महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण

यश पालकर's picture
यश पालकर in काथ्याकूट
20 Oct 2014 - 8:29 am
गाभा: 

महाराष्ट्राच्या सत्तेचा निकाल मतदारांनी दिलेला आहे पण ह्या निकालाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे . आता तुम्ही बोलाल आपण का करावे हे तर राजकीय पक्षाची गरज आहे आणि काम आहे.
परंतु प्रत्येक निवडणुकीसोबत प्रत्येकाने काहीतरी शिकायला हवे मग तो मतदार असो व राजकीय पक्ष .

महाराष्ट्राच्या इतिहासातील युती आणि आघाडीची समीकरण ह्या निवडणुकीत संपुष्टात आली होती.अनेक वर्षांनी मतदारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले होते त्यामुळे जनतेची सुद्धा इथे खरी कसोटी होती.जनतेनेसुद्धा योग्य तोच निर्णय दिला आहे त्याब्बदल त्यांचे अभिनंदन

भाजपाने महाराष्ट्रात स्वतच्या बळावर लढण्याचा निर्णय घेतला होता तो चूक आहे बरोबर आहे ह्यावर बरीच चर्चा झाली . सामान्य जनतेला युती हवी होती अस काहीस चित्र उभ झाल होत . त्यानंतर त्यांच्यावर युती तोडण्याचा आरोप झाला कदाचित खरा असेलही परंतु त्यात त्याचं काही चुकल नाही असेच वाटत होते . कारण त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव झाली होती आणि ती आजमावून पाहणे त्यांना आता गरजेचे होते जे पुढे शक्य नाही झाले असते. भाजपाने मोदी लाटेचा वापर करण्यापेक्षा मोदी नावाच्या गंगेत हात धुऊन घेतले . "गोपीनाथ मुंडे" साहेबांच्या शिवाय #भाजप पहिल्यांदा राज्यातील निवडणूक लढवत होता त्यामुळेच महाराष्ट्रातील नेत्यामध्ये थोडासा उतावीळपणा आणि अनुभवाची कमतरता जाणवली.परंतु ती सारी भरून काढण्याच काम नरेंद्र मोदी यांनी केल होत . पहिल्याच सभेत आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेवर टीका करणार नाही हे सांगून लोकांची मन जिंकलीच आणि शिवसेनेला backfoot वर टाकल होत.त्यानंतर त्यांच्या सभा आणि पक्षाने इतर पक्षांसोबत मांडलेली गणित हे सार सर्वांनाच माहित आहे . मी म्हणेन कि ह्यात भाजपने खूप प्रयत्न केले सत्ता मिळवण्यासाठी आणि त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर यश सुद्धा आला आहे.परंतु हि मत देताना लोकांनी हाच विचार केला कि केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाच सरकार असाव जेणेकरून विकास आणि राज्यकारभार योग्य रित्या करता येईल.त्यामुळे पुढील पाच वर्षे भाजपने ह्या विश्वासास खरे उतरावे अशीच एक आशा आहे.

शिवसेनेबद्दल बोलायचं झाल तर माझी सुद्धा पसंती शिवसेनेसच होती परंतु जसा जसा निवडणुकीचा ज्वर चढत गेला त्यानंतर जी काही विधान शिवसेनेकडून केली गेली त्याचा फटका शिवसेनेस बसला अस वाटू लागल. जी काही मत ह्या निवडणुकीत मिळाली असतील ती बाळासाहेबांच्या बद्दल जो आदर त्यामुळेच मिळाली अस खात्रीने वाटत . कारण मराठी अस्मिता,अफझलखान,बापाचा अनादर ह्या मध्ये अडकलेली शिवसेना विकासाबद्दल काहीच बोलली नाही . तुम्ही जेव्हा एखाद्या निवडणुकीस उतरता तेव्हा एक चेहरा घेऊन उतरण गरजेचे असत त्यामुळे शिवसेनेने आपला कोणताही नेता मुख्यमंत्री म्हणून लोकासमोर आणला नाही उलट उद्धव मुख्यमंत्री बनतील कि नाही ह्याच्याच गप्पा मारत बसले . बाळासाहेबांनी #शिवसेना पक्ष घडवला होता, पक्षबांधणी केली होती परंतु तस आज काही दिसत नाही आणि त्याचा फटका आता बसला आणी बदल नाही झाला तर पुढेही बसत राहील. त्यामुळे तूर्तास शिवसेनेने विरोधी पक्षाच्या बाकावर बसून उत्तम अशा विरोधी पक्षाची भूमिका निभावावी पक्षबांधणी पुन्हा नव्याने करावी . पुढील पाच वर्षाच्या काळात खूप काही करता येईल आणि मग संधीच सोन कराव. कारण महाराष्ट्राच्या हितासाठी आता जवळ येण्यापेक्षा पूर्वीच एकत्र लढायला हव होत आणि आधीच तुम्हीच आम्हाला शिकवलेली मराठी अस्मिता जपण्याकरता भाजप सोबत जाऊ नये .

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांनी तर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. काही दिग्गजांना फटका बसला परंतु तो त्यांच्या घोटाळे , फुकाचे गर्व, अतिआत्मविश्वासामुळे मिळाला आहे. जनतेला गृहीत धरू नये हेच दोघांच्या नेत्यांनी शिकावं आणि आपली राजकारणाची दिशा ठरवावी.पवार साहेब आजूनही अप्रत्यक्षरित्या सत्तेत राहण्याचं प्रयत्न करत आहे ते पवार साहेबांच राजकारण आहे कळण आता तरी थोड अवघड आहे

मनसे ह्या निवडणुकीत खूपच मागे पडला मी तर म्हणेन अधोगती झाली.राज ठाकरे सारखा नेता ज्याकडे महाराष्ट्राने खूप अपेक्षेने पाहिलं आणि फक्त त्यांच्या वर्कृत्वाच्या जोरावर १३ आमदार निवडून दिले.पण अपेक्षेवर किती खरे उतरले हे जनतेने ह्या निवडणुकीत दाखवून दिले. त्यामुळे मराठी माणसाने मत दिल नाहीत अशी बोंब मारण्यात आता काहीच अर्थ नाही आहे.कारण "ये पब्लिक है ये सब जाणती है".आजकाल प्रत्येकाला विकास हवा आहे आणि तस विकासाच मोडेल मांडण्याची संधी नाशिक मध्ये होती पण ती सुद्धा हुकली होती . विकास आराखडा खूपच उत्तम होता पण तो शेवटच्या ओवर मध्ये सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता जो खरच फसला आहे.परंतु खरच वेळ नाही गेली आहे प्रत्येकाने लक्षात ठेवाव.

महाराष्ट्राच्या ह्या निवडणुकीत साऱ्या पक्षांचा पराभव झाला आहे जेव्हा "MIM" सारखा पक्ष ३ जागा जिंकवून आणू शकतो. हि चिंतेची बाब असली तरी त्यात नवल अस काही नाही आहे कारण "पेराल तेच उगवेल " असो महाराष्ट्राच्या हिताची आम्हालाही काळजी वाटते .

नवखा राजकीय विश्लेषक
यशवंत पालकर

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

20 Oct 2014 - 8:51 am | चौकटराजा

MIM ने राजकारणात येण्यात अडचण काय असावी ? चिंता कसली. ते काय खोमेनी होणारेत " आणि होउ पहातील तर इतर ८० टक्के काय टीव्ही पहात बसतील काय? आरपीआय काय आहे ? ती एक प्रकारची जातीय संघटनाच आहे. यात चितांतूर होण्याचे कारण लालूप्रसाद ,सोनिया, मुलायमसिंग, मायावती याना आहे .कारण त्यांच्या व्होटबँकेवर आता दरोडा पडणार आहे. पण मुलायम, माया यानी नाही का सोनियांच्या व्होट बँकेवर दरोडा घातला? कयनेका मतलब पेरावे ससे उगवते ते असे !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2014 - 9:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

MIM ने राजकारणात येण्यात अडचण काय असावी ? चिंता कसली. ते काय खोमेनी होणारेत

अतिशय चुकीचं वाक्य. तुम्ही त्या हैद्राबादच्या पिल्लावळीचा विखारी प्रचार ऐकला नाहीये का? पोलिस १५ मिनिटासाठी काढुन घ्या सगळ्या हिंदुंची कत्तल करतो वाला? विरोध मुस्लिमांना नाही. त्यांच्यामधल्या ह्या ओवेसी म्हणा, रझा अ‍ॅकॅडमी म्हणा अश्या भिकार विचारांना आहे. आत्ता सत्तेत विशेष वाटा नसताना ह्या लोकांचं (एम.आय.एम आणि रझा वगैरे) उपद्रवमुल्य किती आहे ते बघा, उद्या ह्यांनी हातपाय पसरले तर देशात दंगे पसरायला वेळ लागणारे का? असल्या वाय.झेड. माथेफिरुंच्या नादाला साधे मुस्लिम नं लागोत हिचं एक ईच्छा.

अतिशय सहमत. ह्यांची पिलावळ जिथल्या तेथे ठेचावयास हवी. भायखळासारख्या मुस्लिमबहूल भागात ह्यांची १ सीटपण येणे ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2014 - 8:59 am | टवाळ कार्टा

MIM ने राजकारणात येण्यात अडचण काय असावी ? चिंता कसली. ते काय खोमेनी होणारेत

फार चुकीची वाक्ये

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2014 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्रात दोनच जागा मिम च्या निवडून आल्या आहेत एक आमच्या औरंगाबाद मध्य आणि दुसरी भायखेळ्यातून. औरंगाबादपूर्व मधेही ते दुसर्‍या क्रमांकावर राहीले. औरंगाबाद मध्यमधे मिम चे आमदार निवडून येण्याचे कारण शिवसेना आणि भाजप यांच्यातील भांडन मिम च्या फायद्याचे राहीले इथे पूर्वी प्रदीप जैस्वाल हे अपक्ष परंतु सेनेचे असलेले निवडून आमदार येत होते. इथे मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे, परंतु हिंदु संखेपेक्षा जास्त नव्हती, नाही. निवडणुकीपूर्वी इथे मि च्या हैद्राबाद येथील खासदाराची सभा झाली आणि औरंगाबादेत पुन्हा निजामी राजवट येते की काय आणि आणली जाते की काय इतका विखारी प्रचार केल्या गेला. आणि 'औरंगाबाद पूर्व' आणि 'औरंगाबाद मध्य' मधे दोघंही उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातल्या त्यात 'औरंगाबाद मध्य'मधे औरंगाबाद लोकमतचे राजेंद्र दर्डा माजी आमदार निवडणुकीत होते त्यांनी नेहमीच मुस्लीम मतदारांचे लालनचांगुल केले परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना आपण परंपरेने मतदान करतो परंतु ते केवळ आपला वापरच करतात आपला कोणताही फायदा होत नाही, एव्हाना आता मुस्लीम मतदारांना कळु लागलेले होते आणि त्यांना याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता म्हणुन त्यांनी MIM चा एकगठ्ठा मतदान करणे हा पर्याय निवडला.

औरंगाबाद मध्य मधे प्रदीप जैस्वाल शिवसेनेचे आणि त्यांना विरोध करायला भाजपाचे किशनचंद तणवानी उभे राहीले इथेच MIM चा उमेदवार अर्धी लढाई जिंकला होता. दोघांच्या मतविभाजनाचा फायदा MIM च्या उमेदवाराला झाला. शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना ४१८६१, भाजपाच्या तणवानी यांना ४०७७७ तर विजयी सय्यद जलील MIM च्या उमेदवाराला ६१८४३ मतं पडली आणि ते विजयी झाले.

प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तणवानी हे एकाच शिवसेनेच्या आखाड्यात वाढलेले एकमेकांच्या कमकुवत आणि मजुबत गोष्टी एकमेकांना माहिती होत्या. दोघांनाही माहिती होतं 'तु तु मै मै' करता करता आपण दोघेही पडणार होतो हे त्यांना माहिती झालं होतं पण मी नै तर तुही नै यात नुकसान झालं ते 'शांततेचं' आणि विजय झाला तो विखारी वृत्तीचा असे नाविलाजाने म्हणावे लागते.

आपली होणारी ससेहोलपट ही मुस्लीम मतदारांनी व्यक्त केली तशी हिंदु मत विभागल्यामुळे इथे नुकसान सेना आणि भाजपाचे झाले. MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये.

'औरंगाबाद पूर्व' मधे सेनेचा उमेदवार कमकुवत होता आणि तिथे लढत थेट MIM विरुद्ध भाजपा अशी काट्याची टक्कर झाली शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हतं दुपारी दोन वाजेपर्यंत इथे एक शांतता होती. MIM चे दोन उमेदवार निवडून आलेत अशी बातमी वाट्सपवर येत होती. परंतु या मतदार संघात सरळ हिंदु विरुद्ध मुस्लीम असाच आतल्या आत प्रचार रंगला आणि जास्त मतदार असलेल्यांनी भाजपाच्या अतुल सावेंच्या पारड्यात मतं टाकली. अतुल सावेंना (भाजपा) ६४५२८ तर MIM च्या उमेदवार डॉ.काद्री यांना ६०२६८ मतं पडली. काँग्रेस तिसर्‍या तर शिवसेना इथे चौथा स्थानावर राहीली.

मीम ही एक कट्टर जातीयवादी संघटन आहे. मग बाकीच्या संघटना जातीय नाहीत काय असा प्रश्न पुढे येईल परंतु ही प्रवृत्ती मला विघातक स्वरुपाची वाटते. अराजकतेकडे नेणारी वाटते. कदाचित माझं विश्लेषण चुकही असेल त्याविषयी येता काळच त्याला उत्तर देईल परंतु ते महाभयंकर असेल असे मला वाटते. काल कोणीतरी म्हणत होते की यापुढे फक्त दोनच पक्ष असतील एक हिंदु आणि एक मुस्लीम त्यांची नांदी मात्र माझ्या मतदार संघातून झाली असे वाटायला लागले आहे. चुकभुल देणेघेणे.

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2014 - 9:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रतिसाद आवडला.

बाकी आता सेक्युलर सेक्युलर म्हणुन नेहेमी बोंब मारणार्‍यांचं आता काय म्हणणं आहे हे मात्र कळायला हवं.
संघाच्या नावानी बोटं मोडणार्‍यांनी आता गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. तो "शांततावादी" समाज डोईजड होणार नाही ही काळजी कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना नं दुखावता घेतलीत पाहिजे. विरोध मुस्लिम धर्मियांना नाही पण त्यातल्या ओवेसी, रझा अ‍ॅकॅडमी, एम.आय.एम. आणि बाकीच्या "शांतीवादी" संघटनांना आहे.

आता इथेही काही अकलेचे कांदे संघ आणि एम.आय.एम. ची तुलना करतीलचं त्यांच्या प्रतिसादांची वाट पाहातोय.

मुसलमान कसे एक गठ्ठा मतदान करतात त्याचे हे उत्तम उदाहरण ठरले ! आणि हे नक्कीच चिंतेचे कारण आहे कारण मुसलमानांनी एकगठ्ठा मतदान एम.आय.एम. केले आहे, आणि त्यांचा इतिहास आणि वर्तणुक आपल्या देश हिताची नक्कीच नाही आणि त्यामुळेच त्यांना मतदान करणार्‍यांच्या मानसिकतेचा सुद्धा नक्कीच विचार करायलाच हवा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

मदनबाण's picture

20 Oct 2014 - 3:18 pm | मदनबाण

MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये.
बिरुटेसर कॄपया या घटनेचा तपशील द्याच आता.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

शिद's picture

20 Oct 2014 - 3:28 pm | शिद

तपशिल जाणून घेण्यास उत्सुक.

विटेकर's picture

20 Oct 2014 - 10:30 am | विटेकर

धन्यवाद !
फारच सुंदर विवेचन !! आवडले .
फक्त दोनच पक्ष असतील एक हिंदु आणि एक मुस्लीम त्यांची नांदी मात्र माझ्या मतदार संघातून झाली असे वाटायला लागले आहे.
हा देश हिन्दूचा आहे तसेच भारतीय मुस्लिमांचाही आहे. असे नुसते म्हणून उपयोग नाही , व्यवहारात ही असेच असायला हवे. कॉन्ग्रेसने त्यांचे तुष्टीकरण करुन त्यांना मतांच्या राजकारणासाठी विनाकारण विशेष दर्जा दिला. आता भाजपच्या राज्यात तो मिळणार नाही म्हणून त्यांना अधिक असुरक्षित वाटू लागले आहे.आणि म्हणून ओवेसी सारख्यांचे फावते. अशी हिन्दू- मुस्लिम फाटफूट होणे म्हणजे पुन्हा एका नव्या द्वीराष्ट्रवादाला तोंड देणे होय. असा प्रसंग माझ्या आयुष्यात व भारताच्या भविष्यात न येवो.

विनोद१८'s picture

20 Oct 2014 - 3:14 pm | विनोद१८

MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये. यातच सारे काही आले, पण ते समजण्याची कुवत सर्वसामान्य माणसे व हे सुमार वकूबाचे राजकिय नेते, तथाकथित विचारवंत व मिडीया हे 'सेक्युलरपणाच्या शर्यतीत' कधिच गमावुन बसलेत, एम.आय.एम च्या ओवेसीची सगळी भाषणे 'यु. ट्युब'वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी ती नक्की पहावीत व आपली मते बनवावित. त्याची लिंक देत आहे : https://www.youtube.com/watch?v=Ffkf3tosmKw
त्यामधील त्या 'अकबरुद्दीन ओवेसीची' जाहीर भाषणामधुन ओकलेले जहरी गरळ हा भाग तर आवर्जुन पहावा म्हणजे सर्वांचे मिटलेले डोळे उघडतील अशी आशा व्यक्त करतो. हा भस्मासुर या देशात वाढणे हे धोक्याचे आहे, इराक व सिरीयामध्ये जे काही चाललेले आहे त्याचीच ही भारतीय आव्रुत्ती असे लक्षात येइल.

विनोद१८'s picture

20 Oct 2014 - 3:18 pm | विनोद१८

MIM चा उमेदवार निवडून आल्यानंतर जी विजयी रॅली निघाली आणि पुढे जे घडलं ते मी इथे लिहु नये.

यातच सारे काही आले, पण ते समजण्याची कुवत सर्वसामान्य माणसे व हे सुमार वकूबाचे राजकिय नेते, तथाकथित विचारवंत व मिडीया हे 'सेक्युलरपणाच्या शर्यतीत' कधीच गमावुन बसलेत, एम.आय.एम च्या ओवेसीची सगळी भाषणे 'यु. ट्युब'वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी ती नक्की पहावीत व आपली मते बनवावित. त्याची लिंक देत आहे : https://www.youtube.com/watch?v=Ffkf3tosmKw

त्यामधील त्या 'अकबरुद्दीन ओवेसीने' जाहीर भाषणामधुन ओकलेले जहरी गरळ हा भाग तर आवर्जुन पहावा म्हणजे सर्वांचे मिटलेले डोळे उघडतील अशी आशा व्यक्त करतो. हा भस्मासुर या देशात वाढणे हे धोक्याचे आहे, इराक व सिरीयामध्ये जे काही चाललेले आहे त्याचीच ही भारतीय आव्रुत्ती असे लक्षात येइल.

प्रसाद१९७१'s picture

20 Oct 2014 - 9:47 am | प्रसाद१९७१

मीम चा उदय हा भाजप आणि हिंदुत्ववादी लोकांना फायदेशीर ठरणार आहे. पुढच्या निवडणुकीत हिंदु मते निवडुन येणार्‍या हिंदू उमेदवारासाठी एक होतील. आत्ता सारखी फाटाफुट पुढे होणार नाही.

विटेकर's picture

20 Oct 2014 - 10:23 am | विटेकर

टिपिकल पेनीवाईज पौन्ड फुलिश !
हिन्दू निवडून यावेत म्हणून मुस्लिमांचे ध्रुवीकरण ? हा तर भारताच्या सर्वधर्म समभाव प्रतिमेवर घाला आहे.
फारतर काय होईल , कॉग्रेस निवडून येईल .. येऊ दे ना ! कितीही झाले तरी कॉग्रेस हा पूर्ण भारतीय पक्ष आहे.
बापाचा मार आणि पोलिसांचा मार यात फरक आहे की नाही?
ब्रिटिशांनी असले ध्रुवीकरण केले त्याची विषारी फळे आपण सध्या पाकीस्तानच्या रुपाने भोगतो आहोतच ना ! अजून तुकडे व्हावेत असे वाटते का ?

प्रसाद१९७१'s picture

20 Oct 2014 - 2:29 pm | प्रसाद१९७१

माझ्या सर्व धर्म समभावाच्या कल्पनांमधे एक धर्म सोडुन बाकी सर्व धर्म येतात.

विटेकर's picture

20 Oct 2014 - 10:13 am | विटेकर

मी दुर्दैवी म्हणतो त्याची दोन कारणे :-
१. ही संघटना अतिरेकी आहे आणि केवळ विद्वेषातून जन्माला आली आहे. यांचे भले म्हणजे दहशतवादाला खत-पाणी !
२.अशा प्रकारचे अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण होणे म्हणजे त्यांनी मुख्य प्रवाहात येणे नाकारणे ! निजामाला हाकल्यानंतर इतक्या वर्षांनंतरही हा समाज स्वतःला सुरक्षित मानत नाही. हे एका अर्थांने आपल्या सर्वांचेच दुर्दैव आहे. वास्तविक जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत. पण ओवेसी सारखे नालायक त्यांना सतत भड्कवत ठेवतात.

आरपीआय आणि ओवेसी ही तुलना अत्यंत चुकीची आहे. आणि दुर्दैवी पण आहे. आरपीआय ने जातींचे ध्रुवीकरण केले तरीही ते देश कधीही तोडणार नाहीत. ओवेसी हा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. बाबासाहेबांनी हिंदुत्व सोडले पण परकीय धर्म स्वीकारला नाही. हे म्हणजे रागवलेल्या मुलाने दुसरा घरोबा करण्यासारखे होते. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ ही भावना नव्हती. सुशिक्शित सज्जनांना हा धोका ओळखता येऊ नये हे ही एक दुर्दैव च !
( बाबासाहेबांचे हे उपकार हिंदूनी कधीही विसरु नयेत आणि शहाणपणा शिकून आता- तरी जातीयता मोडावी )

.
.
.
.
- विटेकर ( बाबरी काळात संभाजीनगरात वास्तव्य केलेला )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2014 - 10:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

झॅक प्रतिसाद :)

नाखु's picture

20 Oct 2014 - 10:35 am | नाखु

नेहमी प्रमाणे संघच जबाबदार आहे अशा प्रतिक्रिया वाल्या अखिल मिपा "विचारजंता"च्या प्रतिसादाच्य अपे़क्षेत.

अवांतर : ते "सर्वधर्मसमभाव** वाले आणि "आप"चे खाप-पंचायत## वाले कुठे गायबले आहेत???

** संघद्वेष हाच एक कलमी कार्यक्रम
## "खुजलीवाल"चे अ-वीट प्रशंसक

संजय कथले's picture

20 Oct 2014 - 11:21 am | संजय कथले

MIM ला थांबवायलाच हव. मुस्लीम मतदारांनी देशहिताचा विचार करावा.

चौकटराजा's picture

20 Oct 2014 - 12:22 pm | चौकटराजा

ही संघटना अतिरेकी आहे म्हणजे नक्की काय इतिहास आहे? किती घातपात त्यानी केल्याचे पुरावे आहेत ? अन असले तर मग संघावरच्या बंदीचे गुर्‍हाळ चालविणारे सेक्यलर ( लालूच्या भाषेत शेकूलर ) काय करीत आहेत आतापावेतो ? आतापर्यंत किती खळ खट्याक प्रकरणी किती जणाना तुरूंगवास झाला आहे. तो ही अतिरेकच आहे ना? मोर्चा निवेदने निषेध
ई लोकशाही मार्ग जर नको असतील तर सर्वच प्रकारचा हिंसाचार गर्हणीय आहे.

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2014 - 12:33 pm | टवाळ कार्टा

अभ्यास वाढवा :)

चौकटराजा's picture

20 Oct 2014 - 3:01 pm | चौकटराजा

आमचा अभ्यास MIM च्या बाबतीत नाहीच. आता आपण अभ्यासू आहात तेंव्हा सांगा भडकारु भाषण व दहशतवाद यात काही फरक आहे की नाही ? व याच धाग्यावर या संघटनेवर १९४८ साली बंदी घातली होती ती का कधी व कोणी उठविली. अशा बंदी असलेल्या संघटनेला इलेक्शन कमिशनने का परवानगी दिली ? बाकी आम्ही काही मिम चे वकील नाही पण
भडकाउ भाषण देऊन महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले नेते आहेत की नाहीत ? ते सांगा !

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2014 - 3:09 pm | टवाळ कार्टा

http://www.misalpav.com/comment/624864#comment-624864

व्हिडीओच्या लिन्का वेळ मिळाला की चिकटवतो

सुहास..'s picture

20 Oct 2014 - 9:16 pm | सुहास..

रझाकार म्हणजे निजामाची फौज, उर्वरित फौज, जी ऑपरेशन पोलो मध्ये कुत्र्यासारखी मारल्या गेली, जिला त्या काळच्या पाकिस्तान ने ( बहुधा २ करोड ) ची मदत केली होती , ऑपरेशन पोलो मध्ये सामान्य मुस्लीम जनता ही भरडल्या गेली दिनांक १८ सप्टेबर, या दिनांकाला आजवर हैद्राबाद मध्ये काही ठिकाणी " ब्लॅक डे " म्हटल्या, जाते, काही ठिकाणी 'लिबरेशन डे' !! निजामशाही मोडीत काढण्यासाठी ' लोहपुरुषाच्या ' कारकिर्दीला लागलेला बट्टा म्हणजे ' ब्लॅक डे, औ.बाद आणि मालेगाव वा त्या भागात सध्या जिवंत असलेली सामान्य जनता म्हणजे निझामशाही मोडीत असताना वाचलेली जनता , ओवेसी चे सपोर्टर , मी , त्यांचा सक्सेसर, ज्यांनी त्यांना वाचविले, लहान बाळांना मृत्युपासुन, त्यांच्या स्त्रियांना बलात्कारापासुन , वाचवायसाठी माझ्या अन्सेस्टर्स ला लढावे लागले नाही, माझ्या घरात ते येवु शकत नव्हते, माझ्या घरातलं साधं पाणी ही पिवु शकत नव्हते, रस्त्यान जाताना अ‍ॅन्सेस्टर्स ची सावली जरी पडली तरी आंघोळ करणारे सैनिक कसे काय घरात घुसतील !! .......

इतिहास च्यायला लय वाईट स्साला !!

नांदेड महानगरपालिकेत त्यांचे ११/१२ का काहीतरी नगरसेवक आहेत त्यांनी मधे महानगरपालिकेत राष्ट्रगीत होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती.

अकबरुद्दिन याची काही भडकावु विधाने
१} अजमल कसाबला फासावर लटकवले केवळ तो एक पाकिस्तानी बच्चा होता म्हणुन,पण मोंदींना फासावर लटकवले नाही कारण ते हिंदूस्थानी आहेत.
२} हिंदूंचे देव श्रीराम आणि त्यांची माता कौसल्या यांची टिंगल अकबरुद्दिन यानी केलेली आहे.
३}हैद्राबादच्या भाग्यलक्ष्मी मंदीरातील भाग्यलक्ष्मी देवीची टंगल :- मला लक्ष्मी माहित आहे, पण ही भाग्यलक्ष्मी कोण ? ते आम्हाला माहित नाही. हे मंदिर अनधिकॄत आहे. इतक्या जोरात तुम्ही आरोळ्या द्या की भाग्य सुद्धा कापायला लागेल आणि लक्ष्मी सुद्धा खाली पडेल,यावर संपूर्ण सभेत अल्लाहु अकबरच्या जोरदार घोषणा झाल्या.
४} हिंदूंच्या सणांची टिंगल :- आमचे सण २ आहेत ! पण हिंदूंचे सण किती ते पहा... दर १० दिवसाला १
५} आंध्रप्रदेश मधील पोलीस म्हणजे षंढांची फौज आहे.
६} जर बांग्लादेशी घुसखोरांना परत पाठवले गेले तर ते मी कधीही सहन करणार नाही.
७}पूर्व पंतप्रधान नरसिंहवराव जर मेले नसते तर मी त्यांचा गळा आवळला असता.

मुंबईतल्या मुस्लीम मतदारांनी यावेळी बाहेर पडुन जास्त मतदान केले नाही,असे सध्या म्हंटले जाते आहे, पण मग भायखळा मतदारसंघातून वारिस युसूफ पठाण यांनी 25,314 मतांनी दणदणीत विजय कसा काय मिळावला ? त्याला मतदान करणारे नक्की कोणत्या विचारांचे आहेत ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

एका उत्तम लेखाचा दुवा दिल्या बद्धल धन्यवाद !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

जेपी's picture

20 Oct 2014 - 12:41 pm | जेपी

स्थापना-1927 साली हैद्राबाद संस्थानाचे नवाब महमुद नवाझ खान यांनी केली.
उद्देश-स्वतंत्र भारतात हैद्राबाद विलीन होऊ नये यासाठी दीड लाख रजाकारांची फौज.
1948 साली MIM वर बंदी.नेता कासीम रिजवी 57 पर्यंत अटक

सतिश गावडे's picture

20 Oct 2014 - 1:48 pm | सतिश गावडे

रजाकार हे संघटनेचे नाव आहे का?
इतिहासाच्या जाणकारांनी जरा प्रकाश टाकावा.

रझाकार संघटना नव्हती. MIM चे अत्याचारी कार्यकर्ते किंवा सैन्य .हैद्राबादच्या निजामाच्या आदेशाने चालणारे.

1957 साली कासिम रिजवी सुटला.MIM ची सुत्रे अब्दुल औवेसी कडे देऊन रिजवी पाकिस्तानात गेला.
1984 पासुन हैदराबाद लोकसभा मतदारसंघ MIM कडे.
2014 मध्ये तेलंगणात 9 विधानसभेत विजयी.MIM ला निवडणुक आयोगाची मान्यता.

पातेल्यातलं सगळं श्रीखंड आपल्याच ताटात पडलं पाहिजे हा हेका महागात पडला. १३५ जागा लढवू एकपण कमी नाही जणू काही सर्व १३५ निवडून येणार होते. २४४ चे ६३ आणि दुसरीकडे मराठी तरूण पोरांच्यावरफक्त भिस्त ठेवून २२५सात एक हे उत्तर मतदारांनी दिलं.

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2014 - 2:16 pm | प्रभाकर पेठकर

मनसे ह्या निवडणुकीत खूपच मागे पडला मी तर म्हणेन अधोगती झाली.
मनसेची, डोळे उघडणारी, वाताहात लोकसभेच्याच निवडणूकीत झाली. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूका आल्याने मनसेला 'सुधारण्यासाठी' वेळच नव्हता. लोकसभेचे प्रश्न वेगळे विधानसभेचे वेगळे. राज्यातील मतदार आमच्याच बाजूने ह्या भ्रमात राज ठाकरे राहिले. निदान, त्यांनी 'हेच' सत्य आहे असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण राज ठाकरेंच्या नकलांना, उथळ विधानांना आणि निष्क्रियतेला कंटाळली होती/आहे. राज ठाकरेंकडून असलेल्या अपेक्षा धुळीला मिळाल्याने मतदार नाराज आहेत. नाशिक मध्ये सत्ता असून आपला प्रभाव पाडू न शकलेल्या मनसेला मतदारांनी धुत्कारले आहे.
येत्या ५ वर्षात नाटकं करण्यापेक्षा कांही भरीव कार्य केले तरच पुढच्या निवडणूकीत मतदार मनसेचा पुन्हा विचार करू शकतील.

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2014 - 2:27 pm | प्रभाकर पेठकर

ताजी बातमी...

मनसेचे चिन्ह (इंजिन) आणि राजकिय पक्ष म्हणून मान्यता धोक्यात. प्रादेशिक पक्ष म्हणून कमीतकमी ३ उमेदवार निवडून येण्याची आवश्यकता आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Oct 2014 - 8:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सर्वांना एकत्र घेवून विकास हे भाजपावाल्याण्चे धोरण मतदारांना पसंत पडले. ह्यापुढे लोकांत भाषेच्या आधारावर फूट पाडता कामा नये हे राजने लक्षात घ्यावे.त्यात मराठी-गुजराती हा वाद अगदी ओढून ताणून निर्माण केला गेला.
मतदारांनी मनसेला जरा जास्तच हग्या दम दिला असे हे म्हणतात.

मतदारांनी मनसेला जरा जास्तच हग्या दम दिला असे हे म्हणतात.

तुमचे हे नेहमी तुमच्या आडून का मतं मांडतात का आयडी ब्लॉक झाला?

तसं नसेल तर त्यांनापण लावा की गोडी मिपाची. ;)

धर्मराजमुटके's picture

20 Oct 2014 - 9:26 pm | धर्मराजमुटके
ऋषिकेश's picture

21 Oct 2014 - 11:56 am | ऋषिकेश

भावनिक विश्लेषण आहे.

असो.
एमायएम सारख्या संघटनांचे फोफावणे काँग्रेस (वा तत्सम) हा पक्ष मजबुत/समर्थ (पर्याय) का असावा हेच अधोरेखीत करते (कॉंग्रेस जिंकावी की हरावी हे त्या त्या निवडणूकीत ठरेल मात्र काँग्रेससारखा पर्याय मजबुत व समर्थ असणे गरजेच आहे. नाहितर लोक अशा वेगळ्या वाटा चोखाळतात)

काँग्रेसमुक्त भारताच्या कल्पिताना (किंवा वल्गना करताना) ज्या गोष्टींकडे काणाडोळा केला जातो ती आता अशी पुढे आल्यावर तरी अशा घोषणांना जनता थारा देणार नाही अशी अपेक्षा!

पुन्हा काँग्रेसम्हणजे काँग्रेस हा पक्ष नव्हे तर तत्सम कोणताही "मध्यममार्गी" असल्याचे भासवणारा पक्ष

इन जनरलच या प्रतिसादाशी असहमत.
विशेषतः दुसरीकडे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे

हो. विकासाचा मुद्दा आणि मीम ला मिळालेली मते यांचा काहीही परस्परसंबंध असेल असे वाटत नाही.
आणि विकास कधी होतो, जेव्हा शेवटच्या कडीपर्यंत विकास पोचतो तेव्हा. मुस्लिमसमाजाबद्दल माझे असे पर्सेप्शन आहे की त्यांना मिळालेले सगळे पैसे वेगळ्याच कारणासाठी नेते वापरतात आणि त्यातीलच काही पैशांच्या सहाय्याने सामान्य मुसलमान दारिद्र्यात आणि अज्ञनात कसा राहील याची काळजी घेतात. हे जो कोणी थांबवू शकेल तोच मुसलमानांचा विकास करू शकेल.

मिम आणि तत्सम लोक हे काँग्रेसनेच पोसलेली एक विषवल्ली आहे, तिचा भ्समासूर बनून आता तो त्यांनाच गिळायला आला आहे.
---------------
अवांतर - पूर्वी मी देखील सेक्युलर होतो, अगदी संघात जाऊन सुद्धा. पण कॉलेजात असताना एका मिसरूडपण न फुटलेल्या मुलाने तुमचे एव्हढे देव का म्हणून मला हिणवले, आणि तेव्हा मला सेक्युलर आणि स्युडोसेक्युलर मधला फरक कळला. तेव्हापासून मी खर्‍या सेक्युलॅरिझमची पाठराखण करतो. म्हणूनच मला मिमच्या उदयामध्ये काही वावगे वाटत नाही. जोपर्यंत त्यांना मते देणार्‍यांना त्यात काही वावगे वाटत नाही तोपर्यंत असे पझ येतच राहणार. धर्मनिरपेक्ष राजकारण करणे हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे असे मला वाटते.

काळा पहाड's picture

21 Oct 2014 - 4:48 pm | काळा पहाड

पण कॉलेजात असताना एका मिसरूडपण न फुटलेल्या मुलाने तुमचे एव्हढे देव का म्हणून मला हिणवले, आणि तेव्हा मला सेक्युलर आणि स्युडोसेक्युलर मधला फरक कळला.

मला पण पूर्वी एका 'मित्रा'नं तुमचा शिवाजी म्हणजे चहाची टपरीवाला का असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याला सांगितलं की मी तुला माझ्या घरी बोलावल्यानं मला हवं तसं उत्तर देता येत नाहीये. जवळच्या शिवसेनेच्या शाखेत जाऊ. तू त्यांना हा प्रश्न विचार आणि मग बघ. सध्या अर्थातच या जमातीत मला एकही मित्र नाहीये.

चौकटराजा's picture

22 Oct 2014 - 6:12 pm | चौकटराजा

एव्हढे देव का म्हणून मला हिणवले, असे माझा एक मुसल्मान मित्र मला म्हणतो तरीही मला हिणवल्यासारखे काही वाटले नाही कधी. रोज सहा सहा वेळा प्रार्थना कशाला? असे मी ही त्याला म्हणतो तरीही आमची मैत्री कायम आहे. माझे निरिंक्षणाप्रमाणे काही हिंदू ही अतिरेकी स्वभावाचे असतातच ! ( माझा एक भाचाच आहे ! ) डों मीना प्रभू या अनेक इस्लामी देशात फिरून आल्या आहेत. कित्येक देशातील मुसलमानाना हिंदू हे काय आहे हे ही माहीत नाही. मग हिंदू प्रेम वा द्वेष याचा विचार लांबच ! माझे सिराज खान नावाचे बोस्टन स्थित फेसबुक मित्र आहेत. आमच्यात असा काहीही विषय कधी चर्चेस येत नाही. हे सगळे भारतातच घडते.

हिणवले की थट्टा केली हे तुमची मैत्री किती घट्ट आहे आणि तो माणूस किती लोकांच्य समोर तुम्हाला बोलत आहे यावर देखील अवलंबून असते. वरील प्रसंगात मी अतिशय शांत होतो, पण माझ्याबरोबर असलेली इतर मुले मुली भयंकर खवळलेली होती. त्यांना शांत करयाचे काम मी केले होते.
आणि त्यानंतर मी त्याच्याशी १ तास वादही घातला होता. माझ्या तत्कालीन हिंदु धर्माच्या ज्ञानावर. यावरून तुम्हाला नक्केच कळले असेल की ती थट्टा नव्हती.

पुन्हा काँग्रेसम्हणजे काँग्रेस हा पक्ष नव्हे तर तत्सम कोणताही "मध्यममार्गी" असल्याचे भासवणारा पक्ष

उलटपक्षी प्रॉब्लेम भासवाभाशवीनेच निर्माण झाला नाही ना अशी शंका वाटते. या हिशेबाने आपण लोक चर्चा करत आहात ती मीमही स्वतः सेक्यूलर म्हणवते. तथाकथीत डावे आणि मध्यममार्गींपैकी राजकारणात असलेल्या कुणाही दहा राजकारणी नेत्यांना रँडमली पकडा आणि सेक्युलॅरीझमचे थेअरऑटीकल समर्थन करून दाखवण्यासाठी सांगा आणि पटले असल्याचे त्यांच्याच अनुयायांकडून गुप्त सर्वेतून तपासले तर काय रिझल्ट येईल असे वाटते ? केवळ बेरजेचे राजकारण आणि दुसर्‍या एखाद्या पक्षावर आगपाखड आणि तोंडदेखले स्वतःस सेक्यूलर म्हणवून घेऊन कुणा अनुयायाच्या मनावर सेक्युलॅरीझम ठसवता येतो का ? बेरीज न करणार्‍या पक्षातून, बेरीज करणार्‍या राजकीय पक्षात गेले की राजकारणी सेक्यूलर कसे होतात ? नेमके कोणते सेक्युलॅरीझमचे इंजेक्शन अथवा टॉनीक दिले जाते या सेक्यूलर पक्षांच्या टोप्यातून की त्या त्या पक्षाची टोपी घातलेली माणसे सेक्यूलर होतात ? की भासवा भासवी = फसवा फसवी असे समीकरण तयार होते ? एकुण भासवाभासवीच्या सेक्यूलर राजकारणाने भारतात सेक्युलॅरीझम यशस्वी झालाच असता, तर तुम्हा आम्हावर ह्या चर्चेची पाळी आली असती का; या बद्दल मी साशंक आहे