आजच्या म. टा. मधील संवाद पुरवणीतल्या 'माझेही मत' मध्ये प्रसिद्ध झालेले हे पत्र
म. टा. च्या संकेतस्थळावर मी नोंदविलेली ही प्रतिक्रिया
मा. संपादक,
आजच्या म. टा. संवादमधील ’माझेही मत’ या सदरात श्री. विजय दांडेकर यांनी लिहिलेल्या पत्रातून एकुण असा सूर असल्याचे जाणवले की स्वा. सावरकर यांनी बोटीतुन समुद्रात उडी मारलीच नव्हती. या साठी श्री. दांडेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक व स्व्तातंत्र्यसंग्रामाचे अभ्यासक कै. डॉ. य. दि. फडके यांचा दाखला दिला आहे. या संबंधी मला असलेल्या दोन शंका
१) दांडेकरसाहेबांनी ह प्रश्न डॉ. फडके यांच्या हयातीत का उपस्थित केला नाही? आता ते नसताना ’आज ते असते तर त्यांनी खुलासा केला असता’ असे लिहिण्यात काही अर्थ नाही
२) जेव्हा अंदमानान येथील स्वातंत्र्यज्योतीवरील स्वा. सावरकर यांचे उदगार मणीशंकर अय्यर यांनी काढुन टाकले तेव्हा बराच गदारोळ उठला होता व कोट्यावधी स्वा. सावरकरभक्त संतप्त झाले होते व त्या अनुषंगाने अनेक चर्चा घडल्या होत्या. दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात मी या संबंधी डॉ. फडके यांची मुलाखत पाहिली होती. डॉ. फडके यांच्या सारख्या परखड संशोधकाने जर त्यांना असे काही माहित असते तर त्यांनी ते लपवुन न ठेवता जनतेला सांगितले असते. स्वा. सावरकरांची धास्ती जन्मभर बाळगणाऱ्या ईंग्रजांनी तर अशी काही कपोलकल्पित घटना स्वा. सावरकरांचे महात्म्य प्रस्थापित करते आहे हे लक्षात येताच अशी उडी न घेतल्याचे ठणाणा करुन सांगितले असते व स्वा. सावरकरांना जनतेचा आदर लाभणार नाही याची पूर्ण काळजी घेतली असती. मात्र इंग्रजसरकारने या घटनेचा इन्कार केल्याचे कुठे ऐकिवात नाही.
स्वा. सावरकरांची ही जगप्रसिद्ध उडी हे कोट्यावधी हिंदुस्थानियांचे श्रद्धास्थान आहे. श्री. दांडेकर महाशयांना अशी घटना घडलीच नाही असे म्हणायचे असेल तर त्यांनी स्वा. सावरकरांचे ते पत्र व अन्य पुरावे कृपया सादर करावेत. ते खरे असल्यास आम्ही अंध भक्ति न करता आम्हाला आराध्य असले तरी स्वा. सावरकरांनी अशी उडी मारली नव्हती हे मनोमन मान्य करु.
प्रतिक्रिया
2 Nov 2008 - 3:53 pm | धोंडोपंत
अरे हा कोण आहे रे?
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
2 Nov 2008 - 3:57 pm | यशोधरा
सर्वसाक्षीजी, चांगली प्रतिक्रिया दिलीत.
हल्ली स्वातंत्रवीर सावरकरांसारख्या व्यक्तीला झोडणे म्हणजे पुरोगामीपणा हे तुम्हांला ठाऊक नसावे बहुधा!
2 Nov 2008 - 4:03 pm | अवलिया
कोण हा दांडेकर (***)?
च्यायला, आजकाल हिंदु, हिंदुंचे आचार विचार, तसेच हिंदु विचारधारेशी संलग्न मंडळींवर काहितरी चिखलफेक करायची अन प्रकाशझोतात रहायचे असला भुक्कड धंदा सुरु झाला आहे. सावरकर काय होते अन त्यांचे विचार काय होते हे तर समजण्याची पात्रता नाहीच नाही पण त्यांचे विचार अंमलात आणायचे तर यांना भुळकांडी लागेल, असे असतांना हा अनाठायी वाद उकरुन काढण्याचे काहीच कारण नाही. पण असे दिसते आहे की, निवडणुकांचे रणशिंग लवकरच फुंकले जाणार. असो!
सुज्ञांनी अशांकडे दुर्लक्षच करावे. आणि महत्वाचा प्रश्न असला देशविघातक वृत्तींना पाठिशी घालणारा पेपर कशाला विकत घेता अन त्यांचा धंदा वाढवता? चुक आपलीच आहे. आपणच पोसतो अशांना.....असो.
(कट्टर हिंदु) नाना
2 Nov 2008 - 4:15 pm | सर्वसाक्षी
परिक्षिती राजाने आळीकडे दुर्लक्ष केले आणि मग तिचा तक्षक झाला. तक्षक होताच तो राजाला डसला व परिक्षिती राजा मृत्यु पावला.
कुणी उगाच काही आचावाचा लिहिल तर दुर्लक्ष ठिक आहे. पण इथे कुणी कुण्या दिवंगत नामवंताचा दाखला देत आहे तर शहानिशा का करु नये?
मुळात संपादकांनी असे लेखन समाधानकारक पुरावा असल्याशिवाय प्रसिद्ध का करावे? आता ते 'प्रकाशित झालेल्या लेखनाशी संपादक सहमत असतीलच असे नाही व हे लेखन म्हणजे लेखकाचे वैयक्तिक मत असून त्याच्या शी आमच्या आस्थापनेचा संबंध नाही' असे जबबदारीखंडनपर वाक्य टाकुन मोकळे होतील
2 Nov 2008 - 6:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सर्वसाक्षीजी,
तुमचं म्हणणं पटतं. हे लोकं आजकाल असं का करतात हे महत्त्वाचं नाही. पण स्वातंत्र्यवीर आणि य.दि.फडके, दोघांच्या मागे अशी विधानं करणं थोडं काय, खूपच संशयास्पद वाटतं.
नाना, 'या असल्या लोकांकडे दुर्लक्ष करा' हा सल्ला मलातरी पटला नाही.
2 Nov 2008 - 9:07 pm | कपिल काळे
इतिहास प्रसिद्ध व्यक्ती, विशेषतः हिंदू ची झोडपणी केली की असल्या लोकांना मोठेपणा वाटतो. पण ज्या लोकांत ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते धडपडत असतात तेच लोक त्यांच्यावर उलटतात. एकदा ते संपादक केतकरांना समजलं होतं. शिवधर्म की शिवसंघटना असे कोणी त्यांच्या घरी घुसले होते.
ह्या लोकांची थेरं फार काळ नाही चालत.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
2 Nov 2008 - 9:55 pm | सर्किट (not verified)
श्री. दांडेकर महाशयांना अशी घटना घडलीच नाही असे म्हणायचे असेल तर त्यांनी स्वा. सावरकरांचे ते पत्र व अन्य पुरावे कृपया सादर करावेत.
सर्वसाक्षी,
पुरावे मागितले ते छानच केले. पुराव्यांशिवाय उगाच कसा कुणावरही विश्वास ठेवायचा ?
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
2 Nov 2008 - 10:12 pm | चतुरंग
चतुरंग
3 Nov 2008 - 8:08 am | विकास
हा घ्या पुरावा... सावरकरांच्या स्वत:ची सुटका करून घेण्याचा (दी सावरकर केस, ब्रिटीश, फ्रान्स)
http://untreaty.un.org/cod/riaa/cases/vol_XI/243-255.pdf कायदेशीर भाषा असल्याने उडी वगैरे शब्द नाहीत पण "ब्रिटीश व्हेसल" मधून पळाले "एस्केप" असे नक्की लिहीले आहे (पान ४,११) (Savarkar, who had escaped from that vessel where he was in custody— ...)
3 Nov 2008 - 8:19 am | llपुण्याचे पेशवेll
पुराव्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच.
अजून एक मटा मधील लेखक महाशय जेव्हा असे म्हणतात कि 'एकदा समक्ष विचारले. तेव्हा सावरकरांनी एका मित्राला पाठवलेल्या पत्रातील तपशील सांगितला. सावरकर लिहितात, 'गोदावरीला पूर आला असताना त्या पुरात उडी घेण्याचे धैर्य मला झाले नाही. तर मी समुदात उडी घेणे कसे शक्य आहे?' '. एक प्रश्न असा कि सावरकर सरळ विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मित्राला लिहीलेल्या पत्रातील मचकूर वाचून कशाला देतील.
म्हणजे मला कोणी विचारले की 'तू मिपाच्या कट्ट्याला गेला होतास का?' तर मी म्हणेन 'हो(किंवा नाही)'. उगाच 'अरे मी टारझनला लिहीलेल्या खरडीत म्हटले आहे की मी जाणार आहे म्हणजे मी गेलो होतो' असे नक्कीच देणार नाही.
तुम्हाला काय वाटते?
पुण्याचे पेशवे
3 Nov 2008 - 10:05 am | ऋषिकेश
उत्तम दुवा!
विकासराव तुम्हाला दुवा! :)
आता तरी त्या दांडेकराचे तोंड बंद व्हावे.. कोणी हे मटा ला पाठवेल का?
-(अस्वस्थ) ऋषिकेश
3 Nov 2008 - 8:29 am | विसोबा खेचर
कोण हा दांडेकर? आम्ही त्याला ओळखत नाही आणि कुठलेही उत्तर देणे लागत नाही..! त्याला काय बरळायचं आहे ते बरळू दे, आम्ही कुणीतरी वेडा बडबडतो आहे अशी सहानुभूती दाखवून बिचार्या दांडेकराला त्याच्या बडबडीकरता क्षमा करू..
आपला,
(सावरकरभक्त) तात्या.
3 Nov 2008 - 8:40 am | मदनबाण
तात्यांशी १००% सहमत...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या 'मोरिया' जलयानातुन उडी मारुन मार्सेलिस,फ्रान्सचा किनारा गाठला त्याची प्रतिकृती:--
http://www.misalpav.com/node/2282
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
3 Nov 2008 - 9:01 am | विनायक प्रभू
मनाने सिक असलेल्या लोकांचे फारसे मनावर घेउ नये.
3 Nov 2008 - 9:30 am | प्रकाश घाटपांडे
सावरकरांचे कर्तुत्व हे उडी घेणे अथवा न घेणे याचे शी निगडीत नाही. तो मुद्दा आमच्या मते गौण आहे.त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचले तर आजच्या हिंदुत्ववाद्यांना नाना म्हणतात तशी बुळकांडी लागेल.
मान्य! पण त्या श्रद्धास्थानाला धक्का पोचवाल तर खबरदार! असा पुढील अध्याहृत अर्थ असेल तर अमान्य.
साशंक! कारण ते हायपोथेटिकल आहे. इतिहासकाराला वा अभ्यासकाला त्याच्या संशोधनातुन काढलेला निष्कर्षावर ठामपणे येता येईल असे नाही. परवडणारी परखडताच व्यक्त केली जाते. जनमताच्या माहोल समोर त्यांना प्रतिकूल वाटणारी मते व्यक्त करुन अप्रिय होणे एक रिस्क असते. त्यापेक्षा मौन बाळगणे अनेक विद्वान पसंत करतात. इतिहासातील थोर व्यक्ती ही माणसेच होती हे मान्य केले कि मुल्यमापन जड जात नाही पण गोची तिथच होते.
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला|
हे काव्य लिहिणार्या स्वातंत्र्य वीरांना आपला सॅल्युट.
प्रकाश घाटपांडे
3 Nov 2008 - 1:32 pm | मनिष
प्रकाशकाकांच्या वरील परीच्छेदातील सगळ्याच मजकुराशी अगदी तहे-दिल से सहमत!!
3 Nov 2008 - 3:58 pm | सुनील
सावरकरांचे कर्तुत्व हे उडी घेणे अथवा न घेणे याचे शी निगडीत नाही. तो मुद्दा आमच्या मते गौण आहे.त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचले तर आजच्या हिंदुत्ववाद्यांना नाना म्हणतात तशी बुळकांडी लागेल.
असहमत होणे अशक्य.
इतिहासकाराला वा अभ्यासकाला त्याच्या संशोधनातुन काढलेला निष्कर्षावर ठामपणे येता येईल असे नाही. परवडणारी परखडताच व्यक्त केली जाते. जनमताच्या माहोल समोर त्यांना प्रतिकूल वाटणारी मते व्यक्त करुन अप्रिय होणे एक रिस्क असते. त्यापेक्षा मौन बाळगणे अनेक विद्वान पसंत करतात.
सहमत. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी महाराष्ट्र सरकारचे शिवचरित्र लिहिण्याचे आमंत्रण स्वीकारले खरे, पण दोन तपे उलटूनदेखिल फारसे काही लिहिले नाही, याची आठवण येते.
इतिहासातील थोर व्यक्ती ही माणसेच होती हे मान्य केले कि मुल्यमापन जड जात नाही पण गोची तिथच होते.
१०१% सहमत.
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला|
हे काव्य लिहिणार्या स्वातंत्र्य वीरांना आपला सॅल्युट
अवांतर - काय योगायोग आहे. सावरकरांनी हे अजरामर काव्य ज्या समुद्रकिनार्यावर रचले, त्याच समुद्रकिनार्यावरील गावी सध्या अस्मादिकांचे वास्तव्य आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Nov 2008 - 5:44 pm | विकास
सावरकरांचे कर्तुत्व हे उडी घेणे अथवा न घेणे याचे शी निगडीत नाही. तो मुद्दा आमच्या मते गौण आहे.त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचले तर आजच्या हिंदुत्ववाद्यांना नाना म्हणतात तशी बुळकांडी लागेल.
हा मुद्दा योग्य असला तरी प्रस्तुत चर्चेतील विषय आणि दांडेकरांचा (जावई) शोध याच्यासंदर्भात तो अवांतर वाटला... दांडेकरांच्या पत्रात केवळ सावरकरांनी उडी मारलीच नाही असा जो काही सूर आहे त्या संदर्भात ही चर्चा चालू आहे. तेंव्हा त्यातील मुद्दा सोडून विज्ञाननिष्ठ निबंधांबद्दल आणि मग सनातनी (येथील सदस्यच असे नव्हे :-) ) हिंदूत्ववाद्यांवरील कितीही रास्त असलेली टिका असली तरी ती या विषयात करणे मला योग्य वाटत नाही.
...पण त्या श्रद्धास्थानाला धक्का पोचवाल तर खबरदार! असा पुढील अध्याहृत अर्थ असेल तर अमान्य.
हे पण वाक्य अशासाठी पटले नाही, कारण, मूळ चर्चेतील सर्वसाक्षींचे पत्र जर आपण वाचले तर त्यातील पुढील ओळीतच त्यांचा स्पष्ट अर्थ अध्याहृत मानला तरी समजेल, : "स्वा. सावरकरांची ही जगप्रसिद्ध उडी हे कोट्यावधी हिंदुस्थानियांचे श्रद्धास्थान आहे. श्री. दांडेकर महाशयांना अशी घटना घडलीच नाही असे म्हणायचे असेल तर त्यांनी स्वा. सावरकरांचे ते पत्र व अन्य पुरावे कृपया सादर करावेत. ते खरे असल्यास आम्ही अंध भक्ति न करता आम्हाला आराध्य असले तरी स्वा. सावरकरांनी अशी उडी मारली नव्हती हे मनोमन मान्य करु. "
फडक्यांनी ही माहीती प्रकाशात न आणण्याचे कारण देताना आपण म्हणता की; "कारण ते हायपोथेटिकल आहे. इतिहासकाराला वा अभ्यासकाला त्याच्या संशोधनातुन काढलेला निष्कर्षावर ठामपणे येता येईल असे नाही. परवडणारी परखडताच व्यक्त केली जाते. जनमताच्या माहोल समोर त्यांना प्रतिकूल वाटणारी मते व्यक्त करुन अप्रिय होणे एक रिस्क असते. त्यापेक्षा मौन बाळगणे अनेक विद्वान पसंत करतात. इतिहासातील थोर व्यक्ती ही माणसेच होती हे मान्य केले कि मुल्यमापन जड जात नाही पण गोची तिथच होते."
हा भाग मला देखील सर्वसाधारण वस्तुस्थिती म्हणून मान्य आहे, तज्ञ असले तरी, अर्थस्य पुरूषो: दासा: प्रमाणे असतात, अथवा , "नसे राम सोडूनी द्यावे, सुखालागी आरण्य सेवीत जावे" असे म्हणत वागतात ही वस्तुस्थिती आहे. मात्र स्वतः फडके अभ्यासू होते आणि तज्ञ होते. इंटरनेटच्या काळात जो संदर्भ मला सहज आणि तात्काळ मिळाला पण काय पाहीले पाहीजे हे तज्ञ नसून देखील कळू शकले तर फडके काही संशोधन न करता बोलतील हे मान्य नाही...
या संदर्भात मला एकदा त्यांची आणि दुर्गा भागवतांची झालेली खडाजंगी वाचल्याचे स्मरते - त्यांचे म्हणणे होते टिळक हे १९१७ नंतरच्या सुमारास साम्यवादी विचारांकडे झुकले होते (अर्थात त्यांनी हे लिहीले, तेंव्हा भारतात समाजवाद होता आणि रशियाचा काँग्रेससरकारवर प्रभाव होता). त्याचे दुर्गाबाईंनी सडेतोड उत्तरे देऊन (अर्थातच अभ्यासांती) खंडन केले होते.
तात्पर्यः घाटपांडे साहेबांच्या वरील प्रतिसादात खटकलेली गोष्ट काय तर जेंव्हा स्पष्टपणे एखाद्या गोष्टीला चूक म्हणायची वेळ येते, ज्याचा अर्थ आपण जणू काय सावरकरांची अथवा सद्यस्थितीतील हिंदूत्ववाद्यांचीच जणू काही बाजू घेतो, अथवा वर्तकांच्या बाजूने बोलतोय असा अर्थ होईल, तेंव्हा तात्काळ उगाच त्यात अवांतर लिहून विषय थोडाफार भरकटवणे... हे घाटपांड्यांबद्दल व्यक्तिगत नाही हे त्यांना देखील माहीत आहे, पण ही एकंदरीत भारतीय वृत्तीचे दुसरे एकेरी टोक आहे असे वाटते इतकेच.
3 Nov 2008 - 9:49 am | वेताळ
सावरकरांसारख्या उंत्तुग व्यक्तिमत्वावर टिका केल्यावर प्रसिध्दी मिळेल हा हेतु ठेवुन त्याने तसा आरोप केला असावा. पण सुर्यावर थुंकायचा प्रयत्न केला तर थुंक आपल्याच अंगावर पडणार हे त्याला माहित नसावे. अशी माणसे महाराष्ट्रात खुप आहेत.
वेताळ
3 Nov 2008 - 10:14 am | मराठी_माणूस
जेव्हा अंदमानान येथील स्वातंत्र्यज्योतीवरील स्वा. सावरकर यांचे उदगार मणीशंकर अय्यर यांनी काढुन टाकले तेव्हा बराच गदारोळ उठला होता व कोट्यावधी स्वा. सावरकरभक्त संतप्त झाले होते व त्या अनुषंगाने अनेक चर्चा घडल्या होत्या
दुर्दैवाने पुढे काहीच झाले नाही, त्या अय्यर ला कसलीच झळ पोहचली नाही
3 Nov 2008 - 1:10 pm | अनामिका
हल्ली अशी बाष्कळ विधाने करुन प्रसिद्धी मिळवणार्यांच पेव फुट्लय महाराष्ट्रात किंबहुना भारतात .
असल्या क्षुल्लक लोकांच्या बोलण्याकडे ल़क्ष देतो कोण?
दादोजींच्या महाराजांचे गुरु असण्यावरुन राळ उठवुन झाली आता स्वातंत्र्यवीरांना लक्ष करायचा मानस असेल.
त्या मणिशंकर ने आपल्या हलकट नीच प्रवृत्तिचे दर्शन घडवले आता दांडेकर घडवतायत.
पण असल्या थिल्लर लोकांच्या कुठ्ल्याही कृतीस अथवा विधानास कींमत न देणे हेच योग्य.
मटा ने असल्या हलक्या प्रवृत्तीच्या व्यक्तींचे कुठलेही लेखन छापणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे.........
"ने मजसी ने परत मातृभुमिला
सागरा प्राण तळमळला"
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
3 Nov 2008 - 3:38 pm | विसुनाना
हा विजय दांडेकर फारच उडाणटप्पू आणि खोटारडा इसम दिसत आहे.
डॉ. य. दि. फडके यांच्या नावावर आपला 'जावईशोध' खपवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या इसमाकडून लिखित स्वरूपात माफीनामा लिहून घेतला पाहिजे.
श्री विकास यांनी दिलेल्या दुव्यातल्या कागदपत्रातला त्या साहसी 'उडीचा' (अगदी पोर्टहोल, पोहणे, आरडाओरडा यासर्वांसकट) प्रत्यक्ष उल्लेख वाचावा. (पान २५३)
WHEREAS, on the 7th July, the " Morea " arrived at Marseilles. The following morning, between 6 and 7 o'clock, SAVARKAR, having succeeded in effecting his escape, swam ashore and began to run; he was arrested
by a brigadier of the French maritime gendarmerie and taken back to the vessel. Three persons, who had come ashore from the vessel, assisted the brigadier in taking the fugitive back. On the 9th July, the " Morea " left
Marseilles with SAVARKAR on board.
WHEREAS, from the statements made by the French brigadier to the Police at Marseilles, it appears:
that he saw the fugitive, who was almost naked, get out of a porthole of the steamer, throw himself into the sea and swim to the quay; that at the same moment some persons from the ship, who were shouting and gesticulating, rushed over the bridge leading to the shore, in order to pursue him; that a number of people on the quay commenced to shout " Arrêtez-le "; that the brigadier at once went in pursuit of the fugitive and, coming up to
him after running about five hundred metres, arrested him.
3 Nov 2008 - 5:23 pm | विकास
काल रात्री हा दुवा शोधल्यावर संपूर्ण पहायला वेळ मिळाला नाही...
हा दुवा म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कागदपत्रांचा भाग आहे. हे ध्यानात असूंदेत.