फुलपाखरू उद्यान

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
20 Nov 2014 - 10:24 am

नमस्कार

धागा भटकंती मधे उघडावा की कलादालन मधे ते समजत नव्हतं. शेवटी भटकंती मधे उघडायचं ठरवलं. भटकंती फार लांबची नाही. ठाण्यातलीच. ओवळेकर वाडी, ओवळा, येथे हे फुलपाखरू उद्यान आहे. अनेक वर्ष फुलपाखरं, त्यांना पोषक ठरणारी झाडं इत्यादी बाबींचा अभ्यास करत हे उद्यान उभारलं गेलेलं आहे.

इथे जाण्यासाठी घोडबंदर रोड वर हायपरसिटी सोडलं, की डावीकडे वेदांत हॉस्पिटल लागतं, ते गेलं की डावीकडे अतिशय छोटी गल्ली आहे. 'श्री गावदेवी कडे' असा फलक तिथे लावलेला आहे. तिथून आत जायचं. दोनच मिनिटांवर एल्व्हिस बटरफ्लाय गार्डन लागतं, पण ते 'हे' नव्हे. ते नवं आहे. त्याबद्दल माहीत नाही. तिथून पुढे जायचं, एकीकडे रस्ता उजवीकडे वळताना दिसतो, त्या वळणावरच एक गेट आहे. तिथे लिहीलेलं आहे, ओवळेकर वाडी. तेच हे.

वडिलांनी सुरू केलेलं हे उद्यान आता दोन भाऊ चालवतात. हे उद्यान फक्त रविवारी सकाळी ८:०० ते १२:३० चालू असतं. ८ ला गेलात तर माहिती वगैरे नीट ऐकता येते. फुलपाखरू तयार होण्या आधीच्या स्थिती दाखवल्या जातात. प्रवेश फी १०० रुपये आहे, नाश्ता (बरा असतो, ग्रेट नाही) ५० रुपयांस मिळतो.

आणि क्लिकक्लिकाट करायचा मग. हवशे नवशे गवशे सगळे आलेले असतातच.

माझे फुलपाखरांचे फोटो फार काही बरे आले नाहीत. त्यामुळे ढीगभर फुलपाखरांचे फोटो नाही आहेत. त्यातल्या त्यात मला जमलेले फोटो इथे देत आहे.

1
हा सरडा लक्षवेधी ठरला. जबर पोज देत बसला होता.
2
अजून एक. गंमत तेंव्हा झाली जेंव्हा आम्ही सरडयाचे फोटो काढून परत फिरल्यावर एक वाक्य आमच्या कानावर आलं. एक मुलगा दुस-या मुलाला म्हणाला, 'अरे वो ग्रीन शॅमेलिऑन है; कलर चेंजिंग नही है...' इतकं ह्र्दयस्पर्शी वाक्य होतं ते की डोळे पाणावले.
1
तिथल्याच एका नर्सरीतील हे जरबेराचं फूल
5
आणखी एक जरबेरा
6
p
ही कॉसमॉस ची फुलं
22
इंडियन कॉमन टायगर
33
इंडियन कॉमन टायगर
aaaa
याचं नाव आठवत नाहीये, बहुदा ब्लू टायगर

तर अशी ही जागा, अर्धा दिवस घालवायला चांगला पर्याय आहे.

प्रतिक्रिया

विशालभारति's picture

20 Nov 2014 - 10:49 am | विशालभारति

छान फोटो

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2014 - 10:57 am | टवाळ कार्टा

माझा गणेशा झालाय :(

मदनबाण's picture

20 Nov 2014 - 10:58 am | मदनबाण

मस्त ! :)
याच ओवळेकर वाडीतील मी टिपलेले फोटु... :)
फुलपाखरु भाग १
फुलपाखरु भाग २

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

वेल्लाभट's picture

20 Nov 2014 - 11:58 am | वेल्लाभट

कडक फोटो काढलेत हो ! क्लासच !

मृत्युन्जय's picture

20 Nov 2014 - 11:19 am | मृत्युन्जय

धागा मस्त.

अरे वो ग्रीन शॅमेलिऑन है; कलर चेंजिंग नही है...' इतकं ह्र्दयस्पर्शी वाक्य होतं ते की डोळे पाणावले.

हे वाक्य इतके हृदयस्पर्शी का वाटले?

वेल्लाभट's picture

20 Nov 2014 - 11:55 am | वेल्लाभट

प्रतिसाद वाचून डोळे अजूनच पाणावले :D

सूड's picture

20 Nov 2014 - 1:08 pm | सूड

रुमाल देऊ??

अमित खोजे's picture

22 Nov 2014 - 4:00 am | अमित खोजे

शॅमेलिऑन मुळातच रंगबदलू जातीचा सरडा आहे. आजूबाजूच्या वातावरणाला अनुसरून तो त्याच्या त्वचेचा रंग बदलतो. हा असा

त्यामुळे ग्रीन म्हणजे त्या मुलांचे याबाबतचे ज्ञान जरा ..

मदनबाण's picture

22 Nov 2014 - 6:45 pm | मदनबाण

मस्त व्हिडीयो आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }

तळ्यात मळ्यात's picture

25 Apr 2015 - 12:34 am | तळ्यात मळ्यात

फारच मस्त आहे व्हिडीओ. शॅमेलिऑनचा कलर आयक्यू भन्नाट असेल नाही!! :p

कवितानागेश's picture

20 Nov 2014 - 11:44 am | कवितानागेश

छानच आहे जागा. जायला हव एकदा.

मराठी_माणूस's picture

20 Nov 2014 - 11:55 am | मराठी_माणूस

काही वर्षा पुर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात(नाशिक) असे उद्यान होते , ते नंतर बंद झाले

प्रचेतस's picture

20 Nov 2014 - 12:18 pm | प्रचेतस

क्या बात है वेल्लाभटा...!!!

सुरेख फोटो.

विशालभारति's picture

20 Nov 2014 - 12:47 pm | विशालभारति

कॄपया कमेरा कोणता वापरला त्याचे डिटेल्स पाटवाल का!

फुलांचे फोटो सुंदर आले आहेत.

वेल्लाभट's picture

20 Nov 2014 - 1:30 pm | वेल्लाभट

जरबेरा कॅनन पॉवरशॉट एसएक्स २२० एचएस
बाकी सगळे कॅनन ईओएस ७०डी १८-५५

अमित खोजे's picture

22 Nov 2014 - 3:55 am | अमित खोजे

जरबेराचे फोटो पॉवरशॉट ने काढले असतील असे वाटणार नाही एवढे छान आले आहेत. ट्रायपॉड वापरला होतात का?
फुलपाखरांपेक्षा फुलांचे फोटो शार्प आलेत. मस्तंच!

वेल्लाभट's picture

22 Nov 2014 - 1:35 pm | वेल्लाभट

अनेक वर्ष पॉवरशॉट एसएक्स २२० एचएस वापरतोय; इतका कव्वा कॅमेरा आहे म्हणून सांगू !
कदाचित मी अजून एसएलआर ला सरावलो नाहीये असं असेल; पण समटाईम्स आय जस्ट लव्ह द लिटल वन अँड इट्स रिझल्ट्स. काहीही म्हणा.

त्रिवेणी's picture

20 Nov 2014 - 2:16 pm | त्रिवेणी

फुलांचे फोटो खुप सुंदर आले आहेत.

ओवळेकरवाडीची बाग जुनी आहे. येऊरला वनखात्याने अशीच एक बाग या महिन्यात सुरू केली आहे. इथे ३६रू प्रवेश आहे. हे मी पेपरात वाचले होते(HindustanTimes/Nov.8/Thane/butterfly garden at Yeor hills--/Megha Pol)

फुलपाखरे ओळखता यावीत यासाठी मी किहिमकराच्या पुस्तकातले फोटो पाहून त्यातली नेहमी दिसणारी फुलपाखरे बघून शंभरेक चित्रे रंगवून एक घडीचे पुस्तक तयार केले. ही चित्रे पाहून फुलपाखरे ओळखता येतात.इथे फोटो टाकतो माफ करा.
१)
1

२)
२

३)
३

वेल्लाभट's picture

20 Nov 2014 - 2:36 pm | वेल्लाभट

उत्तम माहिती ! :) धन्यवाद !

मदनबाण's picture

20 Nov 2014 - 2:50 pm | मदनबाण

HindustanTimes/Nov.8/Thane/butterfly garden at Yeor hills--/Megha Pol)
या बातमीचा ऑनलाइन दुवा कोणाला देता येइल का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

मधुरा देशपांडे's picture

20 Nov 2014 - 2:35 pm | मधुरा देशपांडे

सुंदर.

कंजूस's picture

20 Nov 2014 - 2:50 pm | कंजूस

फोटो आणि लेख इतरत्र अगोदर प्रकाशित केले आहे .
४)
४

५)
५

६)
६

७)
७

येवूर/येऊर येथे या निमित्ताने जाणकारांच्या आणि आपल्या फोटोग्राफरांच्या उपस्थितीत कट्टा केला तर चार दोन गोष्टी निसर्गाच्या सानिध्यात शिकता येतील असा एक विचार मनात येऊन गेला. आयोजन ठाणे-मुलुंडकरांच्या हातात.

वेल्लाभट's picture

21 Nov 2014 - 10:34 am | वेल्लाभट

सद्ध्या 'मौसम'ही खास आहे. डिसेंबर - जानेवारी पर्यंत कधीही करू शकतो पिलॅन !

या रविवारीच सकाळी सातला ठाणे स्टेशनला येतो. एकदा तीन चारजण जे कोणी येतील ते येऊरचं जमवून टाकू. (ते जमलं -बसच्या वेळा वगैरे किती वेळ द्यायचा इ॰ )मग पुन्हा बरेच जण लहानमुले आलीतरी नीट आयोजन करायला सोपे जाईल.

वेल्लाभट's picture

21 Nov 2014 - 10:27 pm | वेल्लाभट

रविवारे अहं नास्ति

इशा१२३'s picture

20 Nov 2014 - 2:54 pm | इशा१२३

सुरेख फोटो..

इशा१२३'s picture

20 Nov 2014 - 2:54 pm | इशा१२३

सुरेख फोटो..

कंजूस's picture

20 Nov 2014 - 4:31 pm | कंजूस

hindustan times मधल्या लेखाची लिंक मी अगोदरच शोधली होती पण सापडली नाही. लेखाचा फोटो कॉपीराईटभयामुळे इथे देता येत नाही व्यनि करतो /पाहा.

मदनबाण's picture

20 Nov 2014 - 4:34 pm | मदनबाण

हो, मी पण शोधली होती पण सापडली नाही म्हणुनच मग इथे विचारले.

व्यनि करतो /पाहा.
ओक्के.धन्यवाद. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

१)तुंगारेश्वर (वसई -सातिवली जवळ)येथेही जानेवारीपर्यँत बरीच फुलपाखरे दिसतात. खाली रस्त्याकडेच असतात. बऱ्याच वेळा गेलो आहे शिवाय भृंगराज, हुदहुद, नंदननाचण, फ्लायकैचर वगैरे पक्षी आहेतच. जाण्यायेण्याचा फक्त खर्च. चांगले रान आहे.
२)पेल्हार धरण -नालासोपारा पूर्व ८ किमी येथेही बरीच फुलपाखरे असतात.

पैसा's picture

21 Nov 2014 - 5:42 pm | पैसा

मस्त फोटो! मात्र फुलपाखरांचे फोटो अजून हवे होते. कंजूस यांनी तयार केलेली चित्रे आणि माहितीसुद्धा खूप आवडली.

वेल्लाभट's picture

21 Nov 2014 - 9:01 pm | वेल्लाभट

एवढे भारी फोटो आलेच नाहीत माझे फुपांचे...

जेपी's picture

21 Nov 2014 - 6:47 pm | जेपी

हे फुलपाखर काय,
मला वाटल'दिसते सुंदर मला फुलपाखरु'
टाईप हाय का .
*wink*
फोटु आवडले

जेपी's picture

21 Nov 2014 - 6:47 pm | जेपी

हे फुलपाखर काय,
मला वाटल'दिसते सुंदर मला फुलपाखरु'
टाईप हाय का .
*wink*
फोटु आवडले

रेवती's picture

21 Nov 2014 - 6:56 pm | रेवती

धागा आवडला. कंजूसांचे प्रतिसाद चांगले आहेत. आम्ही आमच्या इथे जवळ असलेल्या फुलपाखरू बागेला भेट दिली होती. अगदी शेकड्याने फुलपाखरे उडत असतात अशी माहिती मिळाली होती. आम्ही भेट दिलेला दिवस बहुधा त्यांचाही विकांत असावा. शेकड्याने फूलपाखरे बसून होती.

विजुभाऊ's picture

21 Nov 2014 - 7:11 pm | विजुभाऊ

असेच एक फुलपाखरु उद्यान ( सँक्चरी) महाराष्ट्र निसर्गोद्यान.( धारावी डेपो समोर) ( खरंच सांगतोय)
पूर्वी इथे डंपींग ग्राउम्ड होते. तेथे सध्या जंगल आहे.
तेथे बरेच जुनी वेगवेगळ्या प्रकारची राशिंची झाडे सुद्धा आहेत, फुलपाखरे बघायची असतील तर सकाळी साधारणतः साडे आठच्या आत बघता येतात. त्या नम्तर त्यांचे दवाने भिजलेले पंख वाळतात आण ती उडून जातात.
सायन स्टेशन किंवा कुर्ला स्टेशनपासून धारावी डेपोपर्यन्त येता येईल. तेथे समोरच हे उद्यान आहे.
सुदैवाने या उद्यानात किंवा सभोवती कसलेच खाद्य पदार्थ मिळत नाहीत.

वेल्लाभट's picture

21 Nov 2014 - 8:58 pm | वेल्लाभट

ते फुलपाखरू उद्यान नसून निसर्ग उद्यान आहे. जाऊन आलोय मस्त आहे ते सुद्धा.

विजुभाऊ's picture

22 Nov 2014 - 12:54 pm | विजुभाऊ

ते निसर्ग उद्यान " बटरफ्लाय सँक्चरी " म्हणून जाहीर केलं गेलंय

वेल्लाभट's picture

22 Nov 2014 - 1:36 pm | वेल्लाभट

ये नई इन्फो है ! धन्यवाद्स याबद्दल :) आता बटरफ्लाय सँक्च्युरी म्हणून जायला लागेल तिथे हेहे

एक पारिजातकाच्या पानांसारखे पाने असलेले झुडुप असते/आहे. त्याला आता पांढरे फुलांचे गुच्छ येतात त्यावरून फु॰ हटतच नाहीत. त्या फुलांना रंग ,वास, चव काही नाही खाऊन पाहिले.तितकाच पांढराशुभ्र कोळी गुच्छात बसून त्यांना चिमटीत पकडून तिथेच खातो. तुंगारेश्वरात ओकलीफ फु॰ पण आहे

मुक्त विहारि's picture

21 Nov 2014 - 11:56 pm | मुक्त विहारि

आणि

श्री.कंजूस आणि मदनबाण आणि विजुभाउ ह्यांचे, तितकेच सुंदर प्रतिसाद...

स्पार्टाकस's picture

22 Nov 2014 - 12:08 am | स्पार्टाकस

मियामी इथे बटरफ्लाय वर्ल्ड आणि की वेस्टच्या बटरफ्लाय कॉन्झर्वेटरीला दिलेल्या भेटीची आठवण झाली.

तळ्यात मळ्यात's picture

25 Apr 2015 - 12:35 am | तळ्यात मळ्यात

सुंदर जागा सुंदर फोटोज्

पॉइंट ब्लँक's picture

25 Apr 2015 - 7:51 am | पॉइंट ब्लँक

मस्त फोटो आले आहेत. :)