यंत एअरबॅगच काय, आणखी कुठलंही सेफटी फीचर दिलं तरी अपघाताचा धोका टळणार नाही. तरीही आशा; की नव्या वाहन कायद्याच्या नियमांची चोख आणि प्रामाणिक अंमलबजावणी झाली तर कदाचित थोड्डीशी शिस्त यावी ड्रयव्हर्स ना.
27 Nov 2014 - 11:39 am | टवाळ कार्टा
आजच १ सेदान (बहुतेक होंडा अमेझ) काहीही सिग्नल (हॉर्न, लाईटसची उघडझाप, इ.) न देता डावीकडून फक्त १-१.५ फूट अंतर ठेउन ओव्हरटेक करून गेली... स्पीड ७०+ आरामात असावा तिचा (मीच ५०+ ला होतो)
रस्ता ५ लेनचा एक्स्प्रेस्स हायवे...जेमतेम २ गाड्या टेंपो पॅरलल जात असतानाची वेळ
:(
27 Nov 2014 - 3:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
गोर्या लोकांनी चाचण्या घेतल्या म्हणजे अंतिम? ह्यांचा मित्र म्हणतो की गाडी २०० किमी वेगाने आदळली तर काय होईल अशा प्रकरच्या चाचण्या असतात. येथे पवन पुत्र मारूतीच नव्हे तर चार बांगड्या मिरवणारी भारतात विकली जाणारी ऑडी पण कदाचित नापास होईल.
खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खडे, बेपर्वा चालक्,सगळा रस्ता माझाच असे समजून चालवनारे चालक्,दर १५ सेकण्दांनी हॉर्न वाजवायचाच असा पण केलेले चालक, मागे कितीही रहदारी होवू दे, मी माझी गाडी मला पाहिजे तशीच चालवणार... हे सुधारत नाही तोवर सा़क्षात हेन्री फोर्ड जरी येथे अवतरले तरी अपघात होतच राहतील.
27 Nov 2014 - 4:44 pm | चिगो
नाही हो, माईसाहेब.. गाडी आदळतांना तिचा वेग जर ६०-८० किमी प्रति तास असेल (धोका कळून पॅनिक ब्रेकींग केल्यास आदळण्याच्या वेळी जनरली वेग ह्यापेक्षा कमीच रहात असेल..) तर गाडीचं काय होतं ह्याच्या टेस्ट्स असतात ह्या..
गाडीची "स्ट्रक्चरल इंटीग्रिटी" महत्त्वाची असते म्हणे, ब्वॉ.. फक्त एअरबॅग्स असल्यानी गाडी सुरक्षित होत नाही. बाकी, सीट बेल्ट लावत चला, हां..
27 Nov 2014 - 4:57 pm | llपुण्याचे पेशवेll
Polo ani Ford Figo chi structural integrity tikali mhane. Mhanoon tya air bag lawoon safe hotat. Pan bakichya air bag lawoon pan titakya safe honar nahit mhane. Pan tyat Hyundai i20 ani Swift baddal kay mhatale ahe mahit nahi. Mhanaje structural integrity tikali ka nahi te mahit nahi.
27 Nov 2014 - 5:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान. हे तज्ञ लोक गाडीचे दरवाजे उघडून structural integrity पासून ते तुमच्या त्या थर्मोडायनॅमिक्सपर्यंत पोचले नाहीत म्हणजे मिळवली.
पुंटो,सियाझ,सिटी? त्या टिकल्या का त्यात?
28 Nov 2014 - 11:05 am | पिलीयन रायडर
बेअरिंग सुटायला लागलं ना आताशा माईसाहेबांचं!!!
27 Nov 2014 - 5:59 pm | टिलू
Celerio बद्दल काय मत आहे ? गाडी चान्गली आहे असे ऐकले आहे.
27 Nov 2014 - 7:24 pm | प्रसाद१९७१
बजेट कमी असेल तर मस्त गाडी आहे. मी ऑटो गाडी चालवली आहे. चांगली आहे. ५ लाखात ऑटो गाडी म्हणजे स्वस्त आहे.
28 Nov 2014 - 10:42 am | वेल्लाभट
सहमत. चालवलेली नाही. रिव्ह्यूज आणि स्पेक्स वरून सांगू शकतो की उत्तम पर्याय आहे. थोडं अधिक बजेट असल्यास झेस्ट बघू शकता.
28 Nov 2014 - 12:36 pm | बाहुली
होण्डा ब्रिओ कशी आहे ??
30 Nov 2014 - 7:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
छान आहे. जागा कमी आहे पण खुप. ६ फुट उंच असाल तर बसायला त्रास होईल.
29 Nov 2014 - 9:27 pm | माझीही शॅम्पेन
वेंटो नक्कीच चांगली आहे
पण
टाटा झेस्ट (Zest) चालवून पहा अफालूत्न गाडी आहे म्हणतात ना खेळ-बदलू ...कमीत कमी बजेट मध्ये जबरस्त !!!!
1 Dec 2014 - 11:32 am | चिगो
मान्य आणि धन्यवाद.. धन्यवाद कारण की मी ही गाडी घेतोय आणि मिपावर ह्या गाडीला "अंगठा वर" देणारे आहेत, ह्याचा आनंद..
1 Dec 2014 - 11:55 am | घाटावरचे भट
सध्या भारतात बेस्ट इंजिनीयर्ड कार्स कोरियन आहेत. जर्मन आपल्याकडे कचर्याखेरीज काहीच विकत नाहीत, विशेषतः मास मार्केटात (चांदणी, बांगड्यांबद्दल हे विधान नाही.(म्हटलं तर आहे. खरं तर एक्स-१, क्यू-३, ए-क्लास ही याचीच उदाहरणे आहेत)).
परत फोवेच्या डीलर्सचा माज, कंपनीचा माज (वॉरंटी आणि इतर क्लेम बाबत)आणि एकुणच आफ्टर सेल्स सर्व्हिसची अवस्था बघता सध्या फोक्सवॅगनच्या वाटेला न गेलेलंच बरं.
1 Dec 2014 - 1:11 pm | योगी९००
नुकतीच अमेझ गाडी माझ्या पहाण्यात आली..(माझ्या चुलत भावाने घेतली म्हणून....त्याने त्याची स्विफ्ट डिझेल विकली आणि अमेझ पेट्रोल घेतली).
डिझायर बुक केल्यानंतर ही अमेझ लाँच झाली होती. त्यामुळे होंडा गाडी घेऊ शकलो नाही अशी चुटपुट वाटली. पण नवीन अमेझ बघीतल्यावर डिझायरचा निर्णय चांगला होता हे पटलं. अमेझच्या पत्रा एकदम तकलादू वाटला आणि workmanship सुद्धा सो सो वाटली. आणि अमेझचा डॅशबोर्ड कमालीचा outdated वाटला. डिझायर किंवा असेंन्ट च्या डॅशबोर्ड्च्या तुलनेत होंडा अमेझ फारच डावी वाटली. गाडी चालवताना केबीन मध्ये थोडा जास्त ईंजीनचा आवाज येतोय असे वाटले पण पिक-अप्/ब्रेकींग मात्र व्यवस्थित वाटले.
अमेझ गाडी launch करण्यात होंडाने थोडी घाई केली असे वाटते. डिझायरला टक्कर देण्यासाठी आणि किंमत कमी ठेवण्यासाठी कमी गुणवत्तेचे मटेरीयल वापरेले असावे अशी शंका आली. होंडाकडून ही अपेक्षा नव्हती. (पण होंडा सिटी मात्र खुपच छान आहे).
1 Dec 2014 - 3:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे. डिझायरचा पत्रा जेमतेम. फोक्स्वॅगन व फियाट गाड्या जास्त मजबूत वाटतात. दुर्दैवाने फोकस्वॅगन्चे लोक विमान विकल्याच्या थाटात बोलत असतात.त्यामुळे तेथे जाणारे लोक कमी.
टाटांच्या गाड्यांबद्दल न बोललेलेच बरे.
1 Dec 2014 - 4:21 pm | प्रसाद१९७१
होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे. डिझायरचा पत्रा जेमतेम.>>>>> अहो पत्र्याच्या जाडीवर काही नसते अवलंबुन. फ्रेम कशी आहे आणि कीती चांगली डीझाइन केली आहे ते महत्वाचे असते. फ्रेम नुसती मजबुत, जाडजुड असुन पण उपयोग नाही, लवचिक पण पाहीजे. शॉक शोषुन घेइल अशी पाहीजे.
पत्रा नुस्ते झाकण्याचे काम करतो, बाकी काही नाही.
1 Dec 2014 - 5:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मागून टेम्पोने वा रि़क्षाने धडक दिली तर अमेझचे सगळे डिझाइन मागून बाहेर येइल असे हे म्हणतात. फक्त जाडीवर नसते हे मान्य पण भारतात तरी ते म्हत्वाचे आहे.
1 Dec 2014 - 10:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी बरोबर.