आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे….
१. अचानक बंद होतो
२. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा
३. अचानक mute मोड मधेय जातो
४. फोन घेताना hang होतो.
५. wallpaper वेगवेगळा दिस्तो. (म्हणजे जर मी home आणि lock स्क्रीन साठी चे option select करून एखादा wallpaper ठेवला तरी home आणि lock स्क्रीनला वेगवेगळा च दिसतो .
तुम्ही कोणते फोन वापरता आणि त्यात काय काय गुण-दोष आहेत आणि त्या वर काय उपाय केले आहेत हे माहित करून घ्यायचे आहे.
प्रतिक्रिया
19 Nov 2014 - 1:14 pm | जेपी
आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिला.
काय जास्त नखरे नव्हते.धाग्यानिमीत्त तो आठवला आणी डोळे पाणावले.
19 Nov 2014 - 2:12 pm | स न वि वि
नुकताच नाल्यात जिव दिला.
*LOL* *LOL*19 Nov 2014 - 2:24 pm | वेल्लाभट
हसायला आलेलं आहे हे वाचून !
लोळ !
19 Nov 2014 - 2:28 pm | योगी९००
आमच्या नव्या lumia याने नुकताच नाल्यात जिव दिला.
ड्वाळे पाणावले....(वाचून की फक्त मोबाईलने जीव दिला...मालकाला नाही घेतले बरोबर.....)
20 Nov 2014 - 9:11 am | योगी९००
ह.घ्या. लिवायचे राहीले....गैरसमज करून घेऊ नका..
19 Nov 2014 - 6:01 pm | धर्मराजमुटके
तुम्ही लेझीम तर खेळत नव्हता ना ? :)
19 Nov 2014 - 6:06 pm | जेपी
लेझिम प्रकरण कळाला नाय.जमल्यास व्यनी करुन सांगावा.
नाला आमच्या व्यवसायाचा भाग आहे.
19 Nov 2014 - 8:38 pm | टवाळ कार्टा
तुला कल्ला की मला पनं कलव
19 Nov 2014 - 8:53 pm | धर्मराजमुटके
जास्त दारु पिऊन झिंगलेला व्यक्ती दोन पाऊल पुढे तर एक पाऊल मागे येतो. त्याची चाल लेझीम खेळल्याप्रमाणेच दिसते. तसेच पुर्वी दारु पिऊन गटारे / नाल्यात पडणार्या व्यक्तींचे प्रमाण लक्षणीय होते. (आताचे माहित नाही.)
अवांतर : प्रतिसाद केवळ मजेमजेत दिलेला आहे. कोणताही आरोप करण्याचा हेतू नाही. :)
19 Nov 2014 - 9:01 pm | टवाळ कार्टा
=))
19 Nov 2014 - 9:06 pm | जेपी
आमच्या lumia ने जीव दिलेला नाला वेगळा होता. एक जेसीबीला त्याने गिळायचा प्रयत्न केला.पोकलेन पण आर्धि गिळली होती.
गडबडीत वरच्या खिशातील मोबल्याने उडी मारली.
दोष आमचा नाही.
19 Nov 2014 - 2:15 pm | कंजूस
कोणताही फोन नखरे करू लागला की त्याअगोदरच्या दोन एक दिवसात काय काय केले हे पाहावे. त्यातली कोणती गोष्ट आतापर्यँत कधी केली नव्हती तिथेच पाणी मुरतंय हे ओळखावे. सर्दी झाली की मी काल पावसात भिजलो/आइसक्रीम फार खाल्ले/जुनी पुस्तके झटकली इ॰ आठवतो तसे.
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे ओएस अपडेट नीट झाली नाही आहे/थोडी RAM ब्लॉक झाली आहे. माझ्या मते जेलिबिन नंतर ओएसच्या आर्किटेक्चरमध्ये सुधारणा झाली नाहीये फक्त वरवरचे दिखाऊ(cosmetics) अपडेटस आलेले आहेत. जुनीच ओएस ठेवली असती तरी चालले असते पण आता परतही जाता येणे अशक्य आहे.आता एकेक ओझे कमी करा. १)क्लिअर ऑल पासवर्डझ ,कुकिज २)सिक्यु लॉक ३)डिलिट प्लेलिस्ट ४)रेडी इमेल बॉक्स आणि नोटिफिकेशन्स बंद करा. ५)दोन दिवसांत ब्लुटुथने घेतलेली फाईल काढा. करून पाहा सुधारणा होते का?
19 Nov 2014 - 2:22 pm | वेल्लाभट
साफ चूक. उलट त्यात जास्त धोका असतो व्हायरस चा. तुलनेत विंडोज फोनला व्हायरसचा धोका खूप कमी असतो.
मी विंडोज वापरतो. लुमिया.
नखरे आहेत त्याचेही.
१) फोन वाजला की टच ऑपरेट होत नाही मग पटकन स्क्रीन ऑफ ऑन केला की फोन उचलता येतो.
२) क्वचित हँग होतो. आत्तापर्यंत एका वर्षात १०-१५ वेळा झालेला आहे.
३) माझा फोन मध्यंतरी असंख्य वेळा रिबूट होत असे. काही कळेना. बॅटरीला पॅकिंग लावलं, की बॅटरी लूज बसत असावी इत्यादी. पण दोन महिने हे सहन केल्यावर, 'तरी मी म्हणत होते सॅमसंग घे', 'बघितलंस, लुमिया! सध्या अँड्रॉईडचंच मार्केट आहे रे' असे अनेक शेरे ऐकल्यावर एक दिवस जेंव्हा बसवलेल सिलिकॉन कव्हर काढलं, तेंव्हा फोन सुसाट नीट सुरू राहिला. एक दिवस, दोन दिवस, एक आठवडा झाल्यावर पुन्हा कव्हर घातलं, फक्त बघण्यासाठी की त्यामुळेच तर....?... आणि काय विचारता? पुन्हा रिबूट. लोचा कव्हरच्या डिजाईन मधे होता ज्यामुळे पॉवर ऑन चं बटण अर्धवट कसंतरी दाबलं जायचं आणि रिबूट व्हायचा फोन. मग कायमचं काढून टाकलं सिलिकॉन कव्हर. निष्कर्षः चटकन निष्कर्ष काढू नये, आणि लुमिया/विंडोज फोन उत्तम आहे.
या व्यतिरिक्त लुमियाने फारसा त्रास दिलेला नाही. पूर्णपणे समाधानी आहे मी विंडोज फोनने.
अरे अरे. माझ्या फोन ने दोन आठवड्यापूर्वी थोबाड फोडून घेतलं. खिशातून बसमधे पडला खाली. फुटला स्क्रीन. नंबर ३ मधे म्हटल्याप्रमाणे सिलिकॉन कव्हर काढलं होतं ना... आता नवा बसवला. लोकल दुकानातून. १५०० मधे.
19 Nov 2014 - 11:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत...लुमिया लै भारी.
22 Nov 2014 - 10:23 am | शिद
हे कुठं दुरुस्त करुन घेतलं साहेब? मला पण माझ्या सॅमसंग एस३ मिनीची स्क्रीन ग्लास बदलायची आहे.
चौकशी केल्यावर बरेच जणं म्हणाले की फक्त ग्लास बदलून देता येणार नाही तर टच-स्क्रीन सकट बदलून घ्यावी लागेल.
24 Nov 2014 - 1:02 pm | वेल्लाभट
ठाण्यात प्रभात टॉकिज च्या मागच्या रस्त्यावर प्रभात (आता गोल्ड डिजिटल) च्या बाजूने बारकासा बोळ जातो त्यात तिसरं दुकान सिद्धिविनायक टेलिकॉम.
26 Nov 2014 - 8:42 am | शिद
धन्यवाद. :)
19 Nov 2014 - 2:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आमचा नॉकिया(१०५-नॉकिया) अनुभव चांगला आहे.हल्ली तर बरेचसे लोक सॅमसंगीच झाल्याने त्याचा दर्जा उत्तम असेल असा समज होता.
"Android मधेय म्हणे virus पकडत नाही"
मग कठीण आहे रे.तुमच्या त्या लिनक्सबद्दल असे वाचले होते.
" जेव्हा software update चे notification"
ही एक डोकेदुखी आहे असे माझे मत.नोटिफिकेशन पाठवणार्यांची गचांडी धरावयास हवी.
19 Nov 2014 - 2:58 pm | संचित
माझ्याकडेही नोकिया आहे. सुरुवातीला बराच हंग व्ह्याचा. पण विन ८.१ ची उप्डते आल्यापासून बर आहे. क्वचित फोने घेताना टच ऑपरेट होत नाही. पण तेव्हढ सोडलं तर ठीक आहे..
19 Nov 2014 - 6:20 pm | बॅटमॅन
देवा परमेश्वरा, गमभनच्या कृपेने कायकाय वाचायला लावशील. =))
19 Nov 2014 - 9:23 pm | योगी९००
त्यांना अपडेट म्हणायचे आहे.....
19 Nov 2014 - 9:54 pm | लॉरी टांगटूंगकर
==))
19 Nov 2014 - 2:59 pm | विजुभाऊ
आमचा अँड्रॉईड सोनी एक्ष्पीरीया
१)फोन आल्यावर घेण्यासाठीचे स्लाईड बटन वापरले तरी दोन तीन रिंगा वाजतातच.
२) सकाळी गजर बंद करताना जरा काही चूक झाली की गजर बंद करायचे बटन गायबच होते ते कुठेच सापडत नाही. शेवटी फोन ऑफ्फ केल्यावरच गजर बंद होतो.
19 Nov 2014 - 5:53 pm | मोहनराव
आमचा सॅमसंग s2
1) बराच वेळा हॅंग होतो
2) अप्लिकेशन नेविगेट करताना स्लो होतो
3)कधीकधी अचानक रिसटार्ट होतो
19 Nov 2014 - 6:09 pm | हाडक्या
सगळ्यात बेष्ट आय-फोन..!! ढीगभर बंधने घालतो तो तुमच्यावर )खासकरून भारतीय लोकांना फार त्रास होतो त्याचा ;) ) पण प्रॉब्लेम नाय येनार कसलाच.
19 Nov 2014 - 6:17 pm | रेवती
शामसंग ग्याल्याक्षी आहे. कधीही चालू न केलेली अॅप्लीकेशने कशी चालू झाली माहित नाही. त्यामुळे ब्याटरी लवकर संपू लागली. आधी ती अॅप्लिकेशने बंद केली. मग काही दिवस बरे गेले. पंधरा दिवसांपूर्वी अचानक ब्याटरी एका दिवसात डिस्चार्ज व्हायची म्हणून (१ अठवडा वाट बघून) नवी मागवली. त्या दिवसापासून पहिली ब्याटरी शिस्तीत वागू लागली. आता नवी ब्याटरी येऊन पडलीये आणि जुनी व्यवस्थित आहे.
19 Nov 2014 - 8:34 pm | वेल्लाभट
यंत्रांनाही भावना असतात बहुदा :)
19 Nov 2014 - 8:45 pm | मोहनराव
:)
19 Nov 2014 - 9:04 pm | रेवती
असेच म्हणावेसे वाटतेय आता!
20 Nov 2014 - 1:03 am | बहुगुणी
मैं दूजा ब्याह रचाऊंगा
मैं तेरी सौतन लाऊंगा
तू दूजा ब्याह रचाएगा?
हाये मेरी सौतन लाएगा?
मैं मायके नही जाऊंगी
तुम देखते रहियो
:-)
20 Nov 2014 - 4:51 am | रेवती
अगदी अगदी! जुने फोनच बरे म्हणायची वेळ आलीये. मिस्ड कॉल ठसठशीतपणे दाखवायला हा फोन लाजतोय असं वाटतं. अगदी बारीक चिन्ह कोपर्यात! कधी दिसायचं?
19 Nov 2014 - 9:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी खोटी गोष्ट. कुठलीही ऑपरेटींग सिस्टीम १००% व्हायरस फ्री नाही. अँड्रोईड विशेषकरुन नाही. कारण अँड्रॉईड ही ओपन सोर्स ऑपरेटींग सिस्टीम आहे. ओपन सोर्स ऑपरेटींग सिस्टीम्स व्हायरस ला बळी पडायचं प्रमाण तुलनेनी जास्त आहे.
19 Nov 2014 - 9:50 pm | श्रीरंग_जोशी
मी ब्लॅकबेरी झेड १० हा चतुरभ्रमणध्वनी वापरतो.
धाग्यात वर्णिलेल्या समस्यांइतक्या गंभीर समस्या कधीच जाणवल्या नाहीत.
केवळ खिशातुन काढताना वगैरे कधी कधी स्वतःहून रिस्टार्ट होतो. माझ्या बायकोकडे पण झेड १० च आहे. तिला ही समस्या जाणवत नाही.
वर वेल्लाभट यांच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे सिलिकॉन केसचा घटक यास कारणीभूत असावा असे वाटत आहे. माझ्या फोनला सिलिकॉन केस आहे तर बायकोच्या फोनला वेगळी केस आहे. काही दिवस विनाकेसचा वापरून बघतो.
19 Nov 2014 - 9:59 pm | मुक्त विहारि
आमचा, लीनोव्हा बर्यापैकी बरा चालत आहे.
(किंवा आमचा फोन जरा जास्तच स्मार्ट असल्याने, आमच्या सारख्या "ढ" माणसाला सांभाळून घेत असेल.)
19 Nov 2014 - 10:00 pm | पैसा
कंजूस यांनी सांगितलेले उपाय करून बघा. काहीच माहिती नसेल तर प्रयोग करत बसण्यापेक्षा हॅण्डसेट सर्व्हिस सेंटरला नेला तर जास्त चांगले. माझा अॅण्ड्रॉईड फोन मध्यंतरी अचानक काही वाटेल ते अॅप्स ओपन करायला लागला. ते बंद न करता आणखी दुसरे सुरू व्हायचे. फॅक्टरी रिसेट केल्यावर तासभर बरा चालला. परत ये रे माझ्या मागल्या. मग आणखी २ दिवसांत फोनबुकमध्यल्या एका नंबरला आपोआप कॉल लागला. माझ्या आईने तो नंबर बंद करून २ वर्षे झाली आहेत म्हणून बरे. रेवतीला फोन लागला असता तर माझे काही खरे नव्हते. एअरटेलवाल्यांनी एका कॉलसाठी महिन्याच्या लँडलाईन बिलाइतके बिल फाडले असते. ताबडतोब फोन बंद करून सिमकार्डे एका ६०० रुपयाच्या फोनमधे घातली आणि हॅण्डसेट दवाखान्यात भरती केला. वॉरंटीमधे आहे, मात्र बरा व्हायला किमान २० दिवस लागतील असे कळताच दुसरा फोन मागवून मोकळी झाले. आता तो कधीही घरी येवो.
तात्पर्य, वॉरंटी संपली असेल आणि फोनचे नखरे सुरू झाले की दुसरा फोन आणायला हवा आहे हे समजावे. आताचे स्मार्ट फोन जुन्या नोकिया ३३१० किंवा मोटोरोला सी ३५० ई सारखे दहा दहा वर्षे विनातक्रार काम करत नाहीत.
20 Nov 2014 - 7:54 am | टवाळ कार्टा
नोकिया ३३१०
हा स्वसंरक्षणार्थ्सुध्धा वापरता येतो...फेकून मारायला =))
20 Nov 2014 - 8:01 am | रेवती
हैला! खरच की! माझीही अॅप्लीकेशने अशीच चालू न करताही व्हायची. मुलाने ती सगळी बंद केली. सांगते काय, आता मीच फोन तयार करणारे. आणि हा फोनही मी घेतलेला नव्हता . फ्री आलाय तो! यापुढे बाबा आदमाच्या जमान्यातला घेणारे! नकोच नस्ती कटकट!
20 Nov 2014 - 2:03 am | अमित खोजे
नवीन फोनबाबत कल्पना नाही. गेली ४ वर्षे आपला सफरचंद मी भ्रमणध्वनी क्रमांक ४ स (Apple iPhone ४ S - अजून जास्त फाडता नाही आले याला) अति उत्तम स्थितीमध्ये चालू आहे. काहीही तक्रार नाही.
आलेले सगळे फोन घेता येतात तसेच फोन करता येतात.
सकाळी गजर व्यवस्थित मी बंद केल्यावरच बंद होतो. (मात्र सुरु आपला आपण तो पण वेळेवर होतो बरं का! )
अगदी नवीन OS ला जरी उप्डते *lol* केले तरीही बुंगाट पळतो आहे.
$२०० कामी लागले म्हणायचे.
20 Nov 2014 - 8:31 am | स्वप्नज
'सुक्ष्मकमाल' वापरत आहे..१ वर्ष झाले. सुक्ष्मकमालाने कमालच केली..एक सुक्ष्म बिघाडदेखील झाला नाहीय... अजूनतरी स्मार्टली च वागतोय..
20 Nov 2014 - 9:02 am | थॉर माणूस
Galaxy S3... दोन वर्षे होतील आता. कसलाही त्रास नाही. नव्या अपडेटस मुळे ६ एक महिन्यांपुर्वी काँटॅक्टस उघडताना २-३ सेकंदांचा डीले यायला लागला कधी कधी. पण तो सॅमसंग च्या इंटरफेसचा घोळ असल्याचे कळले. बाकी आज वर फोनने कधीही तक्रार केलेली नाही. २-३ वेळा माझ्यामुळे डोक्यावरसुद्धा पडलाय बिचारा पण तरीही कसलेच नुकसान नाही झालेले.
20 Nov 2014 - 9:34 am | मदनबाण
@ जेपी
नाले नाले पे लिख्खा होता है गिरनेवाले स्मार्ट फोन का नाम... ;)
@ कंजूसमामा
अगदी योग्य सल्ला ! :)
@मुवि
अहो डोंबिवलीकरांशी पंगा घेण्याचा "ओव्हर स्मार्टपणा" कोणता फोन करेल ? ;)
@पैसा ताई
कृपया आपण माझ्या मोबाईलचे स्मार्ट अनुभव असे पुस्तक प्रकाशित करावे ! वाचकांना एकदम टेक्नोसॅव्ही लेखन वाचनाचा आनंद मिळेल बघा. ;)
जाता जाता :- या स्मार्ट फोनच्या स्पर्धेत आता टी-सिरीज ही उतरले आहे, एका चीनी कंपनी बरोबर यांचा टाउअप आहे. { व्हेअर इज मेक इन इंडिया कॉन्सेप्ट ?} तर नोकिया हे नाव संपले नसुन त्यांचा एन-१ हा टॅबलेट लवकरच "चीन" मधे लॉन्च केला जाणार आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
20 Nov 2014 - 9:52 am | पैसा
पण खरं सांगू बाणा, दहा वर्षापूर्वीचा घेतलेला पहिला मोबल्या हामेरिकन बनावटीचा मोटोरोला C350e सिमकार्ड आणि बॅटरी घातली की अजून चालू होतो. दहा वर्षात फक्त एक बॅटरी बदलली. आता गेली तर परत मिळणार नाही बहुतेक. तो इतका मट्ठ आहे की त्याला FM सुद्धा नाही. पण तरी त्याच्याइतका कोणताच फोन मला आवडत नाही खरे तर!
20 Nov 2014 - 11:13 am | असंका
c350e म्हण्जे तो अँटेना बाहेर अस्ते तोच का?
20 Nov 2014 - 12:52 pm | पैसा
मट्ठ असला तरी अगदीच इतका काही "हा" नाही हो!
(चित्र आंतरजालावरून साभार)
20 Nov 2014 - 9:54 am | मदनबाण
पण तरी त्याच्याइतका कोणताच फोन मला आवडत नाही खरे तर!
पहिल प्रेम असचं असत बघ ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
20 Nov 2014 - 10:24 am | टवाळ कार्टा
कितीही मठ्ठ असले तरीही :)
20 Nov 2014 - 2:29 pm | वेल्लाभट
आय स्टिल लव्ह माय नोकिया ई ७१..... व्हॉट अ फोन इट वॉज ! मध्यंतरी ग्रे मार्केटमधून घेण्याचाही विचार केलेला... पण बाजूला ठेवला. कारण आधीही असा बंद झालेला फोन इथून तिथून मागवून झाला आहे. काही काळ वापरला. आता बंद आहे, पडून आहे. त्यामुळे पुन्हा नको तसं म्हणून सोडला तो विचार.
आजवर वापरलेले व सगळेच यादगार असलेले फोन नोकिया ३३१० नोकिया ३१२०, नंतर नोकिया ३५००, नंतर ई ७१... आता लुमिया.
20 Nov 2014 - 2:48 pm | बॅटमॅन
ग्रे मार्केट काय असतं बॉ? शेड्स ऑफ ग्रे आणि ग्रे म्याटर माहिती आहे, पण ग्रे मार्केट काय प्रकार आहे?
(अज्ञानी) बॅटमॅन.
20 Nov 2014 - 3:17 pm | प्यारे१
हल्ली ब्लॅक मार्केट (काळाबाजार) म्हणत नाहीत म्हणून ग्रे मार्केट.
20 Nov 2014 - 3:24 pm | बॅटमॅन
ओह अच्छा, धन्यवाद.
20 Nov 2014 - 3:48 pm | स्वामी संकेतानंद
शंभर टक्का काळाबाजार नसतो काही.अर्ध लिगल, अर्ध इल्लिगल.बिल देत नाहीत म्हणून ग्रे मार्केट. प्रॉपर दुकाने असतात मात्र ऑथराइझ्ड डिलर नसतात हे.
20 Nov 2014 - 4:15 pm | बॅटमॅन
अच्छा, ओके.
20 Nov 2014 - 4:20 pm | प्यारे१
नवं काहीही विदौट बिल खरेदी करणं म्हणजे चोरीचाच मामला थोडक्यात काळाबाजार झाला ना मालक?
20 Nov 2014 - 4:30 pm | स्वामी संकेतानंद
आपण विदाउट बिल खरेदी करतो. त्याच्यापाशी असतात धंद्याचे प्रूफ. तो शासनाला टॅक्सही देतो, पण कमी. ;)
हा काळा बाजार नाही. काळ्या बाजारात काहीच लिगल नसते. लपूनछपून असते. इथे फक्त हे दुकानदार ऑथराइझ्ड डिलर नसतात हाच काय तो फरक. अनेकदा हे तुम्हाला बिल सुद्धा देतील. मग काय क्रायटेरिया ठेवायचा ग्रे मार्केटचा? तर तो दुकानदार ऑथराइझ्ड डीलर आहे का ते बघणे. समजा आयफोन विकण्याची परवानगी सफरचंदाने फक्त रिलायन्सला दिली असेल आणि तरीही तुमच्या गल्लीतला मारवाडीसुद्धा आयफोन विकत असेल(बिलसकट) तरी ते ग्रे मार्केटिंग झाले. इथे वितरण प्रणाली अनऑथराइझ्ड आहे हे लक्षात आले असेलच. हा महत्वाचा फरक ब्लॅक आणि ग्रे मध्ये
20 Nov 2014 - 4:35 pm | स्वामी संकेतानंद
ग्रे मार्केटवाले आधिकारिक वितरण प्रणाली बायपास करत असल्याने इथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकत घेणे स्वस्त पडते. आणि विदाउट बिल घेतले तर अधिकच स्वस्त. मोबाईलच्या नोकिया युगात अनेकदा विदाउट बिल घेतले जात असत. आता मात्र माझी हिम्मत होणार नाही. :)
20 Nov 2014 - 11:01 am | स्वामी संकेतानंद
आमचा शोणी एरिक्षणचा लिव विथ वाकमन आहे. अडीच वर्षे झाली. सिलिकोन कव्हर होता तोही सव्वादोन वर्षांनी फाटला अखेर. आता फोन कव्हरविनाच चालवतोय.(शोधावा म्हणतोय बाजारात सापडतो का ते.) फोन मजबूत आणि कव्हरची कृपा, आदळ-आपट्,वादळ-वारे सगळे हसतखेळत सहन केले त्याने.(माझ्या प्रंप्रिय नोकियाच्या दगडाची आठवण करून देतो हा.) अडीच वर्षांत कुठलाही आजार नाही,हाडेकाडे मोडणे नाही, सर्दीपडसे नाही, रुसवेफुगवे नाहीत. फस्सक्लास चालतोय अजूनही. आता लवकरच श्री. नेक्षस गुगळे आश्रमात येणार असले तरी दुसरा सीम टाकून ह्याचा वापर चालूच ठेवणार आहे. :)
20 Nov 2014 - 1:10 pm | कपिलमुनी
गुगळे म्हणला की एका जुन्या मिपाकराची आठवण येते ...
गेले ते दिवस :(
20 Nov 2014 - 3:50 pm | स्वामी संकेतानंद
कोण ते?
20 Nov 2014 - 3:54 pm | मदनबाण
चेतन सुभाष गुगळे
यांचा गाजलेला लेख :- सिंहीण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
20 Nov 2014 - 4:17 pm | स्वामी संकेतानंद
=))
21 Nov 2014 - 8:31 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=)) मुक्तफिट ;)
21 Nov 2014 - 4:54 pm | बॅटमॅन
ते मुतपीठ आहे. नेमका संदर्भ विसरलो, पण करेक्ट नाव हेच आहे. उप्डते केले पाहिजे. ;)
25 Nov 2014 - 7:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
तुला आठवलं की मला पण "उप्डते" कर रे बाबा. =))
25 Nov 2014 - 8:55 am | टवाळ कार्टा
अचरत बव्लत, चोप्य पस्ते सारखे उप्दते मिपाफेमस होणार?
20 Nov 2014 - 11:25 am | पिशी अबोली
माझ्या सॅमसंगने पर्वाच ५व्या मजल्यावरून लिफ्टच्या गॅपमधून उडी मारली.. पण बॅक कव्हर ला २ स्क्रॅच सोडल्यास अजूनतरी काही प्रॉब्लेम दिसलेला नाही.. त्यामुळे आय लौ माय फोन.. :)
20 Nov 2014 - 11:39 am | माईसाहेब कुरसूंदीकर
असंगाशी (सॅम्)संग प्राणाशी गाठ.
(नॉकियाप्रेमी)माई
20 Nov 2014 - 11:56 am | जेपी
माई,
तुमचे 'हे' कुठला फोन वापरतात.
20 Nov 2014 - 1:11 pm | कपिलमुनी
नानांस आता फक्त टेलीपॅथी किम्वा प्लँचेटच !
20 Nov 2014 - 1:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आता पर्यंत हा होता.
20 Nov 2014 - 11:00 pm | vikramaditya
माई, ग्रॅहम बेल ने पहिला फोन तुमच्या घरि केला तेव्हा तो कॉल कोणी घेतला? तुम्ही कि नानांनी...
20 Nov 2014 - 3:13 pm | मदनबाण
५व्या मजल्यावरून लिफ्टच्या गॅपमधून उडी मारली.. पण बॅक कव्हर ला २ स्क्रॅच सोडल्यास अजूनतरी काही प्रॉब्लेम दिसलेला नाही..
बाब्बो... अरे हा फोन काय अंबुजा सिमेंट वापरु बनवलाय काय ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
20 Nov 2014 - 12:23 pm | प्रशांत हेबारे
शेवटी सर्व आपल्या वापरण्यावर अवलंबून असते.
20 Nov 2014 - 1:21 pm | पाषाणभेद
आजचा सुविचार:
स्मार्ट फोनमुळे वेळेचा अपव्यय होतो. स्मार्ट फोनचा वापर टाळा, वेळेचे महत्व पाळा.
- सं. पाषाणभेद (मृ. श.के. १५१५)
20 Nov 2014 - 2:18 pm | बॅटमॅन
मी अजूनतरी डम्ब फोनच वापरतो. बाकी ग्याजेटं हाताळण्यात उगा डोक्याला ताप.
20 Nov 2014 - 2:49 pm | arunjoshi123
माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस ५ आहे. त्याच्यावर मी एकूण ३६० च्या अप्प्लीकेशन्स डाउनलोड केली आहेत. तरी ना बॅटरीचा प्रॉब्लेम, ना स्पीडचा प्रोब्लेम, ना नेविगेशनचा (२-पेज ओल्नी). पण हे काहीतरी कौतुकास्पद आहे असं ऐकायला , मानायला कोणी नाही. असो. ;)
20 Nov 2014 - 3:02 pm | टवाळ कार्टा
झैरात...झैरात ;)
20 Nov 2014 - 3:13 pm | योगी९००
कोणाची झैरात?
फोनची की हा फोन माझ्याकडे आहे याची? (ह.घ्या).
20 Nov 2014 - 3:17 pm | arunjoshi123
फोनची जाहिरात करून मला काय मिळनारंय? ह्घ्या.
20 Nov 2014 - 4:52 pm | arunjoshi123
अरे आता तरी कुणी माझ्या ३६० अॅप्सचं कौतिक करा. पोस्ट करून किती वेळ झालाय.
20 Nov 2014 - 4:57 pm | पैसा
त्यातली किती ओपन करून बघितलीत? आणि रॅम किती शिल्लक राहिली आहे?
20 Nov 2014 - 3:36 pm | समीरसूर
स्वस्तात मस्त. जुलै २०१४ मध्ये स्मार्टफोन नामे भूत घेतले (निरिच्छेने). सुरुवातीला भयंकर त्रास झाला. काँटॅक्ट्स घेतांना, वाचवतांना...अर्रर्रर्रर्र...काही विचारू नका. एक तर मला गेम्स, अॅप्स वगैरे मध्ये काही खास रस नाही. शिवाय कॉल झाला की फोन बंद करण्यासाठीची लाल पट्टी यायचीच नाही. स्क्रीन ऑन करून कॉल कट करावा लागायचा. मग बदलून घेतला. पण त्यातही हा प्रॉब्लेम आहेच. आता स्क्रीन ऑन करून फोन बंद करण्याची सवय झालीये. अॅप्स नसल्याने लोकं अस्पृश्य समजतात ते वेगळे. उप्दते वगैरेच्या फंदात अजून तरी पडलेलो नाही. :-) असलं काही आलं की मी नकार कळवतो. गरजा खूप कमी असल्याने मोटो ई सात हजारात बेष्ट वाटला. खूप हेवी वापर नसल्याने फोन ओक्के सुरू आहे (फोन बंद करण्याचा प्रॉब्लेम सोडून). बाकी आपल्या काही फार अपेक्षादेखील नाहीत म्हणा. फोन करणे, घेणे, कधीमधी एखादा एसेमेस, थोडीफार गाणी ऐकणे, रेडिओ ऐकणे...बस्स्स...
20 Nov 2014 - 4:10 pm | संजय क्षीरसागर
xiaomi redmi 1s
मी स्वतः मोबाईल वापरत नाही पण भार्येनं हट्ट धरलायं. फ्लिपकार्टवर २४ तारखेला सेल आहे आणि तो ४/५ सेकंदात संपतो. काही जणांकडे, फोन एक्स्ट्रा झाल्यानं ६,२०० ते ७,००० अशा विविध किंमतीला सध्या बाजारात उपलब्ध आहे.
20 Nov 2014 - 4:33 pm | पैसा
डेटा चोरीबद्दलच्या या बातम्या वाचता भारतात कोणीच वापरू नये.
http://gadgets.ndtv.com/mobiles/news/indian-air-force-reportedly-issues-...
http://trak.in/tags/business/2014/11/03/xiaomi-security-related-investig...
20 Nov 2014 - 4:44 pm | संजय क्षीरसागर
फिचर्स कशी आहेत आणि वापरायला सहज आहे का ते हवं होतं.
20 Nov 2014 - 4:55 pm | पैसा
डेटा म्हणजे काही मिलिटरी सिक्रेट्स नव्हेत. अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते. त्याशिवाय फोन चालत नाही. शिओमीवाले त्यानी बनवलेल्या सगळ्या फोनमधील असला गूगलचा, आणि फोन नंबरांचा डेटा गोळा करत आहेत आणि दुसरी बातमी नीट वाचलीत तर त्यात म्हटल्याप्रमाणे ते कोणाच्याही फोनवरून कसलेही कॉल्स करू शकतील. हाँगकाँगमधल्या एकाच्या फोनवरोन प्रचंड प्रमाणात डेटा बाहेर पाठवला जात होता अशी तक्रार आहे. त्याला डेटा चार्जेस तर लागलेच असणार. शिवाय चीनमधून मार्केटिंग कॉल्स येत होते असंही म्हटलं आहे. बघा ब्वा.
20 Nov 2014 - 5:00 pm | संजय क्षीरसागर
ही काय भानगडाये? मग अँड्रॉईडपेक्षा विंडोज OS वाले फोन वापरायला सोपे आहेत का?
20 Nov 2014 - 5:01 pm | मदनबाण
अँड्रॉईडपेक्षा विंडोज OS वाले फोन वापरायला सोपे आहेत का?
हो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
20 Nov 2014 - 5:02 pm | पैसा
मदनबाणाचा विंडोज फोनबद्दलचा धागा बघा. बॅटरी पण २/२ दिवस रिचार्ज करावी लागत नाही.
20 Nov 2014 - 5:07 pm | संजय क्षीरसागर
तिला काय वाट्टेल ते झालं तरी 8 MP कॅमेरा हवायं. Wnidows OS + 8 MP Camera मिळाला की तीचं काम झालं! बाकी त्यात इतर कोणतीही अॅप्स (वॉट्स अॅप) सोडून नसली तरी चालेल!
20 Nov 2014 - 5:33 pm | पैसा
या दोन लिंक्स बघा.
http://www.misalpav.com/node/29100
http://www.misalpav.com/node/28688
या लिंकवर तुम्हाला पाहिजे तसे ८ मेग्यापिक्सेलवाले अॅण्ड्रॉईड आणि विंडोज फोन किंमतीप्रमाणे सॉर्ट केलेले आहेत. हवा तो घ्या!
20 Nov 2014 - 5:55 pm | वेल्लाभट
http://www.microsoft.com/en-in/mobile/phones/lumia/
20 Nov 2014 - 5:49 pm | वेल्लाभट
आणि मुलीला मेगापिक्षेल चा बाऊ करू नकोस असं समजवायचा प्रयत्न करा जमल्यास. प्रत्यक्ष फोटो काढून बघा मग कळेल. लुमिया चा कॅमेरा खलास असतो. अगदी बेसिक मॉडेल पासून.
20 Nov 2014 - 5:54 pm | प्यारे१
भार्या भार्या. मुलगी नाही. धन्यवाद.
20 Nov 2014 - 5:56 pm | वेल्लाभट
माफ करा. :) गल्लत झाली.
20 Nov 2014 - 6:23 pm | पैसा
मोबाईल फोनचा कॅमेरा आपण खरे तर फार वापरत नाही. जास्त मेगॅपिक्सेल्स म्हणजे जास्त मोठ्या आकाराचे फोटो. ते आपण कधी प्रिंट करतो? शिवाय ५/७ हजारात बरे डिजिटल कॅमेरे मिळतात. त्यामुळे मी तर मोबाईलचा कॅमेरा किती मेग्यापिक्सेल आहे हे बघत पण नाही. बॅटरी कपॅसिटी आणि इंटरनेटवरचे रिव्ह्यु सगळ्यात महत्त्वाचे.
20 Nov 2014 - 6:40 pm | संजय क्षीरसागर
तिला फोटो चांगलेच आले पाहिजेत आणि झालंच तर HD Recording पण हवंय (आणि ते बहुदा) वॉट्स अॅपवर अपलोड करायचंय. तिला बाकी कशाशी काही घेणंदेणं नाही. घरी Cannon-550 DSLR आहे पण स्त्री हट्टापुढे इलाज नाही!
21 Nov 2014 - 7:15 pm | सुबोध खरे
संक्षी सर
विंडोज च्या फोन ( नोकिया ल्युमिया वगैरे) वर व्हाटस एप चालत नाही बहुधा. त्यासाठी तुम्हाला अन्ड्रोईड असलेला फोन घ्यावा लागेल. अगोदर खात्री करून घ्या
25 Nov 2014 - 7:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बजेट चा प्रॉब्लेम नसेल तर ल्युमिआ १०२० घ्या. त्या कॅमेर्याला फोनची सगळी फिचर्स आहेत. परत लै भारी बॅटरी बॅकअप.
20 Nov 2014 - 5:44 pm | वेल्लाभट
हा खरं तर वैयक्तिक मुद्दा असू शकतो, पण मी विंडोज वापरतो, व अँड्रॉईडही वापरलेत (स्वत:चे नाही) तेंव्हा माझ्या मते हो १०१ टक्के
20 Nov 2014 - 11:47 pm | लंबूटांग
साफ चूक. तुम्ही फोन सेट-अप करताना गूगल अकाउंटची माहिती विचारली जाते पण ते स्किप करून फोन वापरता येतो. अर्थात तुम्हाला गूगल प्ले स्टोअर मधून काही अॅप्स डाऊनलोड करायची असल्यास गूगल अकाउंट लागतेच.
21 Nov 2014 - 7:23 pm | सुबोध खरे
पैसा ताई
अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागत नाही. जेंव्हा पाहिजे तेंव्हा डेटा प्लान ऑन करा आणि नको असेल तर ऑफ करा. माझ्या कडे कार्बन चा टायट्यानीयम एस ५ + गेल्या ८ महिन्यापासून आहे. व्यवस्थित चालू आहे. दिवसात(रात्री) एकदा चार्ज करावा लागतो. अगोदर बायकोसाठी घेतला होता पण तो बिघडला बरीच आटा आटी करून बदलून घेतला त्यानंतर आता तो माझ्याकडे आहे आणि तिने samsung galaxy grand २ घेतला आहे. आमच्या घरीसार्वांचे android फोनच आहेत. ( माझा सर्वात स्वस्तातील आहे)
फोन बद्दल एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे दुसर्याला स्थळ सुचवण्यासारखे आहे. ते त्याला लाभेल कि नाही हे सांगता येत नाही तसेच तुम्ही सुचवलेला फोन खराब निघाला तर फुकटच्या शिव्या खाव्या लागतात. त्यामुळे मी कुणालाही स्थळ किंवा फोन सुचवत नाही.
22 Nov 2014 - 12:25 pm | पैसा
लॉग्ड इन नसाल तर बर्याच सुविधा वापरता येणार नाहीत. जीमेल आणि चॅट बंद करून फक्त मॅप्स आणि क्रोम चालू ठेवता येते का? मला वाटत नाही. चालू ठेवता असेल तर कोणीतरी उपाय सांगा. डाटा बंद केला तर स्मार्टफोन आणि साधा ६०० रुपयाचा फोन यात काय फारसा फरक राहिला नाही ना!
मी म्हणतेय ते डेटा बंद करण्याबद्दल नाहीये. नवा फोन ऑन केला की तो ताबडतोब गूगल लॉग इन स्क्रीनला जातो. नंतर गूगलचीच बरीचशी अॅप्स वापरत रहावं लागतं आणि ती बॅकग्राउंडला रन होत रहातात आणि रोज सकाळी उठून चहा प्यायच्या आधी फोन चार्जिंगला लावावा लागतो त्याचा वैताग आहे. ही जीमेल, गूगल चॅट, गुगल म्युझिक वगैरे सिस्टिम अॅप्स नको असतील तर फोन रूट करावा लागतो आणि मग वॉरंटी जाते.
विंडोज फोनवर वॉट्स अॅप चालते. माझ्याकडे चालते आहे. कधी कधी मेसेजेस एकदम बरेच येतात. पण अॅप चालू आहे.
24 Nov 2014 - 6:51 pm | लंबूटांग
सेटिंग्स मधे जा आणि अकाउंट्स नावाचा सेक्शन शोधा.
त्यातून गूगल अकाऊंट काढून टाका.
24 Nov 2014 - 8:19 pm | पैसा
अकाउंट काढून टाकल्यावर गूगल मॅप्स चालू रहातील का?
24 Nov 2014 - 10:27 pm | लंबूटांग
गूगल मॅप्सची डायरेक्शन्स फ्रॉम होम वगैरे फीचर्स चालणार नाहीत (भारतात ही फीचर्स जी मुख्यतः गूगल नाउचा भाग आहेत ती गूगलने सुरू केली आहेत का मला कल्पना नाही).
24 Nov 2014 - 10:48 pm | पैसा
माहितीसाठी धन्यवाद!
20 Nov 2014 - 4:45 pm | वेल्लाभट
कशाला चायनाच्या नादी लागता? त्यापेक्शा भारी फोन त्याच किमतीला उपलब्ध आहेत. मोटो ई चा वरच उल्लेख झाला. बर, कार्यालयात एकाने घेतला आहे हा झिओमी का काय ते. गरम होतो सॉलिड. डोकेदुखी सुरू झालीय त्याला म्हणाला. खरी खुरी हं, 'त्रास' या अर्थी नाही. तेंव्हा हे सगळं ऐकत असता नकाच घेऊ असा सल्ला देईन. मायक्रोसॉफ्ट कॅनव्हास युनाईट २ मस्त आहे असं वाचून ऐकून आहे. किंवा इन्टेक्स अॅक्वा कर्व्ह चांगला आहे. मी वापरून बघितलाय.
20 Nov 2014 - 4:50 pm | पैसा
मोटो ई माझ्या मुलीचा आहे. फोन चांगला आहे. पण त्याच्यावर कॉलेज बॅगेतल्या वह्या पडल्या आणि डिस्प्ले फुटला. त्याची किंमत ४००० सांगत होते. मी भांडून १८०० मधे मिळवला. मायक्रोमॅक्स युनाईट२ माझ्या मुलाकडे आहे. मायक्रोमॅक्स फोन चांगल्या क्वालिटीचे नसतात असे हुच्च लोक म्हणतात. मात्र हा फोन चांगलाच दणकट आणि रफ-टफ निघाला आहे.
20 Nov 2014 - 4:52 pm | वेल्लाभट
आजच घेऊन या ! :P
20 Nov 2014 - 4:51 pm | संजय क्षीरसागर
.
20 Nov 2014 - 4:55 pm | मदनबाण
Micromax to launch Cyanogen smartphones under 'Yu' brand
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
20 Nov 2014 - 11:06 pm | vikramaditya
पण बघा... ७-८ हजारात चांगली मॉडेल्स आहेत. कॅमेरा मात्र खास नाही बहुतेक
20 Nov 2014 - 5:49 pm | प्यारे१
आक्ख्या जगात बर्यापैकी माहिती 'नाही' असं काहीतरी आहे ब्वा!
आज मी किमान साखर तरी खावी म्हणतो.
20 Nov 2014 - 6:45 pm | संजय क्षीरसागर
त्याच्यापुढे इतर गोष्टी यथावकाश माहिती होतात! त्याचं विषेश काही वाटत नाही.
20 Nov 2014 - 6:50 pm | प्यारे१
तब्बेत बरी नाही का काय हो?
वे वॉन्ट आवर संक्षी सर बॅक !
कल्जी घने
20 Nov 2014 - 10:24 pm | तुषार काळभोर
झेनफोन ४ (४५०)
४.५" १़ जीबी/८जीबी, ८मेपि, बॅटरी ओके, स्क्रीन ब्राईटनेस ३०-४०% केला तर ऑफिसात आणि घरात काहीच प्रॉब्लेम न येता बॅटरी आणखी जास्त चालते. सध्या दिवसभर ३जी डाटा चालू ठेवूनही १२-१४ तास आरामात जातो. (माझे फोन कॉल दिवसभर चालू असतात. दिवसभरात ६०-९० मिनिटे कॉल)
@७०००
(+कॉर्निंग गोरिला ग्लास३ झक्कास आहे. आज ३ महिन्यानंतर नुसती स्क्रीन पुसली, तरी नव्यासारखा दिसतो)
20 Nov 2014 - 11:18 pm | धर्मराजमुटके
मायक्रोम्याक्स किंवा झोलो चे विंडोज फोन वापरलेत काय कोणी ? कसे आहेत ? विंडोज आणी करवंद यापैकी कोणता मोबाईल घ्यावा यावर खुप डोके खाजवले पण अजून विचार पक्का होत नाही. दोन सिमवाले विंडोज फोन्सचे (लुमिया) फिचर चांगले आहेत पण स्क्रीन साईज छोटी आहे. (४.५ ते ४.७" पर्यंत). करवंदाचा झेड ३ चांगला वाटतो आहे आहे पण एकच सिम वापरता येते. काय करावे काही कळत नाही.
21 Nov 2014 - 12:24 am | रेवती
हो, मायक्रो म्याक्सचा फोन पैसाताईच्या मुलाने वापरलाय्/वापरतोय.
21 Nov 2014 - 5:48 pm | होकाका
बरेच दिवस नोटीफिकेशन येत असूनही अँड्रॉइडचा अपडेट घेतला नाही -- कारण केवळ आळशीपणा. पण आता बर्याच लोकांना झालेला त्रास बघून जाणवतं की आळशीपणामुळे फायदाच झाला - बराच त्रास वाचला.
21 Nov 2014 - 11:53 pm | सँम
karbonn a18+ वापरत आहे, १ वर्ष झाले . ४-५ वेळेस आपटला आहे आत्तापर्यंत . प्रत्येक वेळेस आपटल्यावर बंद पडला, नेहमी पडल्यावर भीती वाटायची की आता हा कधीच चालू होणार नाही . पण हा मात्र switch on केल्यावर पुन्हा पहिल्यासारखा सुरळीत चालू झाला . अजून काही प्राॅब्लेम नाही .
22 Nov 2014 - 1:50 pm | इरसाल
सोनीचा एक्स्पेरिया टी टु अल्ट्रा आहे. अजुनपर्यंत काही अडचण नाही. ;)
23 Nov 2014 - 10:10 am | चंद्रनील मुल्हेरकर
आजकाल स्मार्टफोन विश्वात तीन महिन्यात फोन, त्याचे स्पेक्स ,त्याची OS जुने वाटू लागतात. त्यासाठी सात आठ हजारात फ्लॅगशीप फोनची स्पेक्स देणारे चिक्कार फोन बाजारात आहेत, असे फोन डाऊनमार्केट नसतात ,यात लेटेस्ट OS ,पाच इंची डीस्पले ,1GB रॅम येते. असे फोन घ्यावेत, दोन वर्षांनी बदलावे. जास्त पैसे गेल्याचे दुखः नाही.
चायना कंपनी खराब असतात असे काही नाही. लेनोवो, झायोमी स्टँण्डर्ड आहेत. सगळ्या कंपन्या चीन तैवानातुन फोन बनवुन घेतात व फक्त ब्रँण्डनेमखाली विकतात. अगदी apple iphone ही तैवानची एक कंपनी बनवते.
24 Nov 2014 - 9:43 am | पेरु
मागच्याच विकमधे आयफोन ६ प्लस घेतला. लाइटवेट आणि फास्ट आहे. बरेचसे नविन अॅप्स आलेत फोन बरोबर. लुक पण भारी आहे. फक्त हा फोन ठेवता येइल असा खिसा असलेली पॅन्ट शोधायची आहे :)
24 Nov 2014 - 8:52 pm | कंजूस
नोकिआ फोन(माझा साधाच आहे)ची एक मजा म्हणजे ५मेगापिक्सेलचे फोटो २एमबी एवढे कंप्रेस होऊन मेमरीत जातात. हेच अपलोड करताना नोकिआ ब्राउजर त्याला आणखी ५०ते७०केबी एवढा लहान करतो. तरीही मोठ्या स्क्रीनवर चांगले दिसतात. परवाच्या कटट्याचे लुमिआतून ब्लूटूथने घेतलेले २एमबीचे(6.7MB) अपलोड करतांना २०केबी झाले !इतके भन्नाट सॉफ्टवेर आहे.
26 Nov 2014 - 8:48 am | चेतन677
मझ्या बर्याच मित्रांकडे सॅमसंग फोन आहे.माझ्यामते सॅमसंग फोनला हा प्रॉब्लेमच आहे तरी तुम्ही फोनचा ब्रॅन्ड बद्लुन पाहा.
3 Dec 2014 - 11:36 am | संजय क्षीरसागर
सेल फोन घेण्यासाठी सर्वांनी केलेल्या मनःपूर्वक मदतीबद्दल आभार.
सगळ्या उहापोहानंतर अनेक उलट-सुलट मतप्रवाहातून मार्ग काढत शेवटी Redmi 1S घेतला (म्हणजे FilpKart वर नेमकं पावणे दोन वाजता लॉग-इन होऊन (नशिबानं) मिळाला!). फोन कार्टमधे आल्यावर पत्नीनं (झंजावाती) वेटो वापरला, पण संध्याकाळी सहाच्या आत पेमंट करायचं होतं, त्यामुळे `तू दोन-तीन दिवस वापरुन पाहा, नाही पटला तर मी कुणाला तरी गिफ्ट देईन' या बोलीवर ती तयार झाली. दरम्यानच्या काळात, OS, Battery, Apps, Android Vs Windows, Ram, Internal Memory, Camera, Mega Pixel, Swipe Key Board, Processors, Settings, Devanagari Script, Whats App असल्या अगम्य गोष्टींची भारंभार माहिती (स्वतःला नको असतांना) झाली. आता मात्र तो फोन तिचा जिवलग झालायं.
हे सांगण्याचा उद्देश इतकाच की (स्वतः जरी सेल फोन वापरणार नसलो तरी); तो फोन तुम्ही कंप्युटरसारखा वापरणार नसलात तर, दिलेल्या किंमतीला (Rs 5,999) एकदम बेस्ट आहे. कॅमेरा अती उत्तम आहे, बॅटरी ड्रेन होणं किंवा तापणं वगैरे काहीही होत नाही, सर्व अप्लिकेशन्स फक्त दोन स्क्रीन्सवर आणि आयकॉन बेस्ड असल्यानं वापरायला अत्यंत सहज आहे, इंटरफेस एकदम सुरेख आहे.
थोडक्यात ज्यांना गेम्स किंवा इतर काही भारी अॅप्लिकेशन्ससाठी न वापरता, एक फोन विथ ऑलमोस्ट ऑल कन्विनीयन्सेस (मराठी टायपींग धरुन) असा डिवाइस वापरायचा आहे त्यांना इटज अ लव्हली बाय.