Wikipedia वरील स्वातंत्र्यसैनिकांवरील माहीतीची वानवा
Wikipedia वरच Bombay च Mumbai करताना माझ्या लक्षात अजून एक गोष्ट आली की तिकडे स्वातंत्र्यसैनिकांवरील माहीतीची अगदीच वानवा आहे. सावरकर, टिळक अशी माणसं सोडली तर बाकी आनंदच आहे.
चाफेकर बंधू, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती एक पानदेखील अस्तित्वात नाही. जिथे आहे त्याची अवस्था अशी आहे.. त्यांच्या नावापुढे काही नाही, महाराजांचा उल्लेख एकेरी, असले प्रकार आहेत.
अहिंसेन आणि तत्सम गोष्टींनी स्वातंत्र्य मिळाल अस ज्यांना वाटत त्यांच्याविषयी माझ काही म्हणण नाही. पण, ज्यांना अस वाटत नाही ते ह्यात लक्ष घालून पूढच्या पिढीसाठीच्या या वाचनालयात माहीतीची भर घालतील अशी अपेक्षा करतो. ज्या लोकांनी, आज आपण जे उपभोगतोय, त्याच्यासाठी घरादाराची-आयुष्याची राख रांगोळी केली, त्यांना विसरल तर काळ आपल्याला कधीच क्षमा करणार नाही.
मी तिथे (Wiki वर) प्रयत्न करतोय, परंतू माझ अगाध ज्ञान पाहता ते किती पुरेस पडेल शंकाच आहे :) .
प्रतिक्रिया
2 Nov 2008 - 12:12 pm | प्रमोद देव
मिपाचे एक सदस्य सर्वसाक्षी ह्यांचा क्रांतिकारकांबद्दलचा गाढा अभ्यास पाहता तेच तुम्हाला योग्य ती मदत करू शकतील असे खात्रीने सांगता येईल.
2 Nov 2008 - 12:19 pm | ऋषिकेश
क्रांतीकारकांवर तिथे माहिती नसण्याचं कारण अहिंसावाद्यांचा कट वगैरे वाटत नाहि. फक्त विकीवर लिहिताना तिथे लेखकाचे नाव दिसत नाहि त्यामुळे एकूणच मंडळी विकीपेक्षा ब्लॉगवर अथा मिपासारख्या स्थळांवर लिहिणे पसंत करतात.
तुम्ही विकीवर लिहिते आहात हे अत्यंत स्त्युत्य आहे. इंग्रजी विकीवर पेक्षा मराठी विकीवरही माहितीपूर्ण लेख चढवावेत ही तुम्हालाच नव्हे तर तमाम मिपाकरांना विनंती.
-(विकीप्रिय मिसळप्रेमी) ऋषिकेश