महाराष्ट्र विधानसभा निवडणूका - अंदाज अपना अपना

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
16 Oct 2014 - 1:10 am
गाभा: 

यावेळेस मिपावर कोणीच निवडणूकींच्या अंदाजाचा धागा काढला नाही. म्हणून आता मी काढत आहे.
(आन्यथा क्लिंटन, श्रीगुरुजी, ऋषिकेश इत्यादी नेहमी धागे काढतातच.

आसो, आपल्या महाराष्ट्रात आज निवडणूका पार पडल्या. यावेळच्या निवडणूका खर्‍या अर्थाने उत्कंठावर्धक ठरणार आहेत. पंचरगी लढतीतुन कोणाला काय मिळते याचा अंदाज बांधणे कठीण होतेय.

एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय. चाणक्य वगळता इतर सर्वांनी भाजपा ला १२५-१३० च्या आसपास जागा सांगतल्या आहेत.

व्यक्तिशः मला चाणक्यवर जास्त विश्वास आहे. कारण सरळ आहे, २०१३ आणि लोकसभेला त्यांचाच अंदाज सर्वात बरोबर ठरला होता. इतर सर्व सावधगिरीने निष्कर्ष देत आहेत असे वाटते

seats

percentage

तुमचा अंदाज काय?

प्रतिक्रिया

विलासराव's picture

16 Oct 2014 - 2:01 am | विलासराव

का ते माहीत नाय पण मला असं वाटतं शिवसेना , भाजपा, कॉग्रेस, राष्ट्र॑वादी, मनसे आनी अपक्ष असा क्रम असेल.

भाजपा बद्दलचा अंदाज खोटा ठरेल रादर खोटा ठरावा अशी इच्छा आहे. स्पष्ट बहुमत अजिबात मिळू नये. सिंगल लार्जेस्ट पार्टी असली तरी १००-१२० मध्ये रहावी.
अशुभाची शंका मनात घोळत आहे. ते टाळण्यासाठी काही पाय जमिनीला टेकणं आवश्यक आहे. अन्यथा येत्या १०-१५ वर्षात भारताचं वेगळं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे. असो!

माझ्यादृष्टीने भाजपा आता ११०-१२० मधे अडकणे अधिक धोकादायक आहे. एक तर त्यांना पूर्ण बहुमत मिळाले पाहिजे, किंवा मग ~९०, म्हणजे शिवसेनेची स्पष्ट गरज पडेल अश्या सीट्स.
१२०-१३० हा आकडा फारच विचित्र आहे. तिथे भाजपा पोचणे फारच घातक आहे राज्याच्या दृष्टीने..

पिवळा डांबिस's picture

16 Oct 2014 - 10:56 pm | पिवळा डांबिस

मिश्टर प्यारे१ यांच्याशी (बर्‍याच दिवसांनंतर!!) सहमत आहे!!!
(च्यायला, काय दिवस आणलेत या राजकीय पक्षांनी! "कुठे नेऊन ठेवलाय मिसळपाव माझा?")
:)

=))
तुम्ही सहमत होणं पहिल्यांदाच असावं.
बाकी आम्ही आपल्याशी बर्‍यापैकी नेहमी सहमत असतो.

चौकटराजा's picture

16 Oct 2014 - 7:07 am | चौकटराजा

भाजपा चा आलेख सुधारेल.
राज ठाकरेना " उशीर" या शब्दाचा अर्थ कळेल.
शिवसेनेला मोदींमुळे लोकसभेत जीवदान मिळाल्याचा साक्षात्कार होईल.
आपल्याला अजूनही मुस्लीम व अ.जा अ.ज यांची व्होट ब्यांक आहे याची खात्री काँग्रेसला होईल.
राकाला माज" या शब्दाचा अर्थ कळेल.
मोदी यातून बरेच काही शिकतील .' सामान्य लोकांच्या साठी असे काहीतरी केले पाहिजे ज्यात गरीब श्रीमंत मध्यमर्गीय
या सार्‍यानाच हायसे वाटेल.' हे ते शिकतील. ( मनमोहन यांच्या काळात घरगुती गॅसची बोगस नोंदणी 'चुन चुनके' सापडवून रद्द करण्यात आली व आता पुरवठा उत्तम आहे.. याला म्हणतात गव्हर्नन्स ! ) तहसीलदार, आरटीओ,बांधकाम परवाना अधिकारी ई ना "सरळ" करण्याचे काम राज ठाकरे यानी केले असते तर त्यांच्या मी महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवितो याला अर्थ होता.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Oct 2014 - 8:02 am | माईसाहेब कुरसूंदीकर

भाजपा सर्वात जास्त जागा जिंकणार असे दिसते आहे.सत्ता एकहाती मिळावी अशी अपेक्शा. मनसे,शिवसेना,राष्ट्रवादीचे राजकिय मूल्य जेवढे घसरेल तेवढे राज्यास्,देशास हितावह.

नानासाहेब नेफळे's picture

16 Oct 2014 - 8:37 am | नानासाहेब नेफळे

माझा अंदाज आहे की भाजप १००च्या वर जाणार नाही.एक्झिट पोलची डेमोग्राफीक सँपलींग चूकीची असण्याची शक्यता आहे.

भाजप ९५
सेना ८०
काँग्रेस ५० ते ६०
राकाँ ४० ते ४५
मनसे १५
इतर १५

काळा पहाड's picture

16 Oct 2014 - 9:58 am | काळा पहाड

नाना,
तुम्च्या सगळ्या लहान संख्या जरी घेतल्या, तरी ९५+८०+५०+४०+१५+१५=२९५ होतात. तेवढ्या शीटा तरी नकोत का? निदान पोस्ट करण्या पूर्वी बेरीज तरी करून बघायची!

(संपादित)

नानासाहेब नेफळे's picture

16 Oct 2014 - 10:03 am | नानासाहेब नेफळे

एके ठिकाणी रेंज द्यायची राहीली कापाभौ

अगदीच अमान्य करता येत नाही , सगळेच किमान अंदाज १५ दिवसापुर्वींचा आहे, तो प्रचार संपल्याशिवाय जाहीर करता येत नसल्यामुळे तसेच बसावे लागते !!

सहसा नसते फिरत पण या पंधरा दिवसांमध्ये 'मी जे राजकारण ' फिरताना पाहिलय की डोळे अक्षरशः विस्फारलेत !!अदांज बांधायच तर राहुच द्या :(

राजकारणात आंजापेक्षा पडीक असलेला

सहसा नसते फिरत पण या पंधरा दिवसांमध्ये 'मी जे राजकारण ' फिरताना पाहिलय की डोळे अक्षरशः विस्फारलेत !!अदांज बांधायच तर राहुच द्या

याबद्दल थेट वा किमान सुचकपणे काही लिहिता येईल का? वाचायला खूप आवडेल.

मला अशा पडद्यामागच्या कथा म्हणा, गॉसिप म्हणा (काय म्हणायचे ते म्हणा) खूप रस असतो ;)

लिहितोस का?

जाहिर लिहिता नसेल येणार तर किमान या गोष्टी ऐकण्यासाठी तुला एकदा भेटावेच लागेल! :)

सुहास..'s picture

17 Oct 2014 - 7:33 pm | सुहास..

:)

अत्रन्गि पाउस's picture

16 Oct 2014 - 8:39 am | अत्रन्गि पाउस

सध्या स्पष्ट बहुमत कुणालाही मिळण्याची शक्यता नाही आणि कोणतीही युती आघाडी आता नको...त्यामुळे उत्तम प्रतीचे कडबोळे व्हावे व फेरनिवडणुकांची वेळ यावी...
मग तेव्हा मात्र सर्व पक्षांना पुन्हा एकदा आत्ता हरलेल्या जागांवर ..नवीन चांगले उमेदवार द्यावेच लागतील ..पुन्हा एकदा आपला अजेंडा जाहीरनामा सादर करावाच लागेल
आणि माग बघू ..
आर्थिक दृष्ट्या महागडा प्रकार आहे पण एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागेल ....

कडबोळे तसेही येणार नाहीये.. जर भाजपा १००/११०च्या आत रोखला गेली तर आणि तरच कडबोळे येऊ शकते. ती शक्यता मला फारच कमी वाटते. आणि विशेष म्हणजे मतदानाचे ४ टक्के वाढलेत, त्यामुळे मला भाजपा एकहाती येईल असेच वाटते.

सुधीर's picture

16 Oct 2014 - 9:25 am | सुधीर

भाजपाला सर्वाधिक जागा मिळण्याच्या शक्यता आहेत हे Arithmetic, not ‘love jihad’ हा लेख वाचला तेव्हाच ताडलं होतं. मुंबई-पुण्यासारखी शहरे वगळता, महाराष्ट्राच्या इतर भागात असलेले खास करून तरुणांचे मोदींबद्धलचे आकर्षण भाजपाला सर्वाधिक जागा मिळवायला मदत करेलसे वाटते. तळ कोकणातही, भाजपाचीच चर्चा जास्त होती असं स्थानिकांशी बोलताना जाणवत होतं. मराठी अस्मितेचा (भावनिक) प्रश्न मुंबई-ठाणे पुरता मर्यादीत असल्याने, ही शहरं वगळता शिवसेना जास्त प्रभाव टाकू शकेल असे वाटत नाही. त्यातही, मुंबईत काही विभागातून काँग्रेस येण्याचे मुख्य कारण, अमराठी मतदारांचा "अँटी शिवसेना/मनसे" फॅक्टर असावा असं मला वाटतं. लोकशाही निवडणूकीच्या निकालावरून हा मतदार भाजपाकडे वळण्याची शक्यता जास्त आहे असे वाटते.

खरी गंमत जर भाजपाला सत्ता स्थापन करण्याइतपत जागा नाही मिळाल्या तर येईल. मग अजून कुठली "नवीन युती" हे राज्य पाहिल या चर्चाना जोर येईल.

सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य" च्या पोलवर विचार करतोय !
टूडेज चाणक्य'
(इमेज सोर्स :- लोकसत्ता}

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup
इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

अनुप ढेरे's picture

16 Oct 2014 - 10:06 am | अनुप ढेरे

याच चाणक्यवाल्यांनी लोकसभेच्या वेळेला एन्डीएला >३३० जागा मिळणार आणि भाजपाला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला होता. तेव्हा लय लोकांनी यड्यात काढलं होतं त्यांना.

पैसा's picture

16 Oct 2014 - 10:10 am | पैसा

तिथे जातवार मतदानाचा अंदाज दिला आहे. आपल्याला ही गोष्ट पटत नाही, आवडत नाही. पण भारतातलं ते अप्रिय सत्य आहे. निवडणूक निकालाच्या अंदाजासाठीचा तोच सगळ्यात विश्वासार्ह पाया आहे.

अनुप ढेरे's picture

16 Oct 2014 - 10:17 am | अनुप ढेरे

खरं. यावर काय प्रतिक्रिया द्यावी समजत नाहीये.

सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य" च्या पोलवर विचार करतोय ! +१ आसाच निकाल यावा.
किमान टक्केवारी तर बंद होईल.

काळा पहाड's picture

16 Oct 2014 - 10:00 am | काळा पहाड

एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय.
असं का? बरं बरं. दोन्हीतला फरक कळला तर आम्हालाही कळवा बरं का!

काळा पहाड's picture

16 Oct 2014 - 10:02 am | काळा पहाड

एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय.

असं का? बरं बरं. याच्यातला फरक कळला तर आम्हालाही कळवा बरं का..

अर्धवटराव's picture

16 Oct 2014 - 10:09 am | अर्धवटराव

साला उन्का टैम भोत अच्छा चल रहा है बाप.

कलंत्री's picture

16 Oct 2014 - 11:19 am | कलंत्री

पूर्वीच्या निवडणूका कार्यकर्ते, नेते, सभा , मिरवणूका इत्यादी भौवती फिरत होत्या. आता माध्यमे, अनर्गळ टिका, दोषारोप आणि मी म्हणेल तेच खरे या भौवती आहे.

"उन्का टैम भोत अच्छा चल रहा है".

स्वामी संकेतानंद's picture

16 Oct 2014 - 12:47 pm | स्वामी संकेतानंद

माझा अंदाज १९ तारखेला कळवतो.

मागे एका धाग्यावर लिहिले तसेच हे एक्झिट पोलचे सर्व्हे पाहिल्यावर वाटते. भाजपा सर्वात मोठा पक्ष बनेल किंवा काही जणांच्या मते बहुमतपर्यंत पोहचेल असे अंदाज आहेत मात्र विभागवार अंदाजात मोठी तफावत आहे. एबीपी वाले भाजपला विदर्भात ६२ पैकी ५०-५० तर कोकणात शून्य दाखवत आहेत हे दोन्हीही मला टोकाचे अंदाज वाटतात. झी वाले आधी आणि आताही विदर्भात भाजपला २५-३० हि रेंज देतात विदर्भात भाजपा जास्त जागा जिंकेल मात्र बाकींना एकदम चिल्लरमध्ये काढण्यात अर्थ नाहि. असे अनेक झोल विभागवार पाहिले तर लक्षात येतात. असो १९ तारीख लांब नाही काय ते कळेलच.

शिवसेनेला जे काही यश मिळेल ते स्वतःचे असेल. पंतप्रधान मोदी आणि केंद्रातला त्यांचा बाकी फौज फाटा (राजनाथ, सुषमा, उमा, गडकरी वगैरे) तसेच आजूबाजूचे भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री , आमदार वगैरे हे सगळे राज्य भाजपसाठी प्रचारात होते. सेनेकडे तसे मुख्यकरुन उद्धव, आदित्य आणि बाकी राज्यातले नेते होते. तरीही सेना जर ७५-८०च्या घरात खेळत असेल तर सेनेसाठी लक्षणीय यश मानायला हवे. या आधीचा त्यांचा उच्चांक ७३ आहे ते पण बाळासाहेब आणि युती असताना. शिवसेनेला पुढे राज्यात अजून विस्तारायची संधी आहे. खरा फटका एनसीपीला आहे. कॉंग्रेस तरुन जाइल त्यांचा खास मतदार अजूनही त्यांच्याकडे आहे.

प्रदीप's picture

16 Oct 2014 - 1:38 pm | प्रदीप

आतापासूनच पांढरे निशाण फडकावू नका, हो!

एखाद्या पक्षास यश मिळाले आणि तो स्वतःचे समर्थन नसलेला पक्ष असला, तरी त्याचे ह्या निवडणूकीपुरते कर्तृत्व कबूल करण्यात हरकत नसावी. इथे भाजपाने राज्याबाहेरून नेते त्यांच्या प्रचारासाठी आणले, ह्यात नक्की आक्षेपार्ह काय आहे? का महाराष्ट्र इतर भारताहून वेगळा असा स्वायत्त देश आहे?

तरीही सेना जर ७५-८०च्या घरात खेळत असेल तर सेनेसाठी लक्षणीय यश मानायला हवे. या आधीचा त्यांचा उच्चांक ७३ आहे ते पण बाळासाहेब आणि युती असताना. शिवसेनेला पुढे राज्यात अजून विस्तारायची संधी आहे.

सहमत आहे. शिवसेना बाळासाहेबांबरोबर संपेल असे विश्लेषण करणारे अनेक विश्लेषक तोंडघशी पडतील हे असे झाले तर!

शिवाय पुढे मागे मनसे, शिवसेना एकत्र आले (ते येतीलच बहुदा आता) तर ते पुन्हा एक मोठा फोर्स म्हणून उभे रहातील.

भाजपा, आपल्या नव्या "आयात" केलेल्या लोकांसह राज्य कसे करते ते बघायला हवे.

हा "कर्नाटक" फॉर्म्युला (तिथेही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रेड्डींना आयात केले होते) अंगाशी येऊ शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे. आयात व्यक्ती किती स्वच्छ आहेत, त्यांचे किती घोटाळे बाहेर येतात यावरही बरेच अवलंबून असेल!

दुश्यन्त's picture

16 Oct 2014 - 1:49 pm | दुश्यन्त

तेच म्हणतोय मी सेनेचे कर्तुत्व कमी समजायला नको.आणखी एक सेना एकट्याच्या बळावर लढली ( आर पी आय, स्वाभिमानी, रासप, मेटे हे भाजप बरोबर होते).
हे सगळे एक्झिट पोल बद्दल आहे खरे काय ते १९ लाच समजेल असे सुरुवातीलाच लिहिलय.

मदनबाण's picture

16 Oct 2014 - 2:24 pm | मदनबाण

निवडणुकीच्या नंतर घोडे-बाजाराला फार जोर येइल असे सध्याच्या आकाड्यांवरुन तरी वाटते. पैश्याचा पुर येणार !
कमळाबाईने जर बहुमत मिळवले { ते मिळावेच} तर ढाण्या वाघाची तथाकथित डरकाळी ही फक्त वॄत्तपत्रा पुरती सिमीत होउन जाइल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup
इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

कलंत्री's picture

16 Oct 2014 - 5:08 pm | कलंत्री

या निवडणूकीनंतर अनेक नेते ( अंहकारी, भ्रष्टाचारी, असभ्य असलेले) पूढील ५ वर्षासाठी डब्यात जातील हीच एकमेव आशादायक गोष्ट वाटते.

कंजूस's picture

16 Oct 2014 - 7:47 pm | कंजूस

जो जे वांछिल --
कॉँग्रेस आणि इतर पक्षांना आपला अगदीच धोबिपछाड होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.

सेना :भाजपाला आपली मनधरणी करावी लागेल अशी त्यांची इच्छा आहे परंतू--

भाजप: त्यांनी युतीचा गांभिऱ्याने विचार केला आहे त्यांना युती नकोच आहे मिळाली सरळ सत्ता तरच हवी आहे नाहीतर राष्ट्रपती राजवट आणतील.

थोडक्यात मतदारराजाच घाबरलेला आहे, पक्ष नाहीत.

स्वप्नज's picture

17 Oct 2014 - 7:03 am | स्वप्नज

माझा अंदाज -
भाजप ९५-१००
सेना जवळपास ८०
कॉंग्रेस ६०
रा.कॉं. ४०
..

अर्धवटराव's picture

17 Oct 2014 - 7:24 am | अर्धवटराव

एक नवीन आआप तयार होईल महाराष्ट्रात... शिव आआप सेना... व दिल्ली सारखा प्रयोग महाराष्ट्रात पण होईल :)

कपिलमुनी's picture

17 Oct 2014 - 1:11 pm | कपिलमुनी

भाजप : ११०
शिवसेना : ७५
काँ : ४३
रा काँ ५२
मनसे ३
इतर ५

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Oct 2014 - 5:44 pm | भाग्यश्री कुलकर्णी

भाजप राष्टवादी युती व्हायची भिती वाटते मला.भाजपा स्पष्ट बहुमत का कुणास ठाउक अशकय वाटतेय.बहुदा जनतेच्या पैशाचा अपव्यय मध्यवर्ती निवडणुक भविष्यात होइल असे झाले तर..आणि एवढ्या चिखलफेकीनंतर भाजप सेना एकत्र आली तर.खरच राजकारण आहे हे ,याची किमान मला जाणीव होइल..छ्या ह्या फोनवर टायपायला लयी येळ लागतो ब्वा.म्हणुन मी वाचनमात्र असतेय भो.