" पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र"

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
16 Oct 2014 - 2:53 pm
गाभा: 

विदर्भाचे जौ द्या.. तो तर एक अर्वाचीन प्रश्न आहे आणि मिपावरील चर्चा पाहल्यास नवराज्यकर्त्याना हा प्रश सोडविण्याच्या अनेक टिप्स मिळतील. त्यामुळे हा प्रश्न आता चुटकी सरशी सुटेल असा विश्वास वाटतो.
पण त्यानिमित्ताने " पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र" असावे असा प्रस्ताव मांडतो. वास्तविक हा प्रस्ताव तसा फार प्राचीन ! किती प्राचीन ते वल्लीशेट ना विचारा , किमान " वाकाट्क" काळ तरी असेल , पण मुद्दा तो नाही , स्वतंत्र पुण्याचा आहे !
- पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक दरी प्रचंड खोल आणि रुंद ही आहे. ( पुण्यातल्या पुण्यात देखील विविध दर्‍या आहेत, जसे की नदी पलिकडचे आणि अलिकडचे , पण त्याचा विचार नंतर करु) ही दरी आपण मिपावरही अनेक वेळा अनुभवली असेलच.
- जे पूण्यात आहे ते इतरत्र नाही आणि जे पुण्यात नाही (पुणे तिथे खरे म्हणजे काय उणे ?) त्याची पुण्याला गरज नाही.जसे की मुंबईची लोकल पुण्याला नको आहे , नागपूरचा उन्हाळा - हिवाळा पुण्याला नको आहे, बारामतीच्या धरणातले पाणी तर अज्याबात नको )
- पुण्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतिहास पूर्णपणे वेगळा आहे. वास्तविक खर्‍या इतिहास हा पुण्याचाच ! बाकीचे सारे इतिहास विषयापुरते !आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
- पुणे आज ही ऐतिहासिक शहर आहे ,इथल्या जाज्वल्य परंपरांचा इथल्या लोकांना प्रचंड अभिमाण आहे ! उदा. टांगेवाले गेले आणि रिक्षावाले आले .. पण मग्रुरी? तीच ....! घोडे गेले, सायकली गेल्या , स्वयंचलित आल्या पण रस्त्यावर आपलेच घोडे दामट्ण्याचे पुणेरी रक्त ? अजूनही तेच आहे ! आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
- बारभाई गेले पण पुण्याच्या सोसायट्यांमधील कारस्थाने ? .. अजून सुरुच आहे. आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?
- पुण्यातील बाळंतपणाच्या हॉस्पिटलमधील खोल्याखोल्यात " विद्वान" जन्माला येतात, जिज्ञासूनी अधिक माहीती घ्यावी.
आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?

यांसारखे अजून बरेच मुद्दे आहेत आणि प्रस्ताव पुढे जाईल तसे अधिकाधिक सुचत जातील. तुमचे काय मत आहे या प्रस्तावावर?

प्रतिक्रिया

पुणे ह्या विषयावर बोलण्याचा आपला वकूब नसताना काही मंडळी उगाचच तसे करून स्वतःचे हसे करून घेत असतात. मिपावरही भरपूर आहेत. चालू द्यात. चालू द्यात!

मुक्त विहारि's picture

16 Oct 2014 - 7:05 pm | मुक्त विहारि

लुना वाले ब्रह्मे आणि पा.पो. मॅडमच जास्त सांगू शकतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Oct 2014 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

पा.पो. नै कै....पो.पा. लुनावाले ब्रम्हे, पोतदार-पावसकर मॅडम, सप्तर्षीबैंच मांजर हे सगळे पुण्याचे अलंकार आहेत.

हरकाम्या's picture

18 Oct 2014 - 2:21 pm | हरकाम्या

हे " लुनावाले ब्रम्हे " कोण आणि त्यांची लुना अजुन जिवन्त आहे का ? का ती गेली केळकर संग्रहालयाची शोभा
वाढवायला ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Oct 2014 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नुसता लेख वाचु नका खालच्या प्रतिक्रिया पण वाचा ;)

इरसाल's picture

20 Oct 2014 - 4:36 pm | इरसाल

मी तर तो लेख माझ्या क्रोम मधे बुकमार्क करुन ठेवलाय. जेव्हा पाहिजे तेव्हा वाचता यावा.आणी अजुन एक आहे मांजराचा पण. करमणुक मांजराची असा आहे. ही लिंक
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4612028515630603865

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2014 - 10:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तेच हो. सप्तर्षीबैंच मांजर =))

विलासराव's picture

16 Oct 2014 - 3:17 pm | विलासराव

विटूकाका अध्यात्माची नवीन शाखा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 4:23 pm | अत्रुप्त आत्मा

@अध्यात्माची नवीन शाखा>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

पिंपातला उंदीर's picture

16 Oct 2014 - 3:26 pm | पिंपातला उंदीर

सदशिव पेठ नावच स्वतन्त्र "राष्ट्र" अस असत तर अजुन अचुक झाल असत

अगदी, याहूनही अचूक बोललो असतो पण नसतीं राळ उडायचीं!! ;)

काळा पहाड's picture

16 Oct 2014 - 3:34 pm | काळा पहाड

वेगळं कोथरूड झालंच पाहीजे.

चौकटराजा's picture

16 Oct 2014 - 6:33 pm | चौकटराजा

कोथरूड ला कोण राज्य करतात याच्याशी आम्हाला काही देण घेण नाही पण माझ्या भुसारी कॉलनीत जर कोथरूड वाल्यानो लक्ष घालाल तर गाठ या राज भुसारी शी आहे. कोथ्रूडच्या खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी डाव्या भुसारीच्या उधोदादाला धाडतोच मग ! मायला काय व्हील ते जाईल ! पुण्ययनगरीनियमदीपिका गेली खड्ड्यात !

काळा पहाड's picture

16 Oct 2014 - 10:11 pm | काळा पहाड

- प्रति, राज भुसारी साहेब, डावी भुसारी

आमचे उजव्या भुसारी राज्याशी सैनीकी संबंध आहेत हे लक्षात घ्या. तुमच्या पाण्याच्या साठ्यांवर धाड घालायला उजव्या भुसारीचे पंतप्रधान श्री. जानकर तयारच आहेत हे लक्षात ठेवावे. बाणेर देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी (श्री. आठवलेंनी) तिकडची सीमा बंद करायचं मान्य केलं आहे. वारजे राष्ट्राच्या सीमेवर आमच्या फौजा गस्त घालतच आहेत. आणि बावधन देशाशी तुमचं शत्रुत्व आहेच. तेव्हा तुमच्या चतु:सीमा आम्ही बंद केल्या आहेत. आता तुमच्या जनतेला कसा प्रवास करायचा आणि भाजी आणि धान्य कुठून आणायचं ते नीट समजावून सांगा. शिवाय कोथरूड ची सर्व कीलोग्रेड अण्वस्त्रे आम्ही डाव्या भुसारी च्या सीमेवर तैनात केलेली आहेत. नारायणपेठ देशाचे सरसेनापती श्री. राणे यांनी उधोदादांशी दोन हात करायला उत्सुकता दर्शवली आहे आणि गेले काही दिवस ते जोरबैठका काढण्यात मग्न आहेत. उधोदादांना पाठवून द्याच.

- आपला, अफजलखान, प्रधानसेवक, कोथरूड.

चौकटराजा's picture

17 Oct 2014 - 7:01 am | चौकटराजा

ह ह पु वा !

विटेकर's picture

17 Oct 2014 - 10:54 am | विटेकर

चोक्कस !
येत्या शनिवारी शिवतिर्थनगरचा अनुशेष भरुन काढ्ण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल. लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे.

पैसा's picture

17 Oct 2014 - 11:04 am | पैसा

नंतरची सभा कुठे? लकडी पुलावर का?

विटेकर's picture

17 Oct 2014 - 11:08 am | विटेकर

नाही !!
तुम्हारा चुक्याच !
नंतरची सभा म्हातोबाच्या डोंगरावर ...... त्या सीमा एकदा निश्चित केल्याच पाहीजेत .

ते तुम्ही कोथरुडकर आणि हिंगणेकरांनी बघून घ्या हो! आम्ही आपले काही झाले तरी टाळ्या वाजवणार! =))

किसन शिंदे's picture

16 Oct 2014 - 4:12 pm | किसन शिंदे

नागपूरचा उन्हाळा - हिवाळा पुण्याला नको आहे, बारामतीच्या धरणातले पाणी तर अज्याबात नको )

नक्की कुठून ते कुठपर्यंत असणारं पुणे तुम्हाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अपेक्षित आहे?

सुहास..'s picture

16 Oct 2014 - 4:30 pm | सुहास..

शिळ्या कढीला उत !!

रवीराज's picture

16 Oct 2014 - 4:56 pm | रवीराज

जेथवर नजर जाईल तेथवर.....
फक्त उभे कुठे रहायचे, शनिवार वाडा की पर्वती हाच प्रश्न शिल्लक आहे.

रवीराज's picture

16 Oct 2014 - 4:56 pm | रवीराज

जेथवर नजर जाईल तेथवर.....
फक्त उभे कुठे रहायचे, शनिवार वाडा की पर्वती हाच प्रश्न शिल्लक आहे.

आमाला वेगळ वडगाव बुद्रुक दिलाच पायजे.

आदूबाळ's picture

16 Oct 2014 - 8:01 pm | आदूबाळ

चुकून

वे(ड)गळ वडगाव बुद्रुक

वाचलं.

रेवती's picture

16 Oct 2014 - 5:37 pm | रेवती

अरे काय हसवताय!
लेख वाचला नाही पण प्रतिक्रिया मस्त आहेत.

पैसा's picture

16 Oct 2014 - 6:01 pm | पैसा

स्वातंत्र्य कशाला पाहिजे, प्रत्येक पुणेकर हे एक स्वतंत्र राष्ट्र असते.

तीव्र (हल्लीच्या फ्याशननुसार) सहमती!!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 6:14 pm | अत्रुप्त आत्मा

साडेचार वर्ष मिपा-वयाला (हल्ली :p ) वयोवृद्ध म्हणतात काय हो??? :D

साडेतीन वर्षाचं मिपावय जर ल्ल्ल्ल्लू करणारं बाळवय असेल तर साडेचार वर्ष वयोवृद्ध असायला काय्येक हरकत नाही. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा

@असायला काय्येक हरकत नाही. >>> अच्च होय! :D त्यात फक्त दिडच वर्ष पुरलं! :p
चालायचच!!! असो! ;)

साडेचार वजा साडेतीन= एक वर्ष !! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 9:38 pm | अत्रुप्त आत्मा

ठिक हो.. पण आपल्या वयाचं काय? मी आपलं माप-काढलवतं..(दिड वर्ष वजावटीचं! :p )
ते सोइस्करपणे कसं टाळलंतं? =)) भारीच द्वाड हो सुडुकशेट! =))

>>मी आपलं माप-काढलवतं..(दिड वर्ष वजावटीचं! ) ते सोइस्करपणे कसं टाळलंतं?

छे टाळलं कुठे? मान्य आहे की !!

>>भारीच द्वाड हो सुडुकशेट!

मिपावर नवीन कुठेय हा द्वाडपणा !! =))

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा

अचानक.. ते नविनच असतं! =))

>>अचानक.. ते नविनच असतं!

माझ्या (तुम्ही म्हटल्यानुसार) दीड वर्षाच्या बाळबुद्धीला याचा अर्थ कळलेला नाही. पण 'शेवटचा प्रतिसाद माझाच' हा हट्ट असेल तर चालू देत. ;)

विटेकर's picture

17 Oct 2014 - 9:25 am | विटेकर

अतितीव्र सहमती ... नदिच्या अलिकडल्या लोकांनी "तीव्रतर सहमती" म्हणावे हवे तर !

ते एक असो, पण मूळ लेखाचा विषय पुणे असूनही त्यातील १/३ शब्द 'पुणे' असे नसल्याबद्दल लेखाला फाऊल धरल्या गेले पाहिजे असा एक प्रस्ताव मांडतो.

पैसा's picture

16 Oct 2014 - 6:19 pm | पैसा

अरे विटुकाका वरिजिनल पुणेकर नसतील

विटेकर's picture

17 Oct 2014 - 9:23 am | विटेकर

तेच ते !
सकाळी इटं आन दुपारी उफराटं .... वालं विटा.... ( संदर्भ - माणदेशी माणसे - व्यंकटेश माडगूळ्कर )

रवीराज's picture

16 Oct 2014 - 11:48 pm | रवीराज

त्यामुळेच तर दोन पुणेकर हमरी-तुमरी वर आल्याचे दृश्य वरचेवर पहायला मिळते आणि बऱ्याच वेळा शेजारी-शेजारी रहाणाऱ्यामधे भारत पाकिस्तान सारखे संबंध असतात.

विटेकर's picture

16 Oct 2014 - 6:20 pm | विटेकर

संपादित ???
मिपावरील कायदा आणि सुव्यवस्था पार ढासळली आहे. लगेच राष्ट्रपती राजवट सुरु होते !

गणपा's picture

16 Oct 2014 - 6:25 pm | गणपा

काय्ये ना काका, आपल्या लोकांना कुठं थांबायचं कळत नाही. आपली ती मस्करी अन दुसर्‍याची ती कुस्करी असं वाटतं.
तेव्हा वेळीच खबरदारी घेतलेली बरी. ;)

सूड's picture

16 Oct 2014 - 6:26 pm | सूड

+१

मुक्त विहारि's picture

16 Oct 2014 - 7:02 pm | मुक्त विहारि

लूना वाले ब्रह्मे पण पुण्याचेच आणि पा.पो. मॅडम पण पुण्याच्याच...

म्हणूनच मी शक्यतो पुण्याला यायचे टाळतो...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Oct 2014 - 8:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आणखी येवू द्यात प्रतिसाद-सिंहगड रस्ता,पिंपरी,स्वारगेट्,विमाननगर्,कर्वे रस्ता, पर्वती... मिपाकर आहेत तिकडे..

विवेक्पूजा's picture

17 Oct 2014 - 10:49 am | विवेक्पूजा

माई काञज का विसरलात हो?

काळा पहाड's picture

17 Oct 2014 - 11:20 am | काळा पहाड

कात्रज, धायरी, भोसरी आणि तत्सम विभाग पुण्यात येत नाहीत.

विजुभाऊ's picture

16 Oct 2014 - 8:35 pm | विजुभाऊ

लूनावाल्या ब्रम्ह्याना " स्वतन्त्र्योत्तर पुण्यभूषण " मिळावा

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 9:47 pm | अत्रुप्त आत्मा

" पुणे " नावाचे एक स्व तंत्र = "राष्ट्र"
=================================
मामला खलास! =))

पिशी अबोली's picture

16 Oct 2014 - 10:08 pm | पिशी अबोली

लुनावाल्या ब्रह्म्यांचं एवढं का कौतुक कळत नाही. ४००० रुपये असे मूर्खपणाने घालवून वर ते असं जाहीररित्या सांगणारा माणूस पुण्याच्या सरहद्दीत पाऊल तरी ठेवायच्या लायकीचा आहे का?

श्रीरंग_जोशी's picture

16 Oct 2014 - 10:34 pm | श्रीरंग_जोशी

मलाही ब्रह्मेंचं कौतुक आहेच. का ते मात्र ठाऊक नाही. कदाचित पुरूष वाचक कधी काळी स्वतःचे'महागात पडलेले स्त्रिदाक्षिण्य' ब्रह्मेंच्या अनुभवाबरोबर जोडत असतील अन अप आपला एवढाही 'ब्रह्मे' झाला नाही असे समजून समाधान पावत असतील :-) .

ज्युनिअर ब्रह्मेंचा तर मी चाहता आहे.

पिशी अबोली's picture

17 Oct 2014 - 12:48 pm | पिशी अबोली

मी गमतीने म्हणाले होते. एपिक ब्रह्मेचं मलाही कौतुक आहे. आणि ज्यु. ब्रह्मे तर क्लास... :)

बॅटमॅन's picture

17 Oct 2014 - 12:58 am | बॅटमॅन

-एक तर लुनावाल्या ब्रह्म्यांचा इन्शिडेंट झाला युनवरशिटी रोडावर. म्हणजे प्रॉपर पुण्यात नव्हेच. भांबुर्ड्याच्याही पलीकडे.

-जर गुज्जू समाजात त्यागाचे महत्त्व सांगणारे गांधी होऊ शकतात अन त्यांचं कौतुकही होऊ शकतं तर पुण्यात ब्रह्मेंनी काय लूना मारलीये?

-तुम्ही गोवेकर उगीच अस्मिता घेऊन बसता पुण्याची. (आता पळतो)

आपला, पुणकदेशस्थ प्रौढमिरजकर.

पिशी अबोली's picture

17 Oct 2014 - 12:47 pm | पिशी अबोली

-म्हंजे पुणे राष्ट्रात उच्च शिक्षण घेणार्‍या लोकांनी काय विसा घेऊन जायचं का युनिवरशिटीत? शेजारी राष्ट्रातील मिरजकर हा कुटील डाव खेळत असतील, तर आम्ही ग्लोबल शांतता नांदवण्यासाठी या प्रश्नात हस्तक्षेप करू..
-गुज्जू वेगळे, पुणेकर वेगळे.
-तुमची अस्मिता तुम्हालाच लखलाभ. पण पुण्याची टिळकीय, आगरकरीय आयडेंटिटी पुसून तिला ब्रह्मीय आयडेंटिटी देण्याचे कारस्थान चालू असेल, तर मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने आम्ही हस्तक्षेप करु.. ;)

-व्हिसा घ्यावयाचा किंवा नाही, याचा निर्णय यथावकाश घेतल्या जाईलच. परंतु तो किस्सा 'पुण्या' त घडला नव्हता, हे नमूद करणे अवश्य वाटले.

-हो वेगळेच, परंतु उपमेपुरते समजून घ्यावे. मीनाक्षी म्हटल्यावर पर अन शेपूट कुठाय ते विचारू नये.

-पुण्याची आयडेंटिटी एका अर्थाने नेहमी 'ब्रह्मीय'च राहिलेली आहे की ओ ;)

पैसा's picture

17 Oct 2014 - 2:17 pm | पैसा

अबोल्या, मिरजकर हे पुण्यातील शत्रुराष्ट्राचे हेर आहेत असे सकृद्दर्शेनी वाटले हों! ;)

पुणकराष्ट्राच्या दक्षिणेतील मित्रराष्ट्राचे हेर ओ ;)

पुणकराष्ट्राला मित्र पण असतात? मला वाटले सगळ्या शत्रुराष्ट्रांनी घेरलेल्या भारतमातेची अवस्था असावी बिचार्‍यांची.

बॅटमॅन's picture

17 Oct 2014 - 2:29 pm | बॅटमॅन

सर्वांची नसली तरी पुणकराष्ट्रातल्या काही राज्यांची तशी अवस्था असेलही. ;) विशेषतः सदाशिविस्तान प्रांताची तशी अवस्था आहे असे कळते.

(नावातला श्लेष अभावितपणे चपखल जमून गेला खरा.)

विटेकर's picture

17 Oct 2014 - 2:42 pm | विटेकर

सदा-शिवि-स्तान
श्लेष... मस्तच हो ब्याटमन भौ ! ( "बॅ" लिहायला शिकायचे ! हे " बॅ " चोप्य -पेस्त केलयं , नाहीतरी आमचे स्वराष्ट्र बान्धव लगेच विचारतील... ह्या ह्या ह्या , हे कसे लिहलेन म्हणून ? ( उपशन्का- सानुअनासिक लिपीत असे लिहितात? ) तेव्हा हा अगाऊ - म्हण्जे आडवान्स खुलासा केला आहे )
(पानपतोत्तर काळात पुण्यकराष्ट्रातील काही घराणी दक्षिणेकडे ( "रमणा"नव्हे हो... दक्षिण दिशा ) सरकली... बहुधा मिरज प्रांतात .. तिथली पूर्वापार पुण्यकीय तैल बुद्धी अजून शाबूत आहे .. याचे समाधान वाटले )

हाहाहा, धन्यवाद विटेकरजी :) [ बॅ = bE ]

बाकी पानपतोत्तर काळात पटवर्धनांनी मिरजेवर राज्य केले खरे...पण पुणकराष्ट्राबरोबरच दक्षिणेकडून कर्नाटराष्ट्रातूनही कैक घराणी तिकडे स्थायिक झाली. तेव्हा तैलबुद्धीसोबतच सांबारबुद्धीही तिथे आहे. :)

रमेश आठवले's picture

16 Oct 2014 - 10:54 pm | रमेश आठवले

१७६० साली असलेल्या पुणे राष्ट्राची चतु:सीमा दाखविणारा नकाशा या लेखात सापडेल.
http://en.wikipedia.org/wiki/Maratha_Empire

पाकिस्तान सुद्धा एक स्वतंत्र राष्ट्र आहे. असो!

पुणे राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे?

आमची कुठेही शाखा नाही.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !!
जे का हिंडले बिंडले
पत्ता शोधण्यात गुंगले
ते उलटे जावोनी गंडले
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही
सुजला सुफला मुळा मुठा अन
दुथडी भरी नागझरी.
सर्वांचे चितळे पोटभरी
सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी
उण्या दुण्या चे काम नसे हे
पुण्या गुण्याचे नाव असे हे.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही.
जय हे जय हे जय जय हे.......
जय.पुणे......

विटेकर's picture

17 Oct 2014 - 11:55 am | विटेकर

आता कोणी तरी "प्रतिज्ञा" लिहायला घ्या रे !

हरकाम्या's picture

18 Oct 2014 - 2:26 pm | हरकाम्या

या नवनिर्मीत राष्ट्राचे " बोधवाक्य " पण ठरवा राव ते अजुन न ठरल्याने पोटात लै कळ मारतीय बघा.

विटेकर's picture

17 Oct 2014 - 11:57 am | विटेकर

सर्वांचे चितळे पोटभरी
चितळे कुणाचे ही पोट भरत नाहीत .... स्वतः चे सोडून !
दमड्या टिचवल्या शिवाय बाकरवडीचा चुराच काय वास देखील घेऊ देत नाहीत ते !

काळा पहाड's picture

17 Oct 2014 - 12:43 pm | काळा पहाड

तुम्ही प्रयत्न केलेला दिसतोय.

विटेकर's picture

17 Oct 2014 - 12:48 pm | विटेकर

प्रयत्न केलाय हे जरी कळले तरी ते पैसे मागायला येतील

सुबोध खरे's picture

17 Oct 2014 - 12:05 pm | सुबोध खरे

लष्कर भाग पुण्यात येतो काय? म्हणजे आम्ही ११ वर्षे लष्करात काढली तेंव्हा किंचित पुणेकर म्हणवून घेता येईल काय असा विचार मनात आला.

काळा पहाड's picture

17 Oct 2014 - 12:42 pm | काळा पहाड

त्यासाठी तुम्हाला कुणाचा तरी किंचितसा तरी अपमान करण्याची कला साधली पाहिजे (रेफरन्सः पु.ल.) आणि अपमान म्हणजे भांडण नव्हे. शालजोडीतले देणे ही एक कला आहे. सध्याचं उदाहरण द्यायचं तर उधोकाका करतात तो अपमान नव्हे, तो थयथयाट. थोरले काका करतात तो अपमान.

इरसाल's picture

17 Oct 2014 - 2:13 pm | इरसाल

तुम्ही स्वतःला पुणेकरा- पुणे अकरा असे म्हणवुन घेवु शकता.

श्रीगुरुजी's picture

17 Oct 2014 - 1:10 pm | श्रीगुरुजी

पुणे या देशात आम्ही जन्माने परकीय असेलेल्यांना (म्हणजे बारामती, इंदापूर इ. भागातले) आम्ही अजिबात पंतप्रधान होऊन देणार नाही.

पुणे या देशात आम्ही जन्माने परकीय असेलेल्यांना (म्हणजे बारामती, इंदापूर इ. भागातले) आम्ही अजिबात पंतप्रधान होऊन देणार नाही.

ह्या ह्या ह्या. श्रीगुरुजी भलतेच विनोदी बॉ तुम्ही. तुम्ही इतके हुकुमी अन जबरदस्त कस्से काय हो विनोदता?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2014 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्ही इतके हुकुमी अन जबरदस्त कस्से काय हो विनोदता?>> =)) अंतरीच्या कळा हो त्या....! =)) दुसरे कै नै! =))

मृत्युन्जय's picture

17 Oct 2014 - 2:49 pm | मृत्युन्जय

म्हणजे??? पुणे हे स्वतंत्र राष्ट्र नाही?

पैसा's picture

17 Oct 2014 - 4:58 pm | पैसा

ही अस्स्सल पुणेरी प्रतिक्रिया.

विजुभाऊ's picture

17 Oct 2014 - 3:14 pm | विजुभाऊ

शनिवॉर वाड्याला पुण्याचे राष्ट्रपतीभवन म्हणून घोषीत करावे.

मग संसद भवन कुठे? लाल किल्ला म्हणायचा तर लाल महाल आहेच म्हणा. चांदणी चौकही आहे.

काळा पहाड's picture

17 Oct 2014 - 3:33 pm | काळा पहाड

ओ तो चांदणी चौक पुण्यात हे का? पुण्यात शगुन चौक किंवा कुंटे चौकाला तो मान मिळायला हवा. संसद भवन सध्याच्या मंडईच्या ठिकाणी भरवता येईल. नाही तरी तिथेही खासदारांची खरेदी विक्रीच चालते नं? बाकी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीला रहावं लागतं. शनवार्वाड्यात भूत असताना कुठला राष्ट्रपती तिथं राहील? तेव्हा दुसरी जागा शोधा.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2014 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा

@लाल महाल आहेच म्हणा. चांदणी चौकही आहे.>>> छ्छे! ते पर्वतीवर हवं. आणि पायर्‍यांनी चढून येणार्‍यांनाच वेंट्री असेल..अश्या नि'यमासह! :p

बॅटमॅन's picture

17 Oct 2014 - 3:39 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी ;)

अन राष्ट्रीय डिष- शिक्रण विथ मटार उसळ.

विजुभाऊ's picture

17 Oct 2014 - 3:25 pm | विजुभाऊ

अरे खरेच की "रेसकोर्स रोड" सुद्धा आहे

बॅटमॅन's picture

17 Oct 2014 - 3:32 pm | बॅटमॅन

आयला हो की. अन दिल्लीत औरंगजेब रोड, लोधी रोड, अकबर रोड आहे तसा इकडे शिवाजी रोड, बाजीराव रोड आहे.

रायसीना हिल सारखी पर्वती हिल, चतु:शृंगी हिल अशा कैक हिला आहेत.

पराठे वाली गली सारखी खाऊगल्लीसुद्धा आहे. (नाव ते नस्ले म्हणून काय झाले)

घंटेवाला हलवाईप्रमाणे चितळे व काका हलवाई आहे. कुतुब मिनारासारखा सीओईपीजवळ हवेचा मीनार आहे.

काय नाही पुण्यात?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2014 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

@ कुतुब मिनारासारखा सीओईपीजवळ हवेचा मीनार आहे.

काय नाही पुण्यात?>>> मेल्या..क्यांपातलं लाल देऊळ विसरलास की! =))

बॅटमॅन's picture

17 Oct 2014 - 3:40 pm | बॅटमॅन

हाहाहा, रैट्ट :)

सूड's picture

17 Oct 2014 - 3:39 pm | सूड

>>घंटेवाला हलवाई

अशा नावाचा हलवाई आहे?? *dash1*

चांदणी चौकात आहे दिल्लीच्या. १७९० पासूनचा. सोहन हलवा नामक तत्रस्थ डिश लय फेमस आहे.

बॅटमॅन's picture

17 Oct 2014 - 3:41 pm | बॅटमॅन
नानासाहेब नेफळे's picture

17 Oct 2014 - 3:46 pm | नानासाहेब नेफळे

भेकड पुण्याचे शेळपट सैन्य, माझे प्रतिसाद झेपानात... तर कसलं डोंबलं राष्ट्र तुमचं छ्या.

कपिलमुनी's picture

17 Oct 2014 - 4:43 pm | कपिलमुनी

नानासाहेबांचा विजय असो !

कॅप्टन ऑफ द कुरसुंगी रेजिमेंट

काळा पहाड's picture

17 Oct 2014 - 4:49 pm | काळा पहाड

अं?nanasaheb

इरसाल's picture

17 Oct 2014 - 4:52 pm | इरसाल

आल्पिष्टन म्हणा की

स्वतन्त्र " भोपळे चौक " झालाच पाहिजे
:- बबन

स्वतंत्र वडगाव फाटा झालाच पायजे

-बबन

विटेकर's picture

17 Oct 2014 - 6:12 pm | विटेकर

माझ्या मिपावरील अखंड कारकिर्दीत आत्तापर्यन्तच्या कोणत्याच धाग्याला ९१ प्रतिसाद मिळाले नव्हते . मागचा उच्च्चांक ८९ होता !!! आणि ते सुद्धा दुष्ट संपादकीय कारवाई नंतर !
सर्व प्रतिसादकांचे मनः पूर्वक आभार !
.
.
.
.
.
.
माताय , गुणपूर्णता आणि लोकप्रियता यांचा काडिमात्र संबंध नाही !!

विटेकरजी, विषयाचा धिक्कार किती जरी केला असला तरी त्याचे महत्त्व तुम्हांला आता चांगलेच समजले असेल. ;)

विषयच असा ड्राम्याटिक हाये, चरचा तर होनारच.

यसवायजी's picture

17 Oct 2014 - 6:25 pm | यसवायजी

च्यामारी, एकादमात ३-४ धागे आलेत पुण्यावर. मी तर वरचं न वाचताच प्रतिसाद देत सुटलोय :))
चरचा तर होनारच्च्च.

यसवायजी's picture

17 Oct 2014 - 6:25 pm | यसवायजी

च्यामारी, एकादमात ३-४ धागे आलेत पुण्यावर. मी तर वरचं न वाचताच प्रतिसाद देत सुटलोय :))
चरचा तर होनारच्च्च.

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 8:13 am | सतिश गावडे

न वाचता प्रतिसाद देत आहेस ते ठीक आहे. पण एकच प्रतिसाद दोनदा? :)

यसवायजी's picture

18 Oct 2014 - 6:07 pm | यसवायजी

:D अति घाई दोनदा प्रतिसाद देई.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Oct 2014 - 1:03 am | अत्रुप्त आत्मा

:D

चौकटराजा's picture

17 Oct 2014 - 7:40 pm | चौकटराजा

या सर्व पोष्टी जेंव्हा तो मराठी चानलचा राजू श्रीवास्तव ( उर्फ राज अवास्तव ) वाचेल त्यावेळी ह ह पु वा होऊन त्याचा
निवडणुकीचा सर्व ताण खलास होईल. याचे सारे श्रेय मिपावरील पुण्याच्या शत्रूना आहे. हा शिलालेख इ स २०१४ मधे लिहिला असे.

पुढच्या कटट्याला जेव्हा पुण्याबाहेरचे(?) पुणेकरां(?)समोर येतील तेव्हा खरा बाका प्रसंग उभा राहील आणि निवाडा करण्यासाठी तीन नावे मला सुचली आहेत (=ट्रॉइका)ओळखा पाहू.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Oct 2014 - 8:50 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ऐतिहासिक विषयावरचा १०० वा प्रतिसाद.

बाकी युरोपियन युनिअन सारख आपण पुणे-पिंपरी चिंचवड युनिअन चालु करु. काड्या सारायला आंतराष्ट्रीय सहकार्य मिळेल म्हणजे. =))

अविनाशकुलकर्णी's picture

18 Oct 2014 - 11:27 am | अविनाशकुलकर्णी

काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न विचारतात की काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न विचारतात की " तुम्हाला पुणे का आवडते ?"

आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..?

आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने ,
पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही !

उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे ,
किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे,
पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे
( अहो कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून .,

गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे
( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर .. ,

सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,
जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे,
मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे,
पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे ,
लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे,
शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे,
अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे,
पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे,
'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे ,
'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे ,
इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे ,
'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे ,
नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे ,
सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे ,
आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे,
SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे ,
आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे ,
Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे,
चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,वैशाली च्या yummy सांभार चे पुणे,रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे,
तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे,
college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे,
Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे ,
पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,Nike आणि Reebok वाले पण पुणे ,
खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे,
कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे ,
कॅड बी आणि कॅड एम चे पुणे,सोडा शॉप चे पण पुणे,अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे,
University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे ,
कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे
( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही .. ,

नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे,
खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे,
आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे,
शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे,
बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे ,Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे,
सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे,आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे,
मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे,
पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे ,
आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे,
आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे,
Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि
चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे,
मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि... देशाचा defense शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या
आमच्या Southern Command चे पुणे,तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे,
बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे,
सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे,
ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे,
फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे ,
'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !,
०२० चे आणि MH "बारा" चे पुणे,आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे ,
जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे,सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे,
शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे,
पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे,
आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे ,
भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे,
ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे,
अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे ,
जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे
पुणे ,
अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या ,
अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे,
भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे,पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे,
bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे,
आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे ,
काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे ,
बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे,नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे,
उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे ,पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे,
घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! ,
शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे ,दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे,
कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे ,फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे,
आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे,

- नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे,
आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे,
रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे,जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे,
गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्र चंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे,
लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे,प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे,
आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे,
दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे… आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे,
दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे,Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे,
भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे,
ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे,सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे,
Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे,
आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे,अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे,
जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे,
सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे,
Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे,
पर्वती वर practise करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!
पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे,उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,
Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे,Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे,
कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे। सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे। घोटाळे बाज खासदारांचे पुणे ,
नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे ,
नवीन दादांचे पुणे,जुन्या भाईंचे पुणे,
बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !!

आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते?

आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..?

आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने ,
पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही !

उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे ,
किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे,
पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे
( अहो कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून .,

गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे
( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर .. ,

सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे,मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे,
पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे ,लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे,शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे,
अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे,पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे,'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे ,
'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे ,इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे ,'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे ,
नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे ,
सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे ,
आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे,
SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे ,
आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे ,
Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे,
चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,वैशाली च्या yummy सांभार चे पुणे,रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे,
तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे,
college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे,
Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे ,
पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,Nike आणि Reebok वाले पण पुणे ,
खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे,
कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे ,
कॅड बी आणि कॅड एम चे पुणे,सोडा शॉप चे पण पुणे,अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे,
University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे ,
कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे
( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही .. ,

नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे,
खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे,
आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे,
शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे,
बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे ,Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे,
सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे,आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे,
मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे,
पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे ,
आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे,
आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे,
Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि
चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे,
मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि... देशाचा defense शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या
आमच्या Southern Command चे पुणे,तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे,
बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे,
सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे,
ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे,
फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे ,
'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !,
०२० चे आणि MH "बारा" चे पुणे,आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे ,
जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे,सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे,
शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे,
पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे,
आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे ,
भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे,
ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे,
अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे ,
जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे
पुणे ,
अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या ,
अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे,
भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे,पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे,
bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे,
आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे ,
काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे ,
बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे,नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे,
उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे ,पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे,
घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! ,
शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे ,दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे,
कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे ,फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे,
आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे,

- नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे,
आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे,
रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे,जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे,
गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्र चंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे,
लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे,प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे,
आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे,
दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे… आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे,
दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे,Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे,
भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे,
ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे,सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे,
Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे,
आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे,अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे,
जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे,
सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे,
Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे,
पर्वती वर practise करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!
पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे,उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,
Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे,Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे,
कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे। सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे। घोटाळे बाज खासदारांचे पुणे ,
नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे ,
नवीन दादांचे पुणे,जुन्या भाईंचे पुणे,
बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !!

आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते?

इरसाल's picture

18 Oct 2014 - 11:49 am | इरसाल

एव्हढ सगळं म्हणजे काय आहे ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Oct 2014 - 2:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एवढ्या मोठ्या प्रतिक्रिया आवर्जुन देणार्‍यांचे पुणे _/\_

शाब्बास अविनाशकुलकर्णी. पाणी पिऊन आणि दम खाऊन प्रतिक्रिया देण्यास अठ्ठावीस युगे उशिर झाला.

विटेकर's picture

20 Oct 2014 - 10:58 am | विटेकर

पुण्यपत्तन राष्ट्राने एकजूट दाखवून एकाच प़क्षाला पूर्णपणे निवडून दिले आहे.
ही राजकीय प्रगल्भता महाराष्ट्रात इतरत्र दिसली का ?
म्हणून आम्ही म्हणतो -
आहे उर्वरित महाराष्ट्रात असे आणखी कोठे ?

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2014 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा

आमच्या मते,हे पुणे'तर पक्षांच्या विरोधी घडलेल्या मतदानामुळे झालय. ;-)