खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
14 Nov 2014 - 3:07 pm
गाभा: 

'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच.

माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता.

तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे.

आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात. या क्षणी हा क्रम आहे.

१) पाको रबान pour homme - अतिशय वेगळा आणि स्ट्राँग वास. वुडी व फ्लोरल नोट्स Top Notes - Rosemary Clary Sage Brazilian Rosewood Middle Notes - Tonka Bean Lavender Geranium Base Notes - Honey Amber Musk Oakmoss
prpr

२) डनहिल डिझायर फॉर अ मॅन - गोडूस वास. प्रामुख्याने फ्रूटी. Top Notes-Apple Neroli Bergamot Lemon Middle Notes-Patchouli Teak Wood Rose Base Notes-Musk Vanilla
drred

३) बॉस - बॉटल्ड नाईट - कडक स्पायसी वूडी सेंट. लाँग लास्टिंग. हार्ड टू डिसलाईक. Top Notes-Lavender Birch Middle Notes-Violet Base Notes-Woodsy Notes Musk
boss

४) ब्रूट - ओल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन सेंट. निर्विवाद. Brut, one of the most popular men's colognes was first launched in 1964. It is originally produced by Faberge Paris. Top notes: lemon, bergamot, lavender, anise and basil. Heart: geranium, jasmine and ylang-ylang. Base: sandalwood, oak moss, vetiver, patchouli, tonka bean and vanilla.
brut

५) जोवान मस्क फॉर मेन - हाही जुना आहे. शाळेपासून वापरतो आहे. मादक वास. मस्त. Fragrance Notes-Jasmine Neroli Bergamot Musk
jm

६) लोमानी ओरिजिनल - शाळेपासून वापरलेला आणखी एक. मिडियम स्ट्राँग. Lomani pour Homme was launched in 1987. Top notes are lavender, lemon, bergamot and rosemary; middle notes are geranium, camphor and cloves; base notes are patchouli, coumarin and moss.
lomani

७) नॉटिका ब्लू फॉर मेन - चार एक वर्षापूर्वीचा टॉप सेलर. सुपर्ब सेंट. Top notes are pineapple, peach and bergamot; middle notes are jasmine and water lily; base notes are sandalwood, musk and cedar.
nblue

८) चार्ली रेड - चार्ली चे सगळेच छान आहेत. पण हा मला जास्त आवडला. हा खरं तर वूमन सेंट आहे, पण अप्रतिम आहे. बनवणारी कंपनी रेव्ह्लॉन. Top notes are orange blossom, gardenia, plum, black currant, violet and peach; middle notes are carnation, tuberose, orchid, jasmine, ylang-ylang, lily-of-the-valley and rose; base notes are honey, sandalwood, amber, musk and cedar.
cred

९) इसेन्झा डि विल्स - हा आयटीसी ने बनवलेला परफ्यूम आहे. मला माझ्या मित्राने भेट दिला होता. सुसाट आहे हा परफ्यूम. स्ट्राँग आहे, मादक आहे, स्पायसी आहे. Notes Lemon, Cedar wood, Sandalwood, Plum ,Amber, Musk
edw

१०) टबॅक - याचं सँपल वापरलेलं छोट्या बाटलीतलं. पण नंतर विकत घेणं झालं नाही. घेईन कधीतरी. अतिशय भारी वास आहे याचा. Tabac was launched in 1959. Top notes are aldehydes, lavender, neroli, bergamot and lemon; middle notes are carnation, sandalwood, orris root, jasmine, rose and pine tree needles; base notes are tonka bean, amber, musk, vanilla, oakmoss and tobacco.
tabac

जसं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल, तसं ज्याला आवड आहे त्याच्यासाठी परफ्यूमस चं हे विश्व प्रचंड व्यापक आहे, रंजक आहे. एक मात्र नक्की आहे, तुमची सर्वात पहिली ओळख जी समोरच्याला होते ती तुमच्या वासातून होते. परफ्यूम्स, अत्तरं हे त्याचंच द्योतक आहेत. राजे सजवाड्यांपासून माणूस आपलं अस्तित्व सुवासिक ठेवण्यासाठी यांचा प्रयोग करत आलेला आहे. असो.

आता तुम्हाला कुठले सेंट्स आवडतात ते सांगा ! मी माझ्या यादीत डिओ, अत्तरं वगळली आहेत, ती केवळ यादी भरकटू नये म्हणून. डिओ म्हटलं की वरचा एकही पर्याय टॉप १० मधे येणार नाही. पण असं काही नाही, तुम्हाला जे सुगंध, मग ते कुठल्याही फॉर्म मधे असूदेत, आवडतात ते सांगा ! जाणण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया

समीरसूर's picture

14 Nov 2014 - 3:10 pm | समीरसूर

किमती पण द्या ना सोबत प्लीज. म्हणजे मग ठरवता येईल की तुम्ही सांगीतलेले सेंट्स खरोखर चांगले आहेत की नाही... ;-)

माझ्या मते रु. ५०० च्या पुढचे सगळे सेंट्स भिकार असतात. ;-)

छान माहिती.

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 3:28 pm | वेल्लाभट

पण जाऊदे किमतींवरून ठरवणं मला पटत नाही. असं जनरलाईझ नाही करता येत. काही बाबतीत असं असतं, की किंमत जास्त मोजली की वस्तूचा दर्जा निश्चित वाढीव असतो. पण प्रत्येक बाबतीत नाही.

शेवटी आवडीचा प्रश्न आहे. ह्युगो बॉस जितका आवडतो तितकाच बाटलीत रिफिल केलेला वन मॅन शो सुद्धा आवडतो. नथिंग अबाउट द प्राईस आय फील.

कपिलमुनी's picture

14 Nov 2014 - 3:26 pm | कपिलमुनी

ओरिजिनल सेंट कसा ओळखायचा ? माझ्या एका दुकानदार मित्राच्या सांगण्यानुसार बाजारमधले ८०% हून अधिक सेंट बनावट असतात.
बाकी ब्रुट आणि लोमानी आवडते.

या धाग्यावरून परफ्युम या चित्रपटाची आठवण झाली

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 3:29 pm | वेल्लाभट

मी बघितलाय तो पिक्चर. कैच्याकै आहे... वेगळाच्च. वेड कॉन्सेप्ट

कपिलमुनी's picture

14 Nov 2014 - 6:12 pm | कपिलमुनी

कसा ओळखायचा ?
की दुकानदार भरोसे ?

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 3:34 pm | वेल्लाभट

PARFUM - सर्वाधिक कॉन्सन्ट्रेटेड. १५% किंवा अधिक
EAU DE PARFUM - ८-१५%
EAU DE TOILETTE - ५-८%
EAU DE COLOGNE - २-५%

कुठला अधिक चांगला, किंवा प्रखर, लाँग लास्टिंग, हे उघड आहे.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2014 - 8:03 am | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद...

यसवायजी's picture

15 Nov 2014 - 6:41 pm | यसवायजी

परफ्युममधील नक्की कशाचे प्रमाण १५% वगैरे असते?

मदनबाण's picture

14 Nov 2014 - 3:40 pm | मदनबाण

मला परफ्यूम्स आणि अत्तरे प्रचंड आवडतात... :)
परफ्यूम्स ची आवड मी शाळेत होतो तेव्हा पासुन झाली.... एका परफ्यूम्स बनवणार्‍या दुकानात सहज म्हणुन गेलो आणि माझा सुगंधाच्या दुनियेत प्रवेश झाला तो कायमचा. :)
मी पहिला वापरलेला परफ्यूम हा पॉयझन होता, आणि आजही माझ्याकडे तो आहे. मॅक्सी, चार्ली, ब्रुट इं वापरले... पण काही काळा पासुन मला अत्तराचे अक्षर: वेड लागले आहे, अत्तराचा जो प्रभाव पडतो तो पूर्णपणे वेगळा असतो... मी शक्यतो फॅन्सी अत्तरे वापरत नाही, मला ट्रेडिशनलच जास्त आवडतात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 3:43 pm | वेल्लाभट

ऊद वालं अत्तर वापरलंयत का? खास 'त्यांचा' आवडता वास. आखाती देशात प्रचंड खपतो. स्ट्राँग. मु.अली रोड ला मिळतं.

उद माझं सध्याच सगळ्यात आवडत अत्तर आहे, वेगवेगळा गंध असणारे उद अत्तर मिळतात, माझ्याकडे एक उद कोल्हापुरच्या कटक्यांच आहे, एक मु.अली वरचं आहे, तर एक माणिकलाल अत्तरवाला {MANEKLAL ATTAR WALA 452, JAWAHR MARG SAIFE HOTEL CHOURAHA INDORE} यांच्याकडचे आहे. मध्यंतरी सोसायटीच्या एका समारंभात हे किंचीत लाउन गेलो होतो तेव्हा माझ्या एका मित्राच्या लगेच लगेच लक्षात आले, काय अत्तर का ? असा त्याचा प्रश्न होता.
माझं अत्तर वेड फोटोतुन सुद्धा एकदा डोकावलं आहे.... :)
बाकी खास 'त्यांचा' आवडता वास म्हणशील तर जन्नत ए फिरदोस सुद्धा त्यांचाच समजला जातो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 4:08 pm | वेल्लाभट

एखाददा सविस्तर चर्चा करायंस हवी तुमच्याशी :)

सध्या जे उद इंदुरातुन आणले आहे, ते १२०० रु तोळा या भावाने मिळाले. :)
आहाहा... कसलं जब्राट वाटतं सांगु ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }

वेल्लाभट's picture

18 Nov 2014 - 11:46 am | वेल्लाभट

क्लास !

देखना पडेगा. आय मीन सूंघना पडेगा.

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2014 - 5:23 pm | टवाळ कार्टा

मी पहिला वापरलेला परफ्यूम हा पॉयझन होता

क्या...रे पाय्झन दाल्ल्लीया....
अर्रे तुम लोकल बस्तीके चीप कॅटेगरीके सी ग्रेड लोगां...तुम्कू क्या मालूम पाय्झन क्या होनां

हे आठवले :)

कपिलमुनी's picture

14 Nov 2014 - 6:00 pm | कपिलमुनी

सोत्रिंची गाथा परफ्युम्सची आठवली.

मदनबाण's picture

14 Nov 2014 - 4:00 pm | मदनबाण

दुव्या बद्धल धन्यवाद. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }

वात्स अप्प वर लिंक आली कि मग वाचेन ;)

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 3:52 pm | वेल्लाभट

बर !

मराठी_माणूस's picture

14 Nov 2014 - 3:57 pm | मराठी_माणूस

पुर्वी एक बॉस कं.ची concentrated Eau de Cologne ची एक छोटी चपटी बाटली येत असे. ते स्प्रेड करायच्या ऐवजी काना मगे थोडेसे लवले जायचे. ती बाटली सध्या कुठे दीसत नाही. कुठे मिळु शकते का किंवा त्या प्रकारचे दुसरे कुठले पर्फ्युम आहे का ?

सिरुसेरि's picture

14 Nov 2014 - 4:02 pm | सिरुसेरि

हरिहरेश्वरला काही दुकानांमध्ये १२ राशींनुसार १२ वेगवेगळे पर्फ्युमस मिळतात . ज्यांचा राशींवर विश्वास आहे ते त्यानुसार किंवा सहज गंमत/बदल म्हणुन घेतात.

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 4:06 pm | वेल्लाभट

इंटरेस्टिंग

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Nov 2014 - 5:02 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मी पण वेडी आहे अत्तराची आणी माझा भाउ पण.पुर्वी रोज कानात फाया असायचाच.सध्या खस,हिना,जन्नत ऐ फिरदोस,डव,असे बरे कलेक्शन आहे.आत्ता भावाच्या लग्नात एक व्हिस्की फ्लेवर आणलाय.महाग आहे पण भारीये.

अत्तराचा फाया कानात घातलेले लोक कापुस बाहेर आलेल्या गादीसारखे दिसतात

नावातकायआहे's picture

2 Dec 2014 - 5:06 pm | नावातकायआहे

:-)

हरकाम्या's picture

22 Jul 2016 - 12:14 am | हरकाम्या

विजुभाउ आज पहिल्यान्दा पोट भरुन हसलो.एकदम मारु उपमा

धागा बूक्मार्क करण्यात आलेला आहे.

उगा काहितरीच's picture

14 Nov 2014 - 7:04 pm | उगा काहितरीच

silence, evening in Paris, born rich, bawari, forever Paris, sweet hearts (blue), आणखी बरेच आहेत . आठवतील तसे सांगतो.

वेल्लाभटांनो - एकच धागा काढून कसं चालेल? पुढचा भाग येऊंद्या.

हे टॉप, मिडल आणि बेस नोटस काय प्रकार आहे? एकाच वासात हे तीन उप-वास कसे ओळखायचे?

पेट थेरपी's picture

15 Nov 2014 - 7:04 am | पेट थेरपी

भाई लोक्स, लेख वाचून अतिशय आनंद झाला. मी भारतातल्या एका अग्रगण्य अत्तर कंपनीत काम करते. ह्या विशयावर सखोल माहिती लिहू शकेन. लिहू का? मराठी माणसाचा जगभर गेलेला उद्योग आहे हा.
फक्त ५०० रु. च्या वर ते सर्व बेकार अशी परिस्थिती नक्की नाही. आपल्याला अधिक माहितीची गरज आहे. वरील फोटोतले सर्व हे डायल्युटेड व्हर्जन्स आहेत. जितके पर्फ्यूम त्यापेक्षा जास्त खर्च बाटलीचा व पॅकेजिंगचा आहे. नो वरीज
क्वालिटी चांगलीच आहे. पण तांत्रिक बाजू बघता. समजा एक भाग कॉन्संट्रेट असेल तर त्यात काही भाग अल्कोहोल व इतर द्रव्ये घालून ते ईडीटी, स्प्रे वगैरे बनवतात. टॉप मिडल बेस नोट हे अत्तर क्रि एट करताना वापरले जाणारे तांत्रिक शब्द आहेत. ह्याबद्दल पण लेख लिहायला पाहिजे. लिहू का? वेल्ला भट लेखनाबद्दल धन्यवाद.

लिहा की...

ह्या जरा हटके विषयाविषयी वाचायला नक्कीच आवडेल...

वेल्लाभट's picture

15 Nov 2014 - 8:15 am | वेल्लाभट

नक्कीच लिहा. म्हणजे लिहाच. तांत्रिक बाबी समजून घ्यायला आम्हाला फार आवडेल. वर दिलेले डायल्यूटेड आहेतच अर्थात. अत्तर प्रकार नक्कीच जास्त कॉन्सन्ट्रेटेड.

त्यामुळे जरूर लिहा तुम्ही यावर सखोल. स्वागत आहे. :)

पिवळा डांबिस's picture

15 Nov 2014 - 10:22 am | पिवळा डांबिस

कारण माझ्या अनुभवानुसार रू ५०० च्या वरचे सगळे पर्फ्यूमस बेकार असतात हे अतिशय अज्ञानी (किंवा मूर्ख म्हणा) विधान आहे...
कारण चांगले दुर्मिळ असे सेंट्स तर सोडा पण भेसळ नसलेली इसेन्शियल ऑईल्स जरी घ्यायची म्हटली तर ती आज मुंबई-दिल्लीमध्ये रू५०० च्या खाली मिळत नाहीत (यात हीना वगैरेंचा तसेच लखनौ-जबलपूर या मार्केट्सचा समावेश नाही). मग आमचं काही चुकतंय की ते विधान मूर्ख आहे? तुमचे जाणकार विचार वाचायला आवडतील.
बाकी आमची आवड म्हणाल तर शॅनेल-५ (स्त्रियांसाठी) आणि इटर्निटी, पोलो-ब्लू, जोवन्स रिच ही पुरुषांसाठी!!!
बाकी प्रिफर्र्ड स्टॉक आणि ओल्ड स्पाईस ओरिजिनल ही ऑल टाइम फेव्हरिट!!!

(बाकी यानिमित्ताने केळकरांनी फार फार पूर्वी दिलेली आणि आम्ही नाकारलेली एक ऑफर आठवली!! पण त्याविषयी कथा अन्यत्र कधीतरी!!!)

वेल्लाभट's picture

15 Nov 2014 - 10:58 am | वेल्लाभट

ओल्ड स्पाईस डिओ.......... कमाल ! कमाल ! आणि कमाल !

सहमत.

शॅनेल-५ (आवडत्या स्त्रियांसाठी) असा बदल करतो आहे.

सध्या कूल वॉटर वापरतो आहे.

मुक्त विहारि's picture

16 Nov 2014 - 6:44 am | मुक्त विहारि

+ १

पिवळा डांबिस's picture

17 Nov 2014 - 11:53 am | पिवळा डांबिस

शॅनेल-५ (आवडत्या स्त्रियांसाठी) असा बदल करतो आहे.

च्यामारी! बूरझवा समदे!!!
लाल क्रांती, लाल सलाम!!!!
;)

केळकरांच्या कंपनीत आहात का आपण?

रामदास's picture

16 Nov 2014 - 6:57 pm | रामदास

केळकरांच्या मुलीशी लग्न केल्यामुळे !!

अरे वा! हौ लक्की! :) मग हवे ते सुगंध तुम्ही केवा फ्र्याग्रन्सेसकडूनच मागवता का? शेवटी जावई आहात ना! ;)

रामदास's picture

17 Nov 2014 - 11:17 am | रामदास

खाण्याचे रंग बनवते . जिलबी- लाडू यात टाकण्याचे रंग.

रेवती's picture

18 Nov 2014 - 1:34 am | रेवती

ओक्के.

लिहू का काय विचारताय? लिहाच !!

सुबोध खरे's picture

18 Nov 2014 - 12:03 pm | सुबोध खरे

@ पेट थेरपी
नेकी और पूछ पूछ
लिहा ताबडतोब .

मी भारतातल्या एका अग्रगण्य अत्तर कंपनीत काम करते.
वल्ला ! क्या बोलती ! ;)

लिहू का?
नेकी और पुछ पुछ ? तुम लिखती तो हम पढती... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दगड दगड दगड दगड दगड दगड... :) { Elizabeth Ekadashi }

मदनबाण's picture

15 Nov 2014 - 10:03 am | मदनबाण

एक इडियो देउन जातो :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दगड दगड दगड दगड दगड दगड... :) { Elizabeth Ekadashi }

आपण तर अत्तर घेण्यासाठी फक्त आणि फक्त बुवा अर्थात आपले अतृप्त आत्मा यांनाच विचारतो..

अनन्त अवधुत's picture

15 Nov 2014 - 11:03 am | अनन्त अवधुत

नॉटिका ब्लू फॉर मेन साठी +१ बाकीचे सुगंध अजून वापरले नाहीत.
माझा आवडता brand Givenchy त्यात निओ आणि पाय अधिक आवडीचे

vrushali n's picture

15 Nov 2014 - 12:34 pm | vrushali n

flora by gucci(edp) आणी issey miyake(edt)
कॉलेजात बर्याचदा compliments मिळतात :ड

वेल्लाभट's picture

15 Nov 2014 - 1:19 pm | वेल्लाभट

क्लास्स्स्स आहे !

मनिमौ's picture

15 Nov 2014 - 12:37 pm | मनिमौ

ंइस दिओर्र फ्रोम च्रिस्तिन दिओर

आत्मुबुवा अत्तरवाले कुठे आहेत?

त्यांनी एका कट्ट्याला आणलेलं 'पैल्यापावसानंतरमातीचावास'वालं अत्तर अजून लक्षात आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Nov 2014 - 3:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला धागा आवडला. धाग्यावर लक्ष आहे.

-दिलीप बिरुटे

नेत्रेश's picture

16 Nov 2014 - 11:26 pm | नेत्रेश

केविन क्लाइन चा ऑब्सेशन परफ्युम अतीशय आवडतो.

लेडीज साठी जे.लो. चे परफ्युमस मस्त वाटतात.

एस's picture

17 Nov 2014 - 12:05 pm | एस

माहितीपूर्ण धागा आहे, पण ह्या माहितीचा उपयोग करून घेण्याइतपत खिसा खुळखुळायला लागला की अवश्य तसे केले जाईल! :-) तूर्तास... असो! ;-)

नोट्स कशा आयडेंटिफाय करायच्या म्हणे?

दर्यासारंग's picture

23 Nov 2014 - 2:37 pm | दर्यासारंग

कालच उद विचारुन आलो,मु.अली वर, ५००० रु. १०mlला.

दर्यासारंग's picture

23 Nov 2014 - 4:29 pm | दर्यासारंग

इतके महाग परवडणार नाही ५०० रुच्या आत येतील ते सान्गा. चार्ली ४० रु, २०० रु, ५०० रु वापरुन झालेत. किमतीप्रमाणे क्वालिटि बदलते.

कालच उद विचारुन आलो,मु.अली वर, ५००० रु. १०mlला.
अहो,जरा कमी किमतीचे उद सुद्धा मिळते... अगदी महागडेच घ्यावे असे थोडीस आहे ?

किमतीप्रमाणे क्वालिटि बदलते.
अगदी खरं ४०-१०० मिळणार्‍या वस्तुचा दर्जा हा तसाच असणार...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods

मदनबाण's picture

2 Dec 2014 - 3:09 pm | मदनबाण

गेल्या आठवड्यात पाकिजा मार्केट मधे जाउन आलो आणि या वेळी २ वेगळी अत्तरे घेण्याची संधी मिळाली. :)
एक म्हणजे शमामा {Shamama } आणि दुसरे जाफरान Zafran (SAFFRON) { केशराचे अत्तर }. उद अत्तराचे २ प्रकार मला माहित झाले आहेत, एक तांबड्या रंगाचे वुडी फ्रेग्रंस असलेले आणि दुसरे व्हाईट उद हे अगदी वेगळ्या गंधाचे अत्तर आहे.आसाम मधे तयार होणारे उद हे सर्वात उत्तम मानले जाते. :) पाकिजा मार्केट मधे Al Jamil & Bros यांचे दुकान आहे, त्यांच्याकडे गेलो होतो, हे अत्तरे एक्स्पोर्ट करतात. काही दिवसांपूर्वीच २० लाखाचे जाफरान अत्तर एक्स्पोर्ट केले अशी माहिती देत त्यांनी या अत्तराची ओळख करुन दिली. सुभानल्ला ! इस इत्र की खुशबु बोहोत सुकुन देने वाली है | असे त्याला सांगताच त्याने एक्स्पोर्ट क्वालिटीची अत्तराची बाटली त्याच्या माणसाला माझ्यासाठी उघडायला लावली... आणि त्यांचा अप्रतिम गंध वेडावुन गेला. :)
Al Jamil & Bros
40, Pakeeza Market M S Ali Road, Grant Road, Mumbai - 400007
त्यांनी मला मातीच्या मडक्यांपासुन बनवण्यात येणारे अत्तर सुद्धा दाखवले {पहिल्या पावसाच्या मातीचा गंध असलेले}, पण पुढच्या खेपेला ते घ्यावे असा विचार करुन मी पाकिजा मार्केट मधुन बाहेर पडलो.
अत्तराच्या औषधी गुण धर्मा बद्धल अधिक इकडे :- The Medicinal Benefits of Attar

जाता जाता :- फ्रुट अत्तर कधी ऐकले आहे का ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }

वेल्लाभट's picture

2 Dec 2014 - 3:16 pm | वेल्लाभट

भारीच......

अजुन एक... ज्यांना उद अत्तर घ्यायचे असेल त्यांनी आधी व्हाईट उद ट्राय मारावे कारण ब्राउन रंगाचे उदला वुडी फ्रेगंस असल्याने काहींना तो आवडणार नाही, त्याच्या अगदी विरुद्ध व्हाइट उद आहे. मला स्वतःला देखील व्हाइट उद जास्त आवडतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }

प्रमोद देर्देकर's picture

2 Dec 2014 - 4:08 pm | प्रमोद देर्देकर

बाणा तु तर अत्तर वेडा आहेस रे . मी सध्या मजमुआ वापरतो आहे. छान वास आहे.
बादवे ठाण्याचे एखादे दुकान सांग की जिथे ऊद मिळेल. मी नेहमी अलोक हॉटेलच्या मागे नाईकवाडीत एकच दुकान आहे तिथुन सगळी पर्फ्युमस घेतो.

बादवे ठाण्याचे एखादे दुकान सांग की जिथे ऊद मिळेल.
मोहन कुलकर्णी यांचे "केतकी" नावाचे दुकान आहे. पत्ता :- तांबे हॉस्पिटलच्या समोर, बी-केबीन. { वामन हरी पेठे यांचे दुकान जवळच आहे.}
यांच्याकडे बर्‍यापैकी अत्तरे मिळतात,पण उद मिळेल की नाही ते सांगता येत नाही.

मी नेहमी अलोक हॉटेलच्या मागे नाईकवाडीत एकच दुकान आहे तिथुन सगळी पर्फ्युमस घेतो.
आधी इथे २ परफ्युम्स बनवणारी दुकान होती,मी जो वरती परफ्युम विषयी प्रतिसाद दिला ते माझे पहिले परफ्युम याच पैकी एका दुकानातुन घेतले होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }

दुकान आहे. तिथे मिळतात.

वेदांत's picture

21 Jul 2016 - 12:17 pm | वेदांत

सध्या मी फेरारी अत्तर वापरतोय. मस्त सुवास आहे...

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 3:48 pm | महासंग्राम

लईच डाउन मार्केट झाली म्हणायची फेरारी अत्तर लागली. गाड्या उडवन परवडत काय आता त्यायले

- शूमाकर चा फॅन झुम्मम.....

अत्रन्गि पाउस's picture

21 Jul 2016 - 12:36 pm | अत्रन्गि पाउस

4711 eau de cologne

अंतरा आनंद's picture

21 Jul 2016 - 1:07 pm | अंतरा आनंद

मला खर्^या फुलांच्या सुगंधाखेरीज इतर सुवास फारसे आवडत नाहीत. बाहेर फार वेळ जायचे असल्यास क्वचित वापरते. त्यामुळे खुशबू की दुनिया अनोळखी. पण भेट म्हणून मिळालेले केशर-गुलाब , सोनचाफा ही डोंबिवलीच्या हेमन्त मधली अत्तरे आवडली होती.

पेट थेरपी, लिहाच आणि तेही सविस्तर . वाचायला खूप आवडेल.

धागा वाचुन अनेक सुगंध मनात दरवळुन गेले. मला ही अत्तरे आणि परफ्युम खुप आवड्तात. तुमच्या लिस्ट मधील बरिचशी परफ्युम मी वापरलेली आहेत. अजुनही ती पसंतीच्या यादीत आहेत. मला अजुन काही आवड्लेली परफ्युम म्हणजे- वन-ओ-वन फॉर वुमन, सिगार, मोगरा, चंदन.

प्रसाद भागवत's picture

21 Jul 2016 - 3:13 pm | प्रसाद भागवत

वेल्ला साहेब, पेट थेरपी आणी अजुनही कोणी जाणकार..एक सल्ला द्या ना...फक्त चंदनाचाच सुवास (टॉप, मिडल आणि बेस नोटस फक्त sandalwood) असलेला पर्फ्युम कोणता ??

यशोधरा's picture

21 Jul 2016 - 3:57 pm | यशोधरा

मिट्टी वापरलेय का कोणी?

मी वापरलय .. मंद सुगन्ध असतो ..

यशोधरा's picture

21 Jul 2016 - 8:21 pm | यशोधरा

धन्यवाद.

पद्मावति's picture

21 Jul 2016 - 8:53 pm | पद्मावति

आहा, काय मस्तं धागा आहे. माझा वीक पॉइण्ट. मला भयंकर आवडतात.
माझे काही आवडते..शनेल 5, estee लॉडर चं सेन्शुअस, ब्यूटिफुल, bvlgari चं जॅसमिन noir.
cartier चा माझ्या एक खूप आवडीचा पर्फ्यूम होता पण तो आता बनवत नाही म्हणे त्याचं उत्पादन थांबवलंय चार, पाच वर्षांपासून:(
नेहमी वेगवेगळे सुगंध ट्राय करते एकच एक सुगंध नाही वापरत. मस्क, जॅसमिन, सॅंडलवुड अशाप्रकारचे जरा हेवी नोट वाले सुगंध मला आवडतात. फ्रूटी, citric फ्लेवर्स नाही आवडत.

वेल्लाभट's picture

22 Jul 2016 - 8:12 am | वेल्लाभट

शनेल५................
अ क्लासिक. मॅरिलिन मॉन्रो पासून लोकांनी वापरलेला पर्फ्यूम. अफलातून वास. एन्चॅन्टिंग

मदनबाण's picture

23 Jul 2016 - 8:46 pm | मदनबाण

@प्रसाद भागवत
चंदनाचा सुगंध असलेला प्रफ्युम माहित नाही, पण अत्तर ठावुक आहे. Arochem चे सुखद हे उत्तम चंदनाचे रोल ऑन अत्तर आहे.
p1

माझ्या तिर्थरुपांनी मला कलोन असलेला परफ्युम हवा होता म्हणुन लिश्टनस्टाइन { जगातला ६ वा लहान देश एक,राजधानी वडुज } मधुन मला सुपर ड्राय नाईट नावाचा प्रफ्युम आणला.{ क्राफ्टेड अँड बॉटल्ड इन फ्रान्स }
P2
लाईट् आणि झकास... आता अत्तरात रजनीगंधा आणि मिट्टी अत्तरची भर पडली आहे,ही अर्थातच इंदुरातुन आणली. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- Nucleya

प्रसाद भागवत's picture

23 Jul 2016 - 9:49 pm | प्रसाद भागवत

धन्यवाद मदनबाण साहेब..

कबीरा's picture

27 Jul 2016 - 5:35 pm | कबीरा

धागा लैच जमलाय, बाकी अत्तराचा फाया प्रकार काय कळला नाही राव.

संदीप डांगे's picture

28 Jul 2016 - 3:42 am | संदीप डांगे

कापसाचा लहानसा बोळा! त्याला अत्तर लावायचं आणि तो बोळा कानात खुपसायचा.

बेंगरुळ दिसतं म्हणा... पुर्वी श्रीमंती मिरवण्याची फ्याशन होती तेव्हा ठिक होतं.

रोजच्या वापरासाठी चांगला डीयोड्र्न्ट सुचवा ... प्लेबाय,सिन्थोल,निविया,नायके,KS ई. वापरुन झालेत ..

वेल्लाभट's picture

28 Jul 2016 - 2:35 pm | वेल्लाभट

ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस (शक्यतो ओरिजिनल)

आदिदास, नायके, रीबॉक - गुड वन्स
प्लेबॉय - महाग पण चांगले.
फ्युएल चा अनुभव चांगला आहे.
फॉग चे काही काही बरे आहेत.
जोवान मस्क बघा.
सिगार उत्तम टिकतो.
जस्ट कॉल मी मॅक्सी

निव्हिया ने इरिटेशन होऊ शकतं, माझा अनुभव.
डेनिम फ्रॅगरन्सला बरे आहेत पण वास टिकत नाही.
डेव्हिड ऑफ कूल वॉटर (२५०-४००) रुपये याच्या मोहात मुळीच पडू नका.
अ‍ॅक्स भंपक आहेत माझ्या मते.

वेदांत's picture

28 Jul 2016 - 3:02 pm | वेदांत

माहिती बद्दल धन्यवाद ...
ओल्ड स्पाईस (ओरिजिनल) वापरला आहे, पण आवडला नाही.
खर सांगायाच तर, फेरारी अत्तर वापरत असल्यामुळे डिओ घ्यायचा का की नाही यात गोंधळून गेलो आहे.

महासंग्राम's picture

3 Aug 2016 - 10:32 am | महासंग्राम

रच्याकने

डेव्हिडऑफ कुल वाटर

हे वाचून डेव्हिड नावाचा माणूस थंड पाण्यात ऑफ झालाय असं वाटते

II श्रीमंत पेशवे II's picture

25 Sep 2018 - 4:02 pm | II श्रीमंत पेशवे II

धागा खूपच छान आणि अनपेक्षित आहे .....मस्त माहिती प्रसारित झालीये ......जणू परफ्युम्स ची बँकच

मला उध आवडतो

डीओ मध्ये किलर जीन्स च्या शोरूम मध्ये मिळणारा रेक्लेस छान आहे.
Axe चा तिकिट ट्राय करून पहा
engage मध्ये क्लासिक वूडी छान आहे

प्रसन्न३००१'s picture

1 Aug 2016 - 2:00 pm | प्रसन्न३००१

सिंथोलचे डीयो-स्टीक्स मिळतात हल्ली, ७० रुपये किंमत आहे आणि साधारण महिना-दीड महिना पुरते. वास उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे लॉंगलास्टिंग आहे.

बाकी लेयर शोट चा कलोनस्प्रे पण चांगला आहे रोजच्या वापरासाठी (नेव्हीब्ल्यू रंगाच पकिंग आहे)

पर्फ्युम्स कुठून विकत घ्यावेत? ऑनलाइन मधे भरपूरदा झोल होतो असं रिव्यु वाचलेत.

वेल्लाभट's picture

28 Jul 2016 - 2:29 pm | वेल्लाभट

हे मीही ऐकलंय. पण अनुभव चांगला आहे माझा.

प्रत्यक्ष घेणं चांगलं असं मानलं तर काही गोष्टी बघून घ्याव्यात जसं की, पॅकिंग (उघडलेलं, रीपॅक्ड वाटत असेल तर घेऊ नये) दुकान (एकदम नवीन दुकानातून मोठ्या रकमेचा घेऊ नये), ...

आणि काही गोष्टी.... परंतु तरीही चुना लावला जाऊ शकतो. त्यामुळे जस्ट बी व्हिजिलंट इतकंच म्हणेन.

रंगासेठ's picture

28 Jul 2016 - 2:53 pm | रंगासेठ

ऑनलाइन मागवून बघतो कसा अनुभव येतो ते. अ‍ॅमॅझोन जिंदाबाद!

रघुनाथ.केरकर's picture

28 Jul 2016 - 3:02 pm | रघुनाथ.केरकर

पहील्यांदाच एवढी नावे वाचली, नायतर आपल्याला दोनच नाव माहीत, एक केळकरांचा मोगरा, आणी दुसरा चार्ली.

गोव्यात काही ठीकाणी रस्त्याच्या कडेला काही लोकं केवड्याची फुलं पारदर्शी काचेच्या बाटलीत पाणी भरुन वीकायला ठेवल्याचं पाहीलय.

एस.योगी's picture

1 Aug 2016 - 1:44 pm | एस.योगी

'अरमाफ'चे डिओ
'शेड्स' आणि 'पॅराटी' (Shades & Paraty) एकदम लाजवाब ....!

वेदांत's picture

4 Oct 2016 - 4:29 pm | वेदांत

Tres Nuit Armaf for men एक्दम झकास ..

प्रसाद गोडबोले's picture

1 Aug 2016 - 2:30 pm | प्रसाद गोडबोले

ह्म्म्म , धागा वाचुन काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ...

फार पुर्वी चित्रांगदासाठी हा परफ्युम घेतला होता ....
a

अजुनही हा सुगंध मनात दरवळतोय , नुसत्या आठवणीनेच मोहरुन जायला होतं , नक्की कशाने , सुगंधाने की तिच्या आठवणीने ... कळतच नाही :)

प्रसन्न३००१'s picture

1 Aug 2016 - 3:04 pm | प्रसन्न३००१

१) अझारो क्रोम लिजेंड/युनाईटेड/स्पोर्ट्स
२) बर्बेरी
३) नौटिका चा अक़्वा रश
४) डेव्हिडऑफ कुल वाटर
५) पोलीस विंग्स गोल्ड

सध्या अत्तर मार्केट मधे बरेच वेग-वेगळे सुगंध मिळत आहेत, उदा. लिरिल,पोलो स्पोर्ट्स,ह्यूगो बॉस ई. याच्या विषयी जाणकारानी माहिती द्यावी.

वेल्लाभट's picture

3 Aug 2016 - 10:49 am | वेल्लाभट

बॉस चं अत्तर कव्वा असतं राव.
आणि जिव्हॉन्शाय इर्रेझिस्टेबल पण छान
तसंच एक आवडणारं म्हणजे डनहिल डिझायर चं अत्तर.

वेदांत's picture

3 Aug 2016 - 12:11 pm | वेदांत

केमिकल वापरुन बनवतात का?

@वेल्लाभट साहेब,

http://www.basenotes.net/threads/397094-Chennai-Attars-Perfumes

सध्या वापरात असलेली अत्तरे -
1. कस्तुरी अंबर - उग्र वास पण तेवढाच प्रसन्न. गुणधर्मानुसार उन्हाळ्यात वापरू नये म्हणतात. सर्दी झाल्यास नाकाला थोडे लावावे.
2. चंदन - एव्हरग्रीन. सगळ्यात आवडते अत्तर.
3 . खस - उन्हाळ्यामध्ये वापरायला जास्त छान वाटते.
4. मोगरा - एकदम नॅच्युरल
5. पारिजातक - अजून एक आवडते अत्तर. प्युअर फुलांचा सुवास. ह्याचा सुवास जास्त वेळ टिकत नाही म्हणून कुपी जवळ बाळगूनच असतो. खीखीखी
6. उद - मागे एकदा मित्र मक्के ला गेला असताना खास लक्षात ठेऊन माझासाठी आणलेले अत्तर. ह्याचा वास म्हणजे केवळ जन्नत. अहाहा. अगदी पुरवून पुरवून वापरतो.
7. मुखमल अजमल - केवळ अप्रतिम.
8. ice बर्ग - काहीसे deo च्या वासाकडे झुकणारे आणि थोडे चिकट असणारे अत्तर.
शाही चंदन - काही फारसा फरक जाणवला नाही पण किंमत मात्र डबल.

दिवसाच्या मूड प्रमाणे आज कुठले अत्तर लावावे हे ठरवतो. :) :) :)
औरंगाबादेत अत्तर गल्ली आहे. तिकडचा एक पंटर पकडला आहे. साहेब आमचं अत्तर प्रेम बघून थेट पुण्याला कुरिअर करतात. त्यांच्याकडे खास वर्जिनल माल असतो म्हणे.

पद्मावति's picture

3 Aug 2016 - 12:41 pm | पद्मावति

मस्तं लिस्ट. अत्तर कधी ट्राय नाही केलंय. पण आता करीन. पण अत्तर पर्फ्यूमसारखं स्प्रे करता येतं का?

अत्तर मनगटाला,कानाच्या मागे,मानेला लावतात.
आजकाल बाजारात अत्तर पर्फ्यूम पण मिळत आहेत..

http://www.amazon.in/s/ref=bl_dp_s_web_1355016031?ie=UTF8&node=135501603...

पद्मावति's picture

3 Aug 2016 - 1:48 pm | पद्मावति

धन्यवाद वेदांत.
amazon ची लिंकही उपयुक्त आहे.

संदीप डांगे's picture

3 Aug 2016 - 5:46 pm | संदीप डांगे

डियो वापरणे बंद करावे, त्यापेक्षा परफुम अत्तर कधीही योग्य,

मला असाच एकदा अनुभव आल्यानंतर, (एखादा दिवस डियो नाही मारला तर अंगाला घाण वास यायचा, प्रत्यक्षात डियो वापरायला लागलो त्या आधी असे नव्हते) मी ओळखीतल्या दहा बारा जणांना हा प्रयोग करायला सांगितला. एक महिना कोणताच डियो वापरायचा नाही, सुरुवातीचे तीन ते सात दिवस अतिशय घाण वास यायला लागतो शरीराला, डियो शिवाय जगणे शक्यच नाही असे वाटते, नंतर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात शरीराचा हरवलेला नैसर्गिक गंध परत येतो, महिना पूर्ण होताच आपल्याला डियो ची गरजच नाही हे समजतं. ज्यांनी हा प्रयोग केला त्यांची डियो न वापरल्यामुळे येणाऱ्या घाणेरड्या वासापासून सुटका झाली, हा वास काहीतरी केमिकल लोच्यामुळे तयार होतो-हा नैसर्गिक घामाचा वास नव्हे, ह्याच वासामुळे उपभोक्ते सतत डियो वापरात ठेवतात. ज्यांना डिओचे व्यसन लागले असेल त्यांनी हा प्रयोग जरूर करावा,

प्रत्येकाला डियोची गरज नसते, पण वापरात राहिल्याने निर्माण होते, त्यापेक्षा नैसर्गिक सुगंध वापरावेत,

सूड's picture

3 Aug 2016 - 6:05 pm | सूड

बघतो प्रयोग करुन...

अभ्या..'s picture

3 Aug 2016 - 6:07 pm | अभ्या..

खरंच की काय संदीपराव?
च्यायला बघायला पैजे प्रयोग करुन.

मन१'s picture

23 Aug 2016 - 7:43 pm | मन१

तंतोतंत. म्हणजे डिओ वापरणं बंद करुन पाहिलं. नंतरचाही घटनाक्रम ऑल्मोस्ट तसाच. अर्थात शरीरशास्त्राची माहिती , केमिस्ट्रीतली अक्कल, डिओ मध्ये वापरल्या जाणार्‍या नेहमीच्या घटकांबद्दलचं सामान्य ज्ञान माझं शून्य असल्यानं हे सांगायला धजावत नसे. अजूनही ह्याबद्दल खात्री नाही मलाच.
पण तंतोतंत अनुभव आला. सध्या चंदन, गुलाब वगैरेचे परफ्युम वापरतो. ती खास सुगंधी दुकानं नसतात का देवस्थानांच्या आसपास वगैरे, तिथून आणतो. तिथे फक्त उदबत्त्या, परफ्युम , अत्तरं अशाच वस्तू असतात . तशी दुकानं. किंचित महाग पडतं, पण एकूणात वर्थ इट.

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 7:56 pm | संदीप डांगे

खूप खूप धन्यवाद मनराव, मी आता विचारणारच होतो कि कुणी प्रयोग करुन पाहिलाय की नाही.

II श्रीमंत पेशवे II's picture

26 Sep 2018 - 12:39 pm | II श्रीमंत पेशवे II

खर तर डिओडरंट च्या वापराबद्दल एक वेगळा धागा बनू शकेल ,डिओडरंट चे खूप प्रकार आहेत ( स्टिक ,ओईल बेस्ड,अल्कोहोल वाला,ब अल्कोहोल रहित , अल्युमिनियम कण असलेला , किंवा नसलेला ) डिओडरंट मध्ये असलेले घातक पदार्थ मानवी शरीरावर कसे परिणाम करतात ? कुठल्या व्यक्तीने कोणता डिओडरंट वापरावा.

संदीप नि फारच कमी शब्दात डिओडरंट बद्दल मत मांडल आहे... आणि काही अंशी ते खरही आहे ..
आपण शरीराची रचना पाहिली तर आपल्याला शरीरातील विशेष ग्रंथी या उत्सर्जना साठी काम करतात त्याच पैकी बगलेत असलेल्या ग्रंथी घाम उत्सर्जित करतात आणि तो उत्सर्जित होणे महत्वाचे आहे . तो बाहेर येउच नये असे काही केले तर त्याचा परिणाम शरीरामध्ये ते कुठेतरी परिणाम करत असतो.

मी मागे एकदा डिओडरंट बद्दल वाचले होते त्यामध्ये असे कळले कि घामांच्या गंध काढण्यासाठी वापरल्या जाणार्या परफ्यूम आणि डिओडोरंट्स केवळ घाम ग्रंथेवर प्रभाव टाकत नाहीत, परंतु शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या विषारीपणाच्या नैसर्गिक प्रक्रियेस देखील नुकसान करतात.

शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याकरिता मानवी शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी घाम येतो उदा. नाकावर , कपाळावर , छातीवर , पाठीवर , बगलेत , जांघेत , तळव्याला इत्यादी.
जर या घाम येण्याच्या वाटा आपण कशाचे तरी लेपन करून बंद केल्या तर शरीराचे तापमान वाढते. आणि शरीर या ना त्या मार्गांनी तापमान संतुलित ठेवण्याची धडपड करत असते. मग बाहेर पडू न शकलेली विषारी,शरीराला नको असलेली द्रव्ये शरीरातच राहतात आणि त्यांची तीव्रता हि वाढते.ज्यामुळे अजून एक नवीन समस्या जन्माला येते.

डियो वापरणे बंद करावे, त्यापेक्षा परफुम अत्तर कधीही योग्य,
हे मला योग्य वाटले , आपण जशी शरीराला सवय लावतो तसे ते आत्मसात करीत असते. संदीप म्हणतायत तसे काही दिवस डिओडरंट वापरणे बंद केले तर जी दुर्गंधी आणि द्रव्ये ग्रंथीमध्ये साचून राहिलेली असतात ते बाहेर यायला सुरुवात होते.
शरीराला हवे आहे तितके पाणी पिणे आणि ज्यावेळेस लघुशंका होत आहे असे जाणवेल तेव्हा लाघुश्न्केस जाणे हाच हि दुर्गंधी कमी करण्याचा उत्तम उपाय आहे.
यावर मिपा मधील तद्न्य मंडळी उपापोह करतीलच.

माझे लेटेस्ट आवडते पर्फ्यूम. मिस dior आणि कोको शनाल. अप्रतिम सुगंध...addictive!!

शनिवारी मोहमद्द अली रोड वरुन ४-५ अत्तर घेऊन आलोय. रोझ,मोगरा,रॉयल ब्लू (रॉयम मीराज) , ब्लू वेव, आणि अल-रहीब चे सिल्वर .

ऊद बहार एकदम म्स मस्त वाटतं लावले की,

महासंग्राम's picture

22 Aug 2016 - 11:25 am | महासंग्राम

आताच केशर-कस्तुरी(८०-२० %) आणलाय जबरदस्त सुगंध आहे त्याचा. व्हर्जिनल 'केशर' चा सुगंध फार तिव्र असल्याची जाणवले.

आईच्या साडीच्या पदराला येणारा सुगंध, सगळ्यात जास्त आवडतो

मी रसासी चस्टीटी वापरतो. चांगला आहे.

वरच्या यादीतील ब्रुट, लोमानी, चार्ली वापरले आहेत. मलाही आवडतात मंद सुगंध असलेले. जास्त डार्क नाही आवडत.

एक माहीती हवी होती.

सुरंगीचे अत्तर कुठे मिळते हे माहीत आहे का कोणाला?

II श्रीमंत पेशवे II's picture

25 Sep 2018 - 4:18 pm | II श्रीमंत पेशवे II

सुरंगीच्या अत्तराचे उत्पादन दापोली च्या जवळ आसूद बाग नावाचे गाव आहे तिथे कुणीतरी ( नक्की नाव माहित नाही ) ते बनवतात

मी एकदा आणले होते बायको साठी .....छान गंध आहे पण अतिशय नैसर्गिक .....झकपक कपडे घालून त्यावर अजिबात न शोभणारा
सुरंगी चे अत्तर आता स्प्रे मध्ये पण उपलब्ध आहे पण अत्तरा प्रमाणे दिवसभर टिकत नाही .....तरीही छानच

वेदांत's picture

19 Sep 2016 - 10:54 am | वेदांत

काल अल-रहिब चे ३ अत्तर (सुल्तान्,स्पेस्,झिदान) ईबे वरुन मागवले. ऑफिस मध्ये वापरयला पण छान आहेत.

http://www.ebay.in/itm/AL-REHAB-6ML-Perfume-Roll-On-Attar-Ithar-3s-Pack-...

त्याच बरोबर अमझोन वरुन वॉव परफ्यूम्स चे IS-MIAMI मागवले आहे.

पुण्यात कॅम्प मध्ये HP पेट्रोल पंप च्या मागे अली सोमजी स्ट्रीट ला 'FAA' नावाचे एक perfume चे छोटेसे दुकान आहे. पहिले तिथे 'प्राईड ऑफ हैदराबाद' नावाचे नावाजलेले हॉटेल होते आणि हॉटेल च्या बाहेर हे दुकान होते. आता त्या हॉटेलऐवजी शेरवानी चे मोठ्ठे दुकान आहे आणि त्याच्या आत हे FAA आहे.
त्यांचा FAA special हा परफ्युम अफलातून आहे. मला ऑफिस मध्ये आणि बाहेर कमीत कमी 100 लोकांनी या परफ्युम बद्दल विचारलं आहे आणि त्यांच्या साठी एक आणायला सांगितलं आहे. MUST TRY! 550 रुपये किंमत आहे. तुम्हाला लगेच प्रेमात पडेल असा फ्रेश आणि मोहक सुगंध आहे. या अत्तराचे contents हा दुकानदार काही सांगत नाही.
FAA मध्ये अजूनही बरेच छान छान परफ्यूम्स आहेत. पण या FAA SPECIAL ला तोड नाही. त्या दुकानदाराच्या म्हणण्यानुसार इथले अत्तरं विदेशातही पाठवले जातात. जाणकारांनी एकदा तरी भेट द्यावी.

वेल्लाभट's picture

4 Oct 2016 - 3:32 pm | वेल्लाभट

जायलाच पैजे

सामान्य वाचक's picture

4 Oct 2016 - 3:39 pm | सामान्य वाचक

Perfume असेल तर या शनिवारी आणण्यात येईल नक्की

पर्फ्यूम विकत घेण्यासाठी बेस्ट ऑनलाइन साईट

http://perfumery.co.in/designer-perfumes.html?mode=grid

http://unboxed.in/

तुम्ही ऑर्डर केल्या आहेत का..म्हंजे ओरिजीनल असतात का?

वेदांत's picture

4 Oct 2016 - 4:21 pm | वेदांत

कालच unboxed.इन वरुन
Hugo Boss Bottled आणी david's cool water मागवले आहेत.

मी मागावलेले टायटन स्किन परफ्यूम आले आज पण दोनही बॉक्स वर "Tester Not for sale" असं लिहिलंय. त्यांना कॉल केला तर नाही उचलला. साईट वर मेसेज केलाय. काय करू. तसच वापरू की परत करू. असं टेस्टर प्रोडक्ट विकणं बरोबर आहे का.

संदीप डांगे's picture

8 Oct 2016 - 10:06 pm | संदीप डांगे

अजिबात वापरू नका, परत करा,

एकतर हे बेकायदेशीर आहे तसेच पैसे देऊन प्रायोगिक उत्पादन देणे अक्षम्य अपराध आहे, तसेच ह्याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करा व संबंधित दोन्ही कंपन्यांच्या फेसबुक पेजवर टाका

शलभ's picture

9 Oct 2016 - 12:13 am | शलभ

ओके..करतो..

Unboxed.in ला फेसबुक वर मेसेज टाकल्यावर आता कॉल येऊन गेला. त्यांचं म्हणणं आहे, 1. टेस्टर प्रॉडक्ट विकणं बेकायदेशीर नाहीय जोवर तुम्ही त्यावरचा सेल्स टॅक्स बुडवत नाही. 2. प्रॉडक्ट च्या स्पेसिफिकेशन मध्ये लिहिलंय कि Product Packaging = Tester जे मी कन्फर्म केलं. 3. ते अशा प्रकारे बरेच प्रॉडक्ट विकतात म्हणून स्वस्त देऊ शकतात बाकीच्या पेक्षा. अमेझॉन वर टायटन स्किन्न सेलेस्ट 1390 ला आहे, इथे ते 999 ला आहे. 4. सर्व प्रॉडक्ट ऑथेंटिक आहेत.

सध्या तरी मी मला आलेले परफ्युम वापरणार आहे तो परत घ्यायला तयार असताना सुद्धा.

तुमच्या मदतीसाठी धन्यवाद.

संदीप डांगे's picture

9 Oct 2016 - 5:28 pm | संदीप डांगे

"Tester Not for sale"

ह्या उल्लेखाविषयी तुम्ही त्यांना काहीच म्हटले नाही? जेव्हा ते नॉट फॉर सेल आहे तर मग ते सेल कसे होऊ शकते?

तुम्ही वापरा न वापरा तो तुमचा निर्णय, त्याने काही फरक पडणार किंवा नाहीसुद्धा,

पण भविष्यात इतर कुणी असे प्रॉडक्ट ऑर्डर करू नये किंवा वापरू नये या मताचा मी आहे, याचे कारण वैद्यकीय समस्या उद्भवल्या तर यापासून नुकसान भरपाई मिळणे शक्य होईल काय याबद्दल शंका आहे,

तसेच आंतरराज्यीय कर वाचवायला हा झोल करत असावेत अशीही शंका आहे,

नांदेडीअन's picture

11 Sep 2018 - 5:35 pm | नांदेडीअन

=============================
killeroud, unboxed, perfumery, armaf.in या सगळ्या वेबसाईट्स एकाच व्यक्तीच्या (मोहीत खत्री) आहेत.
splashfragrance.in वेबसाईटबद्दल चांगले ऎकून आहे, पण मी ट्राय केली नाही.
=============================

=============================
महागाचे इंटरनॅशनल ब्रँड्स नको असतील, तर पुण्यात टिळक रोडवर एक स्पार्कल पर्फ्युम्स नावाचे दुकान आहे.
तिथे स्वस्तात मस्त परफ्युम्स मिळतात.
मागच्या वर्षीपर्यंत ४०० रुपयांना १०० एम.एल. मिळायचे.
आता बहुतेक ५५० किंवा ६०० रुपये केले आहे.
तो स्वतः बनवतो परफ्युम.

तुमच्याकडचा परफ्युम तुम्ही त्याला नेऊन दाखवला, तर तो त्याचा क्लोनही बनवून देऊ शकतो.
त्याचे सगळ्यात जास्त विकल्या जाणारे पर्फ्युम इंटरनॅशनल ब्रँड्सचे क्लोनच आहेत.
सध्या मी त्याने बनवलेले अझारो क्रोम आणि वर्साचे वापरतोय.

तुम्हाला अत्तर आवडत असेल, तर त्याच्याकडे मिळणारे 'असील' अत्तर ट्राय करा.
फारच मस्त आहे!
पुरवून पुरवून वापरतोय मी.

याच्या पर्फ्युम्सची खासियत म्हणजे, इतके स्वस्त असूनही ते बरेच लॉंग लास्टिंग आहेत.
शर्टवर तर दोन-दोन दिवस राहतात.
विशेष म्हणजे कपड्यांवर डागही पडत नाही.
=============================

=============================
पिंपरी-चिंचवडकरांसाठी Z. K. Perfumes हा जवळचा आणि चांगला ऑप्शन आहे.
हेसुद्धा स्वतः पर्फ्युम बनवतात.
यांचा लब्बैक परफ्युम मस्त आहे!
=============================

=============================
मागच्या वर्षी औंधच्या रिलायंस मार्टमध्ये Sugacci परफ्युम्सचा स्टॉल दिसला होता.
तिथे त्यांचे दोन दोन-तीन परफ्युम ट्राय केले आणि त्यातला Vivo हा परफ्युम निवडला.
या परफ्युमचे नोट्स चांगले आहेत, पण ५०० रुपयांना फक्त ५० एम.एल. परफ्युम मिळतो. आणि ३-४ तासांपेक्षा जास्त टिकत नव्हता हा परफ्युम.
=============================

=============================
परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी.
Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला.
सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत.
मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो.
बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही.
फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर.
फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :(
=============================

पंतश्री's picture

14 Sep 2018 - 5:19 pm | पंतश्री

हे तिळक रोड वर नक्कि कुठेशी आहे??

नांदेडीअन's picture

14 Sep 2018 - 9:26 pm | नांदेडीअन

https://goo.gl/maps/WDLCzCyeD6K2

^^
याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट.

मराठी कथालेखक's picture

17 Sep 2018 - 11:29 am | मराठी कथालेखक

नेटवर असा पत्ता मिळाला. गुगल मॅप्सवर अनेक चांगले अभिप्राय आहेत. हेच का ते ?
ZK Perfumes
18/3,Vastu Udyog, Near Rasrang Sweets, Masulkar Colony, Pimpri,,, Pune, Maharashtra

नांदेडीअन's picture

25 Sep 2018 - 12:37 pm | नांदेडीअन

हो, हेच ते.

मराठी कथालेखक's picture

4 Oct 2018 - 4:55 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.
मागच्या आठवड्यात ZK perfumes मध्ये गेलो होतो. ते अजमलचे अत्तर ठेवतात असे ते म्हणाले. त्यांच्याकडून मी चंदन आणि केवडाचे अत्तर घेतले. चंदन चांगले आहे पण केवड्याचा सुगंध काही फारसा जाणवत नाही.

हल्लीच जरा नविन अत्तर ट्राय मारले आहे, नाव आहे :-कुकुंबर
तसेच पॉयझनचे अत्तर सुद्धा ट्राय मारले, ते सुद्धा मस्त आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

अल रिहब , अरोचेम आणि एक्वादस चे अत्तर पण चांगले आहेत.

रुस्तुम's picture

9 Oct 2016 - 12:02 am | रुस्तुम

वेगळाच विषय आणि छान चर्चा .... डिओडरंट पेक्षा ही परफ्युम जास्ती आवडतात... झारा आणि रसासी विषयी जाणकारांनी माहिती द्यावी

vikramaditya's picture

9 Oct 2016 - 7:16 am | vikramaditya

I bought Hasan migrate attar from Amazon.
Quite good.

vikramaditya's picture

9 Oct 2016 - 7:17 am | vikramaditya

Sorry it is ahsan mogara

नांदेडीअन's picture

11 Sep 2018 - 5:35 pm | नांदेडीअन

=============================
killeroud, unboxed, perfumery, armaf.in या सगळ्या वेबसाईट्स एकाच व्यक्तीच्या (मोहीत खत्री) आहेत.
splashfragrance.in वेबसाईटबद्दल चांगले ऎकून आहे, पण मी ट्राय केली नाही.
=============================

=============================
महागाचे इंटरनॅशनल ब्रँड्स नको असतील, तर पुण्यात टिळक रोडवर एक स्पार्कल पर्फ्युम्स नावाचे दुकान आहे.
तिथे स्वस्तात मस्त परफ्युम्स मिळतात.
मागच्या वर्षीपर्यंत ४०० रुपयांना १०० एम.एल. मिळायचे.
आता बहुतेक ५५० किंवा ६०० रुपये केले आहे.
तो स्वतः बनवतो परफ्युम.

तुमच्याकडचा परफ्युम तुम्ही त्याला नेऊन दाखवला, तर तो त्याचा क्लोनही बनवून देऊ शकतो.
त्याचे सगळ्यात जास्त विकल्या जाणारे पर्फ्युम इंटरनॅशनल ब्रँड्सचे क्लोनच आहेत.
सध्या मी त्याने बनवलेले अझारो क्रोम आणि वर्साचे वापरतोय.

तुम्हाला अत्तर आवडत असेल, तर त्याच्याकडे मिळणारे 'असील' अत्तर ट्राय करा.
फारच मस्त आहे!
पुरवून पुरवून वापरतोय मी.

याच्या पर्फ्युम्सची खासियत म्हणजे, इतके स्वस्त असूनही ते बरेच लॉंग लास्टिंग आहेत.
शर्टवर तर दोन-दोन दिवस राहतात.
विशेष म्हणजे कपड्यांवर डागही पडत नाही.
=============================

=============================
पिंपरी-चिंचवडकरांसाठी Z. K. Perfumes हा जवळचा आणि चांगला ऑप्शन आहे.
हेसुद्धा स्वतः पर्फ्युम बनवतात.
यांचा लब्बैक परफ्युम मस्त आहे!
=============================

=============================
मागच्या वर्षी औंधच्या रिलायंस मार्टमध्ये Sugacci परफ्युम्सचा स्टॉल दिसला होता.
तिथे त्यांचे दोन दोन-तीन परफ्युम ट्राय केले आणि त्यातला Vivo हा परफ्युम निवडला.
या परफ्युमचे नोट्स चांगले आहेत, पण ५०० रुपयांना फक्त ५० एम.एल. परफ्युम मिळतो. आणि ३-४ तासांपेक्षा जास्त टिकत नव्हता हा परफ्युम.
=============================

=============================
परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी.
Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला.
सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत.
मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो.
बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही.
फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर.
फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :(
=============================

पुंबा's picture

11 Sep 2018 - 5:39 pm | पुंबा

माहितीपूर्ण प्रतिसाद.

नांदेडीअन's picture

12 Sep 2018 - 1:58 pm | नांदेडीअन

धन्यवाद :)

यशोधरा's picture

14 Sep 2018 - 9:26 pm | यशोधरा

हे दुकान नक्की कुठे आहे?

नांदेडीअन's picture

14 Sep 2018 - 9:27 pm | नांदेडीअन

https://goo.gl/maps/WDLCzCyeD6K2
‍‌^^
याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट.

वेदांत's picture

12 Sep 2018 - 3:04 pm | वेदांत

परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी.
Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला.
सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत.
मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो.
बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही.
फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर.
फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :(
=============================

तुम्हाला फेक पर्फ्युम्म मिळाला आहे. मी आज तोच पर्फ्युम लावला आहे. ८-१० तास टिकतो. ईबे वरुन मागवला होता.

ते परफ्युम आणि अत्तर वेगवेगळं असतंय का?
मला वाटायचं परफ्युम ला विंग्रजीत अत्तर म्हणतात..

अत्तरांवर माझा सतत सोध सुरु असतो... असाच तू-नळीवर सर्च करताना मला निखीलचा चॅनल सापडला ! जबरा व्यक्तिमत्व,अभ्यास आणि त्याचे स्वतःचे कलेक्शन अफलातुन आहे. मी त्याच्या चॅनलच्या प्रेमात पडलो... नव्हे तर त्याने व्हिडियोत सांगितलेल्या ठिकाणी जाऊन अत्तर खरेदी केली.
त्याचे दोन चॅनल्स आहेत, ज्यावर मी अधुन मधुन चक्कर टाकत असतो... ते दोन्ही चॅनल्स इथे अत्तर प्रेमी मंडळींसाठी देउन ठेवतो.
Perfume Guru :- https://www.youtube.com/user/gobarboss/videos [ परफ्युम लव्हर्ससाठी सुद्धा हा चॅनल आहे.]
Perfume Guru India :- https://www.youtube.com/channel/UCiF045KuvDiT4NE7dGZiNpA [ सध्या इथे ३ व्हिडियो आहेत, निखील ने exotic scents चे बहुधा आता नाव बदलुन Perfume Guru केले आहे.]
निखील ने ज्या व्हिडियोत उद मुखल्लतचे कौतुक केले ते मी बराच प्रयत्न करुन मिळवलेच ! :) तो व्हिडियो मी खाली देत आहे.

याच बरोबर मी नॉन सिंथेटिक अत्तरे घेतली :- इस्तांबुली गुलाब, केवडा, केशर , खस [ खास कनैज मधले १२ वर्ष जुने असलेले ], टीक्स [ हे विविध उदांचे मिश्रण असुन मला विशेष आवडले आहे. मी यावेळी विविध प्रतीचे आणि विविध देशातील उद हुंगुन पाहिले, अगदी कंबोडियन उद देखील. हे उद हुंगल्यावर माझं डोक जवळपास तास-दीड तास ठणकत होते. उद सर्वांना आवणारा नाही, परंतु उत्तम मिश्रण असलेला, किंवा मुख्ल्लत उद जादुयी परिणाम करणारा असतो इतकं मी खात्रीने सांगु शकतो.]
हल्लीच ज्येष्ठ साहित्यिक दाजी शास्त्री पणशीकर माझ्या घरी आले होते, त्यांना सुद्धा अत्तरांची फार आवड आहे आणि त्यामुळेच त्यांच्याशी माझ्या अत्तरावर भरपुर गप्पा झाल्या.त्यांना मी आवडीने माझ्याकडचे उद मुखल्लत लावले आणि त्यांना ते फार आवडले. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- MahaGanapatim | Ft.Agaadh - Priyanka Barve | Sarang Kulkarni

वेल्लाभट's picture

25 Sep 2018 - 1:05 pm | वेल्लाभट

मुंबईत कुठे मिळेल हे? एखादं विशेष दुकान? की प्रचलित ठिकाणी चौकशी करू?

मदनबाण's picture

29 Sep 2018 - 11:08 pm | मदनबाण

मुबंईत मी २ ठिकाणी अत्तर घेतले त्याचे पत्ते खाली देतो :-

अजमल :- Shop No: 1, Ground Floor, Cecil Court, Near Regal Cinema, Colaba.

Attar Mohd.Ayub & Co. :- 4/14 A, Kamal Mansion Corner, Hajiniyaz Ahmed Azmi Marg,A.B Road Colaba. [ इथुन हॉटेल कैलास पर्बत जवळच आहे, तिथे छोले भटुरे एकदम सही मिळतात. :) ]

माझी एक सवय आहे, ती म्हणजे मी जिथेही अत्तर घेतो तिथे सर्वात आधी खस घेतो, जिथे खस उत्तम मिळतो तिथे इतर अत्तरे सुद्धा उत्तम मिळतात असा आजवरचा अनुभव आहे.
माझी आवडती अत्तरे मी आवडीच्या उतरत्या क्रमाने देतो :-
१} खस :- माझ्या वैयक्तिक मतानुसार आणि आवडीनुसार हे अत्तर सर्व अत्तरांचा सम्राट आहे. उत्तम खसचा प्रभाव हा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिला आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तिला आवडेलच असा आहे, कमालिचा गारवा देणारा हे अत्तर आहे.
२} मोगरा :- या अत्तराचे वर्णन करायचा प्रयत्न केल्यास मी असं म्हणीन की... ताज्या ५ मोगर्‍यांच्या गजर्‍याला जो सुगंध येइल अगदी तसे. :)
३] शमामा :- याच्या पहिल्याच वापरात माझ्या लक्षात आले कि हे एकदम जबरदस्त अत्तर आहे, बर्‍याच काळ मी उत्तम शमामाच्या शोधात होतो जे मी कनौज मधुन हल्लीच मागवले. त्यांच्या संकेतस्थाळाचा पत्ता खाली देत आहे, त्यांना मेल करुन अत्तरे मागवता येतात :-
http://mlramnarain.com/
यांच्याकडुन मी खस [ अर्थातच ] , शमामा आणि काश्मिर नावाचे अत्तर मागवले, यातले काश्मिर हे अजुन त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. काश्मिर हे मुखल्लत अत्तर असुन ते फार गोडुस वाटले आहे, त्यामुळे ते कोणी ट्राय मारावे मी असा सल्ला आता तरी देणार नाही.मला या अत्तराला समजायला वेळ लागेल असं वाटत.
४] उद :- एकदा तरी उत्तम दर्जाचे लाईट उद ट्राय मारायलाच हवे... तुमच्या आवडीचे उद जेव्हा तुम्हाला सापडेल तेव्हा तुम्ही नक्कीच उदाच्या आकंठ प्रेमात पडालच.
५]मजमुआ :- याचा गंध हीच याची ओळख आहे, मजमुआ केवडा, कदंब, आणि मिट्टी अत्तर यांच्या रहस्यमयी मिश्रणाची निर्मीती आहे. यात कदंबाचे प्रमाण जास्त असल्यास डोकेदुखी होते असा एक माझा ढोबळ अंदाज आहे.

डेडली काँबिनेशन :-
मी स्वतःवर केलेल्या अत्तरांच्या प्रयोगात अचानक मला अत्ता पर्यंत दोन जबरदस्त काँबिनेशनचा शोध लागला आहे. ते दोन्ही खाली देतो.
१} उद + मोगरा :- वर्णन करायला शब्द सुचत नाहीत.
२} खस + गुलाब :- खसचा गंध इतर गंधांना खाउन टाकत असला तरी या प्रकारात तसे होताना जाणवत नाही, तर एक अफलातुन गंध तुम्हाला अनुभवता येतो. सध्या खस + काश्मिर यांच्या प्रयोगात आहे. :)

@ मराठी कथालेखक
तुम्हीला ऑनलाईन अजमलचे अत्तर अ‍ॅमेझॉन वरुन मागवता येइल आणि जरी कनौज ला जाउ शकत नसलात तरी तिथुनच अत्तरे घरपोच मिळवु शकतात त्यापैकी एका संकेस्थळाचा पत्ता वरती दिला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ऐ मेरे हमसफ़र, एक ज़रा इंतजार सुन सदायें दे रही है, मंज़िल प्यार की... :- Qayamat Se Qayamat Tak

मराठी कथालेखक's picture

4 Oct 2018 - 4:53 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.
पिंपरीतले ZK perfumes मध्ये गेलो होतो. ते पण अजमलचे अत्तर ठेवतात असे ते म्हणाले. त्यांच्याकडून मी चंदन आणि केवडाचे अत्तर घेतले. चंदन चांगले आहे पण केवड्याचा सुगंध काही फारसा जाणवत नाही.