हेल्मेटसक्ती

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
13 Nov 2014 - 9:31 am
गाभा: 

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

13 Nov 2014 - 10:08 am | नितिन थत्ते

पुण्यातल्या लोकांना हेल्मेट घालण्याचे वावडे का आहे हा प्रश्न मला नेहमी पडतो.

देशातल्या बहुतेक शहरांत हेल्मेटसक्ती लागू आहे आणि तिथे असा ओरडा होत नाही असे दिसते.

थॉर माणूस's picture

13 Nov 2014 - 10:37 am | थॉर माणूस

१०००% सहमत. सक्ती विरोधात आंदोलने वगैरे कैच्याकै वाटलं होतं मला तरी. अपघाताला कारणीभूत इतर बाबींकडे लक्ष द्या असे सरकारी लोकांना का सांगतात पुणेकर? इतकाच वाहतूक कायद्याचा आदर असता तर आत्तापर्यंत पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती. नुसता दम देऊन भागत नाही म्हटल्यावर चाबूकच काढावा लागतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2014 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे

इतकाच वाहतूक कायद्याचा आदर असता तर आत्तापर्यंत पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती. बाकी काहीही असो. या वाक्याला कडकडून टाळ्या.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Nov 2014 - 2:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती.

पुण्यात वाहने चालवतांना शिस्त म्हणजे काय रे भाऊ?

१) समोर लाल सिग्नल दिसत असतानाही आपले वाहन पुढे दामटणे.
२) उजवीकडे वळण्याचा सिग्नल दिला असेल त्याला उजवीकडूनच ओव्हरटेक करणे.
३) दोन बाईकचालकांनी आपल्या गाड्या समांतर चालवत सारसबागेत चालत असल्या सारख्या चकाट्या पिटणे.
४) ऐन गर्दीच्या वेळी काकांच्या मागे बसलेल्या काकूंनी 'अहो हेच ते दुकान, हेच ते दुकान' बोंबलत आहे त्या क्षणी गाडी डावीकडे वळवायला लावून काकांचा आणि मागून येणार्‍या वाहनचालकांचा अंदाज चुकवणे.
५) सिग्नल सुटायला पाचेक सेकंद शिल्लक आहेत हे माहीत असूनही निवांत मोबिल्यावर बोलत बोलत रस्ता ओलांडणे आणि सिग्नल सुटला की जत्रेत चुकल्यासारखे इकडे पळू का तिकडे पळू असा आविर्भाव आणत स्वत:सोबत इतरांनाही गोंधळात टाकणे.

आणखीही अनेक गोष्टी पुणेकर आपला वडिलोपार्जित हक्क असल्याप्रमाणे करत असतात.

नसत्या सुक्या मिजाशी शिकाव्यात तर या लोकांकडून. आता पाण्यात राहून माशाशी वैर का करा म्हणून गप्प बसावं लागतं, पण वाहतुकीची बेशिस्त पाह्यली की देवाने केवळ शिक्षा करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावर दहा छड्या मारुन एक मोजावे आणि अशा दहा छड्या माराव्या इतका राग येतो. :( म्हणजे पुन्हा गाडीवर बसताना छड्या आठवून तरी असले उपद्व्याप होणार नाहीत.

त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत

हेल्मेट सक्ती आणि वाहतुकीचे नियम हे म्युच्युअली एक्स्क्लुसिव असतात काय? दोहोंची अंमलबजावणी एकाच वेळेस करता येत नाही काय?

प्रकाश घाटपांडे's picture

13 Nov 2014 - 10:32 am | प्रकाश घाटपांडे

मुद्दा प्राधान्यक्रमाचा आहे. शिवाय धाग्यातील इतर मुद्द्यांचाही विचार केला पाहिजे नुसता शब्दच्छल करुन उपयोग नाही.

धर्मराजमुटके's picture

13 Nov 2014 - 10:41 am | धर्मराजमुटके

कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी असे म्हणतात. वैयक्तीक सुरक्षेचा आग्रह प्रथम धरा. तुम्ही अन्य लोकांच्या सुरक्षीततेचा विचार पहिला करत आहात जे योग्य आहे पण प्राधान्यक्रम चुकला आहे. जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल तेव्हा दुसर्‍यांच्या सुरक्षीततेचा विचार योग्य रितीने करु शकाल.
शेवटी स्वतःचे सिर सलामत तो डोक्यात विचार पचास.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2014 - 10:47 am | डॉ सुहास म्हात्रे

जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल तेव्हा दुसर्‍यांच्या सुरक्षीततेचा विचार योग्य रितीने करु शकाल. हल्ली पुण्यात अश्याच प्रकारे गाडी चालवावी लागते...

जरा इस्काटून...

पुण्यात गाडी चालवताना, स्वतः नियम पाळण्याची जेवढी खबरदारी घ्यावी लागते, त्यापेक्षा अधिक "दुसरा कोणीतरी नियम मोडणारच आहे तेव्हा तिकडे ल़क्ष देवून अपघात टाळण्याची खबरदारी घ्यावी लागते.", हा स्वानुभव आहे.

असंका's picture

13 Nov 2014 - 4:55 pm | असंका

+१
अगदी अगदी...
सिग्नल हिरवा झाला तरी दोन्ही बाजूंना बघून मगच गाडी चौकातनं न्यावी हे योग्य!

विटेकर's picture

13 Nov 2014 - 10:53 am | विटेकर

मी पुण्यातच रहातो आणि मला कॉलेजला मोटारसायकल घेऊन जाणारा मुलगा आहे.
कितिही कंठशोष केला तरी तो हेल्मेट घालत नाही आणि याचा मला प्रचंड त्रास होतो. त्यामुळे या हेल्मेट सक्तिचे मी मनापासून स्वागत करतो , त्यातून एखाद्या कारखानादाराचा लक्षावधी - कोट्यावधी कोटी रुपयांचा फायदा झाला तरी मला आनंदच होईल. ( दुसर्‍याला मिळणार्‍या पैशाविषयी मला अजिबात असूया वाटत नाही )
एका मित्राचा हाता तोंडाशी आलेला तरुण मुलगा केवळ हेल्मेट नसल्याने जीव गमावून बसला , हे दु:ख मी आयुष्य भर विसरणार नाही.
हेल्मेट्ला विरिध करणारे पुणेकर केवळ आत्मघातकी नसून समाज कंट्क आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
कशाला विरोध करावा याचा काही सारासार विचार आहे की नाही ?

नितिन थत्ते's picture

13 Nov 2014 - 11:01 am | नितिन थत्ते

>>कशाला विरोध करावा याचा काही सारासार विचार आहे की नाही ?

"प्रत्येक बाबतीत मतभेद....."

प्रकाश घाटपांडे's picture

13 Nov 2014 - 11:05 am | प्रकाश घाटपांडे

>>हेल्मेट्ला विरिध करणारे पुणेकर केवळ आत्मघातकी नसून समाज कंट्क आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.<<
अहो विरोध हेल्मेटला नाहीच आहे. विरोध सक्तीला आहे. माझा धागा नीट वाचा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Nov 2014 - 2:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सरळ सांगून ऐकतील ते पुणेकर कुठले?
प्रत्येक गोष्टीत स्वःताची मते असणे हे पुणेकर असल्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणे.

बॅटमॅन's picture

13 Nov 2014 - 2:42 pm | बॅटमॅन

प्रत्येक गोष्टीत स्वतःचे विरोधी मत असणे हे पुणेकर असल्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

- असे पुलं म्हणतात, आम्ही नाही. तेव्हा ज्यांना ही व्याख्या पसंत नाही त्यांनी अगोदर व्हाया ओंकारेश्वर स्वर्गात जाऊन भाईकाकांशी बोलून यावे.

एस's picture

13 Nov 2014 - 3:28 pm | एस

उगाच कुठल्याही गोष्टीत पुणेकरांचे पुणेरीपण काढणे हे बेकारीचे दातकोरक लक्षण आहे.

हेल्मेटसक्ती आणि वाहतुकीच्या सर्व नियमांच्या सक्तीला संपूर्ण पाठिंबा देणारा कट्टर पुणेकर.

आम्ही पुणेरीपण काढले नाही, तर पुलंप्रणीत पुणेकरांच्या व्याख्येचा उल्लेख मात्र केला. ती व्याख्या अंमळ चुकीची सांगितली होती म्हणून तो मिसिंग एक शब्द सांगितला इतकेच. अन्यथा टीचभर पुण्यातील चिमूटभर पुणेकरांचे पुणेरीपण काढण्याइतका बोरिंग प्रकार आम्ही कशाला करू?

एस's picture

13 Nov 2014 - 4:00 pm | एस

सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून मावून कितीशी लोकसंख्या मावणार नाहीतरी? त्यामुळे सूर्याला दगड मारण्याचे कपाळमोक्षी प्रकार बाकीच्यांनी करू नयेत यासाठीच आम्हीही प्रतिसाद दिला होता.
असो.

सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून मावून कितीशी लोकसंख्या मावणार नाहीतरी?

पाताळही उलटे पाहिल्यास शिखराइतकेच वर दिसते, तेव्हा बरोबरच आहे ते. =))

पाताळही उलटे पाहिल्यास शिखराइतकेच वर दिसते, तेव्हा बरोबरच आहे ते.

काय माहीत ब्वॉ... पुणेकरांना पाताळात काय आहे हे खाली वाकून पाहण्याची सवय नाही.

बाकी प्रकाशमान स्वर्गातून, अंधकारमय पाताळात पाहिल्यावर काय दिसणार म्हणा, वटवाघळेच.

यसवायजी's picture

13 Nov 2014 - 12:11 pm | यसवायजी

तुमचा मुलगा हेल्मेट वापरत नाही ही त्याची चुकच आहे. मी स्वतः एकदा युन्वर्सीटी रोडवर बेक्कार आपटलो होतो, हेल्मेट असल्याने किरकोळ खरचटण्यावर निभावलं होतं.
पण... सक्तीला माझा विरोध आहे.
समजा तुमचा मुलगा अभ्यास सोडून दिवसभर गेम खेळत बसतो, तर तुम्ही गेमींगवर बंदी आणावी म्हणाल काय?

जर एखादा सगळे नियम पाळतो, गाडी सावकाश चालवतो, पण काही कारणांनी त्याला हेल्मेट वापरायचे नाही तर का सक्ती? उगाच का दुसर्‍यांना त्रास द्यायचा?
हेल्मेट वापरल्याने काहींना व्यवस्थीत दिसत नसेल, काहींना मानेचे त्रास असतील, टक्कल पडेल अशी भिती असेल. ;) , कणेकर म्हणतात तसा आंबाड्याचा प्रॉब्लेम असेल, किंवा काहीही हळक्षज्ञ.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Nov 2014 - 2:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

जर एखादा सगळे नियम पाळतो, गाडी सावकाश चालवतो, पण काही कारणांनी त्याला हेल्मेट वापरायचे नाही तर का सक्ती? उगाच का दुसर्‍यांना त्रास द्यायचा?

त्या सगळे नियम पाळून गाडी हळू चालवणार्‍याला एखादा बेशिस्त पुणेकर कारवाला जाऊन धडकला तर मरेल कोण शिस्तित चालणारा का बेशिस्तित चालवणारा?

यसवायजी's picture

13 Nov 2014 - 2:53 pm | यसवायजी

हेल्मेट न वापरता मेला तर त्याच्या चुकीने मेला. आपण त्रास करुन घ्यायचाच नाही.
जागरुकता एकीकडे आणी सक्ती दुसरीकडे. दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी घातली तर समजू शकतो की, त्यामुळे दुसर्‍याच्या जिवाला धोका आहे. एखाद्याने हेल्मेट न वापरल्याने इतरांना काय त्रास होतो म्हणे?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Nov 2014 - 3:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हेल्मेट न वापरता मेला तर त्याच्या चुकीने मेला. आपण त्रास करुन घ्यायचाच नाही.

वा वा, हे विचार ऐकून पुणेकरांच्या संवेदनशीलतेचा अंदाज आला.

जागरुकता एकीकडे आणी सक्ती दुसरीकडे.

इतके दिवस जागरुक करण्याचे प्रयत्न काय कमी झाले, तेव्हा झोपले होते कां? आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या?

दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी घातली तर समजू शकतो की, त्यामुळे दुसर्‍याच्या जिवाला धोका आहे.

चला हे तर मान्य आहे म्हणायचे नाहीतर वरच्याच विधानाचा आधार घेऊन हे ही म्हणाल मला दारु प्यायचीये, पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने.

एखाद्याने हेल्मेट न वापरल्याने इतरांना काय त्रास होतो म्हणे?

नीट वाचा इतरांबद्दल बोललोच नाहीये, हेल्मेट न वापरणार्‍याबद्दच्च बोलतोय, तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर? जरा तर कॉमन सेन्स वापरा की.

यसवायजी's picture

13 Nov 2014 - 3:52 pm | यसवायजी

आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या?
पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच? (जाताजाता- माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतो).

पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने.
हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या.

तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर?
हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच.

जरा तर कॉमन सेन्स वापरा की.
यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Nov 2014 - 7:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच?

सक्तीला विरोध हा दंड भरावा लागतोय म्हणूनच होत आहे नाहीतर इतकी आदळाआपट झाली असती अस वाटत नाही. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.

माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतो

चांगली गोष्ट आहे. वापरत जा चांगल असतं. :)

हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या.

वाद मी घालतच नाहीये. तुमच्या त्या आधिच्या विधानचा आधार घेऊन मी ते म्हणालो होतो, प्रतिसाद पूर्ण वाचलात तर आपल्याला ते लक्षात येईल.

हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच.

म्हणूनच ती सक्ती आहे. हेच म्हणायचे होते.

यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.

हेल्मेट सक्तीचा विरोध हाच मुळी कॉमन सेन्स च्या विरुद्ध आहे असे मला ध्वनित करावयाचे होते. त्यात तुम्हाला वैयक्तिकरित्या काहीही म्हणायचे नव्हते. तसा समज माझ्या विधानातून झाला असल्यास क्षमस्व.

पिवळा डांबिस's picture

13 Nov 2014 - 12:37 pm | पिवळा डांबिस

कितिही कंठशोष केला तरी तो हेल्मेट घालत नाही आणि याचा मला प्रचंड त्रास होतो.

मोटारसायकलचे पैसे जर तुम्ही भरलेले असतील तर सरळ चावी काढून घ्या आणि बस पकडून जा म्हणून सांगा...
चार-आठ दिवस नखरा करेल पण नंतर गुमान तुमच्या डोळ्यासमोर तरी हेल्मेट घालून जाइल...
आता तुमच्या डोळ्याआड काय करेल ते सांगता येणार नाही, पण ते त्याचं नशीब.
तुमचा मनस्ताप तरी थांबेल...

कपिलमुनी's picture

13 Nov 2014 - 2:39 pm | कपिलमुनी

कडक व्हा !

विटेकर's picture

13 Nov 2014 - 11:00 am | विटेकर

ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय?
कळवळा ? हेल्मेट सक्तिच काय , सरकारला जनतेच्या कोणत्याच गोष्टिविषयी कळवळा नाही ,म्हणून मग सगळेच नियम धाब्यावर बसविणार का ?
कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?
असू देत की ! सरकार ने आपल्या जवळच्या अनेकांचे अनेकवेळा भले केले आहे तेव्हा नाही तुमच्या पोटात दुखले ? आणि तुम्ही बनवा की स्वस्त , टिकाऊ , आय एस आइ मार्क वाले हेल्मेट ? कुणी मना केली आहे का ?
रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय?
नाही , पण जीव वाचण्याची , कमी इजा होण्याची शक्यता वाढते. छत्री बाळगल्याने पाऊस थांबत नाही , तुमचे डोके भिजत नाही.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Nov 2014 - 2:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

१००००००% बाडीस

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2014 - 5:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

*good*

मदनबाण's picture

13 Nov 2014 - 11:57 am | मदनबाण

चक्क प्रकाका लिहते झाले ! ;)
माझे मत :- आत्ता पर्यंत माझे दुचाकी चालवताना अनेक अपघात झाले आहेत ! २ रिक्षांच्या मधे येउन हवेत सुपरमॅन जसा उडावा तसा उडुन अपघात, ट्रकला मागुन ठोकर देउन अपघात, टोलनाक्यावर दुसरा वायझेड दुचाकीस्वार अचानक तिरपा आल्यामुळे झालेला अपघात,वायझेड रिक्षावाल्याने वेगाने रिक्षा दामटवुन समोर अचानक खड्डा दिसल्याने करकचुन ब्रेक दाबल्याने रिक्षा ९० अंशात वळल्याने झालेला माझा अपघात आणि इतर... या सर्व अपघातात माझं टकुरं केवळ आणि केवळ हेल्मेट वापरल्यानेच अजुन फुटलेले नाही ! आणि आमचे हे अपघाती पराक्रम आमच्या तिर्थरुपांना माहित असल्याने चुकुन सुद्धा हेल्मेट शिवाय दुचाकी चालवण्यास सोडत नाहीत.
निष्कर्ष :- हेल्मेट शिवाय दुचाकीचा प्रवास म्हणजे यमाच्या रेड्यावर लवकर बसण्याचा खुला परवाना आहे.
प्रश्नाचे उत्तर :- हेल्मेट सक्ती का असुन नये ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres
Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism
After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

काळा पहाड's picture

21 Nov 2014 - 11:13 pm | काळा पहाड

रिक्शा वाल्यांना तर xxxxx..
ता.क. पुढची दंगल कधी आहे हो?

वेल्लाभट's picture

13 Nov 2014 - 12:41 pm | वेल्लाभट

न सांगून कळत नाही मग सक्ती होणारच.
नियम आला की सक्ती अलिखित आलीच.
हेल्मेट मुळे'च' अपघात टळत नसले तरी हेल्मेट मुळे जीव वाचतो.
वाहतुकीचे इतर नियमही महत्वाचे आहेत व पाळायला हवेतच.
उगाच विरोघाला अर्थ नाही. मदनबाण म्हणाले ते एक नंबर आहे.

प्रश्नाचे उत्तर :- हेल्मेट सक्ती का असू नये ?

म्हणजे, उकडतं, की सुंदर चेहरा झाकला जातो, की दिसत नाही नीट, की कंटाळा येतो, की भार पेलवत नाही, की ट्रेन्डी हेलमेट मिळत नाहीत, की काय? प्रॉब्लेम काय आहे हेल्मेट घालायला? वरीलपैकी काहीही कारण असेल तरी ते सबळ नाही.

असो. मी हेल्मेट सक्तीच्या समर्थनात.

हेल्मेट पण सक्तीचे आणि हेलमेट सक्ती पण योग्य आहे.
तुम्ही जे बाकीच नियम म्हणत आहात.. ते हेल्मेट घालुन पण पाळता येतातच ना ?

सर्वच नियम पाळले पाहिजेत वाहुतकीचे असे माझे म्हणणे आहे.
पुण्यात असुनही मी ९९ % नियम पाळतोच पाळतो.. आणि १ % मागील वाहणांच्या हॉर्ण मुळे मला सिग्नल तोडावा लागतो.

उद्या शिक्षण सक्ती केली म्हणुन का कोणी त्याविरोधात पण आंदोलन करणार आहे.

रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय

रस्त्यावर होणार्या अपघातामध्ये हेल्मेट मुळे डोक्याला मार लागु नये म्हणुन हेल्मेट असते, अपघात न होण्यासाठी हेल्मेट नसते.

हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?

उत्पादक त्यांच्या माल खपवणारच असतात, त्यांचा फायदा होउ नये असेच जर आपल्याला वाटत असेन तर
आपण बाईक उत्पादकांच्या विरोधात जावुन बाईकच घेतली नाही पाहिजे असे म्हणण्यासारखेपण आहे.
होउद्या त्यांचा फायदा, आपला काही तोटा तर नाही ना .
सुरक्षेसाठी विमा काढतो, यात त्या विमा कंपणीचा पण फायदा असतोच ना, फुकट का सुरक्षा मिळते.

पोलिस हे सरकारी कामगार आहे, त्यांना सर्व गुन्हांवरच लक्ष दिले पाहिजे, ट्राफिक पोलीस वेगळे असतात.

जागरुक मन .. सुरक्षित प्रत्येक क्षण.

वेल्लाभट's picture

13 Nov 2014 - 1:32 pm | वेल्लाभट

हो ना,
आणि हितसंबंध जपायला हेलमेट?? अहो त्यासाठी मोठ्या गोष्टी आहेत जमीन, सामाजिक बांधकाम, इत्यादी अनेक. हेमलेट इज टू चीप अ थिंग टू मेक एनिवन रिच.

आशु जोग's picture

13 Nov 2014 - 1:05 pm | आशु जोग

इतर गुन्ह्यात आपल्या चुकीमुळे इतरांचा जीव जातो.

हेल्मेट न घातल्याने इतरांचा जीव जात नाही. अर्थात हेल्मेट न घालणे हा गुन्हा तरी मानायचा का हा प्रश्नच आहे

इरसाल's picture

13 Nov 2014 - 1:29 pm | इरसाल

हेल्मेट घालुन जर दुचाकी नी सुरक्षापट्टा लावुन चारचाकी चालवली तर त्यात चालवणार्‍याचीच सुरक्षा आहे.

त्याचं काय आपल्यात मुडद्याला, हार घातलेल्या फोटोला हेल्मेट घालायची नी सुरक्षापट्टा लावायची सक्ती नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Nov 2014 - 1:45 pm | प्रकाश घाटपांडे

शहरात रस्त्यांचे क्षेत्रफळ,संख्या,पादचारी पथ, पार्किंग या बाबी पण वाहतुक शास्त्राच्या नियमानुसार करा ना!. माझा मुळ मुद्दा हेल्मेटच्या सक्तीबाबत आहे उपयुक्ततेबाबत नाही. तसेच तो वाहतुक समस्येच्या निराकरण करण्यासाठी असलेल्या प्राधान्यक्रमाबाबत आहे

वेल्लाभट's picture

13 Nov 2014 - 2:13 pm | वेल्लाभट

नियम विदाउट सक्ती कसा काय असू शकतो ब्वा?

की म्हणजे बघा बाबा हेल्मेट चा पर्याय आहे... घातलात तर गुडबॉय, नाही तरी ठीक आहे इट्स युअर चॉइस नाही का आफ्टरऑल.... असं अपेक्षित आहे का तुम्हाला?

हे प्लीज समजवलंत तर बरं होईल. पण सक्ती नाही हं.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Nov 2014 - 3:06 pm | प्रकाश घाटपांडे

नियम विदाउट सक्ती कसा काय असू शकतो ब्वा?

नाही ना असू शकत म्हणुन तर सक्तीला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने नियम रद्द करणे हा पर्याय आहे.ज्यांना हेल्मेट वापरायचे आहे त्यांना कुणी ना म्हटले नाही. त्यांना ती मुभा आहेच की!

काळा पहाड's picture

21 Nov 2014 - 11:15 pm | काळा पहाड

आमचा नियम रद्द करायला विरोध आहे.

प्रभाकर पेठकर's picture

13 Nov 2014 - 2:04 pm | प्रभाकर पेठकर

हेल्मेट सक्ती करावी लागते, त्याविरुद्ध आंदोलने होतात, 'हेल्मेट सक्ती अजिबात असता कामा नये' असे मुद्दे अगदी हिरीरीने मांडले जातात ह्याचेच सखेद आश्चर्य वाटते.
दुचाकी चालकाची सुरक्षा ही प्राधान्याने महत्वाची आहे. सक्ती नसतान, कायदा नसतानाही हेल्मेटचा आग्रह स्वतः दुचाकीस्वारानेच धरला पाहिजे.
मस्कतमध्ये ४८ ते ५२ डिग्री तापमानातही हेल्मेटचा नियम सर्वच जणं पाळतात. मी स्वतः वापरलेले आहे. कांही विशेष घाम येत नाही किंवा उकडत नाही. आणि जरी उकडले, घामाच्या धारा लागल्या आणि टक्कल पडले तरीही मी वापरलेच असते कारण माझी सुरक्षा अग्रक्रमाने आहे.
माझा मुलगा गेली अनेक वर्षे हेल्मेट वापरतो आहे. (४ हरविली/चोरीला गेली तरी नविन घेऊन वापरतो). सर्वात साध्या अपघातात पडताना जर डोके जमिनीवर/दगडावर आपटले तर तात्काळ मृत्यू येऊ शकतो.
गेल्याच आठवडयात माझ्या वहिनीचा, असाच दुचाकीवरून पडून (भाऊ दुचाकी चालवत होता) मृत्यू झाला. अर्थात ती सुद्धा हेल्मेट वापरत नसणारच. (भावाचा स्वभाव मला माहित आहे). पाऊस पडत होता आणि भावाच्या मागे छत्री धरून बसली होती. पाऊस पडत असल्याने दुचाकीचा वेगही जास्त नव्हता. छत्रीत वारा शिरल्याने तोल गेला आणि कांही कळायच्या आतच रस्त्यावर पडली. ती पडल्याचे भावाला कळलेही नाही. रस्त्यावरच्या इतरांनी त्याला सांगितले. तातडीने तिला हॉस्पिटलात पोहोचविले. पण मेंदूला दुखापत झाल्याने बिचारीचे निधन झाले. हेल्मेट असते तर नक्कीच वाचली असती.

आशु जोग's picture

13 Nov 2014 - 11:16 pm | आशु जोग

वारजे पुलाखालची घटना सांगताय का

प्रभाकर पेठकर's picture

14 Nov 2014 - 2:50 am | प्रभाकर पेठकर

होय. तिथेच घडला हा अपघात. कुठल्यातरी वर्तमानपत्रातही बातमी आहे.

थॉर माणूस's picture

13 Nov 2014 - 2:12 pm | थॉर माणूस

पण मला मुळात हेच कळले नव्हते की आंदोलन, विरोध वगैरे कशासाठी करत आहेत ही मंडळी? वाहतुकीचे नियम पाळणे हा प्रकार तसाही यांना जमत नाही. मग त्यात अजून एक नियम वाढला तर काय फरक पडतो?

यांच्या ऐवजी सरकारनेच यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला पाहिजे... वाहतूकीचे इतर सर्व नियम प्राधान्यक्रमाने पाळून दाखवलेत तर हेल्मेटसक्ती लगेच बंद करतो. मग पुढच्या १०० एक वर्षांची निश्चिंती.

गणेशा's picture

13 Nov 2014 - 2:37 pm | गणेशा

अतिशय पटले

हाडक्या's picture

13 Nov 2014 - 3:35 pm | हाडक्या

च्या ऐवजी सरकारनेच यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला पाहिजे... वाहतूकीचे इतर सर्व नियम प्राधान्यक्रमाने पाळून दाखवलेत तर हेल्मेटसक्ती लगेच बंद करतो. मग पुढच्या १०० एक वर्षांची निश्चिंती.

याला पूर्ण अनुमोदन..!!

माझ्या चांगल्या मित्राचा सख्खा भाऊ नुसता हळू असलेल्या बाईक वरून पडला, हेलमेट अर्थातच नव्हतं. गेला.
अशा गोष्टी प्रतिसादांमधे वाचतोय आणि खूप वाईट वाटतंय.

वेल्लाभट's picture

13 Nov 2014 - 2:22 pm | वेल्लाभट

सहज कुतुहल. माझ्या फुटकळ माहितीनुसार तिथे जे बाईकर्स सगळे गियर वगैरे आवडीने (नियम आहेत का नाही मला ज्ञात नाही) घालतात. हे गार्ड ते गार्ड इत्यादी. आणि आपले तरुणेश त्याकडे स्टाईल म्हणून बघतात. काय व्वाटतं यार ते सगळं अस घालून.... इत्यादी संवाद ऐकलेले आहेत.

इथे अमेरिकेत (आणि कॅनडात) स्वयंचलित दुचाकी तर सोडाच पण साधी सायकल (ती सुद्धा अंगणात) चालवताना पण हेल्मेटची सक्ती आहे. त्याच बरोबर, 'ब्लेड स्कूटर, स्केट्बोर्ड' वगैरे वापरताना सुद्धा हेल्मेटची सक्ती आहे.
दुचाकीवर मागे बसणार्‍याला सुद्ध्दा हेल्मेट घालावेच लागते आणि दुचाकिस्वार पोलिसही हेल्मेट घालूनच असतात.

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2014 - 2:26 pm | श्रीगुरुजी

भारतात सर्वाधिक अपघात रस्त्यावर पायी चालणार्‍या लोकांचे होतात. खरं तर पायी चालणार्‍यांना हेल्मेट सक्ती केली पाहिजे. ते सोडून बिचार्‍या दुचाकीचालकांना का सक्ती? रस्त्यांवरील असंख्य खड्डे, वरखाली असणारी गटारांची झाकणे, अशास्त्रीय गतिरोधक, वाहतुकीचे नियम तोडणारी मंडळी इ. अपघातांची मुख्य व मूळ कारणे आहेत. मूळ कारणांवर अजिबात उपाय न करता थेट हेल्मेट सक्ती करणे अत्यंत अयोग्य आहे. उद्या हेल्मेटसक्ती केली तरी वरील कारणांवर उपाय न केल्याने एकही अपघात कमी होणार नाही. हेल्मेटमुळे कदाचित काही जणांच्या डोक्याला इजा होणार नाही, परंतु शरीराच्या इतर अवयवांना इजा होणारच. अपघातांचे प्रमाण कमी करणे याला प्राधान्य असावयास हवे. हेल्मेटसक्ती सारखे जुजबी उपाय नंतर येतात. एखादा मुलगा सारखे बाहेरचे खाऊन आजारी पडत असेल तर त्याच्या बाहेर खाण्यावर प्रतिबंध आणण्याला प्राधान्य हवे. हेल्मेटसक्ती म्हणजे अशा मुलाच्या बाहेर खाण्यावर बंदी न आणता त्याला रोज पोटदुखीचे औषध सक्तीचे करण्यासारखे आहे.

हेल्मेट वापरण्याचे तोटे अनेक आहेत. विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्‍यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे. त्याव्यतिरिक्त केसात कोंडा होणे, मागच्या वाहनांचे हॉर्न ऐकू न येणे हे तोटे आहेतच. हेल्मेट सांभाळणे हे अत्यंत त्रासदायक आहे. बहुसंख्य पुणेकर फार थोड्या अंतरासाठी दुचाकी वापरतात. इतक्या थोड्या अंतरासाठी हेल्मेट वापरणे हा एक न्यूसन्स आहे.

सरकारला जर जनतेची इतकी काळजी असेल तर हेल्मेटसक्तीपेक्षा अपघातांची मूळ कारणे नष्ट करण्यावर भर द्यायला हवा. आपल्याला हेल्मेट वापरायचे का नाही ते जनतेलाच ठरवू द्यात. विनाकारण सक्ती करू नका.

थॉर माणूस's picture

13 Nov 2014 - 2:49 pm | थॉर माणूस

>>>इतक्या थोड्या अंतरासाठी हेल्मेट वापरणे हा एक न्यूसन्स आहे.
इतक्या थोड्या अंतरासाठी दुचाकी वापरणे हा मुर्खपणा आहे.

>>>मूळ कारणांवर अजिबात उपाय न करता थेट हेल्मेट सक्ती करणे अत्यंत अयोग्य आहे.
बोला रेटून... तुमचं काय म्हणणं आहे? खड्यांची दुरूस्ती करणे, रस्त्यांची निगा राखणे वगैरे होतच नाही? ते जर नीट होत नसेल तर तुमच्या भागातल्या नगरसेवकांचे गळे धरा ना जाऊन. तिथे त्यांना बरे पैसे खाऊ देता?

>>>अपघातांचे प्रमाण कमी करणे याला प्राधान्य असावयास हवे.
त्यासाठी गाडी चालवणार्‍यांना मेंदू बरोबर घेऊन गाडी चालवण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळत गाडी चालवण्याची सक्ती करायला हवी. आता काय पुणेकरांबरोबर गाडीत वेगळा पोलिस बसवायचा का त्यांनी नियम पाळावेत म्हणून. तिथेही तुम्ही सिग्नल तोडल्यावर पोलिस काही बोलला की सुरू होणार... रस्त्यांची अवस्था, पार्कींग वगैरे वगैरे...

>>>एखादा मुलगा सारखे बाहेरचे खाऊन आजारी पडत असेल तर त्याच्या बाहेर खाण्यावर प्रतिबंध आणण्याला प्राधान्य हवे.
१००% सहमत. सरकारला विनंती करूयात की पुण्यात दुचाक्यांवर प्रतिबंध आणा.

>>> विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्‍यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे.
गैरसमज. मार्केटमधे शेकड्याने प्रकार उपलब्ध आहेत, कित्येक नवी हेल्मेट कमी वजनाची असतात. माझ्या वडीलांना पाठदुखी आहे, पण हेल्मेट घातल्यामुळे जास्त त्रास होतो वगैरे पांचट कारणे त्यांनी कधी दिल्याचं आठवत नाही.

>>>त्याव्यतिरिक्त केसात कोंडा होणे
:D अवघड आहे... डोके फुटण्यापेक्षा कोंडा परवडला. तरीही कोंड्याचा इतका विचार करत असाल तर वेगा पासून ते रीबॉक पर्यंत अनेक कंपन्या हेल्मेटच्या आतून घालण्यासारखे बंडानाज विकतात. ४० रुपड्यांपासून पुढे मिळतात. पण काये ना, कारणं द्यायचीच म्हटलं की वाट्टेल ते स्पष्टीकरण चालते.

>>>मागच्या वाहनांचे हॉर्न ऐकू न येणे
कानात ते हेडफोनचे बोळे घालून येतात वाटतं हॉर्न ऐकू? शेकड्यानी गाडीस्वार बघतो असले रोज. म्हणे हॉर्न ऐकू येत नाहीत. गेल्या १०-१५ वर्षाच्या हेल्मेट वापरात आजवर एकदाही मागच्या गाडीचा हॉर्न ऐकू आला नाही असं झालेलं नाही माझ्याबाबतीत. आणि खरंच एखाद्याला नसतील ऐकू येत तर त्याला आधी श्रवणयंत्राची गरज आहे आणि मग हेल्मेटची.

सक्ती आहे आणि रहाणार...
तुम्ही नियम पाळत असाल तर तुम्ही आधीपासूनच हेल्मेट वापरताय. तुम्हाला सक्तीचा फारसा त्रास होणार नाही
तुम्ही नियम पाळत नसाल तर तुम्हाला काय फरक पडतो सक्ती असली तरी आणि नसली तरी?

मदनबाण's picture

13 Nov 2014 - 3:25 pm | मदनबाण

@थॉर माणूस
क-ड-क प्रतिसाद ! ;)

@श्रीगुरुजी
काय हे हे गुरुजी ! अहो गुरुजी ना तुम्ही ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres
Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism
After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2014 - 9:20 pm | श्रीगुरुजी

तुम्हाला हेल्मेट कितीही सोयीचं आणि गरजेचं वाटत असलं तरी प्रत्येकाला ते वाटेलच असे नाही. ज्याला वापरायचे त्याने ते वापरावे. त्याची सक्ती नको. हेल्मेटसक्ती पेक्षा अपघात होण्यामागे जी प्रमुख कारणे आहेत त्यावर उपाय काढण्याला प्राधान्य हवे.

(गंभीर) अपघात होण्याचं मुख्य कारण हेल्मेट न वापरणं हे आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Nov 2014 - 8:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी बरोबर. कारणं द्यायचीच असं ठरवलं की काय कुठलीही देता येतात. हेल्मेट वापरा रे बाबा सगळ्यांनी.

माझ्या माहीतीत एक जण असा आहे की ९-१० वर्षांपुर्वी स्कुटर स्वत:च्या अंगणात वळवत असताना गाडी स्किड होऊन पडला. पडताना डाव्या बाजुच्या भिंतीवर डो़कं आपटलं. गाडी आणि भिंतीच्या मधे विचित्र अडकला होता. ५-१० किमी प्रतीतास वेगात त्याला ब्रेन हॅमरेज झाला. त्याची डावी बाजु पार्शली पॅरालाईझ झालीये. चालता वगैरे येतं पण व्यंग आलचं ना शेवटी? घरातल्या घरात एवढं झालं तर वेगात असणार्‍या गाडीवर काय होईल ह्याचा विचार करा.

एक वेळ माणुस मेलेलं परवडतं पण एकदा अपंगत्व आलं ना तर ते अतिशय कठीण होऊन बसतं.

ज्ञानव's picture

22 Nov 2014 - 2:21 pm | ज्ञानव

ते बरोबरच आहे कारण बाइकस्वार आणि पिलियन रायडर हे दोघेही आणि किंबहुना पिलियन रायडर हे हेल्मेट न वापरून जास्तच धोका स्वीकारतात. माझी वाहिनी (पेठकरांनी उल्लेख केला आहेच) हि पिलियन रायडरच होती. माझा एक मित्र गेली ३ वर्ष कोमात आहे वडलांनी लाखो खर्च केले आहेत पण काही फरक नाही तोही पिलियन रायडरच होता. गोरेगाव हायवेवर आमच्या एका चुलत मित्राची मुलगी आणि तिचा मित्र (मुंबईच्या अतिशय व्यवस्थित, शिस्तबद्ध आणि खड्डे विरहित रस्त्यावर) ट्रकने मागून धडक दिल्याने जागच्या जागी गेले केवळ डोके फुटून. त्या मुलीचे आई वडील आणि त्यांची मानसिक स्थिती ह्याचे वर्णन करावे का?

मग पुणेकरांना हेल्मेटची सक्ती का नको ?

अपघातांना अनेक गोष्टी, घटना कारणीभूत असतात त्यापैकी हेल्मेट हे एक आहे.
ज्यांना सक्ती नको त्यांच्या घरात कदाचित गंभीर अपघात झाले नसावेत किंवा आजूबाजूला होणार्या अपघातांबद्दल फारसे सोयरसुतक नसावे.

आणि चांगल्या अर्थाने सक्ती नकोच कारण ती जबाबदारी आहे प्रत्येकाची. मग पुणेकरांना जबाबदारीचे वावडे आहे का?

प्रभाकर पेठकर's picture

13 Nov 2014 - 9:14 pm | प्रभाकर पेठकर

अशा उथळ प्रतिसादाची श्रीगुरुजींकडून अपेक्षा नव्हती. असो. एकेकाचे मत असे म्हणून सोडून देतो. मी मात्र माझ्या आणि मुलाच्या सुरक्षिततेला अधिक महत्व देतो.

हेल्मेट सक्ती योग्य आहे असे मला वाटते. मी कॉलेजला असताना माझ्या समोर माझ्या मित्राचा अपघात पहिला आहे. केवळ हेल्मेट असल्यामुळे किरकोळ जखम होऊन तो वाचू शकला. पाषात्य देशांमध्ये मोठ्या पॉवरच्या बाईक्स चालवताना हेल्मेत्बरोबर safety gear सुध्दा घालण्याची सक्ती असते. चारचाकी गाडी चालवताना बेल्टची सक्ती असते. आपल्याकडे केवळ दंड होतो. तिकडे परवाना रद्द पण होऊ शकतो. कायद्याचा वचक असल्याशिवाय काही लोकांना समजत नाही मग सक्ती ही करावीच लागणार. भले मग विक्रेत्याचा फायदा का होईना. स्वताची सुरक्षितता महत्वाची.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Nov 2014 - 3:11 pm | प्रकाश घाटपांडे

स्वताची सुरक्षितता महत्वाची.

मान्य आहे ना! पण स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?

थॉर माणूस's picture

13 Nov 2014 - 3:26 pm | थॉर माणूस

या हिशोबाने "आत्महत्या हा गुन्हा आहे" या नियमाविरुद्ध सुद्धा लढावे लागेल. म्हणजे असं बघा, माझा मी शहाणा आहे. आणि आत्महत्या करेनच किंवा नाही असेही काही ठरलेले नाही. बरं मी इतर कुण्णाला इजा वगैरे करत नाही फक्त माझा मीच मरतो. मग माझ्या सुरक्षीततेची सक्ती करणारे सरकार कोण? आत्महत्या न करण्याची शिफारस करा म्हणावं हवं तर... सक्ती कशाला?

वेल्लाभट's picture

13 Nov 2014 - 4:06 pm | वेल्लाभट

ROFL

प्रकाश घाटपांडे's picture

13 Nov 2014 - 4:41 pm | प्रकाश घाटपांडे

आत्महत्या यशस्वी झाली तर तो गुन्हा नाही व अयशस्वी झाली तर तो गुन्हा आहे. जगण्याची तरी सक्ती का? हा एक वेगळा प्रश्न आहेच. त्याला अनेक पैलू आहे. इच्छामरण दयामरण ही त्याची काही उपांगे. पण तो वेगळा विषय आहे.

विजुभाऊ's picture

13 Nov 2014 - 4:50 pm | विजुभाऊ

"आत्महत्या हा गुन्हा आहे" या नियमाविरुद्ध सुद्धा लढावे लागेल
थॉर माणूस काका. जरा अपडेट रहा. आता हा गुन्हा मानला जाणार नाहिय्ये.सरकार आय पी सी ३०९ मधे बदल करणार आहे.

थॉर माणूस's picture

13 Nov 2014 - 4:57 pm | थॉर माणूस

आत्ता गुन्हा आहे ना? त्यात भविष्यकाळात कधी बदल झाला की आपण सांगू सरकारला हेल्मेट सक्ती काढायला. हाकानाका ;)

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2014 - 9:23 pm | श्रीगुरुजी

आत्महत्येला गुन्हा ठरविणे हे चूक आहे. जैन धर्मात प्रायोपवेशन करून प्राणत्याग करतात. ती आत्महत्याच आहे. त्यावर मात्र गुन्हा दाखल होत नाही. विनोबा, स्वातंत्र्यवीर सावरकर इ. नी अन्नत्याग करून प्राणत्याग केला. कायद्यानुसार ही देखील आत्महत्याच ठरते. अनेक देशात स्वेच्छामरणाची चळवळ सुरू आहे. स्वेच्छामरण ही एक प्रकारची आत्महत्याच आहे.

आत्महत्या हा गुन्हा ठरवण्या मागे वेगळा विचार आसवा .
आस मला वाटतं आत्महत्या हा गुन्हा ठरवला त्या मुळे पोलिस complaint होवून मृत्यू ची चोकशी करावीच लागते .
नाही तर खून करून आत्महत्या आहे आस दाखवलं आणि तो गुन्हा नसेल तर पोलिस चोकशी पण नाही सर्व कास आलबेल

मराठी_माणूस's picture

13 Nov 2014 - 5:18 pm | मराठी_माणूस

पण स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?

आत्मह्त्या हा सुध्दा गुन्हा आहे. तिथे असे म्हणणार का , "आमच्या जीवाची तुम्हाला का काळजी ?"

मराठी_माणूस's picture

13 Nov 2014 - 5:20 pm | मराठी_माणूस

हाच मुद्दा वरील चर्चेत आधीच उपस्थित केला गेला आहे हे नंतर लक्षात आले

पुन्हा पुन्हा हाच मुद्दा याच शब्दात मांडला जातोय म्हणून एक तांत्रिक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो:

आत्महत्या हा गुन्हा नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे.

टवाळ कार्टा's picture

22 Nov 2014 - 7:00 pm | टवाळ कार्टा

म्हणजे मेला नाही तर पोलिसांची पायरी चढायची तयारी ठेवायची...म्हणजे प्रयत्न फसला तर कधीकधी भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थीती व्हायची...याऐवजी त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ञांकडे नेउ शकत नाही का??

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2014 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?

कारण :

दूरदर्शीपणा हा सर्वसाधारण माणसाचा गुणधर्म नाही. माणूस सर्वसाधारणपणे "सारासारविवेकबुद्धी" पेक्षा जास्त "तात्कालीक सोय आणि फायदा" यांना जास्त महत्व देतो.

जनतेत तात्कालीक अप्रिय होऊ शकणारे पण दीर्घकालीक फायद्याचे कायदे जाणीवपूर्वक करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी असते (केवळ जनतेला खूष करणारे आणि / किंवा राजकारण्यांचे काम साधून घेणारे कायदे करणे नाही), हे भारतिय जनता जवळजवळ पूर्णपणे विसरली आहे असेच वारंवार दिसते.

कायद्याने जनतेला सुजाण नागरीक बनवून जनतेचाच फायदा कसा होतो याचे उदाहरण म्हणून सिंगापूर आणि इतर अनेक कायद्याचे राज्य असलेल्या देशांतील यासंबंधाच्या परिस्थितीचा अभ्यास उपयोगी पडेल.

आवांतर :

"आमचा ९ वर्षाचा पोरगा वडापावच्या टपरीवर भांडी घासतो यात तुमच्या तिर्थरुपांचे काय जाते ?" असे विचारणार्‍यांनी बालकामगार प्रतिबंधक कायदा रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू करायला हरकत नाही.

हाडक्या's picture

13 Nov 2014 - 7:49 pm | हाडक्या

तुमचे आवांतर भलतेच आवडल्या गेले आहे असे नमूद करतो. यापरता प्रतिवाद नसावा.

काळा पहाड's picture

21 Nov 2014 - 11:23 pm | काळा पहाड

अहो तुम्हाला मरायचंय तर मरा ना. पण तुमच्या सारखे लोक तिकडे हॉस्पिटलं वगैरे महाग करतात त्याचं काय? शिवाय अ‍ॅक्सिडेंट झाला कि ट्रॅफिक जॅम होतो ना? मरायचंय तर तिकडे मुठेत जा, फास लावून घ्या, विष प्या. उगीच दुसर्‍याची खोटी करायची तत्वाचा प्रश्न वगैरे घेवून.

मोहनराव's picture

13 Nov 2014 - 3:21 pm | मोहनराव

कायद्याचा वचक असल्याशिवाय काही लोकांना समजत नाही मग सक्ती ही करावीच लागणार.

hitesh's picture

13 Nov 2014 - 2:30 pm | hitesh

पोलिओचा डोस सर्वानी नाही घेतला तरी शंभरातल्या वीसच मुलाना पोलिओ होईल.

मग पोलिओचे डोसही औस्शध कंपन्यांच्या हितासाठी सरकार देते असे ओरडुन तेही बंद करणार का ?

.....

हेल्मेटमुळे प्राण नक्कीच वाचतात.. अपघातात हेड इन्जुरी ही सर्वात अधिक आढळणारी गंभीर इन्जुरी आहे.

यसवायजी's picture

13 Nov 2014 - 2:34 pm | यसवायजी

पोलिओचा डोस १८ वर्षावरच्या मुलांना देतात काय?

जेपी's picture

13 Nov 2014 - 2:36 pm | जेपी

हितेस भाई,
हेल्मेट वापरणे चांगले आहे.आमचा नाना हेल्मेट वापरायचा नाय.गेला बिचारा.

काळा पहाड's picture

21 Nov 2014 - 11:26 pm | काळा पहाड

नाना मेला काय? अरेरे! धोपटायला बरा होता हो!

प्रसाद१९७१'s picture

13 Nov 2014 - 4:40 pm | प्रसाद१९७१

मग पोलिओचे डोसही औस्शध कंपन्यांच्या हितासाठी सरकार देते असे ओरडुन तेही बंद करणार का ?

जर कोणी पोलिओ चा डोस घेतला नाही तर पोलिओ पुन्हा पसरण्याची शक्यता आहे, ज्या मुळे दुसर्‍यांना इजा होउ शकते. त्यामुळे ती सक्ती समजु शकतो पण
मी हेल्मेट घातले नाही तर दुसर्‍या कोणाला काय त्रास होणार आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Nov 2014 - 2:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हेल्मेट वापरण्याचे तोटे अनेक आहेत. विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्‍यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे.

अशा लोकांनी दुचाकी तरी का चालवावी? चालत जावे वा रि़क्षा करावी असे आमचे मत.

कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?

हात टेकले ह्या संशयित पुणेकरांपुढे.हेल्मेट सक्तीला विरोध करणार्यामागे खाजगी,महागड्या हॉस्पिटलांची लॉबी तर नाही ना?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Nov 2014 - 2:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

च्यायला या पुणेकरांचा वेळ जात नाही म्हणून असल्या कुरापती काढत बसतात.
फटके मारून हाकलून द्यायला पाहिजे, हेल्मेट वापरा नाहीतर दंड भरा, सोप्प आहे,
उगाच काहीतरी.
चांगली काहीतरी सुधारणा आणायचा प्रयत्न करतय कोणी तर कशाला काड्या घालतात हो?

मोग्याम्बो's picture

13 Nov 2014 - 3:03 pm | मोग्याम्बो

हेल्मेट सक्ती योग्यच आहे. जरा विचार करून पहा. ट्रीपल सीट जाणे सुद्धा धोक्याचे आहे. त्यावेळी धोका हा स्वतः वाहन चालक आणि त्यावर स्वार असलेले लोक यांना असतो. जर ट्रिपल सीट ला बंदी हा कायदा नसता तर रोज आपल्याला बरेच जण ट्रिपल सीट वर दिसले असते. तसेच हेल्मेट सक्तीचे पण होईल. एखादी सक्ती असल्याशिवाय भारतीय माणूस सुधारत नाही

रायनची आई's picture

13 Nov 2014 - 3:05 pm | रायनची आई

एकच प्रश्न..पुण्यात समस्त महिलावर्ग स्कूटी चालवताना डोक्यावरून स्कार्फ गुंडाळतात त्याचा सुरक्षेच्या दृष्टीने काही उपयोग आहे का? म्हणजे स्कार्फ असल्यास चालत्या स्कूटी वरुन पडूनही डोक शाबूत राहत का? :-)

बॅटमॅन's picture

13 Nov 2014 - 3:10 pm | बॅटमॅन

म्हणजे स्कार्फ असल्यास चालत्या स्कूटी वरुन पडूनही डोक शाबूत राहत का?

हो तर! फक्त तो स्कार्फ लोखंडी किंवा मजबूत प्लास्टिकचा असला म्हणजे झालं. नायतर भारतात राहूनही सौदीराज्याचे नियम पाळण्यापलीकडे स्कार्फचा उपयोग शून्य. ;)

हाडक्या's picture

13 Nov 2014 - 3:41 pm | हाडक्या

नायतर भारतात राहूनही सौदीराज्याचे नियम पाळण्यापलीकडे स्कार्फचा उपयोग शून्य.

*lol* . *lol* . *lol*

विजुभाऊ's picture

13 Nov 2014 - 3:11 pm | विजुभाऊ

पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच त्या शिवाय डावीकडून ओव्हर टेक करणे , वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवणे , सिग्नलवर डावीकडचा रस्ता पूर्ण ब्लॉक करणे. इत्यादी स्पेश्यल पुणेरी प्रकाराना सुद्धा चाप लावायला हवा.
हेल्मेटचा एक मोठ्ठा फायदा हा आहे की हेल्मेट वापरण्याने हवेत थुंकणारांचे प्रमान आटोक्यात रहाते. पुण्यात हा दुहेरी फायदा होतो.

एस's picture

13 Nov 2014 - 4:09 pm | एस

या प्रतिसादात उल्लेखलेल्या प्रत्येक गोष्टीवर कायद्याने बंदी आहेच. तिची सक्तीने फक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. पण कृपया अशा बाबींना पुणेरी स्पेशलपणाचे लेबल लावण्याचा आततायीपणा करू नये असे सुचवतो. या प्रकारचा माज इतरत्रही पाहिला आहे. आणि त्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही.

टवाळ कार्टा's picture

13 Nov 2014 - 5:40 pm | टवाळ कार्टा

हेल्मेट वापरण्याने हवेत थुंकणारांचे प्रमान आटोक्यात रहाते. पुण्यात हा दुहेरी फायदा होतो.

=))

vikramaditya's picture

13 Nov 2014 - 3:42 pm | vikramaditya

हेल्मेटलाच नसुन प्रत्येक गोष्टीला असतो. कुठलाही कायदा पाळायचा तर भारतीयांच्या जीवावर येते.

पण भारतात बरं का. बाहेरच्या देशात आवाज बंद... तिथे गेल्यावर शिस्तीचे वारेमाप कौतुक.

शिद's picture

13 Nov 2014 - 4:42 pm | शिद

सहमत...वरील हेल्मेट सक्तीबद्दलच्या सर्वच प्रतिसादांना +१.

धोके व जोखीम माहीत असूनसुद्धा हेल्मेट सक्तीला विरोध करण्यार्‍यांबद्दल नवल वाटतंय.

माझे भावजी रात्रीच्या वेळी बाईक वरून येत होते. काळोखात रस्त्यावरील असलेल्या रेतीचा अंदाज आला नाही व बाईक १०-१५ फुट घसरली. शरीराची डावी बाजू पुर्ण खरचटून निघाली पण हेल्मेट असल्या कारणानं तेवढ्यावरच निभावलं.

त्यामूळे जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट घालणं जरुरी आहे पण लोकांना चांगलं सांगून कळत नसल्यामूळे सरकारला सक्ती करावी लागते.

प्रसाद१९७१'s picture

13 Nov 2014 - 4:34 pm | प्रसाद१९७१

दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला प्रतिसाद इथे चिकटवतोय
--

हेल्मेट चा उपयोग आहे की नाही हा खरा मुद्दा नाहीये.
खरा मुद्दा हा आहे की ह्या भारत सरकारला हेल्मेट सक्ती करायचा अधिकार आहे का?

त्याची कारण म्हणजे

- कोणालाही दुचाकीवरुन जाताना अपघात झाला तर सरकार उपचाराची फुकट व्यवस्था करत नाही. कोणी मेले तर भरपाई देत नाही. मग सरकारला काय अधिकार आहे हेल्मेट सक्ती करायला? ज्या देशात कल्याणकारी योजना आहेत आणि वैद्यकीय उपचार सरकारची जबाबदारी आहे तिथे अशी सक्ती समजु शकतो, भारत सरकार कुठल्या अधिकारात हे सांगते आहे?
- हेल्मेट न घालता एखाद्याने दुसर्‍याला इजा केली ( अपघात करुन ) तरी सरकार काही वेगळी जबाबदारी घेत नाही.
- हेल्मेट न घातल्या मुळे कोणी कायमचा अपंग झाला, तर सरकार पेन्शन वगैरे देत नाही. हेल्मेट घातले असले तरी देत नाही.
- हेल्मेट घातले कींवा नाही ह्याने सरकार वर कुठलाही वेगळा बोजा पडत नाही.
- विमा कंपनी हेल्मेट घालत नसाल तर जास्त प्रिमियम मागू शकते, पण भारत सरकार कुठलाही नैतिक अधिकार नाही सक्ती करायचा.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Nov 2014 - 4:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

साध्या जगभर समजणार्या तर्काचे तर्कट बनवून कसा प्रतिवाद करायचा हे पुणेकरांकडुन शिकावे.असो. काहीतरी फुकट मिळालेच पाहिजे हे अगदी पुणेरी धर्माला जागून हो.
प्रसाद, अधिकार आहेच सरकारला असे नियम करण्याचा. अनैतिक असेल तर पुणेकरांनी कोर्टात सरकारला खेचावे असे हे म्हणतात.

प्रसाद१९७१'s picture

13 Nov 2014 - 5:05 pm | प्रसाद१९७१

अधिकार आहे ( माहीती नाही ), पण नैतिक अधिकार नक्की नाही.

दुर्दैवाने कोर्टात लोक हेल्मेट्च्या उपयुकतेबद्दल च युक्तीवाद करतात. त्यामुळे सरकार जिंकते.

कपिलमुनी's picture

13 Nov 2014 - 5:45 pm | कपिलमुनी

तुम्ही पण कोर्टात जावा

प्रसाद१९७१'s picture

13 Nov 2014 - 5:52 pm | प्रसाद१९७१

त्या पेक्षा गांधींनी कायदे मोडायला शिकवलेच आहे भारतीयांना आहे तेच करावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2014 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

गांधींनी कायदे मोडले पण त्यासंबंद्धीच्या दंडाबद्दल कूरकूर केली नाही. गांधीजींचा दुसरा गुणही अंगी बाणवावा, मग काहीच समस्या नाही. :)

कपिलमुनी's picture

25 Nov 2014 - 4:59 pm | कपिलमुनी

बरोबर बोललात एक्का काका !

लोक सोयीचे गांधी तेवढे उचलतात

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2014 - 6:10 pm | अत्रुप्त आत्मा

@कोणालाही दुचाकीवरुन जाताना अपघात झाला तर सरकार उपचाराची फुकट व्यवस्था करत नाही. कोणी मेले तर भरपाई देत नाही. मग सरकारला काय अधिकार आहे हेल्मेट सक्ती करायला? ज्या देशात कल्याणकारी योजना आहेत आणि वैद्यकीय उपचार सरकारची जबाबदारी आहे तिथे अशी सक्ती समजु शकतो, भारत सरकार कुठल्या अधिकारात हे सांगते आहे?
- हेल्मेट न घालता एखाद्याने दुसर्‍याला इजा केली ( अपघात करुन ) तरी सरकार काही वेगळी जबाबदारी घेत नाही.
- हेल्मेट न घातल्या मुळे कोणी कायमचा अपंग झाला, तर सरकार पेन्शन वगैरे देत नाही. हेल्मेट घातले असले तरी देत नाही.
- हेल्मेट घातले कींवा नाही ह्याने सरकार वर कुठलाही वेगळा बोजा पडत नाही.
- विमा कंपनी हेल्मेट घालत नसाल तर जास्त प्रिमियम मागू शकते, पण भारत सरकार कुठलाही नैतिक अधिकार नाही सक्ती करायचा.>>>>>>> क्या बात! *HAPPY*
पुण्यात सर्वात पहिल्यांदा झालेली हेल्मेट्सक्ती अठवली..आणि नंतर यात कुणाकुणाचे हितसंबंध गुंतलेले होते..हे ही कळलं..(आणि अनेकांनी हतातला सगळा पैसा हेल्मेटात घालून..रस्त्यारस्त्यावर लावलेले हेल्मेट्चे स्टॉल्सही अठवले..आमच्या इथल्या एका रिक्षावाल्यानी रिक्षा विकून अठवडाभर त्या पैशात हा धंदा केला..आणि नंतर एकाला दोन रिक्षा घेतल्या..भजिवाले/बेकर्‍या/दुग्धालयं...इथेही तेंव्हा हेल्मेट विक्री चालायची..हे ही अठवलं...तोच चावट्पणा सध्यःकाली सुरु आहे..अर्थातच काहि दिवसात हे सर्व उजेडात येइलच. आणि अत्ता लोकांना कचकाऊन हेल्मेट खरेदी करायला लावणारे नंतर किमान २/३ वर्ष तरी त्याच्या अंमलबजावणी करण्याच्या योजना राबवतात का? हे ही पहाणं उद्बोधक ठरेल.

hitesh's picture

14 Nov 2014 - 2:45 am | hitesh

सरकार औषधपाण्याची व्यवस्था करुन बसलेलेच असते.
स्डोकं फुटलं तर दीनानाथ ला जाण्याऐवजी ससुनला जायला कुणी अडवलेलं नाही.

प्रसाद१९७१'s picture

14 Nov 2014 - 10:58 am | प्रसाद१९७१

ठीक आहे, सरकार ने सांगावे की हेल्मेट घातले नसल्यामुळे डोक्याला इजा झाली तर फुकट उपचार ( ससून मधे सुद्धा ) मिळणार नाहीत. काही हरकत नाही. मी वीमा कंपनीचे उदाहरण दिलेच होते.

आणी रस्त्यावर प्रत्येक दिवशी होणार्‍या शेकडो अपघातांपैकी कीती सरकारी दवाखान्यात जातात?

hitesh's picture

14 Nov 2014 - 11:58 am | hitesh

विमा कंपनी ही चारिटी कंपनी नाही. त्यांचे नियम वेगळे असतात.

लोकांच्या चुकीने जरी अनारोग्य निर्माण झाले तरी सरकार उपचार करतेच. ते त्यांचे कर्तव्य आहे.

सरकारी दवाखान्यात येऊ नका असे सरकार सांगत नाही. लोकाणॅअ‍ॅ शक्ञ असल्ञास जावे

उपचार जरी खाजगी घेअतले तरी पोलिस केस , कोर्ट ही व्यवस्था सरकारीच असते.

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2014 - 12:27 pm | टवाळ कार्टा

लोकांच्या चुकीने जरी अनारोग्य निर्माण झाले तरी सरकार उपचार करतेच. ते त्यांचे कर्तव्य आहे.

व्वा :)

चिगो's picture

22 Nov 2014 - 3:42 pm | चिगो

भारी लॉजिक, हो.. ह्या हिशोबानी चोरीमारी (खाजगी मालमत्तेची), खून (वैयक्तिक वैरातून झालेला), लुबाडणूक (ज्यात सरकारला तोटा नाही) किंवा कुठलाही गुन्हा ज्यात सरकारी मालमत्ता, कर्मचारी, व्यवस्था हीला नुकसान होतं नाही, त्यात सरकारने लक्ष द्यायची गरज नाही. कारण की असल्या कुठल्याही गोष्टीत सरकार भरपाई देत नाही..

वर इए साहेबांनी बोलल्याप्रमाणे, "तत्कालीन फायदा" ह्यावरच लक्ष ठेवून माणुस वागतो, म्हणून कायद्याचा बडगा उगारावा लागतो.. iRobot चित्रपटातलं वाक्य आठवलं, " You humans are like children. You must be protected from yourselves.."

बाकी चालु द्या..

हुकुमीएक्का's picture

13 Nov 2014 - 10:47 pm | हुकुमीएक्का

       माझ्या मते हेल्मेट सक्ती हवी परंतू अश्या ठिकाणी जिथे वाहनचालक ६० पेक्षा जास्त वेगाने चालवू शकेल. पुण्यातील काही रस्त्यांवर एव्हडी गर्दी असते तिथे २०-२५ पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवताच येत नाही. उदा. सिंहगड रस्ता (सं. ७ नंतर), लक्ष्मी रस्ता (सं. ६ नंतर).
       जिथे वाहनचालकाला गाडी पाय टेकवतच चालवावी लागते तिथे हेल्मेट कशाला.?
ठो दे ठो करायला ?? *lol*
की Kiss of Helmet करायला?? *kiss3*

       हेल्मेट फक्त Highway ला ठेवा ना जिथे लोकं ६० च्या खाली येतच नाहीत. कमी रहदारीच्या रस्त्यावर हेल्मेट कशाला ?? एक गोष्ट प्रकर्शाने पहायला मिळते ती म्हणजे Scarf घातलेल्या एकाही महिलेला पोलीस आडवत नाहीत. आडवतात ते फक्त पुरुषांना. ( एखाद्या महिलेला आडवतील आणि 'समज' देऊन सुटका.) *unknw*

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2014 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा

@ठो दे ठो करायला ?? >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

hitesh's picture

14 Nov 2014 - 2:48 am | hitesh

फक्त हायवेवरच सक्ती कशी करणार ? घारापासुन हायवेवर जायला आधी काही अंतर गल्लीबोळातुनच जाणार ना ? का घर हायवेवरच आहे ?

हुकुमीएक्का's picture

14 Nov 2014 - 10:23 pm | हुकुमीएक्का

    तस नाही. मी म्हणतोय हेल्मेट 'घातलेच' पाहिजे असा नियम शहरात नको. हेल्मेट सोबत ठेवा पण Highway लाच सक्ती ठेवा. आजकल गाडीला हेल्मेट लावायची सोय पण असतेच की. माझं म्हणणे असे आहे शहरात हेल्मेट घालूनच गाडी चालवा असे नको. किंवा जिथून Highway सुरू होतो अश्या ठिकाणी हेल्मेट सक्ती करा. टोल नाक्यावर Checking करा. किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात?? नियम सगळयांना सारखा. आणि RTO कडून अश्या प्रकारची कुठलीही बातमी अजून पेपरात आली नाहीये. मला वाटतं या वेळेस या वाहतूक पोलिसांना सरकार कडून दिवाळी बोनस मिळाला नसावा कारण आता "BJP" आहे ना. *i-m_so_happy* म्हणून नियमाच्या नावाखाली नागरिकांकडून वसूली.
    रस्त्यावरून जाणार्‍या लोकांनी आधी हेल्मेट घातलं पाहिजे. आपण पेपरात वाचतोच की पादचार्‍याला पीएमटी/टँकर/कार/etc ने उडवले. त्यांना तरी भरपाई मिळते का कधी?? फक्त अज्ञात वाहनाने उडवले एव्हडेच कळते. असो एकच प्रश्न आहे. जर हेल्मेट घातलेला माणूस गाडीवरून फेकला गेला आणि त्याचे डोके शाबूत राहिले परंतू एखादे वाहन त्याच्या अंगावरून गेले आणि त्याचा मृत्यू झाला. तर त्याला सरकार कडून नुकसान भरपाई मिळेल का.?? की मग सरकार यापूढे 'चिलखत' घाला असा नवीन नियम आणणारे?? *lol*

किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात??

याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
१. हेल्मेट न घालणार्‍यांचे डोके लोखंडाचे / दगडाचे असू शकते त्यामुळे त्याला मार लागू शकत नाही.
२. हेल्मेट न घालणार्‍यांना डोकेच नसू शकते.
३. हेल्मेट न घालणार्‍यांना डोके असू शकते पण मेंदू दुसर्‍याच ठिकाणी असू शकतो त्यामुळे त्यांना काळजीचे कारण नसावे.
४. आपण नियम बनवले आहेत त्यामुळे आपला अपघात झाला तरी आपल्या डोक्याला इजा होणारच नाही असा ठाम आत्मविश्वास असावा.
वरीलपैकी कोणते कारण पटते काय ते बघा.

हुकुमीएक्का's picture

14 Nov 2014 - 10:33 pm | हुकुमीएक्का

मला वाटते जर Traffice Police हेल्मेट घालायला लागले तर तेही हेल्मेट विक्रेत्याकडून फुकट घेऊन घालतील. म्हणजे त्यालाही दंड की "काय रे Un-Authorized Company ची हेल्मेट विकतो?? ते पण रस्त्यावर अतिक्रमण करून?? चल केस करतो नाही तर आमच्या सर्व कर्मचार्‍यांना एक एक हेल्मेट दे तपासायला" . . . म्हणजे त्या विक्रेत्याच्या पोटावर पाय. *lol*

खटपट्या's picture

16 Nov 2014 - 1:51 am | खटपट्या

असंच असणार !!

hitesh's picture

16 Nov 2014 - 3:15 am | hitesh

हेल्मेट घातल्याने डोके वाचले , तर हेल्मेटचे काम तिथे सफल झाले. अंगावरुन गाडी गेली तर बिचार्‍या हेल्मेटने / सरकारने काय करावे ?

हेल्मेट सक्ती का आहे ? कारण हेल्मेट आहे किंवा नाही यावर जगणे मरणे एखाद्या केसमध्ये ठरु शकते. निर्णायक असु शाकते.

पण गाडी अंगावरुन गेली तर माणुस मरणारच ! चिलखत असले तरी नसले तरी. त्यामुळे त्याचे कंपल्शन जस्टिफाय होउ शकत नाही.

आशु जोग's picture

13 Nov 2014 - 11:20 pm | आशु जोग

म्हणे हेल्मेट घातल्याने पुणेकरांचा इगो दुखावतो

आशु जोग's picture

13 Nov 2014 - 11:21 pm | आशु जोग

म्हणे हेल्मेट घातल्याने पुणेकरांचा इगो दुखावतो
.

आशु जोग's picture

13 Nov 2014 - 11:21 pm | आशु जोग
श्रीगुरुजी's picture

13 Nov 2014 - 11:39 pm | श्रीगुरुजी

कोणी कितीही सक्ती केली, दंड केला, कायदा आणला, खोटा कळवळा आणून आमच्या सुरक्षिततेचा आव आणला तरी मी हेल्मेट वापरणार नाही हे निश्चित. एकवेळ पोलिसांना चुकविण्यासाठी गल्लीबोळातून जाऊ पण हेल्मेट सक्ती केली म्हणून मी कदापि हेल्मेट वापरणार नाही. आधी खड्डे बुजवा, रस्ते रूंद करा, वाहतूकीचे नियम पाळण्याची सक्ती करा, रस्त्यावर पुरेशी प्रकाशयोजना करा, वरखाली असलेली ड्रेनेजची झाकणे रस्त्याच्या पातळीत आणा आणि मग हेल्मेट सक्ती करा. जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत हेल्मेट परिधान करणे नाही.

hitesh's picture

14 Nov 2014 - 2:50 am | hitesh

समान नागरी कायद्याच्या नावाने ओरडणारे गुर्जी जे नागरी कायदे समानच आहेत ते मात्र पाळत नाहीत !

संदीप डांगे's picture

5 Feb 2016 - 4:38 pm | संदीप डांगे

तुमच्या एखाद्या गड्याने म्हणु देत की "मुसलमान हेल्मेट घालणार नाहीत कारण ते इस्लामच्या विरूद्ध आहे", गुर्जी सार्‍या गावाला हेल्मेट घालून मोर्चा काढतेत की नाही बघाच... घोषणा ही तयार होईल, "इस देश में रहना होगा तो हेल्मेट पेहनके चलना होगा," =))

थॉर माणूस's picture

14 Nov 2014 - 9:06 am | थॉर माणूस

त्यापेक्षा आपण असं करुयात का? सगळे पुणेकर मिळून "किमान वाहतूक नियम" अशी एक यादी करूयात, आणि निदान ते तरी आम्ही पाळू शकतो हे सरकारला सिद्ध करून दाखवूयात. म्हणजे काय होईल की पुणेकरांची नियम पाळत रस्त्यांवर गाडी चालवण्याची कुवत आहे हे सिद्ध होईल, मग आपण चांगल्या रस्त्यांची मागणी अधिक जोमाने करू शकूच आणि आपोआपच आपल्या हेल्मेट सक्ती विरुद्धच्या आंदोलनाला वजन सुद्धा प्राप्त होईल नै का?

अन्यथा तसेही आपल्या सोईचे नियम तेवढे लागू करण्यात आपण अनुभवी दिसताच आहात. त्यामुळे मग आहे तसेच वागत रहा, नियम असला काय नसला काय. अनेक नियम मोडतो त्यात हा अजुन एक...

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2014 - 2:33 pm | श्रीगुरुजी

>>> अन्यथा तसेही आपल्या सोईचे नियम तेवढे लागू करण्यात आपण अनुभवी दिसताच आहात. त्यामुळे मग आहे तसेच वागत रहा, नियम असला काय नसला काय. अनेक नियम मोडतो त्यात हा अजुन एक...

सोयीच्या नियमांचा प्रश्नच नाही इथे. एखाद्या घराचे छप्पर गळत असेल तर छप्पर वॉटरप्रूफ करून गळती थांबविणे यालाच प्राधान्य असले पाहिजे. छप्परदुरुस्ती न करता घरातल्या घरात छत्री किंवा रेनकोट वापरण्याची सक्ती केली तर ते जसे हास्यास्पद होईल, तसेच अपघातांची मुख्य कारणे दूर न करता हेल्मेटसक्ती करणे हे हास्यास्पद आहे.

वा! म्हणजे अपघातांची कारणे आहेत तोपर्यंत हेल्मेट वापरायचं नाही :)

रामपुरी's picture

14 Nov 2014 - 2:54 am | रामपुरी

फाल्तू गोष्टीवर लै चर्चा झालेली दिसतीये. पुण्यात सक्ती झाल्यावरच एवढी बोंबाबोंब का? बाकिच्या शहरात तर कधीपासूनच आहे. कि सगळे हेल्मेट कारखानदार फक्त पुणेकरांच्या खिशावर डोळा ठेऊन आहेत असा पुणेकरांचा समज आहे? बाकी वाहतूक नियमांसाठी पुणेकरांच्या ..डीवर हंटरच पाहीजे यावर दुमत असण्याचे कारण नाही.

शिद's picture

14 Nov 2014 - 3:50 am | शिद

१००!

बाकी चालू द्या.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Nov 2014 - 8:13 am | माईसाहेब कुरसूंदीकर

'स्वच्छ भारत'च्या धर्तीवर नरेण्द्र-देवेंद्र जोडगोळी राज्यात 'सुरक्षित महाराष्ट्र/पुणे'मोहिम राबवतील ही अपेक्षा.मग मराठी अभिनेते(भरत जाधव्,मकरंद अनास्पुरे) बाईकवर बसण्याआधी हेल्मेट घालतानाचे फोटो...
मग हेल्मेटला विरोध करणारे मग नक्की हेल्मेट घालतील.

अपघात झाला तर हेल्मेट असेल किंवा नसेल तरी तुमच्या नशीबात जे होणार आहे ते होतेच. माझे दोन भाऊ मागच्या वर्षी हेल्मेट असून सुद्धा अपघातात गेले. (दोन बाईकची समोरासमोर टक्कर झाली, दोन्ही बाईकवरचे हेल्मेट घातलेले स्वार जागीच गेले. मागे बसलेले दोन्ही सुद्धा गेले..). तेव्हापासून दुचाकी चालवण्यापासून दुरच असतो.

जवळच्या जवळ किंवा उपनगरात दुचाकी वापरावी व हमरस्त्यावर चारचाकी (किंवा सरकारी बस) वापरावी. (हे म्हणजे ब्रेड नाही मिळत तर केक खा असे म्हणण्यासारखे आहे पण दुचाकी चालवण्यार्‍यांच्या बेशिस्तीमुळे असे म्हणावेसे वाटते. हायवेवर मध्येच लेन तोडणे, उगाच दोन गाड्यांमधून जाणे, कट मारणे, उजव्यालेनमध्ये उगाचच गाडी हळू चालवणे या प्रकारांमुळे चारचाकीवाल्यांना फारच काळजीपुर्वक गाडी चालवावी लागते.). यामुळे हायवे/एक्स्प्रेस वे अशा रस्त्यावर दुचाकी चालवण्यास बंदी असावी असे वाटले. जास्तीत जास्त अपघात हे दुचाकीमुळेच होतात. मागेच नाशीक-मुंबई रस्त्यावर नीता होल्वोच्या मध्ये एक दुचाकी आली आणि तिला वाचवण्याच्या नादात वोल्वो दुसर्‍या लेनमध्ये घुसली आणि तिने एका इनोव्हाचा (आत बसलेल्यांसकट) चुराडा केला.

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2014 - 9:22 am | टवाळ कार्टा

(दोन बाईकची समोरासमोर टक्कर झाली, दोन्ही बाईकवरचे हेल्मेट घातलेले स्वार जागीच गेले. मागे बसलेले दोन्ही सुद्धा गेले..)

समोरासमोर टक्कर होण्याअगोदर त्यांनी एकमेकांना पाहिले नव्हते? सगळे ४ जण जाण्यासाठी बाईकचा स्पीड कमीतकमी किती हवा?

दुचाकी चालवण्यार्‍यांच्या बेशिस्तीमुळे असे म्हणावेसे वाटते. हायवेवर मध्येच लेन तोडणे, उगाच दोन गाड्यांमधून जाणे, कट मारणे, उजव्यालेनमध्ये उगाचच गाडी हळू चालवणे या प्रकारांमुळे चारचाकीवाल्यांना फारच काळजीपुर्वक गाडी चालवावी लागते.)

बेशिस्त कुणाचीही असू शकते...लेन तोडणे, कट मारणे हे प्रकार बाईकवाले"च" जास्त करतात कारण ४ चाकी पेक्षा बाईकवर असे करणे सोपे असते...पण स्वताचा मुलगा/मुलगी २चाकी कशी चालवतो याची खातरजमा करणे माझ्यामते प्रत्येक पालकाला शक्य असते...वाहतुकीचे नियम माहीत असल्याशिवाय हातात बाईक घेउन देउच नये
आणि चारचाकीवाले सुध्धा समोरच्या बाईक/४चाकी पासून फक्त २ फूट अंतर ठेऊन चालवतात ते सुध्धा ५०+ च्या स्पीडला...अशांचे प्रमाणसुध्धा लक्षणियरीत्या वाढलेले आहे :(

हायवे/एक्स्प्रेस वे अशा रस्त्यावर दुचाकी चालवण्यास बंदी असावी असे वाटले.

सहमत...किंवा सेपरेट लेन असावी

योगी९००'s picture

14 Nov 2014 - 9:34 am | योगी९००

समोरासमोर टक्कर होण्याअगोदर त्यांनी एकमेकांना पाहिले नव्हते? सगळे ४ जण जाण्यासाठी बाईकचा स्पीड कमीतकमी किती हवा?
माझे भाऊ त्यांच्याच लेन मध्ये चालले होते. समोरून येण्यार्‍याने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात अचानक मध्ये बाईक आणली. दोघांनाही सावरायला वेळ मिळाला नसावा. साधारण ८० चा वेग असावा.

बातमी येथे वाचा.

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2014 - 9:43 am | टवाळ कार्टा

झाले ते वाईट झाले...आणि मी आणखी काही लिहित नाही...पण मनात १ प्रश्न आलाय...व्यनी करु की नको ते तुम्हीच सांगा

यसवायजी's picture

14 Nov 2014 - 9:44 am | यसवायजी

:(

देशपांडे विनायक's picture

14 Nov 2014 - 10:26 am | देशपांडे विनायक

कायदा करण्याने काही लोक समाधान पावतात

कायदा राबवण्याने काही लोक समाधान पावतात

कायदा न राबवण्याने काही लोक समाधान पावतात

पण

राज्यकर्ते सर्वाना समाधान देऊ इच्छितात कारण ते कायद्याच्या वर आहेत

प्रसाद१९७१'s picture

14 Nov 2014 - 10:42 am | प्रसाद१९७१

हेल्मेट घातल्या मुळे डोके वाचले पण कायमचे अपंगत्व आले (हात, पाय, कंबर मोडुन ) तर सरकार काही देणार आहे का?

अश्या केसेस मधे त्या माणसाला मेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल.

योगी९००'s picture

14 Nov 2014 - 12:13 pm | योगी९००

मुळात आपण दुचाकी चालवत आहोत आणि आपली चुक असो वा नसो, आपल्यालाच जास्त भोगावे लागणार आहे ही जाणिव जरी आली तरी बर्‍याच प्रमाणात अपघात कमी होतील.

विजुभाऊ's picture

14 Nov 2014 - 12:53 pm | विजुभाऊ

प्रसाद१९७१ - Fri, 14/11/2014 - 10:42
हेल्मेट घातल्या मुळे डोके वाचले पण कायमचे अपंगत्व आले (हात, पाय, कंबर मोडुन ) तर सरकार काही देणार आहे का?
अश्या केसेस मधे त्या माणसाला मेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल.
अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2014 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही.
कारण, मुद्दा जिंकणे महत्वाचे... खरेखोटे जाऊ दे तेल लावत *dash1*

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 11:13 am | वेल्लाभट

हा धागा शंभरी मारणार याची खात्री शीर्षक बघूनच झाली होती. वेल डन लेखक व प्रतिसादक. असाच सपोर्ट देत चला. लोल

हेल्मेट न घालता अपघात झाला, आणि माणुस गेला तर विमा कंपणीने त्याचे नावाचे पैसे न देण्याचा निर्णय घ्या.
आपोपा विमा कंपणीच्या नावाने कोणॅए बोलणाअर नाही, आणि हेल्मेट पण घातले जाईन.

माणुस न जाता, काही हात पाय मोडला तरी मेडिक्लेम मिळणार नाही असा हि निर्णय घेण्यात यावा.

म्हणजे ज्यांना हेल्मेट घालायचे नाही, त्यांनी त्या विमा कंपणीकडे जावु नये , त्यांना तशी सक्ती कोणॅए करु नये ही विनंती .

बघा सगळॅ सरळ होतील

चौकटराजा's picture

14 Nov 2014 - 12:26 pm | चौकटराजा

- सर्व जगात हेल्मेटची सक्ती आहे मग भारतात ती केली तर कोठे बिघडले ?. एक खासदार.
आपले कायदे आपण इतर देशांकडे पाहून करायचे नसतात. ते आपल्या परिस्थीतीला साजेसे करायचे असतात. " नो मॅन्स, लॅन्ड मधे कोणत्याही वहानाचा वेग तीव्र असतो. सबब तिथे हेल्मेट सक्ती करणे एकवेळ क्रमप्राप्त आहे.महापालिका ग्रामपंचायती ई च्या हदीतील रस्ते त्यांची रुदी त्यातून अफाट वेगाने वहान चालवले जाण्याची शक्यता याचा विचार झाला पाहिजे. दुसरे असे की चालविणारा व मागे बसलेला या दोघात मागे बसणार्‍याने प्राधान्याने हेल्मेट घालणे
हे सक्तीचे असले पाहिजे.कारण त्याचे स्वरूप हे थर्ड पार्टी इन्शुअरन्स सारखे आहे. हेलेमेट हा एक संरक्षक विमा आहे. तो मी एकटा असताना उतरवायचा की नाही याचे स्वातंत्र्य मला हवे. पण्॑ मागे बसलेल्याने आग्रह धरल्यास चालक म्हणून मी हेलमेट घालणे एकवेळ सक्तीचे असले तरी चालेल. पुणेकरांबाबत हा आक्षेप घेतला जातो की हे अतिशहाणे लोक आहेत. यांचाच फक्त सक्तीला विरोध का ? इंग्रजांचे अनेक देशांवर राज्य होते पण ते खटकले टि़ळकाना, बोसांना व गांधीना म्हणून त्याना आपण अतिशहाणे ठरवायचे का ? उलट अशी शक्यता आपण का गृहित धरत नाही की पुणेकरांचे आंदोलन हे इतर देशातील नागरिकाना प्रेरणा देणारे ठरून तेथील सक्ती नाहीशी होईल. दुसरे असे की मरण फक्त मेंदूला मार बसल्यानेच येते असे काही वैद्यक सांगत नाही. अपघात होताना " मेंदू कोठेय बरे त्याचा पहिला समाचार घेते असे काही नियती म्हणत नाही. मल्टीपल इन्जुरी तून शॉक हे मरणाचे एक कारण असू शकते की नाही ? दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्‍या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे. पुणेकर नागरिक म्हणावे तितके जागरूक नाहीत. कायद्यातील या " सक्ती" ला कायमची हाकलून लावण्यासाठी त्यानी निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांवर दबाव ठेवावयास हवा होता. निवडणुकी संपताच पद्धतशीरपणे हे अस्त्र बाहेर काढण्यात आले आहे. व जो पर्यंत आपण मोटर व्हीकल कायद्यात बदल करण्याचे
यशस्वी आंदोलन करीत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. मधून मधून हे मांजर तुम्हाला आडवे जाणारच . कोणतेही कोर्ट याला स्थगिती वगैरे देण्याची शक्यता नाही कारण हा कायदा आहे वटहुकूम नव्हे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2014 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्‍या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे. सर्वसाधारणपणे जेथे कायद्याचे राज्य आहे तेथे लोक अपघात टाळण्यासाठी जमिनीवर आखलेल्या दुभाजक रेषांनाही योग्य तो मान देतात. तर, इथे जनावरेही उड्या मारून पलिकडे जाऊ शकणार नाही असे रस्तादुभाजक लागतात (आता तसल्या दुभाजकांवरूनही उडी मारणारेही इथे सर्रास दिसतात ही गोष्ट अलाहिदा). यावरून इथे जरा जास्त कडक कायद्यांची आणि तेवढ्याच कडक अंमलबजावणीची गरज आहे असे वाटत नाही का ?

चौकटराजा's picture

14 Nov 2014 - 3:47 pm | चौकटराजा

दुभाजक ओलांडून देखील अभ्य़ंकर वा पेंडसे यांच्या सारख्याना उडवले गेले पण दुभाजक बरेच काम करून जातात. चिंचवड येथील बिग बझार समोर शक्य असताना पादचारी बिनदिक्कतपणे महामार्ग ओलांडून दुचाकी व चारचाकी यांच्या चालकांच्या उरात धडकी भरत असत. आता इथे इतके उंच कुंपण करण्यात आले आहे की पादचारी भुयारी मार्गाचा वापर झक मारीत करतात. आजही दंड करण्यापेक्षा वहातुक पोलिसानी मनात आणल्यास झेब्रा क्रॉसिंगवर लोक गाड्या आणणार नाहीत. पण आपल्याकडे दंड ही एक अर्थव्यवस्था झाली आहे. विशेषत: १५ जानेवारी नंतर ३१ मार्व पर्यंत दंड उद्दीष्ट ठरविण्यात येते. हे एक ओपन सिक्रेट आहे. लोकाना चौकात मार्गदर्शन करण्यात वहातुक पोलिसाना काडी इतका रस नाही.
त्यांना दंडाचे राज्य हवे आहे .मी अनेक पोलिसांशी बोलून पाहिले पण " काय करायचंय ...लोक कधी सुधारणार नाहीत !" असे संवाद होतात.पोलिसाना खरेच इतका हेलमेट या विषयात रस असेल तर ही मोहिम दोन तीन वर्षे त्यानी लावून धरली पाहिजे पण ती मुळातच कायद्याचे भूत नाचवत कोणाच्या तरी " आदेशाने" गाजते आहे. सध्या तरी हेलमेट विक्रीत काही फरक नाही असे विक्रेते म्हणत असले तरी त्यात फरक आजमावला जाईल. ते इप्सित साध्य झाले की पोलिसांच्या उत्साह परत मालवाहू गाड्याकडे वळेल. ये जो पब्लिक है वो सब जानती है ! आपले स्वयंशिस्तीचे स्वप्न भारतातही पुरे होईल. शास्ता तत्र दुर्लभः

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2014 - 2:41 pm | श्रीगुरुजी

सहमत

हेल्मेटसक्ती ऐवजी वाहतूक नियम पाळण्याची, खड्डेविरहीत रस्ते असण्याची, रस्ते पुरेसे रूंद व समपातळीत असण्याची सक्ती हवी.

पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा. दुचाकीचालक आधीच खड्ड्यांमुळे व अरूंद आणि उंचसखल रस्त्यांमुळे त्रासलेले आहेत आणि त्याच्यात आता हेल्मेटसक्तीची भर. बुरे दिन आ गये!

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2014 - 3:08 pm | टवाळ कार्टा

पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा. दुचाकीचालक आधीच खड्ड्यांमुळे व अरूंद आणि उंचसखल रस्त्यांमुळे त्रासलेले आहेत आणि त्याच्यात आता हेल्मेटसक्तीची भर. बुरे दिन आ गये!

समजा असे झालेच...तरी पुणे तर मग पुणेकर दुचाकी (की "गाडी"??) नियमांनुसार चालवायला सुरु करतील?? :)

अजया's picture

15 Nov 2014 - 4:38 pm | अजया

:)

हुकुमीएक्का's picture

15 Nov 2014 - 9:43 pm | हुकुमीएक्का

पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा.

श्रीगुरुजी यांच्या या प्रतिसादाला +१ *good*

पुणेकर हे पुणेकर आहेत. त्याना फक्त त्यानीच स्वयंप्रेरणेने लागुकेलेले नियमच लागु होतात.
उदा: सवाईला वडापाव खायचा असतो , दगडूशेठ हे हलवायाचे नाव नसून गणपतीचे नाव आहे.

hitesh's picture

14 Nov 2014 - 2:35 pm | hitesh

दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे

......

:)

तुमचे निरिक्षण म्हणजे नेमके कोणते निरिक्षण ? अआणि त्याच्यावर विसंबुन कायदा बदलायचा ?

चौकटराजा's picture

14 Nov 2014 - 3:58 pm | चौकटराजा

चिंचवड ते शिवाजीनगर या मार्गावर बसने मी २२ वर्षे प्रवास केला आहे. त्या मार्गाची अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. दुभाजक नव्हते तेंव्हा जवळ जवळ रोज एक दुचाकीवाला सापडत असे अपघातात. आता ते प्रमाण नगण्य आहे. या रत्यावरून वहान चालवणे हा एक आनंद झालेला आहे. अपघाताची तीन मूल कारणे अशी त्यावर डोकटरेट केलेल्या दं सिं, पसरेचा यानी सांगितली आहेत.
एस टी ओ म्हणजे स्पीड , टर्न व ओव्हरटेक. स्पीडब्रेकर ( नीट केलेले), टर्न इंडीकेटर्स व दुभाजक या तीन साधनानी अपघाताचे प्रमाण कमी झालेले आहे. आमच्या निरिक्षणावर विसंबून कायदा करावा असा दुराग्रह आमचा नाही.

hitesh's picture

15 Nov 2014 - 11:47 am | hitesh

आमच्या एमबी बी एस च्या पुस्तकातही अपघात कारणे प्रतिबंध इ बाबत चार गोष्टी दिल्या आहेत. अपघात टाळायला चार उपाययोजना कराव्या लागतात.

१. एनविरॉनमेंट ... इथे या शब्दात रस्ते वगैरे गोष्टी येतात.
२. टेक्नॉलॉजी ... म्हणजे वाहन सुस्थितीत असणे वगैरे
३. पर्सनल प्रॉटेक्शन डिवाइस .. बेल्ट , हेल्मेट इ
४. लिगल कंट्रोल .... कायदे इ

या चारही गोष्टी वेगवेगळ्या फ्याक्टरकडुन केल्या जातात.. त्या एकमेकांवर अवलंबुन ठेउन करायच्या नसतात.

म्हणजे सरकार रस्ते करत नाही व टाटा मोटर टायरची क्वालिटी बदलत नाही , तर ते लोक त्यांचे काम करत नाहीत म्हणुन मीही माझे काम करणार नाही , हे हेल्मेट न वापरण्याचे कारण होऊ शकत नाही.

डिवायडर वगैरे क्र १ मध्ये सुधारणा केल्याने आले हे लक्षात आले असेलच.. म्हणजे सरकार या घटकाने काहीतरी सकारात्मक काम केले हेच तुम्ही मान्य करताय ना ? मग तुमची ड्युटी क्र. ३ ला विरोध का ?

चौकटराजा's picture

16 Nov 2014 - 4:22 pm | चौकटराजा

अनेकांचा हेलमेट ला विरोध नाहीच . ते वापरायचे कधी याचे स्वातंत्र्य चालकाला असले पाहिजे. आता एक उदाहरण वेगळे देतो.ते " निरोध " वापरण्याचे. निरोध वापरा म्हणजे एडस होण्यास प्रतिबंध होईल असा प्रचार सरकार करू शकते ते वापरण्याची सक्ती करू शकत नाही. कायद्याने अशा कित्येक गोष्टी सक्तीने करता येणारच नाहीत. उदा विमा उतरवणे हे कायद्याने बंधनकारक करता येणार नाही. आयुर्विम्याला पर्याय नाही अशी जाहिरात करता येईल. गायी extinct झाल्या तरच गोवध बम्दी करता येईल . माझ्या हेलमेट घालण्याने माझे रक्षण होणे महत्वाचे नाही ते माझ्या मागे बसलेल्या " दुसर्‍या" चे रक्षण करू शकते की नाही हे महत्वाचे. यासाठी तर एस टी च्या ड्रायव्हरची मद्य चाचणी घाट सुरू होताना करतात. प्रवाशांची नाही. थोड्क्यात आतला मेंदू त्याची प्रवृती बदलण्याची ताकद हेल्मेट मधे नाही. ती फारशी कायद्यातही नसते ती संस्कारातच असते. माझी एक खात्री आहे की एरवी हेल्मेट टाळणारे हायवे वर बर्‍याच वेळा हेल्मेट वापरीत असतील.