विचीत्र प्राणी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
3 Nov 2008 - 8:49 am
गाभा: 

माझ्या सहीचे इंग्रजी मध्ये संक्षिप्त रुप वि.प्रा. होते. वि.प्रा.= विचीत्र प्राणी .माझे माझ्या एकुलत्या एक बायकोने ठेवलेले पेट(परत प्राणी) नाव."तुझा नवरा जरा विचीत्र आहे तेंव्हा जरा संभाळुन" हा माझ्या सासूने साखरपुड्यानंतर सल्ला दिला आपल्या आवडत्या कन्येला. अर्थात हे नंतर कळले.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. पसंद पण पडली.(पहिल्या मैत्रीणी बरोबर विलक्षण साम्य). मोठ्या भावाबरोबर आधी ठरल्याप्रमाणे उगाच आढेवेढे न घेता होकार दिला.
मुलीच्या काकाने मुलीबरोबर बोलण्याचा प्रस्ताव मांडला. लगेच एका वेगळ्या रुमची व्यवस्था पण झाली. अशावेळी होणा-या बायकोबरोबर नेमके काय बोलायचे असते ह्या बाबतीत काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे मी नको म्हट्ले. सासूच्या चेहे-यावर आश्चर्य.
काका काही पाठ सोडेना. "अहो, जावईबापू, बघा आवडीनिवडी जुळतात का बघा"
त्यात आगावू चुलत मेहुणी ने भर घालायला सुरु केली "आताच बोला, नंतर निळणार नाही" चा सडलेला विनोद करुन. काय करावे सुचेना. मग शेवटी निर्धार केला आणि हत्यार काढले.
काय बोलु? कुठला विषय बोलु? कसली चर्चा करु? कसल्या आवडी निवडी? माझ्या भविष्यातील वैवाहिक जिवनाशी त्याचा काय संबंध. आणि समजा आवडी निवडी जुळल्या नाही तर काय करु? नकार देउ. (सासु चा चेहेरापांढरा फटक )ही माझी बायको- विषय संपला. काय जुळवाजुळव ती माझी मी बघुन घेईन. म्हणुन मी वि.प्रा.
एक बरे आहे गेल्या २३ वर्षात सासरकड्ची मंडळी माझ्या नादाला लागत नाही. वेळ वाचतो हो उगाच मनात नसताना ह्यँ, ह्यॅ करण्यापासुन.
लग्न झाल्यानंतर सुमारे ५ वर्षानी मोठ्या वहिनीने गणपती त एकदा बायकोला खाजगीत (मला कानावर पडेल ह्या आवाजात) विचारले. " तुला भिती वाटते का ग. तुझा नवरा कायम घोळ्क्यात. अगदी लहानपणापासुन बघतेय. आजही तेच आहे. आजकाल काही सांगता येत नाही. कुणी तरी गळ्यात पडली तर?"
बायकोने अगदी शांत आवाजात उत्तर दिले. " ह्यांच्या प्रेमात पडणा-याबद्दल मला भिती नाही सहानुभुती वाटेल. कारण ह्या माणसाकडे स्वःतवर प्रेम आणि आपल्या कामावर प्रेम करुन आणि कोणावर प्रेम करायला वेळ आणि जागा (?)शिल्लकच नाही.
जाता जाता: लग्नाच्या अगोदर चार दिवस मला अपघात झाला. दोन्ही हात संपूर्णपणे प्लास्टर मध्ये. अनेस्थेशियात जायच्या आधी डॉक्टरला दोन्ही हाताची दोन बोटे मो़क्ळी ठेवायला सांगितली होती हार घालण्याकरिता. लग्न पुढे ढकलण्यात अर्थ नव्हता. उगाच पैशाची नासाडी आणि मानसिक त्रास. परत आमच्याकडल्या कोणी पायगुण वगैरे वाद काढण्याची शक्यता होतीच की. सगळे लग्न एक कॉमेडीच होती. खास करुन प्लास्टर मधील नवरा हा फार मोठा मस्करी चा आणि सहानुभुती चा विषय झाला. माझे स्पेशलायझेशन माहित नसलेल्या भगिनीवर्गानी रिसेप्शन मधे समजुत काढताना डोळ्यात पाणी काढले.(३ महिने कळ सोस वगैरे). मी पण एक डायलॉग सुमारे १०० वेळा सहन केला. शेवट शेवटी तर ओरडून सांगावेसे वाटले, " प्लास्टर हाताला आहे" गप्प बसण्यात शहाणपणा होता.
सासुने ३.५ महिन्यात "जावई माझा भला म्हटले.
सासू सॉफ्टवेअर हार्डवेअर चे प्रॉब्लेम असलेली कपल्स रिफर करते. आता विचीत्र प्राणी नाय म्हणत.
एक प्रष्नः आज काल ३ ते ४ मिटींगा होतात म्हणे मुलगी बघितल्यानंतर. नेमके काय बोलतात ते होणारे जोडीदार? एवढ सगळ बोलुन होणा-या लग्नानंतर घट्स्फोटाचे प्रमाण का वाढते आहे.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2008 - 9:05 am | प्रकाश घाटपांडे

विंडोजतुन डोकावणारी बदलती नातीहा २१ आक्टोबर २००७ लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील चिन्मय बोरकर यांचा लेख अप्रतिम आहे.

जागतिकिकरणाचा परिणाम केवळ आर्थिक वा तंत्रज्य़ान क्षेत्रावर होत नाहीत, तर ते नाते संबंधांवरही होतात. आय.टी. संलग्न क्षेत्रात सध्या लग्न टिकणे ही समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे येत्या काळात हा प्रश्न अधिक व्यापक होणार आहे. आधुनिकतेच्या प्रचंड फोर्स मध्ये पारंपारिक व्यवस्थांना धक्के बसत आहेत. नात्यांची वीण बदलत आहे.
असं चिन्मयने लिहिल आहे

प्रकाश घाटपांडे

संजय अभ्यंकर's picture

3 Nov 2008 - 5:00 pm | संजय अभ्यंकर

प्रकाशजिंनी म्हटल्या प्रमाणे घटस्फोटांची समस्या वाढट आहे.

वि.प्रं.नी म्हटल्या प्रमाणे लग्ना आधी मुला - मुली च्या ३-४ भेटीतून काय साध्य होते ते समजत नाही.

मी एका मुलीला पहायला गेलो होतो तेव्हाव्ही गोष्टः
मुलीच्या आईने मुली बरोबर वेगळ्या खोलीत गप्पा मारायचा बराच आग्रह केला.
मी सांगीतलेकी मला जे सांगावयाचे आहे ते चारचौघां देखत सांगीतलेले आहे. या उप्पर मुलीला काही विचारायचे असेल तर मी तिच्याशी वेगळ्या खोलीत गप्पा मारायला तयार आहे.

वेगळ्या खोलीत गप्पा मारायच्या राहील्या बाजूला, संपुर्णं बघण्याच्या कार्यक्रमात मी आणी मुलीचे आई-वडीलच गपा मारत होतो. मुलीने चेहेर्‍यावरची माशी सुद्धा हलू दिली नव्हती.

हा प्रसंग आठवून आजही हसू येते.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 9:09 am | विनायक प्रभू

भारतात न्युपिटल ऍग्रिमेंट लवकरच ही एक अट होईल.

प्रि नप ही नवरा-बायको दोघांच्या हिताचे सारखेच रक्षण करते. चांगली गोष्ट आहे.

आता समुपदेशन प्रकार देखील केव्हाचा आलाय तरी कुठे सगळेच लोक त्यांच्याकडे थोडेच जातात? व समुपदेशन घेणारे सगळे सुखान्त असतील असे थोडेच आहे?

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 9:34 am | विनायक प्रभू

समुपदेशन हे एक फॅड आहे. ९९% बकवास. समुपदेशन घेणारे सोडा करणारे सुद्धा सुखी नसतात.
प्रि. नप कधी वाचले आहेका? भारतिय कायदा परिस्थितीत त्याचे योग्य एक्झीक्युशन फार
कठीण वाटते.
सर्वात योग्यः अय शेख तेरी तू देख.
समुपदेशक गेला ढगात.

नीधप's picture

3 Nov 2008 - 10:20 am | नीधप

समुपदेशनाने काहीच भलं घडत नाही का?
मला अनुभव नाही पण चार चांगल्या गोष्टी ऐकून होते आजवर म्हणून विचारतेय...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 10:30 am | विनायक प्रभू

वेळ आणि पैसा खर्च करुन समुपदेशकाचा सल्ला अयकायला कानच बंद असतात. जे अयकतात आणि त्याचा वापर करतात त्यांचे नक्कीच भले होते.

समुपदेशनाच्या नावाखाली शिंग मोडून वासरात धुडगुस घालताय.
ऑल पीस अँड विंड.....
ग्रासरुट लेवलला काम करा आता.

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 8:51 pm | विनायक प्रभू

हा कसला राग बॉ?
कसली वासरे?
मला शिंगे कधी उगवली?
तुम्ही म्हणता ते ग्रास रूट कुठे आहे?
कसला पीस कसला वींड
ज्या मिपा वाल्यानी हाक मारली त्याच्यापर्यंत पोचलो की?
एकतर गेले १ महिना तुम्ही भेटत नाही कारण काय ते माहित नाही.
आपला नम्र
विप्र

शैलेन्द्र's picture

3 Nov 2008 - 9:19 am | शैलेन्द्र

"काय बोलु? कुठला विषय बोलु? कसली चर्चा करु? कसल्या आवडी निवडी? माझ्या भविष्यातील वैवाहिक जिवनाशी त्याचा काय संबंध. आणि समजा आवडी निवडी जुळल्या नाही तर काय करु? नकार देउ. (सासु चा चेहेरापांढरा फटक )ही माझी बायको- विषय संपला. काय जुळवाजुळव ती माझी मी बघुन घेईन."

यशस्वी वैवाहिक जिवनाचे सार येथे आहेत....

विजुभाऊ's picture

3 Nov 2008 - 9:51 am | विजुभाऊ

दाखवणे बघणे कार्यक्रमात समजूत दार पालक मंडळी "चला तुम्हाला टेरेस दाखवतो म्हणत नवर्‍याकडच्या लोकाना बाहेर काढतात्.किंवा त्याना आता बोलुद्या कोठेतरी जाउन असे साम्गतात. त्या अर्ध्या तासात मुलीली तु म्हणाचे. की तुम्ही या पासुन सुरुवात होते. मुलगा काहितरी बडबडतो आणि मुलगी पसन्त करतो ( बहुतेकदा) मुलगी घुम्यासारखी बसुन रहाते.
ती फक्त हम्म हो नाही किंवा हा समोर बसलेला प्राणी अजून काय विचारेल असा विचार करत असते. बरे बाहेर गेले असतील आणि जास्त वेळ लागला तर आपल्या चिरन्जिवानी नवख्या मुलीला काय दाखवायला नेले आहे या चिन्तेत घरातली मंडळी असतात.
कसनुसे हसत आणखी एकदा चहा पितात. आणि ती दोघे आल्यावर मुलगा आईशी कहितरी बोलतो. मुलेगी आतल्या खोलीत जाते. ती तिच्या आइशी काही तरी बोलते.
मुलाची आई मुलाच्या वडिलाना काहि सांगते मुलीची आई मुलीच्या वडिलाना काहितरी साम्गते.
अशा रितीने मुलाचे आणि मुलीचे आइ वदील लग्नाला तयार होतात.
मुलगी पाया पडते मुलीला साडीचोळी दिली जाते.
शुभमन्गल सावधान..................
ढुम ढुम ढुम ढु ढुमक्क
( सावधान हे शब्द ऐकल्यावर समर्थ रामदास बोहोल्यावरुन पळाले आणि त्यानी " प्रपंच करावा नेटका" हे लिहिले.)

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

ऋषिकेश's picture

3 Nov 2008 - 9:58 am | ऋषिकेश

माझ्या बर्‍यापैकी जवळच्या एका मित्राने, मुलगी घरच्यांचे क्रायटेरीया पूर्ण करते ना बास! मी ऍडजेस्ट करून घेईन.. ते काहि वाईट मुलगी बघणार नाहित असा पवित्रा आजच्या जगात घेतला तेव्हा आम्ही सो कॉल्ड मॉडर्न लोकांनी त्याला जवळजवळ वेड्यात काढले. आता त्यांचा गेले २ वर्षे चाललेला संसार बघुन तरी त्याचा निर्णय चुकला असे वाटत नाहि.

तरीही जेव्हा माझ्यावर लग्नाबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा इतक्या अलिप्तपणे+निर्भिडपणे मी निर्णय घेऊ शकणार नाहि हे देखील मी जाणून आहे. जे व्हायचे ते तसंही होणारच आहे. पण म्हणून सगळंच नशिबाच्या हवाल्यावर सोडणं कठिण वाटतं. जर निर्णय चुकला तर तो माझा चुकेल..नशीबाचा नाहि.... अश्यावेळी नशिबाला दोष देण्यात काय हशील?
काय हवंय यापेक्षा नक्की कशी मुलगी नको आहे हे लक्षात ठेवणं गरजेच आहे असे मला वाटते. मला ३-४ मिटिंग्ज लागतीलच ;)

(आयटीमुळे मिटींग्ज-टेलिकॉनची सवय लागलेला ;) ) ऋषिकेश

एक प्रष्नः आज काल ३ ते ४ मिटींगा होतात म्हणे मुलगी बघितल्यानंतर. नेमके काय बोलतात ते होणारे जोडीदार? एवढ सगळ बोलुन होणा-या लग्नानंतर घट्स्फोटाचे प्रमाण का वाढते आहे.

तुमच्या मते एकदा भेटले की परत लग्न होईपर्यंत भेटू नये की लग्न ठरवले तरच पुढे भेटणे? घटस्फोटाचे प्रमाण व लग्नाआधी जुजबी बोलणे किंवा विस्तारपुर्वक बोलणे याचा नेमका कसा संबध लावत आहात?

तुमच्यासारखे थोडक्यात पिंक टाकायची तर मी असे म्हणेन की आज काल घटस्फोट होतात कारण पुर्वीसारखे चालवून घेत नाही कोणी. पटत नाही तर जा उडत. आजकाल कित्येक घटस्फोटीत लोकांचे सुखी दुसरे विवाह पाहीले आहेत. तुम्हाला काय वाटते लोक हौस म्हणुन घटस्फोट घेतात?

कोणाचे स्पेसिफीक प्रि नप वाचले नाही. पण त्याबद्दल थोडीफार जी माहीत आहे त्यात दोन्ही बाजुच्या (आर्थिक) हक्कांचे रक्षण होते व दोन्ही बाजुचे वकील आपल्या अशिलांना योग्य असाच करार घेतात.

भारतिय कायदा परिस्थितीत त्याचे योग्य एक्झीक्युशन फार कठीण वाटते.
हे न्यायालयच ठरवेल. त्याचा प्रि नप नसावे असा अर्थ काढताय का?

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 3:17 pm | विनायक प्रभू

बरे बाबा. पिंक टाकणार नाही>

मदनबाण's picture

3 Nov 2008 - 10:11 am | मदनबाण

नेमके काय बोलतात ते होणारे जोडीदार?
मला मुलींकडुन आलेले काही प्रश्र..
१)तुझे तुझ्या नोकरीतील फ्युचर काय वाटते?
२)तुझे अफेअर वगरै आहे का ?
३)तुझ्या माझ्या विषयी काय अपेक्षा आहेत ?
४)पगार इन हॅन्ड किती मिळतो?
५)माझ्या आधी किती मुली पाहिल्यास ?
६)तु कधी भांडतोस का ?
अजुन किती काय .....

माझ्या मते १ सेटिंग घ्या नाहीतर १०...समोरची व्यक्ती ही गुडी गुडीच वागणार त्यामुळे खरे व्यक्तीमत्व कळणे तसे मुश्कीलच आहे!!

मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

सहज's picture

3 Nov 2008 - 10:17 am | सहज

शाब्बास मदनबाण बरोब्बर बोललास

माझ्या मते १ सेटिंग घ्या नाहीतर १०...समोरची व्यक्ती ही गुडी गुडीच वागणार त्यामुळे खरे व्यक्तीमत्व कळणे तसे मुश्कीलच आहे!!

वैयक्तिक मत - प्रेमविवाह ते सुद्धा निदान दोन वर्षांच्या प्रेमानंतर.

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 11:21 am | विनायक प्रभू

सर्व प्रष्न नेहेमीचे.
हीच माझी बायको ही भावना आल्यानंतर इतर प्रश्न नगण्य होतात. हा असे वाटून सुद्धा तुझ्या भावनाविरुद्ध मुलीच्या धारणा असतील तर मात्र "तू नही तो ऑर सही". हा नियम दोन्ही बाजुनी लागू.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोण, कधी, का आवडेल सांगता येत नाही, प्रेमविवाह असू देत वा ठरवलेलं लग्नं. फक्त त्या दोन व्यक्ती एकमेकांशी किती कमिटेड (मराठी शब्द?) आहेत तेच महत्त्वाचं! आणि ही कमिटमेंट होण्यासाठी किती वेळा आधी भेटावं लागेल तेही व्यक्तीसापेक्ष असावं. त्यात सर्वसमाविष्ट विधान करता येणं कठीणच आहे.
किती लोकांना स्वतःचीच संपूर्ण ओळख असते की आपल्या स्वतःच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत ते आपलं आपल्याला समजावं?

(कमिटेड) अदिती

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 10:33 am | विनायक प्रभू

क्या बात कही अदिती

विसोबा खेचर's picture

3 Nov 2008 - 11:12 am | विसोबा खेचर

अदितीने छान लिहिलं आहे..

आपला,
(कुणालाही कमिटेड नसलेला) तात्या.

अवलिया's picture

3 Nov 2008 - 11:28 am | अवलिया

क्या बात है संहिताजी ! फार छान !
पण असे समर्पण करणे फारच थोड्यांना जमते. बाकी सर्वत्र फक्त बाजारच आहे...देवघेवीचा. रोखठोक.

नाना

भाग्यश्री's picture

3 Nov 2008 - 1:31 pm | भाग्यश्री

अदितीशी प्रचंड सहमत ! कमिटमेंट, विश्वास, याला खूप महत्व आहे.. तसेच मी यात तडजोडीलाही महत्व देईन थोडं. मी माझ्या मैत्रिणींवरून बघते, कोणीही तडजोडीला तयर नसतं. मान्य आहे की, आपण इतके सर्वगुणसंपन्न असताना तडजोड का करावी वगैरे विचार येतात. पण ती करावी लागतेच. कुठे ना कुठे.. हे एकदा ध्यानात ठेवलं की माझ्यामते सर्व गोष्टी सुरळीत होतात.
बाकी आमच्या लग्नाचीही कथा थोडीफार विप्रंसारखीच असल्याने मजा वाटली.. अविश्वसनिय वाटावं इत्कं फास्ट लग्न ठरलं.
पण अर्थात नंतर एकमेकांना पूर्णपणे समजुन घ्यायला चिक्कार वेळ असल्याने काहीच प्रश्न आला नाही..

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 1:36 pm | विनायक प्रभू

मला वेळ प्लास्टर ने दिला.

चतुरंग's picture

3 Nov 2008 - 10:01 pm | चतुरंग

प्लास्टरमधल्या हातांनी 'हात' दिला म्हणा की!!
मास्टर ब्लास्टरला प्लास्टरचे काय ओझे!! ;)

चतुरंग

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 10:05 pm | विनायक प्रभू

फूल ब्लास्ट.

चतुरंग's picture

3 Nov 2008 - 3:54 pm | चतुरंग

किती लोकांना स्वतःचीच संपूर्ण ओळख असते की आपल्या स्वतःच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत ते आपलं आपल्याला समजावं?

एकदम लाख वाक्य!

आमच्या कारभारणीची आणि आमची एकच भेट झाली. एकमेकांना बघताक्षणीच दोघांच्याही डोक्यात घंटा वाजली होती की येस हाच/हीच आपला जोडीदार.
तरीही त्यादिवसापासून लग्न साधारण ३ महिन्यांनी झाले. बर्‍याचवेळा फिरायला गेलो. बोललो.
पुढील बाबतीत एकमेकांच्या अपेक्षा काय आहेत - आवडी-निवडी, पैसा, धंदा, दोघांनी नोकरी करणे/न करणे, मुलं-बाळं, नातेवाईक, घरातले लोक, मित्र/मैत्रिणी इ. ह्यासंबंधी बोलणे महत्त्वाचे.
ही फक्त सुरुवात असते. एकमेकांना मान देणं, वैयक्तिक आवडीला सामावून घेणं आणि समर्पण ही यशाची गुरुकिल्ली!
दोघांच्या मधे ईगो आला की इनो घ्यायची वेळ आलीच म्हणून समजावे!
संसारात भांडणे होणार, वादविवाद होणार, तापातापी होणार - कशासाठी हे होते आहे ह्याचे मूळ शोधून त्यावर इलाज हा प्रत्येक प्रश्न सोडवायचा राजमार्ग! कितीही कंटाळा आला, वीट आला तरी कोणताही प्रश्न अर्धवट टाकू नका! सोनं चोख असेल तर अशा तापातापीतूनच बाहेर पडतं! तुम्ही मनाने स्वतःजवळ आणि मग एकमेकांजवळ येत जाता.

बोहल्याच्या जवळ उभ्या असलेल्या समस्त मिपाकरांना/मिपाकरणींना शुभेच्छा!! B)

(खुद के साथ बातां : रंगा, कुठेसं वाचलं होतंस ना? "आय ऍम दि बॉस इन धिस हाऊस अँड आय हॅव माय वाईफ्स परमिशन टु से सो!" ;) )

चतुरंग

विप्र साहेब , पुन्हा एकदा उत्तम विषय आणि योग्य हाताळणी , हाबिणंदण .. आम्हाला समजला तुम्हाला काय म्हणायचा तां ..

"प्लास्टर हाताला आहे हो "
=)) =)) =))

रंगाकाका के साथ बातां : आमची घंटी तर न पघताच वाजलेली, आणि भेटल्यावर सायरन वाजलेले .. मग बाकी गोष्टी जसे उंची, रंग , जात-पात किंवा तत्सम ...गौण ठरल्या .. आता गोष्ट वेगळी आहे की लग्नासाठी मुलगी बघायला गेलो नव्हतो , आणि त्या अनुशंगाने बोलणी झालीच नाहे .. परंतू असं जरूर वाटलं भो .. शोध संपला आहे ...

-- विचारी प्रेवी.
टारझन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 4:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(खुद के साथ बातां : रंगा, कुठेसं वाचलं होतंस ना? "आय ऍम दि बॉस इन धिस हाऊस अँड आय हॅव माय वाईफ्स परमिशन टु से सो!" )

मी हेपण ऐकलं होतं, "बीईंग माय हसबंड ही इज द हेड ऑफ द फॅमिली, अँड बीईंग हीज वाईफ, आय ऍम द नेक, आय डिसाईड विच डायरेक्शन टू लुक ऍट!" ;-)

चतुरंग's picture

3 Nov 2008 - 4:52 pm | चतुरंग

लचकली गं मान माझी!! ;)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 5:02 pm | बिपिन कार्यकर्ते

एक साधा सरळ माणूस असतो. त्याची बायको लै खाष्ट असते. एकदा त्यांचं भांडण होतं. बायको काठी घेउन नवर्‍याच्या मागे लागते, नवरा पळत सुटतो. पळता पळता नवरा पलंगाखाली जाऊन लपतो. बायको महाकाय असल्याने, पलंगाखाली नाही शिरू शकत. ती बाहेरूनच ओरडते, 'अबे छुपता क्यों है? बाहर आ'

नवरा पलंगाखालून म्हणतो, 'नही आउंगा, मर्द की जबान है, एक बार बोल दिया नही आउंगा बाहर तो बोल दिया.'

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

3 Nov 2008 - 5:05 pm | चतुरंग

बिपिनभौ, एकदम धोबीपछाड आहे हा!!! =)) =)) =))

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 5:09 pm | बिपिन कार्यकर्ते

ह्म्म्म...

काय करणार रंगाशेठ, इथे मिपावरच थोडं बोलता येतं हो... अजून माझी बायको इथे नाहिये ना, म्हणलं थोडं मन मोकळं करावं, आपबीती सांगावी, तेवढंच मन हलकं होतं...

अपने आपसे वार्तालापः तुमच्या बद्दल खरंच सहानुभूति वाटते हो. तुम्हाला तर ते पण सुख नाही. :( मागे एक विडंबन काय टाकलंत तर लगेच... जाऊ दे, नको त्या आठवणी.

बिपिन कार्यकर्ते

भाग्यश्री's picture

3 Nov 2008 - 11:33 pm | भाग्यश्री

अदिती,

माय बिग फॅट ग्रीक वेडींग मधे आहे हे वाक्य. आय मिन मी त्यात ऐकलंय , अजुन दुसरीकडे असू शकते.
आई मुलीला समजवत असते, युअर डॅड इज हेड ऑफ द हाऊस, बट आय ऍम द नेक, अँड नेक डिसाईड्स व्हेअर टू मुव्ह द हेड!

( मी लिटरली टाळ्या वाजवल्या होत्या हे वाक्य ऐकून...! :) )

विजुभाऊ's picture

3 Nov 2008 - 10:30 am | विजुभाऊ

सहज्राव. सामुपदेश करणारी व्यक्ती ही तिर्‍हाइ त असते. ती दोन्ही बाजुंकडे समान नजरेने पाहु शकते. कित्येकदा आपल्या जवळच्या मित्रानासुद्धा न सांगितल्या जाउ शकणार्‍या गोष्टी सामुपदेशकाला सांगितल्या जातात.
त्याच्याशी मोकळे पणे बोलणे शक्य असते.
सामुपदेशकाचे वैक्तीक जीवन हे त्याचे स्वतःचे असते. सामुपदेशक हा एक व्यक्तीच असतो. तो काही सर्वद्ज्य नसतो. त्याचे काम तुमच्या मनातले काढुन घेणे आणि त्यावर समर्पक उत्तर शोधायला तुम्हाला मदत करणे हे असते.
त्याच्या व्यवसायाचा आणि वैयक्तीक आयुश्याचा तसा थेट सम्बन्ध नसतो.

बरेचदा जुन्या कुटुम्बात सामुपदेशनाचे काम एखादी आत्या/मामा अथवा शेजारे /वडीलांचे मित्र करतच असतात.
फक्त त्याना सामुपदेशक हे नाव नसायचे.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मराठी_माणूस's picture

3 Nov 2008 - 10:42 am | मराठी_माणूस

अशाच एका भेटीत , माझ्या मित्राला ,मुलीने , लग्न झाल्यावर वेगळे बिर्‍हाड करायचे सुचवले जे त्याला मान्य नव्हते त्या मुळे त्यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. ह्या मूळे लग्ना नंतरच्या कित्येक समस्या निकालात निघाल्या. त्यामुळे त्या भेटीचा कसा उपयोग केला जातो त्यावर ते अवलंबुन आहे.

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 11:43 am | विनायक प्रभू

माझ्या बाबतीत म्हणाल तर वेगळ घर नाही ही अट पत्रिका बघतानाच काकाला घातली.
अशा मिटींग बद्दल मला जरासुद्धा आक्षेप नाही. फक्त त्यावेळी बोललेले बोलाची कढी बोलाचा भात होतो.

अभिरत भिरभि-या's picture

3 Nov 2008 - 11:31 am | अभिरत भिरभि-या

मदनशेठनी नेमके काय बोलतात याची प्रश्नवली दिलिये.
यात आणखी काय काय भर घालता येईल ?
(सध्या सूपात पण जात्यात भरडण्याची मानसिक तयारी करणारा) अभिरत

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 11:38 am | विनायक प्रभू

अनुभव असलेल्यानी मद्त करावी अभिरतला. मला नाही.

अभिरत भिरभि-या's picture

3 Nov 2008 - 11:49 am | अभिरत भिरभि-या

वि.प्र. काका,
मी निमित्तमात्र आहे. माझ्यापेक्षा अडलेले सिनीअर इथे खूप असतील; त्यांना मदत व्हावी, त्यांना बोलते करावे ही सदिच्छा आहे.
(इथल्या दादा-तायांचे कार्य मार्गी लागल्याशिवाय बोहल्यावर न चढणारा) अभिरत

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 11:53 am | विनायक प्रभू

यंदा कर्तव्य आहे ना? मग काय फरक पडतो. मी टपल्या मारत नाही. सहजराव सांगतिल तुला.

अभिरत भिरभि-या's picture

3 Nov 2008 - 12:10 pm | अभिरत भिरभि-या

मपल्या डोक्यावर मुंडावळ्या चढायला अजून वेळ आहे. पण पूर्ण चर्चेत एक ऋषिकेष-भाऊ सोडून सगळे दिग्गज आणि अनुभवीच बोलताहेत म्हटले
ज्या गरिब-बापुड्या जनतेची पुढारी चर्चा करताहेत त्यांचा आवाज व मागण्या पोचवाव्यात.
कारण घरात नुकतीच काही लग्ने पाहिल्याने जरा या विषयाची धग पण जाणवली होती.
असो
(सहजरावांच्या सहज सोप्या प्रश्नोत्तराच्या प्रतिक्षेत) अभिरत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2008 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवाहाचा किस्सा भारीच आहे, विप्राच आहात तुम्ही :)

दोन-चार भेटीत माणसाच्या स्वभावाची ओळख काय होणार. आयुष्यातली अनेक वर्ष एकत्र राहिल्यावरही माणसाचा स्वभाव ओळखता येत नाही, असे म्हणतात. तेव्हा अशा मिटींगामधून काय स्वभाव कळणार ?

प्राजु's picture

3 Nov 2008 - 9:30 pm | प्राजु

विवाहाचा किस्सा आवडला.
प्लास्टर मधले हात... जबरदस्त..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 4:03 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रभूमास्तरांनी अजून एक चांगला विषय मांडला आहे.

माझे मत पण अदितीच्या मतासारखेच आहे. भेटी गाठी झाल्या न झाल्या, बोलणं झालं न झालं तरी ठीक आहे. त्या दोन व्यक्ति किती कमिटेड आहेत त्या नात्याप्रति हे फार महत्वाचे आहे. जर का आवश्यक ते नाते जुळून आले तरच सगळ्या गोष्टी नीट होतात. जर का असे नसते तर पूर्वीच्या काळातली सगळीच लग्ने (जेव्हा मुलगी कळती पण नसायची, तिने मुलाला बघणे वगैरे तर सोडाच) शोकांत झाली असती आणि आजकालची बहुतेक लग्नं (जी नीट दोघांना वेळ वगैरे देवून किंवा प्रेमविवाह अशी असतात) सुखांत झाली असती.

विप्रंनी हेच जरा वेगळ्या शब्दात वर एका प्रतिसादात लिहिले आहे..... "हीच माझी बायको ही भावना आल्यानंतर इतर प्रश्न नगण्य होतात." कमिटमेंट म्हणजे हीच असावी.

अवांतरः मास्तर प्लॅस्टर किती दिवस होते? आणि तो पर्यंत कसं केलंत? आय मीन, जेवण वगैरे हो?

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

3 Nov 2008 - 4:05 pm | अवलिया

अवांतरः मास्तर प्लॅस्टर किती दिवस होते? आणि तो पर्यंत कसं केलंत? आय मीन, जेवण वगैरे हो?

का समोरचा घास भरवु शकत नाही का?

काय राव तुमी पन.... छ्या

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 4:17 pm | बिपिन कार्यकर्ते

चला म्हणजे कमीत कमी जेवणाचा तरी प्रश्न सुटला. बा़कीचं (म्हणजे कपडे घालणं, सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर हो) वगैरे पण कसं तरी जमवलंच असेल कसं तरी. असो.

अवांतरः विप्रंची कॉमेंट आली नाही अजून... धाडकन एखादा फटाका फोडतील एकदम.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

3 Nov 2008 - 4:22 pm | टारझन

आहो काका ,
आपला शोले मधला "रामगड का ठाकूर" माहित्ये का ? त्याला तर प्लास्टरपण नव्हतं ... हार्डवेअरच गायब होतं ... आणि सर्वर म्हणून "रामलाल" बसवला होता हा भाग अलहिदा .. पण ठाकूर ने मॅनेज केलंच ना ?

- शोलेतल्या टारू-विरू मधला)
टारू

ब्रिटिश's picture

3 Nov 2008 - 6:06 pm | ब्रिटिश

जल्ला क मॅनेज केला र त्या ठाकुर न ?
सूकटीच कालवन ठाकुर ओरपाचा न दूसरे दीवशी सकालचा तरास रामलालला

खारपाडा क्रिप्टीक

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 5:07 pm | विनायक प्रभू

३ महिने १ सोडून सर्व बाबतीत पराधिन होता जगती पुत्र दत्तात्रयाचा. (वडिलांचे नाव)
अनुभव कामी येतोच की अड्चणीच्या वेळी.
माझी जॉमेट्री खुप चांगली होती.
ह्या उपर काही लिहु शकत नाही.
मास्तर मारेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 5:11 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर मला पण भूमिती आवडते लहानपणापासून. सगळ्या सिध्दता अगदी अचूक यायच्या मला.

बिपिन कार्यकर्ते

(खुद के साथ बातां : पायथागोरसचे काटकोन त्रीकोणाचे प्रमेय सांग बरे रंगा!! :W :? )

चतुरंग

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 6:05 pm | विनायक प्रभू

चतुरंगजी हे साधे प्रमेय आजकाल विसरले जाते आहे.

विजुभाऊ's picture

3 Nov 2008 - 4:31 pm | विजुभाऊ

तो ठाकुर धूवत कसा असेल.......... हात ओ ;)

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

शैलेन्द्र's picture

3 Nov 2008 - 4:41 pm | शैलेन्द्र

ठ्यां..................................

प्रमोद देव's picture

3 Nov 2008 - 4:43 pm | प्रमोद देव

वाचली नसेल तर वाचा आणि त्यातून विवाहेच्छुकांना काही मार्गदर्शन मिळणार असेल तर आनंदच आहे.

माझ्या लग्नाची चित्तरकथा!भाग १ते ५

संताजी धनाजी's picture

3 Nov 2008 - 5:30 pm | संताजी धनाजी

फारच सुंदर :)

एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 6:02 pm | विनायक प्रभू

देवा तुमची चित्तरकथा वाचली. भावली. मार्गदर्शन नाही ते हायवे दर्शन आहे. गऱजूनी परत परत नीट वाचावे असे.

वेताळ's picture

3 Nov 2008 - 6:32 pm | वेताळ

उशिरा वाचला. विचित्र प्राणी हे नाव वाचुन नवीन प्राण्याबद्दल माहिती असावी म्हणुन वाचायचा टाळला. वाचल्या नंतर कळाले हे आपल्याच बद्दल लिहीले आहे.
सर्व गोष्टी समान आहेत आपल्याबाबत....माझा हात मात्र मोडला नाही अजुन.लग्न जुळवताना खुप अडचणी येतात,काही वेळा दोन्ही बाजुला अपमानास्पद प्रसंग ही येतात.पण ही पध्दत मला मान्य आहे.कारण प्रेम करतेवेळी किंवा प्रेमात पडण्यासाठी समोरची व्यक्ती आपल्याला आवडावी लागते. त्यावेळी त्या व्यक्तीच्या दोषाकडे पुर्णपणे दुर्लक्ष होते. तेच दोष पुढे पुढे वाढत जातात.
लग्न ठरवण्याच्या पध्दतीत देखिल खुप दोष आहेत परंतु मुलगी किंवा मुलगा बघताना आपण सामाजिक दर्जा,आर्थिक कुवत,दोन्ही बाजुच्या आवडीनिवडी ह्या बाबींची माहिती घेतल्यानंतरच बघण्याचा कार्यक्रम घेतो.बघण्याच्या कार्यक्रमातही दोष समजत नाहीत पण त्या बरोबर एकमेकांचे गुण ही समजत नाहीत. लग्नानंतर दोष व गुण एकदमच कळत जातात त्यामुळे तडजोड ही होत जाते. संसार टिकतो.परंतु प्रेमविवाहात दोष लग्नानंतर कळु लागतात व ते वाढतच जातात्.त्यामुळे तडजोड करायची ती किती हा प्रश्न उभा राहतो.
किती लोकांना स्वतःचीच संपूर्ण ओळख असते की आपल्या स्वतःच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत ते आपलं आपल्याला समजावं?

अदितीशी सहमत आहे.पण एक असेही वाटते की माणसाचे जसजसे वय बदलत जाते तशी त्याची विचारसरणीही बदलत जाते.त्यामुळे आपला जोडीदार काहीदिवसात, काहीवर्षात आपल्याला ओळखता येइल का नाही हे सांगता येत नाही.कारण प्रत्येक वेळी त्यांचे वेगवेगळे गुणदोष समोर येत असतात.
बाकी एक उत्तम विषय इथे सुरु केल्या बद्दल विचित्र प्राण्याला धन्यवाद.
वेताळ

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2008 - 6:39 pm | प्रकाश घाटपांडे


पण एक असेही वाटते की माणसाचे जसजसे वय बदलत जाते तशी त्याची विचारसरणीही बदलत जाते.त्यामुळे आपला जोडीदार काहीदिवसात, काहीवर्षात आपल्याला ओळखता येइल का नाही हे सांगता येत नाही.कारण प्रत्येक वेळी त्यांचे वेगवेगळे गुणदोष समोर येत असतात


आम्हाला बी हेच वाटते.

प्रकाश घाटपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 6:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण एक असेही वाटते की माणसाचे जसजसे वय बदलत जाते तशी त्याची विचारसरणीही बदलत जाते.त्यामुळे आपला जोडीदार काहीदिवसात, काहीवर्षात आपल्याला ओळखता येइल का नाही हे सांगता येत नाही.कारण प्रत्येक वेळी त्यांचे वेगवेगळे गुणदोष समोर येत असतात.

अर्थात! माणूस वयाप्रमाणे बदलला नाही तर, "किती गं मोठी झालीस तू!" हे वाक्य मला माहितही नसणारी माझी कोणीतरी आत्या मला कसं ऐकवणार? ;-)
पण पुन्हा तेच, एकमेकांना त्या-त्या वयात त्या-त्या काळाप्रमाणे समजून नाही घेतलं तर मग कसलं आलंय सहजीवन? (नाही, मी ७५ वर्षांची नाही, २७ वर्षांची आहे आणि मला सहजीवनाचा एक वर्षाचाही अनुभव नाही आहे.)

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 6:46 pm | विनायक प्रभू

डोके शाबुत असले तर काही महिने सुद्धा मार्गदर्शक बनतात. जे तुझ्याक्डे आहे.

ब्रिटिश's picture

3 Nov 2008 - 6:56 pm | ब्रिटिश

लगीन म्हंजी तिन पानी चा जूगार

त्यान गनीत, ज्यामेट्री, ईतीहास, भूगोल कायव वर्क व्हत नाय

जसे पत्ते येतील आनी जेवडे पैशे जवल आसतीन तेवड्यातच खेलाच

पत्ते चांगले नसतील त पैशे आसून ऊपेग नाय
पैशे नसतील त पत्ते भारी आसून उपेग नाय

दोन्हींचा बॅलन्स म्हंजे जींकायची खात्री नाय त हार नक्की

पत्ते कवा ओपन कराचे , कवा पॅक कराचा, कवा बंद मदी सूसाट खेलाचा ह्ये कल्ला क डाव तूमचाच

***खारपाडा क्रीप्टीक

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2008 - 7:38 pm | प्रकाश घाटपांडे

खारपाडा क्रिप्टिक+१
प्रकाश घाटपांडे

लिखाळ's picture

3 Nov 2008 - 10:24 pm | लिखाळ

लेख आणि चर्चा छान आहे.
लग्नापूर्वी दोघांनी दोन्-तीन वेळा एकमेकांशी बोलावे. आवडिनिवडी, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्याची स्वप्ने, आकांक्षा याबद्दल खुल्या मनाने बोलावे आणि समोरचा आपल्याला कसा प्रतिसाद देतो हे सुद्धा पहावे.
लग्न लागले आहे त्यामुळे आहे तो जोडिदार स्विकारायचा आणि संसाराचा गाडा ओढायचा ! असा स्वभाव आता अनेक मुला-मुलींचा नसतो. त्यामुळे एक्-दोन वेळा बोलून वरवरचा अंदाज घेणे चांगलेच असते असे मला वाटते.
तसेच परदेशात जाऊन राहणे-न राहणे-परत येणे-न येणे, देश-संस्कृती याबद्दलची मते यालासुद्धा अनेक जण प्राधान्य देतात हे मी बघितले आहे. त्या बाबतीतली मते सुद्धा पटायला लागतात.
आणि जे होणार आहे ते होतेच, कुणीच कुणाला नीट ओळखु शकत नाही वगैरे मते ठिकच आहेत. पण आपल्या कडून आपण अनुरुपता पहावी आणि जास्तीत जास्त अनुरुप व्यक्तीला होकार द्यावा. हल्ली मुले आणि मुली या बाबतीत बरेच सजग होत आहेत हे पाहिले आहे.
--लिखाळ.