चेरी केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
1 Nov 2008 - 7:51 pm

साहित्य-
१२५ ग्राम बटर/तूप/लोणी,१२५ ग्राम साखर,३ अंडी,लिंबाची किसलेली साल १ चमचा
१.५ चमचा लिंबाचा रस,१ चिमूट मीठ,२०० ग्राम मैदा,१/४ कप दूध
२ चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर
चेरी ५०० ते ७५० ग्राम - काचेच्या बरणीत अथवा टीनमध्ये शुगरसिरपमध्ये असलेल्या आंबटगोड चेरी मिळतात त्या घ्याव्या. जर्मनीत राहणार्‍यांनी sauerkirchen/schatten-morellen नावाने ज्या काचेच्या बरणीतील चेरी मिळतात त्या घ्याव्या.
चेरीऐवजी टिन्ड अननस वापरूनही हा केक करता येतो आणि खूप छान लागतो.
कृती-
बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.१ चिमूट मीठ,लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे.मैदा व बेकिंग पावडर एकत्र करणे. मैदा थोडा थोडा घालत फेटणे‌. शेवटी दूध घालून फेटणे.
ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे.
चेरी चाळणीवर ओतणे व पाक काढून टाकणे. आता ह्या चेरीज् गोलाकार आकारात अंतराअंतरावर केकवर हलकेच बसवणे.
अवन प्री हिट करणे.१८० अंश से. वर ४५ मिनिटे बेक करणे.
बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभीत करणे.अथवा व्हिप्ड क्रिम घालून खाणे.
असा-:)

प्रतिक्रिया

प्राजु's picture

1 Nov 2008 - 8:20 pm | प्राजु

बरं झालं ही रेसिपी मिळाली.
करणार नक्की आता. फोटो काय भारी दिसतो आहे. अननस, किंवा.. स्ट्रॉबेरी सुद्धा घालून करता येईल ना..?
मस्त आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

1 Nov 2008 - 8:20 pm | यशोधरा

अगं स्वातीताई, कसले जीवघेणे फोटो टाकतेस गं! मस्तच दिसतोय केक!

सुंदर रेसीपी आणि वरुन त्याचे सुंदर फोटो...पोटात कसली आग लागते म्हणुन सांगु....... :''(
तुम्ही खुप हाल करता आमचे. :D .
बाकी बटर पेक्षा लोणी वापरले तर चालेल काय? चांगले म्हणजे किती फेटायला लागते?मी जे केक केले आहेत ते फुगतात . पण नंतर मधोमध त्या मध्ये खडा पडतो. असे का? :?
उत्तराची वाट पहात आहे.
वेताळ

स्वाती दिनेश's picture

1 Nov 2008 - 8:39 pm | स्वाती दिनेश

बटर/लोणी/तूप/मार्गारिन ह्यापैकी काहीही वापरा.
बटर वापरले तर ते अनसॉल्टेड असावे.
केकचे मिश्रण जेव्हा मोल्डमध्ये ओताल तेव्हा मध्ये कमी व बजूबाजूने जास्त ओता म्हणजे जेव्हा केक तयार होईल तेव्हा सगळीकडे एव्हन होईल व मध्ये खड्डा किवा मध्ये फुगीर असे होणार नाही.
केक तयार झाला तरी लगेच अवन बाहेर काढू नका, २ /५ मिनिटे अवन मध्ये राहू द्या आणि मग बाहेर काढा.
जितके फेटाल तितका केक हलका होईल. तेव्हा भरपूर फेटणे आवश्यक.
शुभेच्छा!
स्वाती

निमीत्त मात्र's picture

2 Nov 2008 - 5:02 am | निमीत्त मात्र

स्वातीताई, बटर आणि लोण्यामध्ये नेमका काय फरक असतो?

स्वाती दिनेश's picture

2 Nov 2008 - 5:03 pm | स्वाती दिनेश

जरी बटर = लोणी तरी वेताळ यांच्या विचारण्याचा रोख होता बाजारी बटर (उदा-अमूल बटर )ऐवजी घरगुती लोणी वापरले तर चालेल का?
इथे लोणी म्हणजे घरगुती लोणी आणि बटर म्हणजे अमूल किवा विजया चे बटर जे पावभाजी इ. साठी वापरतो ते ,असा अर्थ अपेक्षित आहे.

सुंदर रेसीपी आणि वरुन त्याचे सुंदर फोटो...पोटात कसली आग लागते म्हणुन सांगु....... :''(
तुम्ही खुप हाल करता आमचे. :D .
बाकी बटर पेक्षा लोणी वापरले तर चालेल काय? चांगले म्हणजे किती फेटायला लागते?मी जे केक केले आहेत ते फुगतात . पण नंतर मधोमध त्या मध्ये खडा पडतो. असे का? :?
उत्तराची वाट पहात आहे.
वेताळ

शाल्मली's picture

1 Nov 2008 - 9:22 pm | शाल्मली

स्वाती ताई,
एकदम मस्त पाकृ.
आणि दोन्ही फोटो सुद्धा भारीच आहेत. केक लगेच उचलून खावासा वाटत आहे :)

काश म्युन्स्टर आणि फ्राफू जवळ असतं तर.... ;)

--शाल्मली.

चकली's picture

1 Nov 2008 - 10:37 pm | चकली

फोटो आणि पाकृ एकदम छान ! लिंबाची किसलेली साल टाकल्याने मस्तच लागेल केक!

चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

2 Nov 2008 - 12:00 am | विसोबा खेचर

स्वातीआंटी,

पाकृ केवळ सुंदर..!

लिखाळ's picture

2 Nov 2008 - 12:08 am | लिखाळ

वाहवा !
फार सुंदर केक !
आता करुन पहावा असे वाटतेय :)
-- लिखाळ.

शितल's picture

2 Nov 2008 - 12:11 am | शितल

स्वाती ताई,
केकचा सुंदर फोटो आणी पाककृती ही मस्त दिली आहेस.
:)

रेवती's picture

2 Nov 2008 - 12:25 am | रेवती

स्वातीताई,
आत्ताच ड्राइड चेरीज चा केक बेक केला आणि मिपावर येऊन बघते तर हा केक.
आहे कि नै मज्जा.
तुझ्या पद्धतीने करून बघीन व कळवीन.

रेवती

स्वाती दिनेश's picture

2 Nov 2008 - 5:07 pm | स्वाती दिनेश

रेवती,नुसते सांगतेस काय ग? फोटू टाक की रेसिपीसकट .. :)

मदनबाण's picture

2 Nov 2008 - 4:46 am | मदनबाण

च्यामारी,,,फोटोच जर एव्हढा मस्त हाय तर चवीला किती सॉलिड असेल??
भुक लागली ना मला आता !!

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

ऋषिकेश's picture

2 Nov 2008 - 12:23 pm | ऋषिकेश

लाळेचं तळं साचलं....
तुम्ही काय बेकरीमधे कामाला होता काय ;) इतका सफाईदार केक... वा!

-(बेक(का)र) ऋषिकेश

सहज's picture

2 Nov 2008 - 12:29 pm | सहज

मला वाटायला लागलेय की स्वातीताई ही हॉबी प्रोफेशन मधे बनवावीस. हॉटेले काढावीस. लवकर अनेक साखळ्या निघतील पुर्ण युरोप व जगात.

आम्ही जेवण खाउ पिउन राहून च्या बोलीवर तुझ्या हॉटेलात काम करु.

आता किती उत्तम पदार्थ आहे हे लिहण्याचा कंटाळा आला आहे. :-)

चित्रा's picture

3 Nov 2008 - 12:40 am | चित्रा

मला वाटायला लागलेय की स्वातीताई ही हॉबी प्रोफेशन मधे बनवावीस. हॉटेले काढावीस. लवकर अनेक साखळ्या निघतील पुर्ण युरोप व जगात.

हेच अगदी मनात आले. किमानपक्षी एक पुस्तक तर नक्कीच निघेल (आणि चांगलेच खपेल) असे वाटते.

यशोधरा's picture

2 Nov 2008 - 12:35 pm | यशोधरा

>>आम्ही जेवण खाउ पिउन राहून च्या बोलीवर तुझ्या हॉटेलात काम करु.>>

स्वातीताई, मी ह्या सगळ्या खाऊ पिऊ वाल्यांवर लक्ष ठेवायचे काम करेन गं! :) म्हणजे तुझ्या हाटेलांना तोटा होणार नाही!!

खाऊपिऊवाले: तुम्ही मला 'खाऊ पिऊ' ची लाच दिलीत की स्वातीताईला मी तुमचे कोण्णाचे नाव सांगणार नाही!!
एकमेकां सहाय्य करू, अवघे धरु 'खाऊपिऊ' पंथ!!

मीनल's picture

2 Nov 2008 - 6:07 pm | मीनल

आधी करून पाहिन.
मग थॅक्स गिव्हिंग पॉटलक ला घेऊन जाईन आणि भाव खाईन.

अमेरिकन सुट्टी /सण साजर करायचे तर देसी मेनु करत नाही.
तेवढच वेगळ फूड खायला मिळत.

मीनल.

अनिरुध्द's picture

2 Nov 2008 - 8:35 pm | अनिरुध्द

खूपच छान स्वाती. मस्त पाककृती दिल्येस. आता करुनच बघतो घरी.

स्वाती दिनेश's picture

4 Nov 2008 - 11:42 pm | स्वाती दिनेश

खवय्यांनो धन्यवाद!
स्वाती

विसोबा खेचर's picture

5 Nov 2008 - 12:37 am | विसोबा खेचर

काय स्वाती, तुझा इतका सुंदर केक आंतरजालावर इतरत्र कुणाला फारसा आवडलेला दिसत नाही!

काय सुतकबितक आहे की काय?! :)

आपला,
(देवगडचा) तात्या बर्वा!

मनस्वी's picture

5 Nov 2008 - 2:15 pm | मनस्वी

करून बघायला हवा.
दुसरा फोटू तर क्लासच आहे :)

शाल्मली's picture

10 Nov 2008 - 11:46 pm | शाल्मली

स्वातीताई,
आज चेरी केक करुन पाहिला.

चवीला खूप छान झाला आहे. :)
तुझ्या केक मध्ये चेरी जश्या केकच्या वर सुद्धा आहेत तश्या यात राहिल्या नाहित. सर्व चेरी तळाशी गेल्या आहेत. आणि बहुधा थोडा वेळ जास्त राहिल्याने वरुन गडद रंग आला आहे. पुढल्यावेळी काय सुधारणा करावी?

पाककृतीसाठी धन्यवाद.
--(शिष्या)शाल्मली