येऊर भटकंती-संजय गांधी उद्यान

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
22 Nov 2014 - 10:44 pm

आज येऊर (ठाणे)येथे गेलो होतो.

ठाणे स्टेशन पश्चिम येथून१६ नंबर बस येऊरसाठी सुटते. सकाळी साडेपाच पासून दर अर्ध्या तासाने बस आहे. पंधरा रुपये तिकीट आहे अर्धा तास लागतो. शिवाईनगर स्टॉप नंतर 'भकेँद्र' स्टॉप आहे. तिथे केँद्र सरकारच्या वनखात्याचे कार्यालय आहे मागच्या अंगणात रुईची पंचवीसेक रोपटी लावली आहेत.याला फुलपाखरू उद्यान संबोधले आहे.येथे वनखात्याने नुकत्याच सुरु केलेल्या फुलपाखरे उद्यानात काही नाही .
इथून 'संजय गांधी उद्यान बोरिवली' या राष्ट्रीय उद्यानाची पूर्व हद्द सुरू होते. बसने शेवटच्या स्टॉपला उतरून संजय गांधी उद्यानात दोन तास भटकलो. दुपारच्या वेळेमुळे बिबळ्या झोपला होता.:) पण फुलपाखरे खूप असली तरी चपळ झाली होती:( फोटो नाही मिळाले. झाडांच्या फोटोवर मोबाईल कैमऱ्याची समजूत काढली.

१६नं बस रूट:ठाणे प॰, जांभळी नाका,शक्ती मिल, -आंबेडकर रोड-LBS-नाका,ठाणे एसटी आगार, लाइफलाइन हॉस्पीटल,खोपट,(हाइवेखालून) कैडबरी,जेकेग्राम,वर्तकनगर नाका,शास्त्री नगर,शिवाइनगर,खंडेलवाल इस्टेट,भकेंद्र (संजय गांधी उद्यान कमान),-घाट-एर फॉर्स,येऊर गाव,स्वानंद बाबा आश्रम, रोणाचा पाडा,पाटणपाडा,येऊर.

१)संजय गांधी उद्यान बोरिवली'मध्ये येऊरकडून अधिकृत प्रवेश नाही. ती पाटी.

२)आणि हे बिबट्याबद्दल सावध राहण्यासाठी

३)ही मुख्य वाट

४)एका ओढ्यात पाणी वाहत होते

५)काही झाडांनी पाने गाळली होती

६)चार सह्या केल्याशिवाय हे साहेब दिवस सुरू करत नाहीत

७)पाहुण्याचा आहारासाठी स्वागताला पांढरीरेशमी चादर पसरून दारात वाट पाहणारा कोळी

८)मंद उडणारे फुलपाखरु(SAILOR)

९)शेवाळ ?('लाइकन')

१०)वारूळ

११)अजून एक आतिथ्यशील

आणखी काही झाडे
१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

विशेष सूचना:
१९ मे २०१६ । आज येऊरकडून संजय गांधी उद्यानात जाण्यासाठी गेलो होतो परंतू आता प्रवेशच बंद केला आहे.मोठी आठ फुटी भिंत घातली आहे.

प्रतिक्रिया

आमच्या (मध्यवर्ती) डोंबोली पासून हे ठिकाण जास्त दूर नाही....

कट्टा यशस्वी होईल. येऊर गावात बरीच हॉटेल्स आहेत हे लिहायचे विसरलो होतो.

मुक्त विहारि's picture

23 Nov 2014 - 2:01 am | मुक्त विहारि

आपापला डबा घेवून यायचा.अंगत-पंगत करायची.

आणि

श्रम परीहारार्थ, नंदी पॅलेस आहेच.

लहानपण आठवलं !! महीन्यातुन एक फेरी असायची !! आता बरीच वर्षे गेलो नाही. आतमध्ये एअरफोर्सचा एक तळ आहे. पावसात जाण्याची मजा काही औरच. काही ठीकाणाहुन ठाण्याचे मनोहारी दर्शन घडते. एक आश्रमही आहे बाबांचे नाव आता आठवत नाही. सायकलने वर जायचो आणि येताना पैडल न मारता वर्तकनगरपर्यंत यायचो. जवळच उपवनचा निसर्गरम्य तलावही आहे. सद्या त्यातले पाणी खूप कमी झालंय असं ऐकले.

एकंदर कट्ट्यासाठी अतिउत्तम जागा.

खटपट्या's picture

23 Nov 2014 - 1:34 am | खटपट्या

abcd

प्रचेतस's picture

23 Nov 2014 - 9:10 am | प्रचेतस

मस्त.
ह्या निमित्ताने आंबा घाटानजीकच्या घनदाट अरण्यातून वाट काढत वरच्या सड्यावर पोहोचलो होतो त्याची आठवण झाली.

एस's picture

23 Nov 2014 - 11:05 am | एस

चांगले ठिकाण दिसतेय. एकदा भेट द्यायलाच हवी.

बहुगुणी's picture

23 Nov 2014 - 12:25 pm | बहुगुणी

धन्यवाद!

(शेवाळ म्हणजे algae, तुम्हाला झाडावर दिसलं ते lichenच आहे, त्याला दगडफूल म्हणतात बहुतेक मराठीत)

बहुधा हेच शेवाळं पावसाळ्यात रात्री चमकत असतं. झाडी खूप प्रकाशमान दिसतात ह्यामुळे.

बहुगुणी's picture

24 Nov 2014 - 10:13 pm | बहुगुणी
टवाळ कार्टा's picture

24 Nov 2014 - 10:17 pm | टवाळ कार्टा

लय भारी...कुठे बघायला मिळेल हे?

भुमन्यु's picture

26 Dec 2014 - 5:15 pm | भुमन्यु

ते lichen असण्याचे चान्सेस खुप कमी आहेत. lichen हे प्रदुषण विरहित परिसरातच अढळताम, त्यामुळे येऊर मध्ये lichen सापडणे जरा अवघडच

भिमाशंकरला पावसाळ्यात वाळक्या काटक्यांवर रात्री चमकणारे शेवाळे पाहायला जातो ते कुठले ?

भुमन्यु's picture

26 Dec 2014 - 7:15 pm | भुमन्यु

बहुदा ते lichens असावेत. कारण मी जुलै २०१४ मध्ये गेलो होतो तेव्हा बर्‍याच ठिकाणी lichens अढळले होते.

दिपक.कुवेत's picture

23 Nov 2014 - 12:45 pm | दिपक.कुवेत

पण फोटो अजुन सुस्पष्ट चालले असते.

दिपक ,खरं सांगायचं म्हणजे माझा मोबाइल ऑटोफोकस नाही आणि ५०सेमी मिनीमम फोकस आहे. मी नेहमीचं भिंग नेले नव्हते. माझा चष्मा पुढे धरून फोटो काढले चष्मा काढल्यामुळे नीट दिसत नव्हते.

छोटेखानी भटंकती .
आवडली.

निखळानंद's picture

24 Nov 2014 - 7:01 pm | निखळानंद

कुठल्याही गोष्टीची साद्यंत माहिती देण्याची मिपाकरांची पद्धत खूपच कौतुकास्पद आहे.
कुठल्या क्र. ची बस तिथे जाते - तिचे प्रवास भाडे आणी थांब्यांसकट महिती देणे हे आपल्या fellow मिपाकरांच्या प्रती असलेल्या जिव्हाळ्यातूनच येत असावे !

येथे वनखात्याने नुकत्याच सुरु केलेल्या फुलपाखरे उद्यानात काही नाही<\cite>
किंवा
दुपारच्या वेळेमुळे बिबळ्या झोपला होता.:) पण फुलपाखरे खूप असली तरी चपळ झाली होती<\cite>

अश्या नोंदींमुळे काही विशेष नसलेल्या गोष्टींचे वर्णन ही विशेष खुमासदार होऊन जाते !
आवडले..

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2014 - 7:08 pm | टवाळ कार्टा

मग काय...काही "अतीपरिचित" मिपाकरांनातर बाकीचे टेंप्युतपण "व्यवस्थित" बशीवतात ;)

झकास वृतांत कंजूस काका

प्रवासभाडे आणि भटकंतीसाठी लागणारा वेळ अशासाठी नोंदवतो की जर तुम्ही एखादे वाहन भाडयाने ठरवले तर गंडत नाही. त्यांचा हिशोब प्रत्यक्ष किती किमी गेलात यापेक्षा किती तास त्याचे वाहन पार्क करून वेळ वाया घालवणार यावर असतो. टुअरिस्ट जागांवर साधारणपणे तासाला दोनशे रुपये काढण्याचा रिक्षावाल्यांचा इरादा असतो. टैक्सिवाले आणखी मागतात.थोडक्यात सांगायचे म्हणजे नियोजन करणे सोपे जावे हा हेतू .जो तो आपल्या आवडीप्रमाणे वेळ घालवणार अपेक्षाभंग तरी होत नाही.

सचित्र वृत्तांत आवडला.