निमीत्त एका सणाचे

कोदरकर's picture
कोदरकर in काथ्याकूट
1 Nov 2008 - 5:22 am
गाभा: 

हॅलोवीन च्या निमीत्ताने बरीच छोटी मंडळी माझ्याकडुन चॉकलेट घेवून गेली. विशेष म्हणजे बहुतांश भारतीय वंशाचे होते. सण भुतांचा असूनही...
आपल्या राज्यात छट पुजेच्या भोवती जमा झालेला धुराळा हे आपले दुर्देव नाही का?

प्रतिक्रिया

वेताळ's picture

1 Nov 2008 - 11:21 am | वेताळ

इथे काय चालु आहे अन तुम्ही कशाबद्दल बोलताय हेच कळत नाही.तुम्ही बहुतेक अमेरिकेत रहात आहात. हॅलोवीन हा अमेरिकेतील सण आहे.अन तुम्ही तो उत्साहने साजरा करता ही खुपच छान गोष्ट आहे. जर उद्या तुम्ही दिपावली अमेरिकेत साजरी करताना सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडायला सुरुवात केली. रस्त्यावर स्पिकर लावुन धिंगाणा घालायला सुरुवात केली.मोठ्मोठी पोस्टर रस्त्यावर लावायला सुरुवात केली. मुळ अमेरिकेतील नागरिकांवर दादागिरी करु लागलात तर काय होईल?
हेच बिहारी इथे महाराष्ट्रात करु लागले आहेत त्याला इथे विरोध आहे.
वेताळ

सुक्या's picture

1 Nov 2008 - 11:22 am | सुक्या

सण हा सण असावा .. त्यात राजकीय तमाशा नको. आपल्या राज्यात इतरही बरेच सण साजरे होतात .. त्याचा असा राडा होत नाही.
पोंगल, उगादी, दुर्गापुजा .. साजरे होताच की. कधी काही ऐकायला आलं? छट्पुजा कशी आली? १० वर्षापुर्वी कुनी करत होतं का ही छट्पुजा ?

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

दत्ता काळे's picture

1 Nov 2008 - 12:27 pm | दत्ता काळे

मा. श्री. कोटरकर साहेब ह्यांना भारतीय (वंशाच्या ) परंपरेनुसार नमस्कार,

माफ करा, पण आपल्या दोन वाक्यांतील म्हणणे माझ्या लक्षात आले नाहीत.
१. सण भुतांचा असल्याने चॉकलेट नेऊ नये - असे असेल तर, ते कां ? आणि कुठ्ल्या वंशाच्या परंपरेनुसार असे करणे चुकीचे आहे ? - कारण भारतीय वंशाच्या परंपरेत 'चॉकलेट' अपारंपारिक पदार्थ असावा.
२. धुराळा म्हणजे कुठ्ला धुराळा ?
३. आपल्या म्हणण्यानुसार (ह्या विषयाला अनुसरुन असलेले )दुर्देव - म्हणजे नक्की काय ?

हे नेमके कळले नाही तर, आपले म्हणणे नक्की काय आहे हेही कळत नाही.
जोपर्यंत म्हणणे नक्की काय आहे कळत नाही, तो पर्यत ढेकरच येणार नाही, मग मन अस्वस्थ. . . .

कोदरकर's picture

1 Nov 2008 - 9:02 pm | कोदरकर

खालील गोष्टींचा विचार व्हावा
१) आपण जिथे राहतो तेथील रिवाज आपणाला समजुन घेता आला पाहीजे
२) गुजराती 'गरबा' आपण स्वीकारला,त्यात राजकारण नव्हते. 'छट पुजा' निमीत्ताने येणारे राजकारण आपल्याला घातक आहे
३) 'छट पुजा' समान एखादा मराठी सण आहे का? त्यात मराठीपण यावे असा प्रयत्न कधी झाला का?
४) आपले सण राजकारण विरहीत साजरे होऊ शकतील का? सणात राजकारण हे दुर्देव

आमचा ह. मु. टोरंटो मध्ये आहे.
धुराळा म्हणजे मुंबई मध्ये 'छट पुजा' राजकारण
हॅलोवीन मधील भारतीय उत्साह वाखाणण्यासारखा आहे.