प्रत्येक वर्षी नोव्हे-डिसे मध्ये महाराष्ट्रा बाहेर फिरायला जायचे असे ठरवले होते, पण काही कारणाने या काळात जाता न आल्याने वाईट वाटले. आणि मग त्याची कसर भरुन काढण्यासाठी उन्हाळ्यात कोठे फिरायला गेले पाहिजे याची लिस्ट काढणे सुरु झाले. काश्मीर की हिमाचल या २ ठिकाणांपर्यंत फायनल झाले. पण नक्की कोठे जायचे ते काही फायनल होईना. सरते शेवटी हिमाचल (शिमला.. कुल्लू..मनाली) ला जाण्याचे ठरवले. पुन्हा उन्हाळ्यात जायचे म्हणजे, मुलांच्या (दूसर्यांच्या) परीक्षा संपलेल्या, लग्न झालेली उत्साही मंडलींची गर्दी हे टाळलेच पाहिजे असे वाटले. त्यामुळे प्लॅन थोडा आधी करावा असे वाटले. उगाच नाहीतर निसर्गाच्या कुशीत जायचे म्हणायचे आणि माणसांच्या गर्दीत चाचपडत फिरायचे..
जानेवारी-फेबुर्वारीत खुप बर्फ असल्याने रस्ता ब्लॉक असु शकतो म्हणुन ते हि महिने बाजुला पडले. आत हिमाचल ला जायचे तर बर्फ पाहिजेच (नशिबाने स्नो फॉल पण अनुभवता आला त्याबद्दल आनंद आहेच), नाहीतर फक्त डोंगरकडा फिरायला सह्याद्रीची साथ कायमची ठरलेलीच असते.
म्हणुन मग, मार्च चा दूसरा आठवडा फिक्स केला. दूसरा आठवडा मला फार प्रिय आहे, कारण सगळी बिले चुकती झालेली असतात, आणि महिन्या अखेरीस येणार्या स्थीतीची जस्ट सुरुवात झालेली असते, एकंदरीत प्रवासात..निसर्गात मनसोक्त पणे हुंदडता येते.
तरीही माझ्या वयक्तिक म्हणण्याने फेब - मार्च मनाली फिरण्यासाठी चांगला महिना आहे, त्यात तुम्हाला पॅराग्लायडिंग, राफ्टींग, स्कीईंग आण इतर अॅडवेंचर गोष्टी पण मस्त अनुभवता येतात. चिल्ड वातावरण पण नाही, बर्फ पण आहे, आणि रस्ते ही ब्लॉक नाहीत.
या वेळेस, मागील केरळा ट्रीप प्रमाणे पॅकेज ने न जाता, स्वता:च सगळ्या गोष्टी मॅनेज करुन जायचे, एक अनुभव असा ही घ्यायचाच असे ठरल्यामुळे थोडी धाक धुक होती, परंतु द्रायव्हर चांगला मिळाल्याने पहिली चिंता निघुन गेली.
१० मार्चला चंदिगड वरुन आम्ही शिमल्याला पोहचलो, ७८ किमी अंतराला ४-५ तास लागले, आणि पुण्या-मुंबई च्या अंदाजाने येव्हद्या अंतराला १ -२ लागतील असे वाटले होते, त्यामुळे पुढील वेळापत्राकावर पण परिनाम होणार होताच, पण येतानाचे सलग २ दिवसांचे बुकींग काढुन ठेवले होते, काही वेळ लागला, किंवा आनखिन फिरावेशे वाटले तर एक तरी दिवस अजुन असावा या करता. त्यामुळे बायको पुढे उगाच माझे प्लॅनिंग कसे ग्रेट असते असे मिरवायला पुन्हा मिळाले. पण मागिल सगळ्या ट्रीप प्रमाणे यावेळेस फक्त निसर्गाचे फोटो काढण्यास मला मनाई करण्यात आली, नाही तर मागील कुठल्याही ट्रीपचे फोटो काढले दाखवायाला तर फक्त निसर्ग आणि आम्ही कुठेतरी एखाद दुसर्या फोटोत.
तसेही मला फोटो घरी आल्यावर कोणाला दाखवायला आवडत नाही, पण बायकांना त्याची फार हाउस असते, त्यात आमचे मागच्या ट्रीपची समुद्रावरचे फोटो सुद्धा आमच्या सासर कडच्या मंडळींनी पाहिल्याने, यावेळेस बर्फात गेलो तरी निदान कपडे चांगले व्यव्स्थीत घातले पाहिजे, उगाच बॉडी शॉडी चे प्रदर्शन नको.
एच.पी.डी.सी चे Peter Hoff हॉटेल मी बुक केले होते, इअतरांच्या सल्ल्याने मॉल रोड जवळील हॉटेल न घेता मुद्दाम लामचे हॉटेल घेतले होते, आणि हॉटेल पहाताच प्रवासा थकवा निघुन गेला. गव्हर्नर हाऊस का होते हे ठिकाण हे लक्षात आले.
हॉटेल च्या गार्ड्न मध्ये :
घरी ९ वाजले तरी बळेच उठवायला लागणारा मी, बाहेर फिरायला गेलो की पहाटे ५ ला उठुन बसतो. त्यामुळे प्रवासाची कीतीही दगदग झाली असली तरी दूसर्या दिवशी ७ वाजताच आम्ही नाश्टा करुन ७:३० ला बाहेर पडलो . त्यामुळे संपुर्ण शिमला पाहण्यास त्यामानाने कमी वेळ लागला. बर्याच जनांच्या सांगण्यावरुन फक्त कुल्लू-मनाली च जा, तेच चांगले आहे, शिमल्याला काही नाही, कुफरी ला पण काही विशेष नाही असेच सांगितले होते, पण तरीही मी शिमल्याला गेलो होतो कारण इतरांना न आवडलेले साधेसे निसर्ग सौद्र्य ही आपल्या मनाला आवडु शकते असा माझा अनुभव आहे.
शिमला, त्या छोट्या छोट्या गल्ल्या, नुकताच वितळलेला पण रस्त्याच्या कडेला थोडाशे आपले अस्तित्व टिकवुन असलेला बर्फ अतिशय सुंदर वाटले शिमला मला. त्यात तेथील सगळी लोकल माण्से पायीच ऑफिस ला जातात, बस कमी, रिक्शा नाही. त्यामुळे एकही जाड व्यक्ती तेथे मला दिसली नाही.
@ ग्रीन व्हॅली ( गदर चे शुटींग झालेले ठिकाण)
हवामान तर काय शुभ्र - धुळीचा एक कण ही नाही, क्षितिजापर्यंत स्पष्ट दिसणारे आकाश. आहाहा..
नंतर आम्ही कुफ्री ला गेलो, घोड्याने ३०-४५ मिनिटे लागली वरती पोहचायला. आणि पहिल्यांदा आम्हाला बर्फात येथेच्छ फिरता आले, त्यात सर्व अॅडवेचर अॅक्टीवीटी पण केल्या.
जाकु टेंपल ला पण भेट दिली, तरी घड्याळाचा काटा फक्त ३ च वाजले आहेत हेच दाखवत होता. मग आम्ही मॉल रोड वर चक्कर मारायला गेलो, काही घेणार नव्हतो पण सर्व निवांत फिरुन वेळ राहिला होता त्यामुळे गेलो, काही घेण्यापेक्षा खाण्यातच आम्ही जास्त रममान होतो.
दूसर्या दिवशी ही सकाळी लवकर उठुन आमचा प्रवास कुल्लू-मनाली कडे सुरु झाला.. सुंदर पर्वत रांगा, छोटेशी तळी, सतलज नदी असे पार करुन आम्ही सुंदर अश्या beas नदी किनारी कुल्लू ला थांबलो.
सतलज नदी
व्हाईट वाटर राफ्टींग ते ही वर्फाच्या या चिल्ड वाटर मध्ये आणि लेवल २ ग्रेड यांमुळे मन अगदी रोमांचित झाले होते. क्रिश जिथे फिश पकडतो, त्या ठिकाणीच आम्ही ९ किमी चे राफ्टींग केले.
कुल्लू ला जायचे आणि राफ्टींग करायचे नाही तर तुम्ही कुल्लू ला जावुन काहीच उपयोग नाही असे माझे मत आहे.
कुल्लु - बियास नदी
आम्ही राफ्टींग दोघांनीच केले पण आधी निघाल्याला गृपचे फोटो.
ह्या गृप चे राफ्टींग पाहुनच येथील राफ्टींग आपल्या कोलाड च्या राफ्टींग सारखे साधे -सरळ नाही हे कळाले, आणि नंतर पाण्यात हात घातला तर पाणी बर्फा पेक्षा ही चिल्ड, बोटे सुद्धा पुन्हा सरळ होत नव्हती. ते पाणे अंगावर पडल्यावर कीती मज्जा येणार असे म्हणुन आम्ही राफ्टींगला सुरुवात केली
त्यानंतर मनाली फक्त ४० कीमी वर होती. आणि आमच्याकडे आनखिन २ दिवस होते. तरीही ड्रायवर च्या म्हणण्याने आणि आम्हाला लागणार्या प्रवासाच्या वेळेनुसार आम्ही शेवटी १ दिवस आनखिन वाढवलाच. आणि ड्रायवर ने सांगितले की पेपर ला आले आहे, की १४ तारखेला सोलांग ला स्नो फॉल होणार आहे, त्यामुळे आम्ही आमचे सर्व प्लॅनिंग चेंज केले , १३ ला सोलांग ला जाण्या ऐवजी आम्ही एक दिवस उशिरा जाण्याचे ठरवले.
मनाली अतिशय प्रसन्न ठिकाण आहे, त्यातच मनाली पासुन थोडे लांब पण तिन्ही बाजुने बर्फांच्या सुंदर पर्वत रांगा आणि त्यांच्या कुशीत हॉटेल आणि खिडकितुन दिसणारा जबरदस्त निसर्ग, खुपच जबरदस्त अनुभव, होटेल ही नावाला सार्थ करणारे होतेच - Snow Peaks - “Nestled in Apple Orchards & Snow Peaks, away from hustle- bustle!: . पुन्हा माझे प्लॅनिंग, मि निवडलेली होटेल्स कीती मस्त आहेत ना असा एक आपलाच फुशारकीचा उदोउदो करुन झाला.
हॉटेलमधुन
नागर या ठिकाणावरुन
वाटेवरती
मनाली शहर, सफेदाची झाडे ( बहुतेक त्यालाच चेरी म्हणतो आपण), मोहरीची शेते, मनु मंदिर, हिडिंबा मंदिर, गरम पाण्याचा झरा, ३० किमी वर असलेले नागर, मलालीतील दूसरी एक नदी आणि क्लब होउस अशी नानाविध ठिकाणे आम्ही आज पाहुन घेतली, सकाळी लवकर उठुन ७:३० लाच बाहेर पडले की ४ पर्यंत सर्व निटसे सावकाश आनंद घेवुन पाहता येते.
मनु टेंपल जवळील गरम पाण्याचा झरा
रोहतांग पास ला ३० फुट बर्फ साचला होता असे कळाले, आणि त्या दिवशी ही तेथे वरती स्नोफॉल झाला असे कळाले.
पण मी मात्र उद्या स्नो फॉल होउदे म्हणुन मनोमन प्रार्थना करत होतो.
दूसर्या दिवशी पहाटेच मी पहाटेच ५ ला उठलो. बायकोची सकाळी सकाळी येणारी तीच वाक्य ऐकली. सगळे निवांत फिरायला .. आराम करायला येतात, आणि तुम्ही ५ लाच उठुन बसता. खिडकितुन दिसणारा नजारा ही मनमोहक होता, थोडे फोटो काढत होतो, आणि काय , सगळे ढग जमा झाले , एका मिनिटात सगळीकडे धगांचेच अस्तित्व नित्मान झाले, आणि चक्क पाउस पडायला लागला. मनालीत पाउस म्हणजे सोलांग- रोहतांग ला स्नो फॉल नक्की.
ढग आल्या नंतर
पटकण फोटो काढुन घेतले, आणि ७ लाच आवरुन बाहेर पडलो. कारण सोलांग ला ही आम्ही जाण्या अगोदर बर्फ पडला तर गाडी वरती पोहचु शकली नसती. आण रस्त्यावरुन ही निटसे जाता आले असते का नसते माहीत नाही.
त्यामुळे सोलांग ला बेस ला ८:४५ ला आम्ही पोहचलो, बर्फ वृष्टी सुरु झाली होती, आणि मग गाडी तेथेच सोडुन , एका गाईड च्या मतदीने पुर्न व्हॅली चडुन आणि नंतर चालत उतरुन येण्याचा निर्णय घेतला.
गाडी येथेच सोडुन दिली, कारण ९ वाजता ही सर्व गाड्या वरुन माघारी येत होत्या, वरती खुप स्नो फॉल चालु होता
पांढरा शुभ्र बर्फ.. सुंदर ब्रिज,.. आणि बर्फाच्या वाटेवरुन आम्ही चालण्यास सुरुवात केली. वरती पोहचलेली मंडळी खाली जाण्याच्या मार्गावरती होती, कारण प्रमाणापेक्षा जास्त स्नोफॉल सुरु होता.
नंतर तर फक्त १०-१२ लोक वरती होते, नेहमी ओसंडुन वाहणारे हे ठिकाण आज, १० नंतर खुप बर्फवृष्टी झाल्याने बर्याच जनांना येथे पोहचता आले नव्हते आणि आले तरी लगेच जावे लागले होते. आणि आम्हाला चालत जायचे असल्याने आम्ही कशाची ही काळजी करत नव्हतो.
स्नो फॉल मध्ये
शेवटी उरलेलो आम्ही काही जण
स्कीईंग , आणि इतर स्पोर्ट्चा येथ्थेच्च आनंद येथे घेता आला.माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीत दिवस .. स्नो फोल दुपार नंतर थांबला, इतका सुंडर फ्रेश बर्फ तर मी कधी पाहिलाच नव्हता, आणि त्यात गाईडने आम्हाला जाता येता नेहमीच्या रस्त्याने अन आणता दरी खोर्यातुन वेगळ्याच रस्त्याने आनल्याने मज्जा आनखिनच वाढली. आणि बायको समोर कीतीही मी फुशारक्या मारल्या तरी उपोयोग नव्हता, कारण खाली येताना कितीदा मी घसरुन पडलो बर्फावरुन पण आमची हि मात्र तिथलीच राहणारी असल्या प्रमाणे चालत होती आणि एकदा हे न पडता आपण कीती योग्य आहोत अश्या प्रवासाला हि ते दाखवुन देत होती,
परत येताना
शेवटी आम्ही गाडी पाशी पोहचलो. आणि आनखिन एक दिवस आहे या आनंदात हॉटेल वरती पोहचलो.
दूसर्या दिवशी तेथील फोटो कालच्या स्नो फॉल नंतर
---------------------------------------------------------------------------------------
भटकंती ११ : तुंग:http://misalpav.com/node/22303
भटकंती ८-९-१०: रोहिडा-लोहगड-बेडसे.
भटकंती ७: राजगड...स्वराज्याचा शिल्पकार : http://www.misalpav.com/node/20849
भटकंती ६ - कार्ला लेणी.
भटकंती ५ - किल्ले पुरंदर : http://www.misalpav.com/node/20592
भटकंती ४ - केरळ : http://www.misalpav.com/node/20316
भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323
प्रतिक्रिया
11 Nov 2014 - 6:09 pm | प्रचेतस
मस्त रे गणेशा.
अफाट सुंदर फोटो आणि सुरेख वर्णन.
एकदम शुभ्र शुभ्र..
येत जा आता इथे नेहमी.
11 Nov 2014 - 6:12 pm | यशोधरा
आह्हा! हिमालय!
11 Nov 2014 - 6:20 pm | बॅटमॅन
अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः|
पूर्वापरौ तोयनिधिं विगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः ||
पारणे फिटले.
11 Nov 2014 - 6:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ! बर्फच बर्फ म्हणजे मजाच मजा... चालायला, घसरायला आणि पडायलासुद्धा ;) +D
फोटो बघूनच लै मजा आली !
11 Nov 2014 - 7:18 pm | विलासराव
मी धरमशालाला जाउनही इ़कडे गेलो नव्हतो. तुमचे फोटो पाहुन असे वाटते जायला हवे होते.
मस्त!!!!!
11 Nov 2014 - 8:50 pm | किल्लेदार
सूपरर्र डूपरर्र …… मजा आली
11 Nov 2014 - 9:22 pm | सुबोध खरे
आपण किती क्षुद्र आहोत हे हिमालयात गेल्यावरच लक्षात येते ( किंवा सरकारी ऑफिसात). त्याची भव्यता प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही. फोटो उत्तम आहेत.
12 Nov 2014 - 5:39 pm | सरल मान
:lol:
11 Nov 2014 - 9:42 pm | बहुगुणी
छान ट्रिप झालेली दिसते आहे.
11 Nov 2014 - 10:50 pm | केदार-मिसळपाव
काय सुरेख फोटो आलेत.
एकदम प्रसन्न वाटले.#
बाकी रोहतांग ला चालत जाण्याचा निर्णय मात्र धाडसीच.
तुम्ही नक्की विचार करुनच घेतला असणार.
12 Nov 2014 - 1:12 am | संजय क्षीरसागर
त्यात असा सेन्स ऑफ ह्युमर :
सॉलिड मजा आली! धन्यवाद.
12 Nov 2014 - 1:28 am | खटपट्या
सर्व फोटो मस्त आले आहेत.
12 Nov 2014 - 3:55 am | मुक्त विहारि
सगळ्यांना फोटो दिसत आहेत...
मग मलाच का दिसत नाही आहेत?
12 Nov 2014 - 4:23 am | स्पंदना
गणेशाच्या लेखावर तुमचा गणेशा झालाय.
:))))
12 Nov 2014 - 4:45 am | मुक्त विहारि
पण म्हटले नकोच... त्यांचा आणि आमचा परीचय नाही.उगाच फालतू प्रतिसाद नको द्यायला.
12 Nov 2014 - 4:49 am | स्पंदना
मुवि? तुमाला अन कंदीपासून परिचय लागायला लागला बस लागल्यागत?
अवो न्हाय न्हाय ती मानस (मंजे वळख नसताना करुन घेत) कट्ट्याला पचवुन वर ढेकर बी देत नाय तुमी आन म्हन परिचय...
12 Nov 2014 - 7:42 am | टवाळ कार्टा
=))
12 Nov 2014 - 4:24 am | स्पंदना
किती सुंदर आहे हिमालय आपला ना?
बाकी ते कुलु ला तुम्ही कुल्लु का म्हणताय?
12 Nov 2014 - 10:50 am | दिपक.कुवेत
खटकत आहेत....जसे सुंडर, आनखीन, हाउस (हौस), लामचे (लांबचे)....सध्या ईतकेच.
बाकि फोटो मात्र जब्राट आहेत. डिसेंबरची आतुरतेने वाट बघतोय.....
12 Nov 2014 - 11:30 am | गणेशा
कारण तेथील लोक कुलू असे न म्हणता कुल्लू असेच म्हणत होते.
बहुतेक त्यांचय बर्याच शब्दांना ते असेच बोलतात, चाबी ला चाब्बी. सफेदा ला सफेददा ...
12 Nov 2014 - 11:33 am | स्पंदना
अच्छा!! ठासून बोलत असतील म्हणुन तसे असेल.
12 Nov 2014 - 8:02 am | एस
हा लेख बोर्डावर आल्याआल्या पाहिला तेव्हा माझापण गणेशा झाला होता. आता सगळे फोटू नीट दिसताहेत. छानच!
12 Nov 2014 - 9:02 am | श्रीरंग_जोशी
सहल करावी तर अशी...
लेखनशैली नेहमीप्रमाणेच उत्तम. फटु छान आले आहेत.
12 Nov 2014 - 10:07 am | अत्रुप्त आत्मा
वाह्ह!!
12 Nov 2014 - 10:55 am | स्पा
वा गणेशा
तुफान मजा केलेली दिसतेय
फोटो भारीच
12 Nov 2014 - 10:57 am | दिपक.कुवेत
ते : १२ नंतर हवे ना? म्हणजे असं...ही वाट भटकंतीची १२: हिमाचल. कारण मग वाचणार्याचा गोंधळ उडतोय. असं वाटतय कि अरेच्च्या हिमाचलचे आधी ११ भाग येउन गेलेत आणि आपण ते वाचलेच नाहित का?
12 Nov 2014 - 11:17 am | गणेशा
सर्वांचे मनपुर्वक आभार.
खुप वर्षांनी मिपा वर पुन्हा आल्याने छान वाटले.
मुवि , ओळखिचे काय घेवुन बसलायस.
शुद्धलेखनाच्या चुका मात्र पदरात नाहितर शर्टात घ्या. शुद्धलेखन करायला सांगितल्यावर, सुरुवातीला 'शुद्धलेखन' या शब्दामध्येच चुक करणारा मी पुढचे काय सांगायचे.
काही सुंदर वगैरे शब्द चुकले असतील तर ते टाईप मिस्टेक आहे, बर्याच दिवसानी लिहितो आहे. हौस असे लिहु शकलो असतो पण लक्षात आले नाही.
मराठी मिडियम असुन काही फायदा नाय माझा वाटते.
आता पुन्हा शुद्धलेखनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करेन.
12 Nov 2014 - 1:39 pm | प्रचेतस
नविन कविता पण येऊ देत रे आता.
मिपावरचे माझे फेवरीट कवी दोनच.
एक तू आणि दुसरे अआ.
12 Nov 2014 - 3:12 pm | टवाळ कार्टा
>>दुसरे अआ.
मिपाकंपू म्हणजे हेच काय ते ?? =))
12 Nov 2014 - 3:24 pm | प्रचेतस
छे छे.
तुम्ही पण आमचे फेवरीट कवी होऊ शकता मात्र त्यासाठी तुम्हाला त्यांच्यासारख्या सुरेख कविता लिहिता यायला हव्यात.
12 Nov 2014 - 3:33 pm | टवाळ कार्टा
माज्याकडं ताम्ब्या नाय वो ;)
12 Nov 2014 - 3:39 pm | प्रचेतस
म्हणून काय झाले?
कवीचे महानपण त्याच्या तांब्याने ठरत नाही.
एमिली ब्रॉन्टी कशी एकच कादंबरी लिहूनही अभिजात लेखिका म्हणून गणली गेली तसे तुम्हीही एकच कविता पाडूनही आमचे फेवरिट म्हणून गणले जाऊ शकाल.
12 Nov 2014 - 5:46 pm | बॅटमॅन
कविता स्वतः न पाडता तिची फक्त मोडतोड करून इतरांना दाही दिश्या मोकलाया लावणारे कवी विसरल क?
12 Nov 2014 - 2:49 pm | झकासराव
वाह !!!!
12 Nov 2014 - 4:42 pm | नाखु
थंडगार धागा.
(जळावू राजकारण धागे/पकावू चर्चा/गुर्हाळी प्रतीसाद)
यांच्या अतिमार्यासमोर ह्या सुखद धाग्याने थंड$$$$$$$$$$$गार वाटले.