गाभा:
आपल्या देशातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही याची माहीती सरकारला झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या दुर्गम भागातील एक लाख शाळांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय स्वागतार्ह असला तरी देशातल्या शाळांची दयनीय परिस्थिती समजायला २००८ साल उजाडावे लागले ही शोकांतिका आहे.पिण्याच्या पाण्यासोबतच फळा,मैदाने.स्वच्छताग्रुहे,यांचीही बिकट अवस्था शाळांमध्ये आहे.याची जाणीवही सरकारला व्हावी.असो, देशभरात राबविल्या जाणार्या या योजनेमुळे आदीवासीबहुल जिल्हे,मराठवाडा,विदर्भातील दूरच्या वाड्या-वस्त्यांवर भरणार्या शाळांना तसेच हिमालयाच्या कुशीत असणारी राज्ये यांना फायदा घेता ये़ता येईल हे मात्र निश्चित..!
प्रतिक्रिया
1 Nov 2008 - 2:20 pm | सुक्या
मला नाही वाटत शाळांना पानी मिळेल. हां नेते, भ्रष्ट अधीकारी अन काही ठेकेदार यांना काही पैसे जरुर मिळतील. ही योजनाच मुळी हा फायदा डोळ्यासमोर ठेउन मंजुर केली गेली असावी. शाळांमध्ये पिण्याचे पाणी कसे देणार ? नळाने देनार तर त्यासाठी नळ पानीपुरवठा योजना असायला हवी. कुपनलीका खोदनार तर ते पानी पिण्यायोग्य राहील याची शश्वती काय? जिथे रोजच्या पाण्यासाठी लोकांना वन वन भटकावे लागते तिथे शाळेच्या पाण्याची कोण चिंता करतो. सकस आहार योजनेचे झालेले फायदे माहीत नाहीत पन शि़क्षक लोक पाककलेत मात्र निष्णात झालेत. शिकवण्याचे सोडुन हातात दाळतांदुळ घेउन त्यांना खिचडी बनवावी लागते. आता या पाणी योजने नंतर गावचा शि़क्षक डोक्यावर हंडा घेउन पानी शोधताना दिसला तर कुनाला नवल वाटायला नको.
ज्ञानदानाचे पवित्र काम करनार शि़क्षक बिगार्यासारखा राबताना मी खुप जवळुन पाहीला आहे. मतदार याद्या, आर्थिक सर्वेक्षण, कुपोषीत बालकांचे पालकत्व, शालेय पोषण आहार, सर्वशिक्षा अभियान .. हे ना ते .. शि़क्षक शिकवायचं विसरला हो. हे शाळांमध्ये पानी देण्यापेक्षा सरकार ने दर्जा सुधारण्यासाठी काही केले तर जरा बरे होइल. कित्येक शाळांना इमारत नाही, पुरेसे शि़क्षक नाहीत, शाळेत शिकवण्यासाठी साधने नाहीत. या गोष्टी अधी पुरवा. पाण्याच्या टाक्या बांधुन काहीही साध्य होणार नाहे. सर्व पैसा असाच वाया जाइल. कित्येक शाळांच्या गळ्क्या टाक्या अन त्यातले घाण पानी मी पाहीले आहे. आनी हो नियमानुसार पाण्याची टाकी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही त्या शाळेची असते. म्हणजे एक तर विद्यार्थी ती साफ करतील किवा शि़क्षक.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
1 Nov 2008 - 7:16 pm | mina
ज्ञानदानाचे पवित्र काम करनार शि़क्षक बिगार्यासारखा राबताना मी खुप जवळुन पाहीला आहे. मतदार याद्या, आर्थिक सर्वेक्षण, कुपोषीत बालकांचे पालकत्व, शालेय पोषण आहार, सर्वशिक्षा अभियान .. हे ना ते .. शि़क्षक शिकवायचं विसरला हो. हे शाळांमध्ये पानी देण्यापेक्षा सरकार ने दर्जा सुधारण्यासाठी काही केले तर जरा बरे होइल. कित्येक शाळांना इमारत नाही, पुरेसे शि़क्षक नाहीत, शाळेत शिकवण्यासाठी साधने नाहीत. या गोष्टी अधी पुरवा. पाण्याच्या टाक्या बांधुन काहीही साध्य होणार नाहे. सर्व पैसा असाच वाया जाइल. कित्येक शाळांच्या गळ्क्या टाक्या अन त्यातले घाण पानी मी पाहीले आहे. आनी हो नियमानुसार पाण्याची टाकी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही त्या शाळेची असते. म्हणजे एक तर विद्यार्थी ती साफ करतील किवा शि़क्षक.
सर्वासर्वी मान्य..आजची परिस्थिती हीच आहे.
1 Nov 2008 - 3:45 pm | सुधारक
पण मुलांना शिक्षण मिळेल कां? मुलांना शाळेत कां पाठविले जाते हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे.