पुण्याचे उणे

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
28 Oct 2014 - 10:22 am
गाभा: 

(श्रीरंग जोशी यांनी चेपुवरील एक ढकल संदेश खफवर टाकला आहे पुण्याची महती सांगणारा ! त्यावरुन थोडे चिन्तन घडले, त्यातून हे मुक्तक प्रसवले आहे.)
पुण्याची मुम्बई झाली आहे हो ! छाती फुटेस्तोर पळावे लागते आज काल पुण्यात देखील!
आय टी वाल्यांनी वाट लावली आहे पुण्याची ! हिन्जवडी आणि हडपसर या दोनी दिशांना २४ तासाचा जाम करुन ठेवला आहे. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. इतके की, आता त्यांना देखील ते परवडेनासे झाले आहेत. मला व्यक्तिशः सकाळ संध्याकाळ दिड तास-दिड तास प्रवास करावा लागतो. आणि विकेण्डला देखील मुंबै च्या लोकांनी पुणे जाम करुन ठेवले आहे.
पुणे हे मुंबई नसल्याने हा असला भार पुण्याला पेलवत नाही. सार्वजनिक वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. लोकल ची सोय कधीच नव्हती आणि पी एम टी चालण्यापेक्षा त्या विषयावर वारेमाप बोलण्यासाठी अधिक प्रसिद्ध !
जुने कोथरुड आणि सिंहगड रस्ता भागातील सोसायटयातील अरुन्द रस्ते फक्त सायकली आणि स्कूटरी जाण्याच्या लायकिचे ! तिथे हल्ली मर्सिदेस आणि बीएमडब्ल्यु सारख्या अजस्त्र गाड्या पार्क करुन ठेवतात. पार्किगची पुण्यात महाबोंब आहे ! ती रस्त्यावर , सार्वजनिक ठिकाणी आणि सोसायट्यातदेखील आहे. पुढचे पानपत पुण्यातच पार्किन्ग वरुन होईल असा अन्दाज आहे.
पुणे अधिकाधिक बकाल होत चालले आहे. बकालपणा समावून घेण्याची मुंबईची सहनशीलता आणि सक्षमता पुण्यात नाही. दिवसेंदिवस पुणे अधिकाधिक व्याकुळ आणि केविलवाणे होत चालले आहे. शान गेली पुण्याची महाराजा !!
विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक ! तो काही नामांकित संस्थांमुळे होता आज त्यांची काय शान आहे ? सी ई ओ पी मध्ये पुण्याची किती अडमिशन्स होतात ? महाराष्ट्रातील? पुणे विद्यापिठीतील दर्जावर बोलायलाच नको! बोरी / दादोजी कोंडदेव पुतळा या प्रकरणांनी पुण्यातील शैक्षणिक वातावरण पुण्याच्याच कारभार्‍यांनी पार ढ्वळून काढले. हे वातावरण संशोधनाला पोषक वातावरण आहे काय? एस पी / फर्ग्युसन आपला दाब ठेवून आहेत पण एमआयटी , भारती , सिंबायसीस , सिंहगड, या खासगी संस्थानी पुण्याच्या शैक्षणिक विश्वावर आक्रमण केले आहे. त्या संस्था शिक्षणासाठी किती आणि अर्थकारणासाठी किती हा विषय इतका स्पष्ट आहे की त्याची चर्चा देखील होणार नाही. या अर्थकारणासाठी पुणे सोडाच अमराठी विद्यार्थ्यांचा भरणा पुण्यात वाढला. त्याबरोबर गुन्हेगारी आली. कसले विद्येचे माहेरघर ?
आणि सांस्कृतिक पुणे ?? किती नवीन लेखक / कवी / गायक पुण्यात गेल्या १५-२० वर्षात आले? सलील आणि संदिप खरे वगळता फारसे आशादायक काही नाही !! अपवाद असतील ही पण त्या अपवादाने नियमच सिद्ध होतो. सदाशिवात वसंतराव देशपांडे रहात होते, त्या माडीच्या खालून , रस्त्यावरुन जाताना देखील भारावल्यासारखे व्हायचे ! तीच गोष्ट नव्या पेठेतील भिमाण्णांच्या बंगल्याच्या आसपास ! आता काय शिल्लक आहे पुण्यात ?
पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल काय लिहू ? उत्सव कमी आणि धागडधिन्गा जास्त ! अनेक वेळा लिहून झाले आहे. गेली १० वर्षे पुण्यात आहे , एकदाही तिकडे फिरकायची हिम्मत झाली नाही.
पार वाट लागली आहे पुण्याची! पुणे , मुम्बईच्या वाटेवर आहे ! हे कमी की काय, पण हल्ली पुण्याचे हवामान ही बदलले आहे. पूर्वीचे आल्हाददायक पुणे, आता तितके आल्हाददायक राहीले नाही. पुण्यात देखील प्रचंड उकडते, मुम्बई सारखा आता रात्रभर पंखा लावावा लागतो.
हे सारे पाहून खर्‍या पुणेकराचा जीव कुळकुळतो. मनापासून वाईट वाट्ते . महाराजांच्या पुणे जहागीरीला पुन्हा एकदा सोन्याचा नांगर फिरवला जाण्याची आवश्यकता वाटते आहे.
अरे , कुठे नेऊन ठेवले आहे महाराष्ट्राचे पुणे !

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Oct 2014 - 10:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडेश. पुण्याचं बाळसं जाऊन आता तिथे फक्त सुज दिसतीये.

च्यक.. पूर्वीचं पुणं राहिलं नाही..
आमच्यावेळी असं नव्हतं..

गविकाका

जेपी's picture

28 Oct 2014 - 11:15 am | जेपी

विटुकाकाशी सहमत.

सतिश गावडे's picture

28 Oct 2014 - 11:17 am | सतिश गावडे

जुन्या पुण्याचं काही माहिती नाही. मात्र गेली पाच वर्षं मी पाहत असलेलं पुणे असंच आहे...

उगा काहितरीच's picture

28 Oct 2014 - 11:20 am | उगा काहितरीच

ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाल्ला की अजुन काय होणार ?

गवि's picture

28 Oct 2014 - 11:21 am | गवि

आमचें रत्नांग्री जिल्हा अन तळकोंकण पहा बरें. इकडचा पाचोळा तिकडे हलत नाय धा वरसांनी ग्येलात तरी.

दुर्दैवाने आपले म्हणणे मुळीच खरे नाही. बांधकाम आणि खाणकाम तिथेही चालू आहेत.

यसवायजी's picture

28 Oct 2014 - 5:34 pm | यसवायजी

अहों, गोठ्यांत निजणार्‍यान बैलाच्या मुताची घाण येतें असें म्हणून भागेल कांय? ;)

- SYG(बर्वा).

आयुर्हित's picture

28 Oct 2014 - 11:25 am | आयुर्हित

पुढचे पानपत पुण्यातच पार्किन्ग वरुन होईल असा अन्दाज आहे.

ह.ह.पु.वा. लागली.

हल्ली पुण्याचे हवामान ही बदलले आहे. पूर्वीचे आल्हाददायक पुणे, आता तितके आल्हाददायक राहीले नाही. पुण्यात देखील प्रचंड उकडते, मुम्बई सारखा आता रात्रभर पंखा लावावा लागतो.हे सारे पाहून खर्‍या पुणेकराचा जीव कुळकुळतो. मनापासून वाईट वाट्ते.

खरे आहे आपले!

अटकेपार झेंडे लावणारे आपण, आणि पुण्याची व्यवस्था चोख करण्यात कचराई करतो!

फक्त तो अमराठी शब्द खटकला.
बाकी छान लेख जमलाय.

मंदार दिलीप जोशी's picture

28 Oct 2014 - 2:03 pm | मंदार दिलीप जोशी

कुळकुळतो नाहि हो, कळवळतो

कुळ्कुळणे वेगळे आणि कळवळणे वेगळे !
अर्थात साधर्म्य असले तरी अर्थछटा भिन्न आहेत. कुळ्कुळणे हे कळवळण्यापेक्षा अधिक अगतिक आहे.
कुळ्कुळणे हे अधिक स्वतःशी , असहाय असण्याचे स्वरुप आहे. कळ्वळ्यानंतर मनुष्य काहीतरी कृती करु इच्छितो/ शकतो.
कळवळणे अधिक तर शारिरिक वेदनेशी ( पण फक्त शारिरिक वेदनेशी नव्हे )निगडीत आहे. कुळ्कुळणे अधिक मानसिक( पण फक्त मानसिक नव्हे )

मंदार दिलीप जोशी's picture

28 Oct 2014 - 3:18 pm | मंदार दिलीप जोशी

अरे बाप्रे. असे आहे होय!

विटेकर's picture

28 Oct 2014 - 3:11 pm | विटेकर

खरे आहे तुमचे म्हणणे... हे विद्यार्थी अमराठी आहेत त्यापेक्षा ते बडे बाप के आहेत ( जे ५० -५० लाख देऊन डिग्री विकत घेतात) हे अधिक लक्षणीय आहे, त्यामुळे एक प्रकारचा माज आहे. आणि म्हणून गुन्हेगारीकरण पण आहे. ते अमराठी आहेत हे या सन्दर्भात तितकेसे लक्षणीय नाही

कपिलमुनी's picture

28 Oct 2014 - 6:24 pm | कपिलमुनी

मराठी माज बघण्यासाठी पौड, मुळशी, हिंजवडी, बाणेर, वाकड अशा ठिकाणी फिरा.
माज करणारे गावगुंड खोर्‍याने भेटतील

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2014 - 6:27 pm | अत्रुप्त आत्मा

@मराठी माज बघण्यासाठी पौड, मुळशी, हिंजवडी, बाणेर, वाकड अशा ठिकाणी फिरा.
माज करणारे गावगुंड खोर्‍याने भेटतील. >>> अगदी अगदी अगदी बरोब्बर!!!

बापू नारू's picture

4 Nov 2014 - 4:34 pm | बापू नारू

पुणे तिथे काय उणे? ,मग गुंडांची तरी कशी उणीव असेल?
गळ्यात कुत्र्यासारख्या जाड साखळ्या ,त्याही सोन्याच्या घालून हे रानरेडे टवाळक्या करत फिरतात..

प्रसाद१९७१'s picture

4 Nov 2014 - 6:36 pm | प्रसाद१९७१

ते खरे पुणे नाही.

जे प्रसिद्धी पावलेले पुणे आहे ते म्हणजे सदाशिव, शनवार, नारायण आणि शुक्रवार आणि थोडे डेक्कन.
खरे पुणे १९९० सालीच लयाला गेले.

आताच्या शहराला काहीही नाव द्या पण ते पुणे नक्कीच नाही.

आजानुकर्ण's picture

28 Oct 2014 - 6:43 pm | आजानुकर्ण

अमराठी विद्यार्थी बडे बाप के आणि सिंहगड, कोथरुडात रस्त्यावर बीएमडब्लू-मर्सिडीज लावणारे छोटे बापके की काय?

काळा पहाड's picture

28 Oct 2014 - 11:48 am | काळा पहाड

अमृतांजन घाटात खाशे गारदी बसवून मुंबईच्या गनिमांची वाट अडवून त्यांचं पारिपत्य करण्याचा विचार कसा वाटतो?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Oct 2014 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे

खरंच, पूर्वीचं पुणं र्‍हायलं नाय महाराजा !

तुमी म्हाराजांच्या टैमाचे का? रुपयाला धा धा शेर दुद दारात म्हस पिळून?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Oct 2014 - 8:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

नांही आम्ही त्यांच्या पूर्वींचे...सातवाहन काळातले. सान्गूका त्याकाळच्या सुर्स कता ? (कसें घाबरवलें !)

... दुद दारात म्हस पिळून? असें हे भर रस्त्यावर अश्लींल काम पुण्यनगरीत होणें नाही... शिव, शिव. ते तसलें कोणत्यांतरी पुरांत करतात म्हणें. ;) +D

टवाळ कार्टा's picture

28 Oct 2014 - 8:12 pm | टवाळ कार्टा

नांही आम्ही त्यांच्या
इस्पीकचा एक्का - Tue, 28/10/2014 - 20:06
नांही आम्ही त्यांच्या पूर्वींचे...सातवाहन काळातले. सान्गूका त्याकाळच्या सुर्स कता ? (कसें घाबरवलें !)

... दुद दारात म्हस पिळून?
असें हे भर रस्त्यावर अश्लींल काम पुण्यनगरीत होणें नाही... शिव, शिव. ते तसलें कोणत्यांतरी पुरांत करतात म्हणें. WinkBiggrin

इथे म्हैस हे रुपक आहे का नाही =))

अल्पिनिस्ते's picture

6 Nov 2014 - 10:33 am | अल्पिनिस्ते

काय काडी टाकलिये राव !!!

बॅटमॅन's picture

28 Oct 2014 - 11:56 am | बॅटमॅन

विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक ! तो काही नामांकित संस्थांमुळे होता आज त्यांची काय शान आहे ? सी ई ओ पी मध्ये पुण्याची किती अडमिशन्स होतात ? महाराष्ट्रातील?

काय फालतूपणा आहे हा? सीओईपी काय पुण्याची जहागीर आहे का?

अन खंडीभर कॉलेजेस असल्यामुळे विद्येचे माहेरघर म्हणणे म्हणजे उदाहरणार्थ रोचक आहे.

गवि's picture

28 Oct 2014 - 11:58 am | गवि

आला का हा बरोब्बर..?

बॅटमॅन's picture

28 Oct 2014 - 12:33 pm | बॅटमॅन

एक सीओईपियन म्हणून त्या उद्गारांचा राग येणे स्वाभाविकच आहे. असो.

विटेकर's picture

28 Oct 2014 - 2:53 pm | विटेकर

बरं येऊ दे !

बॅटमॅन's picture

29 Oct 2014 - 11:01 am | बॅटमॅन

अहो १८८१ सालीसुद्धा म्हैसूरहून विश्वेश्वरैयांसारखे लोक यायचे सीओईपीत शिकायला. ते पुण्यापुरतं मर्यादित झालं ते पुणे युनवर्शिटीनं हायजॅक केल्यानंतर, १९५० च्या नंतर. म्हणजे पूर्णपणे मर्यादित नव्हतं पण ७०% लोक पुणे युनिव्हर्सिटीच्या क्षेत्रातून यायचे. हा फालतूपणा २००३ पर्यंत टिकून राहिला. २००४-५ पासून कॉलेज खर्‍या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रासाठी खुले झाले.

सीओईपीची स्थापना झाली १८५४ साली झाली, त्यावेळी कँपात भवानी पेठेत होते ते. सध्याची इमारत १८६५ साली सुरू होऊन १८६९ साली पूर्ण बांधून झाली. १९१८ सालापासूनचे दिवाळी अंक कॉलेजातल्या अ‍ॅलुम्नी सेक्शनमध्ये अजूनही जपून ठेवलेत. त्यांत पाहिले तर दिसून येईल मी काय म्हणतोय ते. १९३८ सालचा एडवर्ड रोमॅनस गोम्स नामक एक गोल्ड मेडलिस्टही आहे-मूळचा मिरजेचा. १९१०-२० च्या दरम्यान पासौट जाहलेले मिरजेचे एक गोखले नामक विद्यार्थी पुढे कराची इंजिनिअरिंग कॉलेजचे पहिले प्राचार्यही झाले. हे फक्त मिरजेबद्दल बोलतोय, अन्य शहरांचीही कैक उदा. आहेत.

१८५४ पासून २०१४ पर्यंत १६० वर्षांतली जवळपास १०० वर्षे कॉस्मोपॉलिटन इतिहास असलेल्या कॉलेजबद्दल कुणी असं म्हटलं तर वाटणारच की ओ.

(सीओईपियन) बॅटमॅन.

कपिलमुनी's picture

28 Oct 2014 - 11:58 am | कपिलमुनी

पूर्ण बिघडवून टाकली आहे .
हिंजेवाडी,लोहेगाँव तलेगाँव असले भलते उच्चार करतात.
"ज आणि च" चे उच्चार बदलून टाकले आहेत.

छ्या ! पूर्वीचं पुणं राहीला नाय :(

झालच तर आँध,बावधान,येरवाडा...

मराठी_माणूस's picture

28 Oct 2014 - 12:15 pm | मराठी_माणूस

पूर्वीचं ..... राहील नाय

गाळलेल्या जागेत कोणत्याही गावाचे नाव लिहले तरी हे लागु होते. उगीच पुण्यासाठी गळे काढण्यात काही अर्थ नाही.

तुमचा अभिषेक's picture

28 Oct 2014 - 12:32 pm | तुमचा अभिषेक

लिहिलेय चांगले, वाटतेय प्रामाणिक, खरे खोटे पुणेकरच सांगतील. एका मुंबईकराच्या नजरेतून वाचताना आता पुणेकर मित्रांना चिडवायला काही पाँईट मिळतात का हेच या लेखात शोधत होतो. पण शेवटी हे असे असल्यास एक मराठी माणूस आणि महाराष्ट्रीय म्हणून वाईट सुद्धा वाटले.

पिंपातला उंदीर's picture

28 Oct 2014 - 1:47 pm | पिंपातला उंदीर

लेख आवडला . मुख्य म्हणजे तो 'आजच्या ' पुण्यावर आहे . बाकी पुण्याच्या इतर धाग्यांवर पुणेरी लोक आणि पुणे या शहरांवर ज्या खोचक प्रतिक्रिया असतात त्या वाचून आपण १९६०-७० च्या दशकात आलो आहोत कि काय असे वाटते . म्हणजे पुणेकर 'खडूस ' असतात , चहा पण पाजीत नाहीत , कायम वाद विवाद करतात असले आधारहीन कालबाह्य झालेलं stereotypes वाचून अजून पुण्याची १८ व्या शतकातली image कवटाळून बसलेल्या लोकांची कीव येते . म्हणजे काही pockets मध्ये हे जुने पुणे असेलही पण आता शहराने कात टाकली आहे . मी बघत आलेलं पुण असाच आहे . बहुरंगी आणि बहुढंगी

मंदार दिलीप जोशी's picture

28 Oct 2014 - 3:23 pm | मंदार दिलीप जोशी

पुणेकर चहाच काय, पाणी सुद्धा विचारत नाहीत. मी मुंबई हून पुण्यास येणार होतो तर एका नातेवाईकाचे सामान त्यांच्या नातेवाइकाकडे पोहोचवायची कामगिरी येऊन पडली. मी त्यांच्या घरी भर दुपारी गेलो तर सामान घेतले माझ्याकडून पण मग चहा, सरबत, गेला बाजार पाणी सुद्धा विचारले गेले नाही. शेवटी फारच तहान तहान होत होती म्हणून चोरट्यासारखे मी पाणी मागितले तेव्हा अर्धा भांडे भरून उदार अंतःकरणाने मला पाणी पाजण्यात आले. च्यायला ह्यांच्या.

दार पूर्ण उघडले होते का? की सामानाइतकेच?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2014 - 4:30 pm | अत्रुप्त आत्मा

@दार पूर्ण उघडले होते का? की सामानाइतकेच?>>> :-/ आंssssssssssssss!!! :-/ दुष्ष्स्।स्।ट्ट्ट........ गवि! :-/

थॉर माणूस's picture

28 Oct 2014 - 5:50 pm | थॉर माणूस

*lol* *lol* *lol* *lol* *lol*

शिद's picture

28 Oct 2014 - 8:23 pm | शिद

=))

मंदार दिलीप जोशी's picture

30 Oct 2014 - 12:21 pm | मंदार दिलीप जोशी

:D

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Oct 2014 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

"तुम्ही चहा पिउन आला असालच. मी पण थोडा चहा घेउन येतो." असं नाही म्हणाले का ते ?

छे छे मग तुम्ही खर्‍या पुणेकरांकडे गेलाच नाहीत. +D

मोहनराव's picture

28 Oct 2014 - 8:15 pm | मोहनराव

तुमचीच चूक आहे त्यात!! भर दुपार हि पुणेकरांची झोपायची वेळ असते. त्यात व्यक्तय आणल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते कसा काय विचारणार ते बरं ? :)

मंदार दिलीप जोशी's picture

30 Oct 2014 - 11:02 am | मंदार दिलीप जोशी

भर दुपारी म्हणजे बारा-साडेबारा वाजता.

मंदार दिलीप जोशी's picture

30 Oct 2014 - 12:23 pm | मंदार दिलीप जोशी

आणखी एक. एका मित्राच्या इमारतीत त्याचाच पत्ता विचारला तर मला दोन इमारती पुढे आहे असे त्या दुकानदाराने सांगितले.

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2014 - 12:29 pm | टवाळ कार्टा

हे माझा माझ्याबाबत पण झालेले

हडपसर बस स्टॉपवर कात्रजला जाणारी बस कुठच्या फलाटावर लागेल असे विचारले तर उत्तर आले "हितच" ...१० मिनीटांनी कात्रजची बस १ फलाटसोडून पुढच्या फलाटावरुन निघून गेली :(

मंदार दिलीप जोशी's picture

30 Oct 2014 - 12:40 pm | मंदार दिलीप जोशी

मला प्रभात टॉकीजला जायचं होतं तर विश्रामबागवाड्याशेजारी विचारलं. प्रभात मोजून अर्ध्या मिनिटावर होतं तिथे हे मला विश्रामबागवाड्याला चार प्रद्क्षिणा घातल्यावर समजलं. पुन्हा पुन्हा तिथूनच पाठवायचे. फुल्या फुल्या कुठचे.

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2014 - 1:11 pm | टवाळ कार्टा

आणि हे मी कंडक्टरला विचारलेले :(

मंदार दिलीप जोशी's picture

30 Oct 2014 - 4:08 pm | मंदार दिलीप जोशी

अर्रर्रर्र

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2014 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा

@जुने कोथरुड आणि सिंहगड रस्ता भागातील सोसायटयातील अरुन्द रस्ते फक्त सायकली आणि स्कूटरी जाण्याच्या लायकिचे ! तिथे हल्ली मर्सिदेस आणि बीएमडब्ल्यु सारख्या अजस्त्र गाड्या पार्क करुन ठेवतात. >>>> ++++++++++१११११११११११११११ आणि आपण त्या'कडे जाताना त्रासून बघितलं..तरी तो (आपल्याला) ठार मारण्याच्या लायकीचा गुन्हा ठरतो.... त्यांचे ठाई!

मोहनराव's picture

28 Oct 2014 - 5:49 pm | मोहनराव

दुचाकी वाल्यांनी पुरती वात लावुन टाकली आहे पुण्याची. सार्वजनिक वाहतूक चांगली नसल्याचा परिणाम

चिनार's picture

4 Nov 2014 - 5:30 pm | चिनार

दुचाकी वाल्यांनी पुरती वात लावुन टाकली आहे पुण्याची.

या वाक्याचा जाहीर निषेध !!
-- एक दुचाकीस्वार

रवीराज's picture

5 Nov 2014 - 12:03 am | रवीराज

दुचाकीस्वारांचा मोठा वाटा आहे पुण्याची वाट लावण्याला.

आशु जोग's picture

28 Oct 2014 - 5:53 pm | आशु जोग

लयच भारी

पु ल देशपांड्यांच्या वेळचे पुणेकर पुण्याची टीका हा वैयक्तिक पराभव मानायचे म्हणे.....

अवांतर.... पिंप्री चिंचोड पण पु ण्यात धरतात की बाहेर?

नदीपलिकड्च काहीच पुण्यात धरत नाहीत.

खोंड's picture

28 Oct 2014 - 8:45 pm | खोंड

घरांच्या किमती… एकदम खरं बोललात … माझ्या सारख्या सोफ्टवेअर इंजिनियर ला पण नाही परवडत …
खर तर बाहेरून पुण्यात नोकरीला येणारे लोक (I. T. मधले ) यांनीच पुण्याची अशी अवस्था केली आहे
हाकलून काढा साल्यांना

फोटोग्राफर243's picture

29 Oct 2014 - 8:59 am | फोटोग्राफर243

मला एक कळत नाही, लोक सारखे IT ला का दोश देतात, बाकी industry च्या लोकांनी जागेचे भाव नाही का वाढवले?? उठ सुठ आपला IT च्या नावाने बोम्ब...

टवाळ कार्टा's picture

29 Oct 2014 - 9:29 am | टवाळ कार्टा

पुणे...आयटी...परप्रांतिय...अजून १०० नाय????

मी-सौरभ's picture

28 Oct 2014 - 8:56 pm | मी-सौरभ

आजकालचे पुणेकर या अश्या धाग्यांवर पण पेटून उठत नाहीत :(

थॉर माणूस's picture

29 Oct 2014 - 9:37 am | थॉर माणूस

च् च् च्... पुर्वीचे पुणेकर राहिले नाहीत आता.

सुनील's picture

29 Oct 2014 - 9:41 am | सुनील

(नदीजोड प्रकल्प पूर्ण होऊन) मिठीचे पाणी मुळा-मुठेत सोडले गेले की क्काय? ;)

भारतातील जी शहरे पूर्वीसारखीच राहिली आहेत त्यांची कीव येते!

बदल हाच शाश्वत असतो .. वगैरे वगैरे!

सुहास..'s picture

29 Oct 2014 - 5:43 pm | सुहास..

नाही ऋषीकेश , पेठा अजुन जशाच्या तशा आहेत , अगदी टिंबर मार्केट मधली लाकडी दुकाने सुध्दा ..काही वाडे बदललेत,काही जावुन फ्लॅट्स उभे राहिलेत ..कल्चर आहे तशेच आहे ..अजुन ही पुणे म्हणजे पेठा हे ही समीकरण जसेच्या तसे आहे ...सदाशिवातली माणसं ही जशीच्ता तशी आहे....हे जे बोलताहेत , ती पुणे ग्रामीण की पुणे शहर या वादात २५ वर्षे, काही १५ वर्षे अडकलेली गावे आहेत ... आता झालीत शामील , १ जानेवारीपासुन , प्रोसेस कंप्लीट ( म्हणजे तेच ग्रामपंचायचीच क्षेत्रीय कार्यालय करणे , ई. ई. ) एक जुन पर्यंत सगळी महानगर पालिकेत जाणार होती , निवडणुकांमुळे उशीर झालाय बहुतेक..नीटस माहीत नाही उशीर व्हायचे कारण ..

अजुन ही पुणे म्हणजे पेठा हे ही समीकरण जसेच्या तसे आहे ...सदाशिवातली माणसं ही जशीच्ता तशी आहे....

ज्या पेठांसाठी पुणे 'फेमस/इनफेमस' आहे त्यांबद्दल 'अख्खी पेठच्या पेठ उठून नदीपलीकडे कोथरुडास रहावयास गेली' असे ऐकून आहे बॉ.

आदूबाळ's picture

29 Oct 2014 - 6:07 pm | आदूबाळ

छे छे - सिलिकॉन व्ह्यालीत.

ज्या पेठांसाठी पुणे 'फेमस/इनफेमस' आहे त्यांबद्दल 'अख्खी पेठच्या पेठ उठून नदीपलीकडे कोथरुडास रहावयास गेली' असे ऐकून आहे बॉ. >>

ती वाढीस आलेली लोकसंख्या गेली ;) ( पोरं कोथरुडात, आई-वडील एका भावासह पेठात ) पण कोथरूडात गेली त्याबद्दल अ‍ॅप्रिशियेशन आहे, कचरा डेपो होता तिथे आहे , कोणालाही वाटल नव्हत तेव्हा असे काही घडेल ...मला पिंपरी चिंचवड ला होईल असे वाटले होते .....आणी हडपसर ,खराडी, चंदननगर, वाघोली, लोहगाव, फुरसुंगी या बाजुचा कोपरा धरून अशी आणखी एक महापालिका करण्याचा प्रस्ताव मांडला होता काँग्रेस ने !कलमाडी ने!! आता कलमाडी ही नाही काँग्रेस ही नाही .. आता तो पण होतो की नाही !!

पुन्यातल्या लोकानि आपल्या पोरा पोरिना वेळच्या वेळि शिस्त लावलि असति तर आज हि वेळ आलि नसति .

शिद's picture

29 Oct 2014 - 6:21 pm | शिद

वेळच्या वेळि शिस्त

म्हणजे कशी?

सिरुसेरि's picture

30 Oct 2014 - 3:01 pm | सिरुसेरि

उदाहरणासाठी - मुलगा /मुलगी दहावी पास झाली की सनी , स्कूटी - दुचाकी घेऊन देणे , संगीत कार्यक्रमांमध्ये बटाटेवडेच खात बसणे इत्यादी वगैरे वगैरे....

पुन्यात दिडवर्स काढलय.पुण्याची पीएमटी सोडुन सगळ आवडत. खास करुन स्वारगेट चा एमपी बार.माझा पुण्यातील आवडत ठिकाण